TechRepublic Blogs

Tuesday, April 30, 2024

समाधान

 🌿🌷  *।।नामप्रभात ।।*  🌷🌿


*श्रीराम!* 🙏🏻


ज्याचे मन समाधानात आहे त्याचे शरीर कसेही असले तरी चालेल. समाधानालाच खरे महत्त्व आहे.


अर्जुनाने भगवंताला आपल्या बाजूला घेतले आणि त्यामुळे त्याचे जे समाधान टिकले ते काही कौरवांचे टिकले नाही.


"आणखी काही नको" हे पूर्णत्वापासून आले तरच समाधान होईल; कारण समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव होय!


🌿🌷  *।। श्रीमहाराज ।।*  🌷🌿

Monday, April 29, 2024

परमार्थ

 ज्ञानमार्ग काय किंवा कर्ममार्ग काय दोघांनाही अनुभव सारखाच. शेवटी हे दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी येतात. एकाचा स्वयंपाक सिद्ध झाला आहे. ज्ञानमार्ग हा सिद्ध भोजन आहे. कर्ममार्ग्याचं भोजन साध्य होत आहे. पण भोजन झाल्यावर तृप्ती सारखीच असते दोघांना. फक्त ज्ञानमार्गी माणसाचा आणि सांख्यमार्गी माणसाचा अधिकारच वेगळा असतो. आपण गुरुकडे जातो. ते आपला स्वीकार करतात आणि आपला मार्ग ओळखतात आणि त्याप्रमाणे वागवतात. एकदा पु.श्री.रामदास स्वामी एकाकडे जेवायला गेले होते. तेथे एक मुलगा रांगोळ्या घालीत होता. त्याने सुंदर रांगोळ्या घातल्या.

 समर्थानी त्या  मुलाबद्धल चौकशी केली. त्या गृहस्थानी सांगितले हा माझ्या विधवा बहिणीचा मुलगा आहे. शांत आहे. समर्थ त्याच्या आईला म्हणाले " हा मुलगा आम्हाला देता का ?" त्या बाईंनी हा मुलगा दिला तोच पुढे कल्याणस्वामी झाला. काय कमालीची निष्ठा होती ह्या पुरुषाची. 

अलीकडच्या काळातील पु.श्री.विवेकानंद. पु.रामकृष्णांना अन्ननलिकेचा कॅन्सर झाला होता. त्यांच्या थुकीतून रक्त पु यायचं. ते ते एका ग्लासात टाकायचे. तो ग्लास भरला तर शिष्यांना म्हणाले की हा ग्लास बाहेर दूर नेऊन टाका.तर विवेकानंदांनी तो ग्लास घेतला आणि पिऊन टाकला. काय त्यांची अर्पण बुद्धी असेल. गुरूला देणं म्हणजे काय असेल. हा ज्ञानमार्गाचा अधिकारी. पाहता पाहता तद्रूपता पावतो. हा माझा देह तुझा आहे , तू त्याचं काय वाटेल ते कर. म्हणून  गुरूची आवड , कमालीची आवड हा परमार्थ आहे. पु.श्री.कल्याणस्वामींच एक वचन आहे " मज आवडतो मम स्वामी | 

निशिदींनी अंतर्यामी || रात्रंदिवस मला त्या माझ्या गुरुचि आठवण आहे.

Sunday, April 28, 2024

नामस्मरण

 पू.श्री.गुरुदेवांच्या मुलाचे डिसेंबर १९१६ मध्ये निधन झाले. त्यानंतर १९१८ मध्ये जगामध्ये ईनफ्लुएनझा साथीचा ताप या  साथीने उच्छ्याद मांडला होता. त्यावेळी गुरूदेवांचा मुक्काम पुणे येथे होता. पुण्याला पण या साथीच्या तापाने वेढले होते. 

त्या साथीत गुरुदेवांच्या पत्नीचे सप्टेंबर १९१८ मध्ये निधन झाले याचे गुरुदेवांना फार दुःख झाले. प्रसंगानुरूप  श्री.गुरुदेव एका गुरुबंधुला म्हणाले *" ती सद्गतीला गेली असे मला दिसले. तिला वाचविता आले असते. तसा शब्द देवाजवळ टाकला असता तर परत फिरला नसता इतकी किंमत माझ्या शब्दाला देवाजवळ होती. पण तसा शब्द टाकणं योग्य नव्हे. देव करतो ते सर्व कल्याणकारी आहे अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे. म्हणू मी तुझ्या इच्छेला येईल तेच होऊ दे. 

अशी प्रार्थना केली."* पुढे  पत्नीच्या निधनानंतर तीनच आठवड्यांनी ऑक्टोबर १९१८ मध्ये त्याच साथीच्या रोगात गुरुदेवांच्या आईंना देवाज्ञा झाली. त्यांच्या आईचे निर्याण झाले तेव्हा गुरुदेव दासबोधातील १२ वा समास वाचीत होते. त्यानंतर झालेल्या परमार्थ बैठकीत (सिटींग) मध्ये गुरुदेव म्हणाले *आई मृत्युशय्येवर पडली असता मी देवाची प्रार्थना केली  "देवा तुझ्या मनात असेल तर तिला राहू दे , नसेल तर घेऊन जा. माझी आई उध्दरून गेली. तिच्या चितेवर शेष (नाग) नाचताना पाहिला. शेवटपर्यंत ती नामस्मरणात होती." 

पुढे ते एकदा आई संदर्भात म्हणाले " एकवेळ देव मिळवणं सोप आहे पण आई मिळणं फार कठीण आहे."* *"देवाच्या इच्छेने व्हावे "* या निरपेक्ष वृत्तीचा स्वीकार त्यांनी केला होता. या तीन आघाता नंतर श्री.गुरुदेव एकाकी झाले. या काळात गुरूदेवांचा रोजचा कट्टाचा नेम सात तासांचा झाला होता. तो अधिक व्याकुळतेने व भावपूर्णतेने चालू होता.

Saturday, April 27, 2024

शक्ती

 जेवढे नामस्मरण कमी तेवढ्या अडचणी जास्त. जेवढे नामस्मरण जास्त तेवढी आपली शक्ती जास्त. या नामस्मरणाने जी शक्ती निर्माण झाली तीच जीवनाचा आधार. हीच शक्ती सर्व संकटांना दूर करते.


हनुमानजीनी समुद्रावरून जाताना कित्येक अडचणी आल्या पण त्यांच्या मनात श्रीरामाचे स्मरण होते त्यामुळे या अडचणीतून ते पार झाले.


केव्हाही काहीही घडू शकते पण यावर उत्तर उपाय म्हणजे नामस्मरण. पण आपलं नाम घेण कधी कधी स्वार्थी असते. ते श्रीमहाराजांशी एकरूप होत नाही कारण आपली शरणागती कमी पडते. शरणागती ठेवून नामस्मरण केले की सर्वयात्रा, परिक्रमा या एक नामस्मरणातचआहेत.. फक्त तो भाव मात्र हवा.. यात्रेत जर मन प्रपंचात असेल तर यात्रा करून अनुभव येणार नाही पण प्रपंचात राहून मन यात्रा करत असेल तर ती यात्रा, परिक्रमा किंवा अजून काही एका नामात मिळेल.. जे काही मिळवायचे आहे ते एका नामाने साध्य होईल...


!! श्री महाराज !!


!!श्रीराम जयराम जय जय राम!!

!!श्रीराम जयराम जय जय राम!!

!!श्रीराम जयराम जय जय राम!!

!!श्रीराम जयराम जय जय राम!!


          !! श्रीराम समर्थ!!

Friday, April 26, 2024

संगती

 चिंतन 

      श्रीराम,

        प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी वेळ एकदा तरी येते जेव्हा ती खुप निराश होते आणि नैराश्यात जाते. काही दुःख किंवा एखाद्या वाईट घटनेमुळे काही काळ असे होणे सामान्य गोष्ट आहे. परंतु जर ही परिस्थिती बरेच दिवस अशीच राहिली तर ते नैराश्याचे लक्षण असू शकते. वेळेवर नियंत्रण न आणल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. मग हे टाळण्यासाठी काय करावे? तर नियमित झोप घ्यावी. सकारात्मक बोलायचे, वाचायचे, ३०ते४० मिनिटे व्यायाम करायचा, ध्यान, नामस्मरण करायचे. लोकांना मदत करावी. सतत उद्योगात गुंतलेले असावे. हे झाले डाॅक्टरी सल्ले.

           हेच आपल्याला संत हरिपाठातून आणि मनाच्या श्लोकातून सांगतात. तसेच कायम संतांच्या संगतीत रहा असे सांगतात म्हणजे आपला संसार सोडून संन्यास घेऊन त्यांच्या संगतीत रहा असे नाही तर संतांच्या विचारांच्या संगतीत राहता आले पाहिजे.

सदा संगती सज्जनाची करावी.

                         ||श्रीराम ||

Thursday, April 25, 2024

संवाद

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*पू. बाबा - श्रीमहाराज देहात असतांना गंगूबाई नांवाच्या एक बाई येथे स्वयंपाकघरात काम करत असत. स्वयंपाक आणि इतर काम झाल्यावर शेवटी ब्रह्मानंद महाराजांबरोबर त्या जेवायला बसत असत. एक दिवस श्रीमहाराजांनी त्यांना त्यांच्या पंगतीला जेवायला बसायला सांगितले. त्यांनी लक्ष दिले नाही म्हणून श्रीमहाराजांनी पुन्हा गंगूबाई, आज माझ्याबरोबर जेवायला बसा म्हणून सांगितले. पण तरीदेखील शेवटी ब्रह्मानंद महाराजांबरोबर बसायचे म्हणून त्या जेवायला बसल्या नाहीत. नंतर जेवायला बसल्या तेव्हां श्रीमहाराजांची आज्ञा आपण पाळली नाही ही मोठी चूक केली हे लक्षात येऊन त्यांना रडू आले. पण आता संधी हुकली होती. आज्ञापालन अतिशय महत्त्वाचे आहे. अगदी लहानसहान बाबतीत देखील गुरुआज्ञेबाहेर जाता कामा नये.*


*-- अध्यात्म संवाद*

Wednesday, April 24, 2024

पॅकेज*

 *अहो आजकाल फक्त पॅकेज* *पॅकेज म्हणतात तरूण मुलं मुली त्याप्रमाणें परमेश्वरप्राप्ती पॅकेज*

..... संकलन आनंद पाटील 

*एक तरुण मुलगा आपल्या आजोबांना विचारत होता, की "आजोबा रात्रं दिवस तुम्हीं देवाचाचं बोलत असता,* *नामजपच करत असता, यांनी तुम्हाला काय मिळतं? इतकं काम* *जर मी जिथं काम करतो त्या कंपनीसाठी केलं असतं तर अजुन भरपुर पगार वाढवून* *मिळाला असता? आजोबा आता माझं पॅकेज किती आहे माहित आहे का? 12.00लाख रुपये! आणि तुम्ही बघा? तेंव्हा ते* *आजोबा हसुन म्हणाले, 'देवांनी आम्हाला जे पॅकेज दिलं अहे तसं पॅकेज जगात कोणीच देऊ शकत नाही. तेंव्हा तो मुलगा अगदी आतुरतेने विचारत होता* *की,"आजोबा ते कोणतं पॅकेज लवकर सांगा म्हणजे मी सुद्धा त्याचा विचार करेन". त्यावर आजोबांनी स्मित हास्य करत म्हणाले,*


*"परमेश्वरप्राप्ती हे एक आकर्षक पॅकेज आहे. त्यामधे काय काय येतं ते बघूया."*

*1.    अखंड आनंद. उकळ्या फुटत ओसंडून जाणारा आनंद.*

*2.    अखंड तृप्ती. बदलत्या परिस्थितीत देखील सदैव तृप्त अवस्था.*

*3.    अखंड समाधान. परिस्थितीत बदलता देखील हंव हंवं, नको नको ची वखवख नाही.*

*4.    जगणं फक्त वर्तमान काळातच. भूकाळाचा ताप नाही. भविष्याची चिंता नाही. घाबरायचं कारणच नाही. परिणाम स्वरूप भय आणि चिंता गायबच.*

*5.    सर्वप्रकारच्या बंधनातून मुक्त अवस्था.*

*6.    संपूर्ण मोकळं विश्वाचं ज्ञानभांडार. कुठल्याही विषयाचं ज्ञान केव्हांही उपलब्ध. इच्छा असेल तेवढं लुटा. अमर्याद लुटा.*

*7.    शिवाय सोबत स्वत:च्या तसेच परमेश्वराच्या विश्वव्यापक स्वरूपाची अनुभूती.*

*मनुष्य ज्याच्या करता जीवाचा आटापीटा करतो. ते संगंळंच एका पॅकेज मधे. आणखी कांही मिळवण्यासारखं रहातच नाही.*

  *हे ऐकल्यानंतर तो मुलगा एकदम गंभीर होऊन आजोबांकडे पाहत राहिला. संकलन आनंद पाटील*

Tuesday, April 23, 2024

सुकृतिन्

 *॥श्रीहरिः॥*


मायेला जिंकण्यासाठी जे सज्जन परमात्म्याला भजतात. ते कोण हे भगवंत आता सांगतात,


*-----------------------------*

॥ॐ श्री परमात्मने नमः ॥

अथश्रीमद्भगवद्गीता सप्तमोध्याय:


*चतुर्विधा भजन्ते मां* 

*जनाः सुकृतिनोऽर्जुन ।*

*आर्तो जिज्ञासुरर्थार्थी*

*ज्ञानी च भरतर्षभ ॥*

*॥७.१६॥*


(दैनंदिन श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञानयोग ७.१६)


*भावार्थ :- हे भरतवंशी पुरुषांत श्रेष्ठ अर्जुना ! 'अर्थार्थी' 'आर्त' 'जिज्ञासु' आणि 'ज्ञानी' अर्थात् 'निष्कामी' असे चार प्रकारांचे पुण्यशील भक्तजन मला भजतात.*


*-----------------------------*


*'सुकृतिन् ' कोण?*


'दुष्कृतिन्' (दुष्ट प्रवृत्तीचे लोक) ईश्वराला भजत नाहीत, हे सांगून झाल्यावर ‘सुकृतिन्' भजतात हे या श्लोकात सांगितले आहे. शास्त्रानुसार जे कर्मे करतात, जे सत्कर्मे करतात ते सुकृतिन् होत. हे चार प्रकारांचे असतात. 


*आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू व ज्ञानी!*

 

'इन्द्रवर्षेने व्याकुळ झालेले व्रजवासी, वस्त्रहरणाचा भयंकर प्रसंग कोसळलेली द्रौपदी, ग्राहग्रस्त गजेन्द्र, जरासन्धाच्या कैदेत पडलेले राजे इत्यादी उदाहरणे *आर्त भक्तांची* होत.' 


'भगवत्तत्त्व जाणण्याची इच्छा करणारे मुचकुन्द, उद्धव, श्रुतदेव इत्यादी *जिज्ञासू भक्त* होत.' 


'इहलोक वा परलोकातील सुखाची इच्छा करणारे सुग्रीव, बिभीषण, ध्रुव इत्यादी *अर्थार्थी भक्त* होत'  आणि 


'सनकादि ऋषी,नारद, प्रल्हाद, शुकाचार्य इत्यादी *ज्ञानी भक्त* होत.'


*भक्तप्रकार भगवंतांनी भक्तांचे जे चार प्रकार सांगितले आहेत, ते उदाहरणासहित समजावून घेऊ या.*


*१) आर्तभक्त -* 

आर्त भक्तीचे उत्तम उदाहरण म्हणजे *द्रौपदी* होय. 


ज्या ज्या वेळेला तिच्यावर संकटे आली, त्या त्या वेळेला तिने आर्त होऊन भगवंतांनाच साद घातली. पांडवांना वनवास झाल्यावर युधिष्ठिराने वनात सूर्याची स्तुती गायिली. सूर्याने प्रसन्न होऊन त्याला भोजनाचे अक्षयपात्र दिले. 


*सूर्यदेव युधिष्ठिराला म्हणाला,*

'जी तुझी इच्छा आहे, ते सर्व तू मिळवशील. मी तुला बारा वर्षे अन्न देईन. हे राजा! मी दिलेले,वाढण्याला योग्य असलेले तांब्याचे पात्र तू घे. 


'हे सुव्रता! या पात्राने जोपर्यंत द्रौपदी वाढेल, तोपर्यंत स्वयंपाक घरात फल, मूल, आमिष आणि भाजी हे चार प्रकारचे संस्कारलेले अन्न तुला अखंड मिळत राहील. आजपासून चौदाव्या वर्षी तुला पुन्हा राज्य मिळेल.' 

(महा. वन. ३.७१-७३)


*महात्मा पांडव* अशाप्रकारे वनात राहून मुनींच्यासह चित्रविचित्र कथांद्वारा मनोरंजन करीत होते, द्रौपदी जोपर्यंत भोजन करीत नसे,

तोपर्यंत सूर्याने दिलेल्या अक्षयपात्राने अन्न प्राप्त होत असे.


*जेव्हा* दुर्योधनाने ऐकले, की ज्याप्रमाणे नगरातील निवासी राहतात, त्याप्रमाणे पांडव तर वनात सुद्धा त्याचप्रकारे दान, पुण्यकर्म

करीत आनंदात रहात आहेत. तेव्हा त्याने त्यांचे अनिष्ट करण्याचा विचार केला. अशाप्रकारे विचार करून कूटकारस्थानविद्येत निपुण

असलेल्या कर्ण व दुःशासन इत्यादींच्या बरोबर जेव्हा तो दुष्ट धृतराष्ट्रपुत्र निरनिराळ्या उपायांनी पांडवांना संकटात टाकण्याच्या युक्तीचा विचार करू लागला, 


*त्यावेळी* महायशस्वी, धर्मात्मा, तपस्वी, महर्षि दुर्वास ऋषि स्वत:च्या दहा हजार शिष्यांना घेऊन त्या ठिकाणी स्वेच्छेने आले.


परमक्रोधी *दुर्वास मुनि* आलेले पाहून बंधूंसह श्रीमान राजा दुर्योधनाने आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवून, नम्रपणे, विनीत भावाने त्यांचा सत्कार करून, त्यांना निमंत्रित केले. दुर्योधनाने स्वतःसेवकाप्रमाणे त्यांच्या सेवेत उभे राहून त्यांची सेवा केली. मुनिश्रेष्ठ दुर्वास कित्येक दिवसपर्यंत तिथेच राहिले. राजा दुर्योधन त्यांच्या शापाला घाबरून, रात्रंदिवस आळस सोडून, त्यांच्या सेवेत तत्पर राहिला. तेव्हा ते मुनिराज त्याच्यावर विशेष प्रसन्न झाले. आणि असे म्हणाले, 


*'मी तुला वर देण्याची इच्छा करीत आहे. राजा! तुझे कल्याण असो. तुझ्या मनात जी इच्छा आहे, त्यासाठी वर माग. मी प्रसन्न झाल्यानंतर जी धर्मानुकूल गोष्ट असेल, ती तुला अलभ्य राहणार नाही.'*


शुद्ध अंत:करण असणाऱ्या महर्षि दुर्वासाचे हे वचन ऐकून, दुर्योधनाने मनातल्या मनात असे मानले, की जणु आपला पुनर्जन्म झाला आहे. दुर्वास मुनि संतुष्ट झाले तर काय मागावे या गोष्टीचा विचार कर्ण व दुःशासन इ. सह आधीच निश्चित झाला होता, त्या निश्चयाला अनुसरून दुष्टबुद्धि दुर्योधनाने अत्यंत प्रसन्न होऊन हा वर मागितला, की 


*हे ब्रह्मन्! आमच्या कुलात महाराज युधिष्ठिर सर्वात ज्येष्ठ व श्रेष्ठ आहे. यावेळी तो धर्मात्मा पांडुपुत्र वनात वास्तव्य करीत आहे. युधिष्ठिर मोठा गुणवान व सुशील आहे. ज्याप्रमाणे आपण माझे अतिथि झालात, त्याप्रमाणे आपण शिष्यांसह त्यांचे अतिथि व्हावे.* 


जर आपली माझ्यावर कृपा असेल तर माझी अशी प्रार्थना आहे, की आपण त्या ठिकाणी अशावेळी जावे, की जेव्हा अत्यंत सुंदर, सुकुमार यशस्विनी राजकुमारी द्रौपदी, सर्व ब्राह्मण व पाच पति यांचे भोजन झाल्यानंतर आणि स्वत:चेही भोजन आटोपल्यावर सुखाने बसून विश्रांती घेत असेल. 


'तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे मी तसेच करीन.' 


दुर्योधनाला असे म्हणून विप्रश्रेष्ठ दुर्वास जसे आले होते, तसे निघून गेले. त्यावेळी दुर्योधनाने स्वत:ला कृतार्थ मानले. आणि कर्णाचा हात आपल्या हातात घेऊन, तो अत्यंत प्रसन्न झाला. कर्णाने सुद्धा बंधूंसह राजा दुर्योधनाला म्हटले,


'हे कुरुपुत्रा! मोठ्या भाग्यानेच आपले काम झाले. तुझा उत्कर्ष होत आहे, ही देखिल मोठी भाग्याची गोष्ट आहे. तुझा शत्रु संकटाच्या अपार महासागरात बुडाला, ही सुद्धा सौभाग्याची गोष्ट आहे. पांडव दुर्वास ऋषींच्या क्रोधाग्नीत पडले आहेत आणि आपल्याच महापापांमुळे दुस्तर नरकात जात आहेत.'


*त्यानंतर* एके दिवशी पांडव भोजन करून सुखाने बसले आहेत आणि द्रौपदीसुद्धा भोजन करून विश्रांती घेत आहे, असे जाणून दहा हजार शिष्यांसह दुर्वास ऋषि त्या वनात आले. 


श्रीमान् राजा युधिष्ठिर अतिथिला पाहून बंधूंसह त्यांना सामोरा गेला. तो आपली मर्यादा कधीही सोडत नव्हता. त्याने त्या अतिथींना आणून श्रेष्ठ आसनावर आदराने बसविले, आणि हात जोडून नमस्कार केला. नंतर यथायोग्य पद्धतीने पूजा करून त्यांना, आतिथ्यासाठी निमंत्रित केले आणि म्हणाले,


*'भगवन्! आपले नित्यकर्म पूर्ण करून लवकर यावे.'*


हे ऐकून ते निष्पाप दुर्वास मुनि आपल्या शिष्यांसह स्नान करण्यासाठी निघून गेले. त्यांनी या गोष्टीचा थोडाही विचार केला नाही, की यावेळी शिष्यांसह हे पांडव, मला भोजन कसे देऊ शकतील? सर्व ऋषिमंडळींनी पाण्यात स्नान केले आणि ते ध्यान करू लागले. 


*यावेळी* युवतींमध्ये श्रेष्ठ असलेल्या पतिव्रता द्रौपदीला अन्नाची मोठी चिंता निर्माण झाली. जेव्हा बराच विचार केल्यानंतर सुद्धा तिला कोणताही उपाय सुचला नाही, तेव्हा मनातल्या मनात कंसनिषूदन, आनंदकंद भगवान श्रीकृष्णाचे तिने स्मरण केले.


'हे कृष्णा! हे महाबाहू कृष्णा! हे देवकीनंदना! हे अविनाशी वासुदेवा!  तूच संपूर्ण जगाचा आत्मा आहेस. हे अविनाशी प्रभो! तूच या विश्वाची उत्पत्ति व संहार करणारा आहेस. पूर्वी कौरवसभेत दुःशासनाच्या हातून ज्याप्रमाणे तू मला वाचविले होतेस, त्याचप्रकारे या चालून आलेल्या संकटातूनही माझा उद्धार कर.'


द्रौपदीने असे स्तवन केल्यानंतर अचिंत्यगती, परमेश्वर, देवाधिदेव, जगन्नाथ, भक्तवत्सल, भगवान केशवाला हे समजले की, संकट आले आहे. तो त्वरेने तेथे आला. भगवान कृष्णाला आलेला पाहून, द्रौपदीला मोठा आनंद झाला. तिने त्याला नमस्कार करून दुर्वास ऋषींच्या आगमनादिकाचा सर्व वृत्तांत सांगितला.


*तेव्हा भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीस म्हटले,* 

'हे कृष्णे! यावेळी मला फार भूक लागली आहे. मी भुकेने अत्यंत व्याकुळ झालो आहे. प्रथम मला लवकर भोजन दे. नंतर सर्व व्यवस्था करशील.' 


श्रीकृष्णाचे हे वचन ऐकून द्रौपदीला मोठी लज्जा वाटली. आणि ती म्हणाली, 'भगवन्! सूर्यनारायणाने दिलेल्या पात्रातून मी भोजन केले नाही तोपर्यंत भोजन मिळते. हे देवा! आज तर मीही भोजन केले आहे. म्हणून आता त्यामध्ये अन्न राहिले नाही.'


हे ऐकून कमलनयन भगवान द्रौपदीला पुन्हा म्हणाला. हे कृष्णे! मी तर भूक व श्रमाने व्याकुळ झालो आहे. आणि तुला थट्टा सुचते आहे! ही थट्टेची वेळ नाही. लवकर जा आणि मला ती थाळी दाखव.' 


अशा प्रकारे हट्ट करून भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीकडून ती थाळी मागविली. त्या थाळीच्या गळ्याला थोडी भाजी लागली होती. ती पाहून, श्रीकृष्णाने ती खाऊन टाकली आणि द्रौपदीला म्हटले, 


*'या भाजीमुळे संपूर्ण विश्वाचा आत्मा यज्ञभोक्ता, सर्वेश्वर भगवान् श्रीहरी तृप्त आणि संतुष्ट होवो.."*


एवढे बोलून,भगवान श्रीकृष्ण सहदेवाला म्हणाला, 


'तू लवकर जाऊन मुनींना भोजनासाठी घेऊन ये. सहदेव देवनदीत स्नानासाठी गेलेल्या त्या दुर्वास आदि मुनींना भोजनास बोलविण्यासाठी ताबडतोब गेला. ते मुनिलोक त्यावेळी पाण्यात उतरून अघमर्पण मंत्राचा जप करीत होते. अचानक त्यांना पूर्ण तृप्तीचा अनुभव येऊ लागला, वारंवार अन्नरसाच्या ढेकरा येऊ लागल्या. हे पाहून ते पाण्याबाहेर आले आणि परस्परांकडे पाहू लागले. ते सर्व मुनि दुर्वासांकडे पाहून म्हणाले,


*'हे ब्रह्मर्षी !'* 

'आम्ही लोक राजा युधिष्ठिराला स्वयंपाक बनविण्याची आज्ञा देऊन स्नान करण्यासाठी आलो होतो. परंतु यावेळी एवढी तृप्ती होत आहे, की अन्न गळ्यापर्यंत आल्यासारखे वाटते. आता आम्ही कसे भोजन करावे?' 


