सगळ्या ठिकाणी सगळीकडे प्रत्येक गोष्टीत ईश्वराचा हात आहे म्हणून श्री.गोंदवलेकर महाराज म्हणत "राम कर्ता" आणि त्याच्या संकल्पाने ही शक्ती विश्वात काम करते. ह्या शक्तीचे कार्य इश्र्वरोनमुख आहे. म्हणजे तुम्हाला सर्वाँना इश्र्वराकडे ढकलण्याचे काम आहे.यालाच उत्क्रांती म्हणतात. आपण जगमध्येजे जगतो ते नुसतं माणसं म्हणून नाही तर आपल्या आत्म्याचा विकास व्हावा म्हणून जी जी गोष्ट घडेल ती ती यासाठी घडते . मग आपण तक्रार करणं चूक आहे. या घटनेमध्ये परमात्म्याचा काय हेतू आहे त्याची जाणीव ठेवली पाहिजे. आपल्याला तो दुःख देतो तेव्हा ही जाणीव राहिली पाहिजे. प्रत्येक गोष्ट घडते ती सहेतुक असते. सत्पुरुष यांना तर ज्ञानचक्षू असतात म्हणजे ती दृष्टी असते. ही दिव्य दृष्टी नामस्मरणाने येते. हे असेच घडायचे.मग यात दुःख करण्यासारखं काय आहे.
उदा. असं दिसतं की एखादं मुल जन्मला येतं आणि भाग्य उदयाला येत. तसेच एखादं मुल जन्माला आलं की कटकटी निर्माण होतात याला कारण काहीही कारण नाही. सर्व तिथूनच (भगवंता कडून) आलेले आहे,म्हणून त्याचे पाय धरावे.
No comments:
Post a Comment