#ती. सत्यकथा
आपल्या भाच्याना छान सांभाळणाऱ्या प्रेमाला कपड्याचा एवढं मोठं गाठोडे देऊन वाहिनीने तिला नदीला पाठवले . संध्याकाळची वेळ कसे तरी शाळेतून आल्यावर चहाचा एक घोट तिच्या नशिबात मिळाला . भुकेने कासावीस प्रेमा कपडे धुऊ लागली.हे काम झाल्यावर थोडा तरी खाऊ मिळेल हेच विचार डोक्यात होते तिच्या.
एक एक कपडा धुत विचारात गडलेली असतानाच शेजारी एक सुंदर स्त्री कपडे घेऊन आली दिसायला सुंदर गोरीपान,हातभार हिरव्या बांगड्या,गळ्यात ठसठसित मंगळसूत्र. केस खूप मोठे कंबरे खाली आणि कपाळावर मोठे कुंकू. तिच्या कडे काही ठराविकच कपडे धुवायला होते.बराच वेळ ती तेच कपडे धूत राहिली ,प्रेमाला कपड्याचा ढीग होता १०वर्षाची प्रेमा एवढ्याशा हाताने कपडे पिळत होती ,पुन्हा दुसरे धूत होती . त्या बाईला ती निरागसपणे बघत होती. ती बाई काही केल्या तिचे काम संपवेना ,प्रेमाने तिला तुम्ही किती वेळ कपडे धूत आहात कुठे राहता ,असे प्रश्न केले . ती काही बोलली नाही मी इथेच राहते असे जुजबी बोलून हसली . गोरीपान, सुंदर बाई तिचे हात खूपच सुंदर होते प्रेमाला आपण कपडे धुवायला आलो आहोत घरी जायचे याचा विसर पडला.
असेच १तास होत आला घरी जायचे म्हणून प्रेमा पाय धुवायला गेली तर ती बाई कपडे पिळत असल्यामुळे प्रेमाला तिचे पाय दिसले .पाण्यात पाय उलटे होते . पाय बघून प्रेमा जाम घाबरली. कपड्याचा बादली घेउन तिने धूम ठोकली,आईने तिला उशिरा नदीला जायचे नाही हे बजावलेले आठवले .तिथे एक आत्मा फिरतो हे आठवले. घरी गेल्यावर तिला बोलताही येईना . तापाने फणफणली.
क्रमशः.
अस्मिता माधव
No comments:
Post a Comment