विजापूर जवळ निंबारगी या गावी श्री.निंबरगी महाराजांच्या समाधी स्थापनेचा समारंभ होता. त्या समारंभास श्री.गुरुदेव रानडे जाणार होते. त्यांच्याबरोबर श्री.जगन्नाथ लेले, श्री.काकासाहेब कारखानीस व अन्य दोघेजण होते.
रात्रीची वस्ती तेथे जवळ असलेल्या बरडोला गावातील धर्मशाळेत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रातर्विधी आटपून सगळे पायी निघाले. श्री.गुरुदेव मात्र बैलगाडीत होते. गाडी मार्गास लागल्यावर श्री.गुरुदेवांनी सर्वाँना भजन करीत जाण्यास सांगितले.
काही वेळाने श्री.गुरुदेवांनी काकासाहेब यांना जवळ बोलाविले व म्हणाले की "गणपतराव बरडोलच्या धर्मशाळेची जागा किती पवित्र आहे बरे ! " काकासाहेब म्हणाले " का तेथे काय चमत्कार झाला ?"
तेव्हा त्यांनी सांगितले की "रात्री नेमाचे वेळी मुसलमानी धर्माच्या नामाचा साक्षात्कार झाला. ते ऐकू आले." हे ऐकल्यावर श्री.काकासाहेब म्हणाले "श्री.उमदिकर महाराजांनी परवानगी दिली तर मी त्या जागेवर मशीद बांधीन." त्यांचे बोलणे ऐकल्यावर गुरुदेव क्षणभर स्तब्ध झाले व आकाशाकडे पाहू लागले. त्यांना त्या वेळी काय दृश्य दिसले असेल ते त्यांनाच माहिती.
No comments:
Post a Comment