कर्म माणसाला नेहमी परतंत्रीच करत. तुम्हाला नियमांनी बांधावंच लागते. नाहीतर कर्माला कर्मपण राहात नाही.मर्यादा हा शब्द कर्मालाच लागू आहे. या मर्यादा माणूस आपल्या समाजामुळे, आपल्या कल्पनेने, आपल्या प्रथांनी घालून घेतो.
अशी प्रत्येक कर्माला मर्यादा आहे. ही मर्यादा प्रकृती मूळे येते. भगवंताला जेव्हा विश्व निर्माण करण्याची इच्छा झाली त्यावेळी त्याने हे सर्व आपल्या शक्तीने निर्माण केलं. त्या शक्तीला माया प्रकृती ही नावे आहेत.
ही शक्ती सर्वंकष आहे, सर्वांना आवरणारी शक्ती आहे. त्या प्रकृतीच्या शक्तीने माणसाचं जीवन चालते. या विश्वाला चालविणारी शक्ती जी आहे ती मला माझ्या जीवनात चालवते. संतांना हे सोपं करून सांगण्यासाठी त्यानी एक शब्द काढलेला आहे. श्री.समर्थ रामदासस्वामी म्हणाले " रामकर्ता ही भावना ठेवा." त्याला एक सुंदर दृष्टांत दिला की एक माणूस वाहनात बसला.
ज्या गाडीत तो बसला त्याचा सहवास घडतो. त्याची गती आपल्याला येते.तुम्ही स्वस्थ बसता, पण त्या गाडीच्या गतीनं सगळीकडे फिरता. तसं माणूस स्वस्थ बसला तरी मन त्याला अनेक ठिकाणी फिरवून आणते. इतका मी कर्मी परतंत्र आहे.
No comments:
Post a Comment