TechRepublic Blogs

Friday, January 31, 2025

कोपरा

 *पाचवा कोपरा*


"श्रद्धा देसाई इथेच राहतात ना? "

बाहेरून आवाज आला तसे , *"मित्र परिवार "* चे मॅनेजर सुशांत देशपांडे समोर आले. दारात अनोळखी दोन पुरूष आणि एक स्त्री उभे होते .


*" आत या. इथेच राहतात मॅडम . काही काम होतं का?"* देशपांडेंनी विचारलं .

 "भेटायचं होतं मॅडमना", असं म्हणून ते तिघंही व्हिजिटर्स हॉलमधे बसले. गोपाळ मदतनीस आत निरोप घेऊन गेला . श्रद्धाताई लिहीत बसल्या होत्या . बाहेर आपल्याला भेटायला कोण आलं असेल हा विचार करतच त्या फ्रेश झाल्या. स्वच्छ पांढरी सलवार आणि आकाशी कुर्ता घातला . पांढरी ओढणी नीट घेतली . कापलेल्या केसावरून हात फिरवून नीट बसवले . वापरातला चष्मा काढून सोनेरी फ्रेमचा चष्मा घातला . मोबाईल घेतला .. चप्पल घालून त्या बाहेर आल्या. श्रद्धा ताईंना बघून भेटायला आलेले तिघेही उठून उभे राहिले. नमस्कार झाले . आलेल्या स्त्रीने प्रथम श्रद्धाताईचे हात हातात घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. म्हणाली , " मी वैशाली . वैशाली राजे . "मॅडम तुमचं *पाचवा कोपरा* हे पुस्तक बेस्ट सेलर ठरलंय . हार्दिक अभिनंदन " .


"प्रकाशनपूर्व पूर्ण आवृत्ती संपली पुस्तकाची . आता दुसरी काढतोय . " मी रमाकांत जाधव  , मुख्य प्रकाशक . अभिनंदन मॅडम ." त्यांनी अभिनंदन करतच स्वतःची ओळख करून दिली.


जाधव साहेबांनी श्रध्दाताईंचे पुन्हा अभिनंदन करून त्यांना एक पाकिट दिलं . पाकिटात तीन चेक्स बघून श्रद्धाताईंना आश्चर्याचा धक्का बसला. पाच पाच लाखांचे दोन आणि दहा लाखांचा एक चेक होता .


त्यांचा गोंधळलेला चेहरा बघून जाधव साहेब हसले . म्हणाले , " मॅडम आपलं  पुस्तक हिंदी , आणि इंग्लिश भाषेत अनुवादित होणार आहे. . प्रत्येकी पाच लाखांचा तो अॅडव्हान्स आहे. आणि आधीच्या मूळ मराठी पुस्तकाचे दहा लाख आहेत.

 

"दुसरी आवृत्ती वीस हजारांची काढावी म्हणतोय . त्यासाठी आपली परवानगी हवी होती. तेच पेपर्स मी आणलेत. " एवढं बोलणं करून त्यांनी मॅनेजरकडे बघितलं . ती तिसरी व्यक्ती मॅनेजर देशमुख होते. त्यांनी श्रद्धाताईंना काही बाबी समजावून सांगितल्या . सह्या झाल्या. आणि दुसऱ्या आवृत्तीचा ॲडव्हान्स म्हणून जाधवांनी दहा लाखांचा आणखी एक चेक त्यांना दिला.


" श्रद्धाताई , "पाचवा कोपरा " आणखी किती भाषांमधे येईल ठावूक नाही. मराठीच्या किती आवृत्या निघतील हेही माहीत नाही. फक्त तुमचं पेन शाबूत ठेवा . सही साठी . " असं हसत म्हणून , पुन्हा भेटू म्हणत चहापाणी घेऊन मंडळी निघून गेली. 


संध्याकाळी जेवणापूर्वी सर्व "मित्र परिवाराने" श्रद्धा ताईंचे अभिनंदन केले. जवळच्या मित्रांनी *"आता पार्टी हवी"* म्हणून आग्रह केला.


सारं काही स्वप्नवत् होतं . काही वेळ अगदी जवळची मैत्रीण म्हणून त्या वसुधा पंडीतशी बोलत बसल्या . त्या झोपायला गेल्या तरी , श्रद्धाला झोप नव्हती . दुःखात झोप येत नाही , तशीच अत्यानंदानेही माणसाला झोप येत नाही . ताईंचे हेच झाले होते. 


त्यांची स्वतंत्र खोली होती. त्या आपल्या लेखनाच्या टेबलवर बसल्या . काही संदर्भ ग्रंथ , कागद आणि पेन एवढंच त्यांचं भांडवल होतं. . एक फोटो अल्बम होता . तो जुना फोटो अल्बम ताई चाळू लागल्या. तशा अनेक आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर तरळल्या.


वयाच्या तिशीत पतीचं निधन झालं होतं . नंतर पाच वर्षाच्या बाळाला त्यांनी एकटीनं  मोठं केलं होतं . स्वतःचं घर केलं होतं . नोकरी , घर , सासर माहेर सांभाळून बाळाला नुसतंच मोठं केलं नाही तर सक्षम बनवलं होतं . आई आणि बाबा होऊन.


यथावकाश शिक्षण , नोकरी करत बाळचं लग्न झालं . सुरवातीचे काही महिने बरे गेले. तेव्हा त्याही नोकरीत होत्या . श्रद्धा ताईंच्या निवृत्तीनंतर सुनेची वाघनखं बाहेर पडली होती. ती दोघंही नोकरीची असल्याने नातू आणि घर ही जबाबदारी ताईंवर आली . बाळाची केअर टेकर , पोळीवाली बाई बंद झाली. वाढत्या वयानंतर नोकरीतून माणूस निवृत्त होतो . पण बाईला संसारातून निवृत्त होताच येत नाही . उलट जबबाबदाऱ्या वाढतच जातात. तरीही त्या सांभाळून , श्रध्दाताई वेळात वेळ काढून आपला लेखनाचा छंद जपत होत्या. नेमकं तेच सुनेला खटकत होतं . लॅपटॉप वर , मोबाईलवर ती त्यांना लिहिण्याची कामच करू देत नसे. " जागरण करू नका, आराम करा "अशी उसनी काळजी दाखवत त्यांचा छंद तिने जवळ जवळ बंदच केला होता. बाहेरचे सर्व कार्यक्रम बंद झाले होते ते एकटं जायचं नाही या कारणास्तव . वरून , या लेखनातून काय पैसा मिळणार आहे का? वाचतं कोण ही मराठी पुस्तकं आजकाल ? हे बोलणं असायचंच . तिला स्वतःची नोकरी म्हणजे भव्य दिव्य काहीतरी वाटत असे. कला ,गुण यांचा तिच्याशी काहीही संबंध नव्हता.


स्वतः जवळचा पैसा घालून मुलाला ताईंनी दोन बेडरूमचा फ्लॅट घ्यायला मदत केली होती. बारा तेरा वर्ष कशी बशी निघाली . आता नातू मोठा झाला होता. त्याला स्वतंत्र खोली हवीह होती. 

घरी मित्र आलेत , तर त्यांना कुठे बसवायचं यावरून सातवीत असलेल्या नातवाने एक दिवस म्हटलंच , " मला आजीची खोली हवी . स्वतंत्र ."  

बाबांनी "नाही" म्हणताच तो चिडला . म्हणाला "तीन बेडरुमचा फ्लॅट  का नाही घेतलात? "


" अरे बाळा , आमची ऐपत नव्हती , आणि आजीकडेपण पैसा नव्हता . विचार तुझ्या आजीला . " असं बोलायला सूनबाई चुकली नाही. सून बोलल्यानंतरही मुलगा गप्पच होता.

घर आणि नातवाची स्वतंत्र खोली यावरून घरात वारंवार खटके उडू लागले होते. नातू आजी सोबत खोली शेअर करायला तयारच नव्हता. 

एक दिवस कहरच झाला . सुनेनी सरळ फर्मान सोडलं की सोहम दुसऱ्या बेडरूममधे झोपेल. आईंनी हॉलमधे सोफ्यावर झोपावं .


दोन चार दिवस खूप विचार केला . चौकशा झाल्या . मुलगा ,सून ऑफिसला जात होते .

 मित्रांशी गप्पा मारून , नेट वरून श्रद्धा ताईंनी "मित्र परिवार " वृद्धाश्रम निवडला. आणि एक दिवस निश्चयाचा उजाडला .

रात्रीच त्यांनी बॅग भरून ठेवली . दोन साड्या , दोनतीन मोजके ड्रेसेस आणि काही डायऱ्या , पुस्तकं , पेन बॅगेत टाकलं . बँकेचं पासबुक, चेकबुक , ए.टी.एम. कार्ड , आधार कार्ड , पॅनकार्ड , पासपोर्ट एका पाऊच मधे घातलं . ब्रश ,पेस्ट ,पावडर , टिकलीचं पाकीट , कंगवा घेतला. बॅग हॉलमधे ठेवली. 


त्यांना मिळालेल्या एका छोट्या कपाटातील सामान वेगळ्या सुटकेस मधे भरून ठेवले . कपाट रिकामं केलं .

सर्वांचा सकाळचा नाश्ता , डबे तयार करून ठेवले. देवाची पूजा केली . 


तोवर सकाळी तिघंही उठले . "आई ही बॅग ? कुठे निघालीस ?" असं मुलाने विचारलं . श्रध्दाताईने "मित्र परिवारचा" पत्ता सांगितला . म्हणाल्या , " अरे वाईट वाटून घेऊ नका. सोहमला खोली हवीय. ती मी रिकामी केलीय. माझे अनेक मित्र मैत्रिणी आहेत परिवारात . स्वतंत्र खोली आहे तिथं. माझं छान निभेल तिथे. आणि याच शहरात आहे की मी . ही सोय आहे रे तात्पुरती ." 


मुलगा दुखावला , पण सूनबाईला मात्र मनातून आनंद झाला होता. विना औषधीने खोकला गेला होता. सोहम आता मोठा असल्याने तो शाळेतून आल्यावर फ्लॅटचा दरवाजा उघडून आत येऊ शकत होता. सोहम लहान असतानाचे तिचे गरजेचे दिवस संपले होते.

लगेच ताईंनी कॅब बुक केली. कुणाचेच चेहरे न वाचता त्या लिफ्टने खाली आल्या.


मित्र परिवारात त्यांचं छान स्वागत झालं . दोन तीन दिवसातच त्या तिथे रुळल्या . नवीन तंत्रज्ञानाशी त्यांनी नोकरीत असतानाच जुळवून घेतलं होतंच . इथे आणखी टेक्नोसॅव्ही मित्र मिळाले. सोशल मिडियावर त्या ॲक्टिव्ह झाल्या. पेन्शन होतीच. तब्येतीची कुरकुर नव्हती. आता त्यांनी खरंखुरं आयुष्य जगायला सुरुवात केली होती. 


इथे आल्यानंतर काही दिवसांतच एका पूर्वी लिहिलेल्या कादंबरीचं त्यांनी पुनर्लेखन केलं . रीतसर त्याचं पुस्तक झालं , *" पाचवा कोपरा "* .तीनच महिन्यात त्यांना तब्बल तीस लाखांची कमाई त्यांच्या पुस्तकाने करून दिली होती.


सकाळी त्यांनी ते चेक्स पेन्शन अकौंटला न टाकता मुलासोबतच्या अकौंटला टाकले. त्यांच्याच बँकेचे चेक्स असल्याने ते लवकरच जमा झाले . लंच ब्रेकमधे अचानक तीस लाखांचा क्रेडिट मॅसेज बघून मुलाचे डोळेच विस्फारले. त्याला कळेना हे कुठले पैसे? कारण एवढी मोठी रक्कम गोंधळात टाकणारी होती.


ऑफिसमधे सांगून त्याने सरळ बँक गाठली. तेव्हा त्याला एवढंच कळलं , की कुठल्या तरी प्रकाशन संस्थेचे ते चेक्स आहेत. पण आईकडे कसे? याचं उत्तर त्याला लगेच मिळालं नाही. तो घरी आला , पण पैशाबद्दल तो कुणाशी काहीच बोलला नाही .


कविता , कथा , कादंबरी , वैचारिक असं लेखन ताई करीतच राह्यल्या . आजवर मनात साठलेलं आता अक्षर रूप घेत होतं. पुस्तकं प्रकाशित होत होती.


काही काळातच ताईंच्या अकौंटने एक कोटीची रक्कम पार केली . 

मुलाला बँकेचे क्रेडिट मेसेजेस येतच होते.


साहित्याच्या बागेतलं असं कोणतंच फूल नव्हतं , की ते ताईंजवळ नव्हतं . सर्व साहित्य प्रकारांवर त्यांचं प्रभुत्व होतं. सर्वत्र संचार होता ताईंचा.


आताशा रोजच वृत्तपत्र , टी व्ही वर ताई असायच्या. आणि मुलाला सर्व उलगडा होऊ लागला . मात्र आईला भेटायला जाण्याची हिंमत त्याच्यात नव्हती.

आवडत्या छंदात रमल्याने ताईंची तब्येतही आता छान होती. पैसा, आणि प्रसिद्धी चारही बाजुंनी येत होती. आताशा त्यांना कार्यक्रमांना "हो " म्हणणं कठीण होई इतके कार्यक्रम येऊ लागले. प्रसिद्धीच्या वलयानं ताई आणखीच तेजस्वी झाल्या होत्या.


मुलाला सुनेला त्यांची चूक कळली होती. पण ते बोलू शकत नव्हते. 

अशातच एक दिवस त्यांचे मुलाला पत्र आले . त्यांनी लिहिले होते ,*" बाळ, सूनबाई आणि सोहम् ला धन्यवाद द्यायचेत मला. तुझ्या घरातून बाहेर पडल्यावरच मी स्वतः ला ओळखू शकले . तेही या वृद्धाश्रमात . आता मी खरी जगतेय. केवळ अन्न , वस्त्र , निवारा म्हणजे जगणं नव्हे . कला आणि साहित्याच्या क्षेत्रातल्या वावराने मला "मी " कळले . माझ्यातली ऊर्जा मला जिवंत ठेवू शकली . तुम्हाला हवा तेवढा पैसा तुम्ही वापरून आता फोर बीएचके असं मोठं घर घेऊ शकता . कारण आपलं अकौंट जॉईन्ट आहे. आयदर ऑर सर्व्हायवर ऑपरेशन आहे. तू कितीही पैसे काढू शकतोस. तसेही शेवटी ते तुझेच आहेत. मला आता घराची गरज नाही . इथे मला ते मिळालंय . आणि महत्वाचं म्हणजे सम वैचारिक मित्र परिवार मिळाला . फक्त एक काम करशील माझं . काही आठवणीतले गरम कपडे आणि दुर्मिळ अशा आवश्यक पुस्तकांची एक बॅग तुझ्या घरीच आहे. शक्य असेल तर इथे आणून दे. तेवढीच भेट होईल आपली. बाळा , घराचा थकलेला *पाचवा कोपराही* *कधी कधी खूप उपयोगी ठरतो , हे लक्षात ठेव. सर्वांना आशीर्वाद ! थांबते. "*


मराठी शब्दांची आणि वृद्धाश्रमाची ताकद आता बाळला आणि सुनबाईला कळली होती.


वृद्धाश्रम या शब्दाकडे कणव म्हणून बघितलं तर दया येते . संधी म्हणून बघितलं तर उत्तम तऱ्हेनं जगता येतं हे श्रद्धाताईंनी सिद्ध करून दाखवलं होतं. 


सकाळी वृद्धाश्रमाच्या अंगणात ताई मित्रांसोबत चहा घेत बसल्या होत्या. तेवढ्यात दाराशी रिक्षा थांबली . रिक्षातून सुप्रसिद्ध कवयित्री विजया ब्रह्मे उतरत होत्या . आणखी एक पाचवा कोपरा स्वतःला सिद्ध करणार होता.



*प्रा. सुनंदा पाटील*


Thursday, January 30, 2025

मैत्रीचं..!

 वय कितीही होवो,शेवटच्या श्वासांपर्यंत...

खोडकरपणा जिवंत ठेवणारं नातं एकचं असतं,

ते म्हणजे...

मैत्रीचं..!


*वाळवंटासारख्या रुक्ष जीवनातही हिरवळीचा ओयासिस फुलवणारं नातं एकचं असतं ते म्हणजे...*

*मैत्रीचं..!*


मनांतील कोणतीही नाजूक सल ज्याच्यापुढे उघडी करावी असे विश्वासाचं नातं एकचं असतं,

ते म्हणजे...

मैत्रीचं..!


*आपल्याला झालेला प्रचंड आनंद,*

*प्रथम ज्याच्याबरोबर शेअर करुन जल्लोश करावा असे वाटते असं नातं एकचं असतं ते म्हणजे....*

*मैत्रीचं..!*


*कळत-नकळत आयुष्यात घडून गेलेल्या अक्षम्य चुका,*

*फक्त आणी फक्त ज्याच्यापुढे मान्य करता येतात असं  confession box सारखं नातं एकचं असत ते म्हणजे....*

*मैत्रीचं...*


म्हणून....


*मित्र नावाची ही दैवी देणगी जीवापाड जपून ठेवा...*

*कारण जीवनांतील अर्धा गोडवा हा मित्राच्यांमुळेचं असतो,*

*दुधातल्या साखरेसारखा.!*

Wednesday, January 29, 2025

श्रध्दा

 श्री ब्रह्मचैतन्य व स्वामी स्वरूपानंद एकच आहेत !


आपल्या सर्व जणांच्या मनात श्रध्दा कमी व शंकाच जास्त असतात. ' तुम्ही फक्त नाम घ्या , तुमची जबाबदारी मी घेतो '  असे  रामरायाची कृपा असलेले श्रीमहाराज वारंवार सांगतात.

 मी देहात कधीही नव्हतो, मी नामात होतो असे महाराजांनी सांगून देखील आपली श्रध्दा कमी पडते. श्रध्दा असेल तर नामाची प्रचिती लवकर येते हेच सत्य आहे. 


पूज्य स्वामी स्वरूपानंदांची एक गोष्ट .एका धार्मिक गृहस्थांने गोंदवले येथे प.पु. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा समाधीवर अनुग्रह घेतला. 

पण त्याला कायम एक शंका येई की श्रीमहाराजांचा खरच शिष्य झालो का ? अनुग्रहीत आहे का ?


साधारण पाच-सहा महिन्यानंतर त्या सदगृहस्थाचे दोन मित्र पावसला पूज्य स्वामींच्या दर्शनाला जाणार होते . त्यांच्या बरोबर हे गृहस्थ पण गेले.  

सकाळी तिकडे पोहोचल्यावर त्या दोन मित्रांच्या मनात श्रीस्वामींचा अनुग्रह घ्यावा असे आले. त्याप्रमाणे त्यांनी नारळ , हार , पेढे खरेदी केले. 

त्यांच्या सोबत ह्या गृहस्थांनी पण ते विकत घेतले. का ? तर स्वामी देहधारी आणि श्रीमहारांज देहात नाहीत !

 त्यांनी आपला कितपत स्वीकार केला असेल अशी मनात  शंका आली म्हणून . वरील दोन मित्रांना अनुग्रह झाल्यानंतर यांची वेळ आली. हे आत गेले.


