TechRepublic Blogs

Tuesday, January 7, 2025

सोनचाफा

 🌹🌹🌹🌹🌹🏵️🌹🌹🌹🌹🌹

    *🌿🌹🙏 आरोग्य प्रभात 🙏🌹🌿*

             *🔸सोनचाफा(सोनेरी)🔸*


*सोनचाफा हा विष्णूला प्रिय आहे असे मी ऐकले होते. हल्ली फुलवाल्याकडे सोनचाफ्याची फुले भरपूर प्रमाणात विकायला येत आहेत. माझे संशोधनात आलेले सोनचाफ्याचे गुणधर्म पुढे देत आहे.*


*गुडघेदुखी, आमवात, हाडेदुखणे, हाडाचा कॅन्सर, केस गळणे, चाई घसा सुजणे, स्वरयंत्र, थायरॉईड, लघवीला आग होणे, लघवीतून रक्त पडणे, पाळीत गठ्ठे पडणे, पाळी लांबणे, स्तनाचा कॅन्सर.*


*माझे अनुभव पुढे देत आहे.*


*२००८ साली माझे अचानक गुडघे दुखायला लागले. मी दुसऱ्या मजल्यावर राहतो. खाली उतरल्यावर जिना चढताना खूप त्रासदायक होऊ लागला पूर्वी दोन तीन मिनिटात जिने चढत होतो ते आता १५ -१७ मिनिटे लागू लागली. गुडघे दुखत असल्याने पाय तिरके करून जिना चढावा लागत होता. मी चार सोनचाफ्याच्या फुलांच्या पाकळ्या काढून एक वाटी तिळाच्या तेलात तळल्या. ते तेल गार झाल्यावर गाळून घेतले व  रोज रात्री गुडघ्यांना चार दिवस चोळले. पाचव्या दिवशी आमच्या वरच्या मजल्यावरील एक सहा वर्षाचा मुलगा  माझ्यापुढे जिना चढत होता. मी त्याच्यामागे सहज पाय आपटत भरभर जिना चढून वर आलो तेव्हा माझ्या लक्षात आले की माझे गुडघे दुखायचे थांबले आहेत.*


*हे मी बर्‍याच जणांना सांगितले. त्यातील काही जणांनी सोनचाफ्याचे तेल तयार करून गुडघ्याला लावल्यामुळे फायदा झाल्याचे सांगितले.*


*हल्ली तंबाखू खाल्याने व पावसाळी हवेमुळे कफ झाल्यामुळे आवाज बदलला आहे व जास्त बोलायला त्रास वाटू लागला. मी सोनचाफ्याच्या फुलाचे पाणी घेतो आहे. त्यामुळे आवाज सुटतो आहे असे लक्षात आले.*


*माझ्याकडे एक गायक आले. त्यांचा आवाज नीट येत नव्हता. त्यांना त्रास वाटत होता. मी त्यांना सोनचाफ्याच्या फुलाचे पाणी घेण्यास सांगितले. पंधरा दिवसांनी त्यांनी येऊन सांगितले की आज कार्यक्रम झाला आवाजाचा काही प्रॉब्लेम तर आला नाहीच उलट वरच्या सप्तकात आवाज चढला की जो पूर्वी चढत नव्हता.*


*एकदा बोलताना माझे शब्द ओढले जात बोलायला त्रास होत होता. मी सोनचाफ्याचे पाणी घेतले आणि माझा आवाज मोकळा झाला.*


*२०२२ च्या डिसेंबर वय वर्ष ७६ मध्ये माझे गुडघे दुखायला लागले पण पूर्वी इतके दुखत नव्हते. गुडघ्यात मधून मधून कळ यायची. मी सोनचाफ्याच्या फुलाचे पाणी आठ दिवस घेतल्यावर ती कळ येणे थांबले. सध्या मी अधून मधून सोनचाफ्याच्या फुलाचे पाणी घेतो आणि मला फायदा वाटतो.*


*फुलाचे पाणी करणे*

*एक सोनचाफ्याचे फूल वाटीभर पाण्यात रात्रभर ठेवणे. सकाळी फुलबाजूला करून ते पाणी दिवसातून थोडे थोडे चार वेळा पिणे. रोज नवीन पाणी करणे.*


*वर सांगितलेले गुणधर्मातील त्रास ज्यांना असतील त्यांनी सोनचाफा फुलांच्या पाण्याचा प्रयोग करून पहावा. फायदा झाला तर मला कळवावा. म्हणजे माझा अभ्यास होईल व त्याचा इतरांना फायदा होईल.*


*ह्या फुलाचे इंग्रजी नाव मला माहिती नाही.*


*अरविंद जोशी

🌿🌿🌿🌿🌿🏵️🌿🌿🌿🌿🌿

No comments:

Post a Comment