*कर्म तर करायला पाहिजे पण त्याला काहीतरी फळ पाहिजे ना ? फळ नसेल तर कर्म कोण करील.*
उदा. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणाले एक माणूस प्रवासाला जायचे म्हणून स्टेशन वरती गेला. आणि तेथील तिकीट कारकूनाला म्हणाला " मला तिकीट दे" तो म्हणेल "अहो कोणत्या गावाचे तिकीट हवे ?" तो म्हणाला "नाही मला तिकीट दे" कारकून म्हणाला "अरे तुला ज्या गावाला जायचे आहे त्या गावचे नाव सांग मग मी तिकीट देतो" तसे कर्म करताना मी कशा करता कर्म करतोय ? फळ नसेल तर मग त्या कर्माला दिशाच नाही. प्रत्येक कृतीला कर्माला काहीतरी फळ आहे. त्याशिवाय कर्म नाही.
हे जर आहे तर मग आपण जे कर्म करणार त्याचे फळ असलेच पाहिजे. ते फळ आपल्या हातात आहे का ? उदा.साध कचेरीतुन दुसऱ्या ठिकाणी बदली झाली तरी ती बदलण्याचे आपल्या हातात नाही. तुम्ही उत्तम नोकरी करत आहात. पण तेवढ्यात तुमच्या डोक्यावर खालचा कुणीतरी माणूस आणून बसवतो ना मालक. काय फळाचा अधिकार आहे आपल्या हातात. काही नाही. मग जर कर्तेपण माझ्या हातात नाही तर त्या कर्माचे फळ माझ्या हातात कसे असेल. तर देणारा जो माझा गुरू आहे तर त्या कर्माचे फळ तो देईल. मग कर्माचा मुक्काम कसा आहे तर कर्मतर झालंच पाहिजे, कर्म करताना सर्वस्वी मी कर्ता नाही ही भावना पाहिजे आणि कर्म केल्यावर जे फळ मिळेल त्यात समाधान पाहिजे.
*ll श्रीराम जयराम जय जय राम ll*
No comments:
Post a Comment