TechRepublic Blogs

Thursday, October 31, 2024

संत श्री.कबीर

 संत श्री.कबीर स्वतःविषयी म्हणतात " मी जन्मापासूनचा अपराधी आहे. मी नखशिखांत विकारांनी भरलेला आहे. पण तू उदार दाता आहेस. तू दुःखाचे भंजन करतोस. तू माझा सांभाळ कर.तुझ्यासमोर मी अवगुणांचे आचरण करतो. तुला मी कसा आवडेन ?

 कोणत्या तोंडाने तुला विनवू ? माझ्या मनाला लाज वाटते. माझे अवगुण अगणित आहेत. शिवाय ते अवाच्य आहेत. पण तू अपराध्यांचा दयाळू आहेस. मी कुपुत्र आहे खरा पण तुला माझी लाज आहे. मी अवगुण आचरतांना थकलो, हरलो नाही. आता तू वाटेल ते कर या दासला जवळ कर नाहीतर मारून टाक. तुझ्या मनास येईल ते कर. हे स्वामी ! तू समर्थ आहेस.

 माझा हात घट्ट धर आणि मला शेवटपर्यंत पोचव. मध्येच हात सोडू नकोस. माझा अंतर्यामी असा तू माझ्या जीवाचा आधार आहेस. मी तुला भुक्ती व मुक्ती मागत नाही. मला फक्त भक्तीचे दान दे. ते मी इतर कोणापाशी मागणार नाही. मी सगुणाची सेवा करतो व निर्गुणाच ज्ञान करून घेतो.

 मी देवाला म्हणतो की भगवंता , मी केले असे काहीं  नाही. जे जे मी केले ते तूं केलंस. मी जे केलें म्हणतो ते सारे तुझ्या आधीन आहे."

Wednesday, October 30, 2024

गृहिणी

 गृहिणी म्हणजे गृहिणी असतात..


नसतात इंजिनीअर पण,

पिठाच्या गोळ्याचा त्रिकोन करून पोळी मात्र गोल लाटतात..


नसतात शास्रज्ञ पण,

हातात मात्र प्रत्येक व्यंजनाचे मोजमाप अचूक ठेवतात..


नसतात डाॅक्टर पण, 

कोणाला काय पचेल याचे भान ठेवतात..


नसतात शिक्षक पण,

संस्कृतीचे धडे मुलांना जाता येता देत असतात..


नसतात पोलिस  पण,

मुलां बरोबर नवर्‍यावरही बारीक लक्ष ठेवून असतात..


नसतात गायक पण,

मुलांसाठी अंगाई हमखास गातात..


नसतात वादक पण,

राग आला की भांडी आपटून तांडव करतात..


नसतात अर्थतज्ञ पण,

नवर्‍याच्या मोजक्या पगारात काटकसरीने बचतीचा ताळमेळ ठेवतात..


नसतात पंडीत पण,

देवधर्म, पुजाअर्चा, रितीरिवाज, सणवार यांचे औचित्य साधतात..


नसतात परिचारीका पण,

वरिष्ठांची मर्जी सांभाळून प्रेमाने देखभाल करतात..


नसतात लेखक पण,

सर्वांशीच सुसंवादाने प्रेमळ नाते जपत गाथा रचित असतात..


असतात जिद्दी हट्टी पण,

चिऊ,काऊ, माऊ बरोबरच शेजार्‍यांशीही असते गट्टी..


सहनशील अन् संयमी पण, एवढ्याशा भांडवलात पण नातेसंबधांचा व्यवहार चोख बजावतात..

प्रेम आणि आपुलकीच्या जोरावर संसाराचा गाडा हाकत असतात..


संसाराची गुरुकिल्ली कमरेला लावून

"राजाच्या घरात राणीचं राज्य

नामयोगी

 *नामयोगी महाराज*

संकलन आनंद पाटील 

*श्रीमहाराज एकदा राम मंदिरामध्ये नाथांच्या भागवतावर निरूपण करीत होते जमलेले सर्वजण लक्ष देऊन ऐकत होते.*

 *पण गोदूबाईचा मुलगा दत्तू हा त्यावेळी इतर मुलांबरोबर दंगा करू लागला, कोणीतरी मुलांना गप्प बसवले पण दत्तू मात्र गप्प बसेना महाराजांनी सांगून पाहिले तरी तो ऐकेना त्यांनी त्याला जवळ बोलावले आणि मांडी घालून बसण्यास सांगितले. नंतर त्याला डोळे झाकण्यास सांगितले*

 *त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला, एखाद्या योग्याप्रमाणे तो मुलगा गप बसला. निरूपण आटोपून मंडळी उठली तरी तो मुलगा जागचा हलेना त्यावेळी गोदूबाई महाराजांना म्हणाली त्याला भूक लागली असेल त्याला आता आपण जागे करा.'ते ऐकून महाराज म्हणाले,* *तो जागा होता तेंव्हा तूच दंगा करतो म्हणून तक्रार* 

*केली आता गप्प बसला तर तू काळजी* *करतोस.' गोदूबाईने त्यांचे हे बोलणे ऐकून त्याला* *जागे करा असा हट्टच धरला म्हणून महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून पाठीवरून खाली नेला त्यानंतर दत्तू जागा झाला.*

*अनेकांना या गोष्टीचे आश्चर्य वाटले. हा काय प्रकार आहे असे त्यांनी महाराजांना विचारले त्यावेळी ते म्हणाले, 'ही नुसती* *गंमत आहे औषधाने रोग्याला जशी भूल देऊन बेशुद्ध करतात त्याचप्रमाणे आपली शक्ति वापरून अशी मोहनिद्रा उत्पन्न करता येते. 

परंतु पुन्हा पुन्हा असे करणे चांगले नसते ही एक प्रकारची समाधि होय, स्वतःला विसरणे म्हणजे समाधि* *समजावी. नाम घेताना स्वतःचा विसर पडणे ही सर्वात उत्तम समाधी होय. नामात स्वतःला विसरायला शिकावे.*

पर्फेक्ट

 _*पर्फेक्ट-*_


      सध्या ओ टी टी मुळे सगळं जग हातात आलं आहे. मला हव्या त्या देशातील हव्या त्या भाषेतील सिनेमे आणि सिरियल बघता येतात. आणि मला आवडतं निरनिराळ्या देशातले लोक, तिथल्या पद्धती, तिथला निसर्ग बघायला, त्यामुळे इंग्लिश मध्ये भाषांतर केलेल्या सिरीयल मी बघते. 

       अशीच एक सिरीयल बघत होते, त्यात आजकालच्या स्त्रियांना किती ताण असतो, घरचं सगळं करून नोकरी करून मुलं सांभाळून शिवाय पुन्हा स्वतःच्या आवडीचं काही करायला कसा वेळ मिळत नाहीये यावर त्यातली पात्रं चर्चा करत होती...

     मला ही चर्चा पाहताना पटकन असं वाटलं की ही गोष्ट किती ग्लोबल आहे... हाच संवाद आत्ता मुंबईत एखाद्या लोकल च्या डब्यात पण चालू असेल, जपानच्या बुलेट ट्रेन मध्ये किंवा अमेरिकेत एखाद्या कॅफेत सुद्धा सुरू असेल...

       तेवढ्यात त्या चर्चेत सहभागी नसलेली पण शेजारच्या खोलीतून सरबत घेऊन आलेली एक आज्जी असते, तिला त्या सगळ्या जणी विचारतात की, "ए तू कसं मॅनेज केलंस गं सगळं? तूही कॅफे चालवत होतीस, तूही घरी येऊन पुन्हा सगळं काम करत होतीस, मुलांची शाळा अभ्यास, मोठ्यांचे आजार सगळं छान मॅनेज करत होतीस... तुला आम्ही कधीही थकलेलं पाहिलं नाही..." 

      यावर ती आज्जीबाई छान गोड हसते आणि म्हणते, "मी थकत असे कधीकधी, पण मला ताण मात्र कधीही आला नाही... कारण मला पर्फेक्ट व्हायची भूक नव्हती... किंबहुना आमच्या काळी असं 'पर्फेक्ट असं काही नसतं' असं लोकांना मान्यच होतं... 

      आई म्हटल्यावर ती चुरगळलेल्या ड्रेस मध्ये केस विस्कटलेली असू शकते... मुलांनी भरलेलं घर हे पसारा युक्तच असणार... चाळीशी पार केलेला मुलांचा बाबा, टक्कल असणारच त्याला... पर्फेक्ट असं काही नव्हतं आणि ते असावं असा अट्टाहास सुद्धा नव्हता त्यामुळे सोप्पं गेलं जरा तुमच्यापेक्षा..." पुष्कळ आत्मपरीक्षण करायला लावणारा प्रसंग आहे हा. 

      का अट्टाहास करतोय आपण पर्फेक्ट असण्याचा आणि कुणासाठी?

जाहिरातीत दाखवतात तशी संध्याकाळी सुद्धा तरतरीत आणि केस सुद्धा वाकडा न झालेली आई प्रत्यक्षात नसते, कारण प्रत्यक्षातल्या आईला संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर गॅस जवळ उष्णतेची धग सोसत पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक करायचा असतो... सणाच्या दिवशी 12 माणसांचा स्वयंपाक आणि आदरातिथ्य करताना मेकअप आणि भरजरी साडी नाही सांभाळू शकत सगळ्या, त्या ऐवजी कुर्ता घातला असेल तर सरसर कामे करता येतात...

      ऑफिसला प्रेझेंटेशन असेल त्यादिवशी घरी काम जरा बाजूला ठेवावेच लागणार आहे... मुलांच्या परीक्षा असतील तर आईनेच अभ्यास घ्यायचा असं कुठल्याही ग्रंथात सांगितलेले नाही... चित्रातल्या सारखं आवरलेलं घर हे फक्त चित्रात नाहीतर नाटक सिनेमातच असतं... 

      स्वतःहून अभ्यास करणारी आणि पहिले नंबर वगैरे आणणारी मुलं तर मला वाटतं बहुधा फक्त स्वप्नातच असतात... कुणाचा तरी पहिला नंबर येणार म्हणजे इतरांचा दुसरा तिसरा चवथा पाचवा येणारच... अभ्यास छान करून घ्या पण नंबर येऊ दे की पंचविसावा... नोकरी देताना शाळेतला चवथी ब मधला नंबर कोण विचारतो?... 

      तब्येत सांभाळावी हे ठीक पण पन्नाशीच्या बाईने पंचविशी

यातील दिसण्याचा अट्टाहास कशासाठी?... वजनाचा काटा आटोक्यात असावा जे ठीक पण 'साइझ झिरो' चा हट्ट कशाला? सगळ्यांना वन पीस चांगलाच दिसला पाहिजे हा हट्ट कशासाठी ? काहींची वळणे साडीमध्ये काय सुरेख दिसतात... टाचा मोडून पडतात की काय असं वाटेपर्यंत दुखावणार्‍या हाय हील कशासाठी टाच महत्वाची आहे की फोटो?...

      मुळात या पर्फेक्शन च्या व्याख्या कोण ठरवते आहे?

      ऑफिसला काय घालावे, घरी काय घालावे, कसे रहावे, कसे चालावे, कसे बोलावे, कसे दिसावे, कुठे फिरायला जावे, काय आणि कधी खावे, अगदी कुठल्या गादीवर आणि कसे झोपावे, सगळं काही ठरवण्याचे हक्क आपण मिडिया ला नेमके का आणि कधी दिले?

      एक माणूस दुसर्‍या सारखं कधीही नसतं मग सगळ्यांना एकच व्याख्या कशी लागू होईल?

      करा की मस्त भिंतीला तंगड्या लावून आराम... होऊ देत घराचं गोकुळ... अघळपघळ गप्पा मारा मुलांशी, नवर्‍याशी... मस्त मोठमोठ्याने गाणी म्हणत फिरा घरभर गबाळ्या अवतारात... आणि तेवढ्यात पाहुणा आलाच तर त्यालाही आग्रह करा गोष्ट सांगायचा... सध्या दुर्मिळ होत चाललेली कला आहे ती...


_*लेखिका- अनामिका.*_

Monday, October 28, 2024

Prayer

 *Do you Pray?*


I loved this interpretation of *Prayer.* What is a prayer? Prayer doesn't only happen when we kneel or put our hands together and focus and expect things from God. *Thinking positive and wishing good for others is a prayer.* When you hug a friend. *That's a prayer.* When you cook something to nourish family and friends. *That's a prayer.* When we send off our near and dear ones and say, 'drive safely' or 'be safe'. *That's a prayer.* When you are helping someone in need by giving your time and energy. *You are praying.* When you forgive someone by your heart. *That is prayer.* *Prayer is a vibration. A feeling. A thought. Prayer is the voice of love, friendship, genuine relationships. Prayer is an expression of your silent being.*

*Keep on praying* 

😊🙏🏻

विरक्ती

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*विवेक खरा तो की ज्याने विरक्ती निर्माण होते.विरक्ती निर्माण होते याचा अर्थ असा की विरक्ती त्याची गृहिणी बनल्यावर त्याच्या बाकीच्या जीवनाचा जो क्रम आहे तो गृहस्थाला लागू असाच असला पाहीजे.हा परमार्थ मार्ग आहे.विवेकाशिवाय विरक्ती शक्य नाही.उगीच उपासतापास,पोथ्यापुराणं वाचणं याने शरीराला त्रास होईल व मुख्य जे हरीकथानिरुपण ते दूरच राहील.परमार्थ म्हणजे सगळा सुक्ष्माचा खेळ आहे.नामाने आपण सुक्ष्मात जातो.पोथी,प्रार्थना,वैगरेंनी पार्श्वभूमी तयार होईल पण त्यालापण काही लिमीट आहे की नाही?हे समजत नाही म्हणूनच संतांना नामाला "तू घोटघोटकर पी"असं नाईलाजास्तव म्हणावं लागतं.नामाचं महत्व कळल्यावर तरी इतर गोष्टी न करता केवळ नामालाच लागावं.एकदा का विरक्ती आली ना की या जीवनात काही अर्थ नाही असं वाटलं पाहीजे.*

*संदर्भ - बाबा बेलसरे*

*ज्ञानेश्वरी प्रवचने*

Sunday, October 27, 2024

नामस्मरण

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*



*जेथे  भगवंताचें  नामस्मरण ।  तेथे  सर्व  संतांचें  ठाण ॥*


जोंवर धरिली जगाची आस । तोंवर परमात्मा दूर खास ॥

परमात्म्याची प्राप्ति । न होई राखता विषयासक्ति ॥

जग विषयाकार राहिले । तेथे प्रेम केले ते घातासी आले ॥

विषयी एकजीव झालो जाण । सुटता न सुटे आपण जाण ॥

मान, अपमान, जगाचे सुख-दुःख । हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण ॥

अभिमानांत परमात्म्याचे विस्मरण । हें जीवपणाचें मुख्य लक्षण ॥

सुख-दुःख, विपत्ति-आपत्ति, । ही माया प्रपंचाची ओहोटी भरती ॥

आत्मनिश्चय बाणल्यावांचून माया न हटे न सुटे जाण ॥

आता करी शूर मन । मायेसी हटवावे आपण ॥

जैसें जैसें बाहेर दिसलें । त्याचें बीज आपणाशीच उरलें ॥

एकच वस्तूची ओळखण जाण । पूर्ण होते समाधान ॥

ज्याच्यांत मानावे मी सुख । त्याच्यातच उद्‌भवतें दुःख ॥

नराचा होय नारायण । जर न चुकला मार्ग जाण ॥

जेथे ठेवावी आस । त्याचे बनावें लागते दास ॥

देह तो पंचभूतांचा । त्याचा भरवसा न मानावा फारसा ॥

मी तुम्हांस सांगतो हित । दृश्यांत न ठेवावें चित्त ॥

दृश्य वस्तु नाशिवंत असते । भगवत्कृपेने समाधान येते ॥


परिस्थिति नसे बंधनास कारण । असे आपलेच मनाची ठेवण ॥

देवास पाहावें ज्या रीतीनें । तसाच तो आपणास दिसतो जाण ॥

विषयाचा नाही झाला जोंवर त्याग । तोंवर रामसेवा नाही घडत सांग ॥

आपलें प्रेमयुक्त चाले धणी । त्यासी म्हणती ब्रह्मज्ञानी ॥

द्रव्यदारावर्जित जाण । ही खरी संताची खूण ॥

सृष्टी पाहावी भगवदाकारी । प्रेम ठेवील त्याचेवरी । त्याला नाही दुसरी सरी ॥

आल्यागेल्यास द्यावे अन्नदान । मुखानें भगवंताचें नाम ॥

हृदयांत रामाची प्रीति । यासच थोर म्हणती जीवन्मुक्ति ॥

न धरावी जगाची आस । तोच होऊ पाहे रामदास ॥

नामांत संत । नामीं भगवंत ॥

वृत्ति राखावी अत्यंत शांत । हेंच संताचें मुख्य लक्षण जाण ॥

जेथे भगवंताचें नामस्मरण । तेथे सर्व संतांचें ठाण ॥

अगरबत्ती जळून गेली । परि सुवासाने राहिली ॥

तैसी रामचरणी झाले जे लीन । तेच खरे जिवंत जाण ॥

संतचरणीं झाला लीन । त्याला भाग्यास नाहीं दुजें उणें ॥

संताची संगति । भगवन्नामानें साधतें ॥


*१२१ .    देहासकट  माझा  प्रपंच ।  रामा  केला  तुला  अर्पण ॥  ऐसें  वाटत  जावें  चित्तीं ।  कृपा  करील  रघुपति ॥*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।‌‌।*

फूल

 💞


_*#मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला, शरीराला प्रसन्न करून जातो.*_

_सहवासातील माणसाचं देखील असंच असतं._

_शरीराची सुंदरता वया बरोबर संपते, तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते. शरीराला वय असतं, मनाला ते कधीच नसतं..!_

_शेवटी काय, आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो, शरीर तर निमित्त मात्र असतं._


_माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा, आणि विनयशीलता असेल, तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते..!_

_म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही, देवघरातील समईच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो..!_

_आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं...!!_

_आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं, ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई..!_

_ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही._

_आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे...?_

_*नशिबानं कधी भेटलीच तर हळुवार जतन करून ठेवावीत..!*_


_*जपलेले ऋणानुबंध असेच पुढेही जपूया...!!*_. 🌹


🙏

Friday, October 25, 2024

आसक्तित

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*


*पैशाच्या  आसक्तित  राहू  नये .*


कामवासना आणि पैसा ही दोन्ही परमार्थाला विघातक आहेत; पण मला जर कोणी विचारले की, 'त्यातल्या त्यात जास्त घातक कोणते ते सांगा ?' तर मी सांगेन की, 'पैसा हा त्यांतला त्यात परमार्थाला जास्त हानिकारक आहे. पैसा हा भगवंताची निष्ठा कमी करतो.' भगवंताने आपल्याला पैसा दिला आहे, तो आपण सत्पात्र आहोत म्हणून का दिला आहे ? यासाठी, भिकार्‍याला पैसा देताना उगीच वाद घालू नये. तसे करणे म्हणजे काही न करण्याची बुद्धी होय. एखादा त्यागी मनुष्य सर्व देईल पण 'स्व' देणार नाही. 'स्व' देऊन मग 'सर्व' ठेवले तरी चालेल, पण 'सर्व' देऊन 'स्व' ठेवला तर ते मात्र चालणार नाही; म्हणजेच, 'मी देतो' ही भावना राहिली तर सर्वच देणे वाया जाते. मुख्य म्हणजे त्यातली वासना गेली पाहिजे, तर खरे सुख लागते.


देह हा पाया धरून त्यावर इमारत बांधू लागलो तर इमारत पक्की कशी होणार ? मी 'माझा' देह म्हणतो, पण ताप येणे न येणे, इजा होणे न होणे, हे आपल्या हातात आहे का ? 'मी माझे रक्षण करीन ' असे म्हणतो, पण वाटेत ठेच लागून पडल्यावर लोकांनी मला घरी आणावे लागते; म्हणजे जीवित किती परस्वाधीन आहे ! देहाने कितीही कार्य केले तरी ते कळसाला नाही पोहोचणार. अभिमानाने केलेले कार्य कसे कळसाला पोहोचणार ?

 एक भगवदिच्छेने कार्य केले तरच ते शेवटाला जाते. समर्थांनी देहबुद्धी नष्ट करून, रामाचे अधिष्ठान ठेवून कार्य केले; म्हणून त्यांना एवढे कार्य करता आले. जो भगवंताचा झाला त्याचेच कार्य पूर्ण झाले, आणि त्यालाच खरे समाधान मिळाले.


राजाच्या पोटी आलेले देखील भिकारी होऊन जातात, मग मी संपत्तीचा कुठे गर्व करावा ? पैशाने प्रेमात बिघाड येतो आणि अगदी जवळचे नातेवाईकसुद्धा दूर होतात. मी खरे सांगतो, पैशाच्या आसक्तित तुम्ही राहू नका. ही आसक्ति नाहीशी करण्याचा सोपा उपाय म्हणजे संतसमागम हाच होय. आज खरे संतच कुठे आहेत असे आपण म्हणतो, पण आम्हाला संत भेटावा ही तळमळच खरी लागलेली नसते.

 संतात संतपणा दिसत नाही याचे कारण आमच्यात तळमळ नाही. सत्ययुगात जो राम होता तोच आजही आहे, पण माझा भावच कमी झाला त्याला काय करावे ! संतांना आपण खोटेपणा देतो. पण माझा भाव शुद्ध नाही हे नाही जाणत. विषयात सुख आपल्या इच्छेप्रमाणे मिळत नाही, म्हणून आपण संताकडे जातो. पण संताला अर्पण करून घेण्याकरिता कितीजण संताकडे जातात ? देवाकरिता देवाकडे जाणारे किती बरे निघतील ?


*१२० .   मनाने  नेहमी  'मी  रामाचा  आहे'  ही  भावना  ठेवावी .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

सियालकोट

 *मतदान न करण्याची शिक्षा*

            *सियालकोट* 

*लम्होने खता की थी, सदियों ने सजा पाई l*

 नुकतेच पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे आणि आता लगेच दुसऱ्या टप्प्याचे मतदान समोर उभे आहे. नंतर आणखी पाच टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात कमी मतदान झाले म्हणून इतिहासातील एका घटनेची आठवण करून द्यावीशी वाटते. मतदान केले नाही तर त्याची शिक्षा किती पिढ्यांनी भोगली आणि देशाने त्याची किती मोठी किंमत मोजली हे या घटनेवरून लक्षात येईल. 

ही घटना आहे १९४६ मधील, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व फाळणीच्या अगोदरची. सियालकोट, पाकिस्तान मधील पंजाब प्रांतचा एक जिल्हा. लाहोर पासून याचे अंतर १३५ किलोमीटर आहे आणि जम्मू पासून फक्त ४२ किलोमीटर. गोपीनाथ बारडोलोई हे आसाम मधील आणि देशाचे मोठे नेते होते. 

सियालकोट हे फाळणीच्या वेळी भारतामध्ये राहावे यासाठी ते प्रयत्नशील होते. सियालकोट हा त्यावेळी हिंदू बहुल प्रदेश होता. तरीही असे ठरले की जनमत संग्रह घेऊन निकालाच्या आधारावर सियालकोट भारतात राहील का पाकिस्तानात जाईल हे ठरवायचे होते. 

जनमत संग्रहाची तारीख, वेळ आणि प्रक्रिया सर्व ठरले. मतदानाचा दिवस उजाडला. सकाळपासून मतदान सुरू झाले. मुसलमान सर्वात आधी सकाळी लवकर उठून मतदानासाठी रांगा लावून मतदान करू लागले. मोठ्या रांगा लागल्या. हिंदू निवांत उठले. जेवण वगैरे करून दुपारी मतदानासाठी आले. 

बघतात तर समोर मोठ्या रांगा लागल्या होत्या. काही हिंदू रांगा बघूनच मतदान न करता घरी निघून गेले. काही हिंदू रांगेत उभे राहून कंटाळून घरी परत निघून गेले. 

मतदानाचा निकाल आला. आणि ५५,००० मतांनी सियालकोट पाकिस्तानात सामील होण्याचा प्रस्ताव पास झाला. कारण एक लाख हिंदूंनी मतदान केले नाही. १९४१ च्या जनगणनेनुसार सियालकोटची एकूण हिंदू संख्या दोन लाख एकतीस हजार होती. पैकी एक लाख हिंदूंनी मतदान केले नाही. मुसलमान संख्येने कमी असूनही सर्वांनी मतदान केल्यामुळे सियालकोट पाकिस्तानात सामील करायचे ठरले गेले .

यानंतर १६ ऑगस्ट १९४६ चा काळा दिवस उजाडला. जिन्नांनी "डायरेक्ट ॲक्शनची" घोषणा केली. त्याचा प्रहार सियालकोट वर पण झाला. मोठ्या प्रमाणावर हिंदू स्त्रियांची अब्रू लुटून हत्या करण्यात आली आणि हिंदू मुले आणि पुरुषांची कत्तल करण्यात आली. मतदानाच्या दिवशी जे आराम करून घरी विश्रांती घेत राहिले ते कायमच्या विश्रांतीसाठी देवाघरी पाठविले गेले.

त्यानंतर १९५१ च्या जनगणनेनुसार सियालकोटची हिंदू संख्या केवळ दहा हजार राहिली. सन २०१७ मधे ही संख्या आता फक्त पाचशे एवढी राहिली आहे. आज सियालकोट मधे एक तरी हिंदू राहिला असेल असे वाटत नाही. १९४६ ला जर हिंदूंनी मतदान केले असते तर सियालकोट भारतात राहिला असता आणि सर्व हिंदू पिढ्या दिमाखात राहिल्या असत्या. आपले एक मत न देण्याने काय होते याचे इतिहासातील सर्वात मोठे उदाहरण म्हणजे सियालकोट. हिंदू, त्यातल्या त्यात शहरी हिंदू, हा राष्ट्रीय निष्ठेला कमी जागरूक आहे. शहरी हिंदू मतदानाच्या दिवशी सुट्टी समजून मजेत दिवस घालवतो आणि मतदान न करता सर्व कामे सरकारने करावीत ही अपेक्षा ठेवतो. या उलट ग्रामीण लोकसंख्येने अशिक्षित असून सुद्धा मतदान करून लोकशाही अजून जिवंत ठेवली आहे. अजूनही जर प्रत्येक हिंदू मतदाता जागरूक होणार नसेल तर भारताचे सियालकोट होण्याला उशीर लागणार नाही. आणि इथून पुढील हिंदू पिढींना त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल हे इतिहास आणि सियालकोटच्या घटनेने दाखवून दिले आहे.

*जागे व्हा आणि मतदान अवश्य करा*


*सागर आफळे*

भक्ति

 *भक्ति म्हणजे काय ?*


*ईश्वरावर अकृत्रिम प्रेम करणे, मन आणि बुद्धी त्याच्या प्रेमाने भरुन जाणे याचे नांव भक्ती.* *माणसाच्या अंगी सर्वोत्तम ईश्वराचे दर्शन घेण्याचे सुप्त* *सामर्थ्य आहे. तो बाह्य दृष्याच्या आधीन झाल्याने त्याचा आनंद विषयात फसला आहे. बहुसंख्य* *मानव अशा अवस्थेतच मरुन जातात.* *प्रपंचावरील प्रेम कमी कमी करत ईश्वरावरील प्रेम वाढवत राहाण्यास भक्तीमार्ग नामभक्ती उपयोगी पडते..*


*भक्तीमध्ये बाहेर धांवणारे मन परतवून मन भगवंताच्या सन्मुख करावयाचे असते. देह म्हणजे मीच आहे ही भावना मानवी जीवनाच्या दुःखास कारण आहे.* *परमार्थात देहाची आसक्ती नाहीशी करण्याचा मुख्य प्रयत्न असतो.* *मनुष्य जन्म मिळणे कठीण. केवळ याच योनीत परमेश्वराचे ज्ञान करुन घेता येते.* *भक्तीने ते साध्य तर होतेच पण तो परमेश्वरही भक्ताचा* *दास बनतो म्हणून देवही भक्ती सुख भोगण्यासाठी मानव जन्म मिळावा अशी इच्छा करतात. मनुष्य देहाचा उपयोग भगवंतासाठी करावा. त्यातच जीवनाचे सार्थक मानावे.*


   *पापपुण्य सम समान झाले की नरदेह प्राप्त होतो. अशी संधी माणसानें फुकट घालवू नये. स्वर्गात जायचे की नरकांत ते याच जन्मात ठरवायचे आहे. मनुष्य पैसा आणि वासना यांच्य मागे लागून आयुष्य वाया घालवतो  म्हणून गुरूंना दुःख होते. आणि ते मानवांना सावध करतात.  सावध होणे म्हणजे भक्तीमार्गाला लागणे ! 

राम नाम तोंडी येणे पहिले भाग्य, आणि भगवंताशी एकरुप झालेले भक्त भेटणे हे त्याहून मोठे भाग्य !सत्संगाने साधक सद्रूप बनतो. सत्संग हा निर्विषय, उत्तम व निरतिशय सुख देणारा आहे. इंद्रियाशिवाय स्वानंद कसा भोगावा, तसेच विषयाशिवाय परमानंद कसा मिळवावा याचे ज्ञान केवळ संतांपासून मिळते.

 दीपाची संगत घडली की कापराचे कापूरपण नाहीसे होते, त्याचप्रमाणे संतांची संगत मिळाली की देहात्मबुद्धीची निवृत्ती होते. म्हणून भक्तीमार्गात सत्संगतीचे भाग्य सर्वात थोर आहे. भक्तिमार्गात भजन किर्तन, नामस्मरण यासच महत्व आहे.*


   *भक्तीला, नामस्मरणाला स्थळ, काळ, वेळ, वय, ज्ञान कशाचीही आवश्यकता नाही. आहे त्या परिस्थितीत भक्तीच्या जोरावर, नामस्मरणाच्या  जोरावर साधक परमेश्वराशी अनुसंधान ठेवू शकतो.

 संकलन आनंद पाटील*

किमया

 सूत्रधाराची किमया


तो शनिवार होता. हॅाटेल ओबेरायमध्ये प्रसिध्द उद्योगपती रत्नपारखी ह्यांनी स्वत:चा वाढदिवस साजरा करण्यासाठी आयोजित केलेली पार्टी ऐन रंगात आली होती. उंची वेष धारण केलेले पुरूष आणि उंची वेषाबरोबरच दागिन्यांनी आणि प्रसाधनांनी नटलेल्या स्त्रीया हातात मद्याचे चषक घेऊन गटागटाने टेबलाभंवती बसून किंवा उभ्यानेच मनमोकळ्या गप्पांचा आनंद लुटत होते. 

श्रीयुत साळुंके, एक यशस्वी बिझनेसमन आपल्या दोन मित्रांबरोबर एका टेबलाशी बसले होते. त्यांनी परिधान केलेला गर्द निळा सूट, त्यांच्या बोटांतील अनेक अंगठ्या, कोटाच्या खिशात ठेवलेल्या घड्याळाची कोटावर रूळणारी चेन, ह्या सगळ्या गोष्टी त्यांची श्रीमंती दाखवत होत्या. त्यांचे घट्ट मिटलेले ओठ, बारीक तपकिरी डोळे, पेन्सिलीने आंखल्यासारख्या वाटणाऱ्या त्यांचा कोरीव मिशा, ह्या सर्वांतून त्यांचा धूर्तपणा जाणवत असला तरी रुबाबदार व्यक्तीमत्वाची छाप पडल्याशिवाय रहात नसे. त्यांचा कंबाला हीलवर फ्लॅट होता आणि त्यांच्याकडे दोन कार होत्या, एवढे भांडवल त्यांना मुंबईच्या “हाय सोसायटीत” वावरायला पुरेसे होते.


श्री साळुंके शेजारी बसलेल्या इन्कम टॅक्स एक्सपर्ट कोतवालांच्या म्हणण्याला मान डोलावत होते पण त्यांचे कोतवालांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हते. साळुंकेंचे डोळे त्यावेळी मिसेस पंजवानींवर खिळलेले होते. मध्यम वय उलटलेल्या पंजवानी दिसायला जेमतेमच होत्या. त्यांत आता त्यांच्या देहाचा विस्तार त्यांच्या आवाक्यांत राहिला नव्हता पण ह्या सर्वांची कमतरता त्यांनी बहूमूल्य अलंकार घालून भरून काढली होती. त्यांतही त्यांनी गळ्यात घातलेला हारही सर्वांचीच नजर खेंचून घेत होता.   साळुंके तर अशा वस्तुंचे दर्दी. मिसेस पंजवानीकडे, विशेषत: त्यांच्या गळ्यातील हारा कडे पहातां पहाता ते मनांत त्या हाराची किंमत ठरवत होते आणि त्यांच्या मनांत एक योजना तयार होत होती. 

जनरल इन्शुरन्स, इंम्पोर्ट-एक्स्पोर्ट, हे जरी साळुंक्यांचे दाखवायचे व्यवसाय असले तरी कमी श्रमांत जास्तीत जास्त पैसा कमाविण्याच्या अनेक व्यवसायांशी होता. फोर्ट मार्केट येथील घोगा स्ट्रीटवरील त्यांच्या ॲाफिसांमघ्ये अशा अनेक योजनांचे आराखडे तयार होत. स्वत:चा प्रत्यक्ष  संबंध न येऊ देता, ते अशा योजना आपल्या हस्तकांकरवी पार पाडत असत.


छगनलाल मारवाडी हा त्यापैकीच एक. त्याचं जव्हेरी बाजारात दुकान होतं. मुख्य धंदा अर्थातच चोरीचा माल विकत घेणं हाच होता. त्याचा अनेक चोरांशी नियमित संबंध येत असे. उच्चभ्रू समाजात वावरून मिळवलेल्या माहितीच्या जोरावर साळुंके चोरीच्या, घरफोडीच्या योजना आंखून त्या छगनलालला कळवत. साळुंक्यांकडून माहिती आली की छगनलाल योग्य व्यक्तीवर कामगिरी सोंपवत असे. तो साळुंक्याना प्रत्यक्ष ओळखत  पण त्यांनी फोनवर कळवलेली माहिती अचूक असते आणि त्यांच्या सूचनांप्रमाणे कामगिरी पार पाडल्यास मोठा लभ्यांश पदरी पडतो, ह्याची त्याला खात्री पटली होती. आणि अशाच मोजक्या पण मोठ्या चोऱ्या आंखून साळुंके लक्षाधीश बनले होते. 

मिसेस पंजवानींचे अलंकार आणि त्यांतही त्यांचा हिरेजडित हार पाहून साळुंक्यांच्या डोक्यांतील योजनाकार काम करू लागला होता. त्यांच्या आणि पंजवानींच्याही ओळखीच्या एका सरकारी अधिकाऱ्याच्या मुलीचा विवाह दोनच दिवसांनी म्हणजे मंगळवारी संध्याकाळी होता. त्या विवाहाला मिस्टर आणि मिसेस पंजवानी हजर रहाणार होते. अर्थात आपले अलंकार मिरविण्याची अशी संधी मिसेस पंजवानी सोडणचं शक्य नव्हतं. म्हणजे मंगळवारपर्यंत ते अलंकार बॅंकेच्या लॅाकरमध्ये न जाता पंजवानींच्या घरीच रहाणार होते. तेव्हां सोमवारीच ते दागिने त्या हारासह पंजवानींच्या जीवन सोसायटीतील पांचव्या मजल्यावरील फ्लॅटमधून चोरीला जायची व्यवस्था करायला हवी होती. 

पार्टीहून परतताना साळुंके धुंदीतच होते पण मद्याच्या नव्हे तर आपल्याच योजनेच्या. रात्री बिछान्याला पाठ लागेपर्यंत त्यांची योजना मनांत तयार झाली होती. पंजवानीच्या फ्लॅटची रचना आणि घरांतील मंडळी ह्यांची त्यांना माहिती होती. पंजवानी उद्योगी आणि कर्तबगार कारखानदार होते. मिसेस पंजवानी हौशी समाजकार्यकर्त्या होत्या. दर सोमवारी नियमाने त्या आनंद अनाथाश्रमाला भेट द्यायला जात असत. आनंद अनाथाश्रम चालवणाऱ्या ट्रस्टच्या त्या अध्यक्षा होत्या. त्याशिवाय पंजवानींच्या घरी त्यांची कॅालेजांत शिकणारी कन्या डॅाली आणि स्वैंपाकीण अशा दोन व्यक्ती होत्या. 

मिसेस पंजवानी बाहेर गेल्यानंतर घरांत संध्याकाळी सातपर्यंत स्वैपाकीण एकटीच असणार. सोमवारी दुपारी तीन साडेतीनची वेळ नामी होती. पंजवानींच्या घरांत प्रवेश मिळवणं कठीण नव्हतं. त्यांच्या लघुउद्योगापैकी एका औषधनिर्मितीच्या कारखान्यांतून औषधे पाठवली आहेत, असं सांगून ती आंत ठेवायला सहज प्रवेश मिळणार होता. सगळी योजना मनाशी पक्की झाल्यावरच सांळुंक्याना झोप लागली. 


दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी नऊ वाजता सांळुंके घराबाहेर पडले. चर्चगेट स्टेशनकडे येऊन त्यांनी गाडी दूरवर पार्क केली. स्टेशनवरील पब्लिक बूथमधील टेलिफोनवरून त्यांनी छगनलालचा नंबर फिरवला. सांकेतिक भाषेंत ओळख देताच छगनलाल कान टवकारून ऐकू लागला. साळुंक्यांनी त्याला बारीकसारीक तपशीलासह आपली योजना समजावून सांगितली. दागिन्यांच वर्णन आणि अदमासे किंमत ऐकून छगनलालचे हिशेबी डोळे लकाकले. फोनवरचे बोलणे ऐकता-ऐकता त्याच्या डोळ्यासमोरून सराईत चोरांची, टोळ्यांची नांवे सरकत होती. सीताराम नांवाच्या, तोपर्यंत एकदाच पकडला गेलेल्या, अट्टल चोराचं नांव तेव्हाच त्याने मनाशी नक्की केलं. 

पंजवानी कुटुंबात सोमवार नेहमीप्रमाणे उजाडला. बरोबर आठ वाजता पंजवानी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले. त्यानंतर मात्र नेहमीच्या वेळापत्रकांत बदल करणारी गोष्ट घडली. स्वयंपाकीणबाईने अकरा ते सहा बाहेर जाण्याची परवानगी मागितली.  थोडसं कुरकुरत कां होईना पण मिसेस पंजवानीना तिला परवानगी द्यावी लागली. त्याचवेळी डोकं दुखू लागल्यामुळे डॅालीने कॅालेजमध्ये न जाण्याचा आपला मनोदय व्यक्त केला. मिसेस पंजवानीना ही गोष्ट पथ्यकरच वाटली. अकरा वाजतां स्वयंपाकीण बाहेर पडली तर दोन वाजतां दुसऱ्या कारने मिसेस पंजवानी अनाथाश्रमाकडे गेल्या. 

स्वयंपाकीणबाई दुपारी घरी नसणारं हे ध्यानात येतांच डॅाली धूर्तपणे डोकं दुखण्याचं निमित्त करून घरी राहिली होती. खरं म्हणजे दुपारच्या एकांताचा तिला पुरेपूर फायदा घ्यायचा होता. सकाळीच मिसेस पंजवानींची नजर चुकवून तिने तिच्या सध्याच्या दोस्ताला, सुरेशला फोन करून दुपारी अडीचला बोलावून घेतले होते. दुपारी बेल वाजतांच डॅाली दार उघडायला धावत गेली. सुरेश तिच्या शब्दाला मान देऊन तिला सोबत द्यायला हजर झाला होता. वेळ मजेत जाणार होता. 


