*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*पू.श्री.तुकाराम महाराज यांच्या बाबतीत श्री.गोंदवलेकर महाराज असं म्हणाले " जळती शेगडी उरावर घेऊन त्यांनी परमार्थ केला." असे आहे की मनुष्य परमार्थाला लागला की निराळा बनतो. त्याच्या वागण्यात फरक जाणवायला लागतो. घरातील माणसं, नातेवाईक नाव ठेवायला लागतात. श्री.तुकाराम महाराजांना त्यांची बायको "आमचं येडं" म्हणायची. पण हे सर्व सोसून त्यांनी साधना केली. त्यांची खरी परीक्षा मंबजीच्या बाबतीत झाली. तुकाराम महाराजांची शिष्या बहिणाबाई देहूला आल्या होत्या. त्यांच्या बरोबर त्यांची गाय आली होती. ती गाय मंबाजीच्या बागेत शिरली, त्याने तिला बांधून ठेवले व मारले. एकदा त्याचे वळ तुकारामांच्या पाठीवर आले. ते गाय सोडवायला गेले तर मंबाजीने त्यांना खूप मारले.शिविगाळ पण केली. पण यांची शांती ढळली नाही. ते अभंगात म्हणतात "तुका म्हणे क्रोधा हाती | सोडवूनी घेतले रे || राग केव्हा येतो अहंकार असेल तर. अहंकार ज्याला नाही त्याला राग येणंच शक्य नाही. विठोबाने त्यांना क्रोधा हातून सोडविले. मग या मंडळीना आपल्या गुरूचा, आपल्या देवतेचा अहंकार असतो. श्री.महाराजांचे वाक्य आहे " माझा ठेवावा अभिमान" सद्गुरूचा अभिमान धरणं हा निराभीमानच आहे. परमार्था मध्ये अभिमान कसला तर "आम्ही भगवंताचे भूषावया लागी." मी आमक्या देवतेचा भक्त आहे. हे माझे गुरू आहेत. मी अमक्याचा शिष्य हे सांगण्यात अभिमान असतो.*
*||श्रीराम जय राम जय जय राम||*
No comments:
Post a Comment