श्रीराम,
सृष्टीतील सार्वभौम राजाशी (ईश्वराशी) जर आपण मानसपूजेच्या माध्यमातून कनेक्ट झालो आणि संपूर्णपणे त्याच्याशी एकरूप झालो तर तो आपल्याला त्याच्यासारखे करून टाकतो.. म्हणजेच सुरुवातीला आनंदस्वरूप भगवंताशी जितक्यावेळा आपण थेट जोडलेले राहू तितक्यावेळ तो आपल्याला त्याच्या सारखे आनंदस्वरूप करत असतो. उदा - :चार्जर ची पिन जितक्यावेळ मोबाईलला लावलेली असते तितक्या वेळ मोबाईल चार्ज होत रहातो. मात्र चार्जर पासून मोबाईल काढून टाकला की तो चार्ज व्हायचा बंद होतो.
अगदी असेच जीवनात कायमचे आनंदस्वरूप होण्यासाठी भगवंताशी थेट कनेक्शन लावून ठेवणे म्हणजेच त्याच्या अनुसंधानात राहणे. भगवंत निर्गुण निराकार असल्याने त्याचे कनेक्शन वायरलेस असते. या कनेक्शन चा पासवर्ड म्हणजे नामस्मरण होय आणि या सगळ्यांच्या मदतीने त्याच्याशी जोडले जाणे म्हणजे मानसपूजा होय. मानसपूजेत निर्गुण निराकाराशी प्रत्यक्ष कनेक्ट होण्यासाठी आधार मात्र सगुणाचाच घ्यावा लागतो. तो मनात, विचारात घ्यायचा असतो.
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment