संत श्री.कबीर स्वतःविषयी म्हणतात " मी जन्मापासूनचा अपराधी आहे. मी नखशिखांत विकारांनी भरलेला आहे. पण तू उदार दाता आहेस. तू दुःखाचे भंजन करतोस. तू माझा सांभाळ कर.तुझ्यासमोर मी अवगुणांचे आचरण करतो. तुला मी कसा आवडेन ?
कोणत्या तोंडाने तुला विनवू ? माझ्या मनाला लाज वाटते. माझे अवगुण अगणित आहेत. शिवाय ते अवाच्य आहेत. पण तू अपराध्यांचा दयाळू आहेस. मी कुपुत्र आहे खरा पण तुला माझी लाज आहे. मी अवगुण आचरतांना थकलो, हरलो नाही. आता तू वाटेल ते कर या दासला जवळ कर नाहीतर मारून टाक. तुझ्या मनास येईल ते कर. हे स्वामी ! तू समर्थ आहेस.
माझा हात घट्ट धर आणि मला शेवटपर्यंत पोचव. मध्येच हात सोडू नकोस. माझा अंतर्यामी असा तू माझ्या जीवाचा आधार आहेस. मी तुला भुक्ती व मुक्ती मागत नाही. मला फक्त भक्तीचे दान दे. ते मी इतर कोणापाशी मागणार नाही. मी सगुणाची सेवा करतो व निर्गुणाच ज्ञान करून घेतो.
मी देवाला म्हणतो की भगवंता , मी केले असे काहीं नाही. जे जे मी केले ते तूं केलंस. मी जे केलें म्हणतो ते सारे तुझ्या आधीन आहे."
No comments:
Post a Comment