ज्ञानाची व्याख्या काय ? ज्ञान म्हणजे अनेक तऱ्हेचे विश्वास पण ते विश्वास सत्य आहेत, वास्तुतिथी आहे हे जेव्हा पटते तेव्हा ते ज्ञान होतं. नाहीतर नुसता विश्वास राहतो. ते ज्ञान पटलं की त्याची श्रद्धा होते. श्रद्धा याचा अर्थ सत्याची धारणा सत आणि धा, विश्वासाला ज्ञानाचं स्वरूप केव्हा येतं तर ज्या वेळेला हे खरं आहे हा विश्वास घट्ट होतो तेव्हा.
तुम्ही आम्ही देव आहे असं म्हणतो पण तुकाराम महाराज कोणत्या अर्थाने म्हणत होते ? त्यांच्या विश्वासात जो जोर होता, त्यात जे खरेपण होतं ते आपल्यात नाही. आपण नामस्मरण इतकं करतो, तुकारांमहाराजांनी पण नामस्मरण केलं . ते म्हणतात भगवंत नामातच आहे. आपल्याला वाटत असेल किंवा नसेल. बर्फ जेव्हां पडत तेव्हा ते भुसभुशीत असतं पण ते जेव्हा दगडासारखं घट्ट झालं की श्रद्धा होते आणि ती जेव्हा मोडतच नाही ती निष्ठा. या तीन पायऱ्या आहेत. विश्वास कसा असतो तर आंधळा व ऐकीव असतो. तो आतून येत नाही.
पण विश्वास जेव्हा घट्ट होतो तो आतून येतो बाहेरून त्याला पुरावा लागत नाही ती श्रद्धा. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानं. तो आहेच नाही कसा. श्रीतुकाराम महाराजांनीं पांडुरंगाची उपासना करताना काही दगडाचा देव आहे असं म्हणाले नाही. तो जिवंत प्रत्यक्ष आहेच असंच त्यांना वाटत होते. ते जेव्हा त्याच्याशी भांडत किंवा त्याला सांगत त्यावेळेला तो आहेच ही भावना होती. हाच फरक आहे संतांच्यामधे आणि आपल्यामधे.
No comments:
Post a Comment