नमस्कार झाल्यावर अनुग्रहाच्या अनुषंगाने विचारले. तेव्हा पूज्य स्वामी स्वरूपानंदांनी त्यांच्याकडे एकदा  नुसते पाहीले आणि म्हणाले , " असे काय करता ?

 श्री ब्रह्मचैतन्यानी तुमचा कधीच स्वीकार केला आहे . तुम्ही त्यांचे आहात . त्यांच्यात आणि आमच्यात काही फरक नाही. आम्ही दोघेही एकच आहोत ! "


स्वामीच्या उत्तराने या गृहस्थाची शंका पूर्ण मिटली.


|| श्रीराम जयराम जय जय राम ||


॥ जेथे नाम तेथे माझे प्राण ॥

तीर्थक्षेत्र

 श्रीराम समर्थ


तीर्थक्षेत्र


         सामान्यतः नद्यांचे संगम, सरोवरे, विशिष्ट सागरतीर, मंदिरे, पर्वत, गुहा इत्यादींना तीर्थ स्थाने आणि धर्मक्षेत्रे म्हणून ओळखले जाते. या पवित्र स्थानांची यात्रा केल्यामुळे पाप नाहीसे होते व पुण्यलाभ होतो अशी भाविकांची श्रद्धा असते. अशी श्रद्धा नसणाऱ्या लोकांच्या दृष्टीने देवता मुर्ती म्हणजे विशिष्ट आकार दिलेला दगड आणि गंगेचे पवित्र जल म्हणजे केवळ पाणि असते. दैवी संपत्तीने श्रीमंत असलेल्या ब्रह्मनिष्ठांच्या, साधूसंतांच्या वास्तव्याने पवित्र झालेली स्थाने तीर्थक्षेत्रे होतात. ज्यांची संतांच्या ठिकाणी आणि ते जेथे राहिले त्यास्थानांसबंधी पावित्र्याची भावना असते अशा साधाकांना तीर्थयात्रा केल्यावर मानसिक समाधान लाभते.


         मन अत्यंत शुद्ध होणे हे तीर्थामधे श्रेष्ठ तीर्थ होय.  केवळ पाण्यात देह बुडविण्याला कोणी स्नान म्हणत नाहीत. सर्व तीर्थांमध्ये स्नान करूनही मन पापी आणि मलीन राहिले तर अशा माणसाला केवळ शरीराचा मळ गेला आहे म्हणून निर्मळ म्हणता येत नाही. विषयांची अत्यंत आवड हाच मनाचा मळ होय. ज्याने त्याचा त्याग केला तोच खरा निर्मळ होय. म्हणूनच केवळ रूढी म्हणून तीर्थयात्रा केलेल्या लोकांचे लोभ, द्वेष मत्सर इत्यादी विकार कमी होत नाहीत आणि तीर्थयात्रा केल्यामुळे आपण इतरांहून श्रेष्ठ आहोत असा अहंकार मात्र निर्माण होतो. 


         तीर्थयात्रा करताना महर्षि मैत्रेयांकडून आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर विदूर हस्तिनापूरात परत आले. त्यानंतर त्यांना तीर्थयात्रेचा वृत्तान्त विचारताना युधिष्ठिराने म्हटले आहे 'हे प्रभो! तुमच्या सारखे भक्तभागवत स्वतःच तीर्थस्वरूप आहेत. पापी पुरुषांच्या द्वारा कलुषित झालेल्या तीर्थांना आपल्यासारखे महात्मे आपल्या हृदयामध्ये विराजित श्रीगदाधर भगवंताच्या प्रभावाने तीर्थत्व प्राप्त करून देतात.' [भागवत १.१३.१०]. त्याचप्रमाणे असे भक्त कोणत्याही जलाशयात स्थान करोत, त्यांच्या प्रभावाने त्या जलाशयाला तीर्थत्व प्राप्त होते. 


         जे तारून नेते ते तीर्थ. तीर्थ शब्दात तृ हा मुळ धातु असून त्याचा अर्थ ओलांडून पलीकडे जाणे, पोहोणे असा आहे. संसाराला सागराची उपमा देतात. हा सागर तरून जाण्यासाठी नामाच्या नावेमध्ये बसावे असे संतांनी आणि भगवंतानी म्हटले आहे.  'नामाचिया सहस्रवरी | नावा इया अवधारीं | सजूनिया संसारीं | तारू जाहलों ||' ज्ञानेश्वरी १२.९० ||  चित्तशुद्धी होण्यासाठी नामस्मरणाबरोबरच तीर्थयात्रा करावयास सांगितले आहे. काशी, प्रयाग, मथूरा-वृंदावन, अयोध्या तसेच महाराष्ट्रातील पंढरपूर, देहू, आळंदी, कोल्हापूर, नाशिक, तुळजापूर, गोंदवले, पावस, निंबाळ इत्यादी क्षेत्रात जाणाचा मुख्य उद्देश तेथे जाऊन स्नान, देवदर्शन व तीर्थप्रसाद घेऊन परत येणे हा नसून अशा ठिकाणी येणाऱ्या संत सत्पुरुषांचा सहवास घडून चित्तशुद्धी व्हावी व साधनास बळकटी यावी हा असतो. म्हणून नारदांनी तीर्थांना तीर्थपणा श्रेष्ठ भक्तांमुळे येतो असे या सूत्रात म्हटले आहे. संतांच्या केवळ दर्शनाने माणूस पावन होतो म्हणून भक्तांनी सत्संगतीला अतिशय महत्व दिले आहे. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी आलेल्या संतांच्या सहवासाचा साधकांवर अनायसा परिणाम होतो. सारांश संतांमुळे तीर्थांना पापी जनाना पवित्र करण्याची शक्ती प्राप्त होते. 


               *********

संदर्भः श्रीनारद भक्तिसूत्रे ||६९|| - लेखक श्री म वि केळकर



Tuesday, January 28, 2025

हास्यजत्रा

 *हास्यजत्रा 😬*                                                 प्रिय दालचिनी ताईस,


जायफळ दादाचा साष्टांग नमस्कार.


पत्र लिहिण्यास कारण की, मागच्या आठवड्यात बदाम काका झाडावरून पडले होते,

आता त्यांची तब्येत बरी आहे.


आनंदाची बातमी अशी श्री.लवंग यांची मुलगी चि.सौ.कां.मिरी हिचे लग्न कु.जिरे ह्याच्याशी ठरले आहे. 

स्थळ उत्तम आहे. 

तिखट मावशी व गोड मसाले काका यांनी मध्यस्थी केली म्हणून हे लग्न जमले आहे. 


काजू व पिस्ता हे बि. कॉम झाल्यामुळे त्यांचा भाव खूप वाढला आहे. 


मोहरीला अजून शाळेत घातले नाहीं. 


कडीपत्ता पहिलीत आहे. 


दुःखाची गोष्ट म्हणजे साखर व चहा पावडर यांच्या लग्नाला विरोध झाल्यामुळे त्या दोघांनी सकाळी उकळत्या पाण्यात जीव दिला. 

घटनास्थळी कपबशी उपस्थित होती. 


बटाटेमामानी विळीवर खुपसून जीव दिल्यामुळे कांदेमामी स्वतः रडत होत्या व दुसऱ्यानाही रडवत होत्या. 


बाकी सगळे ठीक आहे. 


लसूण, कोथिंबीर, व खसखस ह्यांना गोड गोड पापा


तुझाच,

जायफळ दादा


पत्ता- खलबत्ता-बेपत्ता,

मुक्काम- अलीकडे,

तालुका- पलीकडे,

जिल्हा- सगळीकडे.  😂😂😂😂😜😜😜😜🙄😁😁😁😂😜

Monday, January 27, 2025

हिंदू

 आपण हिन्दू आहोत हे खरे आहे, परंतु, हिंदू म्हणजे काय हो???, सांगाल का???

तर मंडळी वाचा आणि एखाद्याने विचारले की हिंदू म्हणणे काय, तर, चट्दिशी सांगता आले पाहिजे...!!!

🤷‍♂️💥🤷‍♀️💥🤷‍♂️💥🤷‍♀️💥🤷‍♂️💥


"हिंदू" शब्द 'सिंधु' शब्दाचा अरबी अपभ्रंश आहे, असे आपल्याला आतापर्यंत सांगितले गेले आहे, पण, खालील लेखामध्ये ते कसे असत्य आणि दिशा

भूल करणारे आहे, हे सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे.


ते वाचून आपल्या सर्व समूहात

शुद्ध मराठीत अग्रेषित(forward)करा.

सामायिक(share)करा 

"हिंदू" हा शब्द "हीनं दुष्यति इति|

हिन्दु: म्हणजे-


'जो अज्ञान आणि हीनतेचा त्याग करतो'

त्याला हिन्दू म्हणतात'.


'हिन्दू' हा शब्द अनन्त वर्षांपासून असलेला प्राचीन मूळ संस्कृत शब्द आहे.


या संस्कृत शब्दाचा सन्धीविग्रह केल्यास तो हीन+दू=हीन भावना+पासून दूर असलेला,मुक्त असलेला तो हिन्दू होय आणि आपल्याला हे वारंवार खोटे सांगून फसविले जात होते, की, 'सिन्धूचे अपभ्रंशित रूप म्हणजे हिन्दू' हा शब्द आपल्याला मोगलांनी दिला. खरे म्हणजे 'हिन्दू' या शब्दाची उत्पत्ती 'वेदकाळा पासून आणि वेदातूनच झालेली आहे, म्हणून, हिन्दू हा शब्द कुठून आला आणि त्याची उत्पत्ती कशी झाली, हे अवश्य जाणून घेऊयात, आपल्या 'वेद' आणि 'पुराणात'ही 'हिन्दू' या शब्दाचा उल्लेख सापडतो.


आज आपण 'हिन्दू' या शब्दाची उत्पत्ती कशी झाली, ते, पाहूयात. 'बृहस्पति अग्यम'(ऋग्वेद)मध्ये हिन्दू शब्दाचा उल्लेख असा आलेला आहे. “हिमलयं समारभ्य यावत इन्दुसरोवरं। तं देवनिर्मितं देशं हिन्दुस्थानं प्रचक्षते।l" म्हणजेच, 

'हिमालयापासून इन्दू सरोवरा(हिन्दी महासागर)पर्यन्त ईश्वर निर्मित राष्ट्र म्हणजे हिन्दुस्थान('हिन्दूं'चे स्थान)होय.

केवळ 'वेदांत'च नव्हे,पण, 'शैव' ग्रंथातही 'हिन्दू' शब्दाचा उल्लेख असा आलेला आढळतो, "हीनं च दूष्यते एव्,हिन्दुरित्युच्चते प्रिये।”

म्हणजेच-"जो अज्ञान आणि हीनत्व यांचा त्याग करतो तो हिन्दू होय."

कमीअधिक प्रमाणात असाच श्लोक 'कल्पद्रुमा'तही आढळतो- "हीनं दुष्यति इति हिन्दु:।” म्हणजे- "जो अज्ञान आणि हीनत्व यांचा त्याग करतो त्याला हिन्दू म्हटले जाते."


"पारिजात हरण" या संस्कृत नाटकात हिन्दूंचा असा उल्लेख आलेला आढळतो-


"हिनस्ति तपसा पापां,दैहिकां दुष्ट.

हेतिभिः शत्रु वर्गंच,स हिन्दुरभिधीयते।।”

म्हणजे, "जो आपल्या तप:सामर्थ्याने शत्रू,दुष्ट आणि पापाचा नाश करतो,तो हिन्दू होय."

"माधव दिग्विजय,"मध्ये हिन्दू या शब्दाचा असा उल्लेख केला गेलाय- “ओंकारमन्त्रमूलाढ्य,पुनर्जन् गौभक्तो भारत:,गरुर्हिन्दुर्हिंसन दूषकः।।"

म्हणजे- "जोॐ काराला ईश्वर रचित रचना मानतो,ज्याची पुनर्जन्म आणि कर्मसिद्धान्त यावर श्रद्धा आहे,जो गौ पालन करतो आणि वाईटाला दूर ठेवतो,

तो हिन्दू आहे."


केवळ एव्हढेच नव्हे, तर, आपल्या ऋग्वेदात(८:२:४१)विवहिन्दू नावाच्या अति पराक्रमी आणि दानी राजाचे वर्णन आलेले आहे, ज्याने ४६००० गाईंचे दान केल्याचा उल्लेख आहे आणि 'ऋग्वेद मंडला'तही त्याचा उल्लेख येतो.

"हिनस्तु दुरिताम्।" 'वाईटाला दूर सारण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे आणि सनातन धर्माचे पालन पोषण करणारे हिन्दूच आहेत.'



🙏

पद्मश्री

 *दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत... "पद्मश्री".... पोस्टाने पाठवा साहेब !*

(शिक्षण फक्त तिसरी पास... नक्कीच वाचा...)

ज्यांच्या नावापुढं कधीच कुणी "श्री" लावलं नव्हतं, ज्याच्याकडे संपत्ती म्हणून काय होते तर कपड्याचे फक्त तीन जोड, तुटलेली एक रबरी चप्पल, एक जुनाट चष्मा आणि रोख 732 रुपये फक्त !

त्याला जेव्हा चक्क पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी सरकारला कळवलं की,

दिल्ली पर्यंत यायला पैसे नाहीत

"पद्मश्री".... पोस्टाने पाठवा साहेब !

अजब आणि अफाट आहे न हे ? मी सत्यकथा सांगतोय ओडिशातील हलधर नाग या अवलियाची.

कोसली भाषेत कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी,

कहर म्हणजे त्यांनी आजवर जितक्या कविता आणि वीस महाकाव्य लिहिली आहेत ते सर्व त्यांना तोंडपाठ आहे.

आणि आता तर संभलपूर विश्वविद्यालयात त्यांच्या "हलधर ग्रंथावली - भाग -2" याचा पाठयक्रमात समावेश करण्यात आलाय.

साधाच वेष, शक्यतो पांढर धोतर, गळ्यात गमछा आणि बहुतेक वेळा अनवाणी फिरणारे हलधर एक अफलातून अवलिया आहेत .

हि खरे तर इंडियन आयडॉल आहेत. पण कचकड्याच्या दुनियेतील रियालिटी शो मधल्याना आपले चॅनेलवाले हिरो करतात. आयडॉल ठरवतात. खरे आयडॉल तर हलधर जी सारखे आहेत. चॅनेलवाल्याचे यांच्याकडे लक्ष कधी गेले तर याना पद्मश्री जाहीर झाल्यावर !

श्री हलधर जी याची जीवनकहाणी तुम्हालाही प्रेरणा देऊन जाईल. म्हणून तर हि पोस्ट करतोय.

ते एका अत्यंत गरीब हरिजन कुटुंबातून आलेले, आईवडिलांचे निधन झाल्याने वयाच्या दहाव्याच वर्षी हलधर जी अनाथ झाले. त्यामुळे त्यांना इयत्ता तिसरीतच शाळा सोडवि लागली. पोटासाठी इतक्या लहान वयात ते ढाब्यावर खरकटी भांडी विसळण्याचे काम करू लागले. त्यानंतर एका गृहस्थाला त्याची दया आली व यांना एका शाळेच्या स्वयंपाक घरात काम मिळाले. तिथं थोडं स्थिरस्थावर आयुष्य त्यांना मिळालं.

नंतर बँकेकडून त्यांनी शंभर रुपये कर्ज घेऊन पेन - पेन्सिल - शालेय वस्तूच्या विक्रीचे छोटेसे दुकान टाकले. आणि उदरनिर्वाह त्यातूनच भागवू लागले.

आता त्यांच्यातील साहित्यिक कौशल्याबद्दल सांगतो. श्री हलधर जी यांनी 1995 च्या सुमारास स्थानिक उडिया भाषेत "राम शबरी" सारखे काही धार्मिक प्रसंग निवडून त्यावर स्फुट लिहून ते लोकांना ऐकवू लागले. भावनेने ओथंबलेले त्यांचे ते शब्द ऐकताना लोक गुंग होऊन जायचे. पाहता पाहता त्यांच्या रचना प्रचंड लोकप्रिय झाल्या. हळूहळू ती कीर्ती सर्वदूर पसरू लागली. अनेक नामांकित लेखक कवींनी त्यांची दखल घेऊन विविध वृत्तपत्रातून त्यांच्याबद्दल भरभरून लिहिले. आणि अखेर दिल्लीपर्यंत त्यांची हि कीर्ती पोचली आणि त्यांना चक्क साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल "पद्मश्री" पुरस्कार जाहीर झाला.

अजून एक कहर म्हणजे स्वतः हलधर जी फक्त तिसरी पर्यत शिकलेलं पण आजमितीस पाच पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी त्यांच्या साहित्यावर पीएचडी करत आहेत.

त्यांच्याबद्दल इतकंच म्हणावसं वाटत की,

आप किताबो में प्रकृति को चुनते है

पद्मश्री ने, प्रकृति से किताबे चुनी है।।

डीडी क्लास : भोवती अनुकूल काहीच नसतानाही यश खेचून आणणारे, दगडालाही फोडून त्यातून बाहेर उगवून येणारे हलधर जी सारख्या लोकांची चरित्रे का वाचायची ? तर आपल्यात, आपल्या पुढच्या पिढीत त्यातूनच ऊर्जा यावी. "सगळी परिस्थिती वाईट आहे. नाहीतर मी नक्कीच काहीतरी करून दाखवलं असत" अशी कारणे देऊन निराश झालेल्यासाठीच हि आजची हलधर जी याची कहाणी तुम्हांपुढे ठेवली. शेवटी मी नेहमी सांगतो तेच आज पुन्हा सांगतो,

काहीही होवो..... रडायच नाही

तर लढायच आणि लढून जिंकायच...

Sunday, January 26, 2025

निरुपण

 दासबोध १०३१.  जय श्रीराम।


दशक पंधरावा.  समास नववा : पिंडोत्पत्ति निरुपण || १५.९ ||


चारही खाणींमधील सगळे जीवप्राणी पाण्यापासून निर्माण होतात. बीजाला पाणी मिळाले की त्याला अंकुर फुटतो आणि पुढे पाण्यानेच त्याची वाढ होते. मुळे खाली जमिनीत वाढतात आणि पाने, फुले व फळे देठावर येतात. फळामध्ये तेच बीज असते. ह्या सर्व घडामोडीत फळांच्या आधी फुले, फुलांच्या आधी पाने, पानांच्या आधी फांद्या, फांद्यांच्या आधी मुळे, मुळांच्या आधी पाणी असा क्रम दिसतो. पाणी आटून पृथ्वी बनते. म्हणजे पृथ्वीपेक्षा वडील पाणी, पाण्यापेक्षा वडील तेज, तेजापेक्षा वडील वायु आणि वायुपेक्षा वडील अंतरात्मा होय. माणसाच्या देहाची उत्पत्ती अशाच प्रकारे रसापासून म्हणजेच पाण्यापासून होते. सर्व पिंडांना वडील अन्तरात्माच आहे. त्याला आपण ओळखावे. अंतरात्म्याला न ओळखणारे सगळे दुरात्मे समजावे. 


