स्मृती म्हणजे साठवण. साठवण म्हणजे सगळं चांगले वाईट आले. आपली स्मृती आपण जर अशी ठेवली उगाच दुसऱ्याच्या कटकटी दुसऱ्याचे वाईट काढून काय करायचे आहे. आपण आपल्या स्मृतीला असं वळण दिल की भगवंत आहे तो माझा रक्षणकर्ता त्याच्या सहवासात जे सुख आहे ते कशात नाही तर तो मनुष्य वेडा होऊन जाईल. एक निजामपुरकर बुवा नावाचे प्रसिद्ध कीर्तनकार होते. ते किर्तनसम्राट श्री.नानाबुवा बडोदेकर यांचे शिष्य होते. त्यांचे एकदा श्रीमहाराजां पुढे किर्तन झालं. हे बुवा श्री.नानाबुवां सारखे ' राजाराम राजाराम ' म्हणत असत. त्यांना श्री.बेलसरे यांनी विचारले की "तुम्ही सारखे राजाराम राजाराम का म्हणता ?" तर ते म्हणाले ' मला असा सारखा भास होतो की प्रभू रामचंद्र लंकेहून आलेत, ते सिंहासनावर बसलेले आहे, लोक आनंदात आहेत , जिकडे तिकडे सुगंध पसरलेले आहे, प्रसन्नता तर इतकी आहे की माणसाला वेड लागेल. याने मला प्रसन्नता येते , राहते आणि याचा परिणाम माझ्या देहाच्या कोणत्याही अवस्थेत त्याच भान झालं की सगळं दुःख विसरून जातो." आपण असं म्हणावं माझ्या गुरूने मला नाम दिलेलं आहे , त्या नामाची, गुरुची आठवण आपण अशी सतत ठेवावी की माझं जीवन ही त्याची देणगी आहे.याने माणसाची वृत्ती बदलून जाईल. त्याने काय होईल आपण जे नाम घेतो ते त्यांनी (गुरुं ने) दिलेले नाम घेत आहोत. म्हणजे ते आहेत. ते जर आहेत तर त्यांना आवडेल असंच आपण वागायला पाहिजे. म्हणजे त्यांच्या अस्तित्वाचा इतका अभ्यास झाला तर माणसाला बदलायचं कारणच राहणार नाही.
TechRepublic Blogs
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment