TechRepublic Blogs

Thursday, August 1, 2024

निष्ठा

 मानवी जीवनाचं अंतिम घ्येय काय आहे ज्याच्या पलीकडे ध्येयच नाही. त्याची खूण अशी आहे की ते ध्येय मिळाल्यावर सार्थकता वाटली पाहिजे.कृतकृत्यता वाटली पाहिजे. कृतकृत्य म्हणजे जे काही करायचे होते ते करून झालं. तर त्याचा परिणाम काय तर अत्यंत समाधान. राजाला लाजवील असं समाधान मिळालं पाहिजे. मनुष्य म्हटला की त्याला जो देह मिळाला आहे आणि त्या देहाला सांभाळणार जे मन आहे ते तर अतिशय निराळे आहे. म्हणून श्री.गोंदवलेकर महाराज म्हणाले *"माणसाचे शरीर आणि त्याचे मन हा भगवंताचा प्रसाद आहे."* पण आपल्याला तसे वाटत नाही.

आपण कसे आहोत तर वासनेने भरलेले आहोत. म्हणजे मला अमुक हवं, तमुक नको याचे नाव वासना. आपण स्वतःशी विचार करावा की "आता मला काही नको." असं खरं वाटत का ? अगदीच नाही तरी मृत्यू तरी शांत यावा असे तरी वाटते ना. मग देह आणि मन हा प्रसाद आहे म्हणजे परमात्म्याची देणगी आहे. याच कारण की माणसाला जी कृतकृत्यता येते , म्हणजे आणखी काही मिळवायचे राहत नाही ती, माणसाला या देह आणि मनातूनच मिळविता येत.  याचे नाव परमार्थ. म्हणून देहाला आणि मनाला महत्व आहे. श्री.भाऊसाहेब केतकर होते ते म्हणाले "महाराज भेटले आता काय मिळवायचे राहिले आहे ?" ही खरी गुरुवरची निष्ठा आहे.  यात खरं समाधान आहे.

No comments:

Post a Comment