TechRepublic Blogs

Wednesday, July 31, 2024

शक्ती

 आपला जो देह आहे याची इंद्रिय

काम करतात , ही जी इंद्रिय काम करतात ते काम प्रकृती करते. याचा अर्थ असा की जगात काम करणाऱ्या शक्ती ज्या आहेत त्या शक्ती तुम्हाला नाचवतात. साधं हवा पाणी बिघडलं की तुम्हाला जाणवतं. या जगातल्या ज्या शक्ती आहेत त्या मला नाचवतात ही भावना व्हायला तो कर्ता आहे ही भावना झाली पाहिजे. परमार्थाचे विनाउपाधीकरणं जर असेल तर मी आहे पण मी कर्ता नाही तो कर्ता आहे हे समजायला हवे. हीच गुरुआज्ञा आहे. पु.श्री.ज्ञानेश्वर महाराज म्हणाले "मन भ्रांतीपासून सुटले आणि गुरुवाक्ये मन धुतले."

  आपल्या मनात जर सगळा मळ असेल तर मी करतो. मी करतो हा आहे. आपण काय करणार आहोत या जगातल्या शक्तींपुढे. आपले सामर्थ्य मुंगी इतके सुद्धा नाही, आपल्या हातात काय आहे? जेव्हा माझ्या सकट माझं जीवन आहे ते सगळे तुझ्या सत्तेने आहे हे गुरुवाक्य आहे .

 या वाक्याने मन धुतले जाईल. आपले गुरू देहात असोत किंवा नसोत " तो कर्ता आहे मी कर्ता नाही " ही त्यांची आज्ञा असते. ही आज्ञा पाळन हे शिष्याचं आद्य कर्तव्य असतं. तीन गोष्टी दुर्लभ आहेत. देवाची कृपा असेल तर मिळतात.१) मनुष्य देह २) मोक्षाची इच्छा ३) महापुरुषांचा सहवास. सत्पुरुषांकडे अनेकजण जातात. तो सत्पुरुष त्यांना आपलं म्हणत नाही. कारण त्या जीवाचा उद्धार होईपर्यंत त्याची जबाबदारी घ्यावी लागते. तर त्याने आपला म्हणण्यासाठी काय लागत तर "मी  तुझ्या चरणांशी आलो आहे मी खरा कर्ता नाही" हे म्हटलं की त्याची कृपा होते.

मृत्युंजय

 *मृत्युंजय अमावस्या........*


बरोब्बर गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे फाल्गुन अमावस्येच्या दिवशी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज व त्यांचे मित्र कविराज कलश यांची औरंग्याने निर्घृण हत्या केली... 


या अमावास्येला आपण *मृत्युंजय* अमावस्या म्हणतो.


चाळीस दिवस सतत मृत्यूच्या छायेत वावरूनही तसूभरही न ढळता हिंदवी स्वराज्यासाठी स्वतःचे शिरकमल अर्पण करणाऱ्या संभाजी महाराजांनी त्या मृत्यूवरही विजय मिळवला आणि आपला हिंदू धर्म स्वाभिमानाने जपला. म्हणून ही मृत्युंजय अमावस्या..


चालताना साधा काटा रुतला तर आई गं म्हणणारे आपण... कसं सोसलं असेल हो त्या सिहांच्या छाव्याने? अंगावरचे केस उपटले गेले, सालटी काढली गेली, त्यावर मीठ टाकलं गेलं, मिरचीची धुरी देण्यात आली, चाबकांचे फटके मारण्यात आले, हाता पायाची नखे उपटण्यात आली, जीभ छाटली गेली, दोन्ही डोळ्यात तापलेल्या लालबुंद सळया टाकण्यात आल्या.. हात पाय तोडण्यात आले, आणि शेवटी शिर छाटण्यात आले...रोज एक एक छळ. असे किती दिवस?? तब्बल चाळीस दिवस... किती  ही सहनशीलता? किती हे धैर्य? किती हे कठोर मनोबल? कुठून आलं हे सर्व? कोणी बळ दिलं इतकं सोसायला? कोणासाठी? कशासाठी सहन केलं?


*फक्त आणि फक्त स्वधर्मासाठी...*


आपण खूप थाटामाटात हिंदू नववर्षाचे स्वागत करतो. ज्यांनी हिंदू धर्म रक्षिला त्या छत्रपती पिता-पुत्रांचे आपण साधे स्मरणही करत नाही. त्यांनी मुघलांना रोखले नसत तर सर्व हिंदूंचा सुंता करून मुघलांनी मोठे धर्मांतर घडवले असते. मग.... कोणता हिंदू आणि कोणते नववर्ष ?


सर्वच हिंदू बांधव विसरले आहेत असेही नाही.आजही हजारो लाखो हिंदू बांधव संभाजी महाराजांनी ज्या यातना ४० दिवस भोगल्या त्याची थोडी तरी झळ स्वतःला बसावी म्हणून हे ४० दिवस अनवाणी चालतात, अनेक जण एक वेळचे अन्नत्याग करतात, अनेक जण चाळीस दिवस एखादी आवडती वस्तू त्यागतात, एखादा अतिशय आवडता खाद्य पदार्थ त्यागतात, अनेकजण चाळीस दिवस मौन सुद्धा धारण करतात.. जसे जमेल तसे स्वतःच्या देहाला यातना देतात.


*दि 8 एप्रिल सोमवार #मृत्युंजय_अमावस्या आहे.. आपण सर्वांनी जमेल त्या प्रकारे निदान या एका दिवशी तरी वरील पैकी एक पर्याय स्वीकारावा.. सोमवार दिवसभर शंभू महाराजांच्या बलिदानास आठवावे. त्यांनी सोसलेल्या छळास मनोमन अनुभवावे. त्यांच्या नावाने एक दिवा लावावा. हीच त्यांना खरी सुमनांजली असेल.*


*धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय.*


🚩🚩🚩 *|| जय हिंदुराष्ट्र ||*    🚩🚩🚩

Tuesday, July 30, 2024

कृष्ण

 *कृष्ण अंधारात जन्मला. ह्याचा प्रवास जसा गूढ आहे, तशी ह्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर सावधचित्त राहायला हवं.*


*कृष्ण खोडकर आहे. केव्हा आधार काढून पळून जाईल भरवसा नाही...!*


*अभिमन्यू चक्रव्यूहात फसला. कशामुळे, तर श्रीकृष्णामुळेच...*

*चक्रव्यूह कसा भेदायचा हे कृष्णाने सांगितलं होतं. पण त्यातून बाहेर कसं पडायचं हे कृष्णाने सांगितलं नाही.*

 

*कृष्ण आहेच असा अजब. आपल्याला फसवतो. गंमत बघतो. फुकटात काही देत नाही. अर्धा मार्ग दाखवतो. रस्ता थोडासा उघडतो. पण पोहोचायचे कष्ट आपल्यालाच घ्यायला लावतो. मोफत काही नाही.*

*चक्रव्यूहात उतरणार असाल तर उतरा, पण जिंकून बाहेर पडायची माहिती तुम्हालाच घ्यावी लागेल. ते कष्ट तुम्हीच घ्यायचे. चक्रव्यूहातून श्रीकृष्ण अलगद उचलून बाहेर काढत नाही. काढू शकतो, पण काढत नाही. फार चलाख आहे. ''चालू'' आहे असंच म्हणा हवं तर... चक्रव्यूहात सोडतो आणि गंमत बघतो. सुटायचं तर तुमच्या बळावर सुटा, नाहीतर फसलात. फसल्यावर त्याच्याकडे अपेक्षेने पहात बसाल तर फक्त सौम्य हसतो.*


*फार अर्थ आहे ह्या हसण्यामागे...*


*तो फक्त एक नाजूक स्मितहास्य करून सांगतो, जे करायचे स्वतःच्या बळावर करा. शिकून घ्या, समजून घ्या. आत्मसात करा...*


*अर्जुनाला असंच अडकवलं. आपलं सैन्य दुर्योधनाला दिलं आणि स्वतः एकटाच अर्जुनाच्या पक्षात आला. ज्यामुळे दुर्योधनाला पक्के कळले की अर्जुन जिंकणार नाही, पांडव जिंकणार नाहीत. युद्धाचा निकाल तिथेच लागला होता.*


*श्रीकृष्ण "न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार" अशी शप्पथ घेऊन रथावर चढला. काम केलं फक्त रथ हाकण्याचं. अर्जुनही घाबरला. साक्षात महायोद्धा कृष्ण रथावर सोबतीला होता, पण निशस्त्र !!* 

*वरून अर्जुनाला ताकीद दिली की तुझं धनुष्य तू उचल आणि लढ. लढत असशील तर मी रथ चालवीन, दिशा दाखवीन...*


*विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था*

*कर्तव्याने घडतो माणुस जाणुन पुरुषार्था*

*भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था*


*कृष्ण भर रणांगणात वेदार्थ सांगतो. कर्मयोग पटवून देतो. आपण तो नाही पटवून घेतला, नाही आचरणात आणला तर कृष्णाचा काही भरवसा नाही. मैदान सोडून पळून जाईल.*


 *अर्जुनाला बजावले की धनुष्य खाली टाकशील तर मी रथ सोडलाच म्हणून समज...*


*अर्जुन भर रणांगणात फसला. अखेरीस त्याचा तोच लढला आणि शेवटी जिंकला. अर्जुनामध्ये जिंकण्याची क्षमता आहे. कृष्णाला हे पक्के ठाऊक होते. आपल्यातही ही क्षमता असते, पण आपण आत्मविश्वास गमावून बसतो. कोणीतरी मदत करेल ही अपेक्षा ठेवतो. आपली लढाई दुसर्याने लढून द्यावी असे वाटते. अशावेळी कृष्ण मदत करत नाही. आपली लढाई आपल्यालाच लढायला लावतो...*


*यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: ।*

*तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥*


*जिथे योगेश्वर आहे, श्रीकृष्ण आहे तिथे विजय निश्चित आहे. का नसणार...? तो सोबतीला उभा राहतो. थोडी फार दिशा दाखवतो. लढायचं आपल्यालाच आहे. जो लढेल, तो निश्चितच जिंकेल...*


*असं म्हणतात की कृष्ण जिथे नसावा तिथेही आहे. दारूचा गुत्ता, जुगारचा अड्डा इथे लपून बसला आहे. माझ्याकडे कोण कोण आकर्षित होतो, कोण येतो हे तो बघत बसतो...*


*रंगहीन मी, या विश्वाच्या रंगाने  रंगलो...कौरवांत मी, पांडवांत मी. अणुरेणुत भरलो...*


*तो पांडवांमध्ये आहे आणि कौरवातही आहे. नीतीच्या पक्षात बसला आहे आणि अनीतीच्याही. त्याला नीती - अनीतीच्या तराजूत तोलता येत नाही. कारण तो कुठेही गेला तरी रंगहीन आहे. पण तो रंगपंचमी खेळतो. आपल्याला रंगवून सोडतो. त्याचा काही भरवसा नाही. आपल्यासमोर अनेक रंग पसरवून ठेवतो आणि पाहतो, की आपण कोणत्या रंगात रंगतो.*


*धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे !!*


_तो म्हणतो की धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात येत राहीन..._

_म्हणजे तो काल होता, आज आहे आणि उद्याही असणार आहे. तो आपल्या सोबतही राहणार आहे. फक्त त्याचे म्हणणे ऐकावे लागेल._


*कृष्ण सरळ नाही, पण चांगला आहे. समजून घेतलं तर फारच उपयोगाचा आहे.*


*श्रीकृष्णाने आयुष्यात जितक्या गोष्टी सोडल्या, तितक्या त्या इतर कोणालाही सोडता आल्या नाहीत.*


*श्रीकृष्णाने आपली आई, वडील सोडले, त्यानंतर नंद-यशोदाला. मित्र निघून गेले. राधा निघून गेली. गोकुळ सोडले आणि मथुराही सोडली.*


*आयुष्यभर कृष्ण काही ना काही सोडतच गेला. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला. आपली आजची पिढी, जी एखाद्या गोष्टीच्या विरहाने कोसळून पडते, त्याने कृष्णाला गुरु बनवावे. ज्याला कृष्ण समजला तो कधीच औदासिन्यात (depression) जात नाही.*


*कृष्ण आनंदाचा देव आहे. एखादी गोष्ट हातातून निसटून गेल्यावरही सुखी कसे रहावे हे कृष्णापेक्षा कोणीही उत्तम शिकवू शकत नाही....!*


*!! जय श्रीकॄष्ण !!*

  

चैत्रगौर

 *गृहिणीपणाचा उत्सव -चैत्रगौर*


आज चैत्र शुद्ध तृतीया म्हणजे गौरी तृतीया.आज पासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत  गौरीची  पूजा करून महिनाभर हा उत्सव साजरा होतो.देवघरातली अन्नपूर्णा लख्ख करून तिची षोडशोपचारे पूजा केली जाते आणि तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेऊन हा उत्सव साजरा होतो.अनेक शुभ चिन्हांची रांगोळी" चैत्रांगण " काढली जाते.

गौरी अन्नपूर्णा कशी झाली याची सुंदर कथा पुराणात येते.गौरी ही भौतिक समृद्धीची देवता.अन्नधान्य ,वात्सल्य ,धन संपती ,सौंदर्य ,मांगल्य ,कौटुंबिक सौख्य हे सारं काही तिचीच कृपा.आणि शिव म्हणजे विशुद्ध ज्ञान!.योग ,वैराग्य,ब्रह्मज्ञान यांचे ते अधिष्ठान. शिव पार्वती एकदा कैलाशी निवांत गप्पा मारत होते.बोलण्याच्या ओघात शिव म्हणाले ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. फक्त ब्रह्म सत्य आहे बाकी सब झूट.


पार्वती म्हणाली अहो हे सुंदर विश्व ? 

शिव म्हणले साफ खोट आभासी आहे हे.

 विश्वातील सौंदर्य ,मांगल्य , नातीगोती ???

ते हि असत्य

बर मग आपण खातो ते अन्न तरी ?

तेही खोट ,असत्य ,आभासीच ,फक्त ब्रह्म तत्वच सत्य !!


झालं ….गौरीला आला थोडा राग . ती म्हणाली बरं तुमचं ज्ञान वैराग्यच खर बाकी सगळ आभासी ना.या क्षणी मी अंतर्धान होते. गौरी गुप्त होताच जगातले मांगल्य लोपले ,नात्यांचा गोडवा उडाला ,घराचे घरपण हरपले ,सात्विक सौंदर्य विरले,आणि मुख्य म्हणजे जगातले सगळे अन्न धान्य सुद्धा अकस्मात संपले.


 शिवाना वाटले हरकत नाही.या वाचून जगाचे  काही बिघडत नाही. पण थोड्याच वेळात अख्या जगातले देव ,मानव ,ऋषी ,पशु पक्षी सारे प्राणीमात्र भुकेले होऊन शिवांपाशी आले. महादेव म्हणाले थांबा तुम्हाला जरा ज्ञान देतो. पण भुकेल्या पोटी कसलं  ब्रह्म कसलं ज्ञान.आधी अन्न द्या मग पुढ्च बोला.पण अन्न आणायचे कुठून. कोणीतरी सांगितलं संपूर्ण विश्वात फक्त काशी नगरीत एक घर आहे तिथेच अन्न उपलब्ध आहे. सगळ्या प्राणिमात्रांच्या वतीने शिव याचक म्हणून तिथे भिक्षा मागायला गेले. 

*ओम भवति भिक्षां देही|*

आतून एका गृहिणीचा नाजूक आवाज आला महादेवा भिक्षेत काय देऊ ज्ञान कि वैराग्य ??

महादेवानी पाहिलं ,आत सुवर्ण सिंहासनी साक्षात पार्वती बसली आहे ,मांगल्य लेवून ,पावित्र्य पांघरून ,समृद्धीचे अलंकार घालून आणि तिच्या हातात आहे अन्नाचे अक्षयपात्र ,वात्सल्याच्या पळीने ती प्रत्येक जीवाला अन्न देऊन तृप्त करते आहे. 

प्रपंचाशिवाय  परमार्थ, प्रवृत्तीवाचून निवृत्ती ,शक्तीविना शिव अपूर्णच आहेत हा साक्षात्कार शिवांना झाला.शिव म्हणाले  ज्ञान -वैराग्य प्राप्त होण्यासाठी आधी शरीरात शक्ती आणि मनात शांती हवी ,त्यासाठी सकस अन्न हवे, अन्न हे पूर्णब्रह्म .त्याचीच  भिक्षा दे !!!

*ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती ।।*

पार्वती हसली , तिने आनंदने शिवांना भोजन दिले ,शिव तृप्त होताच जगातले सगळे जीव देखील तृप्त झाले.


त्या तृप्त अंतकरणाने महादेव म्हणाले तू  सदाशिवाला सुद्धा पूर्ण करणारी सदापूर्णा आहेस ,जगाची आई बनून अन्न पुरवणारी  तू अन्नपूर्णा आहेस.साध्या गृहिणीच्या रूपातली ती शंकराची प्राणवल्लभा अन्नपूर्णा म्हणून विख्यात झाली.


ही अन्नपूर्णा जगातल्या सगळ्या गृहिणींच प्रतिक आहे. सोनेरी महालात राहणाऱ्या रुख्मिणीवर देखील  द्वारकेतील सगळ्यांना अन्न देण्याची जबाबदारी होती आणि झोपडीत राहणारी सुदामाची बायको  सुद्धा मिळेल ते रांधून घराला जेऊ घालत होती.परिस्थितीचा फरक असेल पण कुटुंबाला तृप्त करण्याची वृत्ती सारखीच आहे.कदाचित ही आठवण राहावी म्हणून नववधूला लग्नात माहेरून अन्नपूर्णा देतात.तिची रोज पूजा करत गृहिणीने सकस अन्न शिजवावं ,नाती जपावीत ,घराला घरपण द्याव.हे सगळं करत असताना "गृहिणी कुठे काय करते?" असा प्रश्न कोणी विचारला तर गृहिणीच्या रुपात अवतीर्ण होऊन जगाचे पोषण करणाऱ्या अन्नपूर्णेची कथा आठवावी.


या गृहिणीपणाचा उत्सव ही चैत्रगौर.रोजची देवघरातली अन्नपूर्णा मखरात हिंदोळ्यात बसवली जाते.किंवा काही ठिकाणी पंचगौरचे छोटे झोपाळे पुजले जातात.त्यात मध्यभागी ही गौरी आणि सभोवताली तिचा परिवार -शिव, गणेश, नंदी वैगरे.गृहिणी हीच घराचा केंद्रबिंदू आहे हे यातून बिंबवलं जातं.


*स्वयं पञ्चाननः पुत्रौ गजाननषडाननौ।*

*दिगम्बरः कथं जीवेदन्नपूर्णा न चेद्गृहे॥*

पाच मुखे असणारे शंकर; गजमुख गणेश आणि सहा मुख असणारा कार्तिकेय अशी खाणारी बारा तोंडे घरी असताना भिक्षाटन करणाऱ्या दिगंबर शिवाचा संसार सुरळीत चालला आहे; कारण त्याच्या घरी अन्नपूर्णा गृहिणी म्हणून आहे.

 

शिवांपासून तर जगभरातल्या सगळ्यांचे संसार ज्यांच्यामुळे सुरळीत चालले आहेत अशा गृहिणींच्या रुपात असणाऱ्या अन्नपूर्णेला नमन


*विनय मधुकर जोशी*


गुढी पाडव्याविषयी

 हिंदू नूतन वर्षभिनंदन!!


गुढी पाडव्याविषयी सनातन संस्थेने लिहिलेल्या विविध लेखातील माहिती एकत्रित केली आहे. 