अंतरात्मा सतत निकट असून माणूस त्याला चुकतो व मुकतो. अंतरात्म्याशी एकरुप झाले की प्रकृतीचा स्वभाव बदलतो. ज्याच्या अंतःकरणात अंतरात्मा जागृत झाला त्यालाच भाग्यवान पुरुष समजावे. असा पुरुष दिनचर्या व व्यावसाय सांभाळत असला तरी त्याचे ध्यान वा अंतरात्म्याशी असलेले तादात्म्य भंग होत नाही. विश्वव्यापी अंतरात्म्याची उपासना केल्याने ती उपासना विश्वव्यापी बनते आणि तीच मनुष्याला दृश्य विश्वाच्या पलीकडे नेऊन सोडते म्हणजेच मनुष्याला भौतिक विश्वाचे मिथ्यात्व व नाशित्व आकलन होते.


Dashak Fifteen.  Samas Nine. Deliberation on the process of creation of the body.

 

Jai Shri Ram! All the creatures of all types in all the species are born from water. A sprout is born when the seed gets water and it grows on water only. The roots grow downward in the ground and leaves, flowers and fruits grow on the stem. The same seed appears in the fruit. In this entire happening, the flowers appear before the fruits, the leaves appear before the flowers, the branches appear before the leaves, the roots appear before the branches and the water is there before the roots are created. The Earth is born from Water. This means that the Water is older than the Earth, the Fire is older than Water, the Air is older than the Fire and the Antaratma is older than the Air. The human body is also created like this, from juices which are water-form. The Antaratma is the oldest and is senior to all bodies. We should visualize the Antaratma. Those, who fail to visualize are all Duratma or ignorant souls. The Antaratma is all the while close to us but still man fails to meet him and understand him. The Nature changes, once you become one with the Antaratma. Only the one, who visualizes the Antaratma within, should be treated as a fortunate person. Even if such a person is doing all his rituals and routine work, his closeness with the Antaratma never gets disturbed. When you worship the Universal Antaratma, your worship also becomes Universal and such worship takes the attitude of the person beyond the visible material world. This means that such a person understands the mythical, temporary and perishable nature of the Universe.    

     

॥श्रीराम॥ चौखाणीचे प्राणी असती | अवघे उदकेंचि वाढती | ऐसे होती आणी जाती | असंख्यात ||१||

तत्वांचें शरीर जालें | अंतरात्म्यासगट वळलें | त्यांचें मूळ जों शोधिलें | तों उदकरूप ||२||

शरत्काळींचीं शरीरें | पीळपीळों झिरपती नीरें | उभये रेतें येकत्रें | मिसळती रक्तीं ||३||

अन्नरस देहरस | रक्तरेतें बांधे मूस | रसद्वयें सावकास | वाढों लागे ||४||


चारही खाणींमध्ये जन्म घेणारे सगळे प्राणी पाण्यापासून जन्माला येतात आणि पाण्यावरच वाढतात. असे असंख्य प्राणी जन्माला येतात आणि मरण पावतात. तीन गुण, पंचमहाभूते आणि अंतरात्मा यांच्या मिश्रणाने मानवी शरीर बनलेले आहे. पण त्या शरीराचे मुळ शोधले तर ते जलरुप आहे असे आढळते. शरद काळी म्हणजे पावसाळ्यात उगवणाऱ्या वनस्पती जर पिळून बघितल्या तर त्यांच्यातून पाणी झिरपते. मानवी शरीरांमध्ये स्त्री व पुरुषांचे रेत म्हणजे स्त्रीबीज व पुंबीज रक्तामध्ये एकत्र मिसळतात. रक्त व रेत यांच्या संयोगाने अन्नरस व देहरस यांची एक मूस बांधली जाते. ह्या दोन्ही रसांच्या योगाने ती मूस वा तो पिंड सावकाश वाढू लागतो. १५-९-१,२,३,४.


All types of living beings in all the species are born from water and they grow on water only. Millions of such creatures are born and they face death. The human body is made from a compound of the three Gunas, five fundamentals and Antaratma. But if you try to search the origin of that body then it can be seen that, Water is the origin. If you squeeze the plants growing during monsoon then Water oozes out from them. The egg-form female seed and the sperm-form male seed get mixed with blood in the human body. A mould or a matrix or a body is created by compounding of blood and that seed. This matrix is fed with the Water-form food juices and bodily juices and it grows gradually. 15-9-1,2,3,4.

प्रश्नाचं उत्तर

🚩🌹जय जय श्रीराम 🌹🚩 🙏🙏🙏🚩

*एके दिवशी (संध्याकाळच्या सुमारास) सरयू नदीच्या तटावर.....तीन्ही भावांसह फिरत असता श्री रामाला बंधू भरतानं म्हटलं , "एक गोष्ट विचारू दादा? माता कैकईनं तुला वनवास मिळावा यासाठी मंथरेसोबत जे कारस्थान रचलं ते कारस्थान म्हणजे राजद्रोहच नव्हता का? तिच्या या कारस्थानाने एकीकडे राज्याचा भावी राजा आणि त्याच्या पत्नीला १४ वर्षांचा वनवास भोगावा लागला आणि दुसरीकडे महाराजा दशरथ यांचा पुत्रविरहाच्या केवळ कल्पनेनंच अपमृत्यू झाला.  अशा कारस्थानासाठी (सामान्य नियमांनुसार) तर मृत्युदण्डच दिला जात असतो, तर मग तू , जी तुझीही आई आहे अशा कैकईला दंड का नाही दिलास ?"*

*यावर रामचंद्र हसले आणि म्हणाले,  "तुला माहित आहे भरता !!  एखाद्या कुलात जेव्हा चरित्रवान और धर्मपरायण पुत्र जन्म घेतो, तेव्हा त्याचं जीवन त्याच्या असंख्य पीढ्यांतील पितरांच्या अपराधाचं क्षालन करतं. ज्या आईनं तुझ्यासारख्या  पुण्यात्म्याला जन्म दिला असेल , तिला दंड कसा बरं देता येईल भरता ?"*

*यावर भरताचं कांही समाधान झालं नाही. तो म्हणाला, "हा तर मोह आहे दादा; आणि राजाचा कायदा मोहापासून मुक्त असायला हवा. तेव्हा दादा तू कृपा करून मला एका राजाप्रमाणे उत्तर दे की तू माता कैकईला दंड कां नाही दिलास ?.......असं समज की तुला हा प्रश्न तुझा लहान भाऊ नव्हे तर अयोध्येतील एक सामान्य नागरिक विचारतोय."*

    *(श्रीराम गंभीर झाले )...... काही क्षण मौन राहून श्रीरामचंद्र म्हणाले, "हे भरता, आपल्या नात्यातल्या किंवा जवळच्या कुणा व्यक्तीला त्याच्या अपराधाबद्दल शिक्षा न करणं हाच या सृष्टीचा सर्वात कठोर असा दंड आहे !! माता कैकईनं आपल्या केवळ एका अपराधाचा खूप कठोर असा दंड भोगला आहे. वनवासाच्या (१४) चौदा वर्षांत आपण चारही भाऊ आपापल्या जागी राहून त्या काळच्या विपरीत परिस्थितीशी झगडत होतो ;  पण माता कैकई प्रत्येक क्षणाला केवळ आणि केवळ फक्त मरणच अनुभवत होती. आपल्या त्या एका अपराधासाठी तिनं आपला पति गमावला, आपले चारही पुत्र ती गमावून बसली, स्वतःचं सर्व सुख - सन्मान तीनं गमावला, आणि तरीही आपल्या हातून घडलेल्या अपराधाच्या सततच्या जाणिवेतून ती कधीच मुक्त होऊ शकली नाही. वनवास संपला तसा ....... परिवारतील उर्वरित सगळेच  सदस्य आनंदी आणि सुखी झालेत;  पण तिला कधीच समाधान लाभू शकलं नाही. कुठलाही राजा कुणा स्त्रीला यापेक्षा अधिक कठोर दंड काय देऊ शकणार मला तर सदैव याचंच दुःख होतं की  माझ्या मुळेच (अकारण) माझ्या आईला इतका कठोर दंड भोगावा लागला."*

       *रामाच्या नेत्रांतून अश्रूंच्या धारा वाहात होत्या, आणि भरतासह सर्व भाऊ नि:शब्द होऊन गेले.*

    *रामचंद्र पुन्हा सांगू लागले ....... "आणि तिच्या या एका क्षुल्लक चुकीला आपण अपराध तरी कां समजायचं भरता !!...... जर मला वनवास झाला नसता] , तर हे जग 'भरत' आणि 'लक्ष्मण' या भावंडांचं अतुल्य भ्रातृ - प्रेम कसं पाहू शकलं असतं ?  मी तर केवळ माझ्या माता पित्याच्या आज्ञेचं पालन करायचं म्हणून वनवास भोगला होता, पण तुम्हा दोघांनी तर कुणाची आज्ञा नसतानाही केवळ माझ्यासाठी १४ वर्षाचा वनवास भोगलात. माझ्या भाग्यात वनवास नसता तर भावांचे संबंध कसे असावेत हे जगाला कळलं असतं कां ?"*

*भरताला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. कांहीही न बोलता त्यानं श्रीरामांना प्रेमभरानं आलिंगन दिलं. !!*

 *राम काही कुठला नारा नाही, राम एक आचरण आहे, एक चरित्र आहे , जीवन जगण्याची एक शैली आहे.*

  *👣  🙏 जय श्रीराम 🙏👣*

 

  *जय श्री राम.🙏🙏🙏*

Saturday, January 25, 2025

सर्वतोमुखीं



*🌷 लवकरच श्रीमहाराजांचें नांव इंदूरमध्यें सर्वतोमुखीं झालें. त्यावेळचा इंदूरचा राजा (शिवाजीराव होळकर यांचा बाप) विशेष अडचणींत होता, आणि म्हणून तो त्यांच्या दर्शनासाठीं आला. 

श्रीमहाराजांच्या मनांत त्याला भेटायचें नव्हतें म्हणून तो राजवाड्यांतून भेटायला येण्यास निघाला असें कळल्यावर श्रीमहाराज जिजीच्या घरच्या एका कुणबिणीचें लुगडें नेसले आणि तिला जोडीला घेऊन जात्यावर दळायला बसले. राजा आल्यावर इनामदारांनीं त्यांचें स्वागत केलें. 

सर्वजण बसले, आणि मग राजानें विचारलें, 'तुमच्याकडे जे सत्पुरुष आहेत, त्यांचें दर्शन मला घ्यायचें आहे. ते कुठे आहेत?' 

इनामदारांना श्रीमहाराजांनीं आधींच पढवून ठेवलें होतें त्याप्रमाणें ते बोलले 'सरकार, ते आत्तां घरांत होते, पण त्यांचा कांहीं भरंवसा नसतो, ते केव्हांहि कुठेंहि पळून जातात.

 इतक्यांत ते बाहेर पळून गेले.' राजा बोलला, 'आम्ही त्यांच्या दर्शनासाठीं येऊन गेलों हें त्यांना कळवा.' इनामदार 'जी सरकार' असें म्हणाले व राजा जाण्यास निघाला. त्याच्या वाटेमध्येंच श्रीमहाराज दळत बसले होते आणि मोठमोठ्यानें ओव्या गात होते;

 परंतु त्याच्या किंवा त्याच्या बरोबर आलेल्या कोणाच्याहि लक्षांत आलें नाहीं, आणि म्हणून श्रीमहाराज प्रत्यक्ष घरांत असूनदेखील राजाला त्या दिवशीं दर्शन झालें नाहीं.

 राजा गेल्यावर घरामधली सर्व मंडळी हंसूं लागली व जिजी तर थक्क होऊन गेली. जिजीबाईला त्यावेळी आठनऊ वर्षांची ताई नांवाची एक मुलगी होती.*


*श्रीमहाराज त्यांच्या घरीं राहूं लागल्यापासून दोघांची फार गट्टी जमली, ताईला त्यांचा लळा लागल्यामुळे तिला त्यांच्यावांचून चैन पडत नसे. अहोरात्र ती त्यांच्यापाशीच असायची. एके दिवशीं सकाळीं श्रीमहाराज ताईबरोबर खेळत बसले असतां एक बैरागी त्यांच्या दर्शनासाठीं आला.

 एखाद्या लहान मुलाप्रमाणें श्रीमहाराज त्या मुलीबरोबर खेळत आहेत हे पाहून तो संतापला, आणि तोंडानें कांहीं तरी पुटपुटत परत जाऊं लागला. इतक्यांत श्रीमहाराजांनीं त्याला मोठ्या प्रेमानें हांक मारली, त्याचा फार आदरसत्कार केला, आणि तेथे येण्याचें कारण विचारलें.

 त्यानें स्वतःची हकीकत सांगितली. ती अशी कीं, बरेच वर्षांपूर्वी तो कुटुंबवत्सल होता. पहिल्यापासून योगाची आवड असल्यामुळे संसारांत असूनसुद्धां तो योगसाधन करीत असे. पुढे त्याची बायको वारली. 

कांहीं कालानें त्यानें संसार आपल्या मुलांच्या स्वाधीन केला आणि सर्वसंगपरित्याग करून गुरूच्या शोधार्थ तो हिमालयाकडे गेला. कर्मधर्मसंयोगानें तेथें त्याला एक उत्तम योगी भेटला. 

गुरूजवळ सहा वर्षे अभ्यास केल्यावर गुरूनें त्याला श्रीमहाराजांच्या खाणाखुणा सांगितल्या आणि इंदूरमध्यें त्यांना भेटण्याची आज्ञा केली. पुढचा मार्ग समजावून घ्यावा आणि तसा अभ्यास करावा हाच त्याच्या येण्याचा हेतु होता. 

परंतु तो हिमालयांतून इतका लांब आला, आणि ज्यांना भेटण्यासाठीं आला ते श्रीमहाराज लहान मुलीबरोबर खेळत बसलेले पाहून आपण अयोग्य माणसाकडे आलों व आपले श्रम वाया गेले असें त्याला वाटलें, म्हणून तो चिडला, आणि आपल्या गुरूंनीं आपल्याला असल्या माणसाकडे पाठविलें तरी कसें हें त्याला कळेना. तरी आपण मुकाट्यानें परत जावें आणि गुरूला भेटावें म्हणून तो आला तसाच परत निघाला होता.*


*बैराग्याची ही हकीकत ऐकून श्रीमहाराजांनीं त्याचा मोठा गौरव केला आणि त्याला म्हटलें, 'आपण इथें आलांत हे फार बरें झालें.

 मला योगबिग कांहीं येत नाहीं, पण गुरूच्या घरीं मी पडून होतों तेव्हां कांहीं गोष्ट नजरेखालून गेल्या, त्यांतल्या थोड्याशा सहज लक्षांत राहून आठवत आहेत. 

त्यांमध्यें तुम्हांला कांहीं शिकण्यासारखें असलें तर बघा!' असें बोलून त्यांनीं ताईला जवळ बोलावलें, तिच्या पाठीवर कौतुकानें थाप मारली, आणि 'आसन घालून समाधि लाव' असें तिला सांगितलें. 

ताईनं लगेच परकराचा काचा मारला, ती सिद्धासन घालून बसली आणि तिनें डोळे झांकून दोन-तीन मिनिटें झाल्याबरोबर तिची समाधि लागली. 

पंधरा मिनिटांनंतर श्रीमहाराजांनीं तिला 'ताई!' म्हणून हांक मारतांच तिची समाधि उतरली. 'या मुलीला आपण आपले प्रश्न विचारा' असें त्या योग्याला सांगितल्यावर त्यानें तिला ध्यानधारणेसंबंधीं अनेक प्रश्न विचारले, आणि ताईनें त्या सर्वांचीं खडाखड उत्तरें देऊन त्याचें गाडें कुठे अडत होतें तेंहि पण बरोबर सांगितलें. 

हा सगळा प्रकार पाहून तो बैरागी थक्कच झाला, आणि एकदम श्रीमहाराजांच्या पाया पडून त्यांना म्हणाला, "महाराज ! मला आपण क्षमा करा.

 आपल्याजवळच्या लहान मुलीसुद्धां इतका योग जाणतात, मग आपली अवस्था काय असेल! माझें पूर्ण समाधान झालें. मी आनंदानें जातों." श्रीमहाराजांनीं त्याला आठ दिवस आपल्याजवळ ठेवून घेतलें, आपण स्वतः त्याला योगाच्या क्रिया दाखविल्या, आणि नंतर परत गुरूकडे पाठवून दिलें.*



Friday, January 24, 2025

चरित्र

 श्रीराम समर्थ


               *श्रीमहाराजांचे चरित्र*


          पू. केशवरावजी बेलसऱ्यांनी हातांनी लिहिलेल्या *श्रीमहाराजांच्या चरित्राचीं पानें सुमारें दोन हजार होती.*

 सोमवार ता. २२.१०.५६ रोजीं त्यांनी श्रीमहाराजांस [वाणीरुप अवतारात] बोलावून घेऊन लिहिलेलें सर्व दाखविलें. श्रीमहाराजांस हें आवडणार नाही हे त्यांस माहींत होतें. रा.केशवराव म्हणाले,

 *'माझें समाधानाकरितां मी लिहिलें आहे. मला समाधान लाभले. आपण सांगाल तशी व्यवस्था करीन. आज्ञा असेल तर छापावे असें वाटतें. तसे नसल्यास आज्ञेबाहेर नाही.*


          तेव्हां श्रीमहाराजांनी [वाणीरुप अवतारात] त्यांचे श्रमाचें कौतुक केलें व श्री म्हणाले कीं *'तुम्ही इतके कष्ट केले आहेत, मी 'नको' कसे म्हणणार?* छापायचा काय खर्च येतो वगैरे चौकशी करून कळवावे.' त्यां सर्वास [त्यांचे मंडळींनी व मुलानेंही त्यांचे लिहिण्यांस मदत केली होती.] 

श्रीमहाराजांनी आशीर्वाद दिले, व रा. केशवरावांस म्हणाले, *'तुम्ही आपले समजुतीनें चांगलें लिहिलेंच असेल; पण मी चांगलें तेव्हां म्हणेन कीं जर कोणी मला सांगितले कीं, 'चरित्र वाचून मला नाम घेण्याची बुद्धि झाली.'*

 शेवटी श्रींचे कृपेनेंच हें खरे ठरलें. पुष्कळ लोकांनी वरिल प्रमाणे आपणहून कबुली दिली.


               **********

संदर्भः *पू तात्यासाहेब केतकर यांचे आत्मवृत्त पान ४०४ व पू बाबा बेलसरे यांनी लिहिलेले श्रीमहाराजांचे चरित्र.*

संकलन: श्रीप्रसाद वामन महाजन

Thursday, January 23, 2025

नाम

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*




*नाम  घेणार्‍याच्या  मागेपुढे  मी  उभा  आहे .*


गूढ शोधून काढण्याकडे मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते. कोकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात. ते कुठून येतात हे कळत नाही. म्हणजे, केवळ दृश्यामध्ये असणार्‍या गोष्टींचेदेखील मूळ आपल्याला उकलत नाही. मग जे अदृश्यच आहे त्याचे मूळ आपल्याला कसे कळणार ? मो बोलतो कसा, माझे मन कुठून येते, हे देहबुद्धीत राहणार्‍यांना कळणे कठीण आहे. नामामध्ये जे स्वतःस विसरले त्यांनाच मी खरा कळलो. स्वतःच्या प्रपंचाचे कल्याण करून घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता. पण कोळसा जितका जास्त उगाळावा तितका तो काळाच होत जातो, त्याप्रमाणे प्रपंचामधे कसेही केले तरी दुःखच पदरात पडते. आपण समजून उमजून ज्या चुका करतो, त्यांचा दोष आपल्याकडे असतो. न समजता जी चूक होते त्याचा दोष येत नाही. प्रपंचाच्या आसक्तिने दुःखपरंपरा येते हा अनुभव दररोज येत असून आपण प्रपंचात आसक्ति ठेवतो, हा दोष नव्हे काय ? आपले कुठे चुकते ते पाहावे आणि जे चुकते ते सुधारावे. प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठे मिळतात ? त्या मिळणे न मिळणे आपल्या हातातच नसते. मग अमुक हवे किंवा नको असे कशाला म्हणावे ? रामाचेच होऊन राहावे म्हणजे झाले ! जो रामाजवळ विषय मागतो, त्याला रामापेक्षा त्या विषयाचेच प्रेम जास्त असते असे सिद्ध होते.


मी तुमच्याकडे येतो. पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवीत नाही. मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा; म्हणजे सतत नामस्मरणात रहा. मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच. मला रामावाचून दुसरे जिवलग कोणी नाही. देहाच्या भोगांना मी कधी कंटाळलो नाही. तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे यापलिकडे खरोखर मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही. रात्रंदिवस माझ्या माणसांना मी हेच सांगत असतो की, वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका. जो माझा म्हणतो , त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे. जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका, धीर सोडू नका, आणि घ्यायचे झाले तर नामच घ्या. माझा नियम असा आहे की, परमार्थाची एकही गोष्ट अशी असता कामा नये की जी व्यवहाराच्या आड येईल. माझ्या गावी पैसा पिकत नाही. पण भक्ति मात्र खास पिकते. ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागेपुढे मी उभा आहे. मी तुमच्याजवळ आहेच; तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही नुसते नाम घ्या, बाकीचे सर्व मी करतो. शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे, मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे; ती मी सांभाळीन.


*२१० .   जेथे  नाम  तेथे  मी ।  हा  भरवसा  बाळगून  असावे  तुम्ही ॥*


॥  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम ॥

Wednesday, January 22, 2025

मोरपिसे मनातली

 मोरपिसे मनातली...

*भिऊ नकोस......*

देवाची पूजा करून तिने त्यांच्यापुढे हात जोडले आणि महाराजांना म्हणाली हसा नुसते तुम्ही हसा फक्त . तिन्हीत्रिकाळ माझी फजिती बघत बसा . थोडीशी नाराज होऊनच ती आज घराबाहेर पडली होती.काही धड होत नाहीय आयुष्यात .एक गोष्ट निस्तरे पर्यंत दुसरे विघ्न समोर उभे ठाकते. सासूबाई गावी पडल्या होत्या पाय घसरून. दोन दिवस नवरा जाऊन आला होता .पण रजा नाही म्हणून आईला शेजाऱ्यांच्या भरवशावर टाकून यावे लागले कारण या परिस्थितीत आईला प्रवास झेपला नसता .

इकडे तिचे आई बाबा ही थकले होते .काय काय म्हणून सावरू मी. तिला रिक्षाही मिळेना . आजपण लेट मार्क लागणार .जाता जाता वाटेत  देऊळ लागले .नेहमी प्रमाणे परत हात जोडले गेले . रस्त्याच्या बाहेरून ही महाराजांची शांत मंदस्मित करणारी मूर्ती दिसली. ती पुन्हा महाराजांवर कावली. काल रात्री मुलाचा अभ्यास घेत बसले , झोपायला उशीर झाला , नवरा रुसून बसला . त्याची समजूत काढता काढता नाकीनऊ झाले . त्याचे ही बरोबर आहे रात्रीचीच तेवढी घटकाभर वेळ असते दोघांना भविष्याची स्वप्ने पहात एकमेकांबरोबर वेळ व्यतीत करायची .मग सकाळी उशिरा जाग आली . त्यातून दूध नासले , गॅसही नेमका आत्ताच संपायचा होता . दुसरा लावून देईपर्यंत मुलाची बस चुकली. नवरा  त्याला सोडायला शाळेत गेला .अरे देवा ! आज त्याला पण उशीर होणार . ती कशीबशी ऑफिस मध्ये पोचली . ऑफिस मध्ये सगळया जणी नटून थटून आल्या होत्या . काय आहे आज ? समोरची तयारी बघताच तिने डोक्यावर हात मारून घेतला. आज ऑफिस मध्ये सत्यनारायणाची पूजा . कसलीच मदत नाही माझी .ती फुरंगटली . मैत्रीण म्हणाली त्यात काय छान रांगोळी काढ . ती रांगोळी काढायला बसली. मन आईबाबांकडे , त्यांच्या आजारपणाकडे , सासूबाईंच्या दुखण्याकडे , मुलाच्या परिक्षेकडे तर रुसलेल्या नवऱ्याकडे लागले होते . हात रांगोळी रेखाटत होते पण तिच्याही नकळत महाराजांची हसरी मूर्ती पूजेपुढे आकार घेत होती .तेच मंद स्मित .सगळे कौतुक करत होते पुन्हा ती रागावली . हसा तुम्ही फक्त हसा .नुसते म्हणता भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे . दुपारनंतर तिने मोबाईल हातात घेतला तर तिला कळले की ज्या भागात नवऱ्याचे ऑफिस आहे त्या भागात मोठी आग लागली आणि फायरब्रिगेडच्या गाड्या आग विझवत आहेत. तिच्या नवऱ्याचे ऑफिस तिला स्पष्ट दिसत होते. हातातले सगळे काम सोडून ती धावत निघाली. रिक्षा सिग्नल ला थांबली तो पुन्हा समोर महाराजांचे देऊळ . मंदस्मित करणारी महाराजांची मूर्ती आणि त्याचवेळी तिला नवऱ्याचा फोन आला की उशीर झाल्यामुळे तो आज ऑफिस ला गेलाच नाही , मुलाच्या शाळेच्या बस ला छोटासा अपघात झाला होता व जबाबदार पालक म्हणून तो शाळेच्या मदतीसाठी थांबला होता . त्याच्या ऑफिस जवळ झालेल्या आगीच्या घटनेची त्याला कल्पनाच नव्हती . तिची नजर महाराजांकडे गेली आणि रिक्षा सिग्नल वरून पुढे गेली .ती घरी पोचली . संध्याकाळी महाराजांच्या फोटो ला हार घालताना नवऱ्याचा फोन वाजला , त्याच्या आईचा फोन होता तिचे आईबाबा तिच्या आई कडे आले होते .बाबांचे एक मित्र  त्यांच्या गावात राहतात त्यांच्या घरी महाराजाच्या पादुका आल्या होत्या आणि त्या उत्सवासाठी तिच्या आईबाबांना आग्रहाचे आमंत्रण त्यांच्या मित्राने दिले होते . तिथून ते तिच्या आईला भेटायला आले आणि त्यांना कळले आईच्या पायाचे दुखणे .आणि त्यांनी ठरवले की आई बऱ्या होईपर्यंत ते आनंदाने त्यांची जबाबदारी घेऊन तिथे राहणार होते. क्षणार्धात  सगळ्या घटना तिच्या डोळ्यासमोरून गेल्या . संपलेला गॅस , चुकलेली बस , नवऱ्याला झालेला उशीर , महाराजांच्या पादुकांचे आईच्या गावात येणे 

आणि त्या मंदस्मित करणाऱ्या महाराजांपुढे ती नतमस्तक झाली .फोटोतून जणू ते म्हणत होते *भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.*

मंजू काणे©

Tuesday, January 21, 2025

सत्य काय

 🕉️ *अष्टावक्र गीता/ प्रथम अध्याय-१*🕉️


*सत्य काय ?*


अष्टावक्र गीता हा जनकमहाराज व अष्टावक्र मुनी यांच्यातील संवाद आहे. तसं बघितलं तर जनक महाराज स्वतः विद्वान होते. त्यांच्या पदरी अनेक पंडित होते. पंडितांना आत्मज्ञान म्हणजे काय ते माहीत होते पण त्यांना त्याची अनुभूती नव्हती. म्हणजे आत्मज्ञान झालेल्या माणसाच्या मनःस्थितीची त्यांना कल्पना नव्हती. त्यामुळे जागृतअवस्था व स्वप्नावस्था यातील खरी कोणती ? असा प्रश्न जनकमहाराजांनी दरबारात विचारला असता पंडितांपैकी कुणालाच समाधानकारक उत्तर  सांगता येईना. तेव्हा सभेतील पंडित एकमुखाने म्हणाले , " याचं उत्तर अष्टावक्र मुनीच देऊ शकतील , कारण ते आत्मज्ञानी आहेत."


दरबारातल्या पंडितांचं म्हणणं ऐकून जनक महाराजांनी अष्टावक्र मुनींना विचारलं , " मुनिवर , माणसाला वाघ मागं लागल्याचे स्वप्न पडले असेल तर स्वप्नात तो घाबरून पळत सुटतो. कारण त्यावेळेस तो मागं लागलेला वाघ स्वप्नात अनुभवत असतो. पण जेव्हा तो जागा होतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे वाघ वगैरे काही नाही मी तर माझ्या घरी गादीवर आरामात झोपलेलो आहे. 


आता माझा प्रश्न असा आहे की , वाघ मागं लागलाय म्हणून पळत सुटलाय ही स्वप्नावस्था व घरी गादीवर आरामात झोपलाय ही जागृत अवस्था या दोन्ही अवस्थांपैकी सत्य कोणती ?"


वरील प्रश्नाचं सामान्य उत्तर जागृत अवस्था हीच खरी असं वाटणं सहाजिक आहे परंतु जनक महाराजांच्या प्रश्नाचे उत्तर देताना आत्मज्ञानी अष्टावक्र मुनि म्हणतात , " राजा , या दोन्हीही अवस्था खोट्या आहेत. जोपर्यंत तू दोरीला साप समजतोस तोपर्यंत तू घाबरलेला असतोस आणि ती दोरी आहे हे कळल्यावर तू निर्धास्त असतोस. या घाबरणे आणि निर्धास्त असणे या दोन्हीही अवस्था तात्पुरत्या असतात. तसं स्वप्न व जागृती या दोन्हीही अवस्था तात्पुरत्या आहेत आणि म्हणूनच असत्य आहेत.


*तू मूळचा  परमेश्वरी अंश आहेस तेवढंच फक्त सत्य आहे.*


कारण ,


मनुष्य जन्माला येतो तेव्हा त्याला नाव नसतं. कालांतराने त्याचं बारसं करून नाव ठेवलं जातं. आईबापांच्यावरून आडनाव मिळतं. जात ठरते. त्यानुसार संस्कार होतात. कुळाचा अभिमान बाळगला जातो. असा काहीसा प्रत्येकाचा आयुष्यक्रम चालू राहतो. 


पण तू बेसावध राहू नकोस. एक लक्षात घे , आपण सर्व मूळचे ब्रह्माचे अंश आहोत. म्हणून आपलं कुळ ब्रह्माचं आहे. त्याला शोभेल असं वर्तन ठेव. *आपण सर्व या सर्व दृश्य जगापेक्षा वेगळे आहोत हे लक्षात घेऊन यापासून अलिप्त होऊन रहायला हवं.*


मुनींच्या उत्तराने जनकमहाराजानी अतिशय प्रभावित झाले. त्यांनी अष्टावक्र मुनींना गुरु केले. त्यांची आत्मज्ञान विषयक जिज्ञासा जागृत झाली आणि त्यांना पडलेल्या तीन प्रश्नापैकी एक प्रश्न मुनींना विचारला की , *महाराज वैराग्य कसं येतं ?*


*क्रमशः*✍️

एक चरित्र

 🚩🌹जय जय श्रीराम 🌹🚩 🙏🙏🙏🚩


*एके दिवशी (संध्याकाळच्या सुमारास) सरयू नदीच्या तटावर.....तीन्ही भावांसह फिरत असता श्री रामाला बंधू भरतानं म्हटलं , "एक गोष्ट विचारू दादा? माता कैकईनं तुला वनवास मिळावा यासाठी मंथरेसोबत जे कारस्थान रचलं ते कारस्थान म्हणजे राजद्रोहच नव्हता का? तिच्या या कारस्थानाने एकीकडे राज्याचा भावी राजा आणि त्याच्या पत्नीला १४ वर्षांचा वनवास भोगावा लागला आणि दुसरीकडे महाराजा दशरथ यांचा पुत्रविरहाच्या केवळ कल्पनेनंच अपमृत्यू झाला.  अशा कारस्थानासाठी (सामान्य नियमांनुसार) तर मृत्युदण्डच दिला जात असतो, तर मग तू , जी तुझीही आई आहे अशा कैकईला दंड का नाही दिलास ?"*


*यावर रामचंद्र हसले आणि म्हणाले,  "तुला माहित आहे भरता !!  एखाद्या कुलात जेव्हा चरित्रवान और धर्मपरायण पुत्र जन्म घेतो, तेव्हा त्याचं जीवन त्याच्या असंख्य पीढ्यांतील पितरांच्या अपराधाचं क्षालन करतं. ज्या आईनं तुझ्यासारख्या  पुण्यात्म्याला जन्म दिला असेल , तिला दंड कसा बरं देता येईल भरता ?"*


*यावर भरताचं कांही समाधान झालं नाही. तो म्हणाला, "हा तर मोह आहे दादा; आणि राजाचा कायदा मोहापासून मुक्त असायला हवा. तेव्हा दादा तू कृपा करून मला एका राजाप्रमाणे उत्तर दे की तू माता कैकईला दंड कां नाही दिलास ?.......असं समज की तुला हा प्रश्न तुझा लहान भाऊ नव्हे तर अयोध्येतील एक सामान्य नागरिक विचारतोय."*


    *(श्रीराम गंभीर झाले )...... काही क्षण मौन राहून श्रीरामचंद्र म्हणाले, "हे भरता, आपल्या नात्यातल्या किंवा जवळच्या कुणा व्यक्तीला त्याच्या अपराधाबद्दल शिक्षा न करणं हाच या सृष्टीचा सर्वात कठोर असा दंड आहे !! माता कैकईनं आपल्या केवळ एका अपराधाचा खूप कठोर असा दंड भोगला आहे. वनवासाच्या (१४) चौदा वर्षांत आपण चारही भाऊ आपापल्या जागी राहून त्या काळच्या विपरीत परिस्थितीशी झगडत होतो ;  पण माता कैकई प्रत्येक क्षणाला केवळ आणि केवळ फक्त मरणच अनुभवत होती. आपल्या त्या एका अपराधासाठी तिनं आपला पति गमावला, आपले चारही पुत्र ती गमावून बसली, स्वतःचं सर्व सुख - सन्मान तीनं गमावला, आणि तरीही आपल्या हातून घडलेल्या अपराधाच्या सततच्या जाणिवेतून ती कधीच मुक्त होऊ शकली नाही. वनवास संपला तसा ....... परिवारतील उर्वरित सगळेच  सदस्य आनंदी आणि सुखी झालेत;  पण तिला कधीच समाधान लाभू शकलं नाही. कुठलाही राजा कुणा स्त्रीला यापेक्षा अधिक कठोर दंड काय देऊ शकणार मला तर सदैव याचंच दुःख होतं की  माझ्या मुळेच (अकारण) माझ्या आईला इतका कठोर दंड भोगावा लागला."*


       *रामाच्या नेत्रांतून अश्रूंच्या धारा वाहात होत्या, आणि भरतासह सर्व भाऊ नि:शब्द होऊन गेले.*


    *रामचंद्र पुन्हा सांगू लागले ....... "आणि तिच्या या एका क्षुल्लक चुकीला आपण अपराध तरी कां समजायचं भरता !!...... जर मला वनवास झाला नसता] , तर हे जग 'भरत' आणि 'लक्ष्मण' या भावंडांचं अतुल्य भ्रातृ - प्रेम कसं पाहू शकलं असतं ?  मी तर केवळ माझ्या माता पित्याच्या आज्ञेचं पालन करायचं म्हणून वनवास भोगला होता, पण तुम्हा दोघांनी तर कुणाची आज्ञा नसतानाही केवळ माझ्यासाठी १४ वर्षाचा वनवास भोगलात. माझ्या भाग्यात वनवास नसता तर भावांचे संबंध कसे असावेत हे जगाला कळलं असतं कां ?"*


*भरताला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. कांहीही न बोलता त्यानं श्रीरामांना प्रेमभरानं आलिंगन दिलं. !!*


 *राम काही कुठला नारा नाही, राम एक आचरण आहे, एक चरित्र आहे , जीवन जगण्याची एक शैली आहे.*


  *👣  🙏 जय श्रीराम 🙏👣*


 *सादर: ही कथा मला अतिशय प्रेरक, आपल्या संस्कृतीचा एक अमूल्य ठेवा असल्यासारखी वाटली म्हणून प्रेषित करीत आहे. जर आपल्याला ही कथा आवडली आणि पुढे पाठवावीशी वाटली तर जरूर पाठवा.*


  *जय श्री राम.🙏🙏🙏*

Saturday, January 18, 2025

कल्याणाच्या गोष्टी

 वाचनात आलेलं छानसं आणि उपयुक्त काही....👇


*प्रश्न : तिरडी चितेत न जाळण्याचे शास्त्रीय कारण काय* ?


जाणकारांनी मार्गदर्शन करावे...🙏🏻


माहीत नव्हते, संदर्भ पटताहेत म्हणून पाठवतोय......😳🤔🤔


 *देवासमोर अगरबत्ती लावणे शास्त्रामध्ये अशुभ मानले जाते हे तुम्हाला माहित आहे का ?*


हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे बांबू जाळणे निषिद्ध आहे. कोणत्याही पूजा, हवन आणि होमामध्ये सुद्धा बांबूचा वापर होत नाही. इतकेच काय, चितेमध्ये सुद्धा बांबू जाळणे निषिद्ध आहे. शास्त्रानुसार, बांबू जाळण्याने पितृदोष लागतो…


*चला बघूया, ह्यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत का ?*


बांबूमध्ये शिसे आणि दुसरे हेवी मेटल असतात आणि जर बांबू जाळला गेला तर ह्या हेवी मेटलचे आणि शिस्याचे आॅक्सिडेशन होऊन लीड ऑक्साइड आणि हेवी मेटल चे ऑक्साइड बनतात.


हे ऑक्साइड न्यूरोटॉक्सिक म्हणजे मज्जासंस्थेला खूप घातक असतात. अगरबत्तीमध्ये सुगंधासाठी phthalate नावाच्या एका विशिष्ट रसायनाचा वापर होतो जे Phtalic ॲसिडचे एक इस्टर आहे.


ज्या बांबूला चितेत सुद्धा जाळलं जात नाही, त्या बांबूला आपण रोज घरामध्ये जाळतो !!

विश्वास नाही ना बसत ??

हो रोज जाळतो अगरबत्तीच्या रूपाने.

अगरबत्तीमध्ये बांबूच्या लाकडाचा उपयोग होतो हे आपल्या सगळ्यांना माहित असेलच. हे घातक रसायन सुद्धा अगरबत्तीच्या सुगंधासह श्वासाद्वारे शरीरात प्रवेश करते. अशाप्रकारे अगरबत्तीचा सुगंध हा नुरोटॉक्सिक आणि hepatotoxic रसायने शरीरात पोहोचवतो. 


*ही रसायने कर्करोग आणि पक्षाघातासारख्या भयानक रोगाला कारणीभूत आहेत. hepatotoxic रसायनाची थोडी मात्रासुद्धा यकृतासाठी (लिव्हर) घातक असते.*


धार्मिक विधीमध्ये सगळ्या ठिकाणी धूप हाच शब्दप्रयोग केलेला आहे. पूजेमध्ये धूप, दीप आणि नैवेद्य असाच उल्लेख आढळतो…


*भारतामध्ये अगरबत्तीचा वापर हा ईस्लामच्या आगमनानंतर आढळतो. ईस्लाममध्ये मूर्तिपूजा निषिद्ध असल्याने मूर्तिपूजा केली जात नाही. तिथे अगरबत्ती हि मजारवर किंवा थडग्यावर लावली जाते जी आपण अंधानुकरण करत आपल्या देवघरात लावतो.*


आपण हिंदुधर्माला कायम कमी लेखतो आणि दुसऱ्या धर्माना मोठा समजतो… 


*खरतर हिंदुधर्मातली प्रत्येक गोष्ट ही शास्त्रसंमत आणि वैज्ञानिक गोष्टींवर आधारित आहे, कारण हिंदु धर्म समस्त मानव जातीच्या कल्याणाच्या गोष्टी सांगतो.*


बऱ्याच गोशाळा धूपकांडी बनवतात. त्या भाकड गावरान गायीच्या शेणापासून बनवलेल्या असतात, त्या धूपकांडी पासून ऑक्सिजन तयार होतो.


*म्हणून आपण जसा जमेल तसा फक्त आणि फक्त धुपाचा वापर केला पाहिजे…*


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


खरं आहे की नाही ?? ......


*आपण धुपं समर्पयामी, दिपं दर्शयामी म्हणतो.*


अगरबत्ती समर्पयामी म्हणत नाही !!!

मनःशांती

 *मनःशांती*. 


*साधकाने समाजात वावरत असताना नींद आचरण टाळावे आणि वंद्य आचरण भावे म्हणजे मनापासून करावे. साधनेत गढून  गेला असताना समाजातील काही लौकीक व्यवहार सांभाळू शकत नाही, तेव्हा लोकांनी त्याला नावं ठेवल्यास त्याने पर्वा करू नये.*

 *वंद्य भावे करावे असे समर्थ म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ चांगले वागणे नाईलाजास्त्व  नसावे, श्रद्धपूर्वक असावे. चांगले वागण्याची कृती तयार व्हायला पाहिजे. जीवनमूल्य ही*

 *जीवनपेक्षा मोठी आहे. संस्कार हा क्षणभंगुर सुखापेक्षा थोर आहे.*


*एकदा कुंतीने युधिष्ठराला* *विचारले आपण एवढे चांगले वागतो तरी आपल्या वाट्याला* *वनवास आला. कौरव एवढे दुराचारी आहेत तरी ते*

 *वैभववात लोळत आहेत. तेव्हा युधिष्टर म्हणाला," काही लाभ होणार म्हणून चांगले वागायचे असते हे*

 *आजच मला तुझ्याकडून कळले. चांगले वागणे हा संस्कार आहे मग त्यासाठी* *कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल असे*

 *मी समजतो". साधकाने प्रयत्नच्या आहारी न जाता वेळप्रसंगी  थोडा त्रास सहन करून श्रेयस कर्मच निवडावे. येथे वंद्य म्हणजे श्रेयस आणि निंद्य म्हणजे प्रेयस.सत्य हे जीवनापेक्षा मोठे आहे. चांगले संस्कार* 

*समाजामध्ये टिकवून ठेवण्याची जबाबदारी साधकाने निर्धारपूर्वक पार पाडावी. तेंव्हा माणसाने श्रेयस स्तर निवडून प्रेममय आणि शांत जीवन जगावे.

 संकलन आनंद पाटील*

Friday, January 17, 2025

विख्यात विवेकानंद

 *वाचनशिल्प*


*अध्यात्मिक अनुभव सोसण्याचे सामर्थ्यहि लागते*



*श्रीरामकृष्ण परमहंसांच्या* जीवनातील एक प्रसंग आहे , मोठा बोधप्रद आहे . श्रीरामकृष्ण आरंभी पुजारी म्हणून काम करीत असत . राणी रासमणी नावाच्या एका अत्यंत संपन्न स्त्रीने बांधलेल्या मंदिराचे आरंभी ते पुजारी होते  पुढे पुढे त्यांचा अधिकार लक्षात आल्यानंतर राणी रासमणी आणि तिचा सर्व परिवार परमहंसांचा भक्त झाला . माथूरबाबू या नावाचा रासमणीचा जावई होता . त्याने एकदा परमहंसांची भावावेषात तल्लीन झालेली मूर्ति पाहिली . त्यांच्या मुद्रेवर विलक्षण तेज झळकत होते आणि निरतिशय आनंद अनुभव जणू त्यांच्या रोमारोमातून ओसंडत होता . माथूरबाबूने ते पाहिले . *आपण इतक्या सुखविलासात राहतो , ऐश्वर्यात लोळतो तरी आनंदाचे हे स्वरूप आपल्या अनुभवाला कधी येत नाही . आपल्याला वाटणारे सुख तत्काळ ओसरून जाते , आणि मागून नाना प्रकारच्या चिंतांनी अंतःकरण व्यथित झालेले राहते , हे अनुभविलेले असल्यामुळे  , तल्लीनतेच्या दर्शनाने भारवलेल्या , माथूरबाबूने परमहंसांना  विनंती केली की ,  ' महाराज ! भाव - समाधीत आपण जो आनंद अनुभवता त्यातला थोडासा अंश आम्हालाही चाखवा ना !  त्याचे म्हणणे रामकृष्णानी फारसे मनावर घेतले नाही . पण माथूरबाबू मागेच लागला . चार - पाच वेळा त्यांनी आग्रह केल्यानंतर काही दिवसांनी रामकृष्ण त्याला ' ठीक आहे ' म्हणाले . तो जावई माणूस . रुसला तर काय करील कोणास ठाउक ? म्हणून रामकृष्ण ठीक आहे म्हणाले खरे ! आणि एक दिवस परमहंसांनी माथूरबाबूला आवर्जून स्पर्श केला आणि म्हणाले    ' जा  ! येईल तुला अनुभव .'*    माथूरबाबू  संतोषाने घरी आला पण संध्याकाळी त्याला काही चमत्कारिक वाटू लागले . शरीरात  , हृदयामध्ये  ,  डोक्यात काही जाणीव होऊ लागली . पण ते स्पंद त्याला सुखावह वाटेनात . तो अस्वस्थ झाला आणि परमहंसांच्याकडे धावत आला . पायांवर डोके ठेवले आणि म्हणाला ,  ' महाराज ! आपला हा अनुभव परत घ्या , तो मला असह्य होतो आहे .


*आध्यत्मिक अनुभव सोसण्याचे सामर्थ्यहि असावे लागते .* त्या दृष्टीने शरीर आणि अंतःकरण योग्य असावे लागते . विज्ञानाच्या क्षेत्रात सुद्धा काही विशिष्ट रसायनांचा प्रयोग करावयाचा असला तर सर्वसामान्य काचेची पात्रे चालत नाहीत. त्यासाठी पायरेक्स ग्लासची पात्रे वापरावी लागतात . साधी काच तडकते , वितळते म्हणून तिचा उपयोग करता येत नाही . माथूरबाबूला ते सोसले नाही . *रामकृष्ण परमहंसांनी आशाच काही आग्रहावरून नरेंद्रलाही अनुभव आणवून देण्यासाठी विशिष्ट हेतूने स्पर्श केला. पण ती दिव्य अनभूती नरेंद्राला सोसली , मानवलीही , त्यामुळेच नरेंद्राचे पुढे विख्यात  विवेकानंद झाले  !*


संदर्भ ग्रंथ - *पूर्वरंग - तरंगिणी*


              *स्वामी वरदानंद भारती*

संग्रहातून 

सतीश निरंतर


Thursday, January 16, 2025

पूर्वसंकेत

 *पशुपक्षांकडून मिळणारे पावसाचे पूर्वसंकेत*


*1. चातक पक्षी -*


पावसाळा जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात. पाऊस अगदी वेळेवर येणार असेल तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते. जर त्यांचे आगमन लांबले तर पाऊसही लांबणार, ही काळ्या दगडावरची रेघ. त्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. चातक पक्षी ‘पिऊ.. पिऊ’ या त्यांच्या सांकेतिक आवाजात ओरडू लागले की पहिल्या पावसाचे दिवस जवळ आले हे हमखास समजावे.


*2. पावशा पक्षी -*


चातक पक्ष्याप्रमाणेच सृष्टीतील बदलांचे पूर्वसंकेत देणाऱ्या आश्चर्यकारक घटनांचा पावशा पक्षी हा आणखी एक महत्त्वाचा दूत! ‘पेर्ते व्हा’ असे सांगणारा पावशा ओरडू लागला की जुन्या काळी शेतकरी मशागतीची कामे सुरू करत.


*3. तित्तीर पक्षी -*


माळरानावर, शेतांवर काळ्या-पांढऱ्या, अंगावर ठिपके असलेल्या तित्तीर पक्ष्यांचे थवे ‘कोडय़ान केको.. कोडय़ान केको..’ अशा सांकेतिक स्वरात ओरडू लागले की आता लवकरच पाऊस येणार असे खुशाल समजावे. जंगलातील माळरानांत या पक्ष्यांचे अस्तित्व फारसे आढळून येत नाही. परंतु मानवी वस्त्यांशेजारच्या माळरानांवर तित्तीरांचा गडबडगुंडा सुरू झाला की ते हमखास पावसाचे लक्षण समजले जाते.


*4. कावळा -*


कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाभुळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा, करंज या वृक्षांवर केले तर त्या वर्षी पाऊस चांगला येतो, हा जंगलातला अनुभव आहे. कावळ्याने झाडाच्या पूर्व दिशेने घरटे केले तर पाऊस चांगला पडणार. पश्चिमेला केले तर पाऊस सरासरीएवढा पडणार. दक्षिण-उत्तरेला केले तर पाऊस अत्यंत कमी पडणार. आणि झाडाच्या शिखरावर केले तर अवर्षणपर्वाची ती नांदी होय. सहसा कावळा झाडाच्या शिखरावर घरटे करीत नाही. आणि केले तर ती अत्यंत दुर्मीळ घटना असते. यातून दुष्काळाचे अगदी डोळस संकेत मिळू शकतात.


यापेक्षाही मनोरंजक बाब म्हणजे कावळिणीने अंडी किती घातली, यावरूनही जुन्या काळात पावसाचा अंदाज बांधला जात असे. तिने सुमारे चार अंडी दिली तर पाऊस चांगला पडतो. दोन अंडी दिली तर कमी पाऊस. एकच अंडे दिले तर अतिशय कमी. आणि जमिनीवर अंडी दिली तर अभूतपूर्व दुष्काळाचे आगमन ठरलेले.


*5. वादळी पक्षी -* 


पाऊस येण्याअगोदर वादळी पक्षी किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागतात. त्यामुळे पाऊस पडणार याचे संकेत ओळखून समुद्रावर उपजीविका करणारे मच्छिमार आपल्या बोटी, जहाजे, पडाव समुद्रात नेत नाहीत. अशावेळी केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता असते. वादळी पाखरू किनाऱ्याच्या दिशेने आले की वादळवारा त्याच्यापाठोपाठ येत आहे याचे संकेत कोळ्यांना मिळतात. एक प्रकारे ती धोक्याची पूर्वसूचनाच असते. त्याचा अर्थ हमखास पाऊस पडणार किंवा सुमद्रात वादळ येणार.


*6. मासे -* 


पहाडी, डोंगरी भागातील माशांच्या अंडय़ांतील पिल्ले मोठी होऊन जेव्हा समुद्राच्या दिशेने पोहू लागतात, तेव्हा तो काळ पाऊस संपण्याचा… उत्तरा नक्षत्राचा असतो. त्यामुळे पाऊस केव्हा पडणार आणि केव्हा संपणार, याची सुस्पष्ट चाहूल माशांच्या या जीवनचक्रातून मिळते.


*7. खेकडे  -* 


तांबूस रंगाचे खेकडे हजारोंच्या संख्येने समुद्राच्या दिशेने जाताना दिसतात. तुम्ही त्यांच्या मार्गाचे निरीक्षण केले असता अशा अनेक अभूतपूर्व घटना पाहावयास मिळतात. समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या खेकडय़ांवरून शेतकऱ्याला पावसाचे संकेत मिळतात. हा खेकडय़ांच्या स्थलांतरणाचा कालखंड आहे. भरधाव वाहनांखाली असे हजारो खेकडे दरवर्षी समुद्राकडील प्रवासादरम्यान चिरडले जातात. परंतु त्यांची समुद्री धाव कशासाठी असते, याचा कोणी विचारही करीत नाही.


*8. हरीण -*


पाऊस येणार नसेल तर विणीच्या काळातही हरिणी पिल्लांना जन्म देत नाहीत. 


*9. वाघिण -*


आम्ही पाहिलेली ही वाघीण गर्भवती होती. तिला पिल्ले होणार होती. परंतु या वाघिणीने डायसकोरियाचे कंद खाऊन गर्भपात करवून घेतला. हे कंद खाऊन आदिवासी स्त्रियादेखील गर्भपात करवून घेतात. या वाघिणीचे सृष्टीज्ञान अक्षरश: तोंडात बोटे घालायला लावणारे होते. यंदा पाऊस येणार नाही, त्यामुळे जंगलात गवत राहणार नाही. गवत नाही म्हणजे तृणभक्षी प्राणीदेखील राहणार नाहीत. परिणामी आपल्या पिलांना भक्ष्य मिळणार नाही. त्यांची उपासमार होईल… याची पूर्वकल्पना आल्यानेच तिने गर्भपात करवून घेतला होता. वाघिणीच्या गर्भपातानंतर त्या वर्षी अभूतपूर्व दुष्काळ पडल्याचा अनुभव आम्ही घेतला आहे.


*10. वाळवी -*


जंगलात हमखास झाडे पोखरणाऱ्या वाळवी/ उधईला कधी पंख फुटत नाहीत. परंतु पावसाळ्यापूर्वी वारुळातून उधईचे थवेच्या थवे हजारोंच्या संख्येने एका झपाटय़ात बाहेर पडू लागले की पावसाचे लवकर आगमन होते. पावसाळ्यापूर्वी प्रजननासाठी वाळवीचे पंख फुटलेले थवे उडून एकमेकांशी समागम करतात. त्यातून त्यांच्या नंतरच्या पिढय़ा तयार होतात. त्या जंगलात वारुळे तयार करतात.


*11. काळ्या मुंग्यां -*


हजारोंच्या संख्येने काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी नेऊ लागल्यास पाऊस नक्की पडणार, हे समजावे. अत्यंत पुरातन काळापासून काळ्या मुंग्यांच्या हालचालींवरून पावसाचे अंदाज बांधले जात आहेत.


बिळांमध्ये दडून राहणारे सरपटणारे जीव बिळाच्या बाहेर पडू लागले की ती हमखास पावसाची चाहूल समजावी. या प्राण्यांना पाऊस येणार असल्याचे अगोदरच कळलेले असते. त्यामुळे बिळात पाणी शिरण्यापूर्वीच स्वत:च्या बचावासाठी ते उंच जागांचा आश्रय शोधू लागतात. पावसाळ्यापूर्वी सापदेखील मोठय़ा प्रमाणात बिळाच्या बाहेर पडू लागतात.


*मराठवाडय़ात प्रचंड संख्येने आढळणाऱ्या गोडंबा- म्हणजे बिब्याच्या झाडाला बहर येणे हे दुष्काळाचे संकेत आहेत.*


 *खैर आणि शमीच्या वृक्षांना फुलोरा आल्यास त्या वर्षी पाऊस कमी पडतो.* 


*कवठाला आलेला फुलांचा बहर वादळवाऱ्याचे संकेत देतो.* 


*बिचुलचा बहर आणि कुटजाचा बहर तर अतिवृष्टीचेच हाकारे देतो.* 


*आपण वेली पाहतो. या वेलींचे तंतू अगदी काटकोनात, सरळ रेषेत उभे राहताना दिसू लागले तर ते चांगल्या पावसाचे लक्षण समजावे.*

Wednesday, January 15, 2025

माणसं मनातली'...

 'माणसं मनातली'......


मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला, शरीराला प्रसन्न करून जातो.

सहवासातील माणसाचं देखील असंच असतं.


काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात, आपली होऊन जातात.

तर, काही कितीही सहवासात राहिली, तरी त्यांची आतून ओढ नसतेच...


चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल, तर त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाणं वाटतं...


शरीराची सुंदरता वया बरोबर संपते, तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते. शरीराला वय असतं, मनाला ते कधीच नसतं...


शेवटी काय, आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो, शरीर तर निमित्त मात्र असतं.

माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा, आणि विनयशीलता असेल, तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते...


म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही, देवघरातील समईच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो...


आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं!!


आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं, ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई...

ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही.


आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे?

नशिबानं कधी भेटलीच तर हळुवार जतन करून ठेवावीत...

 

 कदाचित, पुन्हा भेटतील ,न भेटतील?


व.पु.काळे 🙏🏻🌹

Monday, January 13, 2025

पेंशन

 *राणीचे पेंशन*

मोदी सरकार पुन्हा आल्या शिवाय ब्रिटिश राशीची पेन्शन बंद होणं शक्य नाही. आता ही गोपीनीय माहिती बाहेर आली आहे. वाचावे थंड डोक्याने खास करून गद्दार हिंदु समाजाने.

 *प्रत्येक भारतीयाने हे जाणून घेणे आवश्यक आहे की 2024 मध्ये मोदीजींना सत्तेवर आणणे आम्हा भारतीयांसाठी खूप महत्वाचे आहे, हे जाणून आम्हाला धक्का बसेल🤔🤔🤔

 

 काही सत्ये जी १९४७ पासून आजतागायत आपल्या भारतीयांपासून कायदेशीररित्या लपवून ठेवली गेली, स्वातंत्र्याच्या वेळी नेहरू आणि गांधींनी चटकन सत्ता मिळवण्याच्या लालसेने इंग्रजांशी सत्ता हस्तांतरणाचा करार केला.  स्वाक्षरी केलेला गोपनीयता करार!


 ज्याची अट अशी आहे की भारत 1947 पासून 50 वर्षांपर्यंत हा पेपर सार्वजनिक करू शकत नाही आणि भारतीय संविधानानुसार, भारतीय संसद, पंतप्रधान किंवा राष्ट्रपती यांना देखील त्यात सुधारणा करण्याचा अधिकार नाही, संविधान कलम 366, 371, 372  , ३९५.


 ज्याचे काही भयंकर तथ्य


 तुम्हाला माहित आहे का की 1947 पासून आजपर्यंत आपल्या देशातून 10 अब्ज रुपये पेन्शन राणी एलिझाबेथला जाते.

 

 करारानुसार, भारत दरवर्षी 30 हजार टन गोमांस ब्रिटनला देण्यास बांधील आहे.


 भारत जपान, चीन, रशिया यांसारख्या देशांमध्ये आपले राजदूत नियुक्त करतो… परंतु श्रीलंका, पाकिस्तान, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये केवळ उच्चायुक्त (उच्चायुक्त) नियुक्त करू शकतात, राजदूत नाही.  असे का.?


 अखेर, भारतासह 54 देश राष्ट्रकुल देश म्हणून का ओळखले जातात, स्वतंत्र राष्ट्र म्हणून का नाही?


 कॉमनवेल्थ म्हणजे "संयुक्त मालमत्ता" संयुक्त मालमत्ता ब्रिटिश राष्ट्रीयत्व कायदा 1948 अंतर्गत, प्रत्येक भारतीय, ऑस्ट्रेलियन, कॅनेडियन, मग तो हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, तरीही कायदेशीररित्या ब्रिटनच्या राणी एलिझाबेथचा गुलाम आहे, जो आता मृत झाला आहे.  आता त्याच्या जागी आपण राजा चार्ल्स तिसरे याचे गुलाम आहोत.


1997 मध्ये, या सत्ता हस्तांतरण कराराला 50 वर्षे पूर्ण होण्याआधी, तो सार्वजनिक होऊ नये म्हणून तत्कालीन पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांनी हा गुप्त करार विदेशी एजंट सोनिया माईनो यांनी 2024 पर्यंत वाढवला होता.


 आता 2024 मध्ये हा गोपनीय करार पुन्हा सार्वजनिक केला जाईल या भीतीने भारतविरोधी शक्ती मोदीजींना विरोध करत आहेत जेणेकरून 2024 मध्येही तो सार्वजनिक होऊ नये आणि...


 आपल्या देशातून दरवर्षी 10 अब्ज रुपये पेन्शन ब्रिटनला जावे.

आपल्या देशातून दरवर्षी 30 हजार टन गोमांस ब्रिटनमध्ये जाते आणि तेथे इतर रहस्ये दडलेली असतात,


 स्वतंत्र भारताचा इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा बलवान नेते लाल बहादूर शास्त्रीजी भारतात आले तेव्हा त्यांची हत्या झाली, हे सर्वांना माहीत आहे...

ताशकंदमध्ये त्यांना अन्नात विष देण्यात आले होते.. त्यांचा मृत्यू, सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू वगैरे रहस्यच राहिले..


त्याचप्रमाणे आपले स्वातंत्र्यही एक गूढ बनले आहे.


 माझ्या प्रिय सनातनी भारतीयांना आवाहन आहे की, उच्च-नीच प्रांतवादाचा सर्व भेदभाव पुसून टाकून, देश, धर्म आणि भावी पिढीच्या रक्षणासाठी, सुख, शांती आणि समृद्धीसाठी २०२४ मध्ये मोदी सरकार स्थापन करावे लागेल.  प्रचंड जनादेश देऊन पंतप्रधान केले.. लाचारी म्हणा किंवा काळाची मागणी म्हणा, दुसरा पर्याय नाही.

नाहीतर देशाचे शत्रू, देशद्रोही काँग्रेसवाले, डावे, स्वार्थी भ्रष्ट केजरी, ममता अखिलेश सारखे दहशतवादी तुकडे टुकडे टोळीचे समर्थक भारताला लुटून नष्ट करतील किंवा इस्लामिक देश बनवण्याच्या मार्गावर येतील.


 म्हणूनच हे विरोधी पक्ष काही रुपयांना विकले गेलेले, वृत्तवाहिन्या जनतेची दिशाभूल करून मोदीजींना बदनाम करण्याचा आणि रोखण्याचा अहोरात्र प्रयत्न करत आहेत...


म्हणून जागरूक राहा आणि त्यांच्या पुढच्या पिढीला सुरक्षित जीवन देण्याच्या उद्देशाने प्रत्येक भारतीयाला ही गोष्ट सांगा, सावध रहा, सतर्क रहा.


 *आम्हा भारतीयांना.  मोदी आणा, देश वाचवा.  याशिवाय दुसरा मार्ग नाही.*

        

      🚩 *शाश्वत एकता चिरंजीव होवो*🚩



🌳🤖😡🥶🥵💩🎯🇮🇳

स्त्रियांचे मनोगत

 खूप छान लेख आहे अवश्य वाचा


😍 🙏🙏 *खरच*🙏🙏


त्या दिवशी रात्री मी *स्वैपाक* करताना *माझा* 

*छोटा मुलगा जवळ उभा राहून पहात* होता*. 

मी *छोटासा फुलका* लाटून तव्यावर टाकला 

आणि एकदा परतुन भाजून घेतला. 

*तोवर दुसरा लाटून तयार होताच*. 

एका हातात पकड घेऊन तवा उचलला 

आणि *फुलका चिमट्याने त्यावर धरला*, 

*लगेच तो फुगून आला*. 

मुलगा आश्चर्याने म्हणाला 

*"झाला पण फुलका?* 

 *ईतका सोप्पा* ??"

😃

मी म्हणाले 

"हो, *कठीण नसतोच मुळी फुलका*. 

खर तर  *सगळा स्वैपाकच मुळी* 

*सोप्पा असतो* . *कठिण* असतं ते... 

*तो रोज रोज करणे*, ^दिवसातून^ 

*अनेक वेळा ओट्याशी झुंजत उभे राहणे*, 

 *आपल्या मूड चा, मनःस्थिती चा* , 

 *आजारपणाचा, दुखण्याचा* *कशाकशाचा* 

विचार न करता *अचूक आपली* 

*भूमिका निभावत भयंकर* 

 **उकाड्यात* देखील *शेगडी* जवळ 

*न कंटाळता लढत देणे* .


सगळे संपले असे वाटत असतानाच 

*ऐन वेळेवर नव्याने कणीक मळून* 

*चार पोळ्या जास्त कराव्या लागणे* , 

स्वैपाक घर *आवरून ठेवल्यावर* 

'संपली एकदाची *दगदग आतापुरती'* 

असे *वाटत असतानाच*... बैठकीतून '

*'आज जेवूनच जा' चा पुरुष मंडळींनी* 

*पाहुण्यांना केलेला *आग्रह* 

*हसून* साजरा करणे आणि *तडक* 

*बिनपगारी overtime* करणे


आणि हे करीत असताना *प्रत्येकाची भाजी*, 

*तिखट, चटणी* ची ^वेगळी आवड^ 

आणि ^तर्‍हा^ समजून *त्यानुसार* 

*जास्तीत जास्त मने सांभाळत* खपणे


बरे *एवढे करून भागेल* 

तर *कसले स्वैपाकघर?*  

म्हणुन सगळा *जिव निघून गेल्यावरही* 

*ओटा, शेगडी, भांडी सगळे घासून* 

पुन्हा *लख्ख करून* ठेवणे, 


ईतक्या मेहनतीला *साधा कुणी* 

*thank you चा उच्चार ही न करता* 

साधी *पुढली ताट देखील न उचलता* 

*निघून जाणे* 


*भरीस भर* म्हणून 

*'ह्यात कोणते जग जिंकले*?? 

 *स्त्रिया असतातच स्वैपाक आणि* 

*घरकाम करण्यासाठी* टाइप' 

*सामाजिक मान्यता असणे..* 


आणि *हे सगळे शिकल्या सवरल्या* 

*स्त्रिया आहात म्हणुन बँक, शाळा*, 

*नोकर्‍या, उद्योग, मीठ मसाला*, 

*नातेवाईक, सण समारंभ* ईत्यादी व 

इतर *अनेक गोष्टी जास्तीच्या सांभाळुन* 

फिरून *ओट्याशी दोन हात करीत* 

*न कुरकुरता उभे राहणे*. 


^कामवाल्या बाईला^ *निदान पगार तरी देतात*, 

^घरच्या बाईला^ तर *तेवढीही किम्मत नसते*. 


अरे .. 

 **फुलका कठीण नसतोच मुळी..* 

 *कठीण असतो तो स्त्री जन्म* ."* 


( *साऱ्या स्त्रियांचे मनोगत* )

🙏🙏🙏🙏

बरं वाटतं....

 *कि जरा बरं वाटतं......*


जाताना बरोबर काही नेणार नाही!

हे जरी सत्य असल तरी...


खात्यावर बऱ्यापैकी शिल्लक असली की जरा बरं वाटतं!!


वाटेत कुणी दिन दुबळा असाह्य दिसला की... चार नाणी खिशात असली की ती त्याच्या हातावर टेकवताना जरा बर वाटत!


हॉटेलिंग ची हौस फिटली असली तरी....

मित्र भेटला तर त्याच्या बरोबर गप्पा मारायला हॉटेलात बसण्या इतपत चार पैसे केव्हाही जवळ असले की जरा बरं वाटतं!


कपडालत्ता दागदागिने नकोसे वाटू लागले तरी... मुलाबाळा साठी, नातवंडासाठी मनाजोगा खर्च करण्या इतकी ऐपत असली की जरा बरं वाटतं!


बरोबर काही न्यायचं नसल तरी .....

शेवट पर्यंत हातात चार पैसे खुळखुळत असले की,जरा बरं वाटतं!!


साठी पार केलीत?अजिबात वाटत नाही!अस कुणी म्हटल की जरा बरं वाटतं!


मित्रांसोबत रात्रभर पार्टी केली तरी...

घरी कुणीतरी आपली वाट पाहतंय हे जाणवलं की,जरा बरं वाटतं!


जाताना बरोबर काहीच जाणार नाही हे माहीत असल तरी...


आहे तोपर्यंत जे जे शक्य ते उपभोगुन घेतलं की,जरा बरं वाटतं!


पुढे दवा डॉक्टर काय वाढून ठेवलंय माहीत नाही तरी...

दोन चार एफडी एखादी पॉलिसी असली की, जरा बरं वाटत!


साठी नंतर ही आपण मुला बाळांना भार नाही. माझ मला पुरेस आहे.अस म्हणण्या इतपत पुंजी गाठीशी असली की,जरा बरं वाटतं!


मी मेल्यावर मला काय करायचंय अस म्हटल तरी...

जाताना दुसऱ्यासाठी काही शिल्लक ठेऊन गेलं की,जाताना जरा बर वाटत!


गरजे पुरता संचय कर हे तत्वज्ञान ऐकायला बर वाटल तरी...

भविष्यात कशा कशाची गरज पडेल हे सांगता येत नाही!


म्हणून.....

सगळं काही इथच रहाणार,

जाताना काही आपल्या बरोबर नेता येणार नाही.हे जरी खर असल तरी...

अंगात ऊब आहे तो पर्यंत खिशाला ही ऊब असली की,

जरा बरं वाटतं!जरा बरं वाटतं!


*कोणी लिहिलं माहीत नाही पण वाचून जरा बर वाटलं...*👍💐💐

Sunday, January 12, 2025

रिझल्ट

 *नंदिनी*


आज पुन्हा एकदा आईच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती.नेहमीपेक्षा जास्त घरात गंभीर वातावरण होते.कारण आज माझा आणि नंदिनी चा दहवीचा रिझल्ट होता.माझी आईला कधीच काळजी वाटत नव्हती!किंबहुना गेली दहा वर्षे माझा रिझल्ट बघायच्या आधी आई नेहमी नंदिनीचा रिझल्ट बघायची.मी पास होणारच ह्याची तिला एकशे दहा टक्के खात्री असायची.काळजी नेहमी प्रमाणेच होती ती नंदिनीची!कारण शाळेत दरवर्षी आईने टिचरला दिलेल्या महागड्या गिफ्टमुळे केवळ नंदिनीला प्रमोट करून वरच्या वर्गात टीचर ढकलून द्यायच्या.परंतु आज रिझल्ट बोर्डाचा होता.इथे टीचरला महागडं गीफ्ट देऊन,मोठी पार्टी देऊन नंदिनीला पास करा सांगायचा चान्सच नव्हता.

खूपदा शाळेत,नात्यात,मित्र परिवारात सगळ्यांना नवल वाटायचे आम्ही दोघे जुळे भावंड असूनही,मी हुशार आणि नंदिनी इतकी ढ कशी? कधीकधी तर लोकांना ती गतीमंदही वाटायची.

   तेव्हा आजी मात्र नंदिनीची बाजू घेत, माझ्याकडे पाहून सगळ्यांना उत्तर द्यायची की... "नंदिनीच्याही वाटणीची बुध्दी आणि शक्ती ह्या टोणग्याने हिसकावून घेतलीस बहुतेक!" 

आजीचे माझ्यापेक्षा जास्त प्रेम नंदिनीवर असल्यामुळे नंदिनीला कोणी काहीही बोललेल आजीला चालायचं नाही.अशावेळी आईचा नेहमीच ठरलेला डायलॉग असायचा नंदकुमार माझ्यावर गेलाय म्हणुन तो हुशार आहे.आणि नंदिनी तिच्या बापावर गेली म्हणून ती...

तेव्हा आजी जरा रागातच आईच वाक्य तोडायची आणि म्हणायची...

" नंदिनीचा बाप अभ्यासात हुशार नसला तरी तबला वाजवण्यात हुशार होता.उगाच नाही बर्मन दा सारख्या दिग्गज संगीतकाराने चौदा वर्षे त्याला आपल्या जवळ ठेवले होते.तू त्याची तबल्यावरची थाप आणि ड्रम वरील काठीला भुलूनच तर त्याच्याशी लग्न केलेस... 

त्यावेळी आई डोळे बंद करून दिर्घ श्वास घेऊन आजीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायची.कारण पप्पांना‌ जाऊन आता सात वर्ष झाली होती.ह्या सात वर्षांत आईने पप्पांच्या पुण्यतिथीला हार घालण्या व्यतिरिक्त कधीच पप्पांची आठवण काढली नव्हती.

तसेही आई सरकारी खात्यात मोठ्या हुद्द्यावर असल्यामुळे तिला ऑफिसचे सुद्धा भरपूर टेन्शन असायचे म्हणून ती घरातील आजीच्या ह्या टोमण्यांच्या राजकारणात फार पडायची नाही.  

      एरवी देवाकडे कमालीचे दुर्लक्ष करणाऱ्या आईने आज मात्र सकाळीच उठून घाईघाईत का होईना पण देवाची पुजा केली.पप्पांच्या फोटोवर ताज्या गुलछडीचा हार चढवला.वर्षांनुवर्षे पुजा करणार्यांना न पावलेला देव जणू हिच्या एक दिवसाच्या पुजेला पावणार होता.लॅपटॉप समोर घेऊन लिंक कधी ओपन होईल याची आई वाट बघत होती.आई टेन्शन मध्ये असली की बसल्यावर ती डावा पाय जोरात हलवत बसायची.आजही तो पाय जोरात हलवत होती.तिच्या मनाची चलबिचल पाहून आजी म्हणाली...

"इतकं टेन्शन घेण्या सारखे काही नाही...काय होईल जास्तीत जास्त नापासच ना!"

आईने एक तिक्ष्ण कटाक्ष आजीकडे टाकत म्हंटले...

"नापास!... अहो तिचं वर्ष फुकट जाईल,क्लासची फी फुकट जाईल,वरती नैराश्य जन्मास येईल ते वेगळच."

तेव्हा आजी छद्मी हसत म्हणाली... नैराश्य कोणाला येईल तिला का तुला???

आजीच्या प्रश्नांना उत्तर द्यायचा आईचा मुडच नव्हता.ती मानेला हिसका देत पुन्हा पुन्हा लिंक ओपन करायचा प्रयत्न करत होती.

शेवटी मीच धीर करून आईला म्हंटले‌..

"आई चिल! दुपारी एक वाजता ओपन होईल लिंक.आता केवळ सकाळचे नऊ वाजले आहेत."

माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत,आईने लॅपटाॅप बाजूला सारून नंदिनीला हाक मारली.

       नंदिनी मात्र नेहमीप्रमाणे गाडीचे वेगवेगळे जुने पार्ट,बॅटऱ्या जोडून ते दुरुस्त करण्यात गुंग होती.तिला नवीन काहीतरी गाडीत बदल करायचा होता.एक नवीन माॅडेल बनवायचे होते.आई रागातच बेडरूम मध्ये गेली.चहुबाजूने काळीकुट्ट झालेली बेडरूम आणि नंदिनीचा काळा चिकट पेहराव बघून आईचा पारा अजूनच चढला.आईने सगळा राग तिच्यावर क्षणात  काढून तिला स्वच्छ आंघोळ करून बाहेर येण्यास सांगितले.

      इतक्यात दारावर बेल वाजली.मी घाईघाईत दार उघडले.समोर आत्या उभी होती.आत्याला बघून सगळ्या घरालाच आनंद झाला.आज पोरांचे रिझल्ट म्हणून मुद्दाम आल्याचे सांगून आत्या आजीच्या रूम मध्ये गेली.तेवढ्यात नंदिनी सुध्दा बाहेर आली आणि तिने आत्याला घट्ट मिठी मारली.नंदिनीचे काळे हात नकळत आत्याच्या साडीला लागलेही! पण आत्याने नेहमी प्रमाणे दुर्लक्ष करून,नंदिनीला खाऊ देऊन ती आईशी रिझल्ट वर चर्चा करू लागली.

आईने मात्र सुरवाती पासून नाराजीचा सूर लावला होता.नंदिनीमुळे केवळ आपलं आयुष्य विस्कळीत झालयं ह्याची खंत ती व्यक्त करत होती.आत्या मात्र आईला धीर देत मुलांच्या कलेने घेण्याचा सल्ला देत होती.आत्याने नकळत आईच्या मर्मावर घाव घालत म्हंटले...

" समजा नंदिनी नापास झाली तर काय करणार आहेस तू!?"

आत्याच्या ह्या प्रश्नाने आईच्या दोन दिवसांपासून लागलेल्या चिंतेला जणू बांधच फुटला.ती एकदम रागातच म्हणाली काय करणार? मारून तर टाकता येत नाही.पुढच्या वर्षी पुन्हा परिक्षा द्यायला सांगेन तिला.किंवा घरातील कामवाल्या मावशींना काढून टाकेन आणि नंदिनीला काम करायला लाविन!पण त्याआधी हे सगळे गाडीचे पार्ट भंगारात देऊन टाकेन."

ममाच्या ह्या बोचऱ्या उत्तराने सगळे नाराजच झाले.पण नंदिनी मात्र रडतरडत म्हणाली..

"नाही हं आई! माझ्या कोणत्याही गोष्टी भंगारात द्यायच्या नाहीत.मला ओटोमोबाईल इंजिनिअर व्हायचे आहे."

आईने कपाळावर हात मारत म्हटले...

"आधी दहावी पास व्हा!"

आईच्या अशा बोलण्याने नंदिनी नाराज झाली.पुन्हा जाऊन त्या कळकळ मळकट रंगाच्या गोष्टी एकमेकांना जोडूनच काहीतरी करु लागली.

     आत्याशी बोलण्याच्या नादात एक कधी वाजला हे सुद्धा आम्हाला कळले नाही.आईने घाईघाईत पुन्हा लिंक उघडली आणि जी गोष्ट घडून नये तीच घडली! म्हणजे नंदिनी नापास झाली.आईचा पारा एकदम चढला आणि तिने रागातच नंदिनीला हाक मारली.आईचा तोल ढळतोय हे पाहून आजी म्हणाली...

नंदकुमारला किती टक्के मिळाले.तेव्हा आई एकदम भानावर येत माझे मार्क पाहू लागली.मला ब्याण्णव टक्के पाहून आई रडायलाच लागली.नंदिनीच्या रिझल्टचा थोडा वेळ जणू तिला विसर पडला.ती आनंदाने आत्या समोर माझे कौतुक करु लागली.आईचा आनंदाचा सूर पाहून क्षणभर नंदिनीला वाटले नक्की आपण पास झालोय.पण दुसऱ्या क्षणी आईने नेहमीप्रमाणे तिला ओरडायला करायला सुरुवात केली.अर्थात नंदिनीला ह्या सगळ्या गोष्टींची सवय होती.त्यामुळे सवयीप्रमाणे ती आजीच्या शेजारी जाऊन तिच्या पदराशी चाळा करत बसली.

       आई मात्र प्रचंड नाराज होती.तिला कशी नंदिनीला समज द्यावी हेच कळत नव्हते.एकूण दहा वर्षांच्या अनुभवातून तिला आता पूर्ण कळले होते की नंदिनीचे अभ्यासात अजिबात डोके नाही.

म्हणून ती रागाने म्हणाली....

" बास्स! ह्या पुढे नंदिनी हातात पुस्तक घेणार नाही.मी पुन्हा कधीच तिची फी भरणार नाही.तिने आता घरकाम शिकावे किंवा बापा सारखं एखादे वाद्य शिकावे.अजून दोन चार वर्षांनी मी तिचं लग्नच करून टाकेन."

नंदिनी तरी धीर करून म्हणाली...

"आई मला मोटर मेकॅनिक व्हायचे आहे.मला मशीन दुरुस्त करायला फार आवडते.मला स्वयंपाक नाही करायचा.मला गॅरेज काढायचे आहे.मी एक बॅटरी सुध्दा तयार केली आहे."

आतातर आईचा राग शीगेला पोहचला.

"आधी बुध्दी दुरुस्त करा स्वतःची!मशीनच्या नादी लागली आहे कारटी.अग ही सगळी कामं पुरूषांची असतात हे किती वेळ सांगायच.तू काय गॅरेज मध्ये काम करणार आहेस का?? गॅरेज मध्ये पंक्चर काढत बसणार आहेस का?दिवसरात्र ह्या छोट्या मशीनशवर मेहनत करतेस...ती जर पुस्तकावर केली असती तर आज पास झाली असतीस.मी तुला मोटार दुरूस्तीला विरोध नाही करत ,पण परिक्षेला पास होणं पण तितकंच महत्त्वाचं आहे."

तेवढ्यात आत्याने ममाच्या हातात पाण्याचा ग्लास दिला.

     तेव्हा आई थोडी शांत झालेली पाहून आत्याने मला विचारले...

" मग काय नंदकुमार तू कोणती साइड घेणार!अर्थात तुला IAS ऑफिसर व्हायचे आहे.मग तू काय कला किंवा वाणिज्य शाखा निवडलीस तरी चालेल."

"नाही हं!" आईने रिकामा पाण्याचा ग्लास ओट्यावर ठेऊन बोलायला सुरुवात केली...."नंदकुमार डॉक्टरच होणार.मला स्वतः ला चांगले टक्के पडून, इच्छा असून सुध्दा पैशा अभावी डॉक्टर होता आले नाही.पण माझी ती इच्छा मी नंदकुमारला पूर्ण करायला सांगेन...."

केवळ आईचा हसरा चेहरा पाहून माझी इच्छा नसतानाही मी आईसाठी सायन्सला गेलो.

      नंदिनीचा अभ्यासाशी पूर्ण संबंध तुटला.अर्थात त्याच तिला किंचितही वाईट वाटत नव्हते.ती घरकाम करून बाकी दिवसभर मोटारीची नवीन बॅटरी बनवत बसायची.दोन चार वर्षे कशिबशी गेली.आणि जे होऊ नको तेच झाले.मला मेडिकल कॉलेज मध्ये सलग दोन वर्षे प्रवेशच मिळाला नाही.एकतर मार्कही कमी त्यात डोनेशनही द्यायची आईची तयारी नाही.शेवटी डोनेशनची सोय व्हावी म्हणुन ब्लॉक गहाण ठेवावा ही कल्पना आईला सुचली.पण त्याला आजी तयार होईना.सगळी कडून आईची चिडचिड होऊ लागली.मी पुन्हा एकदा माझी IAS ची इच्छा प्रकट केली.परंतु त्यासाठी सुध्दा अभ्यास करावा लागतोच ना मग मेडिकलसाठी का नाही करत ह्यावरून सुध्दा तिचा चिडचिडाट झाला.शेवटी मी माझ्या इच्छांना मुरड घालून आईच्या घर गहाण ठेवण्याच्या निर्णयावर मान्यता दिली.ह्याच नैराश्यातून मला सिगारेटचे व्यसन लागले.

    नंदिनीच ना शिक्षण ना नोकरी वर तिच्या त्या बॅटरी आणि स्पेअर पार्टसाठी लागणारे पैसे हा आता वायफळ खर्च आईला वाटू लागला.म्हणून तिने नंदिनीच्या लग्नाचा विचार करायला सुरुवात केली.वीस वर्षांची नंदिनी लग्नाला तयार होते नव्हती.परंतु आजीने सुद्धा आग्रह धरल्याने नंदिनी लग्नास तायार झाली.ना शिक्षण ना नोकरी त्यामुळे तिलाही तसाच कमी शिकलेला पण स्वतःचा छोटेखानी हाॅटेल व्यवसायातील नवरा मिळाला.नंदिनीला पहिल्या पासून अजिबात स्वयंपाकघरात रस वाटत नव्हता.परंतु हाॅटेल व्यवसायातील नवरा असल्याने सकाळ संध्याकाळ ती नुसती चुलीपाशी उभी!हाॅटेल मध्ये होणाऱ्या नुकसानीचे सगळे खापर नेहमी नंदिनीवर फुटले जायचे.आईला मनातील काही सांगावे असे नंदिनीला कधीच वाटले नाही.उलट एक दिवस ती आजीला फोन करून म्हणाली सुध्दा "जर माझ्या जन्मदात्या आईलाच माझ्या भावना कधी कळल्या नाही.तर इतरांना त्या कळवाव्यात अशा मी का अपेक्षा कराव्यात!हळुहळु नंदिनी उदास होत गेली.आणि एके दिवशी तर नैराश्याच्या सगळ्या सीमापार करून तिने चक्क आत्महत्या केली.बावीस वर्षाची पोरं चितेवर पाहून आई एकदम ओरडली ही आत्महत्या नाही.हा खून आहे.पण नंदिनीच्या सासर करांनी उलटे आरोप आईवरच लावले.

अर्थात दुःखाच्या भरात एकमेकावर आरोपप्रत्यारोप झाले.पण ह्यात नुकसान मात्र आमचे झाले.त्या दिवसापासून आईने हसणच सोडून दिले.आधीच तिचा गंभीर स्वभाव तो अधिक गंभीर झाला.आजी मात्र आपल्या मनातील भडास आत्या पुढे काढत म्हणाली.."नंदिनीच्या बाबतीत तिची आईच दोषी आहे.इतक्या अपेक्षा का म्हणून ठेवाव्यात मुलांकडून की ज्याचं मुलांना ओझ व्हावं.??मुलांना त्यांच्या मर्जीप्रमाणे जगू द्यावं.एका चुकीमुळे दुसरी चुक होत गेली."

आईवर दोषारोप करत आजी डोळ्यातून नुसती टीप गाळत होती.

तेव्हा अचानक आत्याने कडक शब्दात आजीला सुनवायला सुरवात केली..."काय चुकलं वहिनीचे? मुलांकडून अपेक्षा ठेवल्या हे चुकल!?

का मुलांच्या सुखासाठी बारा बारा तास काम केले ते चुकल?

का मुलांच्या सुखासाठी तिने काटकसर हे चुकलं? 

वहिनी सुध्दा शिकलेली होती.दादा काय शिकला होता? काय सुख मिळाले तिला ह्या घरात येऊन!?

किती त्रास दिला तिला दादाने!पण तिने फाईट केली दादांशी,तिला तरी कुठे होता माहेरचा आधार.तरी तिने डिव्होर्स ची धमकी दिली दादाला.हातपाय गाळून,डिप्रेशन मध्ये जाऊन वहिनीने आत्महत्या नाही केली.ती प्रत्येक प्रसंगाशी लढली.

तिने प्रत्येक वेळी आपल्या इच्छा समोर ठेवल्या त्यात काय चुकले तिचे?

ती आयुष्यभर तुमच्या मर्जीप्रमाणे जगली हे दिसले नाही तुम्हाला? दादा गेला तेव्हा तीस वर्षाची होती वहिनी.तिची इच्छा होती दुसरं लग्न करायची.पण तिने केलं का? नाही केलं!कारण तुझी इच्छा नव्हती तिनें दुसरं लग्न करावे.

नंदिनीला अभ्यासात रस नव्हता.मोरटमॅकॅनिक व्हायचे होते.पण त्याला वहिनी कधीच नाही म्हणाली नसती  जर तिने पास होण्यापुरते तरी गुण मिळवले असते तर! नंदकुमारला त्याच्या मना सारखे शिकता नाही आले म्हणून दारू सिगारेट ओढू लागला.मग वहिनीने तर किती तरी दारू प्यायला पाहिजे होती.तिच्या मनासारखे काहीच घडले नाही ह्या घरात.दरवेळी आईवडील,पालक चुकिचे नसतात नंदकुमार! अनुभवामुळे ते पिचलेले असतात.त्यांनी तुमच्या कडून आशा नाही ठेवायच्या तर कोणाकडून ठेवायच्या.परक्यांकडुन???

आणि तुम्ही मुलांनी पालकांना दोष देत आत्महत्या करायच्या.

 मुलांच्या बाबतीत काही चांगलं झालं की लगेच आपण मुलांची हुषारी म्हणतो आणि त्यांच कौतुक करतो. काही वाईट झाले की लगेच आईवडिलांना दोष देतो.अरे म्हणुनच मी माझ्या आयुष्यात मुलबाळ होऊनच दिली नाही.मुलांना जन्म द्यायचा, त्यांच्यासाठी खोडा सारखं झिजायच,त्यांना वाढवायचं,त्यांच्या मर्जीप्रमाणे आयुष्य जगायचं , त्यांच्या आवडी निवडी प्रमाणे स्वयंपाक करायचा आणि पुढे आयुष्यभर त्यांनी दिलेल्या दोषांचे ओझे वहायचे.मुल म्हणणार तुम्ही कर्तव्य केले.पालक मुलांकडून कर्तव्याची‌ अपेक्षा ठेवणार! कधीकधी त्या पक्षांचं नवल वाटते.पिल्लांना फंख फुटल्यावर लगेच ढकलून देतात फांदीवरून.पिल्लू उडेल का? त्याला लागेल का? नाही उडता आले तर खाली पडेल का? असा कोणताही विचार न करता तो पक्षी दुसऱ्या दिशेने उडूनही जातो.पुढे त्या पिल्लांचे नशिब!

पण असं वागता येत नाही माणसांना!गुरफटतात माणस मोहमायेत.म्हणुनच जे झाले त्यात कोणाचाही दोष नाही.एखाद्याशी नाही पटलं तर उडून जायच घरट्यातून,मदत मागायची कोणाकडे, आईला विश्वासात घ्यायचे, आजीला भावना सांगायच्या,इतर कोणाला तरी दोष देऊन जीव कशाला द्यायचा.

आत्या सुसाट बोलत सुटली होती.तेव्हा आईने पाण्याचा पेला आत्या पुढे धरला.दोघींचे डोळे पाण्याने तुडुंब भरून आले होते.एका स्त्री च्या भावना दुसऱ्या स्त्री ने जाणल्या म्हणून दुःखातही दोघिंच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.


प्राची गडकरी


शिवणाचा डबा

 *शिवणाचा डबा*


परवा मी काहीतरी उसवलेलं शिवत होते ,

सुईदोरा पाहिला आणि नात(वय वर्षे ८ ) म्हणाली ,आजी काय करतेस ?

मी म्हटलं अगं आजोबांच्या पॅंटचा काठ उसवलाय  तो शिवतेय 

मग तिचे प्रश्न काय संपतायत ?

उसवलं म्हणजे काय ?

काठ म्हणजे काय 

मग सगळं शिस्तवार समजावून सांगणं आलं 😃

पण त्याचा एक फायदा झाला , 

ती म्हणाली मला शिकव ना आणि लगेच एक कापडाचा तुकडा घेऊन आली . 

चला हे ही नसे थोडके म्हणून मी पण लगेच सुई ओवण्यापासून सगळं शिकवलं आणि माझं गुणी बाळ पण लक्ष देऊन पहात होतं 😊

मग तिला हेम म्हणजे काय 

धावदोरा म्हणजे काय उत्साहाने सगळं सांगितलं 

आणि खरच तिने सांगितल्याप्रमाणे इतका छान प्रयत्न केला ना हेम धावदोरा घालायचा मला तर भरुनच आलं 😃. 

शाळेला सुट्टी त्याचा एवढा फायदा झाला याचाच मला आनंद . 

आता त्याचा प्रत्यक्ष उपयोग कधी होईल देवास ठाऊक .

कारण हल्ली ब्रॅंडेड कपडे उसवतही नाहीत आणि फाटतही नाहीत. 

 वाढत्या वयामुळे लवकर लहान मात्र होतात . 😊


पण आपल्या लहानपणी शिवणकाम शिकताना जगण्याचे संस्कार होत होते . मुलामुलींच्या मनावर . 

कारण शाळेत ५वी ते ७ वी शाळेत शिवण विषय असायचा. 

धावदोरा हेम घालणं काजं करणं बटण लावणं (तेव्हा हूक नव्हते 😊)या प्राथमिक गोष्टी शाळेतच शिकायला मिळाल्या . आणि वार्षिक परिक्षेत त्याचे % टक्क्यांमध्ये भरघोस मार्क वाढायचे हा आनंद जास्त 😃


फार पूर्वी तर घरी हातानेच कपडे शिवायची पद्धत होती . 

मला आठवतय माझी आजी पांढरी चोळी (त्यावेळेस बायका पोलके किंवा ब्लाऊज म्हणत नसत 😊)

घालायची 

आणि ती त्या स्वत : शिवायची  हाताने आणि ती चोळी ८ तुकड्यांची असायची 

वितीने माप घेऊन कसं तिला बरोबर साधायचं आता खरच कमाल वाटते . 

पण अडून राहणच नाही हा मला वाटतं पहिला संस्कार असावा बाईवर .

कुंची लंगोट दुपटी झबली (आता ही नावं सुद्धा वापरातून बाद होतील बहुतेक ) घरीच शिवायची . आजीमुळे हे शिकायला मिळालं . 

शिवणाच्या डब्यात बारिक जाड सुया खाकी पॅंटची आणि इतर मोठी बटणं प्रेस बटणं रिळं याचा संग्रह असायचा .

माझ्या डब्यात आता गरजेप्रमाणे ईलॅस्टिक वेलक्रो अश्या गोष्टीही सामावल्यात .  

अजूनही या सुई दोर्याने शिवण्याचा सिनेमात फक्त हिरो हिरॉईनचा  रोमान्स दाखवताना हिरोच्या जवळ उभं राहून त्याच्या  अंगातल्याच शर्टाला बटण लावायचा सीन हमखास दाखवला जातो . 

जो प्रत्यक्षात कधी नसतोच .😃 

नवरा एकतर पटकन शर्ट काढून देईल किंवा दुसरा शर्ट घालेल 😃

आताच्या मुली असा डबा ठेवत असतील का ?आणि किती जणाना याचं ज्ञान असेल ?😃

अपवाद असतीलच . 

त्यामुळे या ज्ञानातून जे आज्यांकडून (मौलीक ?)विचार ऐकायला मिळायचे ते संपलेच .😊

O१ अगं एक टाका वेळेवर घातला तर पुढचे १० टाके घालायचे वाचतात . २ अगं थोडी चूण घालावी गं कपड्यासारखी मनाला . 

३ अगं कपड्यासारखी अलगदपणे माणसं जोडता आली पाहिजेत गं बाळा ,

४ धागा उसवला म्हणून कुणी कपडा टाकून देतं का ?

तसच नात्याचं आहे बयो, टाका घालून जोडता आलं पाहिजे गं 

५ बाईच्या जातीला शिवण टिपण आलं पाहिजे गं बाई तिलाच तर सारं जोडायचं आणि बांधून ठेवायचं  असतं संसारात . 


असे संवाद संपलेच की आता . 

दुपारच्या वेळी माजघरात शिवण टिपण करत बायका एकमेकींशी सुखदुखाच्या गोष्टी  बोलतायत हे दृश्य फक्त सिनेमात किंवा  फोटोत दिसेल आता . 

आता वेळ कुणाला आहे जोडाजोडी करायला ?

आणि लागतच नाही असं काही करायला . 

सगळं रेडीमेड मिळतच की, आणि माणसांचं म्हणाल तर ते फारसं  महत्वाच नाही (🤫) ?

कुणी आलं बरोबर तर ठिक आहे  त्याच्यासह,...  नाहीतर ठिक आहे , त्याच्याशिवाय ,

फक्त धावायचं असतं प्रत्येकाला . 

पण अजूनही निरागस मनाची नातवंडं आजूबाजूला असतील  ना तर नक्की आजीने टाके घालून जोडायचं कौशल्य शिकवत राहावं 

कुणी सांगावं काळ फिरुन येईल  आणि काळाची गरज म्हणून  ( कपडे आणि नाती जोडायला )  परत या गोष्टी करायला शिकवेल तेव्हा आपली आठवण निघेल . 😃

तोपर्यंत आपण आपला शिवणाचा डबा त्यातील सर्व सामानासकट जपून ठेवूया 

आपण एवढं तर करुच शकतो . 😊


  ©️®️ सौ . नीलिमा लेले .

Saturday, January 11, 2025

वाढदिवस

 समीकरण


उद्या तिचा वाढदिवस. लग्नानंतरचा पहिलाच.

लग्नही अगदीच नवं. फक्त महिनाभरापूर्वीचं.


तरी बाबांना सांगत होते की हा वाढदिवस तरी होऊन जाऊ दे इथेच पण त्यांना त्या आधीचाच मुहूर्त हवा होता.

त्या घरी कशी धमाल यायची वाढदिवसाला.

माझ्या वाढदिवसापासून घरात आंबे खायला सुरवात व्हायची. 

भाऊ तर नेहमी चिडवायचा,  तुझा वाढदिवस ना मला तुझ्यापेक्षा जास्त आंब्यासाठीच आवडतो. कारण तेव्हापासून आपल्या घरातला आंबे महोत्सव सुरू होतो.


आंबे महोत्सव.. खरंच तर होतं ते...बाबा माझ्या वाढदिवसाचा महोत्सवच तर करायचे.. कितीही महाग असू दे.. एक डझन आंबे तरी त्या दिवशी न चुकता आणायचेच..माझा वाढदिवस अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावरही भारी ठरायचा.. मला आठवतय तेव्हापासून तरी यात खंड पडलेला नाही.. आता या घरचा वाढदिवस कसा असेल हा विचार करत करतच ती झोपली.


सकाळी नवरा, सासू सासरे सगळ्यांनी तिला विश केलं. सासूबाईंनी तिच्या आवडत्या भेंडीच्या  भाजीपोळीचा डबा दिला. ती नवऱ्याने घेतलेला नवा सलवार कमीज घालून ऑफिसला निघणार इतक्यात आई बाबांचा फोन आला विश करायला. त्यांच्याशी बोलून ती ऑफिसला गेली.


संध्याकाळी सासूबाईंनी तिला ओवाळलं आणि तिचा बाबीसावा वाढदिवस म्हणून तिला २२ वस्तू भेट म्हणून दिल्या. नवा ड्रेस आणि त्यावर जाणाऱ्या सगळ्या ॲक्सेसरीज आणि एक सुंदर पर्स. त्या पाहून तिला एकदम भरून आलं.


