काही लोक आहाराचा यज्ञ करतात. 'अपरे नियताहारा ' नियत म्हणजे नियमन करणे याचा अर्थ ते लोक आपल्या आहारावर बंधन ठेवतात. भगवान जेव्हा आहार सांगतात तेव्हा त्याचा अर्थ फक्त खाणे असा नाही तर आहार म्हणजे बाहेरून आत आणण.
प्रत्येक इंद्रियांचा आहार आहे. तर या सर्व आहारावर बंधन ताबा पाहिजे . पारमार्थिक मनुष्य म्हटला की त्याच्या जीवनामध्ये एक सौंदर्य पाहिजे. तो सगळं करील पण एका मर्यादेन करील.
तो सर्वं इंद्रियांचे नियमन करील. ही बंधनं नाईलाज म्हणून न पाळता मनापासून आनंदाने पाळली पाहिजे. जे खायचे ते हलकं असावं पण त्यात सत्व असावं. फळं खावीत पण ती पचायला हलकी असावीत. स्वामी रामदास होते काननगडचे ते उकडलेले बटाटे आणि केळी पण खायचे. पुढे जपात एकाग्रता येईना तर त्यांनी अन्न सोडले. स्वामी रामतीर्थ पंजाबी होते. ते नेहमी चपाती खायचे पुढे पुढे ते फक्त गाईचे दूध पीत असत. आपण आपल्या देहाला योग्य तेच करावं.
पण शक्यतो आहारावर मर्यादा बंधन पाहिजे. तरुणपणी माणूस जसा पोटभर खात होता तस वय झाल्यावर खाणे म्हणजे परमार्थ नाही. म्हणून गीता सांगते की नियत आहार पाहिजे सगळ्याच बाबतीत. श्रीमहाराज म्हणत " ज्याने जीभ जिंकली त्याने अर्धा परमार्थ जिंकला " जिभेची काम दोन एक खाणे आणि दुसरे बोलणे. आपण सर्व जप करतो मौन पाळतो भरपूर उपासना करतो पण एखाद्या दिवशी इतकं बोलतो की त्या जपाचा परिणाम नाहीसा होतो.
No comments:
Post a Comment