TechRepublic Blogs

Wednesday, August 21, 2024

जाळ

 पु.श्री.कृष्णमूर्ती म्हणतात "आपलं जीवन म्हणजे संबंधांच जाळ आहे." म्हणजे काय तर हा माझा मालक, हा नोकर, ही माता, ही पत्नी असं सगळं माझं आहे. संतांचं म्हणणे काय आहे की "तुम्ही मी काय आहे हे समजण्याचा प्रयत्न करू नका. पण हे ममत्व काढा, नाहीस करा."  हे माझं हे माझं म्हणून सगळं उपाधीयुक्त आहे. आपल्या जिभेवर गोड चव ओळखणाऱ्या पेशी असतात, त्या पदार्थांची चव ओळखतात, परंतु आपण अन्न खाताना त्या पेशी काम करतात त्यांच्याकडे लक्ष दिले नाही तर किंवा मी काय खाल्लं यांचं भानच  नसलं तर काय होईल ? हा जो संतांचा विचार आहे तो आपल्याला पटतच नाही. तो डोक्यावरून जातो. हे काय आहे तर माझा देह हे सगळं करतो आहे यात माझं अस काय आहे ? जो देहच माझं नाही तर मी त्यावर किती विसंबून आहे? तर हे माझं माझं नाहीस करायला पाहिजे. ते कसं नाहीसे करावे याला गोपींच उदा.आहे. हे माझं माझं करण्याच्या मागे मूळ काय असेल तर हा मी आहे. या मी ला कोणाला देऊन टाकला तर. गोपी भगवंताला काय म्हणाल्या "आम्ही तुझ्या निःशुल्क दासी आहोत "  म्हणजे मी माझी नाहीच  मी तुझी आहे. असं म्हटल्यावर माझं जे आहे ते सर्व तुझंच आहे हा परमार्थ.

No comments:

Post a Comment