निंबाळ येथे असताना सौ.काकूसाहेब, श्री.गुरुदेव रानडे यांच्या पत्नी, गुरुदेवांन साठी नेहमीचे जेवण करीत परंतु गुरुदेव त्यातील थोडे जेवण घेत असत. पुढे अलाहाबाद येथे आल्यावर हळूहळू श्री.गुरुदेवांची अंन्नावरची वासना कमी होत गेली व नामशक्ती मुळे अन्नाची गरज कमी होत गेली.
एखाद्या वेळेस ते एखाद्या पदार्थाची नुसत्या बोटाने चव घेत असत किंवा एखाद्यावेळेस भाकरीचा एखादा तुकडा घेत असत. पुढे पुढे महिनाभर श्री.गुरुदेव अन्नाला स्पर्शदेखील करत नसत. बहुतेक वेळा ते दृष्टिभोजन करीत असत. तरी सुद्धा सौ.काकूसाहेब गुरुदेव यांच्यासाठी सर्व पदार्थ बनवीत असत.
दृष्टिभोजना नंतर हा प्रसाद इतर स्वयंपाकात मिसळून दिला जात असे. श्री.गुरुदेवांना भाजीचे किंवा आमटीचे पाणी, पालेभाज्यांचे सूप आवडे पण ते सुध्दा कधीकधी एखादा चमचा घेत असत.
फळांमध्ये संत्र्याची एखादी गोड क्वचित घेत असत. फराळात शेव, पेढे क्वचित घेत असत. श्री.गुरुदेवांना पिण्याच्या पाण्याचे हंडे, तांब्या, फुलपात्र हे सर्व चकचकीत घडलेले लागे. ते पाणी पिण्यास मागत पण बरेचदा ते चुळा भरून टाकीत व नंतर ज्या पाण्यावर वस्तुदर्शन होई असेच ते पाणी पीत असत साधारण ते अर्धा फुलपात्र होत असे. त्यांचे देह नामस्मरणामुळे होणाऱ्या अमृतरसावर पोसला जायचा.
No comments:
Post a Comment