TechRepublic Blogs

Thursday, July 31, 2025

तपामाजी तप

 ज्ञानराज सांगताहेत, " अनंत जन्मांचे तप एक

नाम । " 


*भगवन्नाम हे सामान्य नाही. अनंत जन्मात केलेल्या तपाचे हे फळ आहे. वाणीद्वारा एकवेळ नाम येणे, किंवा एका नामावर विश्वास राहणे हे अनंत जन्मांच्या तपाचे फळ आहे. भगवान अर्जुनाला* *सांगताहेत, “जयाचिये वाचे पुढा भोजे । अखंड नाम नाचत असे* *माझे । जे जन्मसहस्त्री वोळगिजे । एक वेळ यावया ॥* *तप केले असेल कोटी । तरीच नाम येईल ॥” नामदेवराय म्हणतात, "अनंत पुण्यराशी घडेल ज्यापाशी ।*

*तरीच मुखासी नाम येत ।। " नाथराय म्हणतात,*

" *अनेक जन्मांचे सुकृत पदरी । त्याचे मुखी हरी पैठा होय ।। "*

*सहस्त्रावधी जन्मात तप करून, ज्ञान, योग करून ज्यांची पापे क्षीण झाली आहेत अशा* *अंत:करणातच  परमात्मा भक्ती उत्पन्न होते; नामाविषयी*

*विश्वास दृढ असतो. अनंत जन्मांचे तप आणि एक नाम सारखे आहे. म्हणजे अनंत जन्मांच्या तपाचे फळ व एका* *नामाचे फळ समान आहे. किंबहुना अनंत जन्मांच्या तपाने जे साध्य होत नाही ते फक्त एक वेळ पूर्ण प्रेमाने नाम घेतल्याने प्राप्त होते. “नारायण नाम* *घालिता तुकासी । न येती या राशी जप तीर्थे ।" नामदेवराय म्हणतात. "सर्व काळ हरिनाम । हेचि*

*तपामाजी तप ॥'*

*अनंत जन्मांचे तप आणि एक नाम समान आहे. एवढंच नाही तर किंबहुना अनंत जन्मांच्या तपाने जे साध्य होत नाही, ते* *एकवेळ पूर्णप्रेमभावाने नाम घेतल्याने अगदी सहजी प्राप्त होते. नामस्मरणात एवढी सिद्धी* *असल्याचे कारण असे की, आपल्या नावावर भगवंताचे विलक्षण प्रेम आहे.*

"*आवडे तयाचे नाम घेता तयासी ।। "*

संकलन आनंद पाटील

Wednesday, July 30, 2025

निरुपणाचा हेतू

 एकदा मालाड येथे निरूपण सुरू होण्याला अवकाश होता. त्यावेळी एकाने असा विचार मांडला की निरूपण आणि त्याच्या आगेमागे जाणारा वेळ मिळून होणारा वेळ जर घरी नामस्मरणात घालविला तर निरुपणाचा हेतू चांगल्या तऱ्हेने साध्य होईल.

 या बद्दल बरीच चर्चा झाली. निर्णय लागेना. तेव्हा या बद्दल श्री.महाराज यांना विचारावे असे ठरले. त्यानंतर एकाने हा प्रश्न श्री.महाराज यांच्यापुढे मांडला व दोन्ही बाजूचे मुद्दे मांडले. त्यावर श्री.महाराज म्हणाले " मला वाटते की खरा मुद्दा या प्रश्नाने व्यक्त होत नाही. 

या वेळात काय करावे यापेक्षा हे दोन तास सोडून दिले तरी उरलेल्या बावीस तासात आपण काय करतो आणि काय करायला पाहिजे हा मुद्दा आहे. निरूपण ऐकले काय किंवा नामस्मरण केले काय , उरलेले बावीस तास जर  आपण नामाशिवाय घालविले तर किती तरी तास नामाशीवाय घालविले असे होईल ना? पोथीच्या दोन तासात नुसती करमणूक म्हणून ती न ऐकता, 

आपल्या मनात भगवंता बद्दल प्रेम उत्पन्न होऊन नामस्मरणाची बुध्दी वाढीला लागावी या भावनेने ऐकली तर लाभ होईल. त्या ऐवजी तेव्हढा वेळ सर्वांनी नामस्मरण केले तरी उत्तमच होईल. कारण नामस्मरण करण्याची बुध्दी व्हावी हाच पोथीचा हेतू आहे. पण दोन तास मन नामात गुंतविणे ही गोष्ट सोपी नाही हे ध्यानात ठेवावे."

Tuesday, July 29, 2025

रामहृदय

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*काय सांगितले यापेक्षा कोणी सांगितले ते महत्त्वाचे*


     *श्रीमहाराज जेव्हा अनुग्रह देत तेव्हा अनुग्रहीतास त्रयोदशाक्षरी मंत्र , रामहृदयाची पोथी व माळ देत असत. रोज स्नान झाल्यावर एक माळ तरी जप व रामहृदयाचा एक पाठ करावाच असा श्रीमहाराजांचा आग्रह असे. वामनराव ज्ञानेश्वरी ( हे रामहृदयाची संथा देत ) यांनी एकदा श्रीमहाराजांना विचारले की , महाराज , रामहृदय संस्कृतमध्ये आहे. बहुतेकांना त्याचा अर्थ कळत नाही. त्याचा अर्थ न कळता ते पोपटासारखे म्हणून काय साध्य होणार ? ' त्यावर श्रीमहाराज म्हणाले , ' वामनराव, काय म्हणायला सांगतो यास विशेष महत्त्व नसून ते कोण म्हणायला सांगतो यात त्याचे महत्त्व आहे. जो म्हणावयास सांगतो त्याची शक्ती त्याच्या पाठीमागे असते. रोगी डाॅक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर त्यास तपासतो. रोगाचे निदान करून औषध देतो. औषधात काय काय आहे हे रोग्यास माहीत नसते.

 पण त्या औषधाने आपणांस बरे वाटेल या श्रद्धेनेच त्यास बरे वाटते. औषधात काय काय आहे हे समजल्याशिवाय औषध घेणारच नाही असे जर रोग्याने म्हटले तर ते हास्यास्पद होईल. त्याने श्रद्धेने औषध घेतले तर तो बरा होतो असा अनुभव येतो. तसे अर्थ न कळता पण श्रद्धेने रामहृदय म्हटल्यास साधकाचे काम आपोआप होते. '*

*||श्रीराम जय राम जय जय राम||*

Monday, July 28, 2025

अनुभवांचे क्षेत्र

 माणसाच्या माणुसकीचा विकास त्याच्या येणाऱ्या अनुभवांच्या मोठेपणावर अवलंबून असतो. माणसाचे मनच त्याच्या अनुभवांचे आणि त्यांच्यातून निर्माण होणाऱ्या ज्ञानाचे प्रधान साधन आहे. म्हणून माणसाला जोपर्यंत आपल्या मनाचे अज्ञान असते तोपर्यंत त्याच्या अनुभवांचे क्षेत्र अगदी सीमित राहते. 

माणूस इंद्रियांची सीमा ओलांडू शकत नाही. खरे म्हणजे माणसाच्या मनामधे इंद्रियांची मदत न घेता विशाल अनुभव घेण्याची मोठी सुप्त शक्ती आहे. शब्दस्पर्शादि इंद्रियांची स्वाभाविक कक्षा पार करून येणारे हे अनुभव इंद्रियांना नेहमी येणाऱ्या अनुभवांइतकेच खरे म्हणजे वस्तुनिष्ठ असतात.

 त्या अनुभवांपैकी ईश्वराचे दर्शन हा सर्वात श्रेष्ठ व पवित्र अनुभव मानला जातो. ईश्वरदर्शनाच्या अनुभवांमध्ये माणसाचे मन ईश्वराशी समरस होऊन ईश्वराचा प्रत्यक्ष अनुभव घेते. यासाठी मनाचे परिवर्तन घडवून आणावे लागते. ईश्वराशी समरस होण्याची एक कला आहे. 

मनाचे मूलद्रव्य, मनाची रचना आणि मनाचे कार्य यांचे अज्ञान आहे तो पर्यंत ही कला हस्तगत होत नाही. विज्ञानाचे ज्ञान अल्प असल्याने त्याने  मनामध्ये परिवर्तन घडवून आणणे शक्य नाही. म्हणून मानवी मनाचे अज्ञान नाहीसे करण्यासाठी संतांनी सांगितलेल्या तत्वज्ञानाकडेच वळावे लागते.

Sunday, July 27, 2025

परमार्थ

 भगवान सांगतात की पाण्यामध्ये जो रस आहे तो मी आहे. म्हणजे पाणी पिताना परमात्म्याची आठवण व्हावी. सूर्याचा प्रकाश , चंद्राची प्रभा, अग्निच तेज , भुतांमध्ये म्हणजे जिवंत वस्तूमधील जीवन मी आहे. प्रत्येक ठिकाणी जर तोच आहे तर दर क्षणी त्याची आठवण झाली पाहिजे. 

आपण तीर्थ घेतो म्हणजे पाणीच असत ना ; पण हे पवित्र आहे ही भावना घालताना त्या मध्ये ! ही भावना जर प्रत्येक गोष्टींमध्ये घातली , प्रत्येक पदार्थामध्ये ठेवली तर परमार्थ आणखी काय असतो. 

आकाश सगळ्यात श्रेष्ठ कारण ते सगळं आपल्या पोटात साठवत आणि सगळ्यात सूक्ष्म असेल तर शब्द आहे. असे अनंत शब्द या आकाशात आहेत. आजपर्यंत इतकी माणस जन्माला आली. ती किती बोलली असतील , आज माणसं किती बोलत आहेत.  ते सर्व साठवणार आकाश किती विशाल असेल. 

मग आपल्याला कोणी बोलला तर त्याच्याकडे पाहण्याची आपली दृष्टी अशी पाहिजे की मी किती बोललो आहे तसंच हा पण बोलला आहे , तर मग जाऊ दे ना. असं माणसाचं झालं तर त्याला खरं खरं नियतीचं ज्ञान होईल.

मनाची कडी

 🌹मनाची कडी🌹 


🌹बऱ्याचदा आपण मनाची कडी लावायला विसरतो आणि मग, अनेक घोळ होतात.🌹


*घराची ही साधी कडी. पण काम चोख. आतला सुरक्षित आणि बाहेर गेलेल्याला घर सुरक्षित आहे याची खात्री देणारी ही कडी खरं तर घराची देखणी नथच मानावी. ज्या घराला कडीकोंड्याच नाही ते घर सुरक्षित नाही. कडीशिवाय घर पुरं नाही. आजवर कडीकुलपांनीच स्थावर मालमत्ता सुरक्षित ठेवली.*


*भित्र्या माणसांना कडी सुरक्षितता पोहोचवते. विशेषतः एकटी स्त्री घरात एकटी असेल तर ही कडीच तिला..... मै हुॅ ना! असं बेलाषक सांगते. कडी नुसती कडी नसते तर आधारासाठी कायम खडी असते. आपली ती सुरक्षिततेची कवच कुंडल असते. अगदी रात्र घरात एकटे असू... आणि दार नुसतंच लोटलेलं असेल तर झोप लागता लागणार नाही. कडी तिचं काम फारच इमाने इतबारे करते.*

 

*मनाच्याही दरवाज्यालाही अशा कड्या असाव्यात. वेळोवेळी त्या लावता याव्यात. सताड उघड्या घरात कोण कसं शिरेल आणि विध्वंस करुन जाईल याची नुसती कल्पना करा. आपण अस्वस्थ होतो.* 


*मन जर कायम असं सताड उघडं असेल तर.... कोणीही आपल्याला गृहीत धरून कसेही आपल्याशी व्यवहार करु लागतील. त्यांना जर थोपवायचे असेल तर... मनाची कडी मजबूत असावी.*


*कोणालाही कसेही आपल्या मनात.... जीवनात डोकावता येणार नाही. बऱ्याचदा आपण मनाची कडी लावायला विसरतो आणि मग..... अनेक घोळ होतात. कडी ही आपल्या अस्तित्वासाठी आवश्यकच आहे. म्हणजे मग आपण फार कमी वेळा दुःखी होऊ. म्हणजे इतरही ठरावीक अंतराने आणि अदबीने आपल्याशी वागतील.*


*बोलता बोलता कधी कधी आपण बेताल होतो. वाहवत जातो. पच्छाताप होतो. तोंडाला जरा कडी लावायला  हवी होती हे सहज विसरुन जातो.* 


*नेमकं आणि योग्य वेळी निर्णायक बोलणारी जी माणसं असतात त्यांच्या शब्दाला सभेत... घरात... समाजात भारी किंमत असते. कोणत्या विषयाला कोठे कडी घालायची हे त्यांना पक्के ठाऊक असते.* 


*कधी कधी नको तिथे मनाला कडी घालणारी माणसं दुसऱ्याला कायम ताटकळत उभे ठेवतात. आपल्यासाठी जीवतोड करणाऱ्यांच्या बाबतीत ही कडी फार क्लेश देणारी ठरते. आयुष्यभर मग नाव घ्यायचं नाही असं मन ठरवून टाकतं. हे कितपत योग्य आहे.*


*आगरकर आणि टिळक यांनी  एकमेकांसाठी आयुष्याच्या उत्तरार्धात अशाच कड्या घातल्या. एकत्र शाळा चालवणारे.. शाळा शेणाने सारवणारे हे मित्र खूप दुरावले. शेवटच्या क्षणी मात्र न राहून टिळक आगरकरांना भेटायला गेले.*


*डोळे भरुन एकमेकांना पाहिले. पण बोलले नाहीत. टिळक घराबाहेर पडले आणि आत आगरकरांनी जीव सोडला. टिळकांना अतिव दुःख झाले. पण.... काय उपयोग. मित्र कायमचा गेला.* 


*आपणही जरुर कड्या लावा. पण योग्य तिथेच. नको त्या ठिकाणी लावून बसाल तर फार फार काही गमावून बसाल. योग्य ठिकाणी लावाल तर जीवन हलके कराल.* 


*फक्त ती लावायची कुठे आणि कधी यावर जरुर विचार करा.🌹🌿🌾






Friday, July 25, 2025

संवेदनाशील

 निलगिरीच्या बाजूला एक मोठा कॉफीचा मळा आहे. त्या मळयाच्या मालकाला एकच मुलगा होता. लहानपणी त्या मुलावर चांगले संस्कार झाले होते. पुढे त्याने आपले जीवन ध्यानधारणा करता लावायचे असे ठरविले म्हणून गुरूच्या शोधात तो हिमालयात गेला. 