'आम्ही जो स्वयंपाक पांडवांकडून तयार करविला आहे, तो वाया जाणार. यासाठी आता आम्ही काय करावे?'


*भगवंतांची लीला दुर्वास ऋषींनी जाणली. ते म्हणाले,* 

'खरे पाहिले असता, स्वयंपाक तयार करावयास लावून आम्ही राजर्षी युधिष्ठिराचा मोठा अपराध केलेला आहे. कदाचित् असे न होवो, की पांडव आमच्याकडे क्रूर दृष्टीने पाहून आम्हाला जाळतील.' 


*'हे ब्राह्मणहो!'* 

'परम बुद्धिमान राजा अंबरीषाच्या प्रभावाचे स्मरण करून,ज्यांनी भगवान् श्रीहरीच्या चरणाचा आश्रय घेतला आहे, त्या भक्तजनांना मी नेहमी घाबरत असतो. सर्व पांडव महात्मे, धर्मपरायण, विद्वान, शूरवीर, व्रतवारी आणि तपस्वी आहेत. ते नेहमी सदाचारपरायण असून भगवान् वासुदेवाला आपला फार मोठा आधार मानणारे आहेत. पांडव क्रुद्ध झाल्यानंतर आम्हाला अशाप्रकारे भस्म करून टाकतील, की जशी कापसाच्या ढिगाऱ्याला आग. म्हणून हे शिष्यांनो, आता पांडवांना विचारताच निघून जा.'


गुरु दुर्वास मुनींचे हे भाषण ऐकून, पांडवांना अत्यंत घाबरून ते सर्व ब्राह्मण दाही दिशांना पळून गेले. सहदेवाने जेव्हा देवनदीत त्या श्रेष्ठ मुनींना पाहिले नाही, तेव्हा तो तेथील तीर्थात इकडे तिकडे शोध घेत फिरू लागला. तेथे राहणाऱ्या तपस्वी मुनींच्या मुखातून, त्यांच्या पळून जाण्याची वार्ता ऐकून सहदेव युधिष्ठिराकडे परत आला. आणि त्याने सर्व वृत्तांत कथन केला. त्यानंतर मनाला ते सर्व पांडव त्यांच्या परत येण्याच्या आशेने बराच काळपर्यंत वाट पहात राहिले. पांडव विचार करू लागले, की


'दुर्वासमुनि अचानक अर्ध्या रात्री येऊन आम्हाला त्रास देतील, दैवाने प्राप्त झालेल्या या महान् संकटातून आमचा उद्धार कसा होईल?' अशा विवंचनेत असताना त्यांची ही दशा पाहून भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिर आदि सर्व पांडवांना प्रत्यक्ष दर्शन देऊन म्हटले,


‘हे कुंतीपुत्रांनो! अत्यंत क्रोधी महर्षि दुर्वास ऋषिंकडून आपणावर संकट आले आहे, हे जाणून द्रौपदीने माझे स्मरण केले होते. यासाठीच मी त्वरेने येथे येऊन पोहोचलो. आता तुम्हा लोकांना दुर्वास ऋषिंकडून थोडेही भय उरले नाही. ते तुमच्या तेजाने घाबरून आधीच पळून गेले आहेत. जे लोक नेहमी धर्मतत्पर असतात, ते कधीही संकटात पडत नाहीत. मी आता तुमच्याकडे जाण्याची आज्ञा मागत आहे. येथून मी द्वारकानगरीला जाईन. आपले निरंतर कल्याण असो.'। 


भगवान श्रीकृष्णाचे हे भाषण ऐकून द्रौपदीसह पांडवांचे चित्त स्वस्थ झाले. त्यांची सर्व चिंता दूर झाली आणि ते भगवान श्रीकृष्णाला म्हणाले,


‘हे विभो! हे गोविंदा! तुला आमचा सहाय्यक आणि संरक्षक मिळवून आम्ही मोठमोठ्या तरण्यास कठीण अशा संकटातून, अशा प्रकारे पार पडलो आहोत, की ज्याप्रमाणे महासागरात बुडणारी माणसे जहाजाचा आधार घेऊन समुद्र पार करतात. तुझे कल्याण असो. अशाप्रकारे भक्तांचे हितसमाधान करीत रहा.'


पांडवांनी असे म्हटल्यावर भगवान श्रीकृष्ण द्वारकेला गेले.त्यानंतर द्रौपदीसह पांडव प्रसन्नचित्त होऊन एका वनातून दुसऱ्या वनात भ्रमण करीत सुखाने राहू लागले. अशा प्रकारे दुष्ट धृतराष्ट्रपुत्रांनी वनवासी पांडवांवर अनेक वेळा छळकपटाचा प्रयोग केला, परंतु तो निष्फळ झाला.


(महा. वन. अध्याय २६३)



*२) अर्थार्थी भक्त -*

*ध्रुवाचे* उदाहरण आदर्श अर्थार्थी भक्त म्हणून दिले जाते. स्वायंभुव मनु आणि महाराणी शतरूपा यांच्या पोटी प्रियव्रत आणि उत्तानपाद हे दोन पुत्र जन्मले. उत्तानपादाला सुनीति (नावडती) आणि सुरुचि (आवडती) अशा दोन पत्नी होत्या. एकदा सुनीतीचा पुत्र ध्रुव राजाजवळ आला. त्यावेळी सुरुचीचा पुत्रयउत्तम, राजाच्या मांडीवर होता. ध्रुवालाही वडिलांच्या मांडीवर बसावेसे वाटले. परंतु सुरुचीने त्याला बसू दिले नाही. अपमान झालेला ध्रुव आईकडे रडत परतला. 


सुनीति म्हणाली, जा.' 'बाळा! तू दुसऱ्याचे अमंगल चिंतू नकोस. तू श्रीहरीला शरण जा अपमानित झालेला ध्रुव वनात आला. तिथे त्याची नारदांशी भेट झाली. ध्रुव त्यांना म्हणाला,


'ब्रह्मन्! त्रैलोक्यात सर्वश्रेष्ठ असलेल्या पदावर विराजमान होण्याची माझी इच्छा आहे.'


नारदांनी त्याला, 

*'ॐ नमो भगवते वासुदेवाय'* 

हा मंत्रोपदेश केला. आपल्या तपश्चर्येने ध्रुवाने भगवंतांना प्रसन्न केले. भगवान् विष्णूंनी त्याला ध्रुवलोकाचे राज्य देऊन चक्रवर्ती सम्राट केले.



*३) जिज्ञासू भक्त -* 

भगवत् तत्त्व जाणण्याची *उद्धवाची* तीव्र जिज्ञासा होती. भगवंतांनी ती पूर्ण केली.भागवताच्या अकराव्या स्कन्धाचे ७ ते २९ अध्याय म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाला केलेला उपदेश होय. हा उद्धव भगवान श्रीकृष्णांचा सखा आणि मंत्री होता. द्रौपदीच्या स्वयंवरात व रैवतक पर्वतावरील उत्सवात हा सामील होता. बृहस्पतिकडून याला विद्या प्राप्त झाल्या होत्या. शाल्वाने द्वारकेवर आक्रमण केले, त्यावेळी श्रीकृष्णांच्या अनुपस्थितीत याने नगरीचे रक्षण प्राप्त केले. भगवंतांकडून आत्मविद्या प्राप्त झाल्यावर हा तपश्चर्येसाठी बदरिकाश्रमात गेला.


*४) ज्ञानी भक्त -* 

परमेश्वर स्वरूपाच यथार्थ ज्ञान होऊनही फलाशा-मानमरातबाच्या अपेक्षेविना जो झटतो तो खरा ज्ञानी भक्त. अशा भक्ताला परमेश्वरापाशी काहीच मागायचं नसतं.जो निष्काम बुद्धीन भक्ती करत रहातो, ईश्वरीविचार जनसामान्यांमधे नेण्यासाठी कृतार्थ झालेला हा ज्ञानी भक्त केवळ भक्तीसाठी भक्ती करीत असतो. कलावंत जसा कलेसाठी कला जोपासतो तसा हा ज्ञानी भक्त भक्तीसाठी भक्ती जोपासतो. तो शीलवान असतो.


*खरा ज्ञानी भक्त हा शीलवान, शीलवंत असतो. धर्म, सत्य, वृत्त, बल आणि लक्ष्मी यांच मूळ कारण शील असतं. इंग्रजीमध्ये ज्याला (character) चारित्र्य म्हणतात. शील हे किती महत्त्वाचे असते ते खालील भक्त प्रह्लादाच्या कथेवरून लक्षात घेता येते...*


*शीलवान भक्त प्रल्हादानं* इंद्राचं राज्य जिंकून घेतलं. गेलेलं राज्य परत कसं मिळवावं या विवंचनेत इंद्र पडला असताना देवगुरू बृहस्पतींनी त्याला उपदेश केला, 


*'तू प्रल्हादाचं शील मागून घे.'*


इंद्र ब्राह्मणवेशात भक्त प्रल्हादाकडे गेला आणि त्याची सेवा करू लागला. भक्त प्रल्हाद प्रसन्न झाला आणि त्यानं त्या ब्राह्मणाला 'वर' मागायला सांगितलं. इंद्र म्हणाला, 'मला बाकी काहीही नको; फक्त तुझं शील दे.'


शील देताच प्रल्हादाच्या शरीरातून एक तेज बाहेर पडलं. प्रल्हादानं त्या तेजाला विचारलं, 'तू कोण आहेस

*'मी शील आहे...'*


तेवढ्यात दुसरं एक तेज भक्त प्रल्हादाच्या शरीरातून बाहेर पडलं. 

'तू कोण आहेस,' असं प्रल्हादानं विचारताच ते तेज म्हणालं, 

*'मी धर्म आहे. जिथे शील आहे तिथेच धर्म असतो.'*


त्यानंतर तिसरं तेज बाहेर पडताच प्रल्हादानं तसाच प्रश्न केला. तेव्हा ते तेज बोललं, 

*'मी सत्य आहे. जिकडे धर्म तिकडे सत्य असतं.'*


त्यानंतर चौथं तेज बाहेर पडलं. ते प्रल्हादाला म्हणालं, 

*'मी वृत्त... जिकडे सत्य तिकडे वृत्त!' वृत्त म्हणजे सद्वर्तन.*


पाचवं तेज जेव्हा बाहेर पडलं तेव्हा ते म्हणालं, 

*'मी बल आहे; वृत्त तिथे बल!'*


त्यानंतर एक स्त्री प्रल्हादाच्या शरीरातून बाहेर पडली. प्रल्हादानं तिला विचारताच ती म्हणाली, 

*'मी लक्ष्मी आहे. म्हणजे श्री: आहे. जिकडे बल असतं तिकडे मी असते. '*


शील गेल्यानंतर इंद्रानं पुन्हा प्रल्हादाच्या राज्यावर आक्रमण करून गेलेलं राज्य पुन्हा जिंकून घेतलं. 


*थोडक्यात धर्म, सत्य, वृत्त, बल आणि लक्ष्मी यांच मूळ कारण शील असतं.*

शील गमावल्यामुळे आपण राज्य गमावून बसलो हे प्रल्हादाच्या ध्यानात आलं. इंद्राचं खरं स्वरूप त्याला कळून चुकलं.प्रल्हाद शीलवान होता. पण इंद्रानं त्याचं शील घेऊन त्याला पदभ्रष्ट केलं.


*भगवद्गीतेत* सांगितले आहे, या सर्व प्रकारच्या भक्तांमध्ये ज्ञानी भक्त श्रेष्ठ असतो. जे ज्ञानी भक्त असतात ते भगवंताच क्षराक्षर स्वरुप जाणतात आणि त्याला शरण जाऊन त्याची अनन्यभावानं भक्ती करतात. ते ज्ञानी भक्त भगवंताला अत्यंत प्रिय असतात आणि अशा ज्ञानी भक्तांना भगवंत प्रिय असतो. ज्ञानी भक्त हा भगवंताचा जणू आत्माच असतो. तो त्याच्याशी एकरूप झालेला असतो... 



*सारांश:* 

*आर्त - दुःखपीडित,* 

*जिज्ञासू - ज्ञानप्राप्तीची इच्छा बाळगणारे,*

*अर्थार्थी - द्रव्यादिक काम्यवासना मनात ठेवणारे* आणि 

*ज्ञानी - आत्मज्ञान होऊनही भक्ती करणारे असे चार प्रकारचे भक्त इथे सांगितले आहेत.*



*-----------------------------*


श्रीगीतासागर पूर्वार्ध - श्री गुरुदेव शंकर अभ्यंकर. 

श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीता भाष्य. 



*।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।*

Monday, April 22, 2024

सोंग

 श्रीराम समर्थ


               *सोंग*


         'संत तुकाराम' सिनेमात काम केलेले *रा विष्णुपंत पागनीस* श्री महाराजांस [वाणीरुप अवतारात] भेटण्यास आले. *'सिनेमात तुकारामाचे काम करीत आहे. आपला आशीर्वाद असावा.'* असे म्हणाले. *श्री त्यावर म्हणाले, 'दुसरे कोणाचेही सोंग घेतल्यास हरकत नाही, पण श्रीतुकाराम महाराजांचे काम केल्यास शेवट पर्यंत तसे वागणे जरुर आहे. घरदार सोडावयास पाहिजे असे नाही, पण भगवंतावर निष्ठा ठेवून नीतिधर्माचे आचरण ठेवणे जरुर आहे. शक्यतो भगवंताचे स्मरण करीत जावे. म्हणजे थोरामोठ्यांचे सोंग केले तरी जन्माचे कल्याण होईल.'*


         दुसरे *श्रींनी त्यास सांंगितले की, पुन्हा मात्र सिनेमात कोणाचेही काम करु नये. तुकारामाचे काम उत्तम वठले. पुढे त्यांनी दुसरी कामे केली पण ती बरोबर झाली नाहीत म्हणतात.*


         श्रीमहाराजांचे गुरु श्री तुकाराम महाराज यांचे गुरुबंधू श्रीगोचर स्वामी होते. त्यांचे शिष्य तपकीरबुवा म्हणून पंढरपुरात असत. त्यांचा अनुग्रह श्री पागनीस ह्यांनी घेतला. असा त्यांचा व श्री महाराजांचा संबंध होता. 


               *********

संदर्भाः पू तात्यासाहेब केतकर यांचे आत्मवृत्तातून

संकलन श्रीप्रसाद वामन महाजन

Sunday, April 21, 2024

प्रपंच

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩* 


*🌸  प्रवचने  ::   🌸*


*प्रपंचात  आपण  साक्षित्वाने  वागावे .*


सत्य वस्तू ओळखणे हा परमार्थ, आणि असत्य वस्तूला सत्य मानून चालणे हा प्रपंच होय. आपल्याला वस्तू दिसते ती खरी असेलच असे नाही. पण ती मुळीच नाही असे मात्र नाही; ती काहीतरी आहे. एका दृष्टीने सत्य वस्तू अशी आहे की, प्रत्येकजण जे गुण त्या वस्तूला लावतो ते सर्व गुण तिच्या ठिकाणी आहेतच, शिवाय आणखी कितीतरी गुण तिच्या ठिकाणी आहेत; म्हणून ती निर्गुण आहे. दुसऱ्या दृष्टीने ती अशी आहे की, प्रत्येकजण जो गुण तिला लावतो तो कल्पनेनेच तिच्या ठिकाणी आहे असे आपण म्हणतो; म्हणून ती वस्तू गुणांच्या पलीकडे आहे. या अर्थानेसुद्धा ती निर्गुणच आहे. जशी आपल्या देहाची रचना, तशीच सर्व सृष्टीची रचना आहे. देहामधले पंचकोश सृष्टीमध्ये देखील आहेत. फरक एवढाच की, देहामध्ये ते मूर्त आहेत तर सृष्टीमध्ये ते अमूर्त स्वरूपात आहेत. भगवंताला एकट्याला करमेना म्हणून तो एकाचा अनेक झाला. त्याचा हा गुण माणसाने घेतला. आपण हौसेसाठी आपला व्याप वाढवितो. पण फरक हा की, भगवंताने व्याप वाढविला तरी त्यामध्ये तो साक्षित्वाने राहिला, आणि आपण मात्र व्यापामध्ये सापडलो. भगवंत सुखदुःखाच्या पलीकडे राहिला, आणि आपण मात्र दुःखामध्ये राहिलो. व्यापाच्या म्हणजे परिस्थितीच्या बाहेर जो राहील त्याला दुःख होणार नाही. खरे पाहिले तर व्यापातून वेगळेपणाने राहण्यासाठीच सर्व धडपड आहे. व्याप दुःखदायक न व्हावा असे वाटत असेल तर आपण साक्षित्वाने राहायला शिकले पाहिजे.


आपण जगामध्ये व्याप वाढवितो, तो आनंदासाठी वाढवितो. पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत होय. म्हणून खरा आनंद कोठे मिळतो ते पाहावे.


जगणे म्हणजे शरीरात चैतन्य असणे होय. चैतन्य हे केवळ सच्चिदानंदात्मक आहे. म्हणून, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत स्वाभाविक आनंद असलाच पाहिजे. हा आनंद आपण भोगावा. ब्रह्मानंद आणि सुषुप्ती यांमध्ये फरक आहे. ब्रह्मानंद हा आहेपणाने आहे, तर सुषुप्तीचा आनंद हा नाहीपणाने आहे. आपल्याला झोप लागली की काय 'जाते' आणि जागे झालो की काय 'येते' हे नित्याचे असूनसुद्धा आपल्याला कळत नाही. भगवंताच्या इच्छेने सर्व होते आणि तोच सर्व करतो अशी भावना ठेवणे यासारखे समाधान नाही. कृतीमध्ये आनंद आहे, फळात किंवा फळाच्या आशेत तो नाही. नामस्मरणरूपी कृती केली असता शाश्वत आनंदाचा सहज लाभ होईल.


*८९ .   भगवंताच्या  स्मरणात  कर्तव्य  केले  की  जीवनात  आनंद  उत्पन्न  होतो .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Saturday, April 20, 2024

निरपेक्ष जप

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*🌺🙏नामप्रभात🙏🌺*


     *ऐहिक सुखासाठी नाम घेणे हे अयोग्यच , पण आई जशी मुलाने औषध घ्यावे म्हणून अगोदर गुळाचा खडा दाखवते  , त्याप्रमाणे सुखाच्या प्राप्तीसाठी नाम घेण्यास सुरुवात केली तरी हरकत नाही . नाम सतत चालू ठेवल्यावर आपोआपच निरपेक्ष जप करण्याची बुद्धी होते .*


      *🪷श्रीमहाराज 🪷*

Friday, April 19, 2024

चिंतन

 चिंतन ८९

          श्रीराम,

        संतांच्या विचारांच्या संगतीत राहिलो तर प्रपंच, संसार ह्यांची चिंता न होता हरिचे चिंतन होईल आणि मन सतत हरिसारखे प्रसन्न राहिल. प्रत्येक व्यक्ती ही आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या घटना, परिस्थिती, तसेच वस्तू आणि व्यक्ती ह्यांच्यात अडकलेली असते. जीवाला मिळणारे प्रत्येक सुख तो या चार गोष्टींवर अवलंबून ठेवतो आणि आपोआप त्यांच्या बंधनात अडकत जातो.. मग त्यातून लोभ, आसक्ती.. अपेक्षा, अहंकार तसेच मी माझे, ममत्व आणि अहंता सुरू रहाते. ह्या सगळ्याच्या हेलकाव्यात आयुष्य संपून जाते.

                     जीवनभर प्रत्येक माणूस दुसऱ्याला सुख देऊन किंवा दुःख देऊन, स्वतः सुखी होण्याचा प्रयत्न करीत असतो. अपेक्षा, अहंकार, लोभ आसक्ती अतिप्रमाणात वाढत गेली आणि प्रारब्धाच्या खेळातील दान सतत आपल्या विरुद्ध पडत गेले की नैराश्य, डिप्रेशन या आजाराचे आपण शिकार होतो.

                समर्थ सांगतात - जर आपल्याला कायमचा आनंद, कायमचे समाधान, शांतता आणि तृप्ती हवी असेल तर ती ज्याच्यापाशी अमर्याद आहे, अशा श्रीहरीचे स्मरण करावे. त्यासाठी संतांच्या संगतीत रहावे. त्यांचे विचारधन आत्मसात करावे आणि आचरणात आणावे. प्रपंच अनासक्तीने करुन व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती ह्यांच्या बंधनातून मुक्त व्हावे.

                        ||श्रीराम ||

ज्ञानयोगी

 एक पक्षी आहे, त्याला झाडावरचा आंबा खायचा आहे तर पक्षी काय करील ? तर "पक्षी उडेल आणि त्या फळाला झोंबेल. तसं माणसाला करता येणार नाही. तो या फांदीवरून त्या फांदीवर जाईल आणि शेवटी ते फळ प्राप्त करून घेईल." तसं ज्ञानयोगी जो आहे हा एकदम पक्ष्यासारखा उडेल आणि झोंबेल. कर्मयोगी माणूस पायरी पायरीन जाईल. त्याला वेळ लागणारच. हा हळूहळू या फांदीवरून त्या फांदीवर जाऊन केव्हातरी ते फळ प्राप्त करून घेईल. याचा अर्थ की तो जर मार्गात राहिला तर आपल्या मुक्कामाला पोहोचेल हे निश्चित. ज्ञानमार्गाला विहंगम मार्ग म्हणतात. तर दुसरा आहे  कर्ममुक्ती मार्ग. कर्मयोगी मार्ग आहे हा काळाच्या आधीन आहे. योग्य काळ यायलाच पाहिजे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे " तुका म्हणे नाही चालत तातडी |  प्राप्त काळ घडी आल्याविण || तो अनुकूल काळ यावाच लागतो. तिथे तातडी चालत नाही. कितीही धडपड करा काहीही व्हायचं नाही वेळ आली की सगळं भरभर होऊन जातं. व्यवहारामध्ये वेळ लागतो तसं कर्मयोगामध्ये सुद्धा ते आहेच. समजा की तुम्हाला कोणी मार्गदर्शक नाही तुम्ही साधन करीत आहात. तर ती वेळ आली की साधनाचा मार्ग दाखवीणारा भेटतो. पुष्कळवेळा असं होतं की जो तुम्हाला गुरुकडे आणतो तो गायब होतो तुम्ही चिकटता. श्री.गोंदवलेकर महाराज म्हणाले की  कर्मयोगामधे किंवा भक्तिमार्गामध्ये जीवाची जी वाढ होते त्याला वेळ यावी लागते. कारण भक्तांची जी वाढ आहे ती काही व्यवहारासारखी नाही. ती जीवाची वाढ आहे. जीव शेवटी शिव बनवायचा आहे. त्यांनी उदा. दिले एका राजाची राणी गरोदर होती. तिला दोन महिने झाले होते. ती म्हणाली की मला ते दोन महिन्याचे मूल दाखवा आणि परत ठेवा. हे शक्य आहे का. नाही त्याला नऊ महिने जावेच लागणार. तसं एक मोठा गुरू आहे आणि त्याचा अंतरंगातला शिष्य आहे तरी योग्य वेळ आल्याशिवाय काही करता येत नाही.

Thursday, April 18, 2024

शेवटचा क्षण

 *वृद्धापकाळ आणि नामसाधना :-*


अंते मति सः गती,

अर्थात आयुष्याच्या शेवटच्या क्षणी जशी बुद्धि होते, तशी मानवाला (जीवाला) गती लाभते. श्रीतुकाराम महाराजांनी तर स्पष्ट्च सांगून टाकले, “याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड होण्या."

 

श्रीमहाराजांनीही अनेक जणांचा शेवट साधून दिला असा उल्लेख त्याच्या चरित्रात आहे,आणि आजही श्री त्याचे हे ब्रिद ते राखून आहेत. मग हा शेवटचा क्षण ते कसा साधतात किंवा शेवटचा दिवस गोड कसा करायचा,यात नक्की अडचण काय आहे? 


’म्हातारपण’ हिच फार मोठी अडचण आहे. म्हातारपणी देहाची आणि मनाची अशा दोन्ही शक्ति कमी होतात. नजर कमी होते, काहीना हातापाय़ांना कंप सुटतो, अन्न पचत नाही, श्रवण शक्ति कमी होते, एकाग्रता कमी होते, काहींना उच्च तर काहींना कमी-रक्तदाब, ह्रदयरोग, मेंदूचा थकवा, मूत्रविकार, दातपडणे, अशक्तपणा, अधिरपणा, कमरेत बाक येणे, पाठदुखी असे एक-ना-अनेक आजार संभवतात. या शारिरीक व्याधिंमुळे कोणत्याही कामात कसून प्रयत्न करता येत नाहित. मनाची अवस्था अतिशय नाजूक झाल्याने अनेकांना उत्साहच रहात नाही. म्हातारपणी काही नविन छंद जोपासावा तर शरिर, मन यांच्याबरोबर आर्थिक बलही नसल्यास, जीवाचा पुरता कोंडमारा होतो. असा चारी बाजूंनी खचलेला व आणखिन आणखि खचत जाणारा वृद्ध जीव हताश –निराश होतो, अत्तापर्यंत जिवनात केलेले सारे चांगले-वाईट कार्य हे त्याला फोल वाटायला लागते. अशा परिस्थित रहाणारा जीव, आपली सुप्त ईच्छा पूर्ण करायला काहीसा हट्टी व दूराग्रही होतो. शरिर, मन व वित्त बल नाही, अशा परिस्थित हट्ट, दुराग्रह –यांच्यामुळे कुटुंबिय मंडळी, नातेवाईक, जुने-नवे मित्र यांच्याशी असले त्याचे मैत्रिपूर्ण संबंध ताणले जाउ लागतात. मग हळू हळू एकेकजण काढतापाय घेउ लागतो. अचानक गळून तड्णारे आप्तसंबंध, यासार्‍यामुळे तो वृद्धजीव पुरता एकटा पड्तो. मागची वाट पुसलेलि आहे,पूढ्चे काही माहित नाहि  व  क्षण सहन होत नाहि, असा जीव पार पिचुन जातो. मनाच्या अशा च्छिन्न अवस्थेत काहि माणसे आत्महत्येसारखे विचारही करताना पहाण्यात येतात. काहींना (क्षणिक) यश येते,तर बहुतांशी अपयशी तर होतातच परंतु क्वचित प्रसंगी जन्माचे जायबंदी होऊन बसतात. अशा प्रसंगी, “जळत ह्रदयमाझे जन्म कोट्यानुकोटी” अशा अनुभवातुन त्याला जावे लागते.


मात्र वर नमुद केलेल्या सार्‍या अवस्था एउनही काही वृद्धजीव फारच शांत, सौम्य  असे आढळतात. असे जीव पाहिल्यास नक्कि जणावे की त्याच्या आत नामाचे अनुसंधान स्थिर झाले आहे, व तो जीव (नव्हे साधक) गुरुकृपेच्या छत्राखालि वावरतो आहे. नाम हे एक ’व्रत’ आहे,हे एक-दोन दिवसांची कृति  नाहि तर अनेक जन्मांचे व्रत आहे. नामाचा जीवाला चट्का लागायला हवा. नामाचा जीवाने ध्यास घ्यायला हवा. जन्मोजन्मिची तळमळी लागून जे हाती येते ते ’गुप्तधन’ म्हणजे भगवंताचे नाम. 


*ज्याच्यावर भगवंताची कृपा आहे त्याच्या मुखात नाम येते. अखंड नामात राहणे यालाच मोक्ष म्हणतात.*


!! श्री महाराज !!


!!श्रीराम जयराम जय जय राम!!

!!श्रीराम जयराम जय जय राम!!

!!श्रीराम जयराम जय जय राम!!

!!श्रीराम जयराम जय जय राम!!


          !! श्रीराम समर्थ!!

Wednesday, April 17, 2024

भ्रम

 " आठव तो ब्रह्म | नाठव तो भव - भ्रम || याबद्दल श्री.गुरुदेव रानडे म्हणाले "साक्षात्कारी सद्गुरुंकडून नाम मिळते ते सबीज म्हणजे  आत्मशक्तियुक्त असते. ते आत्मतत्त्व असते. ती शक्ती त्या अक्षराच्या मौनाने केलेल्या उच्चारात असते.सद्गुरु त्या अक्षरात आत्मशक्ती घालतात. तसे सामर्थ्य त्यांना असते. असे शक्तियुक्त नाम जे देऊ शकतात तेच सद्गुरुपदाचे अधिकारी होत. "सत्पुरुषाच्या जीवनाचे चरित्राचे निरीक्षण करावे " असे श्री गुरुदेव बरेच वेळा सांगत असत. त्यांनी स्वतः श्री.भाऊसाहेब महाराज उमदिकार व श्री.अंबुराव महाराज यांच्या जीवनाचे सूक्ष्म निरीक्षण केले होते व त्या निरिक्षणाचात्यांना बराच पारमार्थिक लाभ झाला होता. "सत्संग म्हणजे थोर संतांची संगत अशी साहजिकच समजूत होते. असे थोर संत नेहमी कसे व कोठे मिळणार ? त्यामुळे सत्संगती ही अशक्यप्राय वाटते." असे श्री.काकासाहेब यांनी विचारले. त्यावर श्री.गुरुदेव म्हणाले " थोर साक्षात्कारी पुरुष असा येथे संत या शब्दाचा अर्थ अभिप्रेत नाही. भक्ती करणारी, नामस्मरण करणारी, सज्जन व शीलवान माणसे म्हणजे संत . त्यांची संगती मिळणे शक्य आहे व ती जोडली पाहिजे. महान साक्षात्कारी पुरुष विरळा"

Tuesday, April 16, 2024

अंतकाळी भगवंताचे स्मरण शक्य आहे का?*

 *प्रश्न. जन्मभर बेफिकिरीने वागून अंतकाळी भगवंताचे स्मरण शक्य आहे का?*


आठव्या अध्यायातील सहाव्या श्लोकात भगवंत म्हणतात,


*यं यं वापि स्मरन्भावं* 

*त्यज्यत्यन्ते कलेवरम्I*

*तं तमेवैति कौन्तेय*

*सदातद्भावभाविताः॥*

*॥८.६॥*


'ज्या ज्या वस्तूचं स्मरण करीत मनुष्य अंतकाली देहाचा त्याग करतो त्याच त्या भावाला तो पुढे जाऊन प्राप्त होतो.'



*चांगल्या सवयी* अंगी बाणण्यासाठी सातत्याने जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणे आवश्यक आहे. वाल्या कोळ्याच्या जीवनात नारदभेटीचा एक क्षण जीवनाचे परिवर्तन करणारा ठरला, पण वाल्याचा वाल्मीकी एका क्षणात झाला नसून अनेक वर्षाच्या निरंतर कठोर तपाने झाला. अजामिळाची गोष्ट ऐकून एखाद्याने विचार केला की आयुष्यभर मौज मस्ती, चैन करून मरण्याच्या क्षणी परमेश्वर स्मरण केले तरी मोक्ष मिळेल तर तो त्याचा भ्रम आहे. जीवनभर आपण ज्या गोष्टीत रमतो, त्याच अंतिम क्षणी सुद्धा आठवण्याची दाट शक्यता असते. लोभी व्यापाऱ्याला मरताना पण आपल्या पश्चात मुले आपला व्यवसाय नीट सांभाळतील ना याचीच चिंता असते. 


आचार्य विनोबा भावे यासाठी फार छान उदाहरण देतात. एकाच दिशेने प्रवाह वाहिला पाहिजे. डोंगरावर पडलेले पाणी जर बारा वाटांनी वाहून गेले तर नदी होणार नाही. परन्तु एका दिशेने वाहणार्‍या धारेचा ओहोळ होईल, ओहोळाचा प्रवाह होईल, प्रवाहाची नदी होऊन सागराला मिळेल.


संस्काराचेही तसेच आहे. संस्काराचा पवित्र प्रवाह सतत जीवनात वाहत राहील तरच शेवटी मरण आनंदाचे होईल. 


जन्मभर योगाभ्यास करणारा अंत होण्यापूर्वी काही कारणाने योगभ्रष्ट झाला तर त्याला पण पुनर्जन्म चुकत नाही (अध्याय 6), तर मग जन्मभर विलासी जीवन जगलेल्या सामान्य माणसाचे काय सांगावे. म्हणूनच कायम मृत्युची जाणीव ठेवून सदाचाराने वागले, उदात्त विचार जोपासले, परमेश्वर सामर्थ्याची व आपल्याला त्याच्या पासून मिळणार्‍या प्रेरणेची जाणीव व स्मरण ठेवून जीवन संग्रामात झोकून दिले तरच मृत्यू सुखाचा होईल, अन्यथा खंत व पश्चाताप करण्याची वेळही हातातून निघून जाईल.



(संदर्भ - विनोबा गीता प्रवचने, गीता तत्त्वमंजरी.)

Monday, April 15, 2024

सच्चिदानंदात्मक

 *जगणे म्हणजे शरीरात चैतन्य असणे होय. चैतन्य हे केवळ सच्चिदानंदात्मक आहे.* *म्हणून, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत स्वाभाविक आनंद असलाच पाहिजे. हा आनंद आपण भोगावा.* *"भगवंताच्या इच्छेने सर्व होते आणि तोच सर्व करतो अशी भावना ठेवणे यासारखे समाधान नाही.* *कृतीमध्ये आनंद आहे, फळात किंवा फळाच्या आशेत तो नाही. नामस्मरणरूपी कृती केली असता शाश्वत आनंदाचा सहज लाभ होईल.भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद उत्पन्न होतो.... श्रीमहाराज* 🌹🙏

Sunday, April 14, 2024

नामप्रभात

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*🌺🙏नामप्रभात 🙏🌺*


*पू. बाबा -- श्रीमहाराजांच्या चरित्रातील प्रसंग डोळ्यांपुढे आणले तर नाम घेतांना येणाऱ्या इतर वृत्ती नाहीशा होऊन केवळ नामाचीच वृत्ती राहील. नाम म्हणजेच महाराज; ते आहेत, ते मला हवे आहेत अशा तहेचा भाव दृढ होईल.*

 *व्यक्तीनुसार हा भाव वेगवेगळा राहील पण सर्वसामान्यपणे कोणत्याही भावात त्यांच्या अस्तित्वाची जाणीव राहील. नाम म्हणजे महाराजांचा आवाज आहे असे ब्रह्मानंद महाराज म्हणाले होते. मला भगवंताचे दर्शन पाहिजे, समाधान पाहिजे अशासारखे ध्येय असावे नाहीतर भाऊसाहेबांसारखा सरळ भाव असावा. पण ते फार कठीण आहे.*


*🍁अध्यात्म संवाद🍁*

Saturday, April 13, 2024

ज्ञानात भर

 *माणूस मांसाहारी आहे की शाकाहारी…*


शिक्षकांनी दिले अद्भुत ज्ञान.....


एकदा एका चिंतनशील शिक्षकाने दहावीच्या विद्यार्थ्यांना विचारले की तुम्ही लोक कुठेतरी जात आहात आणि समोरून एखादा कीटक, कोळी किंवा साप, सरडा किंवा गाई-म्हैस किंवा यापेक्षा वेगळा कोणताही विचित्र प्राणी दिसला, जो तुम्ही आयुष्यात यापूर्वी कधीही पाहिला नसेल, तर प्रश्न पडतो. 


तुम्ही ते कसे ओळखता की तो प्राणी अंडी घालतो की बाळाला जन्म देतो ? हे कसे ओळखाल?


बहुतेक मुले गप्प बसली. तर काही मुलांमध्ये कुजबुज, धांदल चालूच राहिली….


दोन मिनिटांनंतर शांतता झाली तेव्हा त्या चिंतनशील शिक्षकाने स्वतः सांगितले.

 

खूप सोपे आहे, ज्यांचे कान बाहेर दिसतात ते सर्व बाळ देतात आणि ज्यांचे कान बाहेर दिसत नाहीत असे प्राणी ते अंडी घालतात.....

 

मग दुसरा प्रश्न विचारला -


मला सांगा तुम्हा लोकांसमोर एखादा प्राणी आला आहे. मग तुम्हाला कसे कळणार की तो शाकाहारी आहे की मांसाहारी ?

 

कारण तुम्ही त्याला याआधी जेवतानाही पाहिले नसेल,

 

पुन्हा तेच कुतूहल आणि खुसर फुसरचे आवाज मुलांमध्ये.....


शिक्षक म्हणाले-

 

बघा खूप सोपे आहे. ज्या जीवांचे डोळे गोलाकार बाह्य रचना आहेत, ते सर्व मांसाहारी आहेत.

 

उदाहरणार्थ, कुत्रा, मांजर, बाज पक्षी, सिंह, लांडगा, गरुड किंवा आपल्या सभोवतालचा कोणताही प्राणी ज्याचे डोळे गोल आहेत, तो मांसाहारी असेल.

 

त्याचप्रमाणे डोळ्यांची बाह्य रचना लांबलचक आहे, ते सर्व प्राणी शाकाहारी आहेत.

 

उदाहरणार्थ, हरिण, गाय, हत्ती, बैल, म्हैस, बकरी इ. त्यांचे डोळे बाहेरून लांब असतात.


मग चिंतनशील शिक्षकाने मुलांना विचारले-

 

मुलांनो, आता मला सांगा माणसाचे डोळे गोल आहेत की लांबीचे?


यावेळी सर्व मुलांनी सांगितले की, मानवी डोळे लांब असतात...

 

ह्या वर शिक्षकांनी पुन्हा मुलांना विचारले मला सांगा, यानुसार माणूस शाकाहारी झाला की मांसाहारी? 


सर्व मुलांचे उत्तर शाकाहारी होते.


मग शिक्षकाला विचारले मुलांनो आता हे सांगा की मग मानवातील अनेक लोक मांसाहार का करतात ?

 

तर यावेळी मुलांनी अतिशय गंभीर उत्तर दिले आणि ते उत्तर होते की अज्ञानामुळे किंवा मूर्खपणामुळे.


मग त्या चिंतनशील शिक्षकाने मुलांना आणखी एक गोष्ट सांगितली ती म्हणजे, 

 

ज्यांची नखे तीक्ष्ण आहेत, ते सर्व प्राणी मांसाहारी आहेत. जसे- सिंह, मांजर, कुत्रा, बाज, गिधाड किंवा तीक्ष्ण टोकदार नखे असलेला इतर कोणताही प्राणी....

 

आणि ज्या प्राण्यांची नखे रुंद आणि सपाट आहेत, ते सर्व शाकाहारी आहेत. उदाहरणार्थ, गाय, घोडा, गाढव, बैल, हत्ती, उंट, हरिण, बकरी इ.


यानुसार आता मला सांगा आपली नखे तीक्ष्ण, धारदार की सपाट रुंद असतात?


सर्व मुले म्हणाली रुंद सपाट,


मग शिक्षकाने विचारले,

 

आता मला सांगा, यानुसार माणूस कोणत्या जीवांच्या श्रेणीत आला? सर्व मुले एकाच आवाजात म्हणाली शाकाहारी.


मग शिक्षकांनी तिसरी गोष्ट मुलांना सांगितली,


शाकाहारी प्राणी हे पाण्याला तोंड लावून पाणी पितात


उदाहरणार्थ गाय, म्हैस, बकरी, हत्ती, घोडा ई. अगदी मनुष्य सुद्धा.


याउलट मांसाहारी प्राण्यांना पाण्यास तोंड लावून पाणी पिता येत नाही व ते जिभेने लपकुन पाणी पितात. उदा. कुत्रा, वाघ, सिंह ई.