ब्रह्मध्वज पूजन चैत्र प्रतिपदा अर्थात गुढी पाडवा - जसा हिंदूंचा कुठलाही सण हा मौजमजेचा विषय नाही, तर मांगल्य, पावित्र्य, चैतन्य यांचा आनंदसोहळा आहे, तसाच गुढीपाडवाही आहे. गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा म्हणजे प्रत्येकी एक अन् कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे अर्धा, असे साडेतीन मुहूर्त आहेत. या साडेतीन मुहूर्तांचे वैशिष्ट्य असे की, इतर दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी मुहूर्त पहावा लागतो; या दिवशी मात्र मुहूर्त पहावा लागत नाही. या दिवसांतील कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते.


चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास अर्थात गुढीपाडवा साजरा करण्यास *नैसर्गिक*, *ऐतिहासिक* आणि *आध्यात्मिक* कारणे आहेत.


*नैसर्गिक महत्त्व* – वसंत ऋतूच्या प्रारंभाचा दिवस


*ऐतिहासिक महत्त्व* - रामाने वालीचा वध या दिवशी केला, शालिवाहन शक चालू झाल्याचा दिवस


*आध्यात्मिक महत्त्व* - ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.


बांबू हे सुषुम्ना नाडीचे प्रतीक असून त्यातून शरिरात सर्वत्र चैतन्यशक्ती (कुंडलिनी शक्ती) कार्य करते. तिची आराधना करून आणि ती जागृत होऊन त्याद्वारे कार्य करण्यासाठी तिला आवाहन करणे, यासाठी ही पूजा केली जाते. त्या शक्तीला सजवले जाते; म्हणून बांबूला वस्त्र नेसवले जाते.


गुढीला कडूलिंब का लावतात ? कडूलिंब हा कडू असला, तरी तो गुणकारी आहे. सत्य हेसुद्धा कडू असते. यासाठी गुढीला ते लावतात. हा वनस्पतीचा सत्कार आहे.


गुढीवर उलटा लावलेला कलश (तांब्याचा तांब्या), हा ज्ञानशक्तीचे प्रतीक आहे. तो कळस (शिखर) आहे. ते गाठणे म्हणजे यशस्वी होणे होय.


गुढी सूर्योदयानंतर लगेच उभारावी. बांबू स्वच्छ करून भगव्या, हिरव्या किंवा पिवळ्या रंगाची साडी, गाठी, कडुनिंबाची पाने आणि आंब्याची पाने आणि फुलांचा हार या बांबूला बांधावा. भूमीवर पाट ठेवून कळलेल्या स्थितीत उभी करावी. तांब्याच्या कलशावर स्वस्तिक काढून तो उपडा ठेवावा. 


बांबू हे सुषुम्ना नाडीचे प्रतीक असून त्यातून शरिरात सर्वत्र चैतन्यशक्ती (कुंडलिनी शक्ती) कार्य करते. तिची आराधना करून आणि ती जागृत होऊन त्याद्वारे कार्य करण्यासाठी तिला आवाहन करणे, यासाठी ही पूजा केली जाते. त्या शक्तीला सजवले जाते; म्हणून बांबूला वस्त्र नेसवले जाते.


गुढीवर उलटा लावलेला कलश (तांब्याचा तांब्या), हा ज्ञानशक्तीचे प्रतीक आहे. तो कळस (शिखर) आहे. ते गाठणे म्हणजे यशस्वी होणे होय.


गुढीला कडूलिंब का लावतात ? कडूलिंब हा कडू असला, तरी तो गुणकारी आहे. सत्य हेसुद्धा कडू असते. यासाठी गुढीला ते लावतात. हा वनस्पतीचा सत्कार आहे.


कडुनिंबाची फुले, कोवळी पाने, चण्याची भिजलेली डाळ किंवा भिजलेले चणे, मध, जिरे आणि थोडासा हिंग एकत्र मिसळून प्रसाद तयार करावा व तो सर्वांना वाटावा.


कडुलिंबाची कोवळी पाने अणि फुले, मिरे, हिंग, मीठ, कैरी, साखर अन् चिंच हे सर्व साहित्य एकत्र करून ते चांगले वाटावे आणि औषध म्हणून घ्यावे. 

जून पानांत शिरा असतात आणि त्यामुळे त्यांच्यातील औषधी गुण अल्प होतो; म्हणून विशेषकरून मिळतील तितकी कोवळी पानेच घ्यावीत.

आयुष्यातील हार

 *आयुष्यातील हार*

🏵 | 🏵 | 🏵 | 🏵 | 🏵


मी जगदीश महाजन. मी रिटायर्ड क्लास वन आँफिसर आहे. ही आमची पहिलीच फाँरेन टूर आहे" बँकाँकच्या हाँटेलमध्ये मी सगळ्या ग्रुपला माझी ओळख करुन दिली.


"साहेबांनी त्यांची अपूरी ओळख आपल्याला करुन दिलीये." आमचा ग्रुप लिडर सर्वांना सांगू लागला. "तुम्हाला कल्पना नसेल पण साहेबांचे आपल्या मुख्यमंत्र्यांशी खुप जवळचे संबंध आहेत. आमदार, खासदारांसोबत तर त्यांची रोजची बैठक असते"


सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मी मनातून खुष झालो पण मी तसं चेहऱ्यावर दाखवलं नाहीं. हळूहळू सगळे आपला परीचय करुन देऊ लागले. बऱ्याच जणांची ही पहिलीच विदेशवारी होती तर काही जणांची दुसरी किंवा तिसरी. सर्वात शेवटी एक साधारण कपडे घातलेला एक माणूस उभा राहिला. त्यांच्या कपड्यांमुळे म्हणा किंवा सगळ्यांना जेवणाचे वेध लागले होते त्यामुळे म्हणा कुणी त्याला गांभीर्याने घेण्याच्या मुडमध्ये नव्हतं.


"मी सदानंद पाठक आणि ही माझी पत्नी मीनाक्षी पाठक. मी एका शैक्षणिक संस्थेत क्लार्क म्हणून काम करतो. आमची ही नववी फाँरेन टूर आहे" त्या हाँलमध्ये एकदम शांतता पसरली.मला तर आश्चर्याचा धक्काच बसला.


"आतापर्यंत आम्ही भुतान, श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया, हाँगकाँग, जपान या देशात जाऊन आलोय. पुढील वर्षी युरोप टूरला जायचा विचार करतोय"


अजूनही लोक धक्क्यातून बाहेर आले नव्हते. एका मामुली कारकुंड्याने इतक्या फाँरेन टुर्स कराव्या हे कुणाच्या पचनी पडत नव्हतं.


"पाठक तुम्ही एकटे गेले होतात की सहकुटूंब?" मी विचारलं


" सहपत्नीक!तसं मुलांनाही तीनचार देशात घेऊन गेलो होतो पण त्यांच्या शिक्षण आणि करीयरमुळे सगळ्या देशात नेता आलं नाही"


" पाठक शैक्षणिक संस्थेत चांगला हात मारलेला दिसतोय तुम्ही" मी म्हंटलो तसा एकच हशा पिकला. पण पाठक गंभीर होता.


" अहो साहेब जवळजवळ सगळ्या शैक्षणिक संस्था राजकारण्यांच्या हातात असतांना एक मामुली कारकून काय हात मारणार आहे?"


सगळे शांत झाले.


"आम्हांला दोघांनाही प्रवास आणि पर्यटनाची आवड" पाठक पुढे बोलू लागला "जगप्रवास हे आमचं ध्येय होतं. पण कमाई तर तेवढी नव्हती. बचत हा एकमेव मार्ग होता तो आम्ही अवलंबला....."


तेवढ्यात जेवण तयार झाल्याची बातमी घेऊन एक माणूस आला. सगळे उठले. पण मी पाठकला सोडणार नव्हत़ो. मी त्याला म्हंणालो.


पाठक तुमच्याशी सविस्तर बोलायचं होतं"

"जेवण झाल्यावर या ना साहेब रुममध्ये. या, छान गप्पा मारु"


ते सगळे जेवायला गेले मी मात्र रुमकडे पळालो. दोन पेग मारल्याशिवाय मला झोप आली नसती. जेवण झाल्यानंतर मी सौ. ला घेऊन पाठकच्या रुममध्ये गेलो.


"पाठक मला उत्सुकता आहे की हे सगळं तुम्ही कसं जमवलंत. इतक्या फाँरेन टुर्स, त्याही कमी पगारात!" मी विचारलं.


"सर विशेष काही नाही आम्ही आमची लाईफस्टाईल फार साधी ठेवली. फालतू खर्च करायचा नाही हे ठरवून टाकलं. आमच्याकडे आजही टिव्ही, अँड्रॉइड मोबाईल, होम थिएटर असं काहीही नाही. टू व्हिलर आता मुलानं घेतली तीही अगदीच गरज होती म्हणून. मी, माझ्या बायकोनं आतापर्यंत सगळं आयुष्य सायकलवर काढलं. बायको चांगली सुगरण असल्याने कधी हाँटेलिंग केलं नाही. हाँटेलचे सर्व पदार्थ ती घरीच करते"


"याचा अर्थ तुम्ही आयुष्यात एंजाँयमेंट काहीच केली नाही. अहो त्या वहिनींनाही जीव आहे. कधीतरी स्वयंपाकाचा कंटाळा त्यांनाही येतच असणार ना?"


पाठक हसला.


"साहेब एंजाँयमेंटचा अर्थ चमचमीत नाँनव्हेज खाणं, दारु पिणं, चारीत्र्यहीन पात्रांच्या आणि सासूसुनांच्या कारस्थानांच्या सिरीयल्स पहाणं हा असेल तर तो आम्हांला अमान्य आहे. चांगली पुस्तकं वाचणं, चांगलं संगीत ऐकणं, निसर्गात फिरणं, फुलांचं, पक्ष्यांचं निरीक्षण करणं, प्रवास करणं, प्रवासात भेटणाऱ्या व्यक्तींशी संबंध जुळवणं, त्यांच्या संस्कृतींचा अभ्यास करणं यातही एक पाँझिटिव्ह एंजाँयमेंट आहे असं तुम्हाला नाही वाटत? आता राहीला प्रश्न बायकोच्या स्वयंपाकाच्या कंटाळ्याचा, तर तुम्हाला सांगतो साहेब आमच्या घरातला प्रत्येकजण उत्कृष्ट स्वयंपाकी आहे त्यामुळे आम्ही आलटून पालटून स्वयंपाक करतो. स्त्री पुरुष समानता आमच्या घरात नेहमीच राहीली आहे."


बापरे हे काहीतरी वेगळंच प्रकरण होतं. मी विषय बदलत म्हंटलं "बरं ते जाऊ द्या. मुळ विषयाकडे येऊ या"


"हं तर बचतीबरोबरच अँडिशनल इन्कमसाठी मी दुकांनांचे, छोट्या फर्म्सचे अकाऊंट्स लिहायला सुरुवात केली. मिसेसने पोस्टाची एजन्सी घेतली. मुलं मोठी झाल्यावर मुलीने शिकवण्या घ्यायला तर मुलाने गँरेजवर काम करायला सुरुवात केली. कोणत्याही कामाची लाज बाळगायची नाही हे आम्ही मुलांच्या मनावर बिंबवलं होतं"


"पण मग मुलांची शिक्षणं व्यवस्थित झाली का?"


" मुलं जात्याच हुषार आणि सिन्सियर होती.स्काँलरशिप मिळवून त्यांनी शिक्षणं पुर्ण केली. मला फक्त परिक्षेचा फाँर्म भरण्यासाठी ती पैसे मागत."


"आता काय करतात मुलं?"


"मुलगी साँफ्टवेअर इंजीनियर आहे. तिने एम.एस. केलंय अमेरिकेतून. सध्या बंगलोरला असते.तिचा नवराही इंजीनियर आहे. दोघांनी कंपनी सुरु केलीय. मस्त चाललंय तिचं. मुलगा नुकताच एम.डी. झालाय मेडिसीनमध्ये. सध्या एका हाँस्पिटलला प्रँक्टिस करतोय. लवकरच स्वतःचं हाँस्पिटल उभारायचा विचार करतोय"


मी चाट पडलो. मला माझी मुलं आठवली. मुलीने काँलेजमध्ये अनेक लफडी केली होती. लग्नाअगोदरच ती प्रेग्नंट राहीली होती. ते प्रकरण निपटतांना माझ्या नाकी नऊ आले होते. प्रचंड हुंडा देऊन मी तिचं लग्न लावून दिलं होतं, पण तिथेही ती व्यवस्थित रहात नव्हती. भांडणं करुन माहेरी निघून येणं सुरुच होतं. मुलाने तर नाकात दम आणला होता.काँलेजमध्ये असतांना मारामाऱ्या करणं, मुलींची छेड काढणं, गुटखा खाणं. दारू पिणं एवढेच त्याचे उद्योग होते. माझ्या ओळखींमुळे मी त्याच्या भानगडी निस्तरल्या होत्या. काँलेजमधून काढून मी त्याला बियरबार काढून दिला. आम्हांला न जुमानता एका टुकार मुलीशी त्याने लग्न केलं होतं. तिच्याशीही त्याचं पटत नव्हतं. दारु पिऊन तो तिला मारहाण करायचा. घरात रोज घडणाऱ्या महाभारताला कंटाळूनच आम्ही बँकाँकच्या टूरला आलो होतो.


"आमचा औषधाचाही खर्च नगण्य आहे" पाठकच्या बायकोच्या बोलण्यामुळे माझीतंद्री भंगली.


"सायकल चालवण्यामुळे किंवा कुठेही पायी जात असल्यामुळे आम्ही एकदम फिट आहोत. लोक आम्हांला कंजूष म्हणतात पण याचे फायदे त्यांना दिसत नाहीत. बघा औषधाची एक गोळी नाही लागली आम्हांला. तोही खर्च आमचा वाचला."


मी माझ्या सुटलेल्या पोटाकडे पाहिलं मग बायकोकडे पाहिलं. आम्ही दोघांनीही वजनाची शंभरी पार केली होती. तुलनेत पाठक पतीपत्नी चाळीशीतले वाटत होते. पाठकची बायको तर अजुनही चवळीची शेंग वाटत होती.


"साहेब तुमच्याबद्दल सांगा ना काही!" पाठक बोलला.


"आमचं ठिकच आहे.औरंगाबादला या .तिथे आमचा मोठा बंगला आहे दोन कोटीचा. मुंबई, पुणे, नाशिक इथेही आमचे फ्लँटस् आहेत. गावी पाचशे एकर जमीन आहे. मुलगा बियरबार चालवतो. मुलगी पुण्यात दिलीय" मी थोडं मग्रुरीनेच सागितलं.


‌"अरे वा छान. आम्ही पण औरंगाबादमध्येच रहातो. आमचं घर मात्र छोटंसं आहे. पण काहो साहेब एवढी सगळी प्राँपर्टी फक्त पगारावर जमवली? की काही साईड बिझीनेसही आहे तुमचा?"


‌मी जोरात हसलो. हे सगळं मी भ्रष्टाचार करुन कमवलं होतं.दोन तीनदा मी पकडलाही गेलो होतो पण मंत्र्यांच्या क्रुपेने सहीसलामत सुटलो होतो.


‌"अहो पाठक समजून घ्या. एका सरकारी खात्यातला मी वरीष्ठ अधिकारी! सरकारी खात्यात काय चालतं हे तुम्हालाही माहीत आहे. मला म्हणूनच तर मला आश्चर्य वाटलं की साधारण नोकरी असूनही तुम्ही हे सर्व जमवलं कसं?"


‌" साहेब तुम्ही पैसा कमवण्यात आयुष्य घालवलं. मी आनंद मिळवण्यात. अर्थात पैसा कमवण्यातही आनंद मिळतोच की!"

‌पाठकने जणू माझ्या थोबाडीतच मारली होती. पण त्याने माझी शान कुठे पाहिली होती?


‌"घरी या एकदा पाठक. पैसा काय काय घडवू शकतो हे समजेल तुम्हांला"


‌पाठक निर्मळ हसला. मग म्हणाला.

‌"पैसेवाल्यांचे थाटच वेगळे असतात साहेब. आमच्या झोपडीला तुमचे चरणस्पर्श होऊ द्या. ते झाले की आम्हांलाही तुमच्याकडे यायला बरं वाटेल"


‌"हरकत नाही.येऊ आम्ही. बरं आता रजा घेतो.गुड नाईट"


‌आम्ही रुमवर परतलो पण मला झोप काही लागेना. कमी पैशातही अनेक गोष्टी करता येतात हे पाठकने मला दाखवून दिलं होतं. 


खरोखर पैशाच्या मागे लागून मी खरं आयुष्य जगलोच नव्हतो. व्यसनांमुळे आणि शरीराकडे दुर्लक्ष केल्यामुळे माझं शरीर सगळ्या आजारांचं माहेरघर झालं होतं. अतिवजन, बी.पी. डायबेटीस, खराब लिव्हर, गुडघेदुखी, स्पाँडिलायटीस, निद्रानाश... कोणते आजार नव्हते मला? अजून साठी गाठली नव्हती तरी सत्तरीचा म्हातारा दिसत होतो. थकव्यामुळे मी बँकाँकचं साईटसिईंगही एंजॉय करु शकलो

‌नव्हतो.

‌ बँकाँकहून परतल्यावर काही दिवसांनी मला पाठकची आठवण झाली. मी त्याला फोन करुन रविवारी येत असल्याचं सांगितलं. त्याने त्याचा पत्ता दिला. फोनवर तरी त्याला आनंद झाल्याचं जाणवलं.

पाठकला इंप्रेस करण्यासाठी मी मुद्दाम माझी आलिशान कार घेऊन गेलो. रस्त्यावर पाठक आमची वाटच पहात होता. मी त्याच्या घरावर नजर टाकली.एक छोटंसं एकमजली घर होतं ते. माझा बंगला त्याच्या तिप्पट मोठा होता.


‌"या साहेब, या मँडम" पाठकने आमचं स्वागत करत गेट उघडलं. आत पाऊल टाकताच आतली छोटीशी बाग नजरेस पडली. फुलझाडांनी गच्च भरलेली.मुख्य दरवाजासमोर सुंदरशी रांगोळी काढली होती.आम्ही आत प्रवेश केला. पाठकच्या बायकोने समोर येऊन आमचं हसून स्वागत केलं. आत शिरताच जाणवलं ते स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण. हाँलमध्ये थोडंसं पण सुबक फर्निचर होतं.भिंतीवर दोनच पण सुरेख पेंटिंग्ज होती. टिपाँयवर आणि एका भिंतीच्या कोपऱ्यात ताज्या फुलांचे फ्लाँवरपाँटस् होते. शोकेस ट्राँफिजने भरलेलं होतं.


‌"बापरे इतक्या ट्राँफिज!कुणाच्या आहेत या?" माझ्या तोडातून नकळत शब्द निघून गेले.


‌"सगळ्यांच्याच! मुलीच्या गायन स्पर्धेच्या, मुलाच्या वक्तृत्व आणि नाट्य स्पर्धेच्या, सौ च्या रेसिपी स्पर्धेच्या आणि माझ्या बँडमिंटन स्पर्धेतल्या"


‌"वा छान" मी चांगलाच इंप्रेस झालो.


‌"या साहेब तुम्हाला घर दाखवतो. अर्थात तुमच्या बंगल्याच्या तुलनेत झोपडीच म्हणायला हवी"


‌मी सहमत असल्याचं स्मित केलं. पण आम्ही जसजशी एकेक रुम पहायला लागलो तसतसा माझा गर्व नाहीसा होत गेला. एकुण एक खोली पाठक कुटूंबाच्या स्वच्छ चारित्र्याची, कल्पकतेची, रसिकतेची, कलात्मकतेची, आनंदी व्रुत्तीची, एकमेकांवरील प्रेमाची प्रतिबिंब होती. छोटंसं असूनही ते घर अप्रतिम होतं.


‌बैठकीत परत येऊन मी माझ्या घराचं चित्र डोळ्यासमोर उभं केलं आणि निराशेचं मळभ माझ्या मनावर दाटून आलं. एवढा मोठा बंगला महागड्या, आधुनिक पण अभिरुचीहीन वस्तूंनी सजला होता. पण त्यात प्रेम, संस्कार, संस्कृतीचा पुर्णपणे अभाव होता. मला जाणवलं, पैसा नसूनही पाठक माझ्यापेक्षा विचाराने, चारित्र्याने, कर्तृत्वाने नक्कीच श्रीमंत होता.


‌"घ्या साहेब" पाठकच्या बायकोने माझ्यासमोर शिरा-पोह्याची डिश ठेवली. त्यांच्या वासानेच माझी भुक खवळली. मी चमच्याने त्याचा घास घेतला आणि एका अप्रतिम चवीची नोंद माझ्या मनाने घेतली.


‌"वा अप्रतिम!" मी पाठककडे पहात म्हणालो.


‌"साहेब तुम्ही जेवणाचं नाही म्हणालात नाहीतर आम्ही एक वेगळाच मेनू आम्ही ठरवला होता"


‌"अशी सुरेख चव असेल तर जेवायला यावंच लागेल" मी पहिल्यांदाच कुणाची इतकी स्तुती करत होतो.


‌आमचा चहा झाल्यावर पाठकचा मुलगा आला. ओळख करुन दिल्यावर तो माझ्या आणि सौ.च्या पाया पडला.


‌"हाँस्पिटलचं काम कुठपर्यंत आलंय. तुझे वडिल मदत करणार असतील ना तुला!"

‌मी मुद्दामच तिरकस प्रश्न विचारला.


‌"बाबांची मदत घ्यायचीच कशाला काका? अहो आमच्यासाठी त्यांनी काय नाही केलं? आम्हाला एवढं शिकवलं, मोठं केलं. त्यांनी आणि आईने आपल्या कष्टाने शुन्यातून उभं केलेलं हे विश्व आम्ही लहानपणापासून पहातोय. अजून कीती अपेक्षा करायची आम्ही त्याच्याकडून? आणि उडू द्या ना आमच्या पंखांनी आम्हाला! त्यांची मदत घेतली तर आम्हांला कायमची रुखरुख लागेल आम्हांला की त्यांच्या मदतीमुळेच आम्ही मोठे झालो"


‌त्याच्या सडतोड पण उत्तराने मी गार पडलो. त्या उत्तरात आईवडिलांविषयी आदर होता. त्यांनी केलेल्या कष्टांची जाणीव होती. हे असे संस्कार मी मुलांना का देऊ नाही शकलो याचं मला दुःख झालं. दोन पिढ्या बसून खातील एवढी माया मी जमवली होती ती काय मुलांना निष्क्रिय, ऐतखाऊ बनवण्यासाठी? मला स्वतःचीच घ्रुणा वाटू लागली.


‌पाठक कुटूंबाचा निरोप घेऊन निघालो.पण मी दुःखाने जळत होतो. ज्याला मी माझं कर्तृत्व समजत होतो ते पाठक कुटूंबाने मातीमोल केलं होतं. मला माझ्या कुटूंबाची, संपत्तीची लाज वाटू लागली होती.


दिवस बदलत गेले. निवडणूका झाल्या. माझ्या ओळखीचे आमदार, खासदार पराभुत झाले. सरकार बदललं. पण मला काळजी नव्हती.कारण मी आता नोकरीत नव्हतो.


‌एक दिवस सकाळीच दाराची बेल वाजली. मी दार उघडलं. बाहेर ४-५ सुटाबुटातील माणसं उभी होती.


‌"आम्ही इन्कमटँक्स डिपार्टमेंट कडून आलोय."त्यातल्या एकाने कार्ड माझ्या हातात देत दिलं. मी गारठलो, माझे हातपाय थरथर कापू लागले.


‌"मी माझ्या वकिलाशी बोलू शकतो?" मी कापऱ्या आवाजात विचारलं.


‌" जरुर बोला! त्यांना दाखवण्यासाठी सगळी कागदपत्र आहेत आमच्याकडे"


‌"अहो पण साहेब मी आता रिटायर झालोय"


‌"साहेब जरुरीपेक्षा जास्त संपत्ती जमवली की आपोआपच हितशत्रू तयार होतात. विरोधी पक्षांकडे तर तुमची कुंडलीच तयार असेल" तो स्मित करत म्हणाला. 


मला सगळा अंदाज आला. ते ऐकून मी सुन्न झालो. ‌दुपारी तीन वाजेपर्यंत बंगल्याची झडती सुरु होती. मुलगा आणि बायको निर्विकार नजरेने त्याकडे बघत होते. सुनेच्या चेहऱ्यावर कपटी हसू होतं. 'आता भोगा आपल्या पापाची फळं' अशाच त्यांच्या नजरा मला सांगत होत्या.


‌"चला साहेब" झडतीत सापडलेले बेहिशोबी ₹२५ लाख आणि दोन किलो सोन्याच्या चिप्स् दाखवत एक अधिकारी म्हणाला.


‌"कुठे?"


‌"चौकशीसाठी आम्ही तुम्हांला ताब्यात घेत आहोत"


‌मी मुकाट्याने गाडीत जाऊन बसलो. ‌मला अचानक पाठकची आठवण आली.


‌"साहेब एक फोन लावू?" मी विचारलं.


‌"नो पाँलिटिकल इन्फ्लुएन्स"


‌"साहेब हा माणूस साधा कारकून आहे"


‌"ठिक आहे.स्पिकर आँन करा"


‌मी पाठकला फोन लावला.


‌"हँलो पाठक मी महाजन बोलतोय! पाठक तुम्ही जिंकलात.मी हरलो"


‌"काय झालं साहेब?असं का बोलताय?"


‌"पाठक इन्कमटँक्सची धाड पडली आज बंगल्यावर! मी पकडला गेलो."


‌क्षणभर शांतता पसरली. मग पाठकचा आवाज आला.


‌"साहेब तुम्हाला सोडवण्याइतका मी मोठा माणूस नक्कीच नाही, पण मी तुमच्या सुटकेसाठी जरुर प्रार्थना करेन. जे गैरमार्गाचं धन होतं ते गेलं तर जाऊ द्या. तुम्हांला पेन्शन भरपूर असेल साहेब. तुमच्या एका महिन्याच्या पेन्शनमध्ये भारतातील अनेक कुटुंबं सहा महिने संसार करतात. सुटून आल्यावर साधं आयुष्य जगा. गोरगरीबांना मदत करा. घेण्यापेक्षा देण्यात खुप आनंद असतो साहेब, काही काळजी करु नका. सगळं व्यवस्थित होईल"


‌का कुणास ठाऊक पाठकशी बोलल्यानंतर मला हलकं वाटू लागलं.येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची हिंमत मला आली.सगळी संपत्ती जप्त झाली तरी चालेल.नाहीतरी ज्यांच्यासाठी कमवली त्यांना कोणती माझी किंमत होती?साधी सहानुभूती सुध्दा त्यांनी मला दाखवली नव्हती.

‌पाठकच्या रुपात एक खरा हितचिंतक मला भेटला होता.पण तो अगोदर का भेटला नाही याची खंत मला वाटून गेली.


कथाविश्व वरून साभार




Monday, July 29, 2024

"कर्मा रिटर्न्स

 *सुखी व्हायचं आहे का ? मग...*

*"कर्मा रिटर्न्स" हे विसरू नका !*


एका सुंदर शहरात छान बंगल्याची एक कॉलनी होती. त्या कॉलनीत एक बंगला बरेच दिवस रिकामा असतो. त्यामुळे शेजारच्या बंगल्यातील मंडळी त्यांच्या बागेतला कचरा रात्री हळूच या बंद असलेल्या बंगल्याच्या आवारात टाकून देत असत. त्यामुळे तिथं कचऱ्याचा भला मोठा ढीग साचलेला. 

अशातच एक दिवस त्या बंद बंगल्यात एक तरुण जोडपं राहायला येत. कंपाउंड दार उघडून ते आत येताच समोर हा कचऱ्याचा ढीग दिसतो. ती चिडते, वैतागते. हे असं कुणी केलं असेल यावर तडफड व्यक्त करते. तो मात्र शांत असतो. तिला "आधी आत तर जाऊया" असं हसून म्हणत तिला आत घेऊन येतो. येतानाच बाहेरून जेवून आल्याने आता हाताशी वेळ असतो. तर तो तिला म्हणतो, "गॅलरी त्यातल्या त्यात स्वच्छ दिसतेय तर तू  तिथं थोडा आराम कर" असं म्हणून तिला तिथं बसवून हा पठया हातात झाडू घेऊन आधी पूर्ण घर साफ करतो. नंतर बागेत येतो. तिथला कचऱ्याचा ढीग नीट एका कोपऱ्यात नेतो. बागकामासाठी लागणारी हत्यारे तिथेच बागेत एका छोट्या कपाटात असतात. त्यातून तो कुदळ फावडे घेऊन एक छोटा खड्डा तयार करतो. त्यात हा कचरा टाकून वरती थोडी माती व पाणी शिंपडून खड्डा बंद करतो. 

नंतर पाईप घेऊन त्याने पूर्ण बागेच्या परिसरात मस्त पाणी मारतो. मरगळलेली ती झाडे आता एकदम तरारून येतात. जमिनीवरची हिरवळ देखील जणू खुश होऊन डोलू लागते. एक प्रकारचं चैतन्य तिथं अवतरत. अन त्याच्या लक्षात येतं की बागेत मस्त आंब्याचे, चिकूचे, पेरूचे झाडे आहेत. त्या झाडाला मग तो थोडं पाणी टाकून ठेवतो. 

*

हे करता करता संध्याकाळ होते. तोही थकून गेलेला असतो. तोवर ती हि आतून बाहेर येते. म्हणते, "मी आतलं सामान बऱ्यापैकी लावलं आहे. मात्र आता किचनचा कंटाळा आलाय रे"

तो म्हणतो, "हरकत नाही, आपण बाहेर जाऊया. थोडं फिरणं पण होईल अन येताना खाऊन येऊ"

त्याप्रमाणे दोघे तयार होऊन बाहेर जातात. 

त्या दरम्यान शेजारच्या त्या बंगल्यातले लोक तोवर हे सगळं पाहत असतात. मात्र रोजच्या सवयीने रात्रीच्या अंधारात ते स्वतःचा कचरा या स्वच्छ केलेल्या बंगल्यात टाकतात. अन दार बंद करून आत बसतात. 

हे तरुण जोडपं जेव्हा फिरून खाऊन घरी येत तर दिसत की पुन्हा शेजारच्यांनी कचरा टाकला आहे. ती आता मात्र खवळते. "मी बघतेच त्यांच्याकडे" असं म्हणून ती शेजारी जायला निघणार इतक्यात तो तिला थांबवतो अन हसून म्हणतो, "तू आत जा. बाकी सोड माझ्यावर"

असं म्हणून तिला आत पाठवून तो पुन्हा खराटा घेऊन तो कचरा गोळा करून त्या दुपारी केलेल्या खड्ड्यात टाकून पाणी टाकून ठेवतो. 

*

असे रोजच होऊ लागते. शेजारचे अंधाऱ्या रात्री कचरा टाकून जात अन हा खराटा घेऊन तो खड्ड्यात टाकून ठेवत असे. हळूहळू त्या खड्ड्यातील कचऱ्याचे मस्त सेंद्रिय खत तयार होते. ते खत तो बागेतल्या फळझाडांना टाकत राहतो. त्यामुळे लवकरच त्या झाडाला मस्त फळे येतात. 

अन त्या दिवशी तो एक धमाल निर्णय घेतो. 

नेहमीप्रमाणे रात्री शेजारचे कचरा टाकून जातात. तो हा कचरा गोळा करून शोष खड्ड्यात टाकतो. अन सकाळी उठल्यावर त्या बागेतली झकास अशी तयार झालेली फळे तोडून एका टोपलीत भरून ती टोपली घेऊन शेजारच्या घरी जातो. बेल वाजवतो. आतून तिथली मंडळी पिप होलमधून पाहतात तर हा तरुण दिसतो. ते शेजारी गडबडतात की आता भांडायला आला की काय ? असं म्हणून ते भांडणाच्या तयारीत दार उघडतात तर समोर हा तरुण हसतमुखाने हातातली फळाची टोपली त्या शेजार्याला देतो. 

शेजारी चकित होतो. शेवटी ओशाळून तोच म्हणतो की, "आम्ही रोज कचरा टाकत होतो तरी तुम्ही भांडण करत नाहीत तर उलट आम्हालाच फळे द्यायला आलात. हे कसे काय?"

तर तो तरुण म्हणाला, 

*ज्याच्याकडे जे असते ते तो देत असतो.*

तुमच्याकडे कचरा होता तो तुम्ही दिला. माझ्याकडे फळे होती ती मी दिली, 

उलट यामध्ये पण तुमचेच आभार मानेल की तुम्ही दिलेल्या कचऱ्यामुळे माझ्या झाडाला लवकर फळे आली. थँक्स"

असं बोलून शांतपणे तो तरुण निघून येतो. 

*

डीडी क्लास : मित्रमैत्रिणींनो, एक नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला सुखी व्हायच असेल तर एकच गोष्ट विसरू नका. कर्मा रिटर्न्स हे तर असतंच. तुम्ही चांगले केले तर त्याचे फळ चांगले मिळणार, मात्र त्याचवेळी समोरच्याने वाईट कृत्य केले तरी त्याला माफ करून त्याच कृत्यातून पॉजिटीव्ह असे काहीतरी काय करता येईल हे पहा. (जसे त्या तरुणाने कचऱ्याचे खत केले) मग तुमच्या मनाला शांतता लाभेल. चिडचिड होणार नाही. 

*"अमुकने माझ्या आयुष्याचे वाट्टोळे केले"*

असं काहीजण म्हणतात. पण त्यात तथ्य नसते. कुणीच कुणाचे असे वाट्टोळे करत नसतो तर तुम्हीच काहीतरी वाईट कर्म केलेले असते तर तेच रिटर्न तुमच्याकडे आलेले असते. हे कळले तर जीवन सुखकर होईल. 

*कर्म हे असे एक हॉटेल आहे,*

*जिथे ऑर्डर द्यावी लागत नाही.*

*तिथे तुम्हाला तेच मिळते*

*जे तुम्ही शिजवलेले असते.*

कुठेतरी मस्त ऐकण्यात आलेलं ते शेवटी सांगतो अन थांबतो. 

"दाग तेरे दामन के धुले न धुले 

नेकी तेरी कही तुले न तुले 

मांग ले गलतियो कि माफी 

कभी तो खुदसे हि 

क्या पता ये आँखे 

कल खुले न खुले !


*-ˋˏ ༻•••••❁•••••༺ ˎˊ-*

_संकलन_

*_प्रा. माधव सावळे_*

प्रारब्ध

 चिंतन 

             श्रीराम,

तापत्रय म्हणजे तीन प्रकारचे ताप. आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप, आधिभौतिक ताप. हा आधिभौतिक ताप ईश्वराच्या नियोजनाखाली होत असतात. प्रचंड पावसाने अचानक डोंगर खचतो.. किंवा शेजारची बिल्डिंग पडते.. त्याच्या खाली अनेकजण गाडले जातात आणि दुसऱ्या घराला काही होत नाही! असे कसे?

                 जेव्हा घडणारी प्रत्येक गोष्ट त्या त्या व्यक्तींच्या प्रारब्धात असल्याने घडत असते.असे लक्षात ठेवले तर देवा, माझ्याच बाबतीत तू का निष्ठूर होतास? असा प्रश्न मनात येणार नाही. माझ्या प्रारब्धात हेच त्याने लिहिले होते.. असे प्रत्येक घडीला म्हणता आले पाहिजे.

                 दुसऱ्यांच्या नशिबात जर काही वाईट घटना घडली तर आपण पटकन म्हणतो की, तिचे नशीब खोटे, तिच्या प्रारब्धात असे लिहिले असेल. पण स्वतःच्या बाबतीत काही घडले तर मात्र ते पटकन स्वीकारले जात नाही कारण परिस्थिती स्वीकारण्याची मानसिकता नसते. ही मानसिकता नसणे म्हणजे ईश्वराशी शरणागती नसणे होय.

                    सदाचाराने वागून, निरपेक्ष भावनेने

वागून घडणारी प्रत्येक घटना त्याच्या इच्छेने होत आहे असे स्वीकारणे म्हणजे सद्गुरूंच्या प्रती, ईश्वराप्रती शरणागती आहे असे म्हणता येईल.

                      ||श्रीराम ||

Sunday, July 28, 2024

दीपस्तंभ

 *तसे पाहिल्यास* 

*"  श्रीराम " आणि " श्रीकृष्ण "*

 *हे  दोघेही भारतीय इतिहासातील दोन अतुल्य महानायक आहेत. !!* 


*एकाने "अयोध्या ते रामेश्वर" पर्यंतचा*

 *तर दुसऱ्याने "द्वारका ते आसाम" पर्यंतचा भूभाग आपल्या चरित्राद्वारे सांधत. गेली हजारो वर्षे ह्या भारतभूमीला संस्कारांच्या अनोख्या बंधनात बांधून ठेवले आहे.!*


*तस तर दोघांच्या चरित्रात जन्मापासूनच किती विरोधाभास आहे नाही कां?.* 


*एकाने जन्म घेतला तो  रणरणत्या उन्हात आणि तो ही भरदुपारी, तर दुसऱ्याने जन्म घेतला तो मुसळधार पावसात आणि तो  ही मध्यरात्री !!* 


*एकाचा जन्म राजमहालात तर दुसऱ्याचा जन्म कारागृहात !!*


*साम्य म्हणाल तर दोघांच्याही हातून पहिल्या मारल्या गेल्या त्या राक्षसिनीच.....*  


*एकाकडून त्राटिका आणि दुसऱ्याकडून पुतना!* 


*शबरीची बोरे आणि सुदाम्याचे पोहे  हे त्यांच्या मनमिळाऊ मैत्रीपूर्ण स्वभावाचे उदाहरण म्हणून आजही सांगितले जाते.* 


*ज्यांच्यामुळे यांच्या चारीत्र्याला वेगळे वळण लागले त्यादोघी म्हणजे  कैकेयी आणि गांधारी या एकाच प्रांतातल्या...*


*ह्या दोघी मातांच्या कटू शब्दांना वंद्य मानत त्यां दोघांनी ही आनंदाने स्वीकारले.!!* 


*एकाने सुग्रिवाला त्याचे राज्य मिळवून दिले. तर दुसऱ्याने युधिष्ठिराला !*


*एकाने लोकापवादाखातिर पत्नीचा त्याग केला. तर दुसऱ्याने लोकापवादाची चिंता न बाळगता सोळा सहस्त्र स्त्रियांचा स्वीकार केला.!!* 


*एकाने वडिलांचे शब्दासाठी आणि क्षात्रधर्मासाठी कुटुंबीयांचा त्याग करत वनवास स्वीकारला. त्यात गैर मानले नाही. तर दुसऱ्याने क्षत्रियधर्मासाठीच कुटुंबियांवर शस्त्र उगारण्यास देखील गैर मानले नाही.*


*एकाने जन्मभूमीला स्वर्गासम मानले. तर दुसऱ्याने कर्मभूमीला स्वर्ग बनवले.*


*एकाने अंगदाकरवी शिष्टाई करुन तर दुसऱ्याने समक्ष शत्रूच्या दरबारी जाऊन शिष्टाई करत युद्धहानी टाळण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत केला.*


*एकाने समुद्र ओलांडून सोन्याची लंकापुरी नष्ट केली. तर दुसऱ्याने समुद्र ओलांडून सोन्याची द्वारकापुरी उभारली.*


*एकाने झाडामागुन बाण मारल्या गेलेल्या वालीच्या मुखातून झालेली निंदा स्वीकारली. तर दुसऱ्याने झाडामागुन बाण मारणाऱ्या व्याधाच्या हातूनच मृत्यू पत्करला.*


*पहिला  Theory.... आहे. तर...दुसरा Practical  आहे.!!* 


*दोन प्रचंड विरोधाभास असलेल्या ह्या व्यक्तीरेखा गेली हजारो वर्षे नाना विविध प्रक्षिप्त कथांचा स्वीकार करत आपल्या चारित्र्याच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता ह्या देशापुढे*


 *"दीपस्तंभ" बनून उभे आहेत आणि इथून पुढे देखील असेच रहातील.!!*


    *जय श्रीराम / जय श्रीकृष्ण*

Saturday, July 27, 2024

गोत्र

 1. प्रत्येक व्यक्तीचा जन्म गायीचा पुत्र म्हणून होतो, म्हणून त्याला गोत्र आहे.