सुरेश ज्यावेळी पंजवानींच्या घरी आला, बरोब्बर त्याच वेळी सीताराम जीवन सोसायटीच्या समोरच्या फूटपाथवर हजर झाला होता. थोडा वेळ तिथेच उभे राहून त्याने जीवन सोसायटीची टेहळणी केली. त्याला पाहून कोणालाही कसलीच शंका येणार नव्हती. त्याचे कपडे एखाद्या कंपनीच्या शिपायासारखे होते. तो सडपातळ आणि सर्वसाधारण उंचीचा होता. त्याचा चेहराही सामान्य होता. वेळप्रसंगी जलद हालचाली करण्याचा चपळपणा त्याच्यात होता. त्याच्यांत असं कुठलेच वैशिष्ट्य नव्हतं की ज्यामुळे त्याच्याकडे लक्ष जावं. तो फार हुशार होता. तिजोऱ्या उघडण्यात त्याची बरोबरी करणारे फारच थोडे होते. 

फूटपाथवर थोडा वेळ काढून सीतारामने जीवन सोसायटीत प्रवेश केला. सुरेशने पंजवानींच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यानंतर पंधरा मिनिटांनीच, हातांतली औषधांची, खरं तर हत्त्यारांची, बॅग सांवरत सीतारामने पंजवानींच्या दारावरची बेल वाजवली. 

बेलच्या आवाजासरशी डॅाली दचकली. सुरेशबरोबर ती नुकतीच तिच्या खोलीत गेली होती. बेल वाजताच सुरेशपासून दूर होत ती दरवाजा उघडायला गेली. सुरेशच्या उपस्थितीबद्दल काय सांगायचं ह्याचा ती विचार करत होती. दाराच्या झरोक्यांतून तिला परका माणूस दिसताच तिचा जीव भांड्यात पडला. 

तिने दरवाजाला सेफ्टी चेन लावून दार थोडे उघडले आणि सीतारामला “क्या चाहिये?” म्हणून प्रश्न केला. छगनलालने पुरवलेल्या माहितीप्रमाणे वयस्कर स्वयंपाकीण असणार, असं सांगितलं असतांना ही तरुण मुलगी पाहून सीताराम किंचित गांगरला. तिथूनच परत फिरावं असंही त्याला वाटलं. पण एवढा वेळ पाठ केलेले शब्द सहज त्याच्या तोंडून बाहेर पडले, “पंजवानीसाबने दवाईयां भेजी है!” डॅालीचा पटकन त्यावर विश्वास बसला. मुख्य म्हणजे घरातलंच कोणी आलेलं नाही, हे पाहून ती इतकी निर्धास्त झाली होती की “अच्छा! तो रख दो दवाईंया अंदर!” असे म्हणत, सेफ्टी चेन काढून तिने पटकन दार उघडले. 

सीताराम बॅग सांवरत आंत आला. त्यांने आपल्या तीक्ष्ण कानांनी कानोसा घेतला आणि बॅगेतून औषधे काढण्याच्या निमित्ताने त्याने चटकन क्लोरोफॅार्मचा बोळा काढून  बेसावध डॅालीच्या नाकावर दाबला. डॅाली कांही आवाज न करतांच बेशुध्द पडली. 

सीताराम दबकत पुढे सरकला. तिजोरीची खोली पॅसेजच्या उजव्या हाताला दुसरी आहे, असे त्याला सांगितले होते.  तो त्या खोलीच्या दाराशी पोहोचला न पोहोचला तोंच समोरच्याच डॅालीच्या खोलींतून सुरेश बाहेर आला. क्षणभर दोघे एकमेकांकडे पहातच राहिले. तेवढ्यांत दाराशीच आडव्या पडलेल्या डॅालीकडे सुरेशचे लक्ष गेले. त्याचं तरूण रक्त सळसळलं आणि त्याने सीतारामच्या अंगावर झेप घेतली. 

सुरेशच्या अनपेक्षित हल्ल्याने सीताराम चकीत झाला पण त्या त्वेषपूर्ण हल्ल्याला तोंड देतांना त्याचाही हिंस्त्र स्वभाव जागृत झाला. त्याच्या हातांत मोठा पाना होता. दांत ओठ खाऊन त्याने त्याचे दोन जोरदार फटके सुरेशच्या डोक्यावर मारले. सुरेश गतप्राण होऊन खाली पडला. त्याचा जीव गेल्याचे ध्यानांत येताच मुरब्बी सीतारामने डॅालीला जिवंत सोडण्यांतला धोका ओळखून गळा दाबून तिचाही जीव घेतला. 

त्यानंतर त्याने पंजवानींच्या खोलीत शिरून सहजपणे तिजोरी उघडली. तिला तो हार व इतर अलंकाराबरोबरच भरपूर रोख रक्कम सांपडली, तिचा हिशोब त्याला छगनलालला द्यायची गरज नव्हती. तो सर्व ऐवज बॅगेत भरून जणू कांहीच घडले नाही, अशा आविर्भावांत तो जीवन सोसायटीतून बाहेर पडला. 

चारच्या सुमारास सीताराम छगनलालकडे पोहोंचला आणि रोख रक्कम सोडवू सर्व ऐवज त्याने त्याच्या स्वाधीन केला. सीतारामने ह्या कामांत दोन खून करावे लागल्याचे सांगून छगनलालकडून जास्त पैशांची मागणी केली. खून झाल्याचे ऐकताच छगनलालचे पाय लटपटले पण त्या मौल्यवान हाराचा आणि अलंकाराचा मोह होताच. सीतारामची मागणी पुरी करून त्याला दुसऱ्या लांबच्या राज्यांत पळून जायला सांगून तो दागिन्यांची व्यवस्था करायला लागला. 


ठीक साडेसहा वाजतां श्री साळुंके आपल्या ॲाफिसमधून सी.टी.ओ. मध्ये आले आणि तिथल्या पब्लिक फोनवरून त्यांनी छगनलालला फोन केला. छगनलालने दिलेली बातमी विशेष चांगली नव्हती. छगनलालच्या माणसाने कामगिरी पार पाडली होती पण त्याच्या हातून दोन खून घडले होते. म्हणजे पोलिस आता ह्या प्रकरणाचा कसोशीने पाठपुरावा करणार होते. छगनलालने त्यांच्या वाटणीची रक्कम त्यांनी सांगितलेल्या खात्यात जमा करायचे मान्य केले. ते त्यांच्या ॲाफिसमध्ये परत येऊन बसले, तेव्हा स्वत:शीच हंसत होते. एका भलत्याच नांवाने ठेवलेल्या त्या अकाउंटमधली रक्कम काढून घेण्याची व्यवस्था केली की त्यांचा ह्या प्रकरणातील संबंध संपणार होता. 

पंजवानीच्या घरी कुणाचे खून झाले असतील, ह्याबद्दल त्यांनाही कुतुहल होते. त्यांच्या योजनेप्रमाणे त्यावेळी फक्त स्वयंपाकीणबाई त्यावेळी घरांत असायला हवी होती. मग तिचा आणि मिसेस पंजवानींचा खून झाला की तिचा आणि ….. पण कांही असो. ते स्वत:च्या मनाची समजूत घालत होते. 

त्यांचा त्या खूनांशी कांहीच संबंध नव्हता. पोलीसांचे हात, सूत्रधारापर्यंत, त्यांच्यापर्यंत  कधीच पोहोचणे शक्य नव्हते. 

एवढ्यांत त्यांचा फोन घणघणला. त्यांनी चटकन् फोन उचलून कानाशी धरला व म्हणाले, “साळुंके स्पिकींग” पलीकडून गंभीर आवाज आला, “मी इन्सपेक्टर साळवी बोलतोय. साळुंके साहेब, आपण जरा तांतडीने जीवन सोसायटीतील मिस्टर पंजवानींच्या घरी या.” “मी.. मी.. माझे काय काम आहे तिथे पंजवानींकडे?” साळुंक्याना दरदरून घाम फुटला. त्यांना कांहीच सुचेना. 

तेवढ्यांत इन्सपेक्टर साळवींचा आवाज परत त्यांच्या कानांत घुमला, “साळुंके साहेब, बातमी अतिशय दु:खद आहे. पंजवानींची मुलगी डॅाली आणि तुमचा मुलगा सुरेश, ह्या दोघांचा पंजवानींच्या फ्लॅटमध्ये खून झालाय. तुम्ही ताबडतोब इकडे निघून या.” 


श्री साळुंक्याच्या हातून एव्हांना फोन गळून पडला होता. चोरीच्या अनेक निर्दोष योजना आंखणाऱ्या सूत्रधार साळुंक्यांना जगाच्या खऱ्या सूत्रधाराच्या किमयेची जाणीव होऊन ते खुर्चीत कोसळले, ते कायमचेच. 


अरविंद खानोलकर

पूर्व प्रसिध्दी- लोकप्रभा आणि माझा कथासंग्रह “ऋण फिटतां फिटेना” (१९९१).

Thursday, October 24, 2024

सन्मान

 परचुरे शास्त्री ज्यांनी आयुष्यात विद्वत्तेमुळे भरपूर मान सन्मान  आणि त्याच बरोबर महारोग झाल्या नंतर त्याच समाजा कडून अवहेलना दोन्ही सोसले. 

त्यांची भेट श्री.ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याशी झाली असता त्यांनी विचारले " महाराज माणसाच्या जीवनाचे ध्येय काय असावे?" तेंव्हा महाराज जे म्हणाले त्याचा *सारांश*," माणसाचे जीवन म्हणजे प्रवास आहे. पण हा प्रवास दुतोंडी गांडूळा सारखा होतो.

 म्हणजे माणसाचे मन जिथे असते तिथेच तो असल्यासारखा असतो. या मनाच्या एका बाजुला देह आणि देहा मार्फत मनात घेतले जाणारे दृश्य जग. 

तर दुसऱ्या बाजूला आनंद स्वरूप आत्मा आहे. माणसाचं मन दोन्ही दिशे कडे प्रवास करतं राहत दुतोंडी गांडूळा सारखं कधी इकडे कधी तिकडे. सामान्य पणे देहा कडेच जास्तं. ते ज्याच्याशी चिकटत त्याचे गुणधर्म त्या मनाला येतात. देह आणि दिसणारे जग सारखे बदलते त्यामुळें त्याकडे असलेले मनही अस्थिर राहते. या उलट आत्मस्वरूप स्थिर असल्याने त्याकडे प्रवास झाला तर मन स्थीर होऊन माणसाला समाधान मिळेल."

पू. बाबा यांच्या 1995 शिबिर प्रवचनातून

Wednesday, October 23, 2024

सार्वभौम

 

       श्रीराम,

   सृष्टीतील सार्वभौम राजाशी (ईश्वराशी) जर आपण मानसपूजेच्या माध्यमातून कनेक्ट झालो आणि संपूर्णपणे त्याच्याशी एकरूप झालो तर तो आपल्याला त्याच्यासारखे करून टाकतो.. म्हणजेच सुरुवातीला आनंदस्वरूप भगवंताशी जितक्यावेळा आपण थेट जोडलेले राहू तितक्यावेळ तो आपल्याला त्याच्या सारखे आनंदस्वरूप करत असतो. उदा - :चार्जर ची पिन जितक्यावेळ मोबाईलला लावलेली असते तितक्या वेळ मोबाईल चार्ज होत रहातो. मात्र चार्जर पासून मोबाईल काढून टाकला की तो चार्ज व्हायचा बंद होतो.

                     अगदी असेच जीवनात कायमचे आनंदस्वरूप होण्यासाठी भगवंताशी थेट कनेक्शन लावून ठेवणे म्हणजेच त्याच्या अनुसंधानात राहणे. भगवंत निर्गुण निराकार असल्याने त्याचे कनेक्शन वायरलेस असते. या कनेक्शन चा पासवर्ड म्हणजे नामस्मरण होय आणि या सगळ्यांच्या मदतीने त्याच्याशी जोडले जाणे म्हणजे मानसपूजा होय. मानसपूजेत निर्गुण निराकाराशी प्रत्यक्ष कनेक्ट होण्यासाठी आधार मात्र सगुणाचाच घ्यावा लागतो. तो मनात, विचारात घ्यायचा असतो.

                       ||श्रीराम ||

Tuesday, October 22, 2024

एकादशी

 🌀🌀🌀🌀🌀🏵️🌀🌀🌀🌀🌀

             *🔸त्याची रखुमाई..!🔸*


*एकादशी स्पेशल...!*


*थकून भागून घरी यायला त्याला रात्रीचे २ वाजले. रस्त्यात दिव्यांची सोबत करत तो घरी आला, बिचारी ती वाट बघून बघून थकून गेली, आणि सोफ्यावर बसल्या बसल्या तिला कधी झोप लागली हे तिला कळाल ही नाही.*


*ह्याने बेल वाजवली दार १० मिनिटं झाली कुणी उघडलंच नाही, ह्याला भीती वाटू लागली. दारावर त्या भीतीपोटी ह्याने जोरात धक्का दिला.. तिला त्या आवाजाने जाग आली, तिने दार उघडलं. आधीच कर्तव्याची बोजी पाठीवर घेऊन फिरणारा तो वैतागला होता.*


*दार उघडल्या उघडल्या तो तिच्यावर खेकसलाच "कळत नाही का? तुला माझ्या कष्टांची किंमतच नाहीये.." वगरे वगरे.. ती ही वाट बघून बघून वैतागली होती, ती ही चालू झाली आणि जे नेहमी होत तेच झालं.. कर्तव्याच्या बोज्याने आपल्या हातानेच पोट भरलं आणि प्रेमाने जोरात दार आपटत प्रेम झोपी गेलं.*


*विचार करत करत काहीवेळाने कर्तव्य ही झोपी गेलं, सकाळी ५ वाजता फोन वाजला म्हणून त्याला जाग आली. समोरून एक चड्डी दोस्त होता.. अरे येतोस ना, जायचंय आपल्याला माउलींना सासवड पर्यंत सोडायला.*


*राग एक खूप मोठी गोष्ट सोबत घेऊन फिरत असतो.. त्याचं नाव अहंकार. तोच सोबत घेऊन त्याने मित्राला चार शिव्या दिल्या आणि फोन ठेऊन दिला, पण तो राहिला चड्डी दोस्त त्याने परत फोन करून ह्याला ४ शिव्या दिल्या आणि आवर १५ मिनिटात आलो...  असं म्हणून फोन ठेवून दिला. जास्त वाद आता ह्याला ही नको होता, म्हणून त्याने आवरायला सुरवात केली.*


*प्रेमाला कर्तव्याची चाहूल लागली, आणि प्रेम ही झोपेतून उठलं काहीच प्रश्न न करता प्रेमाने चहा ठेवला. चहा वगरे घेऊन आपल्या चड्डी मित्रासोबत कर्तव्य कर्तव्यांची परतफेड करायला बाहेर पडलं. जाताना प्रेमाला काळजी घे, येतो संध्याकाळी सांगून..*


*कोण म्हणतं फक्त व्यसनांनीच नशा येते, भान हरपते? कधी तुम्ही वारीतल्या भक्तिरसात नाहून तर बघा, तुम्हाला कुठल्याच नशेची गरज पडणार नाही. त्याचं ही तेच झालं... टाळ, मृदुग, पखवाज ह्यात पठया इतका नाहून गेला, की आयुष्यातली सगळी दुःखं कुठल्या कुठे पळून गेली. असंख्य लोक आपआपली दुःखं माऊलींच्या चरणी अगदी निर्धास्त टाकून नाचत होती. जणू काही सगळे चातक पक्षी आहेत आणि माऊली त्यांचं पाणी.*


*बरेच अंतर संपल्यावर ह्याच्या लक्षात आलं आपण चुकलोय आणि कुठल्याश्या दिंडी सोबत चालतोय.. मागं पुढं मित्र बघतोय तर तो ही नाही. फोन लावायचा म्हणलं, तर तो ही बंद.*


*शेवटी तो तेही विसरून गेला, आणि माऊली चला पुढं, चला पुढं च्या नादात चालत राहिला. चालत चालत पालखी दिवे घाटाच्या खाली विसाव्याला थांबली. हा त्या दिंडीतून बाहेर पडणार तेवढ्यात मागून आवाज आला.. "माऊली टाळ वाजवायला सोबत अन जेवायला नाय व्हय? चला थोडं थोडं भाकर पोटाला खाऊन घेऊ.."*


*त्यांच्या साध्या वाक्यातलं प्रेम त्याला चटकन जाणवलं. तो नाही म्हणूच शकत नव्हता. जेवणं वाढली गेली. सगळे मनभर जेवले. हा हात धुवायला गेला आणि ह्याला काहीतरी वेगळंच दिसलं....*


*एक आजोबा पाठमोरे साडीला मिऱ्या घालताना दिसले, त्याला आश्चर्य वाटलं.. त्याने पटकन हात धुतले आणि त्याने त्या आजोबांना आवाज दिला.. माऊली...*


*आजोबा वळाले, त्यानंतर त्याला जे काही दिसलं...  त्यावर त्याचा विश्वास बसला नाही, ते आजोबा त्यांच्या रखुमाईला साडी नेसवत होते. तो काही बोलायच्या आतच आजोबा त्याला म्हणाले वय झालं रे लेका आता तीचं.. आणि एक बाजू बी आधु पडली. अरे, ते तुम्ही काय पॅरॅलीसिस का काय म्हणता... ते झालंय. वारीला यायचं म्हणाली, नाही म्हणू शकलो नाही.*


*आयुष्यभर झटली बघ माझ्यासाठी. पांडुरंगाने तिची सेवा करण्याचं भाग्य ह्याच जन्मी माथी दिलंय, तेच काय ते सुख बघ.*


*त्याच्या मनातल्या मेघांनी अश्रूंना वाट रीती करून दिली होती. मन आतून सांगत होत की, बाबारे हाच तो विठ्ठल आणि हिच ती रखुमाई.*


*तो काहीच बोलला नाही. तो आजोबां जवळ गेला आणि त्याने त्यांना कडकडून मिठी मारली. डोळे पुसत इतकंच म्हणाला...,  चला माऊली निघतो. माझी रखुमाई घरी वाट बघत असेल.*


*त्याची वारी आता जगाच्या उलट चालू झाली होती, त्याच्या पंढरपूराकडं...! जिथं त्याची रखुमाई त्याची आतुरतेन वाट बघत होती...*

🌀🌀🌀🌀🌀🏵️🌀🌀🌀🌀🌀

Monday, October 21, 2024

अनुग्रह

 *श्रीमहाराज जेव्हा अनुग्रह देत, तेव्हा रोज स्नान झाल्यावर निदान एक माळ जप आणि रामहृदयाचा एक पाठ करावा असे सांगत.*

*त्यांच्याजवळ जे वामनराव ज्ञानेश्वरी म्हणून होते, त्यांनी महाराजांना विचारले, "महाराज, लोकांना रामहृदय संस्कृतमध्ये असल्याने समजत नाही, नुसते पोपटासारखे म्हणून काय होणार?"*


*तेव्हा महाराज म्हणाले,*

*"वामनराव, 'काय' म्हणायला सांगतो यास विशेष महत्त्व नसून ते 'कोण' म्हणायला सांगतो यात त्याचे महत्त्व आहे. जो म्हणावयास सांगतो, त्याची शक्ती त्याच्या पाठीमागे असते. रोगी डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर त्यास तपासतो व रोगाचे निदान करून औषध देतो. औषधात काय आहे हे रोग्यास माहीत नसते. पण त्या औषधाने आपणास बरे वाटेल या श्रद्धेनेच त्यास बरे वाटते. औषधात काय काय आहे हे समजल्याशिवाय औषध घेणार नाही असे जर रोग्याने म्हटले तर ते हास्यास्पद होईल. त्याने श्रद्धेने औषध घेतले तर तो बरा होतो असा अनुभव येतो. तसे अर्थ न कळता पण श्रद्धेने रामहृदय म्हटल्यास साधकाचे काम अपोआप होते."*


*त्यामुळेच नाम आपले आपण घेणे आणि ते सद्गुरूकडून येणे यात फरक आहे. सद्गुरूची संपूर्ण शक्ती त्यात सामावलेली असल्याने मनुष्य अध्यात्मिक मार्गावर त्वरेने वाटचाल करू शकतो.*

Saturday, October 19, 2024

आरोग्यवर्धक

 *आरोग्यवर्धक*

*श्री नामदेव माने*


कोणी कोणतेही *धर्मशास्त्र वाचले नाही तरी चालेल पण एकदा " शरीरशास्त्रा* "चा अभ्यास करावा.