मग शिक्षकांनी चौथी गोष्ट मुलांना सांगितली की,

 

जे प्राणी किंवा पशु घाम गाळतात, ते सर्व शाकाहारी आहेत,


उदाहरणार्थ, घोडा, बैल, गाय, म्हैस, खेचर इत्यादी अनेक प्राणी.

 

तर मांसाहारी प्राण्यांना घाम येत नाही, त्यामुळे नैसर्गिकरित्या ते जीव जीभ बाहेर काढून लाळ टपकत असताना श्वास घेतात. अशा प्रकारे ते त्यांच्या शरीरातील उष्णता नियंत्रित करतात.


त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की माणसांना घाम येतो की लोक त्यांच्या जिभेने तापमान समायोजित करतात ?


सर्व मुलांनी सांगितले की माणूस घाम गाळतो,


शिक्षक म्हणाले की बरं आता सांगा ...

 

या वस्तुस्थितीवरू मनुष्य कोणत्या वर्गातील आहे हे सिद्ध झाले, सर्व मुले एकत्र म्हणाली -

 

शाकाहारी.


सर्व लोक, विशेषत: अहिंसा, सनातन धर्म, संस्कृती आणि परंपरांवर विश्वास ठेवणारे, नैतिक-बौद्धिक ज्ञान देण्यासाठी किंवा मुलांना शिकवण्यासाठी अशी संभाषण शैली विकसित करू शकतात. यातून ते जे शिकतील ते त्यांना आयुष्यभर उपयोगी पडेल.

 

लक्षात ठेवा, अभ्यास करताना तुम्हाला कंटाळा येणार नाही.


मुले मोठी झाली तर माहिती नसल्यामुळे शाकाहारी माणूस मांसाहार कसा वापरतो हे देखील सांगा आणि हे ही सांगतो की जेंव्हा अन्न पिकत नव्हते, तेंव्हा माणसे मांस खात असतं, हे अगदी चुकीचे आहे. तेंव्हा मानव कंद खाऊन जगायचे. कंद मूळं आणि फळांवर, जे योग्य आहे आणि त्यांची रचना आणि निसर्गाशी देखील जुळते.


ज्ञानात भर म्हणून पाठवित आहे बाकी ज्याचे त्याचे व्यक्ती स्वातंत्र्य. 

माझ्यासह सर्वांचेच....

Friday, April 12, 2024

पूर्ण श्रद्धा बसली

 डॉ.आरोसकर हे सोलापुरातील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर होते. त्यांना १९५५ मध्ये श्री.गुरुदेव रानडे यांची डोळे तपासण्यास गुरुदेवांचे शिष्य श्री.गोळे व श्री.नाडकर्णी त्यांना घेऊन निंबाळला घेऊन गेले होते. पण त्यादिवशी गुरुदेवांची व त्यांची भेट झाली नाही. दुसऱ्या रविवारी परमार्थ बैठक (सीटिंग) झाल्यावर कुणीतरी गुरुदेवांना सांगितले की सोलापूरहून आपले डोळे तपासण्यास डॉ.आले आहेत. श्री.गुरुदेव खुर्चीत बसले व डॉक्टर त्यांचे डोळे तपासू लागले.मोठे लेन्स लावून ते डोळ्यात निरखून पाहू लागले. प्रथम त्यानं काहीच दिसेना. मग पुन्हा पाहू लागताच एक तेज:पुंज असा प्रखर प्रकाश श्री.गुरुदेवांच्या डोळ्यात त्यांना दिसला. डॉक्टर जरासे लटपटले व मागे सरकले. त्यांनी लेन्स खाली ठेवले व श्री.गुरुदेवांचे पाय धरले. त्यांच्या पायावर डोके ठेवले व म्हणाले "आपल्या डोळ्यातील तेज मला सहन करणे शक्य नाही." श्री.गुरुदेव त्यांना म्हणाले " बर बर आता पुन्हा तपासा !" त्यानंतर डॉ.नी पुन्हा डोळे तपासले. ते अगदी नेहमी सारखेच होते. डॉक्टर हे अगोदर नास्तिक होते. पण या प्रसंगानंतर या डॉक्टरांची गुरुदेवांच्या ठायी पूर्ण श्रद्धा बसली. ते पुढे गुरुदेवांचे निस्सीम भक्त झाले.

Thursday, April 11, 2024

"समर्थ"

 पु.श्री.बेलसरे यांना पु.श्री .समर्थ रामदास स्वामी यांच्या वाड्.मयाचा अभ्यास करीत असताना त्यांना दोन श्लोक आढळले. ह्या श्लोकांनी त्यांच्या जीवनावर अतिशय परिणाम झाला. ज्यांना श्रीसमर्थ रामदास स्वामी म्हणत असत की हे आपल्याच योग्यतेचे पुरुष होते. त्यातील एक श्री.जयराम स्वामी आणि दुसरे रंगनाथ  स्वामी . तिसरे  आंदमूर्ती होते ते हैदराबादचे केशवस्वामी हे ज्ञानी पुरुष होते. ह्या सर्वांनी समर्थाना  "समर्थ" ही पदवी दिली. त्यांनी आपल्या जीवनाचा अनुभव सांगीतला आहे. आपलं जीवन किती परिस्थितीमुळे बांधल गेले आहे, किंवा माणूस परिस्थितीला 

किती लाचार होतो. श्लोक  

नजावेची तेथेचि लागेल जावे |

न खावेची जे तेचि लागेल खावे |

वदावेचिना तेचि लागे वदावे |

स्वभावेचि निर्माण केलेचि देवे ||

आपण काय तऱ्हेचे धान्य खातो. धान्य कितीही चांगलं आणलं तरी त्यात काय मिश्रण असेल सांगता येत नाही. अनेक वेळा कसं वागावे हे तुमच्या हाती नाही. हे सगळं तर विश्वामध्ये निर्माण होऊन आलेलं आहे. आपण हॉटेलात खातो, काय प्रतीचं खाद्य तेथे मिळतं हे आपण जाणतो. "प्रसंगे घडे तेचि मानून घ्यावे | " ज्या वेळेला जे घडेल ते मुकाट्याने सोसावे लागते. "अहंता गुणे दुःख शोका न घ्यावे |" मी मी करून दुःख अंगावर ओढावून घेऊ नये. "पुढे काय होईल ते ते पाहावे | बरे वोखटे सर्व साहूनी न्यावें ||" आपल्या वाट्याला जे जे येईल ते सोसावे. हे कोण सांगतो कर्मयोग्यांचा राजा श्री समर्थ रामदास स्वामी म्हणत आहे. कर्माचं बंधन हे असे आहे.

Wednesday, April 10, 2024

मायेला जिंकण्यासाठी....

 *॥श्रीहरिः॥*


मायेला जिंकण्यासाठी जे सज्जन परमात्म्याला भजतात. ते कोण हे सांगताना भगवंतांनी त्यांचे चार प्रकार सांगितले. 


आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू व ज्ञानी!


हे चार भक्त सारखे नसून त्यापैकी ज्ञानी भक्त श्रेष्ठ आहे आणि तो मला विशेष प्रिय आहे हे भगवंत पुढील श्लोकात सांगतात, 


*-----------------------------*


॥ॐ श्री परमात्मने नमः ॥

अथश्रीमद्भगवद्गीता सप्तमोध्यायः


*तेषां ज्ञानी नित्ययुक्त* 

*एकभक्तिर्विशिष्यते ।*

*प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थ-*

*-महं स च मम प्रियः ॥*

*॥७.१७॥*


(दैनंदिन श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञानयोग ७.१७) 


*भावार्थ:- यांपैकी (उपासकांपैकी) एकभक्ती म्हणजे अनन्यभावे माझीच (परमेश्वराची) भक्ती करणारा आणि युक्त असा ज्ञानी भक्त श्रेष्ठ होय. कारण अशा ज्ञानी पुरुषाला मी अत्यंत प्रिय असतो आणि ज्ञानीही मला तसाच प्रिय असतो.*


*-----------------------------*


*आर्त, अर्थार्थी, व जिज्ञासू -* 

हे तिन्ही भक्त सकाम आहेत, तर ज्ञानी हाच निष्काम भक्त होय. म्हणून तो भगवंताला विशेष प्रिय आहे. अर्थात ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी. 


अशा थोर भक्तांचा गौरव गाताना भागवतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात,


'साधवो हृदयं मह्यं 

साधूनां हृदयं त्वहम् ।

मदन्य ते न जानन्ति 

नाहं तेभ्यो मनागपि ।। '

( भाग. ९.४.६८). 


अर्थात् ज्ञानी साधुजन माझा आत्मा- हृदय असून साधूंचे हृदय मीच आहे. साधुजन माझ्याविना वा मी त्यांच्याविना काहीही जाणत नाही.



जे *ज्ञानी पुरुष* भगवंताचं क्षराक्षर स्वरूप जाणतात आणि त्याला शरण जाऊन त्याची अनन्यभावानं भक्ती करतात ते ज्ञानीपुरुष भगवंताला अत्यंत प्रिय असतात आणि अशा ज्ञानी पुरुषांना भगवंत प्रिय असतो. 


*मायेच्या* पाशात बद्ध न होता हा ज्ञानी भक्त लोकसंग्रहार्थ निष्काम कर्म करीत रहातो.परमेश्वराच्या सर्वव्यापक स्वरूपाविषयीचं ज्ञान झाल्यामुळे ज्ञानी भक्ताचं चित्त परमेश्वर स्वरूपापासून विचलित होत नाही. अशा भक्ताला *अंतिम ज्ञान* प्राप्त झालेलं असल्यामुळे या जगात त्याला काहीही प्राप्तव्य नसतं. 


भगवंताजवळ त्याला काहीही मागायचं नसतं. 

*'आता उरलो उपकारापुरता'*

 

म्हणजे केवळ ईश्वराचंच काम करण्यासाठी हा जीव कार्य करीत असतो. या जीवाच्या मार्फत भगवंत स्वत:चं धर्मसंस्थापनेचं कार्य करवून घेतो. त्याच्या इच्छा-आकांक्षा या त्याच्या रहातच नाहीत. किंबहुना *'तू-मी'* असा भेदच न राहता आपण दोघे एकच आहोत अशी भगवंताची आणि ज्ञानी भक्ताची स्थिती असते.


*भक्त प्रल्हाद आणि नारद* 

हे अशा निष्काम कर्मयोगी भक्तांचं श्रेष्ठ उदाहरण म्हणून सांगता येईल. भक्त प्रल्हादानं समाजहिताकरता आपल्या जन्मदात्याचाही वध अवताराकडून करवला.प्रल्हादाला त्याच्या वडिलांनी आगीत टाकलं, कड्यावरून ढकलून दिलं, उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं. परंतु तो श्रेष्ठ भक्त असल्यामुळे आपल्या भक्तीच्या शक्तीनं या साऱ्या संकटांतून पार पडला.


*नारदांनी* तर भगवंताच्या कार्यासाठी आपलं सारं जीवन वेचलं. भगवंताचा भक्तिसंदेश घेऊन ते तिन्ही लोकांतून सतत संचार करीत असत. नारद एकदा भगवंतांना विचारतात, 


'भगवान, आपला श्रेष्ठ भक्त कोण?'


तेव्हा भगवान श्रीविष्णू सांगतात, 

'नारदा, तू आधी एक काम कर...


तेलाची भरलेली वाटी घेऊन पृथ्वी प्रदक्षिणा करून ये. वाटीतलं एक थेंबही तेल मात्र सांडता

कामा नये.' 


नारदमुनी त्याप्रमाणे पृथ्वी प्रदक्षिणा करून येतात. आल्यावर सांगतात, 

'भगवंता, एक थेंबही न सांडता मी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. '


भगवंत विचारतात, 

'या कालावधीत माझं स्मरण किती वेळा झालं?'


'एकदाही नाही. कारण माझं सारं लक्ष तेल सांडू नये याकडे होतं.'


'तात्पर्य: संसारात राहून परमेश्वराचं विस्मरण ज्याला होत नाही तोच खरा श्रेष्ठ भक्त. ईश्वरीविचाराशिवाय दुसरं काही नाही आणि त्याच्या कामा- शिवाय दुसरं स्वार्थप्रणित कार्य नाही अशी ज्या ज्ञानीयांची अवस्था असते ते खरे ईश्वराचे आत्यंतिक आवडते भक्त.'



खरंतर ज्ञानी भक्तच परमभक्त असतो. त्याच्या चेहऱ्यावर प्रत्येक वेळी संतोष, स्वीकाराचं सुख आणि आनंदाचा भाव झळकत असतो. सुख असो अथवा दुःख,मान किंवा अपमान, तो कोणत्याही बाह्य गोष्टी किंवा घटनांमध्ये अडकत नाही. भक्तीमध्ये तो नफातोट्याचा,लाभ-हानीचा विचार करत नाही. जीवनातील प्रत्येक घटनेविषयी त्याच्यामध्ये स्वीकार आणि समभाव असतो.


*सारांश:* 

*दैनंदिन व्यवहार करत असतानाही जो नित्य केवळ भगवंताचेच स्मरण करीत असतो आणि निष्काम बुद्धीनं त्याचंच कार्य करतो तोच खरा श्रेष्ठ आणि भगवंताचा आत्यंतिक प्रिय भक्त होय.*


*-----------------------------*


श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीता भाष्य. 



*।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।*

Tuesday, April 9, 2024

प्रवचने

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।* 


*🚩 श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*


*🌸  प्रवचने  ::   🌸*


*स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच.*


'आपणच काय ते सर्व करणारे' अशी भावना आपण ठेवतो, आणि पुढे दुःख वाट्याला आले म्हणजे वाईट वाटून घेतो. ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म 'मी' केले असे म्हणण्यात काय पुरूषार्थ आहे ? 'मी भगवंताचे कृत्य भगवंताला अर्पण करतो' असे म्हणतो, याचासुद्धा अभिमान आपल्याला होतो. जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात, पण 'मी करतो' हा अभिमान त्यांचाही सुटत नाही. खरोखर, नुसत्या कर्माने परमार्थ साधत नाही; 'कर्ता मी नाही' हे समजले म्हणजे सर्व साधते. नसलेले कर्तेपण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो. ज्याच्याकडे कर्तेपण आहे त्याला ते देऊन आपण सुखदुःखातीत राहावे.


खोलीतल्या खोलीत जो सुख मानून घेतो तो कैदी खरा सुखात असेल असे आपल्याला वाटते. देहाच्या पलीकडे काही नाही असे मानू लागलो आणि विषयातच सुख पाहू लागलो, तर ते त्या कैद्याप्रमाणेच नाही का ? पण त्याच्यापलीकडे काही आहे हे त्याला समजले नाही तोपर्यंतच हे सुख वाटेल. एकदा का बाहेरची हवा कैद्याला लागली म्हणजे तो नाही म्हणणार कैदीपणाच चांगला म्हणून ! त्याचप्रमाणे एकदा भगवंताच्या आनंदाची हवा कैद्याला लागली म्हणजे माणूस नाही विषयात राहणार. चित्त आपल्याला निर्विषय करता येणार नाही, पण ते भगवंताकडे लावता येणार नाही असे नाही. बुजार घोडयाला जसे चुचकारून घेतात, तसे मनाला करावे. वृत्ती जिथे पालटायला लागते तिथे सावध राहावे. भगवंताचे स्मरण चुकले की काही तरी अवघड वाटायला हवे. आज नको वाटणारे नामस्मरण बळजबरीने करावे, म्हणजे हवेसे वाटणारे विषय जातात. प्रापंचिक अडचणीतून जर आपण मार्ग काढतो तर मग परमार्थातल्या अडचणींना का भ्यावे ? जर आज आपल्याला विवेकाने सुखी राहता आले नाही तर आपल्याला सुख कधीच मिळणार नाही. नुसते गिरिकंदरात जाऊन कुठे परमार्थ साधत असतो का ? तसे असते तर तो माकडांनाही साधला असता ! खालच्या प्राण्यांना आपले विकार आवरण्याचा विचार नसतो. पण मनुष्याला चांगले-वाईट कळते, त्याला सारासार विचार करण्याची शक्ती आहे, ही त्याच्यावर भगवंताची कृपाच आहे. जग सुधारण्याच्या नादी आपण लागू नये; त्या कामासाठी लोक जन्माला यावे लागतात. अगदी आपला मुलगा जरी झाला तरी त्याला योग्य ते सांगून पाहावे, पण 'मी त्याला सुधारीनच' हा भ्रम नसावा. स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच.


*९१ .   कर्तव्य  म्हणून  शकील ी  जसा  भांडतो ,  त्याप्रमाणे  कर्तव्य  म्हणून  प्रामाणिकपणे  आपण  प्रपंच  करावा .  त्यामध्ये  भगवंताला  विसरू  नये .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय   जय  ।‌।*

Monday, April 8, 2024

नामप्रभात

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*🌺🙏नामप्रभात 🙏🌺*


*🌹मुखामध्ये भगवंताचे नाम आणि आतमध्ये भगवंताचे ठाण अशी अवस्था झाली की शमदमादि साधनचतुष्टय आपोआप अंगी बाणतात. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. कारण भगवंताचे नाम शक्तिरूप आहे. याचा अर्थ असा की नाम घेणाऱ्याचे मन ते बदलून टाकते. भगवंताचे दर्शन होण्यास जे मन लागते ते मन नाम तयार करते. अशा रीतीने समबुद्धीने नाम घेतले की भगवंताचे अस्तित्व मनामध्ये खोल जाते व अखेर माणूस भगवत्स्वरूप होतो.🌹*


*🌸परमपूज्य बाबा बेलसरे🌸*

Sunday, April 7, 2024

चिंतन

 चिंतन ९१

        श्रीराम,

                 आनंदी असण्यासाठी मनोवृत्ती बदलावी लागते. शास्त्रात चार प्रकारच्या वृत्ती सांगितल्या आहेत. मनोवृत्ती, चित्तवृत्ती, बुद्धीवृत्ती आणि अहंवृत्ती. वृत्ती म्हणजे त्या त्या घटकात, त्याला, त्याच्या कार्याकडे प्रवृत्त करणारा बदल अंतःकरणात झाला की त्याला वृत्ती म्हणतात. समर्थ जेव्हा 'बुद्धि दे रघुनायका' असे म्हणतात, तेव्हा मन, चित्त हे शब्द न वापरता, रघुनायका संबंधी निश्चय करणारी बुद्धी दे व त्या बुद्धिवृत्तीने तोच निश्चय सतत ठेवावा असे मागणे मागतात.

                     भक्तीमार्गाने प्रवास करायचा असा निश्चय जर आपण करत असू तर आपल्या अंतःकरणातील संकल्प विकल्प करणारी मनोवृत्ती इथे उपयोगाला येत नाही. कारण मनोवृत्तीत ठाम निश्चय नसतो. करु की नको? असे प्रश्न निर्माण होत असल्याने या मनोवृत्तीच्या खेळात आपण अडकतो. हळूहळू मन स्वप्नरंजन सुरू करते.. त्यातच दिवसेंदिवस कसे संपून जातात ते समजतच नाही.. आणि एक दिवस असा येतो की आपल्या आयुष्याचे तास संपत आले असे समजते आणि आयुष्य व्यर्थ गेले असा पश्चाताप होतो... पण.. तोपर्यंत खुप उशीर झालेला असतो.

                 पश्चात्तापाची वेळ येऊ नये म्हणून मनोवृत्तीला आवर घालून निश्चयात्मक वृत्ती सतत वर ठेवणे हे मात्र १००% आपल्या हातात असते.  मग आपण तसे करतो का?

                             ||श्रीराम ||

Saturday, April 6, 2024

रामरंगी रंगले

 *मन हो रामरंगी रंगले*

*सौ. विनयाताई देसाई*

संकलन आनंद पाटील 


*भक्त, भक्ती आणि भक्तिभाव याची उकल त्याच भक्तिभावाने करून आपल्यापर्यंत* *पोहचवण्याचा प्रयत्न करते आहे. आपण सर्वसामान्य प्रापंचिक माणसे आहोत, पण पूर्वपुण्याईने नाम, भक्ती जाणून घेण्याचा* *प्रयत्न तरी करत आहोत. निस्सिम भक्त बनायचं असेल तर भक्त आणि त्याची भक्ती कशी हवी? यावर स्वामी स्वरुपानंद सांगतात, न होती भक्त, उच्चारुन नाम पोटी काम, क्रोध असे जरी, न होती ते भक्त, घालोनिया माळा भक्तीचा जिव्हाळा नसे जरी, स्वामी म्हणे व्यर्थ, पूजा घंटानाद भेटे ना* *गोविंद, भक्तीवीण | असे भक्तीनं सारे सूत्र हवे आणि भक्त पण खरे तळमळीचे हवेत. तरच मन रामरंगी रंगून जाईल यात शंकाच नाही.*


*भगवंताची भक्ती करणारे आपण सारे आहोत. प्रापंचिक आहोत, गुण दोषाने युक्त आहोत. आपल्यातील उणीवा,जाणिवा, गुण दोष*

*हे सगळं आपल्याला ठाऊक असतं. जसे आहोत तसे भगवंता ठाई, गुरुपायी परमेश्वर चरणी नतमस्तक होणं याचं नांव भक्ती. असे संपूर्ण शरणागत, समर्पित जगणं म्हणजे भक्तिमय होऊन जगणं. एक वेगळी समाधानाची अनुभूती जगताना यायला लागते. अशी सुंदर अवस्था रामाप्रती, नामाप्रती असलेल्या संपूर्ण श्रद्धाभाव असल्याने निर्माण होते. त्याही पुढे जाऊन जसा आपल्या अंतरंगात तो आहे तसा समोरच्यामध्ये*

*पण तोच आहे याची जाणीव असणं ही भक्तीची परिपूर्ण अवस्था.*


*भक्ती म्हणजे आतून होणारी प्रगती. आंतरीक इच्छा, प्रेरणा,वाटचाल आपल्या ध्येयप्राप्तीसाठी होत असेल तर तीच भक्ती. आपलं ध्येय साध्य काय करायचंय हे निश्चित समजलं की जी निश्चित निर्भय अवस्था प्राप्त होते ती भक्ती. भक्तीमधील शक्ती म्हणजे निर्भयता. सतत शंका, भय, अस्वस्थता म्हणजे भक्तीमय अवस्थेला आपण पूर्णपणे पोहोचलो नाही हे ज्याचे त्याने लक्षात घ्यायला हवे. भक्त आपल्या भक्तीभावाने इतका रममाण होऊन गेला पाहिजे की क्षुल्ल्लक मान,अपमान, जीवनातले चढउतार, बरेवाईट प्रसंग या बाबींचा परिणाम*

*रोजच्या जीवनावर व्हायला नको. अशी समतोल अवस्था प्राप्त झाली की ती भक्तीमय अवस्था, गीतेच्या बाराव्या अध्यायात भगवंताने सुंदर रितीने समजावले आहे. तसा भक्त होण्याचा प्रयत्न करू या. संकलन आनंद पाटील*

Friday, April 5, 2024

चिंतन

 चिंतन ९० 

      श्रीराम,

       सर्वच संतांनी कमी जास्त प्रमाणात मनाशी संवाद करून, त्याचे साधकांसाठी असलेले महत्त्व लक्षात आणून दिले आहे. तुकाराम महाराज - मन तेचि गजानन गणपति |असे म्हणतात. मन ओढी मना |बुद्धी बुद्धी क्षणक्षणा |अशी प्रामाणिक साधकाची होणारी उलघाल ते स्वानुभवाने लक्षात आणून देतात. मन बळिया माजी बळी |करी राखरांगोळी धैर्याची ||  हे मनाचे अचाट सामर्थ्य नाथ महाराज सांगतात. 

                           थोडक्यात मोक्ष साधनेच्या संदर्भात मनाची नेमकी भूमिका समजावून घेतली तर मनाचा नेमकेपणाने वापर करता येतो. साधनेच्या प्रक्रियेची जाण तयार होऊन भक्तीमार्गाने गेल्यास नक्की काय घडावे, ते कसे घडते, घडण्यात अडचणी काय येतात? त्या कशा दूर कराव्यात, ह्यासंबंधी परिपूर्ण मार्गदर्शन मिळते. 

                   आयुष्यात आता दुसरे करण्यासारखे काही नाही म्हणून मग श्रीरामाचे नाम घेऊया आणि परमार्थाचा अभ्यास करुया.. असे म्हणून अभ्यास किंवा नाम घेण्याचा विचार कोणी करत असतील तर त्यांचा परमार्थ कधीच साध्य होणार नाही असे आपले संत सांगतात.. कारण भक्तिमार्गावरुन ईश्वरापर्यंत जाण्यासाठी मन नेहमी प्रसन्न आणि आनंदी असावे लागते. 

                    ||श्रीराम ||

Thursday, April 4, 2024

प्रश्नमंजुषा

 श्रीरामरक्षा प्रश्नमंजुषा


१. रामरक्षेचे रचयिता कोण आहेत?

उत्तर-बुधकौशिक..विश्वामित्र ऋषी

२.रामरक्षेत राम हा शब्द किती वेळा येतो?

उत्तर-८०

३.मंत्र म्हणजे काय?

मननात त्रायते इति मंत्र..ज्याचे मनन केले असता तो तारुन नेतो तो मंत्र होय.मंत्र म्हणजे एक ध्वनी,एक शब्द,एक अक्षर किंवा अनेक‌ शब्दांचा एकत्रित समुह...ज्यांच्या पुनरूच्चारणाने भौतिक ,आत्मिक व अध्यात्मिक उन्नती होते.म...हे अक्षर..मानवी मनाचे प्रतिक आहे.जे मनन अथवा चिंतन करण्यास सक्षम बनवते व त्र म्हणजे संरक्षण करण्याची ताकद ज्या मंत्रात आहे .ज्याच्या उच्चाराने पवित्र उर्जा स्पंदने निर्माण होतात व आत्मिक सुख मिळते

४.रामरक्षा कवचाचे नाव काय?

उत्तर-रामरक्षा ...रक्षा म्हणजेच कवच होय

५. रामरक्षा कवचात किती आणि कोणकोणत्या अवयवांचा उल्लेख आला आहे?

उत्तर-२२

शीर,भाळ,डोळे,कान,नाक,मुख जिव्हा,कंठ,खांदा,भूज,टाळू,हृदय,छाती,

पोटाचामध्यभाग(पाणथरी),नाभी,कंबर,हात,गुढघे,जांघा,पोटऱ्या,पाऊल,मांड्या ...इ.

६.तुम्हाला समजलेली रामरक्षा सारांश रुपाने लिहा.