2. प्रत्येक व्यक्तीला गो-धुळीच्या वेळी लग्नाचा मुहूर्त हवा असतो.


3. प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतर गोलोक धामला जायचे असते.प्रत्येक जीवाला गोलोकवासात जायचे असते.


4. प्रत्येक जीवाला मृत्यूपूर्वी गाय दान करून वैतरणी पार करायची असते.

           विचार करा! प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आई गाईचा आधार. पण त्याच गायीची सेवा करायला वेळ मिळत नाही.


     गोमातेविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी -


1. ज्या ठिकाणी गाय माता उभी राहून आनंदाने श्वास घेते. तिथे वास्तुदोष संपतात.


2. ज्या ठिकाणी गाय माता आनंदाने रडू लागते त्या ठिकाणी देवता फुलांचा वर्षाव करतात.


3. गाईच्या गळ्यात घंटा बांधावी; गाईच्या गळ्यात बांधलेली घंटा वाजवून गायीची आरती केली जाते.


4 गाईची शेपटी डोक्यावर फिरवून दृष्ट काढतात


5. गोमातेच्या खुरांमध्ये नागदेवता वास करते. गाई माता ज्या ठिकाणी फिरते त्या ठिकाणी साप आणि विंचू येत नाहीत.


6. गाईच्या गोठ्यात लक्ष्मीचा वास असतो.


7. गायीच्या उजव्या डोळ्यात सूर्य आणि डाव्या डोळ्यात चंद्र वास करतो.


8. गाईच्या दुधात सोन्याचे तत्व आढळते, ज्यामुळे रोग होण्याची शक्यता कमीच असते.


9. हनुमानजी मातेच्या शेपटीत राहतात. जर एखाद्या व्यक्तीला दृष्टीदोष असेल तर गायीच्या शेपटीला डोकं लावल्याने दृष्टी विकारापासून मुक्ती मिळते.


10.गाईच्या पाठीवर एक उंच वशिंड आहे, त्यात सूर्य केतू नाडी आहे. रोज सकाळी अर्धा तास गाईच्या पाठीवर हात फिरवल्याने रोग नष्ट होतात.


11. गाईला चारा खायला दिल्याने तेहतीस प्रकारातील देवतांना भोग अर्पण केले जातात.


12. गाईचे दूध, तूप, लोणी, दही, शेण आणि गोमूत्र यापासून बनवलेले पंचगव्य हजारो रोगांवर औषध आहे. याच्या सेवनाने असाध्य रोग नष्ट होतात.


13. ज्या व्यक्तीची भाग्यरेषा झोपलेली असेल, त्यांनी गूळ तळहात ठेवून गाय मातेला जिभेने चाटल्यास, मातेच्या तळहातावर ठेवलेला गूळ चाटल्यास त्या व्यक्तीची झोपेची भाग्यरेषा उघडते.


14. गाईच्या चार पायांमध्ये प्रदक्षिणा केल्याने माणूस भयमुक्त होतो.


15. महान विद्वान धर्मरक्षक गौ कर्णजी महाराज यांचा जन्म गाईच्या पोटातून झाला होता.


16. देव-देवतांनी या पृथ्वीतलावर केवळ गाय मातेच्या सेवेसाठी अवतार घेतला आहे.


17. गाय मातेने वासराला जन्म दिल्यावर पहिले दूध वंध्यत्व नसलेल्या स्त्रीला पाजल्याने तिचे वंध्यत्व संपते.


18. निरोगी गायीचे दोन तोळे गोमूत्र दररोज सात पदरी कपड्यात गाळून घेतल्यास सर्व रोग नाहीसे होतात.


19. जो गाई मातेकडे प्रेमळ नजरेने पाहतो त्याला गाईची कृपा प्राप्त होते.


20. काळ्या गायीची पूजा केल्याने नऊ ग्रह शांत राहतात. जे धर्माने गाईची पूजा करतात, ते शत्रू दोषांपासून मुक्त होतात.


21. गाय हे फिरते मंदिर आहे. आपल्या सनातन धर्मात तेहतीस देवता आहेत, आपण दररोज तेहतीस प्रकारच्या देवतांच्या मंदिरात जाऊ शकत नाही, परंतु गाय मातेच्या दर्शनाने सर्व देवता दिसतात.


22. कोणतेही शुभ कार्य रखडले असेल, वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, तर गाईच्या कानात सांगा, ते रखडलेले काम होईल.


23. गाय ही सर्व सुखाची दाता आहे.


आई तू शाश्वत आहेस! तुझे गुण शाश्वत! तुझ्या गुणांचे वर्णन करण्याएवढा मी सक्षम नाही गोसेवा हाच धर्म...🚩🚩

Friday, July 26, 2024

मन

 *"मन"......*


मन म्हणजे काय हो ? , 

त्याला कोणी पाहिलं नाही , 

कसं असते ते माहीत नाही,

पण त्याला खूप मान्सनमान असतो.


कधी ते लिक्विड असतं,  

"मन भरलं नाही" असं म्हणतो आपण, 


कधी ते सॉलिड असतं, "मनावर खूप ओझं आहे", 


कधी ते घर होतं, "मेरे मन में रहने वाली", 

कधी ते तहानलेल असतं,  "मेरा मन तेरा प्यासा" , 


कोणी त्याला मोरा ची उपमा देतं, "मन मोराचा कसा पिसारा फुलला". 


असं हे मन आयुष्य भर आपल्याला झूलवत ठेवतं , 

कधी स्वतःच्या मनाने तर कधी दुसऱ्या च्या मनाप्रमाणे आपण वागत असतो,  


हे "मन" कधीच स्थिर का बरं नसतं ? , 


ते कधी प्रेयसी च्या तोंडातून मंदिर रूप धारण करतं 

आणि ती म्हणते "मन में तुझे बिठाके ..."


काही जण असतात की त्याच्या "मनात"काही रहात नाही तर काही "मन कवडे" असतात.  


मन दिसत तर नाही

... पण त्याने ठरवले तर ते हरवून टाकतं

तर कधी शक्ती नसताना जिंकून ही देतं.


 "मनात आणलं तर काहीही होऊ शकतं .."


 जरी त्याला कोणी पाहिलेले नाही तरी ते जर चांगलं असलं तर आपण आनंदी राहतो , 

दुसऱ्या च भलं करतो,  म्हणुन म्हंटलं जातं, "मन चंगा तो .."


कधी हे खूप डेंजर असतं ,

 स्वतः कडे राग तिरस्कार साठवून ठेवतं आणि "मनातील" राग दुसऱ्याचे नुकसान करतं .


याचा वेग मोजण्याच यंत्र अजून अस्तित्वात आलेल नाही,  

तरी लोकं म्हणतात,  "मनाचा ब्रेक , उत्तम ब्रेक".


"मन" दिसत नसलं तरी तेच आपणाला घेऊन फिरत असतं , कधी घरी , कधी डोंगरदऱ्यांत, कधी आकाशात, पण ते निर्मळ असतं, पारदर्शक  असतं , 


म्हणुन च आपण म्हणू शकतो की "मोरा मन दर्पण कहलाये."

अशा या न  दिसणाऱ्या पण सर्वस्व असणाऱ्या  "मनाला" काबूत ठेवण्याचा अनेकजण प्रयत्न करतात !


पण "मनाप्रमाणे" जगता आलं नाही तर 

त्याला काही अर्थ आहे का ? 

मग ...

"मनसोक्त" जगा ! ! आणि त्यासाठी मनापासून" शुभेच्छा!

Thursday, July 25, 2024

प्रगट दिन

 श्री स्वामी समर्थ आज प्रगट दिन माहिती 


''सबसे बडा गुरू.. गुरूसे बडा गुरू का ध्यास..

और उससे बडे श्री स्वामी समर्थ महाराज...''


इ.स.१४५७ च्या सुमारास श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या. व त्यानंतर शैल यात्रेचे साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली.ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले.एके दिवशी उध्दव नावाचा लाकूडतोडया त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुर्‍हाड निसटली.व ती वारूळावर पडली. ही स्वामी महाराजांची लीलाच की त्या उध्दवाचे निमित्य साधून त्यांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुर्‍हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उध्दवासमोर एक आजानूबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज...

आपल्या हातून ह्या महापुरू्षाला जखम झाली ह्या विचाराने उध्दवाला दुःख झाले व भय वाटू लागले. पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उध्दवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरावर प्रयाण केले.गंगातीरावर भ्रमण करता करता ते कोलकत्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज ह्यांना दीक्षा दिली.

 त्यानंतर स्वामी पंढरपूर , मोहळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले.भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळया वेगळया पध्दतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले.

इसवी सन १८५६ मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोट मध्ये प्रवेश केला व तेथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात सर्व विश्वाला दैदिप्यमान असे तीर्थक्षेत्र अक्कलकोट करून जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. आणि इसवी सन १८७८ मध्ये स्वामींनी अनेकांना कार्य करून त्यांचा एक आविश्कार संपविला असे भासवले.परंतू प्रत्यक्षात स्वामी महाराज आज २०२४ मध्ये देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळ पर्यंत करीत राहतील.

श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या.

अनन्यभावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहून त्यांचा योगक्षेम चालविण्यासोबतच ''भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे.'' असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रगटदिन...पुढील सर्व आयुष्य त्यांच्याच चरणी कार्यरत होत जावे हीच आजच्या मंगलदिनी स्वामीचरणी प्रार्थना...


''अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.''


'' अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त जय जय स्वामी समर्थ ''

Wednesday, July 24, 2024

चैत्रगौर

 *गृहिणीपणाचा उत्सव -चैत्रगौर*


आज चैत्र शुद्ध तृतीया म्हणजे गौरी तृतीया.आज पासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत  गौरीची  पूजा करून महिनाभर हा उत्सव साजरा होतो.देवघरातली अन्नपूर्णा लख्ख करून तिची षोडशोपचारे पूजा केली जाते आणि तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेऊन हा उत्सव साजरा होतो.अनेक शुभ चिन्हांची रांगोळी" चैत्रांगण " काढली जाते.

गौरी अन्नपूर्णा कशी झाली याची सुंदर कथा पुराणात येते.गौरी ही भौतिक समृद्धीची देवता.अन्नधान्य ,वात्सल्य ,धन संपती ,सौंदर्य ,मांगल्य ,कौटुंबिक सौख्य हे सारं काही तिचीच कृपा.आणि शिव म्हणजे विशुद्ध ज्ञान!.योग ,वैराग्य,ब्रह्मज्ञान यांचे ते अधिष्ठान. शिव पार्वती एकदा कैलाशी निवांत गप्पा मारत होते.बोलण्याच्या ओघात शिव म्हणाले ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. फक्त ब्रह्म सत्य आहे बाकी सब झूट.


पार्वती म्हणाली अहो हे सुंदर विश्व ? 

शिव म्हणले साफ खोट आभासी आहे हे.

 विश्वातील सौंदर्य ,मांगल्य , नातीगोती ???

ते हि असत्य

बर मग आपण खातो ते अन्न तरी ?

तेही खोट ,असत्य ,आभासीच ,फक्त ब्रह्म तत्वच सत्य !!


झालं ….गौरीला आला थोडा राग . ती म्हणाली बरं तुमचं ज्ञान वैराग्यच खर बाकी सगळ आभासी ना.या क्षणी मी अंतर्धान होते. गौरी गुप्त होताच जगातले मांगल्य लोपले ,नात्यांचा गोडवा उडाला ,घराचे घरपण हरपले ,सात्विक सौंदर्य विरले,आणि मुख्य म्हणजे जगातले सगळे अन्न धान्य सुद्धा अकस्मात संपले.


 शिवाना वाटले हरकत नाही.या वाचून जगाचे  काही बिघडत नाही. पण थोड्याच वेळात अख्या जगातले देव ,मानव ,ऋषी ,पशु पक्षी सारे प्राणीमात्र भुकेले होऊन शिवांपाशी आले. महादेव म्हणाले थांबा तुम्हाला जरा ज्ञान देतो. पण भुकेल्या पोटी कसलं  ब्रह्म कसलं ज्ञान.आधी अन्न द्या मग पुढ्च बोला.पण अन्न आणायचे कुठून. कोणीतरी सांगितलं संपूर्ण विश्वात फक्त काशी नगरीत एक घर आहे तिथेच अन्न उपलब्ध आहे. सगळ्या प्राणिमात्रांच्या वतीने शिव याचक म्हणून तिथे भिक्षा मागायला गेले. 

*ओम भवति भिक्षां देही|*

आतून एका गृहिणीचा नाजूक आवाज आला महादेवा भिक्षेत काय देऊ ज्ञान कि वैराग्य ??

महादेवानी पाहिलं ,आत सुवर्ण सिंहासनी साक्षात पार्वती बसली आहे ,मांगल्य लेवून ,पावित्र्य पांघरून ,समृद्धीचे अलंकार घालून आणि तिच्या हातात आहे अन्नाचे अक्षयपात्र ,वात्सल्याच्या पळीने ती प्रत्येक जीवाला अन्न देऊन तृप्त करते आहे. 

प्रपंचाशिवाय  परमार्थ, प्रवृत्तीवाचून निवृत्ती ,शक्तीविना शिव अपूर्णच आहेत हा साक्षात्कार शिवांना झाला.शिव म्हणाले  ज्ञान -वैराग्य प्राप्त होण्यासाठी आधी शरीरात शक्ती आणि मनात शांती हवी ,त्यासाठी सकस अन्न हवे, अन्न हे पूर्णब्रह्म .त्याचीच  भिक्षा दे !!!

*ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती ।।*

पार्वती हसली , तिने आनंदने शिवांना भोजन दिले ,शिव तृप्त होताच जगातले सगळे जीव देखील तृप्त झाले.


त्या तृप्त अंतकरणाने महादेव म्हणाले तू  सदाशिवाला सुद्धा पूर्ण करणारी सदापूर्णा आहेस ,जगाची आई बनून अन्न पुरवणारी  तू अन्नपूर्णा आहेस.साध्या गृहिणीच्या रूपातली ती शंकराची प्राणवल्लभा अन्नपूर्णा म्हणून विख्यात झाली.


ही अन्नपूर्णा जगातल्या सगळ्या गृहिणींच प्रतिक आहे. सोनेरी महालात राहणाऱ्या रुख्मिणीवर देखील  द्वारकेतील सगळ्यांना अन्न देण्याची जबाबदारी होती आणि झोपडीत राहणारी सुदामाची बायको  सुद्धा मिळेल ते रांधून घराला जेऊ घालत होती.परिस्थितीचा फरक असेल पण कुटुंबाला तृप्त करण्याची वृत्ती सारखीच आहे.कदाचित ही आठवण राहावी म्हणून नववधूला लग्नात माहेरून अन्नपूर्णा देतात.तिची रोज पूजा करत गृहिणीने सकस अन्न शिजवावं ,नाती जपावीत ,घराला घरपण द्याव.हे सगळं करत असताना "गृहिणी कुठे काय करते?" असा प्रश्न कोणी विचारला तर गृहिणीच्या रुपात अवतीर्ण होऊन जगाचे पोषण करणाऱ्या अन्नपूर्णेची कथा आठवावी.


या गृहिणीपणाचा उत्सव ही चैत्रगौर.रोजची देवघरातली अन्नपूर्णा मखरात हिंदोळ्यात बसवली जाते.किंवा काही ठिकाणी पंचगौरचे छोटे झोपाळे पुजले जातात.त्यात मध्यभागी ही गौरी आणि सभोवताली तिचा परिवार -शिव, गणेश, नंदी वैगरे.गृहिणी हीच घराचा केंद्रबिंदू आहे हे यातून बिंबवलं जातं.


*स्वयं पञ्चाननः पुत्रौ गजाननषडाननौ।*

*दिगम्बरः कथं जीवेदन्नपूर्णा न चेद्गृहे॥*

पाच मुखे असणारे शंकर; गजमुख गणेश आणि सहा मुख असणारा कार्तिकेय अशी खाणारी बारा तोंडे घरी असताना भिक्षाटन करणाऱ्या दिगंबर शिवाचा संसार सुरळीत चालला आहे; कारण त्याच्या घरी अन्नपूर्णा गृहिणी म्हणून आहे.

 

शिवांपासून तर जगभरातल्या सगळ्यांचे संसार ज्यांच्यामुळे सुरळीत चालले आहेत अशा गृहिणींच्या रुपात असणाऱ्या अन्नपूर्णेला नमन


*विनय मधुकर जोशी*


*अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरः प्राणवल्लभे ।*

*ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती ।।*

Monday, July 22, 2024

नामसाधना

 *भवारोग आणि नामसाधना*


*श्रीमहाराज म्हणतात - आजारी माणसाला तीन गोष्टी कराव्या लागतात - कुपथ्य टाळणे, पथ्य पाळणे आणि औषध घेणे. मग आजार कोणताही असो. पण आपल्याला आजार झाला आहे* *ह्याची जाण झाली, त्याच्या निवारण्याची तीव्र इच्छा झाली, तरच या तीन गोष्टींकडे मनुष्य वळेल. शारीरिक आजार झाला असतां मनुष्य हे सर्व त्वरीत अंमलात आणतोच. पण* *मनुष्याला आपल्याला भवरोग झाला आहे ह्याची फार फार उशीरा जाण होते.*

   *भवरोग निवारण उद्देशाने वाटचाल करणार्‍या मुमुक्षुसाठी श्रीमहाराजांचा वरील उपदेश.*

*कुपथ्य टाळणे - पांच ज्ञानेंद्रियांचा विषयांशी संबंध होणे हे अटळ आहे. तसेच पांच कर्मेंद्रियांद्वारे कर्मे घडणेही अटळच. आणि या सर्वांचा राजा जे 'मन' त्याचा व्यवहारही चालणारच. पण डोळ्यांनी* *काय पाहायचे [थोड्या* *निरीक्षणानंतर आढळेल की जास्तीत जास्त विकार* *डोळ्याद्वारे शरीरात, मनांत, बुद्धीत शिरतात), कानांनी काय ऐकायचे, तोंडाने काय आणि किती खायचे यांचा विवेकपूर्व विचार करून त्या त्या विषयांचे सेवन करणे हे माणसाच्या हाती आहे. 

आपल्या हिताचे काय हे सर्वांनाच समजते. अहितकारक गोष्टींपासून इंद्रियांची निवृत्ति करीत विषयांचा दुष्परीणाम टाळणे म्हणजे कुपथ्य टाळणे. पथ्य पाळणे - कुपथ्यापासून निवृत्ति समजली की पथ्यकारक काय याबद्दल भार गहन अभ्यास आवश्यक आहे असे नव्हे. 

डोळ्यांनी भगवंताचे रूप पाहणे - म्हणजेच चर-अचरात, सर्व प्राणीमात्रात भगवंताच्या अस्तित्वाची जाण ठेवणे, हातांनी कोणतीही क्रिया करताना भगवंताला आवडणार नाही असे कोणतेही कर्म न करणे, वाचेचा संयमित वापर म्हणजे निंदा टाळणे, वाचेद्वारे कोणालाही न दुखावणे इ. हे सर्व म्हणजे पथ्य पाळणे झाले. 

पथ्य ह्यात आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे भ. गीता ६.१६,१७ इथे म्हटल्याप्रमाणे अती खाणे नको तसेच जळजळीत उपवास नको,अती झोप नको आणि अती जाग्रणही नको, अती आरामही योग्य नाही तसेच अती दमछाक होईपर्यंत काम करीत राहणे देखील योग्य नाही. सर्वकाही युक्त प्रमाणात, नियमीतपणे करणे.नामस्मरण हेच औषध सेवन - आता नामसमरणाचा औषध म्हणून कसा उपयोग करता येईल ?*

   *माणसाच्या चित्त आणि वृत्ति स्वस्वरूप आनंद स्थितीपासून नेहमीच भलावण करीत असतात. ही भलावण न व्हावी यासाठी आपण काय पाहतोय, ऐकतोय, करतोय ह्याबद्दल सतत जागरूक राहणे नितांत आवश्यक असते. प्रसन असलेले मन कशामुळे कलुशित होते हे समजले तर औषधचा योग्य परिणाम होतो. 

काही उदहरणे पाहू. एखादी न आवडणारे व्यक्ति समोर आली वा* *तिचे स्मरण झाले की त्या व्यक्तिबद्दल नकारात्मक (negative) विचार येतात. कासलातरी कर्कश आवाज कानी पडला, नको त्या वेळी (म्हणजे आपल्याला) पाऊस सुरू झाला, अवेळी फोन खणखणला, जिना उतरताना पाय मुरगळला, अप्राप्त विषयांची इच्छा, द्वेष, मत्सर अशा कितीतरी गोष्टी मनात उद्विग्न भाव उठण्यास, मनाची शांतवृत्ति बिघडविण्यास कारणीभूत होतात. असे झाले की लगेच "श्री राम जय राम जय जय राम" हा मंत्र अगदी सावकाश (म्हणजे ५ ते ७ सेकंद कालावधी लागेल इतके संथपणे) मनात म्हणावा अशी २-३ आवर्तने करावी. मनात उठलेली negative वृत्तिचे निवारण नाही झाले तर परत २-३ आवर्तनांचा एक डोस.

 ज्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही ( ज्या आपल्या हातात नाहीत ) अशा कितीएक गोष्टींपासून उद्विग्न होऊन, वैतागून साध्य तर काहीच होत नाही. मग औषधाचे २-३ डोस घेतले - अर्थात उठलेली negative वृत्तिचे निरसन होईपर्यंत - की मन पूर्ववत प्रसन होते. होता होता उद्विग्न व्हायचे प्रसंगच कमी झालेत असे जाणवते. 

खरे तर प्रसंग कमी होत नाहीत. उद्विग्न व्हायची frequency कमी होते. पण या प्रयोगाचे एक गुपित आहे -* *नामाचे आवर्तन अगदी सावकाश करणे. प्रयोग करायला हरकत नाही ना ?

 वरील औषध उपासना म्हणून नित्य, ठराविक जप करणे या व्यतिरिक्त आहे हे सांगणे आवश्यक नाहीच. संकलन आनंद पाटील*

Friday, July 19, 2024

परमार्थ

 श्रीगोंदवलेकर महाराज एकदा म्हणाले प्रापंचिक माणसाने घरात असलेले सर्वांच्या सर्व देऊन टाकू नये ही गोष्ट खरी, परंतु प्रसंग आला असतां सर्व देण्याची तयारी पाहिजे हेही खरे. 

थोर मनाच्या माणसालाच परमार्थ साधतो. मीपणातून जे देणे होते ते देणे नव्हेच. आपण देतो तेव्हा आपल्याजवळ किती आहे त्याचा विचार करून सांभाळूनच देतो. स्वभावतःच आपण फार हिशोबी आहोत. आपण दृश्य खरे मानतो.  

त्यामुळे आपले देणेही दृश्यातले आहे. देहाने देतो तेव्हढेच खरे वाटते. श्रीगुरूंना जे  द्यायचे ते अदृश्यातले आहे. ते कसे द्यायचे ते माहीत नाही कारण ते खरे वाटत नाही. काकडी खाल्ली की काकडीची ढेकर यायचीच, तसे सकाळी उठल्यापासून दृश्य आत भरत राहिलो की जे दृश्यापालिकडचे आहे त्याला जागाच राहात नाही.

 त्यांना आपला मीपणा पाहिजे आहे पण तो कोण देतो. आपली फार विचित्र स्थिती आहे. विजेचे काम करणारे , लाकडी फळीवर उभे राहून काम करतात, त्यामुळे त्यांना विजेचा धक्का वाहत नाही.  त्याप्रमाणे सद्गुरूंकडून शक्तीचा प्रवाह येतो आहे पण आपण तो आत शिरू देत नाही . आपण दृश्याच्या फळीचा आधार सोडत नाही. सद्गुरूंकडून शक्ती एकसारखी वाहते आहे. 

तुम्ही कितीही घ्या त्यात कमी होणार नाही. आई ज्ञानाच्या राशी आणून ओतत होती असे रामकृष्ण परमहंस म्हणाले.

प्रवचन

 *🚩।।ॐ श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर।।🚩*


*🌺 प्रवचन - l


*शंका न ठेवता नाम घ्यावे.*


नामस्मरण करायला सांगितले की सबबी सांगतात. पण खरोखर, नामस्मरण करण्याच्या आड काहीच येत नाही. काम करीत असताना सुद्धा उगाचच इतर विचार मनात येतातच ना ? मग तसेच नामस्मरण करायला कोणती अडचण आहे ? उगाच दुसरे विचार करण्यापेक्षा भगवंताचे नाम घ्यावे हे बरे नाही का ? वेळ सापडताच तो व्यर्थ न घालविता नामस्मरण करावे; श्रद्धा ठेवून करावे. दोन प्रवासी पायी जात होते. त्यांना भूक लागली. जाताना एक आंबराई लागली. त्यांनी मालकाला विचारले, 'आंबे घेऊ का ?' मालक म्हणाला, 'पंधरा मिनिटांत जितके आंबे खाता येतील तितके खा.' दोघांपैकी एक होता, तो मालकाजवळ चौकशी करू लागला; या शेताला पटटी किती, मालक कोण, वगैरे पुष्कळ विचारपूस करू लागला. दुसरा मात्र भराभर आंबे खाऊ लागला. इतक्यात पंधरा मिनिटे झाली. मालकाने सांगितले, 'वेळ संपली, आता तुम्ही जा.' एकाचे पोट भरले, दुसरा मात्र उपाशी राहिला. या गोष्टीवरून हे ध्यानात घ्यायचे की, नुसते प्रश्न विचारण्यापेक्षा, श्रद्धा ठेवून नाम घेऊ लागावे. नामाचा अर्थ आपल्याला जरी कळला नाही, तरी तो भगवंताला कळतो. म्हणून नामाचे महत्त्व कळो वा न कळो, नाम घेत राहावे. ध्रुवाने काय केले ? नारदवचनावर विश्वास ठेवून नामस्मरण प्रेमाने करू लागला. तो इतर विचारांच्या, शंका कुशंकांच्या नादी लागलाच नाही. 'एक तत्त्व नाम' हेच त्याने धरले, म्हणून त्याला नारायण प्रसन्न झाला. संत निःस्वार्थी असतात. ते तळमळीने सांगतात. त्यावर आपण श्रद्धा ठेवावी आणि नाम घ्यायला सुरूवात करावी आणि अखंड नामातच राहावे.


नाम किती दिवस घेत राहावे ? नाम सोडावेसे वाटत नाही तोपर्यंत ते घ्यावे. नामात रंगून जाईपर्यंत नाम घ्यावे. नामस्मरणात रंगला की नाम सुटणारच नाही. भगवंताचे नाम हेच श्रेष्ठ आहे. त्या नामात रंगेल तोच खरा. चरित्र विसरले तरी चालेल पण नाम विसरू नये, कारण नामात सर्व चरित्र साठविलेले आहे. ज्ञान, उपासना, कर्म वगैरे मार्ग आहेत, पण सर्वांत नामस्मरण हे सोपे साधन आहे. एक मोठा किल्ला होता. तो अभेद्य होता. मुंगीलाही आत प्रवेश होणे अशक्य असा तट होता. पण त्याला एक मोठा दरवाजा होता. त्याला एक मोठे कुलूप होते. एकाला त्याची किल्ली मिळाली; मग प्रवेश सुलभ झाला. तसे नाम ही किल्ली आहे. परमार्थ कितीही कठीण असला तरी नामाने तो सुसाध्य असतो. नामावर प्रेम आणि श्रद्धा बसत नाही अशी तक्रार करतात. संतवचनावर विश्वास ठेवून अखंड नाम घ्यावे, त्यानेच समाधान होईल.


*आपण रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करण्याचा नियम ठेवावा. स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर कराव्याच, पण त्या वाचून अडून बसू नये.*

मोक्षप्राप्ती

 *॥श्रीहरिः॥*


सकाम व निष्काम भक्ताची उपासना व फल यातील भेद उलगडून सांगताना भगवंत म्हणतात, 


॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

अथश्रीमद्भगवद्गीता सप्तमोध्याय:


*अन्तवत्तु फलं तेषां* 

*तद्भवत्यल्पमेधसाम् ।*

*देवान्देवयजो यान्ति* 

*मद्भक्ता यान्ति मामपि ॥*

*॥७.२३॥*


(दैनंदिन श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञानयोग ७.२३) 


*भावार्थ : परंतु; अल्पबुद्धी लोकांना मिळणारं हे फल नाशिवंत असतं. (याप्रमाणे) देवतांची आराधना करणारे देवांना प्राप्त होतात आणि माझे भक्त (उपासक) मला प्राप्त होतात.*


'अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात. पण त्यांना प्राप्त होणारी फळं मर्यादित आणि अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात. पण माझे भक्त मात्र अखेर माझ्याच परमधामाची प्राप्ती करतात.' 



*मंदिरात* किंवा *धार्मिक स्थळांमधे* जाऊन श्रद्धेमुळे जर सत्प्रेरणा मिळत असेल तर ती गोष्ट केव्हाही चांगली. क्लबमधे जाऊन पत्ते खेळल्यामुळे अशी प्रेरणा खचितच मिळत नाही. म्हणून सामान्य लोक श्रद्धेमुळे काम करतात त्याचं फळ त्यांना मिळतं. 



*परंतु;भगवंत सांगतात की,* 

त्यांचं हे फळ टिकऊ नसतं. मोक्षाचं फळ जसं टिकाऊ आणि नित्य असतं तशीसामान्य श्रद्धेची फळं ही टिकाऊ नसतात. ती अनित्य असतात. याचं कारण, जे आराध्य दैवत असतं तेच मुळात अनित्य असतं. साऱ्या देवदेवता या परमेश्वराचंच स्वरूप आहेत. त्या परमेश्वरानंच निर्माण केलेल्या आहेत. मात्र या देवदेवता नित्य नसतात.मनुष्याची त्यांच्यावरची श्रद्धा देखील त्यामुळे नित्य नसते. म्हणून फळंही अनित्यच असतं.


*अनित्याकडून नित्यत्व* कधी मिळू शकत नाही किंवा अपूर्णाकडून मिळालेलं फळ हे कधी पूर्ण असू शकत नाही. मोक्षाकरता किंवा परमप्राप्तीसाठी ते कारणीभूत होऊ शकत नाही. या जन्मातच ते भोगून संपून जातं. शिवाय, या अनित्य भौतिक देवदेवतांच्या उपासनेमुळे अनित्य भौतिक फळंच मिळतात - मोक्षासारखं चिरंतन फल मिळत नाही. जो वासुदेवाची (परमतत्त्वाची) आराधना करतो त्यालाच मोक्षप्राप्ती होते. देवदेवतांची उपासना करणारे देवदेवतांकडे जातात. म्हणजेच स्वर्गलोक, शिवलोक, विष्णुलोक असे लोक त्यांना प्राप्त होतात. तर जे परमात्म्याचं ध्यान करतात त्यांना मोक्षप्राप्ती होऊन त्यांचं जन्म - मरण टळतं. एका अंतिम आनंदसागरात ते डुंबत राहतात.



*भगवान श्रीकृष्ण सकाम भक्तांना अल्पबुद्धी म्हणजे कमी हुशार असं संबोधतात.* 

कारण त्यांच्याकडे मिळवण्यासाठी संपूर्ण विशाल असा सागर(तत्त्वज्ञान) आहे, परंतु ते छोट्या छोट्या भौतिक गोष्टींची मागणी करून, त्यातच खूश होतात. 


*हे तर असं झालं की,* 

एक राजा त्याच्या सेवकावर खूश होऊन त्याला म्हणतो, 


'मी तुझ्या सेवेने अत्यंत प्रसन्न झालो आहे. माझ्या खजिन्यातून तुला पाहिजे तितकं धन घे.' 


पण त्या सेवकासाठी १०० मुद्रा म्हणजेच सर्वांत मोठी संपत्ती होती, केवळ तिचीच तो कल्पना करू शकत होता. त्यामुळे तो तेवढीच मागणी करतो. राजा मनातल्या मनात हसतो. कारण त्यावेळी त्याला विचार येतो, 


'अरे, मी तर या सेवकासाठी संपूर्ण खजिना उघडा करून दिला होता पण हा तर केवळ शंभर मुद्रांमध्येच खूश झाला!'


*विचार करा,* 

प्रत्यक्षात *ईश्वर* स्वतःच तुमच्याकडे येण्यासाठी तयार आहे. आणि त्यावेळी तुम्ही त्याला सांगताय, की 


'मला चांगले मार्क्स मिळू दे, माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, मला चांगली मदतनीस मिळू दे, माझा बॉस माझी रजा मंजूर करू दे...' 


*अशा वेळी* ईश्वरदेखील किती हसत असेल बरं, याची कल्पना न करणंच चांगलं. आपल्या प्रार्थनांनुसारच ईश्वर आपल्या इच्छा पूर्ण करत असतो. परंतु हे फळ नाशवंत आहे. कारण काही काळानंतर त्या फळांचं मूल्यच शिल्लक राहत नाही.



*हरिया* नावाचा एक शेतकरी होता. तो नेहमी देवकार्यात मग्न असायचा. गावामध्ये सगळे लोक त्याला मोठा भक्त समजायचे. तरीही हरियाला दुःख होतंच. 


*त्याचं* एकमेव दुःख म्हणजे त्याला संतती नव्हती. म्हणून त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन ईश्वराने त्याला संतती म्हणून एक मुलगी दिली.आता त्याचं निःसंतान असण्याचं दुःख दूर झालं. पण त्याचबरोबर दुःखाच्या पुढच्या अध्यायालाही सुरुवात झाली. आपल्याला मुलगी आहे पण मुलगा नाही... म्हणून त्याने ईश्वराकडे मुलाची मागणी केली. ईश्वराने तीदेखील पूर्ण केली. पण त्याचा मुलगा अभ्यासात हुशार नव्हता. म्हणून हरिया पुन्हा दुःखी झाला. आता आपल्या या दुःखासह पुन्हा एकदा तो ईश्वराला शरण गेला. आता त्याचं हे दुःखदेखील दूर झालं. पण त्यानंतर काही तो थांबला नाही... कधी मुलांची नोकरी, कधी लग्न, कधी सून, कधी मुलांची मुलं... अशा कित्येक दुःखांची गाऱ्हाणी घेऊन तो ईश्वराला सतत काही ना काही मागतच राहिला... आणि एके दिवशी अशाच एका अपूर्ण इच्छेसह मरण पावला.



*हरिया* आयुष्यभर ईश्वराची भक्ती करत राहिला तरीदेखील तो शेवटपर्यंत दुःखीच राहिला...भक्तीचा परिणाम म्हणून त्याच्या सगळ्या इच्छाही पूर्ण झाल्या. शिवाय त्याच्या ज्या इच्छा पूर्ण झाल्याने त्याला जो आनंद मिळाला तोदेखील मावळला. 

*(यालाच नाशवंत फळ असं म्हटलं आहे)*


*परंतु* ज्ञानाच्या अभावी नवीन इच्छा निर्माण होतच राहिल्या... अपूर्णता, दुःख आणि अतृप्त इच्छांसमवेतच त्याचा मृत्यू झाला. एका अज्ञानी सकाम भक्ताचं जीवन अशा प्रकारचंच असतं. 


*एखाद्या* गाळणीच्या साहाय्यानेच तो ईश्वरीकृपा ग्रहण करतो. कृपा येते आणि जाते... तिचा ते लाभ तो घेऊच शकत नाही. त्याची झोळी रिकामीच राहते, मात्र त्याच्याकडे पाहणाऱ्याला वाटतं, 


'अरे तो किती पूजा- पाठ करतोय, कितीतरी पुण्य कर्म करतोय... त्या भक्तीमुळे त्याला नक्कीच मुक्ती मिळणार...' 


*परंतु* प्रत्यक्षात आतून तो एखाद्या भिकाऱ्याप्रमाणे रिक्त, पोकळच राहतो. पुत्र, संपत्ती, नातवंडं यांसारख्या त्याच्या सगळ्या इच्छा याच जगात राहतात... ज्या इच्छांचा त्याला कोणताही उपयोग नसतो... पण निष्काम भक्ती, ज्ञान यांसारख्या इच्छांचा, ज्यांचा त्याला उपयोग झाला असता, त्या तर दुर्दैवाने त्याने मागितलेल्याच नसतात.


*भगवान श्रीकृष्ण म्हणतात,* 

देवतांचं पूजन करणारे देवतांना प्राप्त होतात आणि माझ्या भक्तांनी कोणत्याही प्रकारे माझं पूजन केलं तरी, शेवटी ते मलाच प्राप्त होतात. या पंक्तीचा अर्थ सविस्तर समजून घेऊ या. 


*निसर्गाचा हा नियम आहे, की* 

'ज्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करतो तसेच बनतो.'


*एखाद्या देवाची* तुम्ही पूजा करत असाल आणि फोकस इच्छापूर्तीवरच असेल तर हरियाच्या बाबतीत जे घडलं तेच तुमच्या बाबतही घडेल. त्या देवतेमध्ये आपल्याला ईश्वर नाही तर इच्छापूर्तीचं एक साधन मात्र दिसेल. आपलं डिलिंग ईश्वराबरोबर नव्हे तर त्या साधनाबरोबर किंवा निमित्तासोबत होईल. अशा प्रकारे निमित्ताच्या सान्निध्यात जाऊन आपल्याला ईश्वराची भेट तर घडणारच नाही, ईश्वरप्राप्तीही होणार नाही.


*आपण* महान भक्त संत तुकाराम आणि संत मीराबाई यांच्यासंबंधी ऐकलंच असेल. संत तुकारामांनी विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा केली, विठ्ठलालाच सर्वस्व मानलं, तर संत मीराबाईंनी श्रीकृष्णाच्या मूर्तीचं पूजन केलं. परंतु त्यांनी आपल्या आराध्याला इच्छापूर्तीचं साधन नव्हे तर ईश्वर मानूनच पूजलं. ते साधनांचे नव्हे तर ईश्वराचे परम भक्त होते. परिणामी त्यांना ईश्वरप्राप्ती झाली. मूर्तिपूजेचा खरा उद्देश तिथे पूर्ण झाला. परमभक्तासाठी ईश्वर एकच असतो,मग तो कोणत्याही स्वरूपात का असेना!


*भगवान श्रीकृष्ण म्हणतात,*

'माझ्या भक्तांनी मला कसंही भजलं, कोणत्याही रूपात अथवा मूर्ती समजून भजलं, ते जर माझीच भक्ती करत असतील तर ते मलाच प्राप्त

होतील.' कारण तिथे वेगळ्या गोष्टींची किंवा इच्छांची मागणीच नसेल, मागणी केवळ ईश्वराचीच असेल.'



