*ध्यानाने आत्मशांती*
ध्यान हे मनाच्या अस्थिरतेने साधत नाही. अशावेळी पुनःपुन्हा आपल्या मनाची समजूत घालावी. मनाशी बोलावे. आपण स्वतः च्या शरीराशीसुध्दा बोलत नाही. ते बोलणे म्हणजे ध्यान आहे. इतरांपैकी काहीशी नीट वागतो, काहीशी नीट वागत नाही. पण स्वतःशी तरी नीट वागायला हवे ना? त्याचेच नाव ध्यान आहे. देहात असताना तरी शरीर हा तुमचा अखेरचा आसरा आहे. त्याला सुद्धा वळवून घेण्याची तुमची ताकद नसली, तर तुमच्या जीवनात अर्थ तरी कोणता उरेल? उलट, ध्यानासाठी शरीराशी संवाद साधण्यास तुम्ही रोज उत्सुकतेने बसले पाहिजे. या कल्पनेचा नवा आनंद तुम्हाला खुपच सुखवील. दुसऱ्या बाजूने, ध्यानात तुम्ही अतिशय गुंगून गेलात, तरी तो अतिरेक ठीक नव्हे. फार बेभान झालात तर कोणाला तरी कानात ' हरि ॐ' करण्याची सूचना देऊन ठेवा.
अनुभवानेही तुम्हाला काही जुळवणूक करुन घेता येईल. योग्य ज्ञात्याचे मार्गदर्शन मिळाले तर अवश्य मिळवा. कोणावर तरी श्रध्दा ठेवून, मोठमोठी नावे आणि भपके पाहून, वैराग्याचे देखावे पाहूनही, अनेकांनी चुकीच्या ध्यान प्रक्रिया केल्या कालांतराने त्यांचे नुकसान झाले. येथे सांगितलेली सर्व पध्दत, एका मर्यादेपर्यंत पूर्ण कारणे देऊन सांगितलेली आहे. तुमच्या बुद्धीला पटवीत पटवीत शक्ती मिळविण्याची ही एक स्वावलंबी प्रक्रिया आहे. नीट समजावून घेतली तर धोक्याचा प्रश्न उरत नाही. *थोडेसे त्याग पथ्य, थोडेसे चिंतन पथ्य निश्चयपूर्वक केले तर तुम्ही* *व तुमचे कुटुंब सुखाच्या शिखरावर जाल*
. जगातील सुखे तुम्ही जिंकाल पण ती सुखे तुम्हाला जिंकू शकणार नाही. अशी एक गोड अवस्था तुम्हाला प्राप्त होईल. एक अनुपम आनंद घेऊन पहा.
No comments:
Post a Comment