जीवाच्या वासना तृप्त करून सुद्धा अपुर्णपण लोपत नाही. जो माणूस पूर्णतेच्या हाकेला प्रतिसाद देतो आणि जिवनशक्तीच्या महासागरात विलीन होतो तो एकदम पूर्ण तृप्त होतो व परम शांत होतो.
पूर्णतेच्या समग्रपणामुळे वासना शून्य होतो. वासनाशुन्य झालेल्या मनाला अभंग साम्य अवस्था प्राप्त होते. मनाच्या साम्यावस्थेत स्थिर झालेल्या माणसाला संत म्हणतात. नि:शेष वासनारहित होणे ही संतांची खूण आहे. माणूस हा विश्वाचा घटक आहे.
वासनेमुळे माणूस आणि विश्व यांच्यामध्ये विसंवाद उत्पन्न होतो. वासना विरली की मूळचा संवाद प्रगट होतो व माणूस समाधान पावतो. समाधान पावलेल्या माणसाच्या अंतर्यांमी विश्र्वस्वामी जो ईश्वर त्याचे अस्तित्व उदय पावते, अंतरी स्थिरावते त्याला संत म्हणतात.
No comments:
Post a Comment