(वैज्ञानिक मानवी शरीराचा अभ्यास करुन थक्क झाले आहेत)

*मानवी शरीर अदभुत आहे.*

🔸 *मजबुत फुफ्फुस*

आपलं फुफ्फुस दररोज २० लाख लिटर हवेला फिल्टर करते. आपल्याला याचा अंदाज पण नाही येत. जर फुफ्फुसाला खेचुन लांब केलं तर ते टेनिस कोर्टचा एक हिस्सा पुर्ण व्यापुन टाकेल.

🔸 *अशी कोणतीही फॅक्टरी नाही*

आपले शरीर दर सेकंदाला २५ करोड नविन सेल बनवते. दररोज २०० अब्जापेक्षा जास्त रक्त कोषिकांचे उत्पादन करते.सतत शरीरात २५०० अब्ज रक्त कोषिका असतात. रक्ताच्या एका थेंबात २५ करोड कोषिका असतात.

🔸 *लाखो किलोमीटर चा प्रवास*

मानवाचे रक्त शरीरात दररोज १९२००० किलोमीटर चा प्रवास करत असते. आपल्या शरीरात साधारण पणे ५.६ लीटर रक्त असते. जे दर २० सेकंदाला एकवेळा संपुर्ण शरीराचे भ्रमण करते.

🔸 *धडधड*

तंदुरुस्त व्यक्तीचं ह्रदय दररोज १००००० वेळा घडकतं. वर्ष भरात ३० करोड पेक्षा जास्त वेळा धडकतं. हृदयाच्या पंम्पिग चा दाब एवढा जास्त असतो की,रक्ताची चिळकांडी ३० फुट वर उडु शकते.

 🔸 *सर्व कॅमेरे आणि दूर्बिणी निष्फळ*

मानवाचे डोळे एक करोड रंगांना ओळखुन लहानातला लहान फरक ओळखु शकतात. अजुनपर्यत जगात अशी कोणतीही मशीन नाही जी यांच्या बरोबर स्पर्धा करु शकेल. 

🔸 *नाकात एअर कंडीशनर*

आपल्या नाकात नैसर्गिक एअर कंडीशनर आहे. जी थंड हवेला गरम आणि गरम हवेला थंड करुन फुफ्फुसात पाठवते.

🔸 *ताशी ४०० कि.मी. ची गती*

चेतनातंत्र शरीराच्या बाकी हिश्यात तासाला ४०० की.मी. गतीने तडक उपयुक्त सुचनाचं प्रसारण करतं. मानवाच्या मेंदुत १०० अब्ज पेक्षा जास्त नर्व सेल्स आहेत.

🔸 *जबरदस्त मिश्रण*

शरीरात ७० % पाणी आहे. या शिवाय मोठ्या प्रमाणात कार्बन, जस्त, कोबाल्ट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फाॅस्फेक्ट, निकल आणि सिलिकॉन आहे.

🔸 *अजब शिंक*

शिंकताना बाहेर येणारी हवेची गती प्रती ताशी १६६ ते ३०० कि.मी. पर्यंत असु शकते. उघड्या डोळ्यांनी शिंकणे निव्वळ अशक्यच आहे.

🔸 *बॅक्टेरियाचे गोदाम*

मानवाच्या शरीराच्या १०%  वजन हे त्याच्या शरीरात असलेल्या बॅक्टेरियाचे असते. एक चौरस इंच त्वचेमध्ये सुमारे ३.२ कोटी बॅक्टेरीया असतात.

🔸 *विचित्र विश्व*

डोळ्याचा विकास लहानपणीच पुर्ण झालेला असतो. नंतर त्याचा विकास होत नाही. पण नाक, कानाचा विकास संपुर्ण जीवना पर्यंत चालुच राहतो. कान लाखो आवाजाचे फरक जाणु शकतात. कान १००० ते ५०००० हर्टज आवाजांना ओळखु शकतात.

🔸 *दातांची काळजी घ्या*

मानवी दात दगडा सारखे मजबुत असतात, पण शरिराचे अन्य भाग स्वःताची काळजी स्वःताच घेतात. तसे दात आजारी पडल्यावर स्वःताची सुधारणा करण्यासाठी सक्षम नसतात.

🔸 *तोंडातली लाळ*

मानवाच्या तोंडात दररोज १.७ लिटर लाळ बनते. लाळ भोजन पाचन करण्यास मदत करते. जीभेत असलेली लाळ १०००० पेक्षा जास्त स्वाद ग्रंथीना ओली ठेवते.

🔸 *पापण्या झपकणे*

वैज्ञानिक सुद्धा मानतात की पापण्या झपकल्यास कचरा निघतो यामुळे डोळ्यांच्या दृष्टीत फारच  फरक जाणवतो.

🔸 *नखांची कमाल*

अंगठ्याचे नख सर्वात हळु वाढते आणि मधल्या बोटाचे नख सर्वात वेगाने वाढते.

🔸 *दाढीचे केस*

पुरुषांच्या दाढीचे केस सर्वात वेगाने वाढतात. जर कोणी व्यक्ती संपुर्ण जीवन दाढी नाही करत तर ती ३० फुट लांब होवु शकते.

🔸 *जेवणाचे गणित*

व्यक्ती सामान्यरित्या जेवणासाठी ५ वर्षाचा वेळ खर्ची करतो. जीवनापर्यंत आपण आपल्या वजनाच्या ७००० पट जेवण खालेलं असते.

🔸 *केस गळण्याचा त्रास*

एका तंदुरस्त माणसाच्या डोक्यातले 80 केस दररोज गळतात.

🔸 *स्वप्नाची दुनिया*

बाळ जगात येण्या आधी पासुनच आईच्या गर्भाशयातच स्वप्न पाहायला सुरुवात करते. वसंत ऋतुमध्ये बाळाचा विकास वेगाने होतो.

🔸 *झोपेचे महत्व*

झोपे दरम्यान माणसाची उर्जा वाढते. मेंदु महत्वपुर्ण माहिती गोळा करतो. शरीराला आराम मिळतो आणी डागडुजीचे ( रिपेअरिंगचे) काम पण होते. झोपे दरम्यान शरीराच्या विकासासाठीचे गरजु हार्मोन्स मुक्त होतात.

✡️ तेव्हा तुमच्या किमती शरीराचे कमी मुल्यांकन करु नका.

*✡️

परमेश्वराचे नामस्मरण करताना जे दिले ते भरपुर आहे म्हणुन माझे हातुन सत्कर्म गोड ही प्रार्थना करु या



व्यक्तिमत्व

 बुलेट वाशिंग करावं म्हणून घरातून बाहेर पडलो ! दादाच्या पेट्रोल पंपाजवल एक वाशिंग सेंटर आहे तिथे गेलो ...बरीच गर्दी होती ! नंबर लावून सौ ने दही आणायला सांगितलं होतं म्हणून दही आणण्यासाठी डेअरी कडे निघालो, सूतगिरणी चा सिग्नल ओलांडला अन एक बावळट गाडीसमोर आलं ! 'मरायचं का रे !' मी ओरडलो…! 


समोर नाम्या होता ..! मी त्याला ओळखलं होतं पण त्याने मला कदाचित ओळखलं नाही पण मरायचं का म्हणल्यामुळे तो रागावलेला दिसत होता !

'आरं दमानी हाक की गाडी मग !' नाम्या

'पांढरी झालेली वाढलेली दाढी, बसलेली गालफाडं, डोळ्याच्या खोबणीत खोल गेलेली बुबुळ, काळीशार ओठं, रंगाचे शिंतोडे उडालेली पॅन्ट, वर वर्षानुवर्षे गाठोड्यात बंदिस्त असलेल्या कपड्याची नेमकीच सुटका झालेला शर्ट ! क्षणभर त्याची अन माझी नजरानजर झाली, क्षणातच मी त्याला ओळखले होते, गाडी बाजूला घेतली. बंद केली. 

आता मात्र तो घाबरला होता, त्याने मला ओळखले नव्हते, तो दुरूनच बोलला,'जावु द्या ना साहेब, गलती झाली !' अन जवळ आला.

त्याची फिरकी घ्यावी म्हणून मी बोललो, ' नाम्या, मरायची घाई झाली का रे ?'

आता मात्र त्याच्या डोळ्यातली भीती गेली अन अनपेक्षितपणे कसला तरी ओळखीचा प्राणी समोर आलाय खरा पण ह्या प्राण्याला आपण कुठे, केंव्हा, कधी भेटलो असन असा भाव त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता !

'साहेब, म्या ओळखीलं नाय तुम्हास्नी !' नाम्या

'साल्या, मी साहेब नाही.....! ओळख पहिले !' गाडीवरून उतरत मी बोललो.

त्यानं डोक्यावर बराच ट्रेस दिला पण त्याचा प्रश्न काही सुटेना ! 

'मायच्यान, नाय ओळीखलं सायेब !' नाम्या म्हणाला.


नाम्या म्हणटल्यावर त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरून त्याचे नाव नाम्याच आहे याची मला खात्री झाली होती ! 

आता जास्त अंत न पाहता मी त्याला बोललो, 'अरे मी तुझा क्लासमेट छोट्या !' 

त्याचा चेहरा चिंताक्रांत, अभ्यासक्रमात नसलेला प्रश्न वार्षिक परिक्षेत आल्यानंतर उमटणाऱ्या प्रतिक्रियेसारखा त्याचा चेहरा झाला होता ! 

पण झटक्यात प्रश्नाचे उत्तर सापडावे तसा तो आनंदाने उद्गारला, " छोट्या, तू ? मायला,आरं ओळखुच आला नाय रं !'

पटकन त्यानं पुढं होऊन आपल्या कळकट अन माझ्या इस्त्रीच्या कपड्याची तमा न बाळगता घट्ट मिठी मारली, 


त्याच्या मिठीत मैत्रीचा, प्रेमाचा, जुन्या आठवणींचा अन लहानपणाचा ओलावा  स्पष्ट जाणवत होता !


त्याचे डोळे पाणावले. 

तब्बल वीस वर्षांनंतर आम्ही भेटलो होतो ! 

आज मला मनस्वी आनंद झाला होता, क्षणभरातच अनेक स्मृती वर्षानुवर्षे दबून पडलेला ज्वालामुखी फुटावा अन लाव्हारस बाहेर पडून वाट मिळेल तिकडे स्वैरभर  पळावा तसे मन आठवणी घेऊन पळत होते, 

माझे डोळे सुद्धा पाणावले होते.

रस्त्याने येणारे जाणारे आमचे हे मित्रप्रेमाचे मिलन पहात होते ! 

पण,

 त्याला ,अन मला ,त्यांची अजिबात पर्वा नव्हती !


नाम्या म्हणजे शालेय जीवनातलं मी अनुभवलेलं एक जबरदस्त रांगडं व्यक्तिमत्व ! अभ्यासाकडं नेहमी दुर्लक्ष! आईच्या अन शिक्षकांच्या धाकाने आमच्या वह्या घेऊन त्याचा गृहपाठ पूर्ण व्हायचा त्यामुळं तो आमचा फॅन !! 

कर्जामुळं बापानं आत्महत्या केली होती, 

आईनं तळहाताच्या फोडाप्रमानं जपून याचा सांभाळ केला ! 

त्याच्या आईच्या हातच्या बाजरी, ज्वारीच्या भाकरी,आंब्याचं लोणचं अन ठेचा,कारळाची-जवसाची चटणी मी गृहपाठ पूर्ण करण्याच्या मोबतल्यात अनेक वेळा खाल्ली होती, 

सध्या आठवलं तरी तोंडाला पाणी सुटावं अशी स्वर्गीय चव !!! 


त्याच्या रांगडेपणावर एक वर्गमैत्रीण पण फिदा होती नाम्यावर !.......... 

पण गेले ते दिवस अन राहिल्या फक्त आठवणी !!


'चल चहा घेऊ.' मी म्हटले..


'मायला ह्यो काय च्या चा टाइम हाय का ?' नाम्या नेहमीच्या टोनिंग मध्ये बोलला.


'मग चल काहीतरी खाऊ.' मी म्हटले....

तसा तो खळखळून हसला, 'पाजायची तर, काटर पाज !'

त्याच्या या बोलण्यावर कमीतकमी त्याच्यासाठी तरी माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हते ! 

'चल'... मी बोललो.

https://chat.whatsapp.com/DM2tObW4L7JHHQVXQRgOvW

अगदी दहा-पंधरा फुटाच्या अंतरावर एका नाल्यावर एक 'देशी दारूचे दुकान' अभिमानाने उभे होते !

त्याला पुढे बार मध्ये जाऊ म्हणटलो पण हात झटकून नकार देत तो देशी दारुच्या दुकानाकडे निघाला देखील ..!

शहरातील ५३ व्या दरवाजातून प्रवेश करावा तसा मी आत प्रवेश केला. 

माझे रोजच्या प्रतिज्ञेतील काही बांधव आपली मान मुरगळून पडले होते, काही पेंगत होते तर काही तरंगत बाहेर पडत होते ! बऱ्याच दिवसापासून झाडू मारलेला नव्हता, दुर्गंधी पसरलेली अन आतच्या खोलीजवळ आलो की दारूचा उग्र दर्प सुटला होता, पण आज नाम्यामुळे सर्व सहन करणे होते !

नाम्या काउंटर वर गेला, 'सेठ, काटर द्या !' म्हणत माझ्याकडे पहात होता.

मी लगोलग खिशात हात घालून पाचशे ची नोट काढली अन त्याच्या जाळीच्या बंदिस्त खिडकीतून आत ढकलली. 

'सुट्टे दे रे !' आतला मनुष्य तावाने बोलला...

'किती ?' मी बोललो,

'पंचेचाळीस दे !' तो म्हणाला,

पाचशे ची परत घेत त्याला पन्नास ची दिली.

पाच परत देण्याऐवजी त्याने एक फुटाण्याचे पाकीट फेकले, ! 

नाम्याने ते परत देत दोन पाणी पाऊच घेतले ! 

माझ्यासाठी सर्व नवीन होते ! पण त्याची जणू पीएचडी झाली असा तो वावरत होता ! 

त्याने समोरच्या नळावर एक पडलेला काचेचा ग्लास धुतला अन त्यात ती देशी ची क्वार्टर ओतली ...! ....पूर्ण ...!!! 

अर्धा पाणी पाऊच दाताने फोडून ओतला अन ग्लास तोंडाला लावला ! 

डोळे बंद, नरड्यातला मणी खालीवर करत अर्धा ग्लास त्याने हापसला ...

अर्धा रिचवल्यावर थांबला अन जवळ पडलेल्या मिठाच्या वाटीतून चिमूटभर मीठ घेऊन यज्ञात फेकावे तसे तोंडात फेकले, तोंड कसेतरी करत डोळे उघडून मला बोलला, 'मग, काय चाललंय तुझं ? काय करतोस ?'

'आपली नौकरी अन दुसरं काय ?' 

'बरंय मर्दा तुह्यासारखं मोहं नशीब कुठं' नाम्या उदगरला.

'बरं म्हातारं, म्हातारी कशी हाइत ?' लगेच विषय बदलत तोच बोलला.

'बरे आहेत, आता आम्ही सगळे भाऊ, आई वडील इथेच एकत्र राहतो.' मी म्हणलो...

मान हलवत त्याने समाधान व्यक्त केले.

'आई कशी आहे? तू इकडं कधी आला ?' मी त्याला विचारलं.

उरलेला अर्धा ग्लास त्याने उचलला अन एका झटक्यात रिचवला, मिठाची चिमूट तोंडात टाकली अन माझ्या खांद्यावर हात टाकत,

 मला बाहेर घेऊन आला.

खिशातून गायछाप काढली, डाव्या हातावर तंबाखू टाकून पुडी खिशात ठेवली, 

चुना डब्बी काढली डब्बीतून अंगठ्याच्या नखाने चुना काढून तंबाखूवर लावला अन तंबाखू चोळू लागला, 

तंबाखू चोळता चोळता बोलू लागला.

'माय गेली ! 

आठ वरीस झालं ! 

लगीन झालं अन पणोती लागली, 

दोन एकरात पोट कसं भरणार?

 इथं साडू राहतू त्येच्या वळखीनं काम धंदा करायसाठी इथं आलो. हाताला मिळण ते काम करतु.'

'मुलं किती आहेत ?' मी म्हटलं,

'मुक्ता अन सोपान दोघंच हाइत.' नाम्या उत्साहाने बोलला ,...

'त्यायची माय वरीस झालं, भांडण करून माहिरी गेली.' नाम्या तंबाखू चघळत  बोलला.

'पण मर्दा, माही मुक्ता लय हुशार हाय, लय समजदार पण हाय, सगळा सैपाक करती, सोपानचं समदं आवरती, त्येचा अभ्यास घेती, अन स्वताचा अभ्यास करून वर्गात नेहमी पयली येती, लय गुणाची हाय माही मुक्ता.' भावुक होत तो बोलत होता.!

थोडा झिंगल्यासारखा वाटत होता ! पण मुलीचं कौतुक तोंडभरून करत मात्र थकत नव्हता.

'हाडळणीच्या पोटी जलमली माही मुक्ता पण तिची उलीशिक पण सावली पडली नाय तिच्यावर !' नाम्या बोलला.

बायकोबद्दल भयंकर राग अन मुलीबद्दल अत्यंत कौतुक असा संगम त्याच्या बोलण्यात होता !

'कितव्या वर्गात आहे रे ती ?' मी बोललो.

'नववीत हाय पण दहावीची पुस्तकं खाडखाड वाचती ती ! तिच्यासाठी म्या कायपण करणं पण तिला लय शिकवण अन मोठी सायब बनविनं !' बोलतांना त्याचे डोळे थोडे पाणावले.

'असं दारू पिऊन तिचं भविष्य कसं घडवशील तू ?' मला न राहवून मी बोललो.

'त्या अवदसामूळं लागली रं दारुची सवय !' नाम्या सयमाने बोलला...

'ती गेली पण तुझी सवय तशीच राहिली ना ! ती गेली ना आता तर तू पण दारू सोडून दे अन 'मुक्ता-सोपान' कडे लक्ष दे ! 

इथलं शिक्षण खूप महाग आहे रे राजा !' मी बोललो.


तितक्यात त्याला लांबवर त्याची मुलगी शाळेतून परत येतांना चौकात दिसली, 'मुक्ता आली शाळेतनं!' मला ये म्हणत तो तिच्याकडे आवाज देत धावला.

मी गाडी वळवून चौक ओलांडून तिच्या जवळ गेलो. अतिशय गोड मुलगी होती. 

नाम्याने ओळख करून दिली, मी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवत तिच्या शाळेबद्दल अन अभ्यासाबद्दल चौकशी केली, बोलण्यात अगदी चुणचुणीत होती, प्रश्नांची पटापट उत्तरे देत होती अन नाम्याच्या चेहऱ्यावर त्याचे समाधान अन तिचे कौतुक दिसत होते !

गरिबी असूनही अगदी टापटीप दिसत होती,

तिच्या पाठीवर अडकवलेल्या दप्तराकडे माझे लक्ष गेले, अनेक ठिकाणी सुईदोऱ्याने शिवलेले अन झिरझिर झालेले दिसत होते, मला राहवले नाही. मी तिला चल म्हणून हाताला धरून बाजूलाच एका स्टेशनरी वर नेले, दुकानदाराला दप्तर दाखवा म्हणटले. 

त्याने चार-पाच प्रकारची दप्तरे दाखवली.

एका दप्तरावर तिची नजर खिळली, 

'Sky bag' लिहलेलं होतं त्यावर !

'हे आवडलं का तुला ?' मी दप्तरावर हात ठेवत तिला बोललो.