तेथे एका थोर संन्यासाची गाठ पडली. त्याच्याकडून त्याने संन्यास दीक्षा घेतली. गुरूने त्याला सोहमचा मंत्र दिला व काही योग क्रिया शिकवल्या. हा एकदा म्हैसूर येथे एका मठात उतरला होता.

 श्री.हुच्चूराव नावाचे एक साधक तेथे ज्या घरात राहात त्या घरातील एका खोलीमध्ये नारायणअप्पा यांच्या प्रेरणेने तेराकोटी जप झाला होता. जप  तेरा अक्षरी मंत्राचाच झाला होता. संन्यासी म्हैसूरला आलेले हुच्चूरावांना कळले. ते त्याचाकडे गेले आणि वेळ काढून आपल्या घरी येण्यास विनविले.

 संन्यासी म्हणाले " मला राजवाड्यात जायचे आहे .त्याच्या आधी पाच मींनीटे येऊन जाईन." ठरल्या प्रमाणे हुच्चूरावांनी त्याला आणले. संन्यासी घरात आले, आणि ज्या खोलीत तेरा कोटी जप झाला होता त्या खोलीच्या उंबरठ्यापाशी थबकले आणि कानडीत म्हणाले " अरे, या खोलीत प्रचंड प्रमाणात नाम भरलेले आहे "  

समोर श्री ब्रम्हचैतन्य महाराजांची तसबीर होती. तिच्या कडे पाहुन म्हणाले " हे कोण थोर पुरुष आहेत ? त्यांच्या भोवती मला तेजोमय असा तेरा अक्षरी मंत्र दिसतो. मी थोडावेळ बसतो" त्याप्रमाणे ते वीस मिनिटे शांतपणे बसले.

 जाताना ते म्हणाले "मोठे रम्य स्थान आहे." नाम घेणाऱ्याचा सूक्ष्म देह नामाच्या स्पंदनांनी भरून जातो. त्या स्पदनांचा अनुभव घेण्यास आपण संवेदनाशील व्हावे लागते.

Thursday, July 24, 2025

विश्र्वस्वामी

 जीवाच्या वासना तृप्त करून सुद्धा अपुर्णपण लोपत नाही. जो माणूस पूर्णतेच्या हाकेला प्रतिसाद देतो आणि जिवनशक्तीच्या महासागरात विलीन होतो तो एकदम पूर्ण तृप्त होतो व परम शांत होतो. 

पूर्णतेच्या समग्रपणामुळे वासना शून्य होतो. वासनाशुन्य झालेल्या मनाला अभंग साम्य अवस्था  प्राप्त होते. मनाच्या साम्यावस्थेत स्थिर झालेल्या माणसाला संत म्हणतात. नि:शेष वासनारहित होणे ही संतांची खूण आहे. माणूस हा विश्वाचा घटक आहे.

 वासनेमुळे माणूस आणि विश्व यांच्यामध्ये विसंवाद उत्पन्न होतो. वासना विरली की मूळचा संवाद प्रगट होतो व माणूस समाधान पावतो. समाधान पावलेल्या माणसाच्या अंतर्यांमी विश्र्वस्वामी जो ईश्वर त्याचे अस्तित्व उदय पावते, अंतरी स्थिरावते त्याला संत म्हणतात.

Wednesday, July 23, 2025

मृत्यू लोक

 चिंतन 

              श्रीराम,

     अकस्मात होणार होऊन जाते... जीवन हे सातत्याने घटनाप्रधान आहे. ते क्षणभंगूरही आहे. जे जे दृश्य रुपाने साकारते त्याचा नाश अटळ आहे म्हणूनच ह्या वास्तव्य भूमीला मृत्यू लोक म्हणतात.

 अगदी सान्निध्यात असूनही आपल्या प्रिय व्यक्तीच्या आकस्मिक निधनाचा पुसटसा पूर्वसंकेत सहसा कोणालाही मिळत नाही आणि मृत्यूचा स्वीकार करणे अत्यंत कठीण जाते. हे सर्वांनाच कळते मात्र ते सहजासहजी वळत नाही, हीच अगम्य अशी माया!

              संथ पाण्यावर नाव ही तरंगणारच. वादळाचे थैमान चालू असताना लाटांच्या धिंगाण्याचा सामना करीत आपली नाव टिकून तरंगत ठेवणे हे फक्त गुरुकृपेने आणि साधनेने जमते. अनावश्यक ते टाळावे व सुयोग्य तेच करावे.

जे उचित तेच आकळावे |ऐसा अनुभव होय निका |

तेव्हा समजावे ही ईशकृपा आहे!!

                   ||श्रीराम ||

नवीन विचार

 सज्जनगडाच्या पायथ्याला एक छोटंस टपरीवजा हॉटेल होतं.. आज ते तिथं नाही. पण त्या टपरीसाठी उभ्या केलेल्या सातही खांबांना मात्र पालवी फुटलीय. जीवन जगण्याची गोष्ट आहे... ही अगम्य गोष्टच हे खांब सांगून जातात. ज्या खांबांना वाळून नंतर जळण बनायचं होतं ते आजही फुलताहेत, बहरताहेत... आणि आपण माणसं मात्र छोट्या छोट्या गोष्टींनी हतबल होतो, प्रतिकूल परिस्थितीत गलितगात्र होतो. जगण्याची आशा सोडून देऊन मरणाची, आत्मघाताची भाषा बोलू लागतो. किती विचित्र आहे ना? या ७ खांबांपासून आपण काय घ्यावं हे ज्याचं त्यानं ठरवावं...पण मला मात्र एक नवीन विचार मिळाला.

Tuesday, July 22, 2025

संदेश

 *एक चांगला संदेश*


समजा लोखंडाच्या एका सळईची किंमत २५० रुपये होते.

त्यापासुन घोड्याचे नाल बनवले तर त्याचे मुल्य होते १०००/- रुपये.

त्यापासुन सुया बनविल्या तर त्याचे मुल्य होते १०,००० रुपये.

त्यापासुन घड्याळाच्या बॅलन्स स्प्रिंग्ज बनविल्या तर त्याचे मुल्य होते १,००,००० रुपये.


तुम्ही स्वतः काय आहात यावर तुमचे मुल्य ठरत नाही. तर तुम्ही स्वतःला काय बनवता यावर तुमचे मुल्य ठरते..

आपण आपल्याला किती मौल्यवान बनवायचं हे आपल्याच हातात आहे.!!!


  "आपण एक दाणा पेरला असता,  आणि निसर्गापासून एकच दाणा रिटर्न मिळाला असता तर माणसाची काय अवस्था झाली असती ?"


धान्य पेरावं का खावं सुचलं नसतं .


पण ईश्वरानं माणसासाठी अजब व्यवस्था करुन ठेवली आहे. 


आपण एक दाणा पेरला कि तो शेकडो, हजारो दाणे देतो.


अगदी निसर्गाच्या याच नियमानुसार जीवनात आपण काय पेरत आहोत ? 


दुःख, राग, द्वेष पेरत असेल तर निसर्गाकडून शेकडो, हजारो पटीने दुःख, राग, द्वेषच परत मिळेल...


आणि आनंद, प्रेम, माणुसकी पेरत असाल तर शेकडो, हजारो पटीने तेच आपल्याला या प्रकृतीकडून, निसर्गाकडून परत मिळणार यात काहीच शंका नाही!


          


             *"पेरणी चालू आहे.."*

          *काय पेरायच हे आपलं*

             *आपणच ठरवायच*

Saturday, July 19, 2025

कशाला कामं करायची ?

 *गावातील एका पानपट्टी दुकानाजवळ सुमारे पस्तीस वर्ष वय असलेल्या एका बेकार तरुणाला विचारले :*


*काही नोकरी धंदा करून कमवत का नाहीस ?*


*दिवसभर दारू पिऊन गुठका खात थुंकत असतोस !*


*तो बोलला : माझी मर्जी !*


*त्याला विचारण्यात आलं : लग्न झालंय का ?*

*तो बोलला : झालंय.*


*मी विचारले : कसं केलं?*


*तो म्हणाला : मुख्यमंत्री  आदर्श विवाह योजनेअंतर्गत श्रम कार्ड द्वारे तीस हजार मिळतात आणि आंतरजातीय कन्यादान योजनेतून अडीच लाख रुपये मिळतात.*


*मी म्हटलं मग मुलं होतील त्याकरिता तरी कमवावं लागणारच ना?* 


*तो म्हणाला : "जननी सुरक्षा" योजनेत प्रसूती मोफत असतेच शिवाय पंधराशे रुपयांचा धनादेश मिळतोच आणि "श्रम कार्ड" योजनेत "भगिनी प्रसूती योजनेद्वारे" वीस हजार रुपये मिळतात.*


*मी म्हटलं : मुलांच्या शिक्षणाकरता तरी कमावशील की नाही ?*


*गुटख्याची पिचकारी मारत तो म्हणाला, त्यांच्या करीता सरकारतर्फे शिक्षण,  गणवेश, वह्या पुस्तके आणि जेवण मोफत मिळतेच शिवाय मुख्यमंत्री श्रम कार्डद्वारे दर वर्षी पैसे सुद्धा मिळतात.*


*आणि जेव्हा मुलगा महाविद्यालयात जाऊ लागेल तेव्हा BPL द्वारे मोफत प्रवेश आणि स्कॉलरशीप सुद्धा मिळते. मग टेंशन कशासाठी घ्यायचं !*


*मी विचारलं, घर खर्चाचं काय ?*


*तो म्हणाला, लहान मुलीला सरकारकडून सायकल मिळाली आणि मुलाला लॅपटॉप मिळालाय.*


*आईवडिलांना वृद्धावस्था पेन्शन मिळतेय आणि एक रुपया किलो दराने तांदूळ मिळतात.*


*मी म्हणालो, अरे आईवडिलांना तीर्थयात्रा करण्यासाठी तरी कमव.*


*तो म्हणाला,  "मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेअंतर्गत त्यांना पाठवलं सुध्दा!*


*मी म्हटलं, त्यांच्या आजारपणासाठी तरी कमव !*


*तो म्हणाला, "आयुष्यमान कार्ड" द्वारे पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपाय मिळतात.*


*मला त्याचा राग आला. म्हटलं, आईवडिलांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी तरी कमव.*


*तो म्हणाला, अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारी लाकडं सरकार मोफत देतंय.*


*मी म्हटलं, अरे मुलांच्या विवाहाकरीता तरी कमव.*


*तो हसला आणि म्हणाला, पुन्हा तोच प्रश्न !*

*जसा माझा विवाह झाला तसाच त्यांचाही होणार!*


*मी म्हटले मित्रा, मला एक गोष्ट सांग. तू एवढे सुंदर कपडे कसे काय वापरू शकतोस ? तो म्हणाला, सरकारी जमिनीवर ताबा घे, घर बांध, कर्ज घे आणि घर विकून जमिन कब्जात घे.*


*तुमच्या सारखे लाखो लोक आमच्या सारख्यांकरीता टॅक्स भरत आहेत. शेतकरी कष्ट करून धान्य पिकवत आहेत आणि सरकार ते धान्य खरेदी करून आम्हाला मोफत देत आहे. मग आम्ही कशाला कामं करायची ?*



अनन्यभक्ती

 *॥श्रीहरिः॥*


"अनन्यभक्ती" ही कशी असते याविषयी मार्गदर्शन करताना श्रीभगवंत म्हणतात, 


*-----------------------------*


॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

अथश्रीमद्भगवद्गीता अष्टमोध्यायः 


*पुरुष: स परः पार्थ*

*भक्त्या लभ्यस्त्वनन्यया ।*

*यस्यान्तःस्थानि भूतानि* 

*येन सर्वमिदं ततम् ॥*

*॥८.२२॥*


(श्रीमद्भगवद्गीता अध्याय आठवा अक्षरब्रह्मयोग ८.२२) 


*भावार्थ:- हे पार्था, ज्याच्या अंतर्गत ही सर्व भूतं आहेत आणि ज्यानं हे सर्व (विश्व) व्यापलेलं आहे तो परम पुरुष (परमात्मा) अनन्य भक्तीनंच प्राप्त होणारा आहे.*


सर्वांहून श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांची प्राप्ती अनन्य भक्तीनेच होते. ते जरी आपल्या धामामध्ये विराजमान असले, तरी ते सर्वव्यापी आहे. आणि सर्व काही त्यांच्या ठायी स्थित आहे.


*-----------------------------*


*अक्षर* म्हणजे मूळ प्रकृतीहून अगदी निराळी, श्रेष्ठ, अनादी, अव्यक्ताहून अशी एक अवस्था आहे. तिला परमगती म्हणतात. मनुष्य त्या गतीला जाऊन मिळाला म्हणजे तो पुन्हा संसारात परत येत नाही, असं यापूर्वीच्या २०व्या आणि २१ व्या श्लोकात सांगून त्या श्लोकांचा उत्तरार्ध भगवंत या श्लोकात वर्णन करतात.


‘अव्यक्त' आणि ‘अक्षर' ही दोन्ही विशेषणं गीतेमधून कधी सांख्यांच्या प्रकृतीला तर कधी त्या प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या परब्रह्माला उद्देशून योजलेली असतात, हे इथे ध्यानात ठेवलं पाहिजे. 


*'अक्षरब्रह्म'* म्हणजे ज्या ठिकाणी पोचल्यावर मनुष्यास पुनर्जन्म प्राप्त होत नाही तो. हा जो अव्यक्त आणि अक्षर भाव असतो त्यालाच सर्वोत्तम गती असं म्हणतात.

 त्या भावाला प्राप्त होऊन जीव पुन्हा संसारमार्गात येत नाही. भगवंताचं ते परमपद असतं. पण अशी अवस्था येण्यासाठी प्रथम 'अहम्'ला विसरावं लागते. म्हणजेच, 


*'अहं'* ला विशाल बनवावं लागतं - 'अहं'चं उदात्तीकरण करावं लागतं. एवढंच नाही तर मी 'अहं'ला विसरलो आहे, ही गोष्ट देखील विसरावी लागते!


नदीचं आणि सागराचं एकदा मीलन झालं म्हणजे नदी कधी सागरापासून विलग होत नाही. रात्र एकदा दिवसाला जाऊन मिळाली म्हणजे ती पुन्हा त्या दिवसापासून परत फिरत नाही.

 बंदुकीतून गोळी सुटली की ती फिरून मागे येत नाही. मुखातून शब्दफेक झाली की तिला मागे घेता येत नाही. अनन्यभक्तीचा

ओघच मानवाला त्या आनंदसागराकडे नेत असतो. 


*'अनन्यभक्ती'* चा अर्थ समजून घेतला पाहिजे. अनन्यभक्ती म्हणजे आत्मज्ञानरूप भक्ती. मीच स्वतः भगवान आहे, अशी साक्षत्काररूपी अनुभूती येणं म्हणजे अनन्यभक्ती! केवळ आरडाओरडा करून भजन करणं म्हणजे परमेश्वराची अनन्यभक्ती होऊ शकत नाही.

 भक्तीमध्ये बुद्धिनिष्ठभावाचा ओलावा हवा. कर्मकांडात्मक शुष्क भक्ती उपयोगाची नाही! केवळ भजनाला जातो म्हणजे भक्ती करतो असं होत नाही. भक्ती ही दुसऱ्याला दाखविण्याची गोष्ट नाही.आपल्या 'भक्ती'मुळे दुसऱ्याला त्रास होत असेल तर अशी भक्ती कधीच फलद्रूप होणार नाही.


ज्यावेळी दुसऱ्यामध्ये असलेल्या परमेश्वराला ओळखण्याची समज येईल त्यावेळी अशी बाह्यतः कर्मकांडात्मक भक्ती माणूस सोडून देईल.

 मग अंतर्मुख झाल्यानंतर खऱ्या अर्थानं त्याच्या भक्तीला प्रारंभ होईल. त्या भक्तीचं अंतिम स्थान म्हणजेच 'अहं ब्रह्मास्मि' खऱ्या अर्थानं गाठलं जाईल. तेव्हाच पुरुष भगवंत स्वरूपात विलीन होऊन जाईल.


*भगवान श्रीकृष्ण पुढे सांगतात,* 

की या अक्षर चैतन्य परमात्म्याला प्राप्त करण्याचा मार्ग आहे - अनन्य भक्ती.


ही तेव्हाच पूर्ण होते जेव्हा साधक स्वतःला शरीर, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे बघायला शिकतो. अन्यथा एक कच्चा साधक शारीरिक वेदना, मनामध्ये उठणारे नकारात्मक विचार, मनाचे विकार, मायेचं आकर्षण यांच्या अधीन होऊन त्यांच्यातच लीन होतो. सत्याप्रति अगाध प्रेम हेच मायेपासून वैराग्य देतं. 

आत्यंतिक तृष्णेमुळे प्रेरित होऊन आत्मतत्त्वाचा शोध घेतल्यानंतर साधकाला, 'मी म्हणजेच ते चैतन्य आहे,' ही दृढता मिळते. हीच अनन्य भक्ती आहे. खरंतर साधक आपल्या हृदयातच 'स्व'चा शोध आणि अनुभव प्राप्त करतो. परंतु परमचेतना हीच संपूर्ण विश्वाचं अधिष्ठान आहे, ही जाणीव त्याच्यात असते. 



*गीतेत* येथून पुढे भक्तीचा विषय आलेला आहे.भक्तीसंबंधीचा असा अधिकाधिक सुंदर उपदेश यापुढील गीताश्लोकांमध्ये येत राहील. 


"अनन्यभक्तीचा" येथील अर्थ हा असा आहे.*'मला भक्तीशिवाय आणखी काहीही नको आहे!* 

भक्तीची हीच कल्पना आपल्या पुराणांद्वारा, आपल्या संतांच्या जीवनांद्वारा स्पष्ट केली गेली आहे. यात सर्वोत्तम कथा आहे ती प्रह्लादाची. 


त्या पाच वर्षांच्या बालकाची भक्ती पूर्णतः शुद्ध आणि अहैतुकी होती. त्याची कथा श्रीमद् भागवतामध्ये आलेली आहे. त्याला ईश्वरानुभूती प्राप्त झालेली होती. नरसिंह अवतारातील परमेश्वर या बालकाच्या भक्तीने प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले, 


“प्रह्लादा! मी तुझ्यावर अगदी प्रसन्न झालेलो आहे. माझ्याकडून तुला हवा तो वर मागून घे.” 


भक्त प्रह्लाद सस्मित वदनाने म्हणाला,

“मी काही वणिग्वृत्तीचा नाही, की तुला वर मागेन. मी तुझ्यावर प्रेम करतो; एवढे मला पुरे आहे. त्याच्या बदल्यात असे मला काहीही नको.” म्हणून तर आपल्या धार्मिक वाङ्मयात सर्वश्रेष्ठ भक्ताचे उदाहरण म्हणून प्रह्लादाची प्रशंसा आढळते. 


*नारद भक्तिसूत्र म्हणते,* 

*भक्ता एकान्तिनो मुख्याः -*

"जे एकाग्र झालेले भक्त असतात, सर्व भक्तांमधील श्रेष्ठ भक्त होत. एकाग्र भक्ती कुठल्याही एखाद्या क्षुल्लक कारणाने विचलित होत नसते." 


श्रीमद्भागवताच्या सातव्या खंडामध्ये जशी भक्त प्रह्लादाची कथा आहे, तशीच चौथ्या स्कंदामध्ये ध्रुवाचीही आहे. ध्रुव हा जितका विस्मयकारक बालक होता, तितकेच त्याचे जीवनही विस्मयकारक होते. 

जेव्हा त्याला ईश्वरानुभूती प्राप्त झाली, तेव्हा त्याला सर्वोच्च असे अढळ पद हवे होते. भगवंत त्याला 'तथास्तु' म्हणाले. त्यानेच ध्रुव नक्षत्र झाला. मृत्यूनंतर तो ध्रुव तारा झाला. 


भगवंत त्याला म्हणाले, 

“मी तुला असे उच्च पद देतो की जिथे सप्तर्षि सदैव तुझ्याभोवती असतील. त्यांच्या केंद्रस्थानी तू मात्र सतत एकाच ठिकाणी राहशील. हेच तुझ्यासाठी सर्वोच्च पद असेल. ते मी तुला देतो.” ध्रुव संतोष पावला आणि परमेश्वर अंतर्धान पावला.


काही काळ गेल्यानंतर ध्रुव विचार करू लागला, "मी केवढा मूढ! परमेश्वरासंनिध जाऊन मी त्याला एक क्षुद्र पद मागितले. मी खरोखरीच मूढ म्हणायचा!" 


नंतरच्या काळात त्याला याचा अतिशय पश्चात्ताप झाला.ध्रुवाची ही कथा चौथ्या खंडात आहे. पुढे सातव्या खंडात प्रह्लादाची कथा येते. तो पूर्णमुक्त होता. 


“मला काहीही मागायचे नाही. मी वणिग्वृत्तीचा नाही. मी काही व्यापारी नाही." 'मी तुम्हास अमुक देतो; त्याच्या बदल्यात तुम्ही मला तमुक द्या', याला व्यापार म्हणतात, विनिमय म्हणतात. येथे असा कोणताही व्यापार-विनिमय नाही. 


प्रह्लादाची भक्ती ही केवळ "अनन्यभक्ती" आहे. स्वामी विवेकानंद जसे 'प्रेमाकरिता प्रेम' म्हणाले ना, तसे हे आहे. (म्हणून प्रह्लादाच्या) या विचाराची आपल्याकडील आध्यात्मिक वाङ्मयात फार प्रशंसा आढळते. 


*'भक्तीकरिता भक्ती'* ही खरोखरीच खूप उच्च अवस्था होय. ही अवस्था खूप उच्च आहे, हे माहिती असणेही चांगले आहे. नाहीतर भारतातील काही भक्तांप्रमाणे आपण आपल्या सर्व चांगल्या गोष्टीही आपल्या सामान्य स्थितीपर्यंतच्या निम्नस्तराला आणून ठेवू.


भक्त एखाद्या देवाची उदाहरणार्थ श्रीगणेशाची प्रार्थना करतो; पण प्रार्थिलेले काही त्याला मिळत नाही. मग तो कार्तिकेयाची प्रार्थना करतो,त्यानंतर शिवाची, नंतर आणखी एखाद्या देवाची. (त्याला असे वाटत असते की) त्याने प्रार्थिलेले त्याला मिळायलाच हवे. जणू परमेश्वर त्याचा दास आहे आणि त्याने मागितलेली कोणतीही वस्तू परमेश्वराने त्याला दिलीच पाहिजे. 


*डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्* यांनी असे म्हटले आहे की,

*'आपण देवावर प्रेम करीत नाही; आपण देवाला वापरून मात्र घेतो.'*


प्रह्लादाची भक्ती काही अशा प्रकारची नाही. त्याच्या भक्तीत शुद्ध प्रेम होते. ते 'प्रेमासाठी प्रेम' आहे. वेदान्ताने अशा भक्तीला अहैतुकी भक्ती म्हटलेले आहे. हरी, श्रीविष्णू किंवा शिव ही एकाच दिव्य पुरुषाची वेगवेगळी नावे होत.त्या दिव्य पुरुषाचे स्वरूप असे आहे की, तो शुकासारख्या तरुणांची ज्यांनी आपले स्वरूप म्हणजे सनातन आत्मतत्त्व होय, याची अगोदरच अनुभूती घेतलेली आहे अशा शुकासारख्या तरुणांची अंत:करणे आकर्षून घेतो.

 त्या तरुणांना अभिलाषा अशा नसतातच. तरीही ते हरीची भक्ती करीत असतात. कारण काय, तर त्यांच्यासारख्यांचीही अंतःकरणे स्वतःकडे आकर्षून घेण्याचा गुण त्यांना परमेश्वरात दिसतो म्हणून. 


श्रीमद्भागवतात याबाबतचा एक सुंदर श्लोक (१.७.१०) आहे. शुक व प्रह्लादासारखी माणसे परमेश्वरावर प्रेम करतात. त्या परमेश्वरामध्ये अशी कोणती महानता आहे की ज्यांना काहीही मिळवायचे नाही अशी माणसेही त्याच्यावर प्रेम करतात?


आत्मारामाश्च मुनयः 

निर्ग्रन्था अपि उरुक्रमे ।

कुर्वन्ति अहैतुकीं भक्तिम्

इत्थंभूतगुणो हरिः ।। 


'जे लोक ज्ञानी आहेत, ज्यांची अविद्येची गाठ सुटली आहे आणि जे नेहमी आत्म्यातच रममाण झालेले असतात, असे लोकही भगवंताची निष्काम भक्ती करतात. कारण भगवंताचे गुण इतके मधुर आहेत की ते सर्वांना भगवंताकडे आकर्षून घेतात.' 


तात्पर्य जो हरी सामान्य माणसांचीच अंतःकरणे नव्हे, तर शुक व प्रह्लाद यांच्यासारख्या असामान्य कोटीच्या माणसांचीही अंत:करणे आपल्याकडे आकर्षून घेतो तो हरी केवळ महान होय.



*सारांश:* 

*परमगतीला जो प्राप्त होतो तो पुन्हा संसारात परत येत नाही. अनन्यभक्तीनंच ही गोष्ट साध्य होऊ शकते. अनन्यभक्ती ही आंतरिक भक्तीची अवस्था आहे. बाह्यभक्तीची अवस्था नाही.*


*-----------------------------*


संदर्भ ग्रंथ :-

श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीताभाष्य.

भगवद्गीतेचा सार्वजनीन संदेश. 



*॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥*

Friday, July 18, 2025

शक्ती

 भक्तीची शक्ती..


   राधाबाई एका दवाखान्यात आया म्हणून काम करायच्या. वय साधारण ५५/५६ असावे.


राधाबाईचा जन्म एका खेड्यातला. आठ भावंडातील राधा हे चौथे अपत्य. आधीची तीन आणि नंतरचे एक भावंड जन्मताच किंवा लहान वयातच गेलेली.  आई वडील दुसऱ्यांच्या शेतात राबून चरितार्थ चालवायचे. घरात अगदी हालाखीची परीस्थिती नसली  तरी श्रीमंती देखील नव्हती. दोन वेळेला खाऊन सुखी होते. 

त्याकाळी प्रत्येक अपत्याची जन्मवेळ नोंदवण्याचे कोणाच्या डोक्यातच नव्हते. बाळंतपणं घरातच सुइणीच्या हाताने होत असत. मग जनगणनेचे अधिकारी जेंव्हा मुलाची जन्मतारीख विचारायचे तेंव्हा, "त्यो बघा भादव्यातला  हाये. हे पाऊस कोसळत होता अन् हितं माझ्या सुनेला  रातच्याला कळा सुरु झाल्या.  लगालगा रुक्मावतीला बोलावून घेतलं अन् ह्यो जनमला." 

घरातल्या आज्जीची ही अशी अनमान धपक्याने दिलेली उत्तरं. मग ते अधिकारी स्वतःच त्या मुलांकडे बघून मराठी महिन्याला इंग्रजीत रुपांतरीत करुन अंदाजे जन्मतारीख लिहायचे. 

या अशा काळात जन्मलेल्या राधाबाईला वयात आल्या आल्या जे पहिले स्थळ आले ते शेजारच्या गावातील एका नात्यातल्या मुलाचे. बघण्याच्या कार्यक्रमातच सुपारी फोडली आणि मग  राधाबाईचे लग्न झाले. पाठवणी करताना तिच्या लाडक्या विठ्ठलाची छोटीशी मुर्ती तिने आवर्जून सोबत घेतली. 

राधाबाईचे वडील निस्सीम विठ्ठलभक्त. दरवर्षी पंढरीची वारी त्यांनी कधी चुकवली नाही. घरातील वारकरी वातावरणामुळे राधाबाईला लहानपणापासूनच विठ्ठलभक्तीचे वेड लागले. 


एकदा राधाबाईच्या  सासरच्या गावी भीषण दुष्काळ पडला. विहिरी आटल्या. नदी नाले कोरडे पडले. खायचे प्यायचे वांधे झाल्यावर कुटुंबाने शहराचा रस्ता धरला. तसेही गावात स्वतःची म्हणावी अशी काहीच मालमत्ता नव्हती. 

शहरात आले आणि शहरातलेच होउन गेले. यथावकाश राधाबाईला एक मुलगा आणि पाठोपाठ एक मुलगी झाली. संसाराला हातभार म्हणून राधाबाई इतरांकडे घरकाम करु लागल्या. अशाच एका डॉक्टर बाईंकडे काम करताना त्यांचे स्वच्छ आणि टापटीप काम बघून त्या डॉ. बाईंनी राधाबाईला त्यांच्या दवाखान्यात आयाचे काम करणार का म्हणून विचारले. पगार देखील व्यवस्थित मिळणार म्हटल्यावर  राधाबाई दवाखान्यात नोकरी करु लागल्या. घरी मुलांना सांभाळायला सासूबाई होत्याच. 

काम करताना त्यांच्या तोंडात सतत पांडुरंगाचे  नाम असायचे..

दरवर्षी वारीला जाण्यासाठी रजा मिळावी म्हणून, त्या आधी काही दिवस रजा घ्यायच्या नाहीत साठवून ठेवायच्या पण वारी करायच्याच. 

काळ पुढे सरकत गेला. मुलीचे आणि मुलाचे लग्न झाले. 

राधाबाई विचार करायच्या, कोण कुठली मी. एका खेड्यात जन्म झालेली पण आता दवाखान्यात नोकरी करते. शिकल्या सवरल्या लोकांसोबत रहाते. पोरं पण चांगली शिकून लग्न होउन मार्गी लागली. सगळी त्या विठ्ठलाची कृपा. विठ्ठलाच्या भक्तीने त्यांचे डोळे भरुन यायचे.

परंतु अचानक एकदा दवाखान्यात काम करताना त्या चक्कर येउन पडल्या. डॉक्टरांनी त्यांच्यावर त्वरीत उपचार सुरु केले. त्या शुध्दीवर आल्या पण त्यांना अर्धांगवायुचा झटका आल्याचे निदान झाले. त्यात त्यांचे दोन्ही पाय लुळे पडले. दुसऱ्याची मदत घ्यायची कधी सवय नसणाऱ्या त्या. त्यांचे सगळे जीवनच परावलंबी झाले. मुलाने त्यांच्यासाठी एका फळीला चाके लावून ती फळी त्यांना दिली. त्याच्या परीस्थितीत  चाकाची खुर्ची घेणे त्याला शक्य नव्हते.

काही काळाने बरे वाटेल असे म्हणून त्यांनी दवाखान्यामधून  काही महिन्यांची सुट्टी घेतली. 

पांडुरंगाला गाऱ्हाणे टाकले,"काय चुकले रे बाबा. तुझ्या भक्तीत कुठे चूक झाली म्हणून अशी शिक्षा दिलीस?" 


त्यांचे सगळ्यात मोठे दु:ख म्हणजे,  वारीला जाता येणार नव्हते.

नियमितपणे मसाज चालू होता परंतु प्रगती शुन्य. विठ्ठलाचे नामस्मरण करत, ती मुर्ती उशाशी घेऊन त्या शांतपणे पडून रहायच्या. पण वरुन शांत वाटणाऱ्या राधाबाई मनात काही योजना आखत होत्या. 

मग एकदा त्यांनी ठरवले, पंढरपूरला जायचे आणि त्या पांडुरंगाला जाब विचारायचा..

पण जायचे कसे. मुलाला सुनेला सांगितले असते तर राधाबाईंनाच वेड्यात काढले असते.


"गप्प बस घरात, असे कसे जाणारेस पंढरपूरला? इथल्या इथे चालता येत नाही तुला. खरडत जावे लागते. नाही तर छोट्या चाकाच्या फळीचा आधार घ्यावा लागतो. आम्ही सगळे करतोय न तुझे. शांत बस मग." 


आषाढ महिना सुरु झाला आणि राधाबाईंची उलघाल खूप वाढली. पांडुरंगाच्या भेटीची आस, काही केल्या स्वस्थ बसू देत नव्हती.. 

खूप खूप विचार केला आणि "जायचेच" हा विचार पक्का केला..


गुपचूप थोडेफार कपडे, पैसे जमा केले.. 

आणि एकदा भल्या पहाटे, घराला जाग यायच्या आधी, छोटेसे बोचके  आणि विठ्ठलाची मुर्ती घेऊन त्या फळीवरुन निघाल्या.

विचार केला, "इथे असेच मारायचे त्यापेक्षा, त्या पांडुरंगाच्या भेटीला तरी जाऊ. भेटला तर ठीक नाहीतर भेटीला जाताना तरी मरण येइल." 


रस्त्यात जागोजागी वारकऱ्यांसाठी खाण्याची, रहाण्याची सोय असतेच. 


इकडे घरी त्यांच्या गायब होण्याने गोंधळ झाला. आजूबाजूला शोध घेतल्यानंतर  पोलिसात तक्रार दाखल केली. 

"आईला नेहमीच फळीचा आधार घ्यावा लागतो तर आई कुठे लांब कशी जाउ  शकली असेल." त्यांचा मुलगा उत्तर शोधायचा प्रयत्न करत होता. 


मजलदरमजल करत  राधाबाई पंढरपूरला पोहोचल्या.. 

चंद्रभागेच्या तीरावर  पोहोचल्यावर अत्यानंदाने त्यांचे डोळे भरुन आले.. 

"बा इठ्ठला इथवर आणलस आता असच तुझ्या सोबत ठेव मला कायमची."  असे म्हणून त्यांनी तिथली माती कपाळी लावली.

सगळीकडे वारकऱ्यांची गर्दी झाली होती. भजनाने, टाळ चिपळ्यांच्या नादाने, विठ्ठलाच्या नामघोषाने सारी पंढरी दुमदुमत होती. राधाबाई या साऱ्या भक्तीमय वातावरणात दंगून गेल्या होत्या. त्या भावावस्थेत त्यांनी कळसाला हात जोडले आणि फळी बाजूला करुन खरडत खरडत चंद्रभागेची एकेक पायरी उतरायला सुरुवात केली.

" बा विठ्ठला तुझ्या दारात आले, भरुन पावले. आता आपली म्हण नाहीतर  दूर लोट पण मी काही अशा अपंग अवस्थेत पुन्हा माघारी जायची नाही. तुझ्या मनात असलं तसं होइल." 

शेवटच्या पायरीवरुन त्यांनी स्वतःला चंद्रभागेच्या स्वाधीन  केले. एकदोन गटांगळ्या खाल्ल्या आणि अहोआश्चर्य त्यांचे पाय नदीच्या पाण्यात टेकले. त्या त्यांच्या स्वतःच्या पायावर ऊभ्या राहिल्या. आधी त्यांना समजलेच नाही.  मिटलेल्या डोळ्यासमोर निव्वळ तो सावळा विठ्ठल दिसत होता. तो त्यांना हाताला धरुन ऊभे करत होता आणि त्यांचे शरीर, त्यांचे पाय विठ्ठलाचे ऐकत होते. त्या सावकाश ऊभ्या राहिल्या, पुन्हा पाण्यात बसल्या. परत त्याने त्यांच्या हाताला धरुन ऊभे केले. राधाबाईंना हे स्वप्न की सत्य हेच कळेनासे झाले. डोळे उघडले तर विठ्ठल दिसणार नाही म्हणून त्यांनी डोळे आणखी घट्ट बंद करुन घेतले. पण आता ते  झरझर पाझरु लागले होते. त्या पाण्याच्या पडद्याआडून विठ्ठलाचे रुप हळुहळू धुसर होत गेले. त्यांनी डोळे उघडले, खाली पायाकडे पाहिले. पाय हलवले आणि त्यांना पाय असल्याची जाणीव झाली. त्यांना ऊभे रहाता येत होते. त्यांना चालता येत होते. त्या पायऱ्या चढून वर आल्या आणि खाली मातीत त्यांनी लोटांगण घातले.

"अरे माझी हाक तू ऐकली. तू स्वतः मला ऊभी करायला आलास.  तुझे पांग कसे फेडू सांग. हे माझ्या पायाचे दान माझ्या पदरात टाकून तू निघून देखील गेलास. इतका कसा रे तू भक्तांच्या हाकेला धावतोस." आणि त्या उठून मंदीरात धावत सुटल्या. तिथल्या गर्दीला, पहारेकऱ्यांना त्यांनी त्यांची हकीकत सांगितल्यावर विठ्ठलनामाचा जल्लोष झाला.


त्या जेंव्हा त्यांच्या घरी परत आल्या तेंव्हा त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवायलाच तयार नव्हते. डॉक्टर देखील अवाक झाले. पायांच्या नसा पूर्णपणे बाद झाल्यावर काहीही न करता केवळ चंद्रभागेत स्नान केल्याने यांचे पाय ठिक झाले. ही बाब डॉक्टरांना आश्चर्यचकीत करत होती. पण त्यांच्या समोर राधाबाईंच्या रुपाने हा ढळढळीत पुरावा होता. 

भक्तीची शक्ती..


"बा विठ्ठला!!

तुझ्या पायी वीट 

देखील भाग्यवंत.

आणि 

मी कायम गरजवंत.

कृपा अशीच राहू दे!! 🙏🙏


©️®️स्मिता मिलिंद🍁

(सत्य घटनेवर आधारीत)

Thursday, July 17, 2025

विश्वास

 विश्वास परिपक्व झाला की श्रद्धा होते. श्रद्धा ही आतून येते. श्रद्धा ही जिवंत आहे.विश्वास हा सगळा उसना घेतलेला असतो.

 विश्वास शब्दाचा अर्थ " विशेष रुपेन श्वसती " माणूस श्वास घेतो, पण तो जेव्हा अस्वस्थ असतो तेव्हा श्वास अस्वस्थ होतो. तो जेव्हा शांत होतो तेव्हा विश्वास. म्हणजे काही सांगितल्यावर मन शांत होणे म्हणजे विश्वास. विश्वासाचं मूळ असेल तर माणूस हा मूळ आहे. विश्वास कोणावर ठेवायचा तर ज्याला आप्त वाक्य म्हणतात , त्यावर विश्वास ठेवायचा.

 आप्त म्हणजे आपला नातेवाईक. आप्तवाक्यवर विश्वास ठेवायला त्या आप्ता मध्ये तीन गुण हवेत. पहिला गुण तो त्या विषयातील तज्ञ हवा. दुसरा गुण असा की त्याची आपल्याविषयी हितबुध्दी पाहिजे. याचं कल्याणाच व्हावं असं त्याला वाटलं पाहिजे. तिसरा गुण त्याच मत निश्चित पाहिजे. आपल्या सगळ्या आप्तातील आप्त , सर्व आप्तांचा राजा जर कोणी असेल तर तो भगवंत आहे.

Wednesday, July 16, 2025

आसक्ती

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*ज्यानं नामाला सत्य मानलं त्याच्यासाठी श्रीमहाराज म्हणतात तसं डोळे उघडे ठेवून जग नाहीसं होतं म्हणजे नेमकं काय होतं ? तर जग आहे तसचं राहतं पण त्याविषयीचे आपले आसक्तीचे ममत्वाचे बंध गळून पडतात.

 महादेवाचा अनुभव श्रीमहाराजांनी देखील त्यांच्या अभंगात सांगितला आहे. ' रामनामाविणे साधन हे जनी | बरळती प्राणी स्वप्रामाजी|| स्वप्रीचा विचार तैसा हा संसार | सोडूनी असार राम घ्यावा ||' श्रीमहाराजांनी महादेवाप्रमाणेच राम ही दोन अक्षरं आपल्या अंतःकरणात ठेवली आहेत. ते म्हणतात , ' तुम्ही राम नाम घ्या . मनापासून घ्या. प्रेमानं घ्या , उत्कटतेनं घ्या, निरंतर घ्या. या गोष्टीचा तुम्ही स्वतः अनुभव घ्या.*

*संदर्भ - आनंदसागराचा धनी*

*लेखक - रविंद्रदादा पाठक*

रामहृदय

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*काय सांगितले यापेक्षा कोणी सांगितले ते महत्त्वाचे*


     *श्रीमहाराज जेव्हा अनुग्रह देत तेव्हा अनुग्रहीतास त्रयोदशाक्षरी मंत्र , रामहृदयाची पोथी व माळ देत असत. रोज स्नान झाल्यावर एक माळ तरी जप व रामहृदयाचा एक पाठ करावाच असा श्रीमहाराजांचा आग्रह असे. वामनराव ज्ञानेश्वरी ( हे रामहृदयाची संथा देत ) यांनी एकदा श्रीमहाराजांना विचारले की , महाराज , रामहृदय संस्कृतमध्ये आहे.

 बहुतेकांना त्याचा अर्थ कळत नाही. त्याचा अर्थ न कळता ते पोपटासारखे म्हणून काय साध्य होणार ? ' त्यावर श्रीमहाराज म्हणाले , ' वामनराव, काय म्हणायला सांगतो यास विशेष महत्त्व नसून ते कोण म्हणायला सांगतो यात त्याचे महत्त्व आहे.

 जो म्हणावयास सांगतो त्याची शक्ती त्याच्या पाठीमागे असते. रोगी डाॅक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर त्यास तपासतो. रोगाचे निदान करून औषध देतो. औषधात काय काय आहे हे रोग्यास माहीत नसते. पण त्या औषधाने आपणांस बरे वाटेल या श्रद्धेनेच त्यास बरे वाटते.

 औषधात काय काय आहे हे समजल्याशिवाय औषध घेणारच नाही असे जर रोग्याने म्हटले तर ते हास्यास्पद होईल. त्याने श्रद्धेने औषध घेतले तर तो बरा होतो असा अनुभव येतो. तसे अर्थ न कळता पण श्रद्धेने रामहृदय म्हटल्यास साधकाचे काम आपोआप होते. '*

*||श्रीराम जय राम जय जय राम||*

Monday, July 14, 2025

नामचिंतन

 संग्रहित संकलन आनंद पाटील 


*जडाच चिंतन  करणारी वृत्ती भगवंताकडे लावावयाची आहे आणि ती निरंतर / सातत्याने लावायची आहे. आपण* *नामचिंतन करत नाही असे नाही पण त्यात सातत्य आणि*

 *अनुसंधान राहात नाही. म्हणून नाम सिद्धीला जात नाही.* *आणखी एक आहे, नामसाधना तेव्हाच सिद्धीला जाईल जेव्हा*

*भगवत्प्राप्ती हाच त्या नामसाधनेचा एकमेव हेतू असेल. अन्य कोणत्याही कामनेनं केलेला नामजप ती ती कामनापूर्ती करेल पण मग भगवंताला हा नामधारक कायमचा दुरावेल.*

   *नामाखेरीज इतर साधनांनी प्राप्त होणारी पवित्रता पुन्हा मलिन होते, पण नामसंकीर्तनाने प्राप्त होणारी पवित्रता कधीच पुनः मलिन होत नाही.*

 "पवित्र तो देह वाणी पुण्यवंत। जो वदे अच्युत सर्वकाळ ।। तयाच्या चिंतने तरतील दोषी । जळतील राशी पातकांच्या । "


*नामाचे आणि नामस्मरणाने प्राप्त होणारे पावित्र्य तीर्थादिकांपेक्षाही खूपच श्रेष्ठ आहे.*

"तीर्थांचे पैं तीर्थ, नाम हे समर्थ । होऊनि कृतार्थ हरिनामे ॥ "


 *नाम हे स्वत: पूर्ण पवित्र आहे म्हणूनच ते नामधारकाला*

*अंतर्बाह्य पवित्र करू शकते.* *श्रीगुरु ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या एका अभंगात म्हणताहेत,*

" नाम पवित्र आणि परिकरु । कल्पतरूहूनि उदारु । ते का रे

सधरु । तेणे तरसी भवसागरु । ” 


*पद्मपुराणात एक कथा आहे. एक राजा मोठा नामधारक होता. नामस्मरणाने तो इतका पवित्र झाला होता की, जेव्हा*

*त्याला विष्णूदूत वैकुंठास नेऊ लागले ती वाट यमलोकांवरून जात होती. या राजाच्या* *शरीरावरून येणाऱ्या वायूने नरकातील अनेक पापी जीवांचा उद्धार झाला. एवढी भक्तांच्या स्थूल देहाची पवित्रता आहे.(संकलन आनंद पाटील)*

   *सर्वसामान्याला नामचिंतनात एवढे सामर्थ्य आहे याचे ज्ञान नसते. त्याकरिता “गुरुकृपा” पाहिजे. हे नामचिंतनाचे ज्ञान गूढ आहे, गम्य आहे, गंतव्य आहे. आपल्या चिरंतन स्वरुपाचे हे ठिकाण आहे. नाम, प्रेम, भक्ती ही गूढ रहस्ये आहेत.*

*गुरुकृपेवाचून ते कळत नाही.  सद्गुरुकृपा होण्यासाठी त्यांच्या वचनावर प्राणापलीकडे निष्ठा हवी. मग त्यांच्याच कृपेने गूढगम्य असणारे भक्तीप्रेमसुख हाती येते. संकलन आनंद पाटील*

Sunday, July 13, 2025

मूर्तिमंत नामच

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*


*सद्‍गुरूची  कामगिरी*


सद्‍गुरूची कामगिरी कोणती ? आरशावर धूळ पडलेली असते, ती बाजूला सारायला सद्‍गुरू सांगतात; आपले चुकते कुठे ते सद्‍गुरू सांगतात. सद्‍गुरू आपल्याला मार्गाला लावतात. स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, तोच जागा झाल्यावर ओरडायचा थांबला ! सद्‍गुरू जागे करण्याचे काम करतात. मला करायचेच काही उरले नाही असे ज्याने म्हटले, त्याने सद्‍गुरू खरोखर केला असे म्हणावे. एखादा सुखवस्तू गृहस्थ 'मी स्वस्थ आहे' असे म्हणतो, पण ते काही खरे नाही. मन जोवर गिरक्या मारते तो पर्यंत तो स्वस्थ आहे असे नाही म्हणता येणार. 


शिष्याच्या भावनाच गुरूला गुरुपद देतात. जो शरण जातो त्याचा कार्यभार सद्‍गुरू उचलतो. ज्याची दृष्टी रामरूप झाली तो खरा गुरू. जे चिरकाल टिकते ते गुरुपद समजावे. खरोखर, सद्‍गुरु म्हणजे मूर्तिमंत नामच होय. गुरूने सांगितलेले अक्षरशः पाळणे हेच खरे साधन. संत कुणालाही देहाने कायमचे लाभले नाहीत. संतांना भगवंताचा जो ध्यास असतो तो महत्त्वाचा आहे. पुष्कळांना संतांची गाठ पडते, परंतु सत्संगतीचे महत्त्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो व्हायला पाहिजे तो फायदा होत नाही. आपली जी कर्तव्ये ठरली आहेत ती आपण बरोबर करावीत. व्यापार थोडक्या प्रमाणात केला तर पुढे वाढतो, त्याप्रमाणे कर्तव्य करीत गेल्याने फळाची आशा आपोआपच सुटेल. आपले कर्तव्य कोणते ते सद्‍गुरू आपल्याला दाखवून देतात. 


रथ आहे खरा, पण जर त्याला सारथी म्हणजे चालवणारा नसेल, तर रथ कुठेतरीच जाईल. केवळ 'गाडी माझी आहे' म्हणून ती मालकाला चालविता येणार नाही. साधी बैलगाडी सुद्धा चालविता येणार नाही. आपला देह मनुष्य आपल्या मनाने चालवितो, आणि खड्ड्यामध्ये पडतो. सद्‍गुरू हे गाडीवानाचे काम करतात आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात. आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे, मग कसलाच धोका उरणार नाही; आपल्या नशिबात जेवढे मिळायचे असेल तेवढेच आपल्याला मिळणार, अशी वृत्ती बनून आपले हवेपण कमी होईल.मनाची ही वृत्ती झाली की, जे घडेल ते भगवंताच्या इच्छेनेच घडेल असे आपल्याला वाटू लागेल. असे वाटू लागले की समाधान चालत घरी येईल. पण हे सगळे होण्यासठी आपल्या अंतःकरणाची शुद्धता हा पाया आहे. 


*१८५ .   संतचरणी  विश्वास ।  त्याने  भगवंत  जोडला  खास  ॥*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Saturday, July 12, 2025

सूक्ष्म देह

 निलगिरीच्या बाजूला एक मोठा कॉफीचा मळा आहे. त्या मळयाच्या मालकाला एकच मुलगा होता. लहानपणी त्या मुलावर चांगले संस्कार झाले होते. पुढे त्याने आपले जीवन ध्यानधारणा करता लावायचे असे ठरविले म्हणून गुरूच्या शोधात तो हिमालयात गेला. तेथे एका थोर संन्यासाची गाठ पडली. 

त्याच्याकडून त्याने संन्यास दीक्षा घेतली. गुरूने त्याला सोहमचा मंत्र दिला व काही योग क्रिया शिकवल्या. हा एकदा म्हैसूर येथे एका मठात उतरला होता. श्री.हुच्चूराव नावाचे एक साधक तेथे ज्या घरात राहात त्या घरातील एका खोलीमध्ये नारायणअप्पा यांच्या प्रेरणेने तेराकोटी जप झाला होता. जप  तेरा अक्षरी मंत्राचाच झाला होता. संन्यासी म्हैसूरला आलेले हुच्चूरावांना कळले. ते त्याचाकडे गेले आणि वेळ काढून आपल्या घरी येण्यास विनविले. संन्यासी म्हणाले " मला राजवाड्यात जायचे आहे .त्याच्या आधी पाच मींनीटे येऊन जाईन." ठरल्या प्रमाणे हुच्चूरावांनी त्याला आणले. संन्यासी घरात आले, आणि ज्या खोलीत तेरा कोटी जप झाला होता त्या खोलीच्या उंबरठ्यापाशी थबकले आणि कानडीत म्हणाले " अरे, या खोलीत प्रचंड प्रमाणात नाम भरलेले आहे "  समोर श्री ब्रम्हचैतन्य महाराजांची तसबीर होती. तिच्या कडे पाहुन म्हणाले " हे कोण थोर पुरुष आहेत ? 