*या* निरनिराळ्या देवतांची भक्ती करता करता उपासकाची बुद्धी स्थिर आणि शुद्ध व्हायला लागते.अखेरीस भक्ताला भगवंताच्या एकमेव विराट- सूक्ष्म, कालतीत आणि नित्य स्वरूपाचं ज्ञान होतं.पुण्याहून एखादी आगगाडी दिल्लीला जाणार असेल तर असा भक्त निदान दिल्लीच्या गाडीत तरी बसतो म्हणजेच जशी समज येईल त्यानुसार या भिन्न देवतांच्या उपासनेतून अंति परमात्म्याच्या उपासनेपर्यंत मनुष्य जाऊन पोचू शकतो. पण तोपर्यंत जी फळं मिळतात ती मात्र अनित्यच असतात. मनुष्यानं या गोष्टी ध्यानात घेऊन फळांमधेच गुंतून पडू नये. तर देवदेवतांच्या पलीकडे असलेल्या त्या अंतिम परमात्म्याचं स्वरूप जाणण्याची इच्छा धरावी. 


*'ज्ञानी'* भक्त होण्याची आकांक्षा मनात ठेवून त्या दृष्टीनं परमेश्वराचं विश्वव्यापक *'वासुदेव रूप'* आपण समजून घ्यायला हवं, असा यातून आशय निघतो.



*सारांश:*

*अनित्य देवतांच्या उपासनेतून अनित्य फळच मिळू शकतं. अपूर्णाकडून पूर्णत्व कधी मिळू शकत नाही. आपली कर्म आणि उपासनापद्धती प्रगल्भ बनवली पाहिजे.अंतिम परमात्म स्वरूपाचा शोधघेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो नित्य असल्यामुळे त्याच्याच उपासनेतून मिळणारं फलही नित्यच असतं.* 


संपूर्ण भगवद्गीता - सरश्री. 

श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीता भाष्य. 



*।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।*

Thursday, July 18, 2024

भक्तीमार्ग

 *नामस्मरण भक्ती हा प्रकार सोडला, तर सर्व प्रकार हे परस्वाधीन आहेत.*


*ll श्रीराम जयराम जय जय राम ll*


नामस्मरणाचा मार्ग. हा भक्तीमार्ग सर्व मार्गातील सर्वात  वेगळा, सोपा आणि शीघ्र फलदायी असा आहे. भक्तींमध्ये श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चना, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन असे विविध प्रकार आहेत; परंतु यातील नामस्मरण भक्ती हा प्रकार सोडला, तर सर्व प्रकार हे परस्वाधीन आहेत. 

दुस-यावर अवलंबून असे आहेत.इतर भक्तीमार्ग वस्तू, व्यक्ती, काळ, वेळ यावर या सर्व अवलंबून आहेत; मात्र, नामस्मरणाला कसलेही बंधन नाही. त्यामुळेच हा बंधमुक्त असा भक्तीप्रकार आहे.  भक्ती मार्गातील श्रवण भक्तीमध्ये श्रवण करण्यासाठी कोणती तरी कथन करणारी शक्ती पाहिजे, वक्ता पाहिजे, कथाकार पाहिजे, कीर्तनकार पाहिजे. 

नुसती श्रवण करण्याची इच्छा असून चालत नाही, तर त्याची सिद्धता, तयारी पाहिजे. इथे परावलंबित्व आले. दुस-यावर आधारित ही भक्ती झाली, पण नामस्मरणाचे तसे नाही. फक्त इच्छा व्यक्त केली की, लगेच नामस्मरण सुरू करता येते. त्यासाठी दुसरे कोणी असण्याची गरज नाही. त्यामुळे हा अत्यंत सोपा आणि चांगला मार्ग आहे. तसेच कीर्तन भक्ती करायची म्हटली, तर त्यासाठी विशिष्ट प्रकारचा पोषाख आला, आसन आले. कुठेही जाऊन कीर्तन करता येत नाही. त्यासाठी विशिष्ट अशी जागा असली पाहिजे. 

ही सगळी सिद्धता असली तरच कीर्तन करता येते. याउलट नामस्मरणाचे तसे नाही. कसलीही तयारी नको. कसलीही सिद्धता नको. कसलाही पोषाख नको. कोणी समोर असण्याची गरज नाही. कसल्या साथीची गरज नाही. इच्छा झाली की, नामस्मरण भक्तीला सुरुवात करता येते. त्यामुळे अतिशय साधी सोपी आणि सहज साध्य असा हा भक्तीमार्ग आहे.नामस्मरण भक्तीसाठी कसल्याही वेळेचे, काळाचे, स्थानाचे बंधन नाही.

 ज्याप्रमाणे आपल्याबरोबर आपला श्वासोच्छवास असतो, त्याप्रमाणे नामस्मरण करता येते. प्रत्येक क्षणी आपण नामस्मरण करू शकतो. अगदी जेवतानाही आपण नामस्मरण करू शकतो. अखंडित चिंतीत जावे, अशी ही नामस्मरण भक्ती असते. अन्य कोणत्याही भक्तीप्रकारापेक्षा नामस्मरण भक्ती ही त्यामुळेच सर्वांना आवडते.


!! श्री महाराज !!

!!श्रीराम जयराम जय जय राम!!

!!श्रीराम जयराम जय जय राम!!

!!श्रीराम जयराम जय जय राम!!

!!श्रीराम जयराम जय जय राम!!

          !! श्रीराम समर्थ!!

Wednesday, July 17, 2024

भगवंताची कृपा

 *सहज बोलणे हितोपदेश* संकलनआनंद पाटील

*भगवंताची कृपा*


*एका गृहस्थाच्या मुलाला अनेक वर्षांनी मुलगा झाला. श्रींना हे*

*सांगितल्यावर ते गृहस्थ म्हणाले, “पुढे सगळे चांगले होईल ना ?” त्यावर श्री म्हणाले, "भगवंत जे करतो ती सगळी कृपा आहे म्हटल्यावर त्यात चांगले वाईट कसले ? म्हणजे आपण आपल्या मनासारखे झाले की त्याची कृपा झाली म्हणतो आणि मनाविरूद्ध झाले की कृपा नाही म्हणतो हे चुकीचे आहे. आपल्याला वाटते तसे न होण्यातही त्याची कृपा आहेच. झोपल्यावर*

*रोज सकाळी आपण जागे होतो ही त्याची कृपाच नाही का?"*


*वो नाम कुछ और*


*एकदा कबीराचा दोहा श्रींना वाचून दाखविला,"*

 “रामनाम सब कहत है, ठग ठाकूर और चोर । जिस नामसे ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम कुछ और ।।"

*वाचल्यावर ती. बाबांनी श्रींना विचारले, “वो नाम कुछ और" याचा अर्थ काय घ्यायचा ?* *त्यावर श्री म्हणाले, “नाम तेच राहते, त्यात बदल होत नाही,* *घेणारा 'कुछ और' होतो. मन जसजसे सूक्ष्म होत जाते, तसतशी गुरुच्या अस्तित्वाची जाणीव सतेज होते. नाम घेत असतांना गुरूच्या अस्तित्वाची जाणीव सतत राहिली पाहिजे.'*


 *नामाचा झरा*

 *श्रीमहाराजांना भेटायला एक शास्त्रीबुवा आले होते. त्यांनी श्रींना*

*विचारले, “परमात्मा सर्व कार्यकारण* *भावाच्या पलीकडे आहे, तो कर्माने कसा प्राप्त होणार, कारण आपण नाम* *घेतो ते कर्मच नाही का ?" त्यावर श्री म्हणाले, “परमात्मा हा नित्यप्राप्तच आहे, तेव्हा त्याची प्राप्ती व्हायला आणखी काही कर्म नकोच. पण आज आपण त्याला विसरलो आहोत म्हणून*

*त्याचे स्मरण केले की पुरे. तुम्हाला भूक लागते. झोप येते यात कर्म कोणते* *घडते ? ही भूक किंवा झोप जशी तुमच्यातून आपोआप येते तसे नामही आतूनच येते. आज तुम्ही बाहेरून नाम घेता म्हणून ते कर्म आहे. ते आतून येऊ* *लागले की कर्म राहत नाहीं. आज आपण बाहेरचे जग आत घेतो आहोत त्या ऐवजी आत जाता आले पाहिजे."* *त्यावर श्री प्रल्हाद महाराज तेथेच होते*

*ते म्हणाले, “झऱ्यातून पाणी येते तसे नाम आतून आले पाहिजे." त्यावर श्री म्हणाले, “ बरोबर आहे, झऱ्यात पाणी असतेच पण त्यावरचे दडपण प्रतिबंध दूर झाल्याखेरीज पाणी येत नाही. तसेच जे नित्यप्राप्त आहे त्यावरचे दडपण दूर केल्यास ते सहजी प्राप्त होऊ शकते. संकलन आनंद पाटील*

श्रीमहाराज

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*पू. बाबा : बाळंभट जोशांचे गांजाचे व्यसन श्रीमहाराजांनी कसे सोडवले ते श्रीमहाराजांच्या चरित्रात आहेच. बाळंभटांना दोन-तीन मुली होत्या. त्यांच्या बायकोला श्रीमहाराजांनी तुम्हाला काय पाहिजे म्हणून विचारले. त्या म्हणाल्या मुलगा पाहिजे. यावर श्रीमहाराज, काय शिंची बायकांची बुद्धी तरी, म्हणाले व तिला म्हणाले, बाई, पण ते शेवटास जाणार नाही. तरीही तिने हट्ट धरल्यावर म्हणाले, ठीक आहे. पुढे मुलगा झाला आणि २०-२२ वर्षांचा होऊन वारला. बाईंनी श्रीमहाराजांना अजिबात दोष दिला नाही. पुढे त्यांची विपन्नावस्था आली तरी शेवटपर्यंत त्या समाधानात होत्या.*


*अशीच गोष्ट श्री. गणपतराव दामल्यांच्या पत्नीची. श्री गणपतरावांच्या मृत्यूनंतर त्यांचा मोठा मुलगा श्री. रामकृष्णपंत जलोदराने वारले. पुढे बाईही खूप आजारी होत्या. मी त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हां विचारले की श्रीमहाराजांनी असे कसे केले असे नाही का वाटत ? तेव्हां आजारी असूनही एकदम अर्धवट उठून बसत त्या म्हणाल्या, त्यांना का दोष देता? हे आपल्या प्रारब्धाचे भोग आहेत. श्रीमहाराजांनी सामान्यातून अशी निष्ठावान माणसे तयार केली. खरोखर, त्यांनी मातीतून अत्तर काढले !*


*-- अध्यात्म संवाद*

Tuesday, July 16, 2024

स्वतंत्रता

 *कृतीशिवाय जे बोलतात त्यांचा नाश होतो. बोलावे असे वाटते तोपर्यंत बोलणे थांबविणे जरूर आहे.स्वतंत्रता आणि स्वैरवर्तन बाहेरून सारखीच दिसतात; पण त्यांच्यामध्ये फार फरक आहे. स्वतंत्रता ही पवित्र आहे, तर स्वैरवर्तन हे घाणेरडे आहे.मनुष्यत्वाचे कर्तव्य असेल तर भगवंताचे होणे हे आहे.* *ऑफिसला जाणार्‍यांनी आपले कर्तव्य नीट बजावावे; घरातल्या मंडळींनी आपले काम मन लावून करावे; आणि हे सर्व करून राहिलेला वेळ भगवंताच्या नामात घालवावा.... श्रीमहाराज* 🌹🙏

Saturday, July 13, 2024

नामशक्ती

 निंबाळ येथे असताना सौ.काकूसाहेब, श्री.गुरुदेव रानडे यांच्या  पत्नी, गुरुदेवांन साठी नेहमीचे जेवण करीत परंतु गुरुदेव त्यातील थोडे जेवण  घेत असत. पुढे अलाहाबाद येथे आल्यावर हळूहळू श्री.गुरुदेवांची  अंन्नावरची वासना कमी होत गेली व नामशक्ती मुळे अन्नाची गरज कमी होत गेली. 

एखाद्या वेळेस ते एखाद्या पदार्थाची नुसत्या बोटाने चव घेत असत किंवा एखाद्यावेळेस भाकरीचा एखादा तुकडा घेत  असत. पुढे पुढे महिनाभर श्री.गुरुदेव अन्नाला स्पर्शदेखील करत नसत. बहुतेक वेळा ते दृष्टिभोजन करीत असत. तरी सुद्धा सौ.काकूसाहेब गुरुदेव यांच्यासाठी सर्व पदार्थ बनवीत असत. 

दृष्टिभोजना नंतर हा प्रसाद इतर स्वयंपाकात मिसळून दिला जात असे. श्री.गुरुदेवांना भाजीचे किंवा आमटीचे पाणी, पालेभाज्यांचे सूप आवडे पण ते सुध्दा कधीकधी एखादा चमचा घेत  असत.

 फळांमध्ये संत्र्याची एखादी गोड क्वचित घेत असत. फराळात शेव, पेढे क्वचित घेत असत. श्री.गुरुदेवांना पिण्याच्या पाण्याचे हंडे, तांब्या, फुलपात्र हे सर्व चकचकीत घडलेले लागे. ते पाणी पिण्यास मागत पण बरेचदा ते चुळा भरून टाकीत व नंतर ज्या पाण्यावर वस्तुदर्शन होई असेच ते पाणी पीत असत साधारण ते अर्धा फुलपात्र होत असे. त्यांचे देह नामस्मरणामुळे होणाऱ्या अमृतरसावर पोसला जायचा.

युनायटेड सिनियर्स

 *खास युनायटेड सिनियर्स साठी*


मॉर्निंग वॉक ला गेलो होतो, तळ्याला चार फेऱ्या मारल्यावर बसलो, तेवढ्यात बाजूनी आवाज आला.“काय रे मन्या, आज कवळी विसरलास का रे!”

खणखणीत आवाजातले हे वाक्य ऐकलं आणि गर्रकन मान वळवली. तळ्याच्या काठावर आठ दहा, सत्तर ऐंशीच्या घरातले तरुण बसलेले, आणि बरमुडा आणि टी शर्ट घालून येणाऱ्या मन्याकडे बघून फिदीफिदी हसत होते.

मन्या त्यांना म्हणाला, ” हसा लेको, ज्याची जळते त्यालाच कळते, यु एस ला गेलो होतो, येताना कवळीच विसरलो, पाठवलीय मुलानं कुरियरनी पण अजून आली नाहीये. तीन दिवस झाले पेज खातोय. तुम्हालाकाय होतंय खोटे दात काढायला.”


तेवढ्यात एक लेंगा आणि सदरा घातलेले आजोबा उठले आणि लटक्या रागानं म्हणाले, ” खोटे दात काय रे, हे बघ” म्हणत बोळक उघडलं, तर टेडी बिअर सारखे दोन दात लुकलुकत होते, बाकी सगळं वाळवंट!

“दात दोनच असले तरी कडक बंदीचा लाडू खातो अजून.”

“खातोस की चघळतोस रे”

ख्या ख्या, करून सगळे हसले.

“नान्या चघळतोस तू लेका. काल घरी जाताना चार शेंगदाणे तोंडात टाकलेस, ते संध्याकाळी देवळात आलास तरी चघळतंच होतास. ह्ये ह्ये ह्ये.


“हाट, ते साखर फुटाणे होते देवळातले!”


असे मस्त संवाद चालू होते.

मग नादच लागला मला रोज त्यांच्या गप्पा ऐकण्याचा.

जवळपास पाच सहा महिने झाले असतील मला त्यांच्या गप्पा ऐकता ऐकता. पण कधी कोणाची कुरबुर ऐकली नाही.

फक्त नोटबंदी झाली त्यावेळेस, नाना तावातावाने, भांडले होते.


“शिंच्या त्या मोदिने माझं पितळ उघडे पाडलन, बायको पासून लपवून ठेवलेले दोन हजार रुपये काढायला लाविलें हो ”

“मॅग, लापवायचे कशाला म्हणतो मी! मी बघ निघताना बायको पुढे रोज भिक्षांदेही करतो, ठेवते २०/२५ रुपये हातावर, तेवढीच आपली विडी काडीची सोय! काय?


एक दिवस अचानक सगळा च्या सगळा ग्रुप गैरहजर!


त्यानंतर माझ्या कामामुळे मला दोन तीन दिवस जमलं नाही, चौथ्या दिवशी गेलो तर सगळे हजर!

त्यातल्या तात्यांना विचारलं, “काय हो परवा कोणीच आला नाहीत?”

तर थेट अंतु बर्व्या स्टाईल उत्तर नानांनी दिले.

“अरे, मन्याची ट्रान्सफर झाली ना! त्यालाच सोडायला गेलो होतो”

“कुठे??”

अरे कुठे म्हणून काय विचारतोस, स्वर्गात! ”

त्याच्या महायात्रेला गेलो होतो सगळे!”


“काही म्हणा मन्या भाग्यवान हो! लेक अमेरिकेतून येतो काय, हाटीलात जाऊन पार्टी करतात काय, घरी येऊन झोपतो काय, आणि मुलगा उठवायला गेला तर हा मन्या केव्हाच गेलेला, स्वर्गाचं दार वाजवायला, रंभेच्या मागं!”

बाकी सगळे खिन्नपणे हसले.

मी म्हंटलं, ” तात्या इतकं लाईटली घेताय?”


“अरे तू, आता आलास, आधी आम्ही सव्व्हीस जणं होतो, आता बाराच उरलोय! तेही ऐशी नव्वदीचे! विकेटी पडायच्याच रे. आणि म्हणून रडायचं कशाला, दोन दिवस दुःख वाटतं, पण जन पळभर म्हणतील हाय हाय म्हणून सोडून आपलं रुटीन चालू करायचं!”

एकदम काहीसं आठवून मला म्हणाले,” तू केटरिंग करतोस ना रे! तुझा नंबर दे, मन्याच्या मुलाला देतो, तेराव्याची ऑर्डर देईल तुला!”


मी डोक्याला हात लावला, ते बघून अजून एक आजोबा म्हणाले,” अरे आपल्या सगळ्यांच्याच मुलांना देऊया याचा नंबर, वर्षभरात अजून दोन चार तरी विकेट पडणार!” ख्या ख्या ख्या!


दोन दिवसांनी मी जरा घाईत होतो, तेवढ्यात तात्यांनी हाक मारली,” ओ केटरर जरा इकडे या,आज संध्याकाळची ऑर्डर घेणार का पार्टीची!”

“पार्टी?”

“अरे नान्याच्या सेंच्युरी ला फक्त अकरा वर्ष उरलीत!”

माझा प्रश्नार्थक चेहरा बघून मला म्हणाले,” एवढा कसा बावळट रे, आज नान्याचा एकूणनव्वदावा प्रकटदिन आहे,

फार काही नको, मस्तपैकी लुसलुशीत उपमा, आणि चहा, बारा प्लेट”

“बास एवढंच ना? दिलं!”


“आणि हो, कडक बुंदीचे पाच लाडू! आज बघतोच कसा खातो ते,

आणि हो! उपमा जास्त तिखट नको हो, हिरड्या झोंबतात नंतर, आणि त्यात उडदाची डाळ बिलकुल नको, कवळी खाली जाऊन बसते, मग जीव जातो काढताना!”

संध्याकाळी ऑर्डर द्यायला गेलो आणि चकित झालो, सगळे थट्टा मस्करी करीत बसले होते. मन्याच्या फोटो समोर काही चाफ्याची फुलं होती, आणि मोठमोठ्यांदा गाणं चालू होतं.

“जिंदगी एक सफर है सुहाना, यहा कल क्या हो किसने जाना!”

