TechRepublic Blogs

Wednesday, January 29, 2025

श्रध्दा

 श्री ब्रह्मचैतन्य व स्वामी स्वरूपानंद एकच आहेत !


आपल्या सर्व जणांच्या मनात श्रध्दा कमी व शंकाच जास्त असतात. ' तुम्ही फक्त नाम घ्या , तुमची जबाबदारी मी घेतो '  असे  रामरायाची कृपा असलेले श्रीमहाराज वारंवार सांगतात.

 मी देहात कधीही नव्हतो, मी नामात होतो असे महाराजांनी सांगून देखील आपली श्रध्दा कमी पडते. श्रध्दा असेल तर नामाची प्रचिती लवकर येते हेच सत्य आहे. 


पूज्य स्वामी स्वरूपानंदांची एक गोष्ट .एका धार्मिक गृहस्थांने गोंदवले येथे प.पु. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा समाधीवर अनुग्रह घेतला. 

पण त्याला कायम एक शंका येई की श्रीमहाराजांचा खरच शिष्य झालो का ? अनुग्रहीत आहे का ?


साधारण पाच-सहा महिन्यानंतर त्या सदगृहस्थाचे दोन मित्र पावसला पूज्य स्वामींच्या दर्शनाला जाणार होते . त्यांच्या बरोबर हे गृहस्थ पण गेले.  

सकाळी तिकडे पोहोचल्यावर त्या दोन मित्रांच्या मनात श्रीस्वामींचा अनुग्रह घ्यावा असे आले. त्याप्रमाणे त्यांनी नारळ , हार , पेढे खरेदी केले. 

त्यांच्या सोबत ह्या गृहस्थांनी पण ते विकत घेतले. का ? तर स्वामी देहधारी आणि श्रीमहारांज देहात नाहीत !

 त्यांनी आपला कितपत स्वीकार केला असेल अशी मनात  शंका आली म्हणून . वरील दोन मित्रांना अनुग्रह झाल्यानंतर यांची वेळ आली. हे आत गेले.


नमस्कार झाल्यावर अनुग्रहाच्या अनुषंगाने विचारले. तेव्हा पूज्य स्वामी स्वरूपानंदांनी त्यांच्याकडे एकदा  नुसते पाहीले आणि म्हणाले , " असे काय करता ?

 श्री ब्रह्मचैतन्यानी तुमचा कधीच स्वीकार केला आहे . तुम्ही त्यांचे आहात . त्यांच्यात आणि आमच्यात काही फरक नाही. आम्ही दोघेही एकच आहोत ! "


स्वामीच्या उत्तराने या गृहस्थाची शंका पूर्ण मिटली.


|| श्रीराम जयराम जय जय राम ||


॥ जेथे नाम तेथे माझे प्राण ॥

No comments:

Post a Comment