एखाद्या कुळामध्ये जन्मास येणारी माणसें बहुधा अध्यातमदृष्ट्या सामान्य असतात. स्वभावाने ती सात्विक असतात. पण प्रपंचात मुलाबाळांत व घरांदारांत त्यांचे मन गुंतलेले असते. मेल्यानंतर ती माणसे फार तर स्वर्गलोकांपर्यंत जातात. आसक्तीमुळे कुटुंबाशी त्यांचा मानसिक संबंध राहतो. म्हणून कर्माच्या नियमाप्रमाणे हा ना तो देह घेऊन ती माणसे त्याच कुटुंबात जन्मास येतात. पण सर्वांच्या भाग्याने एखादी नाम घेणारी व्यक्ती त्या कुटुंबांत जन्मास येते. अखंड नामस्मरणाने ती व्यक्ती मोठा पुण्यसंचय करते. त्याचा परिणाम घडून ते सबंध कुटुंब आध्यात्म दृष्ट्या वरच्या पातळीवर जाते. अध्यात्माचा आणि आनुवंशिक संस्कारांचा संबंध आहे यांत शंका नाही. परंतु तो फार गुंतागुंतीचा असतो. सात्विक आईबापाच्या पोटी आसुरी प्रवृत्तीची तर उलट तामसी प्रवृत्तीच्या पोटी दैवी प्रवृत्तीची मुले जन्म घेतात. माणसांचा जन्म कोणाच्या पोटी झाला याला महत्त्व नाही. त्याच्यावर संताची कृपा होण्याला महत्व आहे.
TechRepublic Blogs
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment