*श्रीराम समर्थ*
*'ब्रह्मचैतन्य'चा अर्थ*
भवानराव म्हणून गृहस्थ महाराजांकडे होता. तो गांजट होता. पण हे लोक कसे असतात, एक गुण असतो त्यांच्यामधे. तो गुण असा महाराजांशिवाय देव नाही. गुरुशिवाय देव नाही. गांजट खरा पण त्याची निष्टा काय होती. तो भवानराव रोज लाकडे फोडायचा तिथे आणि चुलीत घालायला द्यायचा. त्याचं कामच ते स्वैपाकाला लाकडं पुरवायची. त्या दिवशी काही लाकडं नव्हती, तेंव्हा एक नविन खोली बांधली होती नवीन अगदी. हे कुर्तकोटींनी स्वतः सांगितलेलं आहे बंर का. ऐकीव नव्हे. तेंव्हा महाराज म्हणाले लाकडं नाहीत. बर म्हणाले, काढा म्हणाले वासे याचे. अहो दोन दिवसापूर्वी बांधलेली खोली सगळी लाकडं काढली, पोळपाट होते ते फोडले आणि चुलीत घातले. सगळे लोक आश्चर्य करायला लागले, काय हे? तेंव्हा हे सांगून कुर्तकोटी म्हणाले 'ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या हे आचरुन दाखवलं' म्हणाले. हे दृश्य जे आहे, काय अर्थ आहे याला, सत्य परमात्मा आहे हे आचरुन दाखवलं. आणि ते सांगून म्हणाले, काय नाव ठेवलं होतं गुरुंनी तरी, ब्रह्मचैतन्य असं नाव ठेवलं म्हणाले. याचा अर्थ असा ब्रह्म निर्गुण निराकार कोरं शांत आहे. पण ते ब्रह्म जेंव्हा अॕक्टिव्ह होतं, ते ब्रह्म जेंव्हा काम करायला लागतं, ते ब्रह्म जेंव्हा विश्र्व निर्माण करतं तेंव्हा ते चैतन्यरुपानं दिसतं ते हे आहे.
*********
*संकलनःश्रीप्रसाद वामन महाजन*
No comments:
Post a Comment