भगवान सांगतात की पाण्यामध्ये जो रस आहे तो मी आहे. म्हणजे पाणी पिताना परमात्म्याची आठवण व्हावी. सूर्याचा प्रकाश , चंद्राची प्रभा, अग्निच तेज , भुतांमध्ये म्हणजे जिवंत वस्तूमधील जीवन मी आहे. प्रत्येक ठिकाणी जर तोच आहे तर दर क्षणी त्याची आठवण झाली पाहिजे.
आपण तीर्थ घेतो म्हणजे पाणीच असत ना ; पण हे पवित्र आहे ही भावना घालताना त्या मध्ये ! ही भावना जर प्रत्येक गोष्टींमध्ये घातली , प्रत्येक पदार्थामध्ये ठेवली तर परमार्थ आणखी काय असतो.
आकाश सगळ्यात श्रेष्ठ कारण ते सगळं आपल्या पोटात साठवत आणि सगळ्यात सूक्ष्म असेल तर शब्द आहे. असे अनंत शब्द या आकाशात आहेत. आजपर्यंत इतकी माणस जन्माला आली. ती किती बोलली असतील , आज माणसं किती बोलत आहेत. ते सर्व साठवणार आकाश किती विशाल असेल.
मग आपल्याला कोणी बोलला तर त्याच्याकडे पाहण्याची आपली दृष्टी अशी पाहिजे की मी किती बोललो आहे तसंच हा पण बोलला आहे , तर मग जाऊ दे ना. असं माणसाचं झालं तर त्याला खरं खरं नियतीचं ज्ञान होईल.
No comments:
Post a Comment