*श्रीमहाराज जेव्हा अनुग्रह देत, तेव्हा रोज स्नान झाल्यावर निदान एक माळ जप आणि रामहृदयाचा एक पाठ करावा असे सांगत.*
*त्यांच्याजवळ जे वामनराव ज्ञानेश्वरी म्हणून होते, त्यांनी महाराजांना विचारले, "महाराज, लोकांना रामहृदय संस्कृतमध्ये असल्याने समजत नाही, नुसते पोपटासारखे म्हणून काय होणार?"*
*तेव्हा महाराज म्हणाले,*
*"वामनराव, 'काय' म्हणायला सांगतो यास विशेष महत्त्व नसून ते 'कोण' म्हणायला सांगतो यात त्याचे महत्त्व आहे. जो म्हणावयास सांगतो, त्याची शक्ती त्याच्या पाठीमागे असते. रोगी डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर त्यास तपासतो व रोगाचे निदान करून औषध देतो. औषधात काय आहे हे रोग्यास माहीत नसते. पण त्या औषधाने आपणास बरे वाटेल या श्रद्धेनेच त्यास बरे वाटते. औषधात काय काय आहे हे समजल्याशिवाय औषध घेणार नाही असे जर रोग्याने म्हटले तर ते हास्यास्पद होईल. त्याने श्रद्धेने औषध घेतले तर तो बरा होतो असा अनुभव येतो. तसे अर्थ न कळता पण श्रद्धेने रामहृदय म्हटल्यास साधकाचे काम अपोआप होते."*
*त्यामुळेच नाम आपले आपण घेणे आणि ते सद्गुरूकडून येणे यात फरक आहे. सद्गुरूची संपूर्ण शक्ती त्यात सामावलेली असल्याने मनुष्य अध्यात्मिक मार्गावर त्वरेने वाटचाल करू शकतो.*
No comments:
Post a Comment