TechRepublic Blogs

Friday, August 16, 2024

रामरंगी रंगले

 *मन हो रामरंगी रंगले*

संकलन आनंद पाटील 


*भक्तीभावाने आपल्या मनाचं पात्र पूर्ण भरलेलं असेल तर*

*समाधानाचं तीर्थ नित्य सेवन करायला मिळेल. आनंद,* *समाधान, शांती बाहेरून नाही मिळत. ती आपण आपली* *मिळवायची असते. एकदा का शांतीचा झरा झुळझुळू लागला की जे मिळवायचं ते मिळालंय याची जाणीव होऊ लागते, जीवन* *दृष्टी बदलते, समोरच्या माणसाठाई असलेले दोष* *दिसण्याऐवजी असलेला एखादा गुण मात्र दिसू लागतो. आनंदाचा झरा झुळझुळ करू लागला की रामप्रती, नामाप्रती, भगवंताप्रती भक्तीभाव अधिक दृढ होऊ लागतो. नामापरते*

*सत्य नाही रे अन्यथा !!*


*भक्ती म्हणजे भगवंताचं* *श्रद्धेनं घेतलेलं नाम. भगवंत* *नामस्वरूप आहे. त्याच्या* *नामाला चिकटून राहिलं की वाट्याला येणाऱ्या अडचणी,* *त्रास, विपरीत प्रसंग, अनुभव यामध्येही एक वेगळं बळ,* *शक्ती मिळते.आपलं काम, कर्तव्य आपण याही परिस्थितीत, आहे त्या मार्गाने चालू ठेवले, तर पुढे काय होईल ते होऊ दे, मी माझ्या कामात, कर्तव्यात कसूर  केली नाही ही भावना मनाला शांती व समाधान देणारी असते.. मग कोणी म्हणोत, न म्हणोत,

 आपलं करत राहणं आपसूक होऊ लागतं, फार ओढाताण न होता. हा श्रद्धायुक्त भक्तिचा परिणाम. आताच्या सहज भाषेत, ‘व्यथा असो आनंद असू दे' आपलं पुढे जात राहणं चालू राहतंच. संकलन आनंद पाटील*

No comments:

Post a Comment