*त्यासाठी रामायणात पहावे लागते.*
*ll श्रीराम जयराम जय जय राम ll*
कधी कधी आपले काही चुकत नाही, आपण सदाचारी आहोत, पवित्र आहोत, परोपकारी आहोत, धर्माचरणी आहोत, तरीही आपल्याला जीवनात दुःख का भोगावे लागते ? असा प्रश्न निश्चित पडतो. त्यासाठी रामायणात पहावे लागते.
कर्मे दशरथ वियोगे मेला l कर्मे श्री राम वनवासाला गेला l कर्मे रावण क्षयो पावला l वियोग घडला सीतादेवी ll
यात ही सगळी चांगले वागणारी माणसे होती, केवळ कर्मामुळे या वेदना त्यांना भोगाव्या लागल्या.
कर्मे दुर्योधनादी रणी नासले l कर्मे पांडव महापंथी गेले l कर्मे सिंधूजळ शोषिले l नहुष झाला सर्फ देखा ll
ज्या व्यक्तीने कर्माची आणि प्रारब्धाची शक्ती जाणली आणि मानली, त्या व्यक्तीची कर्माचे भोग भोगताना भक्कम मानसिक तयारी आपोआप होत असते. कर्म आणि प्रारब्ध चुकणार नाही याचे भोग भोगावेच लागतात.
हे सर्व भोग शरीराला भोगावे लागतात, शरीराचा संबंध सोडला म्हणजेच विदेही अवस्थेत आपण पोहोचलो तर आपोआप आपण मुक्त आणि आत्मिक आवस्थेत येतो.
ही अवस्था भक्ताची सत्चिदानंद अवस्था आहे. या अवस्थेला भगवान परमात्म्याशी अद्वैत भाव निर्माण होतो. ज्यावेळी हा भाव निर्माण होतो त्यावेळी कर्माच्या आणि प्रारब्धाच्या भोगाची कोणतीच वेदना शरीराला त्रास देत नाही किंवा अशा आत्मस्थित असलेल्या व्यक्तीला शारीरिक वेदना होत नाहीत. याला योग शास्त्रांमध्ये प्रत्याहार असे म्हणतात आणि परमार्थात स्थितप्रज्ञ आवस्था म्हणतात. याचा अर्थ कर्म आणि प्रारब्ध यांचा भोग आणि त्याची वेदना जीवनातून संपवायची असेल, तर आत्मिक अवस्थेतच यावे लागेल आणि हे अध्यात्मशिवाय शक्य नाही.
!! श्री महाराज !!
!!श्रीराम जयराम जय जय राम!!
!!श्रीराम जयराम जय जय राम!!
!!श्रीराम जयराम जय जय राम!!
!!श्रीराम जयराम जय जय राम!!
!! श्रीराम समर्थ!!
No comments:
Post a Comment