'नाही काका, मला काही नको !'

 ती नाम्याकडे बघत बोलली.

मी तिला बऱ्याच विनवण्या केल्या पण ती काही सांगेना. मी नाम्याकडे पाहिलं !

'आपलेच काका आहेत घे !' नाम्या म्हणाला...

मी ते दप्तर उचललं अन तिच्या हातात दिलं. 

'हे नको काका, हे खूप महाग असतं .' मुक्ता म्हणाली..

'असू दे गं, तुझ्या आनंदापुढं खूप स्वस्त आहे.' ....

'पण तुला कसं माहित कि हे महाग आहे ? मी म्हटले..

'

'आमच्या वर्गात दोन तीन मुलींकडे आहेत अशा बॅग, महाग महाग म्हणून मिरवत्यात त्या !' मुक्ता काहीश्या द्वेशाने बोलली..

'आता उद्यापासून तू पण मिरवायचं !' मी हसून बोललो. 


सोपानसाठी अन मुक्तासाठी चॉकलेट घेऊन दुकानदाराला पैसे दिले अन मुक्ताला घरी जाण्यास सांगून मी पुन्हा नाम्याकडे मोर्चा वळवला.

' बघ नाम्या, तुझ्या मुक्ताला माहित होतं की ते दप्तर महाग आहे म्हणून जुनं दप्तर शिवून शिवून ती वापरत होती अन तिला मी घेऊन देत होतो तरी ती महाग आहे म्हणून नको म्हणत होती, वर्गातल्या मुली तिच्या फाटक्या दप्तराला पाहून हसत असतील पण तिने तुला कधीच काहीच सांगितलं नसेल. ती एवढी समजदार आहे की स्वतःच्या भावना मनातच दाबून आपल्या मोलमजुरी करणाऱ्या बापाला त्रास होऊ नये म्हणून आपलं मन मारते, सगळं घर सांभाळते, 

अन तू असा..?

 दारू सोडू शकत नाहीस तू ? दारू पिणाऱ्याला तर कारणच लागते पण तुझ्याकडे दारू सोडण्यासाठी कारण आहे, 'मुक्ताचं भविष्य' !!' मी माझ्यापरीने त्याला ज्ञानबीडी पाजून मोकळा झालो.

नाम्या ढसाढसा रडत होता, मी त्याच्या पाठीवर हात ठेवला.

नाम्याला गोष्ट पटली होती अन त्याने माझ्यासमक्ष निर्धार केला की या क्षणापासून दारू सोडणार !

पण दारुड्याचं काय खरं असत, आज सोडली अन उद्या धरली ! 

पण बालमित्र असल्याने त्याच्यावर विश्वास टाकत मी त्याचा निरोप घेऊन निघालो.

या घटनेला तब्बल एक वर्ष उलटलं आज ! 


आज सकाळीच मुक्ता, त्याच चौकात एका ATM जवळ भेटली, 

खूप आनंदी होती, कालच तिचा दहावीचा गणिताचा पेपर झाला होता अन ती मोठ्या आत्मविश्वासाने नव्वद टक्के पेक्षा जास्त मार्क मिळतील असे सांगत होती.

कुठेतरी जाणार होती, मैत्रिणीची वाट बघत होती.

"काका , THANK YOU बरं का ! 

" मुक्ता मला बोलली.


कदाचित दप्तरासाठी म्हणत असावी पण उत्सुकता असल्यानं, "कशाबद्दल गं ?" मी बोललो.

'तुमच्यामुळं बाबांनी दारू सोडली, आता घरी लवकर येतात, आमच्याबरोबर जेवतात अन आई पण परत आली अन मला अभ्यासासाठी खूप वेळ भेटला त्यामुळं माझा खूप अभ्यास झाला !' मुक्ताच्या

डोळ्यात खळकन पाणी आलं,   एवढ्यात मुक्ताची मैत्रीण तिथे  आली,तीने स्वताःला सावरत , माझा निरोप घेऊन निघाली, माझ्या ही  पाण्याने भरलेल्या डोळ्यातून तिची पाठमोरी आकृती दूरवर जातांना अस्पष्ट दिसत होती,

 तिचा 'Thank You' माझ्या हृदयावर कायमचा कोरला गेला,

 छाती फुगल्यासारखी वाटू लागली. 

कधी नव्हे तो आज माझाच मला अभिमान वाटत होता ! कधीनव्हे ते माझ्या डोळ्यातून आलेले अश्रू हाताने पुसत घराकडे परतलो !

आज ज्ञानबिडीतून खरोखर धूर निघाला होता ....!!!😃



_संकलन_

*_प्रा. माधव सावळे_*


Thursday, October 17, 2024

आत्मशांती

 


         *ध्यानाने आत्मशांती*


    ध्यान हे मनाच्या अस्थिरतेने साधत नाही. अशावेळी पुनःपुन्हा आपल्या मनाची समजूत घालावी. मनाशी बोलावे. आपण स्वतः च्या शरीराशीसुध्दा बोलत नाही. ते बोलणे म्हणजे ध्यान आहे. इतरांपैकी काहीशी नीट वागतो, काहीशी नीट वागत नाही. पण स्वतःशी तरी नीट वागायला हवे ना?  त्याचेच नाव ध्यान आहे. देहात असताना तरी शरीर हा तुमचा अखेरचा आसरा आहे. त्याला सुद्धा वळवून घेण्याची तुमची ताकद नसली, तर  तुमच्या  जीवनात अर्थ तरी कोणता उरेल? उलट, ध्यानासाठी शरीराशी संवाद साधण्यास तुम्ही रोज उत्सुकतेने बसले पाहिजे. या कल्पनेचा नवा आनंद तुम्हाला खुपच सुखवील. दुसऱ्या बाजूने, ध्यानात तुम्ही अतिशय गुंगून गेलात, तरी तो अतिरेक ठीक नव्हे. फार बेभान झालात तर कोणाला तरी कानात ' हरि ॐ' करण्याची सूचना देऊन ठेवा.

   

     अनुभवानेही तुम्हाला काही जुळवणूक करुन घेता येईल. योग्य ज्ञात्याचे मार्गदर्शन मिळाले तर अवश्य मिळवा. कोणावर तरी श्रध्दा ठेवून, मोठमोठी नावे आणि भपके पाहून, वैराग्याचे देखावे पाहूनही,  अनेकांनी चुकीच्या ध्यान प्रक्रिया केल्या कालांतराने त्यांचे नुकसान झाले. येथे सांगितलेली सर्व पध्दत, एका मर्यादेपर्यंत पूर्ण कारणे देऊन सांगितलेली आहे. तुमच्या बुद्धीला पटवीत पटवीत शक्ती मिळविण्याची ही एक स्वावलंबी प्रक्रिया आहे. नीट समजावून घेतली तर धोक्याचा प्रश्न उरत नाही. *थोडेसे त्याग पथ्य, थोडेसे चिंतन पथ्य निश्चयपूर्वक केले तर तुम्ही* *व तुमचे कुटुंब सुखाच्या शिखरावर जाल*


 ‌.    जगातील सुखे तुम्ही जिंकाल पण ती  सुखे तुम्हाला जिंकू शकणार नाही. अशी एक गोड अवस्था तुम्हाला प्राप्त होईल. एक अनुपम आनंद घेऊन पहा.




आपलेपणा

 भगवंताला बांधून ठेवायला उत्तम मार्ग कोणता तर "आपलेपणानी" . आपलेपणा म्हणजे ममत्व. ममत्व माझेपण मीचा विस्तार. म्हणजे माझं घर माझी माणस माझा देह. ममत्व म्हणजे माझेपण तर माझं ही षष्ठी भक्ती आहे. 

माझं म्हणजे माझं ममत्व त्यावर आहे. माझी मालकी त्यावर आहे. मग आपलेपण म्हणजे प्रेमानी भगवंतावर स्वामित्व गाजवणे हे आहे. 

भक्त म्हणतो "अरे माझ्याशिवाय तू जाशील कोठे ?"  पू.श्री निळोबाराय, तुकाराम महाराजांचे शिष्य म्हणाले " तुझ्या नामाच्या चिंतनाने तुला मी स्वाधीन केलं आहे." श्री.गोंदवलेकर महाराज म्हणाले भक्त जर प्रेमाचा जोर करायला लागला तर एखादेवेळी परमात्मा पळून जातो कोठेतरी. मग त्याला जाण्याची इच्छा होऊ नये किंवा जाण्याला अडचण पडावी म्हणून भक्त त्याच्या गळ्यात नामाचे लोढणं बांधतो.

 त्यामुळे तो धरला जातो. ज्ञानामध्ये सुध्दा मी पणा द्यावा लागतो. तो मी पणानी नाहीसा होतो, पण परमात्मा तसाच राहतो. भक्ती मध्ये परमात्मा तुमचा मी पणा गिळतो पण त्यावेळी तो मानवी रूप धरून जीवनात शिरतो.

 तुमच्या भक्तीचा रस घेण्याकरिता तो माणूस बनतो. भक्तीमध्ये जे आपलेपण आहे ते इतर कुठेही आढळत नाही.

Wednesday, October 16, 2024

विरक्ती

 *सुवैर असो अथवा सुतक आपण श्वास घ्यायचे थांबवतो का? नाही ना?*


*ll श्रीराम जयराम जय जय राम ll*


आपले मन राम नाम जपामुळे एकाग्र होवू लागते, प्रपंचापासून थोडी थोडी विरक्ती येवू लागते आणि मग एकदा का ह्या राम नामस्मरणाची गोडी लागली कि मग काय विचारता, ब्रम्हानंदी टाळी लागते जणू आणि मन आपोआप शांत होते. 

मनाची हि अवस्था जेव्हा प्राप्त होते तेव्हा जपास कुठलीच माळ घ्यायची गरजच उरत नाही. राम नाम आणि देवता आपल्या श्वासावर जणू विसावते आणि म्हणूनच त्यानंतर जपास जर माळच घ्यायची झाली तर ती फक्त *“श्वासाची माळ”* घ्यायची म्हणजेच श्वासागणिक जप झाला पाहिजे. नामातून लागते ती समाधी आणि समाधी अवस्थेतून मिळते ते पराकोटीचे समाधान.             

जप करताना म्हणूनच ही "श्वासाची माळ". मग सुवैर असो अथवा सुतक आपण श्वास घ्यायचे थांबवतो का? नाही ना? प्रत्येक श्वासागणिक जप झाला पाहिजे पण आपण आपले कुठलेही नित्य कर्म करत असू , अगदी भांडी घासताना, कपड्यांच्या घड्या घालताना, प्रवासात, काहीही काम करताना जसा श्वास चालू असतो त्याच प्रमाणे आपले राम नामस्मरण सुद्धा चालू असले पाहिजे. हे कठीण वाटेल पण अशक्य नक्कीच नाही. ह्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी होतात. आपण कमी बोलून जास्ती विचार करायला लागतो, राग शांत होतो, मनाची एकाग्रता आणि परिपक्वता वाढते. आपल्या तोंडूनही कुणास वाईट बोलले जात नाही, मन शांत होते आणि नामाकडे कल वाढू लागतो. 

मनात मग सतत एकच विचार रुंजी घालू लागतो... “ हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा ...”


*ज्याच्यावर भगवंताची कृपा आहे त्याच्या मुखात नाम येते. अखंड नामात राहणे यालाच मोक्ष म्हणतात.*


!! श्री महाराज !!


!!श्रीराम जयराम जय जय राम!!

!!श्रीराम जयराम जय जय राम!!

!!श्रीराम जयराम जय जय राम!!

!!श्रीराम जयराम जय जय राम!!


          !! श्रीराम समर्थ!!

Tuesday, October 15, 2024

कर्तव्यतत्पर

 *॥श्रीहरिः॥*


देह टाकणार्‍याला मोक्ष प्राप्त व्हावा, भगवतांची प्राप्ती व्हावी, जीवन उन्नत व्हावे म्हणून त्याने काय करावे, हे भगवंत आता सांगतात. 

॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

अथश्रीमद्भगवद्गीता अष्टमोध्यायः


*तस्मात्सर्वेषु कालेषु*

*मामनुस्मर युध्य च ।*

*मय्यर्पितमनोबुद्धि-*

*-र्मामेवैष्यस्यसंशयम् ॥*

*॥८.७॥*

(दैनंदिन श्रीमद्भगवद्गीता अध्याय आठवा अक्षरब्रह्मयोग ८.७) 


*भावार्थ:- म्हणून तू सर्वकाळी माझं स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर (कर्तव्यतत्पर रहा). संशयरहित होऊन तू मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण केलीस म्हणजे तू नि:संशय मलाच प्राप्त होशील.*


*इथे भगवंताचे नित्य चिंतन, भगवंताचे नित्य नामस्मरण किती महत्वाचे आहे हे विशद केले आहे.*

हा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे.

इथे भगवंत कर्मही करायला सांगत आहेत आणि भक्तीही करायला सांगत आहेत. 

*सर्वप्रकारच्या* अंतकाळी माझं स्मरण ठेव! अर्थात विचार करताना, काम करताना, जेवताना, झोपताना, प्रवास करताना,संकल्प करताना, विकल्पाला तोंड देताना, सुखात- दु:खात - अशा सर्वकाळी माझं स्मरण ठेव!

*भगवद्गीतेत* संसार सोडून केवळ भक्तीच प्रतिपाद्य आहे असा समज असणाऱ्यांनी या श्लोकाकडे विशेष लक्ष द्यायला हवं. भगवंतांनी त्यांचं स्मरण ठेवतानाच *'युद्ध कर'* असं म्हटलं आहे. म्हणजेच माझं स्मरण करताना कर्म मुळीच सोडू नकोस, असाच अर्थ होतो. किंबहुना कर्मात माझंच अधिष्ठान (जाणीवपूर्वक स्मरण) ठेव, असं ते सुचवतात.

भगवंत गीतेतून केवळ भक्ती सांगत नाहीत आणि केवळ कर्मही सांगत नाहीत. कर्म करत करत भगवंताचं स्मरण ठेवणं आणि उत्तरोत्तर कर्म करत असतानाच मन आणि बुद्धी त्याला अर्पण करणं (मन-बुद्धी माझी आहे हा अहंभाव सोडणं) हे साधलं पाहिजे. तरच असा पुरुष भगवंताला प्राप्त होऊ शकतो. 

*म्हणजे* विहित कर्म केलंच पाहिजे.परंतु प्रत्येक कर्म करताना भगवंताला साक्षी ठेवून ते केलं पाहिजे. मग पुढचा मार्ग भगवंतच दाखवतील.

*एकेका* इयत्तेतूनच माणसानं वर गेलं पाहिजे. मन-बुद्धी भगवंताला अर्पण करायची म्हणजे नेमकं काय करायचं, असा प्रश्न प्रारंभीच उपस्थित करता कामा नये. 


प्रथम आपलं विहित कर्म निरलसपणानं,निरपेक्षभावानं पार पाडत जावं. ते करतानाच भगवंताचं चिंतन सुरू करावं. चिंतन करता करता चिंतनाचा आणि भगवंतासाठी केलेल्या निष्काम(कर्माचा) कालावधी वाढवत नेला पाहिजे; आणि मग असं कर्म करता करताच तिन्ही त्रिकाळ त्याचं नाव घेणं (नामस्मरण) साधलं पाहिजे. उघडपणे नाम घेतलं नाही तरी चालेल. मनातच भगवंताच्या नावाची आंदोलनं निर्माण झाली पाहिजेत.नाम श्वासावर स्थापित झालं पाहिजे. नाम घेणं ही केवळ भौतिक क्रिया नाही; तर भगवंताचं जीवाबरोबर चोवीस तास असणं आणि प्रत्येक कर्म त्याच्याच शक्तीमुळे सिद्ध होत आहे, हा भाव वृद्धिंगत करणंही महत्त्वाचं आहे. 

असं आत्यंतिक प्रेमानं जर नाम घेणं साधलं तर त्याचं प्रतिबिंब आपल्या कर्मातही निश्चितच उमटेल.

*अंधारात* बॅटरी वीस फुटापर्यंतचाच मार्ग दाखवते. पण वीस फूट चालून गेल्यावर पुढचा वीस फूट मार्गही ती प्रकाशित करायला चुकत नाही. आपण भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे नाम-कर्म करून काही पल्ला गाठला तर पुढचा मार्ग तोच प्रकाशित करील. आपली पावलं मात्र भगवंताच्या मार्गावरूनच पडली पाहिजेत! 

लहान बाळ जेव्हा चालायला लागतं तेव्हा ते अडखळत दोन पावलं टाकतं. ते मध्येच पडायला लागलं की आई धावत जाऊन त्याला सावरते. त्याप्रमाणे कशी का होईना, आपण भगवंताच्या दिशेनं दोन पावलं वर सांगितल्याप्रमाणे टाकली पाहिजेत. 

आपण अडखळलो तर भगवंत धावत येऊन आपल्याला हात देईल हे निश्चित! संशयरहित होऊन आपण भगवंताला मन-बुद्धी अर्पण करून निश्चिंत झालो तर नि:संदेह त्याला प्राप्त होऊ.

*सारांश:* 

*भगवंतानी सांगितल्यानुसार माणसानं प्रथम कर्म केलं पाहिजे. ते करता करता भगवंताचं चिंतन साधलं पाहिजे. चिंतन मनातच केलं पाहिजे.कारण भक्ती ही आंतरिक बाब आहे. बाहात: दाखविण्याची बाब नाही! ते साधलं तर पुढचा मार्ग भगवंतच दाखवील.*


गीताशास्त्र श्रीमद्भगवद्गीता भाष्य. 



*।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।*

Monday, October 14, 2024

माणूस

 *माणूस* 😇 

शहरातील एका चर्चित दुकानात लस्सी ची ऑर्डर देऊन आम्ही सर्व मित्र-मंडळी आरामात बसून एक दुसऱ्याची चेष्टा मस्करी करीत होतो‌. तेवढ्यात 70-75 च्या वयाची म्हातारी स्त्री पैसे मागत माझ्यासमोर हात पसरवून उभी झाली.

तिची कंबर वाकलेली होती, चेहऱ्याच्या सुरकुत्यांमध्ये भूक तरंगत होती.


डोळे खोल गेलेले पण पाणीदार होते. तिला बघून मनात न जाणे काय आले की मी खिशातून पैसे काढण्यासाठी घातलेला हात परत घेऊन तिला विचारले, "आजी लस्सी पिणार का?"

माझ्या असे विचारण्यावर आजी कमी आणि माझे मित्र जास्त अचंबित झाले.


कारण जर मी तिला पैसे दिले असते तर फार तर 5 किंवा 10 रुपये दिले असते पण लस्सी तर 25 रुपयाला एक होती.

 

आजी ने संकोचून "हो" म्हटले व आपल्या जवळ जे मागून जमा झालेले 6-7 रुपये होते ते आपल्या कापऱ्या हातांनी माझ्यासमोर धरले. मला काही समजले नाही म्हणून मी तिला विचारलं, "हे कशासाठी?"


"यात मिळवून माझ्या लस्सी चे पैसे भरून द्या बाबूजी !"


भावुक तर मी तिला पाहूनच झालो होतो... राहिलेली कसर तिच्या या वाक्याने पूर्ण केली.


अचानक माझे डोळे भरून आले आणि भरल्या गळ्याने मी दुकानदाराला एक लस्सी वाढविण्यास सांगितले... आजीने आपले पैसे परत आपल्या मुठीत बंद केले व जवळच जमिनीवर बसली.


आता मला आपल्या लाचारीचा आभास झाला कारण मी तेथे उपस्थित दुकानदार, आपले मित्र आणि इतर बऱ्याच ग्राहकांमुळे तिला खुर्चीवर बसायला सांगू शकलो नाही.


कोणी टोकणार तर नाही याची मला भिती वाटत होती...... की एका भीक मागणाऱ्या म्हाताऱ्या स्त्री ला त्यांच्या बरोबरीने बसवण्यावर कुणाला आपत्ती न व्हावी... पण ज्या खुर्चीवर मी बसलो होतो ती मला चावत होती......


