एका साधकाने पु.श्रीरामकृष्ण परमहंस यांना विचारले भूतविद्या सुर्यलोक, चांद्रलोक नक्षत्रलोक हे काय आहे? श्रीरामकृष्ण म्हणाले इतका हिशोब कशाला? आंबे खा , आंब्याची झाड किती आहेत, किती लाख फांद्या आहेत , किती पण आहेत हे हिशोब करण्याची गरज काय ? मी आमराईत आंबे खायला आलो आहे आंबे खाण्याशी मतलब. पुढे म्हणाले "चैतन्य जर एकदाचे जागे झालं , कोणी एखादा ईश्वराला जाणू शकला तर मग असल्या फालतू गोष्टी जाणण्याची इच्छाच होत नाही. तापात भ्रम झालेला रोगी बडबडत असतो मी पाच शेर तांदुळाचा भात खाईन, मी घडाभर पाणी पीईन वगैरे. हे ऐकून वैद्य म्हणतो " ठाऊक आहे सर्व करशील " भ्रम दूर झाल्यावर फक्त ऐकायचं असत. तो साधक म्हणाला आमचा भ्रम कायमच राहणार. श्रीरामकृष्ण म्हणाले " ईश्वराकडे मन ठेवा. चैतन्य जागेल. तो साधक म्हणाला " आमचा ईश्वराशी योग क्षणिक. चिलीम ओढायला लागतो तितका वेळ." श्रीरामकृष्ण म्हणाले क्षणभर योगाने सुद्धा मुक्ती लाभते." "" आहिल्या म्हणाली "रामा डुकराचा जन्म येऊ दे की आणखी कशाचा येऊ दे, जेणेकरून तुझ्या पादपद्मी मन राहो, शुद्ध भक्ती लाभो म्हणजे झाले." मनापासून त्याच्याजवळ प्रार्थना केल्यास त्याच्याकडे मन लागते ईश्वराच्या पादपद्मि शुद्ध भक्ती उपजते.
TechRepublic Blogs
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment