सुबुद्धी म्हणजे कर्माचे फळ ईश्वरावर ठेवून राहण्याची बुद्धी, ज्याला झाली त्याला जन्ममरणाची उपाधी त्रास देत नाही. हा बुद्धीचा जो समज आहे की माझ्या हातात एवढेच आहे ते केल्यावर त्याला फळाची अडचण होत नाही. एक गृहस्थ त्यांना खोकला फार होता.
आणि दमा लागलाकी खोकला जात असे. ते डॉ. भडकमकरांकडे गेले. त्यांना तपासल्यावर डॉ. म्हणाले की तुम्हाला एक खोकला तरी राहील अथवा दमा तरी राहील.
हे गृहस्थ म्हणाले की मी आपल्याकडे आलेलो ते मला बरे कराल म्हणून. ते म्हणाले की हे डॉ. हातात नाही. कारण प्रत्येक शरीराच्या मर्यादा ठरलेल्या असतात. झालेला रोग बरा होण्याला सुद्धा मर्यादा असतात. ज्यांनी हे ओळखल त्यांना कर्मयोग साधला.
मी लग्न केले तर मुले होतीलच याची खात्री नाही, मुलगे होतील की मुली होतील याची खात्री नाही. त्या मुलाबाळांचे जीवन कसे असेल ते सांगता येत नाही. इतकेच काय की मी आज झोपी गेल्यावर उद्या सकाळी उठेल की नाही हेही सांगता येत नाही.
जीवनात अस्वातंत्रता आहे. याला मानवी जीवनाच्या मर्यादा म्हणतात. या मर्यादा ओळखून आपण आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करावा आणि फळ देणारा तो आहे, तेव्हा फळ काय मिळेल याची खात्री नाही हे जो कोणी मनात ठेवून कर्म करेल त्याला कर्मयोग साधेल. असा कर्मयोगी कायम समाधानात राहील.
No comments:
Post a Comment