लस्सी ग्लासात भरून आम्ही सर्व मित्र आणि म्हाताऱ्या आजीच्या हातात येताच मी आपला ग्लास घेऊन आजीच्या जवळच जमीनीवर बसलो. कारण असे करण्यास मी स्वतंत्र होतो.... यावर कुणाला आपत्ती असण्याचे कारण नव्हते.... हां!


माझ्या मित्रांनी एक क्षण माझ्याकडे निरखून पाहिले... पण त्यांनी काही म्हणण्या अगोदरच दुकानाच्या मालकाने पुढे येऊन आजीला उठवून खुर्चीवर बसवले आणि माझ्याकडे हसत बघून, हात जोडून म्हणाला,


*"वर बसा साहेब! माझ्याकडे ग्राहक तर भरपूर येतात परंतु माणूस कधीतरीच येतो !*

                 

*आपण सर्व माणूस होऊया...*


_संकलन_

*_प्रा. माधव सावळे_*



Sunday, October 13, 2024

सूक्ष्म

 

                    श्रीराम,

            हजारो मैल लांब असलेल्या व्यक्तींच्या मनातील विचार ओळखण्यासाठी किंवा उर्जा पाठवण्यासाठी आपण प्रयत्न करतो पण 'रिता ठाव या राघवेवीण नाही 'असा सृष्टीतील सूक्ष्मातील सूक्ष्म अणुरेणू मध्ये असलेला आनंदस्वरूप भगवंत माझ्याही अंतर्यामी आहे. त्याला कनेक्ट होण्यासाठी कुठेही हजारो मैल लांब न जाता फक्त अंतर्मुख व्हायचे आहे व त्यासाठीच हजारो वर्षापूर्वी आपल्या संतांनी मानसपूजा सांगितली आहे. 

                अंतर्यामी असलेल्या भगवंताशी टेलीपथीने जुळल्यावर अनंत फायदे होतात. अगदी थोडक्यात आणि महत्वाचे म्हणजे १)त्याचे सत् चित् आनंद स्वरूप जे आपल्या आतच आहे ते प्रगट होते. २)तो तर अखंड शाश्वत चैतन्य स्वरूप आहे, त्याच्या पुढे आपण त्याचा एक सूक्ष्म अंश आहोत. त्याची उर्जा आपल्या अंतरी आहेच. ती सतत प्रगट होते. ३)प्रेम स्वरूप भगवंताप्रमाणे आपल्या अंतर्यामी प्रेम प्रगट होते. ४)भक्तीच्या पोटी ज्ञान असते.. म्हणून ईश्वराची भक्ती करुन ज्ञान प्रगट होते. 

                          ||श्रीराम ||

Saturday, October 12, 2024

उपाधि

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*🌺श्रीगोंदवलेकर महाराज फार खुबीनं सांगतात, ' सत्य वस्तूला उपाधि फार असते पण मुख्य सत्य अगदी  थोडे आणि हलके असते.' भगवंत हा सत्य आहे आणि हे जग ही त्याची निर्मिती आहे. त्याची उपाधी आहे. उपाधीचा एक अर्थ आहे मानाचं पद. उपाधी म्हणजे व्यक्तीला चिकटलेले गौरवपूर्ण विशेषण वा मानाचे पद. त्या उपाधीतून त्या व्यक्तीचा लौकिक दिसतो. त्याचप्रमाणे अलौकिक भगवंताचं लौकिक रूप म्हणजे हे जग आहे.🌺*

       *🍀आपले शरीर एवढे मोठे असते, पण आपला जीव किती लहान असतो ! त्याचप्रमाणे भगवंत अगदी लहान आहे. हे एवढे मोठे जग ही त्याची उपाधि आहे.' आपलं शरीर मोठं असतं पण जीव लहान असतो ! जो आहे म्हणूनच केवळ आपण आहोत तो 'जीव' दिसत नाही, पण हे शरीर दिसतं. त्याचे अवयव दिसतात. रंगरूप दिसतं. अगदी त्याचप्रमाणे भगवंत आहे म्हणून जग आहे. हा सूक्ष्म भगवंत दिसत मात्र नाही. त्याच्या आधारावर असलेलं हे विराट दृश्य जग मात्र दिसतं. त्या न दिसणाऱ्या भगवंतालाही काहीजण मानत असतात.🍀*

        *🌻महाराजही सांगतात की, 'देव आहे' असे खऱ्या अर्थाने समजून वागणारे जगामध्ये फार थोडे ! याचाच अर्थ देव आहे म्हणजे काय, हे समजून घ्यावे आणि त्यानुसार जगावे, हीच श्रीमहाराजांची इच्छा आहे.🌻*

*||श्रीराम जय राम जय जय राम||*

Friday, October 11, 2024

परमार्थ

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*पू.श्री.तुकाराम महाराज यांच्या बाबतीत श्री.गोंदवलेकर महाराज असं म्हणाले " जळती शेगडी उरावर घेऊन त्यांनी परमार्थ केला." असे आहे की मनुष्य परमार्थाला लागला की निराळा बनतो. त्याच्या वागण्यात फरक जाणवायला  लागतो. घरातील माणसं, नातेवाईक नाव ठेवायला लागतात. श्री.तुकाराम महाराजांना त्यांची बायको "आमचं येडं" म्हणायची. पण हे सर्व सोसून त्यांनी साधना केली. त्यांची खरी परीक्षा मंबजीच्या बाबतीत झाली. तुकाराम महाराजांची शिष्या बहिणाबाई देहूला आल्या होत्या. त्यांच्या बरोबर त्यांची  गाय आली होती. ती गाय मंबाजीच्या बागेत शिरली, त्याने तिला बांधून ठेवले व मारले. एकदा त्याचे वळ तुकारामांच्या पाठीवर आले. ते गाय सोडवायला गेले तर मंबाजीने त्यांना खूप मारले.शिविगाळ पण केली. पण यांची शांती ढळली नाही. ते अभंगात म्हणतात "तुका म्हणे क्रोधा हाती | सोडवूनी घेतले रे || राग केव्हा येतो अहंकार असेल तर. अहंकार ज्याला नाही त्याला राग येणंच शक्य नाही. विठोबाने त्यांना क्रोधा हातून सोडविले. मग या मंडळीना आपल्या गुरूचा, आपल्या देवतेचा अहंकार असतो. श्री.महाराजांचे वाक्य आहे " माझा ठेवावा अभिमान"  सद्गुरूचा अभिमान धरणं हा निराभीमानच आहे. परमार्था  मध्ये अभिमान कसला तर "आम्ही भगवंताचे भूषावया लागी." मी आमक्या देवतेचा भक्त आहे. हे माझे गुरू आहेत. मी अमक्याचा शिष्य हे सांगण्यात अभिमान असतो.*

*||श्रीराम जय राम जय जय राम||*

Thursday, October 10, 2024

तापा

 चिंतन 

              श्रीराम,

          सगळ्या तापांचा त्रास जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत सगळ्यांना होणारच आहे. हे ताप म्हणजे आपल्या प्रपंचातील मार्गावरचे न टाळता येणारे खाचखळगे, खड्डे असतात. सर्वोत्कृष्ट असलेली नामस्मरणाची गाडी जर आपल्या कडे असेल तर कितीही खड्डे वा खराब रस्ता आला तरी त्यांचा त्रास होत नाही. कारण भगवंताचे नाम आपल्याला वरच्या वर झेलत असते. ती गाडी चालवण्याची कला योग्य गुरुंकडून शिकली की मार्गात कितीही खड्डे असले तरी त्यावरून गाडी सफाईदार चालवता येते.

                     प्रश्न असा येतो की नामस्मरणाचे महत्त्व कळते, समजते पण आचरणात मात्र आणता येत नाही. मग नामस्मरणात मन एकाग्र होत नसेल, त्याची गोडी लागत नसेल तर संत आपल्याला मानसपूजा करावी असे सांगतात. त्याने मन एकाग्र व्हायला मदत होते.

                ईश्वराजवळ जाण्यासाठी 'मानसपूजा' हा भक्तीमार्गातील खूप महत्वाचा पूल आहे.

                          ||श्रीराम ||

Wednesday, October 9, 2024

स्मृती

 स्मृती म्हणजे साठवण. साठवण म्हणजे सगळं चांगले वाईट आले. आपली स्मृती आपण जर अशी ठेवली उगाच दुसऱ्याच्या कटकटी दुसऱ्याचे वाईट काढून काय करायचे आहे. आपण आपल्या स्मृतीला असं वळण दिल की भगवंत आहे तो माझा रक्षणकर्ता त्याच्या सहवासात जे सुख आहे ते कशात नाही तर तो मनुष्य वेडा होऊन जाईल. एक निजामपुरकर बुवा  नावाचे प्रसिद्ध कीर्तनकार होते. ते किर्तनसम्राट श्री.नानाबुवा बडोदेकर यांचे शिष्य होते. त्यांचे एकदा श्रीमहाराजां पुढे किर्तन झालं. हे बुवा श्री.नानाबुवां सारखे ' राजाराम राजाराम ' म्हणत असत. त्यांना श्री.बेलसरे यांनी विचारले की "तुम्ही सारखे राजाराम राजाराम का म्हणता ?" तर ते म्हणाले ' मला असा सारखा भास होतो की प्रभू रामचंद्र लंकेहून  आलेत, ते सिंहासनावर बसलेले आहे, लोक आनंदात आहेत , जिकडे तिकडे सुगंध पसरलेले आहे, प्रसन्नता तर इतकी आहे की माणसाला वेड लागेल. याने मला प्रसन्नता येते ,  राहते आणि याचा परिणाम माझ्या देहाच्या कोणत्याही अवस्थेत त्याच भान झालं की सगळं दुःख विसरून जातो." आपण असं म्हणावं माझ्या गुरूने मला नाम दिलेलं आहे , त्या नामाची,  गुरुची आठवण आपण अशी सतत ठेवावी की माझं जीवन ही त्याची देणगी आहे.याने माणसाची वृत्ती बदलून जाईल. त्याने काय होईल आपण जे नाम घेतो ते त्यांनी (गुरुं ने) दिलेले नाम घेत आहोत. म्हणजे ते आहेत. ते जर आहेत तर त्यांना आवडेल असंच आपण वागायला पाहिजे. म्हणजे त्यांच्या अस्तित्वाचा इतका अभ्यास झाला तर माणसाला बदलायचं कारणच राहणार नाही.

Tuesday, October 8, 2024

भगवंत

 *॥श्रीहरिः॥* 


भगवंत पुढे म्हणतात, 


'मृत्यूच्या वेळी देहत्याग करताना जो भाव मनात असेल, त्या भावालाच मानव प्राप्त होतो, हे अतिशय महत्वपूर्ण विधान भगवंतांनी केले आहे.'

॥ॐ श्री परमात्मने नमः ॥

अथश्रीमद्भगवद्गीता अष्टमोध्यायः


*यं यं वाऽपि स्मरन्भावं*

*त्यजत्यन्ते कलेवरम् ।*

*तं तमेवैति कौन्तेय* 

*सदा तद्भावभावितः ॥*

*॥८.६॥*


(दैनंदिन श्रीमद्भगवद्गीता अध्याय आठवा अक्षरब्रह्मयोग ८.६) 


*भावार्थ :- हे कुंतीपुत्र अर्जुना ! आपल्या देहाचा त्याग करीत असताना, मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो, त्या त्या भावाची तो निःसंदेह प्राप्ती करतो.* 


भगवान श्रीकृष्ण पुन्हा आपलं म्हणणं स्पष्ट करताना सांगतात, की 


'मृत्युसमयी माझं चिंतन करून जो देहाचा त्याग करतो, तो माझ्या दिव्य स्वभावाला प्राप्त होतो. अंतःकाळी मनुष्य ज्या भावनेने प्रेरित होतो, त्यालाच तो प्राप्त होतो. मग तो भाव पशुत्वाचा असो किंवा देवत्वाचा.'


*"तुम्ही जसा विचार कराल, तसेच बनाल."*

मनुष्याला प्रत्येक क्षणी येणारे विचार हे त्याच्या पूर्वसंस्कारांमुळेच येत असतात. साहजिकच, जो संपूर्ण आयुष्य मायेच्या आकर्षणापासून स्वतःला दूर ठेवून,सत्यामध्ये स्थापित होण्याचा प्रयत्न करतो, त्याचे आध्यात्मिक संस्कार दृढ होतात. मनन आणि संस्कार यांच्या सातत्याच्या प्रभावामुळे मृत्यूच्या वेळीदेखील त्याची वृत्ती, ओढ सहजपणे आपल्या लक्ष्याकडेच आकृष्ट होते. परिणामी मृत्यूनंतर तर त्याची यात्रा आपल्या ठरावीक लक्ष्याच्या दिशेनेच अग्रेसर होते. 

*त्यामुळे* 

कदापि असा विचार करू नका, की 

'सध्या तरी आपण मायेचाच आनंद लुटू या, मग अंतःकाळी ईश्वराचं स्मरण करता येईल.' 


*कारण* 

आपली पुढची यात्रा ठरवण्याची संधी ही अंतिम समयी आपल्याला मिळत नाही. याचाच अर्थ, संपूर्ण जीवनात ज्या वृत्तींची आपल्याला सवय झाली आहे, त्याच वृत्ती अंतिम क्षणी मनात उफाळून येतात.

आपल्या मृत्यूचं वर्ष, दिवस अथवा वेळ कुणाला तरी ठाऊक असते का? 


*नाही ना!* 

अखंड सुरू असणारा श्वासोच्छ्वास केव्हा थांबेल, हे कोणीही जाणत नाही. त्यामुळे आता विचार बदलण्याची वेळ आली आहे, 

पण हे मनुष्याला कळणार कसं? 

*जसं,*

शाळेमध्ये कित्येकदा सरप्राइज टेस्ट घेतली जाते. त्यावेळी नियमितपणे अभ्यास करणारी मुलं परीक्षेत किमान लिहू तरी शकतात. परंतु

परीक्षेच्या एक दिवस अगोदर पुस्तक उघडून अभ्यासाची, वाचण्याची सवय असणाऱ्या मुलांना काही आठवण्याची शक्यता तरी कशी असेल ?


*जसं,* 

एक मनुष्य आयुष्यभर फक्त भांडणतंटाच करत राहतो.शत्रुत्वाच्या अग्नीतच जळत राहतो. कुणाचा बदला कसा घ्यायचा, याचेच विचार मनात सतत बाळगतो. तेव्हा मृत्यूच्या वेळीदेखील त्याचे हेच भाव कायम राहतील. परिणामी त्याचं पुढील आयुष्यही याच भावनेमुळे प्रभावित होईल. मग या जीवनामधूनच पुढील जन्म तयार होतो. प्रत्येक दृश्य हे पुढच्या दृश्याची तयारी असते. त्यामुळे आपण किती सावध, सतर्क राहायला हवं! 


*थोडक्यात,* 

आयुष्यभर भगवंताच स्मरण-चिंतन केलं पाहिजे. तरच अंतकाली परमेश्वराचं नाव आठवेल! आयुष्यभर परमेश्वराचं नाव घेण्याची सवय नसेल तर मृत्यूसमयी तरी ते कसं आठवणार?


आयुष्यभर केवळ पैशाचाच विचार केल्यावर देवाचं नाव अखेरीस तरी कुठून आठवणार? 


*उलट* अखेरीस मनच थाऱ्यावर नसतं. त्यामुळे जो भाव जोपासलेला असतो तोच भाव त्याक्षणी प्रगट होतो आणि माणूस आयुष्यभर त्याच भावाला जोडला जाऊन नवीन देह धारण करतो. जन्म-मृत्यूचं रहाटगाडगं असंच सुरू रहातं. पूर्वजन्मीचे संस्कार मग कार्यरत होतात. 


*पण* 

'जो ज्ञानी असतो तो जीवनभर शास्त्रशुद्ध रीतीनं कर्म करून अंतकाली देवाचं नाव घेऊन देह सोडतो आणि त्याला जाऊन मिळतो.' 


अंतकाळी परमेश्वराचं नाव घेऊन देहत्याग करणं हे एक रूपक आहे. एखादी ज्ञानी व्यक्ती जर कोमात गेली आणि तिला देहभानच उरलं नसेल तर ती देह सोडताना परमेश्वराचं नाव तरी कसं घेणार? 


मग ज्ञानी असूनही केवळ देह सोडताना नाव घेतलं नाही म्हणून ती परमेश्वरापर्यंत जाणार नाही? असं कसं शक्य आहे? 


*म्हणजेच*

 या श्लोकातून भगवंतांना वेगळंच काही सांगायचं आहे. त्यासाठी या श्लोकातला गूढ अर्थ जाणून घ्यायला हवा. देह सोडतानाच्या अवस्थेत व्यक्तीच्या इंद्रियांनी नाव घेण्याचं काहीच कारण नाही. तिच्या अर्धजाणीवयुक्त मनात त्याच्या कर्मांचा ताळेबंद सुरक्षित असतो.


आयुष्यभर त्या व्यक्तीनं समजपूर्वक भगवंताचं कार्य केलं असेल आणि निष्काम कर्मयोग करून भगवंतांचं नाव घेतलं असेल तर अशी ज्ञानी व्यक्ती अंतर्बाह्य शुद्ध झालेली असते. तिचा श्वास शुद्ध बनलेला असतो. भगवंताचं नाम त्या व्यक्तीच्या रोमारोमांत अगदी अर्धजाणीवयुक्त मनात भिनलेलं असतं.अर्जुनाच्या रंध्रारंध्रांतून, केसाकेसांतून कृष्णनाम ऐकू यायचं इतकं ते भिनलेलं होतं. अखेर शुद्धत्वच भगवंतापर्यंत पोचू शकतं. 


देह सोडताना जे जीवाबरोबर जाणार असतं तिथे भगवद्नाम आणि भगवद्कार्याचा ताळेबंद जोडलेला असतो (Attached file!). त्यावरूनच जीवाचा प्रवास परमेश्वरापर्यंत होणार किंवा नाही हे ठरतं. 


आयुष्यभर कुकर्मं करावीत आणि देह सोडताना परमेश्वराचं नाव घ्यावं, की पोचला परमेश्वरापर्यंत! इतकं का हे सोपं आहे? 


अशा पद्धतीनं या श्लोकासंदर्भात जे इतरत्र विचार सांगितले गेले ते पटणारे नाहीत.


*त्यामुळे* समजून-उमजून आणि निष्काम कर्म करूनच परमेश्वर विषयीचं चिंतन आपल्या रोमारोमांत भिनवलं पाहिजे. तर मग देह सोडताना केवळ तोंडानं त्याचं नाव घेण्याचं कारणच उरणार नाही. स्वतः परमात्मा आपलं आनंदानं स्वागत करील!


*सारांश:* 

*किडा सतत भ्रमराचं चिंतन करीत असतो. त्यामुळे एक दिवस तो स्वतःच भ्रमर बनून जातो! तद्वत् परमेश्वराचं अहोरात्र चिंतन आणि त्याला साधर्म्य असणारं निष्काम कर्म केलं पाहिजे. श्वासासह स्वत:ला शुद्ध केलं पाहिजे. म्हणजेच माणूस अखेरीस त्याच्याशी एकरूप होऊन जाईल. शुद्धत्वच परमशुद्धत्वाला मिळू शकतं!*


गीताशास्त्र श्रीमद्भगवद्गीता भाष्य. 

संपूर्ण भगवद्गीता - सरश्री. 


