TechRepublic Blogs

Sunday, July 7, 2024

जिज्ञासा

 परमार्थाच्या प्रारंभीच्या काळात पु.श्री.अंबुराव महाराज (श्री.बाबा) व पु.श्री.गुरुदेव रानडे यांच्यात फरक होता. श्री.बाबांना अनुग्रह मिळाला त्या क्षणापासून त्यांच्या मनात पु.श्री.उंमदीकर महाराज , (ह्या दोघांचे सद्गुरू) यांच्याबद्धल भक्ती श्रद्धा निर्माण झाली.

 पु.श्री. गुरुदेवांची गोष्ट निराळी होती. प्रखर बुद्धिमत्ता आणि जन्मजात जिज्ञासा यामुळे श्रीमहाराजांच्या अगदी पहिल्या भेटीपासून श्रीमहाराजांनी निरुपणात सांगितलेल्या विचारांनुसार प्रयोग करून त्यांची श्रद्धा प्रयोगाअंती दृढ होत गेली. 

परस्पर संबंधांचा त्या दोघांनी एकमेकांचा परमार्थ सद्गुरूंवरील श्रद्धा वाढीसाठीच उपयोग केला. पु.श्री बाबा आणि श्रीगुरुदेव यांचा परमार्थ नाम आणि नीती, श्रद्धा आणि शरणांगती या चतु:सूत्रीवर आधारलेला होता. देह 

कोणत्याही परिस्थितीत असेना का केवळ श्रद्धेच्या जोरावर साक्षात्काराचा कळस गाठता येतो. त्या दोघांचा संबंध परमार्थाच्या  साक्षात्काराच्या समान ध्येयावर आधारित होता. पारमार्थिकदृष्ट्या ते अवळी-जवळी होते.

No comments:

Post a Comment