उत्तर--भगवान शंकरांनी बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात येऊन सांगितलेली रामरक्षा सर्व पापांचा नाश करणारी,भक्तांच्या सर्व ईच्छा पूर्ण करणारी आहे,सर्व अवयवांचे रक्षण करणारी आहे.या रामरक्षा कवचाने पठण कर्ता सुखी,पुण्यवान,विजयी विनयी होऊन सर्व कार्य सिद्धीस जाणार असून  त्याला मुक्ती मिळणार आहे.

रामरक्षारुपी संरक्षक कवचामुळे सर्वत्र मंगलमय होते.

सतत पुढे जाणारा ,कधिही न संपणारा बाण व भाता ज्यांच्या जवळ आहे असे श्रीराम आपले रक्षण करण्यासाठी सतत आपल्या सवे असणार आहेत...तेच मार्गदर्शक आहेत.

     दुःख,संकटांचा नाश करणाऱ्या,सुख समृद्धी देणाऱ्या  श्रीरामांच्या रामरक्षेचे कवच सदा सर्वकाळ आपले रक्षण करेल.  

🙏श्रीराम🙏

७. रामरक्षेत रामाशिवाय आणखी किती कोणकोणत्या व्यक्तींचा उल्लेख आला आहे?

उत्तर-२२.....

सीता,हनुमान,

लक्ष्मण,दशरथ,

कौसल्या,विश्वामित्र(बुधकौशिकऋषी),

सौमित्रिवत्सल(सुमित्रा तीचे पूत्र )शत्रुघ्न,भरत,सुग्रीव,जाम्बुवंत,बिभिषण,रावण,

शंकर(आदिष्टवान),वाल्मिकी,परशुराम(जमदग्नी पुत्र)दुर्वात्मज,पद्माक्ष,पितवासकं,सत्यसंध,लक्ष्मण ,रघुकुलतिलकम्

८. रामरक्षेतील तुम्हाला आवडलेला श्लोक कोणता?

उत्तर-श्लोक-

आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम्।

लोकाभिरामं श्रीरामं भूयोभूयो नमाम्यहम् ।।३५।।

९. रामरक्षेच्या ध्यान श्लोकाच्या आधारे रामाचे ध्यान कसे करता येईल?

उत्तर-- ध्यान ही अष्टांग योगाची शेवटची अवस्था होय.रामरक्षेच्या ध्यान श्लोका नुसार मन स्थिर,निर्विचार करण्यासाठी विष्णूचा ७वा अवतार असलेल्या  अजानुबाहू,पद्मासनात असलेल्या,पितवस्त्र परिधान केलेल्या सूर्यविकासी कमलदलासारखे नेत्र असलेल्या,ज्यांच्या डाव्या मांडीवर सीता बसली आहे अशा श्रीरामचंद्रांची मूर्ती अंतःचक्षुंसमोर आणून प्रज्ञावान अशा श्रीरामरक्षेचे दररोज, नियमित ,प्रसन्न अशा प्रातःकाळी, दिवेलागणीच्या शुभ समयी अथवा दिवसांच्या कोणत्याही प्रहरी,अडचणीत असताना,अनाकलनीय भितीने मनाला ग्रासले असताना,एकांतवासात असताना रामरक्षेचे पठण करावे. रोज ११वेळा करावे .ते करत असताना तटस्थ राहून दृष्टी विशाल होण्यासाठी निःशंक मनाने,,व पूर्ण आत्मनिष्ठेने...नकारात्मकतेला मनात स्थान न देता एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करुन श्रीरामाचे ध्यान करणे...नव्हे तर ही एकाग्रता म्हणजेच  ध्यान व ध्यानाचे फळ होय...अथ ध्यानम्🙏

१० रामरक्षेत रामसाठी आलेली विशेषणे कोणती त्यापैकी एकाचे स्पष्टीकरण करा.

जितेंद्रिय,

लोकाभिराम,

रणरंगधीर,

राजीवनेत्र,

रघुवंशनाथ,

कारुण्यमूर्ती,

करूणाकर,

पुराणपुरुषोत्तम,

जानकीवल्लभ,

रामभद्र,रामचंद्र,

प्रजापती,रघुनाथ,

भरताग्रज,रघुनंदन,

,माता,पिता,

स्वामी,मीत्र,

अजानुबाहू--

अक्षयाशुगनिषङ्गगशङ्गिनौ--

अक्षय-कधिही न संपणारा 

+आशुग -पुढेपढे जाणारा बाण

निषङ्ग संङ्गिनौ भाता जवळ असलेले असे श्रीराम.(सहलक्ष्मण)

११. रामरक्षेचा छंद कोणता?

उत्तर-अनुष्टुप छंद

१२.रामरक्षेतील कोणत्या श्लोकात राम या शब्दाची सर्व विभक्ती रूपे आली आहेत?

उत्तर-

रामो राजमणीः सदा विजयते रामं रमेशं भजे।

रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः।

रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं।

रामे चित्तलयः सदा भवतु भो राम मामुद्धरः।।३७।।

१३. रामरक्षेचा प्रचार व्हावा म्हणून तुम्ही काय कराल?

उत्तर-

पाठांतरक्षम वयापासून शिबीर

सामुदायिक पाठांतर

*नियमित संथा देणे

*पाठांतर स्पर्धा आयोजन

१४. रामरक्षेत एकुण श्लोक किती, कोणत्याही एक श्लोकाचा अर्थ लिहा.

उत्तर-३८ श्लोक


श्लोक...वज्रपन्ञरनामेदं तो रामकवचं स्मरेत।

अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमंगलम्।।१४।।

अर्थ...श्रीरामरक्षा हे रामकवच  वज्राच्या..(लोहाच्या) पिंजऱ्या प्रमाणे संरक्षक आहे.म्हणूनच त्याला वज्रपंजर म्हटले आहे.जो रामकवचाचे नित्य स्मरण करील त्याची आज्ञा  (ईच्छा)कधीही अमान्य केली जाणार नाही.🙏श्रीराम.🙏

positive thinking

 Wonder if any of us felt as privileged & important as this Writer:


*(My School Days)*😊An example of positive thinking 


During my School days, after getting the first beating on my hands from the teacher, I used to wipe my hands on my trousers and then only take the second one !

I was very particular about cleanliness.


 All my teachers used to stand and take the classes... You know the reason?  Respect.... They respected me so much... Nothing else.


During my school days, my teachers used to often request me to bring my father as they were afraid of telling me anything, lest they offend me ..


My teachers were very fond of reading what I had written... In fact, they would make me write it a hundred times so that they can read it again and again..


Many times the teachers have thrown their valuable chalks to me without me asking for it ..


Many times my teachers have made me stand outside the class to ensure 'Z' category security while they were teaching..


Many times I have been asked to attend lower classes to assist those teachers evaluate the students..


How many times I have been honoured/elevated by asking me to stand up on the bench with all others looking up to me ..


How many times I have been given a break from class to enjoy the sunshine and

fresh air, when most others were sweating/choking inside the classroom ...


As I knew everything, the teachers used to appreciate my knowledge and have told me many times.....Why do you come to school ? Why can't you do something else instead..


Hmm ..🤔🙃😊


*Those were golden young days..*....🤩🤷🏻‍♀️

Tuesday, April 2, 2024

 🌹  *!! श्रीमहाराज उवाच !!*   🌹


नाथांसारखी शांती यायला परमभाग्य पाहिजे. राजेरजवाडे आले आणि गेले, पण ज्ञानेश्वरांचे नाव टिकले, कारण ते शांतीची मूर्ती होते. ही शांती काय केले असताना मिळेल ? भगवत्स्मरणावाचून अन्य उपायाने ती साधणार नाही. जे जे घडते ते ते भगवद्‌इच्छेनें घडते ही दृढ भावना असणें, हेंच शांतीचे लक्षण आहे!


🙏🌿  *!! श्रीराम समर्थ !!*  🌿🙏

Monday, April 1, 2024

सुखाचा संसार

 श्रीराम समर्थ 


               *सुखाचा संसार*


डॉ. राजाभाऊ पाथरकर [मालाडचे जेष्ठ साधक डॉ. भाऊसाहेब पाथरकर यांचे चिरंजीव] यांस विवाहबध्द व्हावे असे श्रीमहाराज [वाणीरुप अवतार] २/३ दा बोलले पण सध्या नको असे ते म्हणत. शेवटी श्रीमहाराजांनी जी मुलगी पसंत केली तिच्याशी श्री राजाभाऊंनी  विवाह केला. विवाह झाल्यावर उभयता श्रीमहाराजांचे पाया पडायला आली तेंव्हा श्रीमहाराजांनी योग्य तो उपदेश केला. त्यावर डॉ .राजाभाऊ जरा सलगीने श्रीमहाराजांना म्हणाले :


'आपल्या सांगण्यावरुनच आपल्या पसंतीच्या मुली बरोबर मी लग्न केले. आपली आज्ञा मी तंतोतंत पाळली आहे. तरी माझा संसार सुखाचा होईल असा आशिर्वाद द्यावा'. हे ऐकून श्रीमहाराज जरा हसले व म्हणाले :


'राजाभाऊ संसार सुखाचा होत असता तर श्री ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहली नसती. नाथांनी  भागवत लिहीले नसते, तुकारामांनी  गाथा लिहिली नसती, श्रीसमर्थांनी दासबोध लिहीला नसता. तेंव्हा तुझा संसार सर्वतोपरी सुखाचा होईल हे नक्की सांगता येणार नाही पण परमार्थाला तो हितावह होईल याची मी तुला हमी देतो. 


              *******


संदर्भंः बापुसाहेब मराठे यांचे हस्तलिखीत


*संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन*

अखंड नाम

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*पू. बाबा -- श्री. गोपीनाथ पोतनीस असेच खूप आजारी होते. काही अन्न घेत नव्हते. श्रीमहाराजांना (पेटीवर) हे सांगितले तेव्हां मी त्याला सांगतो असे श्रीमहाराज म्हणाले. नंतर पू. तात्यासाहेबांना श्रीमहाराज असे म्हणाले म्हणून सांगितल्यावर ते म्हणाले की तो (पोतनीस) काही सांगण्याच्या पलीकडे गेला आहे आणि आता महाराज त्याला काय सांगणार आहेत ? पुढे त्यांच्या घरी गेल्याबर श्रीमहाराजांनी (पेटीवर) त्यांना गोपीनाथ म्हणून हाक मारली आणि बेशुद्ध असलेला तो गृहस्थ, काय महाराज म्हणाला ! श्रीमहाराज त्याला म्हणाले की,*

*अरे तू काही खात का नाहीस ? ते म्हणाले, आता काही खावेसे वाटत नाही. श्रीमहाराज म्हणाले की तू काही खाल्ले नाहीस की मला वाईट वाटते. तेव्हां ते खातो म्हणाले. पहा, श्रीमहाराजांनी दिलेले आश्वासन किती खरे आहे.* *जागेपणी आणि शुद्धीवर* *असतांना तुम्ही नाम घ्या; मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम टिकवायची जबाबदारी माझी असे त्यांनी म्हटले आहे. म्हणून अखंड नाम घेतले पाहिजे. आपले असे कां होत नाही ? काय अडथळा येतो ?*


*-- अध्यात्म संवाद*

आर्थिक वर्षाचा अखेर

 🌼🌼🌼🌼🌼🌼

३१ मार्च म्हणजे आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस. त्या निमित्ताने ही विशेष कविता...


*हिशोब काय ठेवायचा, रिटर्न काय मागायचा!*


अनंत काळाच्या अखंड ओघात

आपल्या अल्पशा आयुष्याचा...

हिशोब काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा !   ll१ll


जीवनाने भरभरून दिले.

जे नाही मिळाले त्याचा...

हिशोब काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा !   ll२ll


मित्रांनी अलोट प्रेम दिले

मग शत्रूंनी दिलेल्या त्रासांचा...

हिशोब काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा !    ll३ll


मधुर आठवणी इतक्या आहेत

मग काही कटु अनुभवांचा...

हिशोब काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा !    ll४ll


मिळाली कौतुकफुले कैकवेळा जनांकडून

मग बोच-या काट्यांचा...

हिशोब काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा !    ll५ll


उगवणारा प्रत्येक सूर्य प्रकाशमान.

मग रात्रीच्या अंधाराचा...

हिशोब काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा !    ll६ll


आनंदाचे दोन क्षण पुरे जगायला.

मग उदासवाण्या क्षणांचा...

हिशोब काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा !     ll७ll


चंद्र शीतल, आल्हाददायक.

मग त्याच्यावरील लांछनांचा...

हिशोब काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा !     ll८ll


नुसत्या आठवांनीही होते मन उल्हसित.

मग कुणी भेटल्याचा अन् न भेटल्याचा...

हिशोब काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा !    ll९ll


काही तरी चांगलं आहेच प्रत्येकामध्ये.

मग किरकोळ दोषांचा...

हिशोब काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा !   ll१०ll


नाही ठेवला हिशोब, नाही लिखापढी

आहे त्याच्यापाशी, 'चित्रगुप्ताची' चोपडी

हिशोबून सारे त्याने ठरवायचे...

वसूल करायचे की रिटर्न द्यायचे!   ll११ll


*नव्या आर्थिक वर्षाच्या शुभेच्छा!*

(३१ मार्च २०२४)


🌼🌼🌼🌼🌼🌼