*।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।*

देऊळ

 ॥ श्रीगुरु:शरणम् ॥ 


चिंचेच्या पानावर देऊळ रचिले ।

आधी कळसू मग पाया रे ।।

देव पुजू गेले तव देऊळ उडाले ।

खेळिया सद्गुरुराया रे ।। १ ।।


पाषाणाची सांगड मृगजळ डोही ।

वांझेचा पुत्र पोहला रे ।।

दुहीतोंडी हरणी पाणी पिण्या आली ।

मुखाविण पाणी प्याली रे ।। २ ।। 


आंधळ्याने देखिले, बहिऱ्याने ऐकिले ।

पांगळ्याने पाठलाग केला रे ।।

एकाजनार्दनी एकपणे विनवी ।

हरिच्या नामे तरलो रे ।। ३ ।। 


— संत एकनाथ 


▪️अर्थ :- 


चिंचेच्या पानाइतके छोटेसे असे, आईचे "उदर". त्या उदरात "देऊळ" म्हणजे "नरदेह". त्याची रचना परमेश्वर करतो. हा नरदेह चिंचेच्या पानावर, म्हणजे आईच्या उदरात रचला जात असताना, आधी डोके तयार होते. प्रथम मस्तकाची निर्मिती केली जाते व मग इतर अवयव हळूहळू निर्माण होऊ लागतात. म्हणून आधी "कळस" म्हणजे "मस्तक" आणि मग "पाया" म्हणजे इतर सर्व "अवयव", अशी या तुमच्या आमच्या नरदेहरुपी देवळाची रचना आईच्या उदरात, म्हणजेच चिंचेच्या पानावर होते, असे एकनाथ महाराज सांगतात.


पुढे ते म्हणतात की, बालपण खेळण्यात व तरुणपण कामात निघून जाते. या देवळामध्ये म्हणजे माझ्या नरदेहात देव आहे, हे कळून तो पाहायला जाईपर्यंत, देऊळ उडून जायची, म्हणजे नरदेहात राहण्याची आपली मुदत संपायची वेळ येते. म्हणून तत्पूर्वीच, हा खेळ ज्या सद्गुरुरायाने मांडला आहे, त्या सद्गुरुला देऊळ उडण्याआधी म्हणजे नरदेह हातून निसटून जाण्याआधीच, शरण जावे. 


दोन "पाषाण" एकत्र करून बांधलेली सांगड, म्हणजे दोन जड देहांचे मिलन. अर्थात लग्न ! ते देहाशी देहाचे लावले जाते. तो देह जड असल्याने त्याला पाषाण, असे म्हटलेले आहे. आणि या दोन जड देहांचे मिलन म्हणजे पाषाणाची सांगड एकत्र झाल्यावर "मृगजळ" म्हणजे "संसार", खऱ्या अर्थाने सुरू होतो. मृगजळ ज्याप्रमाणे प्रत्यक्षात नसूनही भासते, त्याप्रमाणेच संसारही प्रत्यक्षात नसून भासत असतो. 


या संसाररूपी मृगजळात, म्हणजे खोट्या कल्पित संसारात "अहंकार"रुपी "वांझेचा पोर" पोहून जातो. म्हणजेच संसारात, सर्व काही मी केले म्हणूनच झाले, माझ्याशिवाय इथले पानही हलत नाही, हा जो मनुष्य अहंकार बाळगतो, त्याला नाथ महाराज "वांझेचा पोर" म्हणतात. या अहंकाराला आई किंवा बाप नाहीत. हा अहंकार खोटा आहे, म्हणूनच त्याला "वांझेचा पोर" असे म्हटले आहे. आणि तो अहंकार आपल्याला खोट्या खोट्या संसारातून पोहून जायला मदत करतो आहे, असे आपल्याला भासते.


पुढे ते म्हणतात, या मृगजळाच्या डोहात, "दोन तोंडांची हरणी" म्हणजे "वासना" पाणी प्यायला आली. जरी शरीराकडून प्रत्यक्षात, वाईट कृती किंवा विषयांचा उपभोग घेतला गेला नाही, तरी वासना मनाकडून वाईट चिंतन घडवते, आणि म्हणूनच "मुखाविण पाणी प्याली रे". प्रत्यक्षात एखादी व्यक्ती हरिस्मरण करत असेल, तरीही वासनेला जिंकलेले नसल्यास ती वासना त्याला, शरीराने भजनात रमत असतानाही, मनाने विषयांची गोडी चाखवतेच.


"आंधळ्याने पाहिले". आंधळे असते ते आमचे "ज्ञान". कारण ते आपल्यात सुप्तावस्थेत आहे. सद्गुरूंनी चालना दिल्याशिवाय ते ज्ञान डोळस, दिव्य होऊ शकत नाही. म्हणून आंधळा असलेला जीवही पाहू लागतो, म्हणजे ज्ञानही डोळस बनते, जर सद्गुरुला शरण गेलो तर. बहिऱ्याने ऐकिले. बहिरा म्हणजे ज्याला कान नाहीत तो.


याबाबतीत, पुराण काळातील महादेवांनी पार्वतीला मंत्र दिल्याची गोष्ट उदाहरणादाखल घेता येईल. त्यांनी जेव्हा गुह्य ज्ञान पार्वतीला एकांतात बसून सांगितले, तेव्हा ते सांगत असताना, त्यांना सतत हुंकार ऐकू येत होता. ज्ञान देऊन झाल्यावर, त्यांनी डोळे उघडून पाहिले तर, पार्वती झोपली होती. मग इतका वेळ हुंकार कोण देत होते, याचा शोध केल्यावर एका मासळीच्या पोटातील "गर्भा"ने ते ज्ञान ऐकताना हुंकार दिल्याचे कळले व त्या मासळीचे पोट फाडल्यावर "मच्छिंद्रनाथां"चा जन्म झाला. म्हणून आदिनाथ हे मच्छिंद्रनाथांचे "गुरु" म्हणून ओळखले जातात. आता, मासळीचे शरीर पाहिल्यास, त्या शरीराला कान हा अवयव नसल्याचे आढळते. तिथे फक्त स्पर्श ज्ञान आहे. मग तरीही, मासळीच्या पोटातील गर्भाने ते गुहय ज्ञान ऐकून हुंकार द्यावा, याचाच अर्थ.. आत्मज्ञान प्राप्तीसाठी बाहेरील कान या अवयवाची गरज नसून, सर्वांगाचे कान करून एकचित्ताने ते ज्ञान ऐकणे, इथे अभिप्रेत असावे, असे वाटते. 


म्हणून "बहिऱ्याने ऐकिले" याचाच अर्थ.. बाकी सगळीकडचे चित्त काढून, सर्वांगाचे कान करून, गुरूंनी दिलेला मंत्र, गुह्य ज्ञान ऐकणे.. हा अर्थ नाथांना अभिप्रेत असावा, असे वाटते. शिष्य कितीही बहिरा असला, म्हणजे आत्मज्ञान ऐकण्याच्या तयारीचा नसला, तरी सांगणारा गुरु जर ब्रह्मनिष्ठ व श्रोत्रीय मिळाला, तर बहिराही ऐकू शकतो. म्हणजे त्याच्याकडूनही उत्तम श्रवण घडते. 


"पांगळ्याने पाठलाग केला रे". इथे पांगळे आहे ते आमचे "मन". कारण मनाला पाय हा अवयव नाही. पण तरीही ते, आमच्या पायांपेक्षा कितीतरी जलद गतीने, कुठेही, केव्हाही जाऊ शकते. म्हणून पांगळे म्हणजे "मन" ते या गुरुवचनाचा पाठलाग करू लागते. 


आणि म्हणूनच "संत एकनाथ महाराज" म्हणतात की, 


¶¶ जनार्दन स्वामींच्या कृपेने, जी अनुभूती मला मिळाली, त्यावरून मी सांगतो की, जरी तुमच्याजवळ अहंकार असेल, वासना असेल, ज्ञान आहे पण ते सदोष आहे किंवा आंधळे आहे, दिव्य ज्ञान नाही, गुरूंचा बोध ऐकण्याची उत्सुकता नाही, मन सैरावैरा विषयांकडे धावत आहे... अशा सर्व परिस्थितीतही जर गुरूंनी दिलेले "नाम" जवळ बाळगले, तर तुम्ही नक्की तरून जाल. गुरुकडून हरिनाम मला मिळाले, त्या हरिनामामुळेच मी तरून गेलो. म्हणून मी एकपणाने तुम्हाला विनवित आहे की, एकचिताने सर्वांनी नाम घ्या. आणि देऊळ उडण्याआधीच, त्या देवळातील देवाची ओळख करून घ्या." 


•||👣|| जय दत्त ||👣||•

Monday, October 7, 2024

अन्नदाता

 अन्नपूर्णा!


हल्लीच्या काळात चोवीस म्हणजे तसं फार च लवकर लग्न झालं होतं तिचं. कोकणातल्या एका गावात , खटल्याच्या घरात राहत असलेली ती. माहेरी नारळी पोफळी च्या बागा, अस्सल हापूस दारात आणि घरामागे समुद्राची गाज. एकत्र कुटुंब असल्याने तिला भरपूर लोकांची सवय होतीच पण घरात लहान असल्याने स्वयंपाक घरात जायची फार वेळ आली नव्हती. 


तिचं लग्न होऊन ती गेली जवळच्याच गावात. अंतराने जवळ असलं तरी शेवटी दुसरं गाव च. इथे प्रत्येक गावाची वेगळी पद्धत. नवीन गावाहून आलेल्या मुलीला बघायला पुर्ण गाव येणार आणि बायका अगदी बारीक निरखून बघणार तिला. कोणी कौतुकाने, कोणी असुयेने तर कोणी असच मायेने. 


लग्नानंतर आलेला पहिला च सण गुढी पाडव्याचा. दोन दिवस आधी बेत ठरला. गोणीतून समान काढून झालं. आंब्यांची रास लागली. दुसऱ्या दिवशी कोणी कधी उठून काय काय करायचं याची उजळणी झाली. ती नवीन नवरी असल्याने तिला अर्थात च लिंबू टिंबू कामे दिली होती, पण ही लगबग तिला नवीन नव्हती. 


जसा पाडवा जवळ आला तशी ती वेगळ्याच चिंतेने ग्रासली. ते एकमेव कारण ज्यामुळे तिला या पंक्ती च जेवण अजिबात आवडत नसे, ते म्हणजे बायकांची पंगत बसेपर्यंत होणारी उपासमार!


लहान होती तेव्हा मुलांच्या पंगतीत तिचं जेवण व्हायचं, पण मोठी झाल्यावर तिलाही थांबावं लागायच च. सकाळपासून तयारीची गडबड, स्वयंपाक घरातल्या धुराने चुरचुरणारे डोळे, वाढताना वाकून वाकून दुखायला लागलेली कंबर याने ती अगदी वैतागून जायची. बायकांची पंगत बसायला जवळ जवळ चार वाजायचे, मग समोर यायच्या गार भजी, उरलेल्या मोडक्या कुरडया, तळाशी गेलेला रस आणि कोमट अन्न. कितीही सुग्रास असलं तरी दमल्याने, भूक मेल्याने आणि गार अन्नाने तिची खायची इच्छा मरून जायची.


तिथे तरी आई मागे भुणभुण करता यायची. इथे? भूक तर सहन होत नाही आपल्याला, मग काय करायचं? असो, होईल ते होईल म्हणत ती झोपी गेली. 


सकाळी पाच वाजता बायका उठल्या. अंगणात सडा पडला, दोन धाकट्या नणंदा रांगोळी काढायला बसल्या. सगळ्यांना चहा फिरला आणि बायका जोमाने स्वयंपाक घरात कामाला लागल्या.चटणी , कोशिंबीर, पापड, गव्हल्यांची खीर, कुरडया, भजी , कोथिंबीर वडी,बटाटा भाजी,मटकी उसळ, पोळ्या, पुऱ्या, वरण भात , रस, रसातल्या शेवया आणि नावाला घावन घाटलं. पटापटा हात चालत होते. फोडण्या बसत होत्या. विळीचा चरचर आवाज येत होता. खमंग वास दरवळत होते. 


हिने दोन चार सोप्या गोष्टी करून मदत केली.अध्येच पोहे फिरले. वाटी वाटी पोहे असे काय पुरणार? पण पोटाला आधार म्हणून खाल्ले.


बारा वाजत आले. नैवेद्याचे ताट तयार झाले. देवाचा , वास्तूचा, गायीचा, पितरांचा नैवेद्य वाढला गेला.


आता पंगती बसणार! ती तयारीत च होती. माजघर पुन्हा एकदा केरसुणी ने स्वच्छ झाले. ताटे मांडली, रांगोळ्या घातल्या गेल्या. पोरी सोरींनी लोटी भांडी ठेवली. 


मुलांची पंगत बसली. अर्धे मुर्धे खाऊन मुले उठली. तिने खरकटे काढले आणि माजघर पुसून घेतले. पुन्हा ताट मांडली, रांगोळ्या काढल्या.


आणि आतून सर्व पुरुष मंडळी आत आली. "चला सर्व अन्नपूर्णा!" आजे सासर्यांचा दमदार आवाज आला तशा सगळ्या जणी बाहेर आल्या. "बसा पानावर" ते म्हणाले.


ही गांगरली च! हे काय वेगळं च? आता पुरुष मंडळींची पंगत असते ना?


पण सगळ्या बायका जाऊन पानावर बसल्या. हिलाही सासूबाईंनी हाताने खूण केली. ही पण अवघडून एका पानावर जाऊन बसली.


आजे सासर्यांनी तिथून च सर्वांना नमस्कार केला आणि पान सुपारी ठेवली.


"आज काय आणि रोज काय, पण या अन्नपूर्णा आपल्यासाठी जेवण रांधतात आणि आपल्याला गरम जेवू घालतात. म्हणून आजचा मान त्यांचा. त्यांनी केलेले गरम अन्न आधी त्यांना मिळावे म्हणून हा खटाटोप. अर्थात तो गरम घास आधी आपल्याला मिळावा हीच त्यांची धडपड असते पण आज आपण त्यांना आग्रह करायचा. सूनबाई, तुला माहित नसेल म्हणून सांगतो" ते तिच्याकडे बघत म्हणाले "तुझी आजे सासू एकदा अशीच उपाशी पोटी चक्कर येऊन पडली सणाच्या दिवशी. तेव्हा कुलदेवी स्वप्नात येऊन म्हणाली की जी अन्नपूर्णा राबते ती उपाशी राहून कशी चालेल? तेव्हापासून प्रत्येक पंगत ही पहिली मुलांची आणि दुसरी बायकांची असते आपल्याकडे!"


ती स्तिमित राहून ऐकत होती. 


इतक्यात खड्या थरथरत्या आवाजात "वदनी कवळ घेता" सुरू झाले. "रघुवीर समर्थ" चा घोष झाला आणि जेवणं सुरू झाली. मागून मुलं, पुरुष एक एक वाढायला आली. आग्रह कर करून भजी, रस वाढला जात होता. ती अजूनही धक्क्यात च होती! गरम गरम पोटभर जेवण झालं आणि आपसूक च तिच्या तोंडून उद्गार निघाले


"अन्नदाता सुखी भव!"


- पूजा खाडे पाठक

Sunday, October 6, 2024

पाऊस

 *देवाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्याच्या कामाला लावू नका*,,********


✳️*


॥मनातला पाऊस॥


काल रात्री १ वाजेपर्यंत हवेत गारवा होता, आभाळ गच्च भरलेलं, अगदी कुंद वातावरण होतं. पण, दीड वाजता जो पाऊस सुरू झाला, त्यानं पार दैनाच करून टाकली. रात्री दीड वाजल्यापासून रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर, दुकानाच्या पायऱ्यांवर, थोडक्यात म्हणजे जिथं जागा मिळेल तिथं, भर पावसात कुडकुडत बसून राहिलेले वारकरी मी पाहतोय. त्यांना झोपायलासुद्धा जागा उरली नाही. दिवसभर पायी चालून थकून गेलेली ती माणसं तशीच बसून राहिली होती. 


अंथरूण म्हणून एखादं प्लॅस्टिकचं इरलं, उशाला एखादी पिशवी किंवा बोचकं आणि पांघरायला साधी शाल.. त्या प्लॅस्टिकच्या कागदावर संपूर्ण शरीर कुठलं मावतंय? पण, जागा मिळेल तिथं, कसलीही तक्रार न करता माणसांनी पथाऱ्या टाकलेल्या.. डोकं आणि पाय एकाचवेळी झाकलेच जाऊ शकत नाहीत अशी ती शाल.. त्यामुळे, कित्येकांचे पायांचे तळवे आणि त्यांना पडलेल्या भेगा दिसत होत्या.


पहाटे साडेतीन च्या सुमारास भर पावसातच त्यांची आवरा-आवरीची लगबग सुरू झाली. ज्यांची साठी-पासष्ठी केव्हाच उलटून गेली आहे, अशी माणसं अशा वातावरणात रात्री साडेतीन वाजता रस्त्याच्या कडेला असलेल्या सार्वजनिक नळावर आंघोळ करतात, आणि तशीच थंडीनं गारठत पहाटे दर्शनाच्या रांगेत जाऊन उभी राहतात. त्यांच्या आर्थिक परिस्थितीविषयी आपण न बोललेलंच बरं. कारण, मी पाहिलेल्या अशा व्यक्तींपैकी काही जण पंचवीस-पंचवीस एकर शेतीचे मालक होते. त्यांच्या अंगावरची तुळशीची माळ म्हणजे सोन्याइतकीच मौल्यवान. त्यामुळे, ‘जे आहे ते भगवंताचंच आहे’ अशाच धारणेनं ही माणसं जगतात. (आपण स्वत:ला पांढरपेशे म्हणवून घेण्यातच धन्यता मानतो. मग त्या पेशाचे सगळे गुणावगुण चिकटतातच आपल्याला)


पण, वारकरी होणं सोपं नाही, हे त्यांच्याकडं पाहिलं की, लगेच समजतं. वारी करणं ही गोष्टच निराळी आहे. अगदी वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं तर, वारी हे २५ दिवसांचं, ६०० तासांचं काऊन्सेलिंग सेशनच आहे. आणि, मानसशास्त्राचा पुस्तकी अभ्यास अजिबात नसलेले अनेकजण केवळ स्वसंवादातून, स्वत:करिता उत्तम वेळ देऊन, स्वत:चे व इतरांचे प्रश्न सोडवतात, हा अनेक अभ्यासकांचा अनुभव आहे. 


कोणती गोष्ट मनाला लावून घ्यावी आणि कोणती गोष्ट फार विचार न करता सोडून द्यावी, हे या माणसांकडून खरोखर शिकण्यासारखं आहे. त्यांना महागड्या वस्तू, ब्रॅंडेड कपडे, प्राॅपर्टी, बॅंक बॅलन्स, खेळता पैसा, दागदागिने, परदेशी सहली यांतल्या एकाही गोष्टीत रस नसतो. दरवर्षी सगळा संसार महिन्याभरासाठी अन्य कुटुंबियांवर सोपवून माणसं निर्धास्तपणे वारीला येतात, म्हणजे त्यांची कुटुंबियांविषयीची मतं काय असतील याचा आपण विचार करायला हवा. “कुणी दिलाच दगा, तर माझा पांडुरंग बघून घेईल” असं अगदी बिनधास्त म्हणणं आपल्याला इतकं सहज जमेल का? 


काल रात्री एका काकांशी बोलत होतो. घराचा विषय निघाला. 

“आता पुतण्या म्हणाला, काका मी हीच जमीन कसणार. मला द्या. माझाही हक्क आहेच जमिनीवर. माझा वाटा मला द्या.” 

“मग?”

“माझा भाऊ होता तिथंच. पण तो काहीच बोलला नाही.”

“मग तुम्ही काय केलंत?”

“आता पुतण्याला नाही कसं म्हणायचं? अंगाखांद्यावर खेळवलेलं पोर. त्याचं मन कशाला मोडायचं? दिली जमीन.”

“मग आता?”

“उरलेली जमीन कमी कसाची आहे. पण, माझा पांडुरंग बघून घेईल सगळं. अहो, जमिनीपायी घर मोडलं तर हातात काय राहणार? त्यापेक्षा हे बरं.”


त्यांच्या घरात जे घडलं, तेच जर आपल्या घरात घडलं असतं तर मालमत्तेच्या वाटण्यांवरून किती रामायणं-महाभारतं झाली असती, असा विचार कदाचित माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असावा. पण, त्यांच्या चेहऱ्यावर दु:ख दिसत नव्हतं. 