मला बघून सगळे थांबले, तात्या पुढे झाले, उपम्याची मुद एकेका बशीत वाढून घेतली, चहा कपांत ओतला, सगळे उभे राहिले आणि “लॉंग लिव्ह नान्या, थ्री चिअर्स फॉर नाना, हिप हिप हुरर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे! करत चहाचे कप, एकमेकांवर आदळून पुन्हा दुसरं गाणं सुरू!


मी काहीश्या संभ्रमावस्थेत घरी आलो आणि विचार करू लागलो, आज आपण आपल्या कट्ट्यावर भेटतो, पण आपल्या आयुष्याच्या तिन्हीसांजेला असेच हसतमुख, इतकेच जिंदादिल असू का? ह्या म्हाताऱ्यांइतकीच तरुणाई आपल्यात असेल??

असायलाच हवी!

आणि एकदम त्यांच्या पार्टीतलं मी निघतानाचं गाणं ओठावर आलं,


“कल खेल में, हम हों न हों

गर्दिश में तारे रहेंगे सदा

भूलोगे तुम, भूलेंगे वो

पर हम तुम्हारे रहेंगे सदा

रहेंगे यहीं, अपने निशाँ,

इसके सिवा जाना कहाँ

जी चाहे जब हमको आवाज़ दो

हम हैं वहीं, हम थे जहाँ

अपने यही दोनों जहां

इसके सिवा जाना कहाँ

जीना यहा मरना यहा,

इसके सीवा जाना कहा!!”...


(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

Friday, July 12, 2024

श्रीमंत माणसं

 *फक्त धन दौलत असली म्हणजे कोणी श्रीमंत होत नसतो,तर ज्याच्याकडे  मनाची श्रीमंती आहे तोच खरा श्रीमंत*

***********************************

ऑफिस मधुन निघाल्यावर का कोणास ठाऊक पण आज द्राक्ष खायची जाम इच्छा झाली,म्हणून घरी न जाता कार सरळ फ्रुटमार्केटच्या दिशेने वळवली.

फ्रुटमार्केटमध्ये गोड द्राक्ष कुठे मिळतील याचा शोध घेऊ लागलो.

असंख्य ठेले, लोटगाड्यांवरचे द्राक्ष चाखुन मी ते नाकारत होतो. जरा भटकंती झाल्यावर

थोड्या अंतरावरच गर्दी पासुन दूर एका झाडाच्या खाली एक म्हातारी टोपलंभर द्राक्ष घेऊन विकायला बसली होती.

या म्हातारीकडे तरी वेगळे काय असणार? मी स्वतःशीच बोललो..

"पण तरीही चाखुन बघायला काय हरकत आहे?" मी स्वतःलाच समजवत म्हातारीकडे जायला निघालो.

म्हातारीकडे बऱ्याच वेळापासुन कदाचित कोणी गि-हाईक आलेल नसाव कारण मी जवळ जाताच म्हातारीला आनंद झाला...

"आज्जी कशी दिलीत द्राक्षं..?" "या सायेब घ्या की द्राक्षं. लई ग्वाड हायेत. जशी साखरच हाय... खाऊन तरी बघा की" म्हातारी माझ्या हातावर द्राक्ष ठेवत म्हणाली.

मी द्राक्ष तोंडात टाकून चाखु लागलो....

अरेच्चा द्राक्ष खरचं खुप गोड आहेत की...

पुर्ण मार्केटमध्ये इतकी गोड द्राक्ष नव्हती.

"आज्जी.. द्राक्षं खरचं खुप गोड आहेत गं.... पुर्ण मार्केटमध्ये इतकी गोड द्राक्षं कुठेही नाहीत. पण तुझ्याकडे कशी गं..." गि-हाईक खुष झालेला पाहुन म्हातारीला ही आनंद झाला....

"आरं लेका ही वेलावरची पिकलेली द्राक्षं हायत. मार्केटला सगळी व्यापारी कार्पीट (म्हातारीला कार्बाईट म्हणायचे होते) टाकुन द्राक्षं पिकवित्यात, पण माझ्या मनाला ते आजवर पटलं न्हाई...दोन पैकं कमी मिळालं तर चालतय पण कुणाच्या जीवाशी खेळणं बरं न्हाई. आख्ख्या हयातीत कधीबी बेईमानीनं धंदा नाय केला."

म्हातारीच्या वयावरुन आणि चेहऱ्यावरुन ती खरं तेच बोलतेय हे मी ओळखलं.

"हं.. बरं काय किलो दिलीत?"

"किलोला दिडशे रुपये."

"बापरे... आजी भाव जास्त आहे की गं.... शंभर रु. किलो दे. दोन किलो घेतो."

"न्हाय रं लेका. किलोला शंभर रुपये न्हाय परवडत."

"बरं ठिक आहे... एकशे वीस रु. किलो दे." मी पुन्हा भाव करत बोललो.

"लेका आरं एकशे ईस रूपये तर माझी खरेदी हाय. किलोला एकशे तीस देते बघ. आता भाव नगं करू. एकतर आज कायबी माल ईकला न्हाई रं." म्हातारी केविलवाण्या स्वरात बोलली.

"बरं दोन किलो दे." दिडशे रूपये किलोची द्राक्षं मी एकशे तीस रूपयांत घेतली याचा मला अभिमान वाटत होता. दोन किलो मागे मी चाळीस रूपये वाचवले होते. मी मनातल्या मनात माझ्यावर खुष झालो.

म्हातारीने दोन किलो द्राक्षं बांधली वरतून अजुन एक लळ टाकली.

मी वॉलेट मधून पाचशे रुपयांच्या बंडल मधून एक नोट काढत म्हातारीला दिली. बंडल पुन्हा वॉलेट मधे ठेवून वॉलेट जीन्सच्या मागच्या पॉकेट मध्ये ठेवले.

म्हातारीने पाचशेची नोट घेऊन मांडी खाली ठेवली.

आणि कमरेला बांधलेल्या फाटक्या बटव्यातुन थरथरत्या हाताने तीनशे चाळीस रुपये काढून मला परत केले.

मी पैसे मोजले. तीनशे चाळीस!!! अरे व्वा म्हातारीने चुकुन मला शंभर रुपये जास्त दिले होते.

शंभर रुपयांचा फायदा. मला मनातूनच आनंद झाला.

म्हातारीच्या लक्षात यायच्या आत इथून निघायला हवे.

मी ते पैसे तसेच शर्टच्या वरच्या खिशात कोंबले.. आणि माघारी फिरुन कारच्या दिशेने निघालो.

सात-आठ पाऊले चालतो न चालतो तोच म्हातारीचा आवाज आला.

"आरं ल्येका.. थांब.."

मी न ऐकल्यासारखं केलं..

"आरे... ल्येका... जरा थांब तर. ईकडं ये.." म्हातारी पुन्हा जीवाच्या आकांताने ओरडली.

आता मला थांबून म्हातारीकडे जाणं भाग होतं.

"हिशोब म्हातारीच्या लक्षात आला वाटतं.." मी स्वतःशीच बोलत म्हातारीकडे गेलो.

म्हातारी जर शंभर रूपये जास्त दिल्याबद्दल बोलली तर काय सारवासारव करायची हे मी क्षणातच ठरवून ठेवले होते.

"काय झालं आजी... का हाक मारलीस... काही हिशोब चुकला का...?" मी जरा अपराध्यासारखा बोललो.

"न्हाई रे ल्येका. आरं हे तुझं पैशाचं पाकिट इथं खाली पडलं व्हतं बघं. तु जायला निघाला आनं.. माझं लक्षं गेलं बघ. हे घे बाबा तुझं पाकिट..." म्हातारी वॉलेटवरची धुळ तिच्या पदराने स्वच्छ करत आणि ते कपाळावर लावत मला वॉलेट परत देत बोलली.

आता मात्र मी स्तब्ध झालो.

मी लगेच जीन्सचा मागचा खिसा हाताने चाचपडला... खिसा रिकामा होता.

म्हातारीला पाचशेची नोट दिल्यावर वॉलेट पुन्हा खिशात ठेवतांना ते खिशात न ठेवता चुकुन खाली पडले होते.

"ओह.. माय गॉड.." माझ्या तोंडुन आपसुकच शब्द निघाले.

मी जाणुन बुजून म्हातारीचे जास्त घेतलेले शंभर रुपये आणि तीने प्रामाणिकपणे मला परत केलेले माझे हजारो रुपये. 

म्हातारीच्या प्रामाणिकपणाने मी माझ्याच नजरेत पडलो.

मला वाटलं होतं की म्हातारीने शंभर रुपये जास्त दिले हे तिच्या लक्षात आले म्हणून तिने मला परत बोलवलं... पण.... पण तिने तर माझे पैशाने भरलेले वॉलेट मला परत द्यायला बोलवलं होतं.

*म्हातारीचे शंभर रुपये जास्त घेऊन मला जितका आनंद झाला होता... त्यापेक्षा जास्त हजारो रुपये भरलेले वॉलेट मला परत करुन म्हातारीला झाला होता.*

मी अक्षरक्षः गप्पगार झालो. मला माझीच लाज वाटत होती.

वॉलेट मध्ये कमीतकमी पंधरा वीस हजार रुपये तरी नक्कीच असतील.

पण इतक्या पैशांचा म्हातारीला किंचितही मोह झाला नव्हता,

आणि माझी त्या गरीब म्हातारीच्या फक्त शंभर रुपयांवर लाळ गळली होती. 

"घे लेका तुझं पाकिट. आरं नीट ठेवत जा बाबा पैकं. तुम्ही श्रीमंत माणसं. तुमच्यासाठी लई मोठ्ठी रक्कम नसल ही.. तरी पण...

मी गप्पगारच झालो.

"तुम्ही श्रीमंत माणसं..." म्हातारीचे ते वाक्य ऐकुन पुन्हा अपराध्यासारखं झालं.

आता... आता... म्हातारीने मला जास्त दिलेले ते शंभर रुपये.. मला हजारो कोटी रुपयांच्या कर्जाच्या ओझ्यासारखे वाटत होते..

म्हातारीला परत करुन टाकतो ते शंभर रुपये...

माझा हात वरच्या खिशात गेला...

पण... पण काय सांगु म्हातारीला.... शंभर रुपये जास्त दिले म्हणून... मी माझ्याच नजरेत पडलो... मला माझीच किळस येत होती...

"आज्जी, हे ठेव तुला काही रुपये... तु इतक्या प्रामाणिकपणाने मला माझे पैसे परत केलेस ना..."

मी पाचशेच्या दोन नोटा म्हातारीला देत बोललो...

"ऐ बाबा. नगं नगं. मला नको तुझा पैका. हा तुझा पैका हाय. या पैक्यावर माझा कायबी अधिकार नाही बघ.

पैसाच सगळं काही नसतं रं पोरा ईमान नावाची पण काही चीज असते की.."

म्हातारी नकळत मला खुप मोठी शिकवण देऊन गेली होती. मी नि:शब्दच झालो होतो.


"म्हातारीच्या प्रामाणिकपणामुळे पैसाच खुप काही असतो हा भ्रम आणि पैशाचा माज क्षणात गळून पडला.”


"तुम्ही श्रीमंत माणसं..." म्हातारीचे ते शब्द सतत कानात घुमत होते...


पण खरोखर श्रीमंत कोण होतं?? नोटांनी टम्म भरलेले वॉलेट असलेला पण नीतीमत्ता नसलेला मी की, फाटका बटवा असलेली पण नीतीमत्तेत तुडुंब प्रामाणिकपणा भरलेली ती...?

आत्मसाक्षात्कार

 ॥ॐ श्री परमात्मने नमः॥


श्रीमद्भगवद्गीता अध्याय नववा


*"राजविद्याराजगुह्ययोग"*


श्लोक संख्या :- ३४

वक्ते :- भगवान श्रीकृष्ण (३४ श्लोक) 


*-----------------------------*


*आत्मसाक्षात्कारानंतर काय?*  


एकदा एक आत्मसाक्षात्कारी संत धान्याचं पोतं खांद्यावर घेऊन बाहेर निघाले होते. तेव्हा रस्त्याने जाणार्‍या एका मनुष्याने त्यांना थांबवून विचारलं, 


*‘आत्मसाक्षात्कार प्राप्त झाल्यावर काय होतं ते सांगू शकाल का?’*


संतांनी त्याच्याकडे पाहिलं आणि हसतच आपल्या खांद्यावरचं ओझं खाली ठेवलं. याचाच अर्थ, त्यांनी काहीही न बोलता उत्तर दिलं. हे पाहून तो मनुष्य विचारमग्न झाला. मग त्याने विचारलं, 


आत्मसाक्षात्कार झाल्यावर लोक काय करतात? आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर लोक कसे जगतात?


हे प्रश्न ऐकून संतानी पुन्हा पोतं खांद्यावर टाकलं आणि मार्गक्रमण करू लागले.

*अर्थातच* आत्मसाक्षात्कार होण्यापूर्वीही मनुष्य ओझं वाहत असतो आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त झाल्यानंतरही तो ओझ वाहतो परंतु दोन्हीत मूलभूत फरक असतो.आधी मनुष्य पोत्याच्या वजनाला ओझं समजतो. 


*मात्र* आत्मसाक्षात्कारानंतर ओझ्याचं रूपांतर *ज्ञानात* होतं आणि ते आनंदाला कारणीभूत ठरतं. म्हणूनच तुम्हालादेखील भारवाहक नव्हे तर ज्ञानोपासक व्हायचं आहे. ज्यांना ओझी वाहायला आवडतं, ते लोभी बनतात, रोगी बनतात. मात्र जे ज्ञानाचे उपासक असतात ते साधक बनतात, योगी बनतात. अनुभूती (समज) नसेल तर मनुष्याला ज्ञानाचंही ओझं वाटतं, तसंच दुःखासोबत सुखाचंही ओझं वाटतं. 


नवव्या अध्यायात तुमच्यासमोर *"परम गोपनीय ज्ञान योगी"* होण्याचं रहस्य उलगडलं जात आहे. यात तुम्ही वाचत असलेले शब्द महत्त्वाचे नसून त्याद्वारे मिळणारा बोध महत्त्वाचा आहे. मात्र हे ‘परम गोपनीय ज्ञान’ नेमकं काय आहे? 


*ज्ञान आणि विज्ञान* यांच्या संयोगाने जे तयार होतं ते *तत्त्वज्ञान!* 

या तत्त्वज्ञानाची अनुभूती झाल्यावरच परम गोपनीय (परमगुह्य) ज्ञानाचं रहस्य उलगडतं. तत्त्वज्ञान हे असं ज्ञान आहे, जे जाणलं नाही तर सर्वकाही जाणूनही काहीच न जाणल्यासारखं आहे. 


जसं,तुमचा उजवा हात ज्ञानाचं प्रतीक आहे आणि डावा हात विज्ञानाचं.मात्र जेव्हा हे दोन्ही हात एकत्र येतात तेव्हा जे प्रकटतं ते तत्त्वज्ञान! अर्थातच यांचा परस्परांशी योग्य सहयोग होणं  आवश्यक आहे. योग्य सहयोग असला तर हात परस्परांपासून कितीही दूर गेले तरीही सहयोग कायम टिकून राहतो. 


ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीशी तुमचे हृदयापासून सूर जुळलेले असतील तर ती व्यक्ती तुमच्यापासून कितीही लांब असली तरी जवळच असते. मात्र एखाद्या व्यक्तीशी हृदय (मन) जुळलेलं नसेलतर ती जवळअसूनही तिच्याविषयी आपुलकी वाटत नाही. 


जर विज्ञान म्हणालं, ‘मी महान’ आणि ज्ञान म्हणालं, ‘मी महान’ तर त्यांचा सहयोग होऊ शकत नाही. यासाठी अंतरंगात ज्ञान-विज्ञान यांचा ताळमेळ साधून गोपनीय ज्ञान प्रकटण्याची संधी तुम्ही द्यायला हवी. 


मानवाच्या जीवनात घडणार्‍या सर्व घटना त्याच्या संकल्पावर आधारित असतात. मात्र त्याच्या अंतर्यामी असलेलं चैतन्य यापासून विलग असतं. माणसाच्या वर्तमानातील कर्मांवर त्याची पुढील कर्मं अवलंबून असतात आणि अशा प्रकारे जीवनचक्र सुरू राहतं, हे गोपनीय ज्ञानात दडलेलं रहस्य आहे. या परमचैतन्याची अनुभूती म्हणजेच आत्मबोध होय. 


*भगवान श्रीकृष्ण म्हणतात,* 

दुष्ट आणि दुराचारी मनुष्यदेखील संकल्प शक्तीच्या आधारे आत्मबोध प्राप्त करू शकतो. खरंतर त्याला साधूच म्हणावं लागेल.वाल्या कोळीचे वाल्मिकींमध्ये झालेलं रूपांतर आपणा सर्वांना ज्ञात आहेच. आत्मबोध अवस्था प्राप्त करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या असामान्य समर्पण योगाचा उल्लेख या अध्यायात आलेला आहे. 


हा असा योग आहे, ज्यात कर्मच नव्हे तर कर्म करणारासुद्धा समर्पित होतो. त्यानंतरच जी अवस्था प्रकट होते ती आत्मबोधाची!एखादा मनुष्य समर्पण करतो तेव्हा तो सुरुवातीला स्वतःचं कर्मफळ, शंका, वृत्ती, सुख, दुःख इत्यादी बाह्य गोष्टी समर्पित करतो. परंतु असामान्य समर्पण योग 

‘तू स्वतःही समर्पित हो’ असं शिकवतो. 


*समजा,एखाद्याला सांगितलं,*

की ‘तुझ्याकडे जे जे आहे ते सर्व समर्पित कर’ 


तर सुरुवातीला तो त्याच्या आसपास असलेल्या वस्तू समर्पित करेल. मग हळूहळू खिशातल्या वस्तू काढून ठेवेल. परंतु तेव्हा त्याच्या लक्षात येत नाही, की वस्तू काढणारा कर्तासुद्धा (अहंकारसुद्धा) समर्पित व्हायला हवा. हाच असामान्य समर्पण योग आहे, जो प्रस्तुत अध्यायामध्ये आपल्याला समजून घ्यायचा आहे. 


सुरुवातीला मनुष्याचं मन यासाठी तयार होत नाही. तेव्हा त्याला सांगितलं जातं, 


‘आधी ज्या सवयी आणि विचार समर्पित करणं सहज शक्य आहे त्यांच्या समर्पणाने सुरुवात तरी कर.’ मग हळूहळू त्याच्यातील कर्ताभाव आणि तुलनात्मक मनही समर्पित होतं आणि मग जे प्रकटतं ते गोपनीय ज्ञान! 



*-----------------------------*

संदर्भ ग्रंथ :-

संपूर्ण भगवद्गीता - सरश्री


*।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।*

Thursday, July 11, 2024

चालते - बोलते देव

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩 श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩

संत  हे  चालते  -  बोलते  देवच  आहेत.*


व्यवहारात ज्याला चांगले वागता येत नाही, त्याला नाही परमार्थ करता येणार. व्यवहारात झालेल्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देणार नाही असा निश्चय करावा, आणि सद्‌गुरू आज्ञा प्रमाण मानून तो तडीस न्यावा. साधनावर जोर द्यावा. स्वतः कोण याची ओळख करून घ्यावी. भगवंतापरते कोणी नाही हे कळले म्हणजे मी कोण हे कळते. निर्गुण जरी समजले तरी सगुण नाही सोडू. 

माझ्या मुखी राम आला यापरते दुसरे भाग्य ते कोणते ? हृदयात स्फूर्ती येऊनच आपण बोलतो; मग आमच्या मुखात राम आला तर तो हृदयात नाही असे कसे म्हणावे ?


