*🌹🌹।।श्रीराम समर्थ।।🌹🌹*
*🍁सफल जीवन कोणते ?🍁*
*तपस्वी हयहया नांवाचा एक मोठा साधु होऊन गेला. त्याचा भाऊ त्याला म्हणाला " माझ्या तीन इच्छा होत्या. आयुष्याचे अखेरचे दिवस पवित्र ठिकाणी जावेत ही एक इच्छा.
सध्या मी मक्केमधें राहतो म्हणून ती पूर्ण झाली.माझ्या उपासनेची सर्व सोय करणारा नोकर मिळाल्यामुळे ती पूर्ण झाली.मरायच्या आधी मला ईश्वराचे दर्शन व्हावे ही तिसरी इच्छा आहे. ती पूर्ण होण्यास आपण कृपा करावी." त्यावर हयहयानें उत्तर दिलें की " पवित्र जागी राहण्यापेक्षा आपण स्वत:ला आंतबाहेर पवित्र करण्याकडे लक्ष द्यावें.
जेथे पवित्र साधु राहतात तें स्थान पवित्र असतें. आपल्याला चांगला नोकर मिळण्यापेक्षा आपण ईश्वराचा उत्तम नोकर होणें हे उपासनेचें लक्षण आहे. आपले दास्य पाहून ईश्वराचे अंत:करण प्रेमानें भरून यायला पाहिजे. आणि याच्यातच ईश्वराच्या दर्शनाचे मर्म सांठवलें आहे. मरेपर्यंत त्याच्या दर्शनाची वाट कशाला पहावी ? त्याच्याशी खोल नातें जोडून त्याला हांक मारली की तो येतो.*
*!!श्रीराम जयराम जय जय राम!!*
*प पू सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज*
(संतकथा— संकलन—प.पू. के. वि. बेलसरे.)
No comments:
Post a Comment