*नामयोगी महाराज*
संकलन आनंद पाटील
*श्रीमहाराज एकदा राम मंदिरामध्ये नाथांच्या भागवतावर निरूपण करीत होते जमलेले सर्वजण लक्ष देऊन ऐकत होते.*
*पण गोदूबाईचा मुलगा दत्तू हा त्यावेळी इतर मुलांबरोबर दंगा करू लागला, कोणीतरी मुलांना गप्प बसवले पण दत्तू मात्र गप्प बसेना महाराजांनी सांगून पाहिले तरी तो ऐकेना त्यांनी त्याला जवळ बोलावले आणि मांडी घालून बसण्यास सांगितले. नंतर त्याला डोळे झाकण्यास सांगितले*
*त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला, एखाद्या योग्याप्रमाणे तो मुलगा गप बसला. निरूपण आटोपून मंडळी उठली तरी तो मुलगा जागचा हलेना त्यावेळी गोदूबाई महाराजांना म्हणाली त्याला भूक लागली असेल त्याला आता आपण जागे करा.'ते ऐकून महाराज म्हणाले,* *तो जागा होता तेंव्हा तूच दंगा करतो म्हणून तक्रार*
*केली आता गप्प बसला तर तू काळजी* *करतोस.' गोदूबाईने त्यांचे हे बोलणे ऐकून त्याला* *जागे करा असा हट्टच धरला म्हणून महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून पाठीवरून खाली नेला त्यानंतर दत्तू जागा झाला.*
*अनेकांना या गोष्टीचे आश्चर्य वाटले. हा काय प्रकार आहे असे त्यांनी महाराजांना विचारले त्यावेळी ते म्हणाले, 'ही नुसती* *गंमत आहे औषधाने रोग्याला जशी भूल देऊन बेशुद्ध करतात त्याचप्रमाणे आपली शक्ति वापरून अशी मोहनिद्रा उत्पन्न करता येते.
परंतु पुन्हा पुन्हा असे करणे चांगले नसते ही एक प्रकारची समाधि होय, स्वतःला विसरणे म्हणजे समाधि* *समजावी. नाम घेताना स्वतःचा विसर पडणे ही सर्वात उत्तम समाधी होय. नामात स्वतःला विसरायला शिकावे.*
No comments:
Post a Comment