तुम्ही मला उपनिषदांतले सांगा म्हटले तर कसे सांगू ? ज्याने जे केले तेच तो सांगणार. एक गुरू आज्ञापालन याशिवाय दुसरे काहीच मी केले नाही, तर मी दुसरे काय सांगणार ? संताचा समागम केला म्हणजे आपण मार्गाला लागतो. आपण साधूला व्यवहारात आणतो, आणि नंतर तो आपल्याशी व्यवहाराने वागला म्हणजे त्याच्याजवळ समता नाही म्हणून उलट ओरड करतो ! 

संत हे देहाचे रोग बरे करीत नसून, त्या रोगांची भिती नाहीशी करतात. संत हे चालते-बोलते देवच आहेत. संतांच्या देहाच्या हालचालींना महत्त्व नाही. भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वांत मोठा उपकार होय. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हेच खरे संतांचे कार्य होय. 

संतांचा कोणताही मार्ग हा वेदांच्या आणि शास्त्रांच्या उलट असणे शक्यच नाही. संत सूर्यासारखे जगावर स्वाभाविक उपकार करतात. सूर्याचे तेज कमी होते आहे असे शास्त्रज्ञ म्हणतात, पण संतांचे तेज मात्र वाढतेच आहे.


श्रीमंत आईबापांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा भीक मागताना पाहून आपल्याला त्याची कींव येते, त्याप्रमाणे मनुष्यजन्माला येऊन आपण दुःख करतो हे पाहून संतांना वाईट वाटते. एकूण योनी इतक्या आहेत की, त्यांमध्ये मनुष्यजन्म येणे कठीण आहे. मनुष्यजन्म येऊन भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार नुकसान आहे. 

म्हणून अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा, त्यांची कृपा प्राप्त करून घ्यावी. संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावे; पडण्याची, अडखळण्याची भितीच नाही. आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाक ऐकूच येत नाही. ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर असावे.

 संतवचनावर विश्वास ठेवू या, म्हणजे भगवत्प्रेम लागेलच. ते लागल्यावर विषयप्रेम कमी होईल. म्हणून संतांची संगत करणे एवढे जरी केले तरी कल्याणच होईल.


  संत - संगती  आणि  नामस्मरण  यानेच  भगवत्प्रेम  येईल .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Wednesday, July 10, 2024

पंगत

 *पंगतीमधील आयुष्य रुपी पत्रावळ*

------------------------------

🪸 *श्रीदत्त,क्षेत्रस्थानी* *छानशी जेवणाची पंगत बसलेली आहे.* 


 *समोर असणाऱ्या  पत्रावळीवर उत्तमोत्तम अन्न पदार्थ वाढण्याकरीता तयार होऊन येत आहेत.*


*जेवणासाठी  नाना प्रकारच्या  केलेल्या पक्वान्नांचा  सुवासही दरवळत आहे.* 


*सर्वत्र नुसता घमघमाट सुटलेला आहे.*


 *वाढपी येऊन क्रमाक्रमाने एक एक जिन्नस  पत्रावळीवरती वाढला जाऊ लागला.*  


*पत्रावळ पूर्णपणे वाढून झाली.*

 *वदनी कवळ------ झाले.*


*नमः पार्वतीपते हरहर महादेव.  जयजयकार देखील म्हणून झाला.*

 

 *आणि जेवायला सुरुवात झाली.  आहाहा...बेत ऊत्तम होता. जेवता जेवता अखेरीस 'गोडासाठी जागा करा' 'गोडासाठी जागा करा' असे ओरडत,ओरडत  एक वाढपी आला. त्याने  गोड खमंग  अशी पक्वान्ने' वाढायला आणली होती.*🪸

................................

*या जेवणावळी मधील  पत्रावळीचा व वाढल्या जाणाऱ्या  पदार्थांचा, आणि वाढप्याचा  जर पूर्णपणे  विचार केला. तर त्याचा खालीलप्रमाणे अर्थ निघतो.*

    ...........................

🪸 *ही जी पत्रावळ वाढलेली आहे ना. ती  म्हणजे आपले आयुष्य आहे.*

 

 *नानाविध पदार्थ वाढायला येत आहेत.* 


*म्हणजेच आपल्या आयुष्यामधे येणारे  निरनिराळे  विविध टप्पे आहेत.*


*(आपण नेहमी  म्हणतोच नां ? आयुष्यात  समोर काय वाढून ठेवले आहे? देव जाणे)*


 *ह्या वाढण्यासाठी आलेल्या  पदार्थांमध्ये मीठ  हे घातलेले आहेच. पण तरीही पत्रावळीत आणखी जादा मीठ  वाढले  गेलेले आहे.*

 

*ह्याचा अर्थ असा की आयुष्यातील चालू कर्मभोगांसोबत*

*(प्रारब्धासोबत)  गत कर्मभोगांचाही परिणाम  अर्थात गत "प्रारब्ध" हे देखील या बरोबरच  भोगून संपवायचे आहे..* 


 *या पंगतीमधे वाढायला येणारा  वाढपी म्हणजे दुसरा तिसरा कोणीही  नसून तो पुढे,पुढे सरकणारा  'काळ' आहे.*


 *जेव्हा हाच 'काळ'  श्रीदत्त कृपेने "मोक्षरुपी" अशी गोड  पक्वांने  वाढायला घेऊन येतो. तेव्हा तो ओरडून,ओरडून जागृत  करुन सांगत  असतो.*


 *बाबारे आता बस कर.! आपण स्वताहून प्रपंच रुपी पदार्थ  आता जरा बाजूला सार.  आणि भगवत भक्ती करुन  जीवनात मोक्ष प्राप्ती मिळव.* 


*ती  मिळवण्यासाठी जागा पटापट रिकामी  कर. अर्थात  कर्मभोग  आहेत ते भोगून संपव आणि मोक्षाला प्राप्त हो.* 


*ज्यांनी लिहिले. त्यांनी किती छान दृष्टांत दिला आहे.विचार करायला लावणारा लेख आहे🙏.*


*अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त*


🙏🏼🚩🙏🏼🚩🙏🏼🚩🙏🏼🚩

परमार्थ

 काही लोक आहाराचा यज्ञ करतात. 'अपरे नियताहारा '  नियत म्हणजे नियमन करणे याचा अर्थ ते लोक आपल्या आहारावर बंधन ठेवतात. भगवान  जेव्हा आहार सांगतात तेव्हा त्याचा अर्थ  फक्त खाणे असा नाही तर आहार म्हणजे बाहेरून आत आणण.

  प्रत्येक इंद्रियांचा आहार आहे. तर या सर्व आहारावर बंधन ताबा पाहिजे . पारमार्थिक मनुष्य म्हटला की त्याच्या जीवनामध्ये एक सौंदर्य पाहिजे. तो सगळं करील पण एका मर्यादेन करील.

 तो सर्वं इंद्रियांचे नियमन करील. ही बंधनं नाईलाज म्हणून न पाळता मनापासून आनंदाने पाळली पाहिजे. जे खायचे ते हलकं असावं पण त्यात सत्व असावं. फळं खावीत पण ती पचायला हलकी असावीत. स्वामी रामदास होते काननगडचे ते उकडलेले बटाटे आणि केळी पण खायचे. पुढे जपात एकाग्रता येईना तर त्यांनी अन्न सोडले. स्वामी रामतीर्थ पंजाबी होते. ते नेहमी चपाती खायचे पुढे पुढे ते फक्त गाईचे दूध पीत असत. आपण आपल्या देहाला योग्य तेच करावं.

 पण शक्यतो आहारावर मर्यादा बंधन पाहिजे. तरुणपणी माणूस जसा पोटभर  खात होता तस वय झाल्यावर खाणे म्हणजे परमार्थ नाही. म्हणून गीता सांगते की नियत आहार पाहिजे सगळ्याच बाबतीत. श्रीमहाराज म्हणत " ज्याने जीभ जिंकली त्याने अर्धा परमार्थ जिंकला " जिभेची काम दोन एक खाणे आणि दुसरे बोलणे. आपण सर्व जप करतो मौन पाळतो भरपूर उपासना करतो पण एखाद्या दिवशी इतकं बोलतो की त्या जपाचा परिणाम नाहीसा होतो.

Tuesday, July 9, 2024

साधना

 चिंतन 

              श्रीराम,

        समर्थांनी दासबोधात त्रिविध तापांची विस्तृत माहिती दिली आहे. भागवत ग्रंथातील पहिलाच श्लोक, सच्चिदानंद रुपाय | विश्वोत्पत्यादिहेतवे| तापत्रय विनाशाय |श्रीकृष्णाय वयं नमः ||

 म्हणजे या सृष्टीची किंवा जगताची उत्पत्ती, स्थिती, आणि लय ज्याच्या इच्छेवर आहे आणि तीन तापांचे नाश करण्याचे सामर्थ्य ज्याच्या जवळ आहे अशा सच्चिदानंद स्वरूप असलेल्या श्रीकृष्णाला नमस्कार करुया. या श्लोकात श्रीकृष्णाचे प्रत्यक्ष स्वरूप (सच्चिदानंद) त्याचे सामर्थ्य (विश्वाची निर्मिती, स्थिती, आणि लय इ.) आणि त्याचा स्वभाव हे सांगितले आहे.

                  अशा सच्चिदानंद स्वरूप असलेल्या ईश्वराला अनन्यभावे शरण गेल्यावर आपल्या तिन्ही तापांची निवृत्ती होते. म्हणजे त्रिविध ताप नाहीसे होत नाहीत तर मी' म्हणजे देह' अशा देहबुद्धीने जी जी दुःखे आपण भोगत असतो ती दुःखे 'मी म्हणजे आत्मा' अशा आत्मबुद्धीने भोगली जात नाहीत.

            भक्तीमार्गावरून प्रवास करताना या टप्प्याला पोहोचण्याचे आपले ध्येय असले पाहिजे. देहाशिवाय आपले अस्तित्व आहे ह्याची जाणीव सद्गुरू करून देतात. मात्र जेव्हा त्याचा अनुभव घेण्याचे क्रियमाण कर्म जीवाला म्हणजे आपल्याला करावे लागते त्याला साधना म्हणतात.

                     ||श्रीराम ||

Monday, July 8, 2024

मोठी शिकवण

 *फक्त धन दौलत असली म्हणजे कोणी श्रीमंत होत नसतो,तर ज्याच्याकडे  मनाची श्रीमंती आहे तोच खरा श्रीमंत*

***********************************

ऑफिस मधुन निघाल्यावर का कोणास ठाऊक पण आज द्राक्ष खायची जाम इच्छा झाली,म्हणून घरी न जाता कार सरळ फ्रुटमार्केटच्या दिशेने वळवली.

फ्रुटमार्केटमध्ये गोड द्राक्ष कुठे मिळतील याचा शोध घेऊ लागलो.

असंख्य ठेले, लोटगाड्यांवरचे द्राक्ष चाखुन मी ते नाकारत होतो. जरा भटकंती झाल्यावर

थोड्या अंतरावरच गर्दी पासुन दूर एका झाडाच्या खाली एक म्हातारी टोपलंभर द्राक्ष घेऊन विकायला बसली होती.

या म्हातारीकडे तरी वेगळे काय असणार? मी स्वतःशीच बोललो..

"पण तरीही चाखुन बघायला काय हरकत आहे?" मी स्वतःलाच समजवत म्हातारीकडे जायला निघालो.

म्हातारीकडे बऱ्याच वेळापासुन कदाचित कोणी गि-हाईक आलेल नसाव कारण मी जवळ जाताच म्हातारीला आनंद झाला...

"आज्जी कशी दिलीत द्राक्षं..?" "या सायेब घ्या की द्राक्षं. लई ग्वाड हायेत. जशी साखरच हाय... खाऊन तरी बघा की" म्हातारी माझ्या हातावर द्राक्ष ठेवत म्हणाली.

मी द्राक्ष तोंडात टाकून चाखु लागलो....

अरेच्चा द्राक्ष खरचं खुप गोड आहेत की...

पुर्ण मार्केटमध्ये इतकी गोड द्राक्ष नव्हती.

"आज्जी.. द्राक्षं खरचं खुप गोड आहेत गं.... पुर्ण मार्केटमध्ये इतकी गोड द्राक्षं कुठेही नाहीत. पण तुझ्याकडे कशी गं..." गि-हाईक खुष झालेला पाहुन म्हातारीला ही आनंद झाला....

"आरं लेका ही वेलावरची पिकलेली द्राक्षं हायत. मार्केटला सगळी व्यापारी कार्पीट (म्हातारीला कार्बाईट म्हणायचे होते) टाकुन द्राक्षं पिकवित्यात, पण माझ्या मनाला ते आजवर पटलं न्हाई...दोन पैकं कमी मिळालं तर चालतय पण कुणाच्या जीवाशी खेळणं बरं न्हाई. आख्ख्या हयातीत कधीबी बेईमानीनं धंदा नाय केला."

म्हातारीच्या वयावरुन आणि चेहऱ्यावरुन ती खरं तेच बोलतेय हे मी ओळखलं.

"हं.. बरं काय किलो दिलीत?"

"किलोला दिडशे रुपये."

"बापरे... आजी भाव जास्त आहे की गं.... शंभर रु. किलो दे. दोन किलो घेतो."

"न्हाय रं लेका. किलोला शंभर रुपये न्हाय परवडत."

"बरं ठिक आहे... एकशे वीस रु. किलो दे." मी पुन्हा भाव करत बोललो.

"लेका आरं एकशे ईस रूपये तर माझी खरेदी हाय. किलोला एकशे तीस देते बघ. आता भाव नगं करू. एकतर आज कायबी माल ईकला न्हाई रं." म्हातारी केविलवाण्या स्वरात बोलली.

"बरं दोन किलो दे." दिडशे रूपये किलोची द्राक्षं मी एकशे तीस रूपयांत घेतली याचा मला अभिमान वाटत होता. दोन किलो मागे मी चाळीस रूपये वाचवले होते. मी मनातल्या मनात माझ्यावर खुष झालो.

म्हातारीने दोन किलो द्राक्षं बांधली वरतून अजुन एक लळ टाकली.

मी वॉलेट मधून पाचशे रुपयांच्या बंडल मधून एक नोट काढत म्हातारीला दिली. बंडल पुन्हा वॉलेट मधे ठेवून वॉलेट जीन्सच्या मागच्या पॉकेट मध्ये ठेवले.

म्हातारीने पाचशेची नोट घेऊन मांडी खाली ठेवली.

आणि कमरेला बांधलेल्या फाटक्या बटव्यातुन थरथरत्या हाताने तीनशे चाळीस रुपये काढून मला परत केले.

मी पैसे मोजले. तीनशे चाळीस!!! अरे व्वा म्हातारीने चुकुन मला शंभर रुपये जास्त दिले होते.

शंभर रुपयांचा फायदा. मला मनातूनच आनंद झाला.

म्हातारीच्या लक्षात यायच्या आत इथून निघायला हवे.

मी ते पैसे तसेच शर्टच्या वरच्या खिशात कोंबले.. आणि माघारी फिरुन कारच्या दिशेने निघालो.

सात-आठ पाऊले चालतो न चालतो तोच म्हातारीचा आवाज आला.

"आरं ल्येका.. थांब.."

मी न ऐकल्यासारखं केलं..

"आरे... ल्येका... जरा थांब तर. ईकडं ये.." म्हातारी पुन्हा जीवाच्या आकांताने ओरडली.

आता मला थांबून म्हातारीकडे जाणं भाग होतं.

"हिशोब म्हातारीच्या लक्षात आला वाटतं.." मी स्वतःशीच बोलत म्हातारीकडे गेलो.

म्हातारी जर शंभर रूपये जास्त दिल्याबद्दल बोलली तर काय सारवासारव करायची हे मी क्षणातच ठरवून ठेवले होते.

"काय झालं आजी... का हाक मारलीस... काही हिशोब चुकला का...?" मी जरा अपराध्यासारखा बोललो.

"न्हाई रे ल्येका. आरं हे तुझं पैशाचं पाकिट इथं खाली पडलं व्हतं बघं. तु जायला निघाला आनं.. माझं लक्षं गेलं बघ. हे घे बाबा तुझं पाकिट..." म्हातारी वॉलेटवरची धुळ तिच्या पदराने स्वच्छ करत आणि ते कपाळावर लावत मला वॉलेट परत देत बोलली.

आता मात्र मी स्तब्ध झालो.

मी लगेच जीन्सचा मागचा खिसा हाताने चाचपडला... खिसा रिकामा होता.

म्हातारीला पाचशेची नोट दिल्यावर वॉलेट पुन्हा खिशात ठेवतांना ते खिशात न ठेवता चुकुन खाली पडले होते.

"ओह.. माय गॉड.." माझ्या तोंडुन आपसुकच शब्द निघाले.

मी जाणुन बुजून म्हातारीचे जास्त घेतलेले शंभर रुपये आणि तीने प्रामाणिकपणे मला परत केलेले माझे हजारो रुपये. 

म्हातारीच्या प्रामाणिकपणाने मी माझ्याच नजरेत पडलो.

मला वाटलं होतं की म्हातारीने शंभर रुपये जास्त दिले हे तिच्या लक्षात आले म्हणून तिने मला परत बोलवलं... पण.... पण तिने तर माझे पैशाने भरलेले वॉलेट मला परत द्यायला बोलवलं होतं.

*म्हातारीचे शंभर रुपये जास्त घेऊन मला जितका आनंद झाला होता... त्यापेक्षा जास्त हजारो रुपये भरलेले वॉलेट मला परत करुन म्हातारीला झाला होता.*

मी अक्षरक्षः गप्पगार झालो. मला माझीच लाज वाटत होती.

वॉलेट मध्ये कमीतकमी पंधरा वीस हजार रुपये तरी नक्कीच असतील.

पण इतक्या पैशांचा म्हातारीला किंचितही मोह झाला नव्हता,

आणि माझी त्या गरीब म्हातारीच्या फक्त शंभर रुपयांवर लाळ गळली होती. 

"घे लेका तुझं पाकिट. आरं नीट ठेवत जा बाबा पैकं. तुम्ही श्रीमंत माणसं. तुमच्यासाठी लई मोठ्ठी रक्कम नसल ही.. तरी पण...

मी गप्पगारच झालो.

"तुम्ही श्रीमंत माणसं..." म्हातारीचे ते वाक्य ऐकुन पुन्हा अपराध्यासारखं झालं.

आता... आता... म्हातारीने मला जास्त दिलेले ते शंभर रुपये.. मला हजारो कोटी रुपयांच्या कर्जाच्या ओझ्यासारखे वाटत होते..

म्हातारीला परत करुन टाकतो ते शंभर रुपये...

माझा हात वरच्या खिशात गेला...

पण... पण काय सांगु म्हातारीला.... शंभर रुपये जास्त दिले म्हणून... मी माझ्याच नजरेत पडलो... मला माझीच किळस येत होती...

"आज्जी, हे ठेव तुला काही रुपये... तु इतक्या प्रामाणिकपणाने मला माझे पैसे परत केलेस ना..."

मी पाचशेच्या दोन नोटा म्हातारीला देत बोललो...

"ऐ बाबा. नगं नगं. मला नको तुझा पैका. हा तुझा पैका हाय. या पैक्यावर माझा कायबी अधिकार नाही बघ.

पैसाच सगळं काही नसतं रं पोरा ईमान नावाची पण काही चीज असते की.."

म्हातारी नकळत मला खुप मोठी शिकवण देऊन गेली होती. मी नि:शब्दच झालो होतो.


"म्हातारीच्या प्रामाणिकपणामुळे पैसाच खुप काही असतो हा भ्रम आणि पैशाचा माज क्षणात गळून पडला.”


"तुम्ही श्रीमंत माणसं..." म्हातारीचे ते शब्द सतत कानात घुमत होते...


पण खरोखर श्रीमंत कोण होतं?? नोटांनी टम्म भरलेले वॉलेट असलेला पण नीतीमत्ता नसलेला मी की, फाटका बटवा असलेली पण नीतीमत्तेत तुडुंब प्रामाणिकपणा भरलेली ती...?