TechRepublic Blogs

Wednesday, October 16, 2024

विरक्ती

 *सुवैर असो अथवा सुतक आपण श्वास घ्यायचे थांबवतो का? नाही ना?*


*ll श्रीराम जयराम जय जय राम ll*


आपले मन राम नाम जपामुळे एकाग्र होवू लागते, प्रपंचापासून थोडी थोडी विरक्ती येवू लागते आणि मग एकदा का ह्या राम नामस्मरणाची गोडी लागली कि मग काय विचारता, ब्रम्हानंदी टाळी लागते जणू आणि मन आपोआप शांत होते. 

मनाची हि अवस्था जेव्हा प्राप्त होते तेव्हा जपास कुठलीच माळ घ्यायची गरजच उरत नाही. राम नाम आणि देवता आपल्या श्वासावर जणू विसावते आणि म्हणूनच त्यानंतर जपास जर माळच घ्यायची झाली तर ती फक्त *“श्वासाची माळ”* घ्यायची म्हणजेच श्वासागणिक जप झाला पाहिजे. नामातून लागते ती समाधी आणि समाधी अवस्थेतून मिळते ते पराकोटीचे समाधान.             

जप करताना म्हणूनच ही "श्वासाची माळ". मग सुवैर असो अथवा सुतक आपण श्वास घ्यायचे थांबवतो का? नाही ना? प्रत्येक श्वासागणिक जप झाला पाहिजे पण आपण आपले कुठलेही नित्य कर्म करत असू , अगदी भांडी घासताना, कपड्यांच्या घड्या घालताना, प्रवासात, काहीही काम करताना जसा श्वास चालू असतो त्याच प्रमाणे आपले राम नामस्मरण सुद्धा चालू असले पाहिजे. हे कठीण वाटेल पण अशक्य नक्कीच नाही. ह्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी होतात. आपण कमी बोलून जास्ती विचार करायला लागतो, राग शांत होतो, मनाची एकाग्रता आणि परिपक्वता वाढते. आपल्या तोंडूनही कुणास वाईट बोलले जात नाही, मन शांत होते आणि नामाकडे कल वाढू लागतो. 

मनात मग सतत एकच विचार रुंजी घालू लागतो... “ हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा ...”


*ज्याच्यावर भगवंताची कृपा आहे त्याच्या मुखात नाम येते. अखंड नामात राहणे यालाच मोक्ष म्हणतात.*


!! श्री महाराज !!


!!श्रीराम जयराम जय जय राम!!

!!श्रीराम जयराम जय जय राम!!

!!श्रीराम जयराम जय जय राम!!

!!श्रीराम जयराम जय जय राम!!


          !! श्रीराम समर्थ!!

No comments:

Post a Comment