निलगिरीच्या बाजूला एक मोठा कॉफीचा मळा आहे. त्या मळयाच्या मालकाला एकच मुलगा होता. लहानपणी त्या मुलावर चांगले संस्कार झाले होते. पुढे त्याने आपले जीवन ध्यानधारणा करता लावायचे असे ठरविले म्हणून गुरूच्या शोधात तो हिमालयात गेला. तेथे एका थोर संन्यासाची गाठ पडली.
त्याच्याकडून त्याने संन्यास दीक्षा घेतली. गुरूने त्याला सोहमचा मंत्र दिला व काही योग क्रिया शिकवल्या. हा एकदा म्हैसूर येथे एका मठात उतरला होता. श्री.हुच्चूराव नावाचे एक साधक तेथे ज्या घरात राहात त्या घरातील एका खोलीमध्ये नारायणअप्पा यांच्या प्रेरणेने तेराकोटी जप झाला होता. जप तेरा अक्षरी मंत्राचाच झाला होता. संन्यासी म्हैसूरला आलेले हुच्चूरावांना कळले. ते त्याचाकडे गेले आणि वेळ काढून आपल्या घरी येण्यास विनविले. संन्यासी म्हणाले " मला राजवाड्यात जायचे आहे .त्याच्या आधी पाच मींनीटे येऊन जाईन." ठरल्या प्रमाणे हुच्चूरावांनी त्याला आणले. संन्यासी घरात आले, आणि ज्या खोलीत तेरा कोटी जप झाला होता त्या खोलीच्या उंबरठ्यापाशी थबकले आणि कानडीत म्हणाले " अरे, या खोलीत प्रचंड प्रमाणात नाम भरलेले आहे " समोर श्री ब्रम्हचैतन्य महाराजांची तसबीर होती. तिच्या कडे पाहुन म्हणाले " हे कोण थोर पुरुष आहेत ?
त्यांच्या भोवती मला तेजोमय असा तेरा अक्षरी मंत्र दिसतो. मी थोडावेळ बसतो" त्याप्रमाणे ते वीस मिनिटे शांतपणे बसले. जाताना ते म्हणाले "मोठे रम्य स्थान आहे." नाम घेणाऱ्याचा सूक्ष्म देह नामाच्या स्पंदनांनी भरून जातो. त्या स्पदनांचा अनुभव घेण्यास आपण संवेदनाशील व्हावे लागते.
No comments:
Post a Comment