त्यांच्या भोवती मला तेजोमय असा तेरा अक्षरी मंत्र दिसतो. मी थोडावेळ बसतो" त्याप्रमाणे ते वीस मिनिटे शांतपणे बसले. जाताना ते म्हणाले "मोठे रम्य स्थान आहे." नाम घेणाऱ्याचा सूक्ष्म देह नामाच्या स्पंदनांनी भरून जातो. त्या स्पदनांचा अनुभव घेण्यास आपण संवेदनाशील व्हावे लागते.

Friday, July 11, 2025

शरणांगती

 शरणांगती मध्ये प्रार्थनेला फार महत्व आहे. मोहाला टक्कर देण्याची शक्ती माणसाला नसते. हतबल होऊन केलेल्या प्रार्थनेने जीवाच्या ठिकाणी अध्यात्मिक शक्ती जागी होते. योगशास्त्रामध्ये त्या शक्तीला कुंडलिनी म्हणतात. " मी आता ईश्वराचा झालो" हा मनाचा निश्चय होणे ही शक्ती झाल्याची खूण आहे. शक्तीने जीव ईश्वराशी जडला म्हणजे त्या जडण्या मध्ये एक ईश्वर आपल्याला प्रेमाने जवळ करील ही खात्री असते. दोन तो जन्मभर आपला सांभाळ करील ही श्रद्धा असते. याचे दोन दृश्य परिणाम अनुभवास येतातयेतात.

पहिला आतापर्यंत आपल्याकडून जे जे घडले ते सारे माणूस ईश्वराच्या चरणी अर्पण करतो. त्या अर्पणामुळे माणसाचे मागचे सर्व कर्मसंचित ईश्वराच्या स्पर्शाने बलहीन होते. जीवाची पाटी कोरी होते. अशा जीवाला ईश्वर अथवा सद्गुरू आपल्याला हवा तसा आकार देऊ शकतो. 

दुसरा मागच्या कर्माचे ओझे ईश्वराच्या चरणी ठेवल्या कारणाने जीव आणि ईश्वर यांच्यात चालत आलेला विसंवाद एकदम नाहीस होतो. मग जीवाला ईश्वराच्या सहवासाची तहान लागते त्याच्या सान्निध्याची किंमत कळू लागते. म्हणून जीव ईश्वराच्या अनुसंधानाचा मार्ग व मार्गदर्शक शोधतो.

Thursday, July 10, 2025

सहनशीलता

 *🌹🌹!!श्रीराम समर्थ!!🌹🌹*


*श्रीमहाराजांचा एक विशेष गुण म्हणजे सहनशीलता होय. त्यांना आपल्या आयुष्यांत अनेक प्रकारच्या दिव्यांतून जावें लागलेल्या. निंदा, तुच्छता, अवहेलना, अपमान, आघात, वगैरे गोष्टी तर त्यांच्या नित्याच्या अनुभवाच्याच बनल्या होत्या. पण चुकून देखील त्यांनीं आपल्या शांत वृत्तीचा भंग होऊं दिला नाहीं, इतकेंच नव्हे तर स्वतःची निंदा करणाऱ्यांचीही त्यांनीं आपण कधीं निंदा केली नाहीं, स्वतःला तुच्छ करणाऱ्यांना कधीं तुच्छ केलें नाहीं, स्वतःचा उघड उघड अपमान करणाऱ्याचा कधीं अपमान केला नाहीं, आणि स्वतःवर संकट ढकलणाऱ्यावर उलट कधीं आघात केला नाहीं. अनेक मार्गांनीं आपल्याशीं विरोध करणाऱ्या लोकांच्या देखील उध्दाराचीच श्री महाराजांनीं चिंता वाहिली. एडिसनने म्हणतो कीं, 'प्रत्येक थोर पुरुषाला आपल्या थोरपणाबद्दल निंदारूपी कर जगाला द्यावा लागतो, नोंदी लोक हे भुकंणारे कुत्रे असतात असें डाॅ.जाॅनसन् म्हणतो. पण स्वार्थानें केलेली निंदा विसरून त्या निंदकाचें लक्ष भगवंताकडे कसें लागेल याचाच प्रयत्न करणाऱ्या  श्री महाराजांची सहनशीलता किती वर्णन करावी!  लोकांकडून येणारा मान जितक्या सहज रितीनें त्यांनीं गिळला तितक्याच सहजतेनें लोकांकडून येणारा अपमानहि त्यांनीं गिळला, आणि दोघांनाही सारख्याच आपलेपणानें भगवंताच्या नामाचें महत्व ते जन्मभर सांगत राहिले.*


*!! श्रीराम जयराम जय जय राम !!*


*प पू सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज*

अध्याय

 श्रीराम समर्थ


सातवा अध्याय वाचावा

[पू अण्णा वर्टीकर यांनी सांगितलेली गोष्ट] 


         एकदा स्वप्नांत श्रीमहाराजांचे दर्शन झाले. मी त्यांना नमस्कार केला तेव्हां श्रीमहाराज म्हणाले,

         'सातवा अध्याय वाचावा.'

         एवढेच स्वप्न. सातवा अध्याय वाचावा, पण कशांतला हे श्रीमहाराजांनी सांगितले नव्हते, जागा झाल्यावर मी प्रथम दासबोध उघडला पण त्यांत अध्याय व समास होते. नंतर श्री. फडकेंची श्रीमहाराजांची पोथी पाहिली, आणि काय आश्चर्य ! त्यात अध्याय होतेच, पण सातव्या अध्यायांत श्रीमहाराजांनी सांगितलेला उपदेश होता. सातवा अध्याय हा पोथीचा मेरुमणि होता. श्रींनी असे कसे सुचविले मला माहीत नाही. पण तेव्हांपासून पूजा करतांना, मी फक्त सातवाच अध्याय वाचण्याचे ठरविले.

         सातव्या अध्याया विषयी ग्रंथकाराने लिहिले आहे,

'सप्तमोध्याय महौषधि | सेविता शमे भवव्याधी |

स्थिर करोनिया बुद्धि |श्रवण-मनन करावे ||

सकलाध्यायी मेरुमणी | हा सप्तमोध्याय गुरु-वाणी | 

ठेवितां सदा स्मरणी | भवजाचणी लया जाईल ||'


               *********


संदर्भः अण्णांच्या गोष्टी हे प्र ना वर्टीकर यांचे पुस्तक पान १०७


*संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन*

Wednesday, July 9, 2025

भ्रम

 एका साधकाने पु.श्रीरामकृष्ण परमहंस यांना विचारले भूतविद्या सुर्यलोक, चांद्रलोक नक्षत्रलोक हे काय आहे? श्रीरामकृष्ण म्हणाले इतका हिशोब कशाला? आंबे खा , आंब्याची झाड किती आहेत,  किती लाख फांद्या आहेत , किती पण आहेत हे हिशोब करण्याची गरज काय ? मी आमराईत आंबे खायला आलो आहे आंबे खाण्याशी मतलब. पुढे म्हणाले "चैतन्य जर एकदाचे जागे झालं , कोणी एखादा ईश्वराला जाणू शकला तर मग असल्या फालतू गोष्टी जाणण्याची इच्छाच होत नाही. तापात भ्रम झालेला रोगी बडबडत असतो मी पाच शेर तांदुळाचा भात खाईन, मी घडाभर पाणी पीईन वगैरे. हे ऐकून वैद्य म्हणतो " ठाऊक आहे सर्व करशील " भ्रम दूर झाल्यावर फक्त ऐकायचं असत. तो साधक म्हणाला आमचा भ्रम कायमच राहणार. श्रीरामकृष्ण म्हणाले " ईश्वराकडे मन ठेवा. चैतन्य जागेल. तो साधक म्हणाला " आमचा ईश्वराशी योग क्षणिक. चिलीम ओढायला लागतो तितका वेळ." श्रीरामकृष्ण म्हणाले क्षणभर योगाने सुद्धा मुक्ती लाभते." "" आहिल्या म्हणाली "रामा डुकराचा जन्म येऊ दे की  आणखी कशाचा येऊ दे, जेणेकरून तुझ्या पादपद्मी मन राहो, शुद्ध भक्ती लाभो म्हणजे झाले." मनापासून त्याच्याजवळ प्रार्थना केल्यास त्याच्याकडे मन लागते ईश्वराच्या पादपद्मि शुद्ध भक्ती उपजते.

पांढरे केस

 *दिसामाजी काहीतरी* ...


*पांढरे केस* 


आजोबा बहुधा सैन्यातून निवृत्त झाले असावेत. पाचुंदाभर झुपकेदार मिश्या, ताठ कणा आणि पत्नीशी मृदू बोलणं - ही सगळी त्याचीच लक्षणं होती.


चार दिवसांपूर्वी ते गाड्यांच्या याच शोरुममध्ये आले होते. नुकत्याच बाजारात आलेल्या एका छोटेखानी ऑटोमॅटिक गाडीची त्यांनी चौकशी केली होती. तेथील त्या हटके रंगाचं मॉडेल त्यांना पसंतही पडलं होतं. किंमतीबद्दल त्यांनी सेल्समनशी घासाघीसही केली होती. पण डिस्काउंट द्यायला सेल्समनने साफ नकार दिला होत. 


"मी हीच गाडी घेणार. चार दिवसांनी येतो. दुसऱ्या कोणाला देऊ नकोस," असं बजावून ते गेले होते आणि आज बरोब्बर चौथ्या दिवशी आले होते. 


आज आजीही सोबत होत्या. आजोबा दुरूनच त्यांनी पसंत केलेली गाडी त्यांना दाखवत होते. रंग, त्यातील करामती आजींना आवडल्या असल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. पण एक मोठी अडचण दिसत होती.


सेल्समन तीच गाडी एक सुंदर तरुणीला दाखवत होता, आणि एवढंच काय, पण आजोबांना सांगितलेल्या किंमतीपेक्षा तब्बल दोन लाख रुपये कमी घेऊन त्याने त्याच गाडीचा सौदा त्या तरुणीशी पक्का केला. ती तरुणी पैसे भरण्यासाठी अकाऊंटस् विभागात गेली आणि आजोबांनी सेल्समनचा ताबा घेतला. 


"भल्या माणसा, मी चार दिवसांपूर्वी आलो होतो. ही गाडी नक्की घेणार म्हणून सांगून गेलो होतो. माझ्या बायकोचा वाढदिवस आहे, तिला सरप्राइज द्यायचे आहे हे सांगितलं होतं. शहरात चालवायला आणि पार्किंगला ही छोटी आणि गिअरशिवायची गाडी तिला सुयोग्य राहील इतकं सगळं आपलं बोलणं झालं होतं. 


माझ्याशिवाय कोणालाही ही गाडी देऊ नकोस असं मी तुला सांगून गेलो होतो. आणि तरीही तू ही गाडी त्या मुलीला विकून टाकलीस ? आणि तीही दोन लाख रुपये कमी किंमतीत ? मी डिस्काउंट मागितला तर मला केवढं प्रवचन दिलंस तू ! मॉडेल नवीन आहे, ऑटोमॅटिक आहे, हा रंग कमी मिळतो - सतराशे साठ कारणं सांगितलीस. मग आता काय झालं ?"


आजोबांचा सात्विक संताप झाला होता. 


"आता एवढ्या सुंदर तरुणीला नाही कसं म्हणायचं ?" ओशट ओशाळं हसत सेल्समन आपली कैफियत मांडत होता.


तो पुढं काही बोलणार एवढ्यात गाडीच्या किल्ल्या घेऊन ती तरुणी त्यांच्याकडेच आली. सेल्समन तिच्याशी काही बोलणार एवढ्यात ती त्या वृद्धाकडे वळली, आणि त्यांच्या हातात गाडीच्या किल्ल्या देत म्हणाली, "आजोबा, you are simply great. तुम्ही म्हणालात तसंच झालं. याने दिला की मला डिस्काउंट ! आज्जी, happy birthday !" 


तरुणी आजीला बिलगली आणि तोंडाचा आ वासलेल्या त्या सेल्समनला उद्देशून आजोबा म्हणाले, "हे केस उन्हात उभे राहिल्याने पांढरे नाही झाले, बाळा. पुष्कळ पावसाळे पाहिले आहेत. पुढच्या वेळी पांढरे केस दिसले की हा धडा लक्षात ठेवशील, अशी आशा ठेवतो."


आणि आजींकडे वळत ते म्हणाले, "चला, birthday girl, आज तुमच्या वाढदिवसानिमित्त मला लाँग ड्राईव्हला घेऊन चला."


इति


मकरंद


श्रीराम


Tuesday, July 8, 2025

अनासक्ती

 चिंतन 

         श्रीराम,

        अनेक गोष्टी पटो न पटो पण अपरिहार्य विहित

कर्तव्य म्हणून आपण पार पाडत असतो. अशावेळी आपले मन त्यात गुंतून रहात नाही. हे न गुंतणे म्हणजेच अनासक्ती.. परमार्थाला पूर्वजन्माच्या पुण्याईचे पाठबळ लागते. अनेकदा संत महात्मे आपल्याला भेटू शकतात परंतु श्रीसद्गुरूंची भेट होणे ही मानव जन्माच्या सार्थकतेची पर्वणी ठरते. अशावेळी सच्चिदानंदाची प्राप्ती करून घेण्याचे ध्येय जर आपले नसेल तर अवघे जीवन व्यर्थ होऊन जाते.

