TechRepublic Blogs

Friday, January 24, 2025

चरित्र

 श्रीराम समर्थ


               *श्रीमहाराजांचे चरित्र*


          पू. केशवरावजी बेलसऱ्यांनी हातांनी लिहिलेल्या *श्रीमहाराजांच्या चरित्राचीं पानें सुमारें दोन हजार होती.*

 सोमवार ता. २२.१०.५६ रोजीं त्यांनी श्रीमहाराजांस [वाणीरुप अवतारात] बोलावून घेऊन लिहिलेलें सर्व दाखविलें. श्रीमहाराजांस हें आवडणार नाही हे त्यांस माहींत होतें. रा.केशवराव म्हणाले,

 *'माझें समाधानाकरितां मी लिहिलें आहे. मला समाधान लाभले. आपण सांगाल तशी व्यवस्था करीन. आज्ञा असेल तर छापावे असें वाटतें. तसे नसल्यास आज्ञेबाहेर नाही.*


          तेव्हां श्रीमहाराजांनी [वाणीरुप अवतारात] त्यांचे श्रमाचें कौतुक केलें व श्री म्हणाले कीं *'तुम्ही इतके कष्ट केले आहेत, मी 'नको' कसे म्हणणार?* छापायचा काय खर्च येतो वगैरे चौकशी करून कळवावे.' त्यां सर्वास [त्यांचे मंडळींनी व मुलानेंही त्यांचे लिहिण्यांस मदत केली होती.] 

श्रीमहाराजांनी आशीर्वाद दिले, व रा. केशवरावांस म्हणाले, *'तुम्ही आपले समजुतीनें चांगलें लिहिलेंच असेल; पण मी चांगलें तेव्हां म्हणेन कीं जर कोणी मला सांगितले कीं, 'चरित्र वाचून मला नाम घेण्याची बुद्धि झाली.'*

 शेवटी श्रींचे कृपेनेंच हें खरे ठरलें. पुष्कळ लोकांनी वरिल प्रमाणे आपणहून कबुली दिली.


               **********

संदर्भः *पू तात्यासाहेब केतकर यांचे आत्मवृत्त पान ४०४ व पू बाबा बेलसरे यांनी लिहिलेले श्रीमहाराजांचे चरित्र.*

संकलन: श्रीप्रसाद वामन महाजन

No comments:

Post a Comment