TechRepublic Blogs

Thursday, October 17, 2024

आपलेपणा

 भगवंताला बांधून ठेवायला उत्तम मार्ग कोणता तर "आपलेपणानी" . आपलेपणा म्हणजे ममत्व. ममत्व माझेपण मीचा विस्तार. म्हणजे माझं घर माझी माणस माझा देह. ममत्व म्हणजे माझेपण तर माझं ही षष्ठी भक्ती आहे. 

माझं म्हणजे माझं ममत्व त्यावर आहे. माझी मालकी त्यावर आहे. मग आपलेपण म्हणजे प्रेमानी भगवंतावर स्वामित्व गाजवणे हे आहे. 

भक्त म्हणतो "अरे माझ्याशिवाय तू जाशील कोठे ?"  पू.श्री निळोबाराय, तुकाराम महाराजांचे शिष्य म्हणाले " तुझ्या नामाच्या चिंतनाने तुला मी स्वाधीन केलं आहे." श्री.गोंदवलेकर महाराज म्हणाले भक्त जर प्रेमाचा जोर करायला लागला तर एखादेवेळी परमात्मा पळून जातो कोठेतरी. मग त्याला जाण्याची इच्छा होऊ नये किंवा जाण्याला अडचण पडावी म्हणून भक्त त्याच्या गळ्यात नामाचे लोढणं बांधतो.

 त्यामुळे तो धरला जातो. ज्ञानामध्ये सुध्दा मी पणा द्यावा लागतो. तो मी पणानी नाहीसा होतो, पण परमात्मा तसाच राहतो. भक्ती मध्ये परमात्मा तुमचा मी पणा गिळतो पण त्यावेळी तो मानवी रूप धरून जीवनात शिरतो.

 तुमच्या भक्तीचा रस घेण्याकरिता तो माणूस बनतो. भक्तीमध्ये जे आपलेपण आहे ते इतर कुठेही आढळत नाही.

No comments:

Post a Comment