              सच्चिदानंदाची प्राप्ती होण्यासाठी साधना कशी करावी, अनासक्तीने कसे रहावे हे न विचारता, संसारात मला हे हवे ते हवे असा आशीर्वाद मागणे म्हणजेच स्वतःच्या हाताने मानेवर दगड बांधून पाण्यात उडी मारणे.

           समर्थ म्हणतात - :अकस्मात होणार होऊन जाते! थोडक्यात कधी काय होईल हे माहीत नसल्याने विहित कर्तव्य म्हणून संसार करायचा आणि सद्गुरूंच्या कृपेने जीवनाचे सार्थक करून घ्यायचे.

                ||  श्रीराम ||

Monday, July 7, 2025

संताची कृपा

 एखाद्या कुळामध्ये जन्मास येणारी माणसें बहुधा अध्यातमदृष्ट्या सामान्य असतात. स्वभावाने ती सात्विक असतात. पण प्रपंचात मुलाबाळांत व घरांदारांत त्यांचे मन गुंतलेले असते. मेल्यानंतर ती माणसे फार तर स्वर्गलोकांपर्यंत जातात. आसक्तीमुळे कुटुंबाशी त्यांचा मानसिक संबंध राहतो. म्हणून कर्माच्या नियमाप्रमाणे हा ना तो देह घेऊन ती माणसे त्याच कुटुंबात जन्मास येतात. पण सर्वांच्या भाग्याने एखादी नाम घेणारी व्यक्ती त्या कुटुंबांत जन्मास येते. अखंड नामस्मरणाने ती  व्यक्ती मोठा पुण्यसंचय करते. त्याचा परिणाम घडून ते सबंध कुटुंब आध्यात्म दृष्ट्या वरच्या पातळीवर जाते. अध्यात्माचा आणि आनुवंशिक संस्कारांचा संबंध आहे यांत शंका नाही. परंतु तो फार गुंतागुंतीचा असतो. सात्विक आईबापाच्या पोटी आसुरी प्रवृत्तीची तर उलट तामसी प्रवृत्तीच्या पोटी दैवी प्रवृत्तीची मुले जन्म घेतात. माणसांचा जन्म कोणाच्या पोटी झाला याला महत्त्व नाही. त्याच्यावर संताची कृपा होण्याला महत्व आहे.

Sunday, July 6, 2025

चिंतन

 नामस्मरणाला बसताना श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातील किंवा आपल्या सद्गुरुंच्या चरित्रातील किंवा संदर्भातील एखादा प्रसंग मनात घोळवावा आणि त्या प्रसंगाचे चिंतन करीत नाम घ्यावे. 

नाहीतरी नाम घेताना चित्त एकाग्र कुठे होते. काहीतरी फालतू विचार चालू असतात. त्यापेक्षा सत्पुरुषांच्या दिव्य जीवनाचे चिंतन करावे. 

उदा. शबरी अनाडी  स्त्री. पण श्रद्धा केवढी ! कोणत्याही दिवशी राम येईल म्हणून रोज त्याच्या स्वागताची तयारी करायची. तिचा भाव अनुकरण करण्यासारखा आहे. भगवंताचे दर्शन होण्यासाठी दोन गुणांची आवश्यकता असते. एक निकडीची तळमळ आणि पराकोटीची  चिकाटी लागते.

 शबरीच्या ठिकाणी या दोन्ही गुणांचा उत्कर्ष आढळतो. भरत आणि हनुमंत हे फार वरच्या दर्जाचे आहेत. प्रल्हादही तसाच. तेव्हा आपल्याला शबरी बरी. तुळशीदासांनाही रामाशिवाय दुसरे काही सुचतच नसे. हे बरंच पण हा दिव्य भ्रम होता. विनयपत्रिका दोहावली रामचरीतमानस सर्वात एका रामाखेरीज दुसरे काही नाहीच.

Saturday, July 5, 2025

हितउपदेश

 *🌹🙏🏻 श्रीराम समर्थ 🙏🏻🌹*


*🌺🙏🏻नामप्रभात🙏🏻🌺*


   *एकदा ती. तात्यासाहेब केतकरांना एका भक्ताने विचारले , " श्रींच्या सहवासात आपण इतके वर्ष होता तेव्हा त्यांच्याबद्दल आपण काहीतरी सांगा." त्यावर ती . तात्यासाहेब लिहीतात , श्रीमहाराज ज्यास एकदा भेटले त्यास त्यांची ओढ लागल्याशिवाय राहत नाही . श्रींनी चमत्काराला महत्त्व दिले नाही . कोणी एखाद्याने त्यांच्याबद्दल काही सांगितले तर दुसरे काही बोलणे काढून ते बोलू देत नसत . श्रीमहाराज मूर्तिमंत चमत्कारी होते व आहेत . त्यांची प्रत्येक गोष्ट वरवर दिसण्यात इतकी स्वाभाविक दिसे , परंतु ती वेळ होऊन गेल्यावर ती कशी काय झाली याचे आश्चर्यच वाटे .* *माझी अशी खात्री आहे की असा एकही मनुष्य नाही की जो श्रींच्या सहवासात राहिला आहे व त्यास मनोमन साक्ष पटली नसेल !* *प्रत्यक्ष ज्यास अनुभव आला आहे अशा मंडळींनी स्वतःबद्दलचे अनुभव मला सांगितले ते लिहायचे म्हटले तर लांबण होईल . 

श्रींस श्रींस खरोखर जे आवडत नव्हते ते मी लिहावे हे बरे नाही. श्रींचा मोठ्यातला मोठा चमत्कार जर पाहायचा असेल तर विषयाच्या आसक्तीत असलेल्या लाखो जीवांस श्रीरामनामाकडे वळविले यासारखा सार्वजनिक चमत्कार दुसरा कोणता आहे ? त्यांचे उपकार अगणित आहेत .* *त्यांची परत फेड करायची असेल तर त्यांचे होऊन राहणे व आज्ञेप्रमाणे वागणे . आमचे बाबतीत त्यांनी व्यवहार सांभाळला नाही . प्रेम राखले . संकटे सर्व प्रकारची आली पण त्यांच्या कृपाछत्राखाली झळ मुळीच लागली नाही . श्रीमहाराज मूर्तीमंत दयाळू होते . श्रींच्या कृपेने व आशीर्वादाने आम्ही आजचा दिवस उपभोगीत आहोत यापेक्षा जास्त काय लिहावे ! '*


   *संदर्भ - सहज बोलणे हितउपदेश*


   *लेखक - गो . सी . गोखले*

Friday, July 4, 2025

दर्शनाचे मर्म

 *🌹🌹।।श्रीराम समर्थ।।🌹🌹* 


*🍁सफल जीवन कोणते ?🍁*


*तपस्वी हयहया नांवाचा एक मोठा साधु होऊन गेला.  त्याचा भाऊ त्याला म्हणाला  " माझ्या तीन इच्छा होत्या.  आयुष्याचे अखेरचे दिवस पवित्र ठिकाणी जावेत ही एक इच्छा. 

सध्या मी मक्केमधें राहतो म्हणून ती पूर्ण झाली.माझ्या उपासनेची सर्व सोय करणारा नोकर मिळाल्यामुळे ती पूर्ण झाली.मरायच्या आधी मला ईश्वराचे दर्शन व्हावे ही तिसरी इच्छा आहे. ती पूर्ण होण्यास आपण कृपा करावी." त्यावर हयहयानें उत्तर दिलें की  " पवित्र जागी राहण्यापेक्षा आपण स्वत:ला आंतबाहेर पवित्र करण्याकडे लक्ष द्यावें.

 जेथे पवित्र साधु राहतात तें स्थान पवित्र असतें. आपल्याला चांगला नोकर मिळण्यापेक्षा आपण ईश्वराचा उत्तम नोकर होणें हे उपासनेचें लक्षण आहे. आपले दास्य पाहून ईश्वराचे अंत:करण प्रेमानें भरून यायला पाहिजे. आणि याच्यातच ईश्वराच्या दर्शनाचे मर्म सांठवलें आहे. मरेपर्यंत त्याच्या दर्शनाची वाट कशाला पहावी ? त्याच्याशी खोल नातें जोडून त्याला हांक मारली की तो येतो.*


*!!श्रीराम जयराम जय जय राम!!*


*प पू सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज*


(संतकथा— संकलन—प.पू. के. वि. बेलसरे.)

Thursday, July 3, 2025

योगिनी एकादशी"*

 *"योगिनी एकादशी"*



युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला विचारले, 

'हे मधुसूदना, ज्येष्ठ वद्य पक्षातील एकादशीचे नाव काय ? आणि तिचे माहात्म्य काय ? हे मला कृपा करून सांग.'


*भगवान श्रीकृष्ण म्हणाले,*

'राजा, सर्व पापांचा क्षय करणारे, ऐश्वर्य व मोक्ष देणारे व सर्व व्रतांत उत्तम असणारे व्रत तुला सांगतो. हे नृपश्रेष्ठा, ज्येष्ठ वद्य पक्षातील ही "योगिनी नावाची एकादशी" महापातकाचा नाश करणारी आहे. ही सनातन एकादशी संसाररूपी सागरात बुडणाऱ्यांना नौकेप्रमाणे वाटते.


*हे नराधीपा,* 

ही योगिनी एकादशी त्रैलोक्यात सारभूत आहे. या एकादशीची पाप हरण करणारी प्राचीन कथा मी तुला सांगतो.


*अलका* नगरीचा राजा कुबेर शिवपूजक होता. त्याच्याकडे पूजेकरता फुले आणण्यासाठी *हेममाली* नावाचा माळी होता. त्या माळ्याची विशालाक्षी नावाची पत्नी होती. ती फार सुंदर होती. हेममाली तिच्या कामपाशात सापडून

तिच्यावर फार प्रेम करीत होता.


तो एकदा नेहमीप्रमाणे शिवपूजेसाठी फुले आणायला गेला होता. त्याने नित्याप्रमाणे मानस-सरोवरातून फुले आणली, पण पत्नीचे मुख पाहून तो मोहित झाला व फुले कुबेराच्या घरी न पोचवता पत्नीप्रेमात गुंतून घरीच राहिला.


इकडे कुबेर देवायलात बसून पूजा करीत होता. माध्यान्हकाळ होईपर्यंत तो फुलांची वाट पाहत बसून राहिला. हेममाली आपल्या घरी आपल्या प्रेयसी प्रेमातच गुंतून राहिला. यक्षराजा कुबेर फुले मिळण्यास उशीर झाल्यामुळे रागावला. तो आपल्या दूतांना म्हणाला,


'यक्षांनो, तो दुराधम हेममाली अजून का येत नाही.याचा तपास करा पाहू.'


कुबेर पुनःपुन्हा असे म्हणाला तेव्हा यक्ष म्हणाले, 

'राजा, तो स्त्रीलंपट त्याच्या घरी स्वतःच्या पत्नीसह आनंदात रममाण आहे.'


हे ऐकताच कुबेर क्रोधाने जणू भरून गेला. त्याने तत्काळ हेममालीला बोलावून आणले. फुले पोचवायला उशीर झाला हे जाणून हेममाली घाबरला. त्याच्या नेत्रात भय दिसू लागले. तो कुबेरासमोर येऊन नमस्कार करून उभा राहिला. त्याला पाहताच कुबेराला क्रोध आला व त्याचे नेत्र संतापाने लाल झाले. तो रागाने ओठ चावून म्हणाला, 


'अरे पाप्या, दुष्टा, दुराचाऱ्या, तू देवाची अवहेलना केलीस म्हणून तुझा व तुझ्या पत्नीचा वियोग होईल. तू श्वेतकुष्टी (पांढऱ्या कोडाचा) होशील व येथून भ्रष्ट होऊन वाईट जागी जाऊन पडशील!'


कुबेराचा हा शाप ऐकताच हेममालीच्या अंगात कोड भरले आणि तो स्थानभ्रष्ट होऊन अरण्यात पडला. त्याला प्रचंड दु:ख झाले. त्या भीषण वनात त्याला अन्नपाणी मिळेना. त्याला दिवसा चैन पडेना व रात्री झोप येईना. त्याला कोड असल्याने सावलीत थंडी वाजे व उन्हात तर फार पीडा होत असे. पण त्याने केलेल्या शिवपूजेच्या प्रभावामुळे त्याची स्मृती मात्र कायम राहिली. तो पातकांनी व्याप्त झाला होता तरी पूर्वकर्मांचे स्मरण करीत भटकत राहिला. फिरता फिरता तो हिमालय पर्वतावर आला तेथे त्याला श्रेष्ठ मुनी तपोनिधी मार्कंडेयाचे दर्शन झाले. त्या मार्कंडेयाला ब्रह्मदेवाचे सात दिवस

म्हणजे सात कल्पे आयुष्य आहे.


तो पापी हेममाली ऋषी मार्कंडेयांच्या आश्रमात गेला. तो आश्रम ब्रह्मदेवाच्या सभेसारखाच होता. त्याने त्या ऋषींच्या चरणांना दुरूनच वंदन केले.


मार्कंडेय ऋषींनी त्या कुष्ट्याला पाहिले. जवळ बोलवून ऋषीने त्याला विचारले,


'अरे, तुला असे कुष्ट कशामुळे झाले ? तुझी अशी निंदास्पद स्थिती कशी काय झाली ?'


त्यावर हेममाली म्हणाला, 

'मी यक्षराजा कुबेराचा हेममाली नावाचा सेवक आहे. हे मुनी, मी कुबेराला रोज शिवपूजेच्या वेळी मानस- सरोवरातून फुले आणून देत असे. एके दिवशी मी कामासक्त होऊन स्त्रीसौख्यात रमल्यामुळे फुले द्यायला मला उशीर झाला.ऋषीश्रेष्ठा, त्यामुळे कुबेर रागावला व त्याने मला शाप दिला. त्या शापामुळेच माझा व पत्नीचा वियोग झाला. माझे शरीर कुष्टाने भरले आणि मी अरण्यात जाऊन पडलो. आता पूर्वपुण्यामुळे मी तुमच्याजवळ येऊन पोचलो आहे. साधुपुरुषांच्या अंत:करणाचा कल नेहमीच परोपकार करण्याकडे असतो, हे तुम्ही जाणताच म्हणून हे मुनीश्रेष्ठा,मला अपराधाची शिक्षा करून या दुःखातून सोडवा.'


मार्कंडेय ऋषी म्हणाले, 

'तू माझ्यासमोर सत्य बोललास व अपराध लपवला नाहीस म्हणून मी तुला कल्याणकारक व्रताचा उपदेश करतो. ज्येष्ठ वद्य पक्षातील योगिनी एकादशीचे व्रत तू कर. त्या व्रताच्या पुण्यामुळे तुझे कुष्ठ निश्चितपणे जाईल.'


मुनींचे हे बोलणे ऐकून हेममालीला फार आनंद झाला. त्याने जमिनीवर आडवे होऊन मुनींना दंडवत घातला. मुनींनी त्याला उठवले.मार्कंडेयाच्या उपदेशाप्रमाणे त्याने योगिनी एकादशीचे व्रत केले. त्या व्रताच्या प्रभावाने त्याचे कुष्ट गेले व देवांप्रमाणे तो दिव्य देहाचा झाला. त्याचा व पत्नीचा संयोग झाला आणि त्याला उत्तम सौख्य प्राप्त झाले.


*नृपश्रेष्ठा,* 

योगिनी एकादशीचे व्रत हे असे आहे. अठ्ठयाऐंशी हजार ब्राह्मणांना भोजन घातल्याने जे फळ मिळते, तेच फळ योगिनी एकादशीचे व्रत केल्याने मिळते. ही एकादशी महापापाचे क्षालन करते व महापुण्याचे फल मिळवून देते. हे माहात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने हजार गायींचे दान दिल्याचे पुण्य लाभते.



*॥ याप्रमाणे ब्रह्मवैवर्त पुराणातील योगिनी एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले ॥*


*॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥*



*-------------------------*


(एकादशी-माहात्म्य -  डॉ.र.चि.ढेरे)

Wednesday, July 2, 2025

नामसाधना

 


*जडाच चिंतन  करणारी वृत्ती भगवंताकडे लावावयाची आहे आणि ती निरंतर / सातत्याने लावायची आहे. आपण* *नामचिंतन करत नाही असे नाही पण त्यात सातत्य आणि* *अनुसंधान राहात नाही. म्हणून नाम सिद्धीला जात नाही.* *आणखी एक आहे, नामसाधना तेव्हाच सिद्धीला जाईल जेव्हा*

*भगवत्प्राप्ती हाच त्या नामसाधनेचा एकमेव हेतू असेल. अन्य कोणत्याही कामनेनं केलेला नामजप ती ती कामनापूर्ती करेल पण मग भगवंताला हा नामधारक कायमचा दुरावेल.*

   *नामाखेरीज इतर साधनांनी प्राप्त होणारी पवित्रता पुन्हा मलिन होते, पण नामसंकीर्तनाने प्राप्त होणारी पवित्रता कधीच पुनः मलिन होत नाही.*

 "पवित्र तो देह वाणी पुण्यवंत। जो वदे अच्युत सर्वकाळ ।। तयाच्या चिंतने तरतील दोषी । जळतील राशी पातकांच्या । "


*नामाचे आणि नामस्मरणाने प्राप्त होणारे पावित्र्य तीर्थादिकांपेक्षाही खूपच श्रेष्ठ आहे.*

"तीर्थांचे पैं तीर्थ, नाम हे समर्थ । होऊनि कृतार्थ हरिनामे ॥ "


 *नाम हे स्वत: पूर्ण पवित्र आहे म्हणूनच ते नामधारकाला*

*अंतर्बाह्य पवित्र करू शकते.* *श्रीगुरु ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या एका अभंगात म्हणताहेत,*

" नाम पवित्र आणि परिकरु । कल्पतरूहूनि उदारु । ते का रे

सधरु । तेणे तरसी भवसागरु । ” 


*पद्मपुराणात एक कथा आहे. एक राजा मोठा नामधारक होता. नामस्मरणाने तो इतका पवित्र झाला होता की, जेव्हा*

*त्याला विष्णूदूत वैकुंठास नेऊ लागले ती वाट यमलोकांवरून जात होती. या राजाच्या* *शरीरावरून येणाऱ्या वायूने नरकातील अनेक पापी जीवांचा उद्धार झाला. एवढी भक्तांच्या स्थूल देहाची पवित्रता आहे.(संकलन आनंद पाटील)*

   *सर्वसामान्याला नामचिंतनात एवढे सामर्थ्य आहे याचे ज्ञान नसते. त्याकरिता “गुरुकृपा” पाहिजे. हे नामचिंतनाचे ज्ञान गूढ आहे, गम्य आहे, गंतव्य आहे. आपल्या चिरंतन स्वरुपाचे हे ठिकाण आहे. नाम, प्रेम, भक्ती ही गूढ रहस्ये आहेत.*

*गुरुकृपेवाचून ते कळत नाही.  सद्गुरुकृपा होण्यासाठी त्यांच्या वचनावर प्राणापलीकडे निष्ठा हवी. मग त्यांच्याच कृपेने गूढगम्य असणारे भक्तीप्रेमसुख हाती येते. 

संकलन आनंद पाटील*

Tuesday, July 1, 2025

प्रतिक्रिया

 🌻 *सकारात्मकता* 🌻

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°


 *केवळ लहरींचा खेळ आहे. आपण नंबर फिरवला की त्या नंबरच्या लहरी, बरोबर त्याच माणसाला शोधून काढतात, हे आश्चर्यकारक आहे*.. 


*तसंच आपण जेव्हा एखाद्या देवीचे, संताचे अथवा देवाचे स्तोत्र किंवा पोथी वाचतो किंवा व्याकुळ होऊन त्या देवाला, देवीला, संकटात प्रार्थना करतो तेंव्हा त्या प्रार्थना रुपी सकारात्मक लहरी बरोबर त्याच देवी /देवा पर्यंत पोहचतात आणि ती देवता आशीर्वादात्मक लहरी तुमच्या कडे पाठवते.. प्रार्थना लहरी जितक्या तीव्र, तितका आशीर्वाद परिणामकारक असतो.*

 

*एखादं वाईट काम,पाप करताना आपलं मन एकाग्र असतं* 


*पण तेच बऱ्याचदा पूजा,पोथी वाचन अथवा पुण्य करताना नसतं. म्हणतात नं दारूचा प्रभाव चटकन होतो,पण दुधाचा नाही..पण आपण आपल्या तब्येतीवर त्याच्या होणाऱ्या दीर्घ परिणामांचा विचार करावा..*


*आपण जेव्हा देवीकवच किंवा शिवकवच वाचतो, तेंव्हा त्याचे शुभ कवच त्यातल्या सकारात्मक लहरींनी आपल्या भोवती निर्माण होत असते आणि ते आपले रक्षण करते.. किंवा एखाद्या आजारी व्यक्ती साठी, रोग्या साठी जरी आपण ते वाचले तरी त्या शुभ कवचा मुळे त्या रोग्याचं रक्षण होऊन तो त्या आजारातून बरा होतो.*

   

*तसंच काही वेळा आपण कोणाला कठोर पणे बोलतो, त्याचे दोष सांगतो,किंवा अपमान करतो, तेंव्हा त्या व्यक्तीच्या क्रोधा मुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मक लहरी आपल्या कडे येऊन आपल्या भोवती अशुभ कवच निर्माण करतातच*.. 


*त्यामुळे मग आपल्याला अस्वस्थ वाटू लागतं,भूक कमी होते, निरुत्साही वाटू लागतं..*


*तुम्ही क्रिया सकारात्मक करा तुम्हाला प्रतिक्रिया सकारात्मकच मिळेल..*


*नकारात्मक केलीत तर नकारात्मकच मिळणार..*


*क्रियेला प्रतिक्रिया ही होणारच..*


*कारण लहरीचं जाळं हे सगळी कडे पसरलेलं असतं आणि ते खूपच परिणामकारक असतं*. 

   

*आपल्या संतांनी यावर बऱ्या पैकी अभ्यास करूनच लोकांनी कसं वागावं, आचार विचार कसे असावेत याबद्दल सांगितले आहे.*


*गुरू बऱ्याचदा दूर अंतरा वरून ही आपल्या शिष्याला दीक्षा देतात, किंवा एखादा संदेश पाठवतात आणि *शिष्याला तिकडे त्याची तीव्र जाणीव होते, हे बऱ्याचदा घडले आहे.*


*मोबाईल तर आता आले पण विचार लहरीं  द्वारे एकमेकांना संदेश पाठवणे ही शक्ती उपासनेने त्या काळी ही अवगत करता येत होती..*


*साईचारित्रात याचा उल्लेख आहे की, श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी एका व्यक्ती कडे साईबाबांना देण्यास एक श्रीफळ दिले होते.. ते ज्या क्षणी त्या शिष्याच्या हातात पडले, त्या क्षणी साईं ना त्याची जाणीव शिर्डी येथे झाली होती की, ही व्यक्ती आपल्या गुरुबंधू ने दिलेले श्रीफळ आणत आहे..*


*तसेच शेगावात गजानन महाराजांनी देह ठेवताना साईनाथांना, माझे सर्व शिष्य आता तुम्ही तुमच्या पदरात घ्या अशी विंनती केली आणि त्या क्षणी शिर्डीत साई अतिशय भावविवश झाले. म्हणाले, माझा भाऊ गेला.*


*आज ही परगावी राहणाऱ्या मुलाने आईची तीव्र आठवण काढता आईला समजते व ती गलबलते..* 


*संकटकाळात गुरुचे स्मरण केल्यास त्या क्षणी आपले संकट टळते.. ही त्या सद्गुरूं नी पाठवलेल्या आशीर्वाद रुपी लहरीं मुळेच .*.

    

*या आणि अशा अनेक घटना बघितल्या, वाचल्या की,'विचार लहरीं'चे संक्रमण होत असते हे नक्की..*


*म्हणजे "विचार लहरी " या किती शुभ आणि सकारात्मक हव्यात ..*


*ज्या घरात बसून आपण सतत विचार करतो ते किती सकारात्मक हवेत..*


*घरात एकमेकांशी बोलताना, अगदी स्वतःशीही बोलताना ते किती सकारत्मक हवं, हे लक्षात घ्या..*


*तरचं तुम्ही ब्रम्हांडाची सकारात्मक ऊर्जा स्वतःकडे आकर्षित करू शकाल*..


*जे तुम्ही बोलाल, ज्या गोष्टींचा आणि जसा विचार कराल, तेच सगळं आकर्षित होईल.. त्याच गोष्टी घडतील तुमच्या आयुष्यात आणि तुमच्याच विचारांनी तुमचं भाग्य बनेल..*


*त्यामुळे ते सकारात्मक, चांगले हवे की, नकारात्मक, दुःखी हवे हे फक्त तुम्हीच ठरवू शकता.*


 *वास्तुशात्रा नुसार घरात फेर बदल करण्या बरोबरच आपल्या घरात प्रार्थना, उपासना, सतत चांगले विचार, एकमेकांशी सौजन्याने वागणं, कलह टाळणं येवढं जरी केलं तरी बघा किती सकारात्मक ऊर्जा  निर्माण होते ते..*


*अशा शांत आणि सकारात्मक लहरी तुमच्या वास्तूत तुम्हीच निर्माण करू शकता.*


*तेंव्हा असं सकारात्मक वागून, सकारात्मक विचार करून एकदा त्या सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घ्याच...*


卐ॐ卐ॐ卐ॐ卐ॐ卐