परचुरे शास्त्री ज्यांनी आयुष्यात विद्वत्तेमुळे भरपूर मान सन्मान आणि त्याच बरोबर महारोग झाल्या नंतर त्याच समाजा कडून अवहेलना दोन्ही सोसले.
त्यांची भेट श्री.ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याशी झाली असता त्यांनी विचारले " महाराज माणसाच्या जीवनाचे ध्येय काय असावे?" तेंव्हा महाराज जे म्हणाले त्याचा *सारांश*," माणसाचे जीवन म्हणजे प्रवास आहे. पण हा प्रवास दुतोंडी गांडूळा सारखा होतो.
म्हणजे माणसाचे मन जिथे असते तिथेच तो असल्यासारखा असतो. या मनाच्या एका बाजुला देह आणि देहा मार्फत मनात घेतले जाणारे दृश्य जग.
तर दुसऱ्या बाजूला आनंद स्वरूप आत्मा आहे. माणसाचं मन दोन्ही दिशे कडे प्रवास करतं राहत दुतोंडी गांडूळा सारखं कधी इकडे कधी तिकडे. सामान्य पणे देहा कडेच जास्तं. ते ज्याच्याशी चिकटत त्याचे गुणधर्म त्या मनाला येतात. देह आणि दिसणारे जग सारखे बदलते त्यामुळें त्याकडे असलेले मनही अस्थिर राहते. या उलट आत्मस्वरूप स्थिर असल्याने त्याकडे प्रवास झाला तर मन स्थीर होऊन माणसाला समाधान मिळेल."
पू. बाबा यांच्या 1995 शिबिर प्रवचनातून
No comments:
Post a Comment