“एखाद्या गोष्टीत गुंतलेला जीव अलगद काढून घेता आला पाहिजे” ते म्हणाले. मला काहीच सुचेना. मी अक्षरश: क्लिन बोल्ड झालो होतो. 


ते म्हणाले, “एखाद्या गोष्टीवरचा हक्क सहजपणे सोडून देता आला पाहिजे. आपल्याला तेच तर जमत नाही. म्हणूनच, प्रश्न आहे. तुमच्या पिढीला फार पुढं जायचंय, मोठं व्हायचंय, म्हणून तुम्ही दिवसरात्र पैसे कमावता. पण, बिल्डींगच्या १५ व्या मजल्यावरच्या घरात राहणाऱ्या माणसाला दारात आलेल्याला पाणी सुद्धा विचारावंसं वाटत नसेल तर, त्या पैशाचा काय उपयोग?”


“मग काय, पैसे कमवू नयेत का?”

“माझं तसं म्हणणं नाही. पण जीव माणसातच गुंतवला तर बरं असतं. पैशात गुंतवला तर माणसाला त्याच्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही.”

“पण माणसं फसवणार नाहीत कशावरून?” मी. 

“ पण, ती फसवतीलच हे कशावरून?”

मी पुन्हा सपशेल आडवा. 


“अरे, तुमच्या वयाच्या पोरांचं इथंच चुकतं. तुम्ही भावाला भाऊ मानत नाही, बहिणीला बहीण मानत नाही, आईवडीलांच्या मनाचा विचार करत नाही. तुम्ही कुणाचाच विचार केला नाहीत तर उद्या तुम्हाला तरी कोण विचारील? तुम्ही सगळ्या गोष्टीत फायदा-नुकसान बघत बसता. म्हणून तुम्हाला माणूस बघितला की आधी त्याचा संशयच येतो. मग कशाला राहतंय तुमचं मन स्वच्छ?”

शाळेतच न गेलेल्या त्या माणसाकडे इतकी वैचारिक सुस्पष्टता असेल, असं मला वाटलंच नव्हतं. 


“राजगिऱ्याचा लाडू खाणार का?” त्यांनी विचारलं. 

मी विचारात पडलो. रात्रीचे साडेतीन वाजून गेले होते, पोटात भूक तर उसळ्या मारत होती. पण एकदम हो कसं म्हणायचं, म्हणून मी नको म्हटलं. 

“हे बघा देवा. पुन्हा आहेच तुमच्या मनात संशय.” ते म्हणाले. 


“तुम्हाला वाटणारच, हा कोण कुठला माणूस आहे, हे ठाऊक नसताना याच्याकडून असं काही कसं काय घ्यायचं? आणि तेही रस्त्यावर बसून?” 

“तसं नाही हो.” मी म्हणालो खरा. पण खरोखरच माझ्या मनात तीच शंका आली होती. 

“यामुळेच माणसं कायम अस्वस्थ असतात. ती त्यांच्या मनातलं खरं काय ते सांगतच नाहीत. सगळा लपवालपवीचा कारभार..!”

आता यावर काय बोलणार? लाडू घेतला. लाडू खाऊन त्यांच्याचकडच्या बाटलीतलं पाणी प्यायलो. 

“चला माऊली, निघू का आता? पाऊस कमी झालाय.” मी म्हटलं. 


“थांबा देवा.” काका म्हणाले. पिशवी उघडली, आतून एक तुळशीची माळ काढली, माझ्या गळ्यात घातली. “देवा, पांडुरंगाला सोडू नका, तो तुम्हाला सोडणार नाही. पण त्याला तुमच्या इच्छा पूर्ण करण्याच्या कामाला लावू नका. माऊलींनी सुद्धा तसं कधी केलेलं नाही, स्वत:करता काही मागितलं नाही, हे विसरू नका. मोठं होण्याच्या इतकंही मागं लागू नका की, आपल्या माणसानं मारलेली हाक तुम्हाला ऐकू येणार नाही. तुम्ही माझ्या नातवाच्या वयाचे म्हणून बोललो, राग मानू नका..”

त्या काकांना नमस्कार करून निघालो. बाहेरचा पाऊस थांबलाय, पण मनातला मात्र सुरू झालाय.. आता तो थांबणं कठीण आहे !


॥लेखनसीमा॥

®️मयुरेश डंके


राजा

 🪔🪔🪔🪔🪔🏵️🪔🪔🪔🪔🪔

*राजा भोज मोठा दानशूर होता. त्याची एक सवय होती की, जेव्हा तो दान देण्यासाठी हात समोर करी, तेव्हा तो आपली नजर खाली  झुकवून घेत असे.*

          

*ही बाब सर्वांनाच खटकत असे. असा कसा हा दानशूर राजा... जो दानही देतो... आणि ते देतांना त्याला लाजही वाटते.*


*जेव्हा राजा भोजची ही किर्ती संतश्रेष्ठ तुलसीदासांच्या कानी पडली, तेव्हा त्यांनी खालील चार ओळी लिहून त्या राजाला पाठवल्या.* -


*ऐसी देनी देन जु*

               *कित सीखे हो सेन।*

*ज्यों ज्यों कर ऊँचौ करौ*

                *त्यों त्यों नीचे नैन।।*


*म्हणजे हे राजन, आपण हे असलं दान देणं कुठून शिकलात? जसजसे आपले हात दान देण्यासाठी वर येऊ लागतात तसतशी आपली नजर खाली खाली कां झुकू लागते?*


*बदल्यात राजाने जे उत्तर तुलसीदासांना लिहून पाठवलं, ते मोठं सुंदर होतं. ज्यांनी ज्यांनी राजाचं हे उत्तर वाचलं... ते ते सर्व तर राजाच्या प्रेमातच पडले.*

 

*इतकं सुंदर उत्तर आजपर्यंत कुणीही कुणालाच दिलं नसेल.*


*राजाने उत्तरात लिहिलं,* 


*देनहार कोई और है*

                *भेजत जो दिन रैन।*

*लोग भरम हम पर करैं*

                   *तासौं नीचे नैन।।*


*म्हणजे, देणारा तर तो कोणी दुसराच आहे. तो ईश्वर, तो परमात्मा तोच रात्रंदिवस  लोकांना दानधर्म करीत असतो. परंतु लोकांना मात्र वाटत असतं की, दानधर्म मी, त्यांचा राजाच करतोय. आणि या विचारानं मला माझीच लाज वाटत असते, आणि माझे डोळे आपोआप लवतात.* 


 *तोच करतो आणि तोच करवून घेतो... तू फक्त निमित्त आहेस, कशाला अभिमान बाळगतोस?*


*एक श्वासही नाही घेता येत तुला तुझ्या इच्छेनं, झोपवतोही तोच, आणि झोपेतून जागंही करतो तोच.........*

🪔🪔🪔🪔🪔🏵️🪔🪔🪔🪔🪔

Friday, October 4, 2024

संतांचे होणे

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*


*संतांचे  होणे  म्हणजे  त्यांच्या  आज्ञेत  राहणे .*


मी जिवंत राहावे हे जितके जरूर आहे, तितकेच परमात्म्याची ओळख करून घेणे जरूर आहे. जगात नावे ठेवीत नाहीत कोणाला ? परमार्थाला वाहून घेतले तर प्रपंच नीट करीत नाही म्हणून नावे ठेवतात; तिकडे लक्ष देऊ नये. मनाच्या विषादाला कारण एकच असावे की, मी अजून भगवंताचा झालो नाही. जो भगवंताच्या इच्छेने वागतो त्याचे चांगले होते. भगवंत ठेवील त्यात समाधान मानून राहावे. भगवंताचे रूप आनंदमय आहे, आणि सृष्टीचा क्रमच असा आहे की तो माणसाला आनंदाप्रत पोहोचवीत असतो. अत्यंत दारिद्र्यालासुद्धा आनंदाची जागा असतेच. आनंदाशिवाय मनुष्य जगणेसुद्धा शक्य नाही. मी मुळात आनंदरूप असताना मग दुःखाचे गाडे आले कुठून ? मला दुःख होते ते माझे कुठे तरी चुकते म्हणून ! मी चुकलो का बरोबर, ही शंकासुद्धा मुक्ताला येत नाही, कारण तो आणि देव एकच असतात. बद्धालाही शंका येत नाही. कारण तो देव जाणतच नाही; 'सर्व काही मी करतो, आणि देव नाहीच, ' म्हणून म्हणतो. मुमुक्षूला मात्र ही तळमळ लागते. जेव्हा ही तळमळ तीव्र असते तेव्हां संतांची भेट होते. काही पूर्वीचा ठेवा असल्याशिवाय अशी तळमळ लागणार नाही.

आपण संतांचे होऊन राहावे. त्यांचे झालो म्हणजे त्यांच्याशिवाय आपल्याला कुणी नाही असे वाटले पाहिजे. संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत वागणे. ते सांगतील तसे करावे, ते वागतील तसे नाही वागू. सत्याची संगत धरली म्हणजे सत्संगती मिळते. कशाचीही आसक्ति न धरता जगात वागणे हेच मुक्तांचे लक्षण. हवेपण नाहीसे झाले म्हणजे मग दुःखाचे कारणच राहात नाही.

जिथे तुम्ही राहता तिथे सद्‌गुरु आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते, हीच त्यांची खरी कृपा होय. श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्येने होत नाही. आपल्या गुरूंनी सांगितलेल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमार्थ समजा. गुरू म्हणजे साक्षात परमात्मा. त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या. याहून वेगळे काही करण्याची गरज आहे असे न वाटावे.

माझ्या मनाचे विकार जात नाहीत असे चांगल्या माणसांनासुद्धा वाटते. पण 'ते जात नाहीत, जात नाहीत' असे घोकून त्यांचा ध्यास घेतल्याने ते उलट वाढतील. तिकडे लक्ष देऊ नये. नाम घेणे हे आपले काम करीत राहावे, म्हणजे विकार आपोपापच कमी होत जातील. मात्र, मनाच्या मागे देहाला जाऊ न देणे, इतके जपले पाहिजे.


*११५ .   संतांची  आज्ञा  प्रमाण  मानणे  हेच  प्रचीती येण्याचे  साधन  आहे .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Thursday, October 3, 2024

रामतनय

 श्रीराम समर्थ


*रामतनय* 


         औंधचे मार्तंडबुवा गोंधळी हे श्रींचे परमभक्त होते. जातीनें गोंधळी असून त्यांची भाषा शुद्ध व रसाळ होती. त्यांचे पूर्ण नाव *मार्तंड रामचंद्र गोंधळी* असे असून राजे बाळासाहेब औंधकर यांच्याजवळ ते किर्तन शिकले. थोरल्या राममंदिरात ते आपल्या हयातीपर्यंत कीर्तन करीत असत. त्यांचे पाठांतर खूप असून काव्य करण्याकडे त्यांची प्रवृत्ति होती. *'धन्य जगी या गुरुवर्य हे मारुति अवतार'* हे प्रसिद्ध पद श्री असताना त्यांनी रचले, व त्याचा शेवट *'रामतनय हा चरणा वंदी जोडुनिया कर'* असा केला आहे.


               ********* 

संदर्भः चेतन्यराम ह्या स्मरणीकेतील कृष्णाजी गोपाळ मोकाशी यांच्या लेखातून पान ६९ 

संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन

Wednesday, October 2, 2024

पैसा बोलतोय


*खूपच छान आहे,,,, सर्वांनी वाचावे,,,*👌🏻👌🏻


*मी पैसा बोलतोय*


सर्वात आधी मी तुम्हाला माझा परिचय करून देतो, 


मी आहे पैसा. माझ रूप  साधारण आहे, पण जगाला व्यवस्थित ठेवण्याची क्षमता माझ्यात आहे.


मनुष्याची नियत आणि प्रकृती बदलण्याची क्षमताही माझ्यात आहे कारण मनुष्य मला आदर्श समजतो.


आहो काही लोक तर माझ्यासाठी आपला जात, धर्म सोडतात, आपल्याच लोकांना धोका देतात, आपला आत्मसन्मान गहाण ठेवतात.


 आहो एवढंच नाही तर माझ्यासाठी आपला देह विकतात, लक्षात ठेवा मी चांगल्या आणि वाईट गोष्टीत कधीच फरक करत नाही,


 परंतु लोक मला स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी वापरतात. 


मी राक्षस नाही, पण लोक माझ्यासाठी अपराध करतात. 


हे सत्य आहे कि मी देव नाही पण लोक माझी देवा प्रमाणे पूजा करतात. 


खर तर मी लोकांच्या सेवेसाठी आहे पण लोकच माझे गुलाम झाले आहेत. 


मी कधी कुणासाठी त्याग नाही केला पण लोक माझ्यासाठी स्वतःचाहि  जीव देतात तर कधी दुसऱ्याचा जीव घेतात. 


मला तुम्हांला काही गोष्टी लक्षात आणून द्यायच्या आहेत सांगायच्या आहेत. मी तुम्हाला सगळ विकत घेऊन देऊ शकतो.

 

मी तुमच्यासाठी घर विकत घेऊ शकतो .......

..... पण तुमच्या घरात घरपण नाही आणू शकत. 


मी तुमच्यासाठी औषध आणू शकतो ......

.....पण तुमच वय नाही वाढऊ शकत.


मी तुमच्यासाठी घड्याळ विकत घेऊ शकतो .......

.....पण गेलेली वेळ नाही. 


मी तुमच्यासाठी मोठे पद विकत घेऊ शकतो ......

.....पण आदर नाही.


मी तुमच्यासाठी मखमली गादी विकत घेऊ शकतो ....

.....पण शांत झोप नाही.


मी तुमच्यासाठी पुस्तके विकत घेऊ शकतो .....

.....पण विद्या नाही.


मी तुमच्यासाठी रक्त विकत घेऊ शकतो ......

.....पण कोमेजून जात असलेले जीवन नाही.


म्हणून लक्षात ठेवा 

*पैसा हेच सर्वस्व नाही*

*पैसा जरुर कमवा पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका* . 


पैश्याची पूजा जरूर करा पण पैश्याचे गुलाम बनू नका.


माणसासाठी पैसा बनला आहे. पैश्यासाठी माणूस नाही. 


आपल कुटुंब, आपले नातेवाईक, आपले मित्र-परीवार, आप्तेष्ठ  हेच आपले धन आहे.


त्यांना जाणीव पूर्वक जपा, कारण जेव्हा तुम्हाला देवाच बोलावण येईल तेव्हा मी तुमच्या सोबत नाही येऊ शकत. 


तुम्ही केलेला परोपकार, दुसऱ्यांना दिलेला आनंद, मातृ पितृच भक्ती, त्यांची सेवा व देशसेवा हेच खरं तुमचे धन आहे. तेव्हा सेवा, साधना करा.


मग आयुष्यात तुमच्या सारखे सुखी कोणीही नसणार...............     


                    धन्यवाद ! 

             

                         *मी पैसा*

Tuesday, October 1, 2024

पुत्र

 🕉️ केसरी पुत्र ~


आज पहाटे पश्चिमवारे मंद,मंद वहात होते,शुक्रतारा निस्तेज होत गेला..

वसंतागमनामुळे कोकिळ सुस्वर आसंतात घुमत होता.त्या उच्च स्वराच्या प्रभावामुळे चिमण्या, राघू,मैना,बुलबुल किलबिल विरली होती..


आणि अचानक पूर्वेला,उषेच्या उबदार कुशीतून सुवर्ण बिंब हळूच डोकावले..

खुदकन् हासले. आणि समोरच्या झाडावरील सान पाखरे ,कोकिळ स्वराला डावलून स्वैर किलबिल करु लागली..स्वागत गीत गाऊ लागली.

बुलबुल तर भूप आळवू लागले...

वृक्ष पर्ण सळसळत अभिवादन करु लागले...


आज काय आहे????


बघता-बघता सुवर्ण बिंब ताटाएवढे गोल गरगरीत केशरी झाले...

ते सशक्त केशरबिंब कँमेरात पकडण्यासाठी केविलवाणी धडपड माझे अशक्त हात करत होते..


आणि हा सुंदर केशरी गोळा पकडण्यासाठी जन्मतःच केसरी-पुत्र हनुमानाने आकाशी झेप घेतली होती.🧜🏻‍♀️🧜🏻‍♀️🧜🏻‍♀️🧜🏻‍♀️


केशरी गोलाचा मोह जन्मतःच झालेल्या आणि सूर्याच्या प्रखरतेने हनुवटी पोळलेल्या या बाळाने पुढे आयुष्यात कोणताच मोह,स्वार्थ, लालसा,वासना,कामना धरली नाही.संयमन हे व्रत धरले.


 स्वत:तच सूर्य तेज,वायू वेग, जल प्रवाह निर्मिले.भय -क्षय व्यय  झाला.


अचाट शक्ती सामर्थ्य असूनही नि:स्वार्थी सहकारी, सेवक बनला.

वेळप्रसंगी तीळा एवढा तर कधी गगनाएवढे स्व-रुप करण्याचे सामर्थ्य असूनही विनम्रता होती.शूचिता  होती.


कधी पंचमुखी ,

तर कधी विमशती (20)भूजा, साक्षात ब्रह्मदेव आणि सप्त ऋषी सुद्धा या रूपाला घाबरले.आणि साष्टांग नमस्कार  या मरूत् रूपाला घातला.अखंड उर्जा बहाल केली.


कधी चौदा शस्त्रे धारी विराट रूप ,तर कधी एक गदाधारी सौम्य रुप.

कधी सागरपार करून लंका दहन..

तर कधी क्षणार्धात लंका ते अचल हिमालय वायूवेगे जाऊन इवल्या अंगुलीवर द्रोणागिरी उचलून आणणारे  अजस्र, भयंकर रूप पण हळवे ह्रदय दिसून येते.

तत्परता दिसते.


त्यांचीअचाट शक्तीने धास्तावून जाणार, 

तोच---

कवन -लेखन-वादन करणारा ,श्रीरामांचे चरणी बसणारा ,सतत रामनाम जपणारा ,सीतेला माई संबोधणारा,भोळा भाबडा राम भक्त  मनावर ठसतो.


अंजनी मूळ अप्सरा!!! एका ऋषींच्या शापामुळे वानर मुखी झाली.

बृहस्पती पुत्र केसरी यांची पत्नी झाली. तिचे पोटी  शिव अवतार जन्माला आला- तो  अंजनेय!!!पवनपुत्र !!!! 


 पवन पुत्र असल्याने चिरंजीव!!! 

जरा-मरण मुक्त!!!


अफाट शक्ती चा वापर सतत सहकारी परोपकारी वृत्तीने, केला.खराखुरा  देवदूत।

सेवा करत राहिला. मेवा कधीच नाही मागितला.

अजूनही जागृत शक्ती बुद्धी दैवत आहे.

सेवा करण्याची बुद्धी देतो.

त्याची उपासना केली तर

बुद्धी ला बळ देतो. समर्थ करतो. मनोबलदायी दैवत।

वानर आहे.. मर्कट नाही.


अश्या या वानररूपी दैवताचा आज जन्मोत्सव साजरा करुया.

श्री राम व हनुमंत यांकडून शिकायचे..स्वतःची दु:खे,विरह यातना ,वेदना,पीडा सर्व अंतरात गाडून, गिळून हासत हासत कार्यरत रहायचे. सतत जनहितार्थ झटायचे.स्वत्व वाततत्व जाळून जगत् दीप उजळायचा. हासत हासत जगायचे.💐


हनुमान जयंती नाही. जयंती म्हणजे मृत आत्म्याचा जन्म दिन!!!

मारुती हा मृत नाहीच. तो पवन पुत्र आहे. पावन मुर्ती 

आहे.

बजरंग आहे बलवंत आहे. तेज:पुंज गुणवंत केसरी पुत्र आहे.


आज त्याला मनोभावे वंदन करुन त्याच्या सम वासना,लालसा,हाव -धाव त्यजून निरपेक्ष सेवा करण्याची,परोपकारी वृत्ती मागुया..सुबुद्धीला सबळ कर विनवुया..

आणि वसंत गीत गाऊया।

जय हनुमंत।


धन्यवाद🌹

उन्नती गाडगीळ 🙏🏾