नवरा म्हणाला "मॅडम चला लवकर तयार व्हा. आपण जेवायला बाहेर जातोय."


सासूबाईंनी दिलेला ड्रेस आणि त्यावरचा सगळा मॅचिंग थाट करून बाईसाहेब निघाल्या.

सासू, सासरे, नवरा आणि ती..चौघं जवळच्याच एका तारांकित हॉटेल मधे पोचले. इतक्या हायफाय हॉटेलमधे जायची तिची पहिलीच वेळ. तिथलं वातावरण पाहून ती एकदम भांबावून गेली.


आत्ता इथे हे तिघंही असते तर काय मज्जा आली असती असा विचार ती करतच होती इतक्यात तिथे खरंच तिथे तिचा भाऊ आला. त्याच्यामागे त्यांची नेहमीची लाल रंगाची शबनम पिशवी खांद्यावर लटकवलेले बाबा होते आणि त्याच्यामागे आई जी तिच्यासारखीच बावरली होती.


त्यांना पाहिल्यावर आधी तर तिचा डोळ्यांवर विश्वासच बसेना. आश्चर्यचकित होऊन तिने नवऱ्याकडे पाहिले तर तोही हसून तिच्याकडेच पाहात होता. तिचा तो आनंद डोळे भरून पाहत मनात साठवत असल्यासारखा.


त्याने हळूच तिचा हात हात घेतला आणि विचारलं "कसं वाटलं सरप्राईज?"

"अरे.. मस्त.." तिला पुढे बोलवना. तिने फक्त हातातला  त्याचा हात दाबला.

मग वेटरने एक छानसा केक आणून ठेवला.  हॉटेलमधे बर्थडे सॉंग वाजायला लागलं आणि टाळ्यांच्या गजरात तिने केक कापला.

नंतर बाबांनी त्यांचं नेहमीचं गिफ्ट म्हणून डझनभर हापूस  तिच्या हातात ठेवले आणि तिच्यासाठी वाढदिवस  सर्वार्थाने सफळसंपूर्ण झाला.


मग नंतर ही प्रथाच पडली. दरवर्षी बाबा आंबे घेऊन तिच्या सासरी  येऊ लागले आणि याही घरी त्या दिवशीपासून आंबे महोत्सव साजरा होऊ लागला. पुढे भाऊ परदेशी गेला, आईने तर कायमसाठीच निरोप घेतला पण बाबा मात्र कायम ही प्रथा पाळत राहिले. न चुकता.

तिचा वाढदिवस, तिचे बाबा आणि त्यांनी तिच्यासाठी आणलेला वर्षाचा पहिला आंबा हे असं समीकरणच होऊन गेलं. नवरा गमतीने म्हणायचा सुद्धा 'तुमच्या मधे येऊन तुमच्या आनंदाचं  समीकरण बिघडवायची मला अजिबात इच्छा नाही. चालू दे तुमचं बापलेकीचं खास सेलिब्रेशन.'


नंतर अनेक वर्ष, आईच्या जाण्यामुळे झालेला एक  अपवाद वगळता, हे समीकरण असंच चालू राहिलं. अगदी अचूक.


पुढे ती नवऱ्या बरोबर लंडनला राहायला गेली. पण तरीही तिच्या वाढदिवसाला व्हीडीओ कॉल करून बापलेक दोघं वर्षाचा पहिला आंबा एकत्र खाऊ लागले. त्यात यंदाच्या वाढदिवसापर्यंत कधीच खंड पडला नाही.


यंदाचा मात्र तिचा हा पहिलाच वाढदिवस होता.. बाबांशिवायचा..


या वर्षी आयुष्याचंच समीकरण बिघडलं होतं.


पण तरीही घरातलं वातावरण बिघडू नये म्हणून डोळ्यात सारखं सारखं येणारं पाणी लपवून आनंदी राहाण्याची तिची धडपड त्याला दिसत होती.


शेवटी त्याने ठरवलं आणि तो जाऊन हापूसचा बॉक्स घेऊन आलाच.

तिला म्हणाला, "हे बघ तुझी मनस्थिती मी समजू शकतो पण आजच्या दिवशी तुला असं रडतांना पाहून बाबांना काय वाटेल याचा विचार कर. त्यांनी इतकी वर्ष तुझा आनंद जपला. आता त्यांच्यानंतर ती जबाबदारी माझ्यावर आहे. हो ना? हा, आता घटक बदलले की समीकरण चुकणारच त्यामुळे मी नाही म्हणत की मी त्यांची जागा घेईन वगैरे कारण ते मला जमणारही नाही आणि करायचंही नाही. मला फक्त तुझा प्रत्येक आनंद जपायचाय. आजच्या दिवशी अजून एक नवं समीकरण लिहायचंय आणि येणाऱ्या काळात ते पक्कं करत जायचंय."


असं म्हणून त्याने आंब्याची एक फोड तिला भरवली.


आज त्याच्यातला पती आणि पित्यामधल्या वेलांटीची अदलाबदल सहजपणे करू शकणारा एक हळवा पुरूष तिला दिसला व ती डोळे पुसत त्याच्या मिठीत विसावली.


©️®️ धनश्री दाबके


Friday, January 10, 2025

प्रार्थना

 #प्रार्थना म्हणजे ती नाही.

जी आपण हात जोडून, 

 देवाकडं काहीतरी,

मागण्यासाठी केलेली असते. 

प्रार्थना तीच असते,

जी सकारात्मक विचार करून, लोकांसाठी काहीतरी चांगली इच्छा करणं... ही खरी प्रार्थना !!

जेव्हां तुम्ही कुटुंबाच्या पोषणासाठी, 

अत्यंत चांगल्या मनानं स्वयंपाक करता,

ती प्रार्थना असते !!

जेंव्हा आपण लोकांना निरोप देताना,

त्यांच्या चांगल्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो.. ती प्रार्थना असते !! 

जेंव्हा आपण आपली ऊर्जा, आणि वेळ देऊन एखाद्याला मदत करतो... ती प्रार्थना असते !!

जेव्हा आपण कोणाला तरी,

मनापासून माफ करतो... ती प्रार्थना असते !!

प्रार्थना म्हणजे कंपन असतात. एक भाव असतो.

एक भावना असते.

एक विचार असतो.

प्रार्थना म्हणजे प्रेमाचा आवाज असतो..

मैत्री, निखळ नाती, हे सगळं...  म्हणजे प्रार्थनाच तर असते... !!

कथा गाण्यांमागच्या*...

 


*कथा गाण्यांमागच्या*...


यातले बहुतेक सर्व किस्से शैलेंद्रजींचे सुपुत्र दिनेश शंकर यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितले आहेत. शैलेंद्रंना रोज डायरी लिहायची सवय होती. ते सर्व अमूल्य टिपण दिनेश शंकर यांच्याकडे आहे. त्यातून काही निवडक गाण्यांविषयी माहिती जमली आणि जे काही पुढे आलंय ते आपल्या समोर ठेवायला मला आनंद होतोय. यातले बरेच किस्से काहीजणांना माहीतही असतील. पण ज्यांनी वाचले नाहीत अशा सदस्यांसाठी रिपोस्ट...


1) *मुडमुडके ना देख मुडमुडके*...


"एकदा राज कपूरची म्युझिकल टीमचे महत्वाचे सदस्य म्हणजे शंकर, जयकिशन, त्यांचे सहाय्यक आणि संगीतकार  दत्ताराम, गीतकार शैलेंद्र, हसरत जयपुरी गाडीतून चेंबूरच्या आर के स्टुडियो मध्ये चालले होते. राजच्या श्री ४२० वर काम चालू होते. तेव्हा मुंबईत बैठी घरेच जास्त होती. रस्त्याच्या बाजूला नवीन बांधकाम चालली होती आणि दत्ताराम अपूर्वाइने सारखे मागे वळून पहात होते. ते पाहून शंकरजींनी विचारले," अरे दत्तू बार बार मुडमुडके क्या देख रहा है" पुन्हा थोड्या वेळाने तो प्रसंग रिपीट झाल्यावर शेजारी बसलेले शैलैंद्र म्हणाले, "अरे इस पर तो गाना बन सकता है, मुडमुडके ना देख मुडमुडके...राजकपूर आणि नादीरावर चित्रित झालेलं हे गाणं...


लिंक..

https://youtu.be/R3D3YNmg-Ak


2) *खोया खोया चांद खुला आसमान*...


"कालाबाजार" च्या गाण्यांच्या सिटींग्ज चालल्या होत्या. सचिनदांची चालही तयार होती. यावर बरेच दिवस शैलेंद्र लिहिण्याचा प्रयत्न होते पण मनासारखे शब्द सुचत नव्हते. त्रासून एक दिवस सचिनदा त्यांना म्हणाले, "आज कुठल्याही परिस्थितीत गाणं लिहून पाहिजे" आणि पंचमला शैलेंद्रंबरोबर पाठवून म्हणाले गाणं घेतल्याशिवाय घरी येऊ नकोस. दिवसभर दोघे आरे कॉलनी, नॅशनल पार्क अशी आवडीची ठिकाणं पालथी घालत शेवटी रात्री जुहूला आले. त्याकाळात जुहूला निवांतपणा होता. शैलेंद्रंनी पंचमकडे माचिस मागितली, सिगरेट शिलगावली आणि नीरव शांततेत, वर चंद्राकडे एकटक पहाता शैलेंद्रना शब्द सुचले. दिवसभर खरडून खरडून कागद संपले होते.  सिगरेटच्या पाकिटातल्या आतल्या कागदावर अप्रतीम गाणे अवतरले.

"खोया खोया चाँद खुला आसमान, आँखोमें सारी रात जाएगी, तुमको भी कैसे नींद आएगी...


शैलेंद्र म्हणाले,"अब तुम आरामसे घर जा सकते हो! सचिनदासे कहो, कल रेकाॅर्डिंगकी तैयारी करें!

लिंक..

https://youtu.be/9QWWH0QDvSY


3)"परख"..चित्रपटाच्या गाण्यांविषयी..


"परख" चित्रपटातलं मधुर गाणी जर जन्मालाच आली नसती तर???धक्का बसला ना? बिमल  रॉयनी हा चित्रपट करायचा ठरवलं तेव्हा त्यात एकही गाणं नसेल असं ठरलेलं होतं. त्यांनी  सलिल चौधरींना पटकथा आणि शैलेंद्रंना संवाद लेखनाची जबाबदारी दिली होती. हा असा एकमेव चित्रपट असावा ज्याचे पूर्ण संवाद शैलेंद्रंनी लिहिले आहेत. पण गाण्याशिवाय चित्रपट ही कल्पनाच कोणाला रुचेना आणि ते ही समोर उत्तम गीतकार, संगीतकार असताना?  पुढे बिमलदांची समजूत काढण्यात सगळे यशस्वी ठरले आणि "ओ सजना बरखा बहार आई, मिला है किसिका झूमका, मेरे मनके दिये, क्या हवा चली बाबा रुत बदली....या सारख्या सुंदर गाण्यांनी रसिकांना .अतीव आनंद दिला.


लिंक..all songs

https://youtu.be/MK3CVhVk8_k


4) *जिस देशमें गंगा बहती है*.....

हा खरंतर कुणा एका गाण्याबद्दल चा किस्सा नाही. या चित्रपटाची कथा ऐकण्यासाठी राजकपूरनी त्यांच्या टीमला राजकुटीर वर बोलावले होते. कथा ऐकल्यावर अचानकपणे शंकरजींनी  हातातला चहाचा कप जोराने टेबलवर आदळला, एक कचकचीत शिवी हासडली आणि रागाने रुमबाहेर गेले.  राजकपूरनी  "अरे देख तो पहलवान को क्या हुआ? असे म्हणताच हसरतजी आणि शैलेंद्र त्यांच्या मागोमाग गेले. त्यांनी विचारल. "भाई हुआ क्या? शंकर वैतागून म्हणाले, 'डाकूओंकी पिक्चरमें संगीतका क्या काम? शैलेंद्रंनी समजावले अरे नहीं वो गानोंके बगैर पिक्चर कैसे बनाएंगे? आणि खरंच एक , दोन नाही तब्बल नऊ गाणी राज कयूरने अशी चपखल बसवली आणि सगळी हीट झाली.


लिंक..all songs

https://youtu.be/3ICwJPcqg0Q


5) *जाओ रे जोगी तुम जाओ रे*...

लेख टंडनजींचा चित्रपट "आम्रपाली"च्या एका रेकाॅर्ढर्डिंगची गोष्ट!  शैलेंद्रंच्या गाण्यावर शंकर जयकिशनची  रिहर्सल चालली होती. एका बाजूला रेकाॅर्डिंगची तयारी चालू होती तेवढ्यात राजकपूरचा शंकरना फोन आला, "क्या हो रहा है ?ते म्हणाले, "गानेकी रिहर्सल चल रही है!  राजकपूरने गाणे फोन वर ऐकवायला सांगितले! गाणे ऐकल्यावर त्याने लेखजींकडे फोन द्यायला सांगितले आणि त्यांना म्हणाला, "ये गाना तो मेरी फिल्म के लिए तू फीट है! तू,अपने लिये दूसरा लिखवा ले! (लेख टंडन काही दिवस राजकपूरकडे असिस्टंट होते. ते नाही म्हणू शकले नाहीत.)


सगळ्यांच्या चेहेर्‍यावर चलबिचल स्पष्ट दिसत होती. शेजारीच लताजी होत्या त्यांनी समजावले, " अरे गानेका क्या है? हम दूसरा लिखवाएंगे! त्यांनी पेटीवर काही सुरावट वाजवली. शैलेंद्रंनी शब्द लिहिले.. "जाओरे जोगी तुम जाओरे, यै है प्रेमियोंकी नगरी, यहाँ प्रेम ही है पूजा..अंतर्याची चाल, ठरली पण  मनासारखे अंतरे सुचेनात. 


शेवटी पुन्हा ३ वाजता पुन्हा जमायचे ठरले. दोन वाजून गेले तरी अंतरे तयार नव्हते. रेकाॅर्डिंग कसे करणार? ठरल्याप्रमाणे लताजी आल्या. तिकडे कोणाचीही हिंमत होईना लताजींना हे सांगायची की अंतरे तयार नाहीत. लेखजींनी शैलेंद्रनाच आत पाठवले. ते आत गेले आणि लताजींशी संभाषण सुरु झाले. खोली साऊंडप्रुफ असल्याने आत काय चाललंय ते कळेना. बाहेर सर्व हैराण परेशान!  लताजी काय बोलताहेत? नक्कीच रागावल्या असतील! शेवटी न राहवून लेखजींनी आतला माईक सुरु केला तर लताजी शैलेंद्रंना हसून म्हणत होत्या "अरे बास बास शैलेंद्रजी ! तीन अंतरे हो गए और कितने अंतरे सुनाएंगे? समोर कागद, पेन नसताना ते उत्स्फूर्तपणे म्हणून दाखवत होते. कदाचित समोर साक्षात गानसरस्वतीला पाहून शैलेंद्रंच्या प्रतिभेलाही सकारात्मक् ऊर्जा मिळाली असेल! होय ना?

लिंक...

https://youtu.be/9-a9Ggv_PSo


6) *छोटिसी ये दुनिया पहचाने रास्ते हैं*....


शंकर जयकिशनना एका साऊथच्या निर्मात्याचा चित्रपट या अटीवर मिळाला की गीतकार त्यांच्या पसंतीचा असेल. तो पर्यंत हा अलिखित नियम होता की एस जें चे संगीत असेल तर गीते हसरत किंवा शैलेंद्रजींची असणार! जेव्हा शैलेंद्रंना ही गोष्ट कळली तेव्हा ते रागाने हसरतजींना घेऊन रेकार्डिंग रुमवर आले. ते तिथे न भेटल्याने एका कागदावर त्यांनी खरडले, "छोटीसी ये दुनिया पहचाने रासते हैं, तुम कभी तो मिलोगे कहीं तो मिलोगे तो पूछेंगे हाल" आणि निघून गेले.  


शैलेंद्र खरंच दुखावले होते. त्या दोघांनी ठरविले आता एकत्र काम करायचे नाही. ही गोष्ट राजकपूरला कळल्यावर त्याने चौघांनाही जुहूला ठरल्याजागी बोलावले आणि अथांग समुद्राच्या साक्षीने त्यांची दिलजमाई झाली. वादळ शमले. पुढे  शैलेंद्रंकडूनच अंतरे लिहून  घेऊन एस जें नी "रंगोली" या चित्रपटात ते गाणे  वापरले.

लिंक..

https://youtu.be/CeOVtDnYpbc


जाता जाता "जीना यहां मरना यहां" या  अप्रतीम गीताविषयी! शैलेंद्रंनी याचा फक्त मुखडा लिहिला होता. अंतरे बाकी होते. दुर्दैवाने त्याच दरम्यान त्यांचे निधन झाले ते ही राज कपूरच्या वाढदिवसाच्या दिवशीच! राजला त्याच्या अजीज दोस्ताची आठवण अश्यारितीने राहिली ती  कधीही न विसरता येण्यासाठी! त्या गाण्याचे अंतरे नंतर शैलेंद्रंचेचे सुपुत्र शैली शैलेंद्र यांनी पूर्ण केले आहेत.

सर्व भावंडांमध्ये थोरले असल्याने शैली यांना  वडिलांचा सहवास इतरांच्या तुलने जास्त मिळाला. शैलेंद्र यांनी हे पूर्ण गीत लिहिले नाही हे ओळखू येणार नाही अशी अंतर्यांची रचना शैली ने केली आहे


© कृपा देशपांडे,पुणे


सौजन्य....यू ट्यूब

अस्वातंत्रता

 सुबुद्धी म्हणजे कर्माचे फळ ईश्वरावर ठेवून राहण्याची बुद्धी, ज्याला झाली त्याला जन्ममरणाची उपाधी त्रास  देत नाही. हा बुद्धीचा जो समज आहे की माझ्या हातात एवढेच आहे  ते केल्यावर त्याला फळाची अडचण होत नाही. एक गृहस्थ त्यांना खोकला फार होता.

 आणि दमा लागलाकी खोकला जात असे. ते डॉ. भडकमकरांकडे गेले. त्यांना तपासल्यावर डॉ. म्हणाले की तुम्हाला एक खोकला तरी राहील अथवा दमा तरी राहील.

 हे गृहस्थ म्हणाले की मी आपल्याकडे आलेलो ते मला बरे कराल म्हणून. ते म्हणाले की हे  डॉ. हातात नाही. कारण प्रत्येक  शरीराच्या मर्यादा ठरलेल्या असतात. झालेला  रोग बरा होण्याला सुद्धा मर्यादा असतात. ज्यांनी हे ओळखल त्यांना कर्मयोग साधला.

 मी लग्न केले तर मुले होतीलच याची खात्री नाही, मुलगे होतील की मुली होतील याची खात्री नाही. त्या मुलाबाळांचे जीवन कसे असेल ते सांगता येत नाही. इतकेच काय की मी आज झोपी गेल्यावर उद्या सकाळी उठेल की नाही हेही सांगता येत नाही. 

 जीवनात अस्वातंत्रता आहे. याला  मानवी जीवनाच्या मर्यादा म्हणतात. या मर्यादा ओळखून आपण आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करावा आणि फळ देणारा तो आहे, तेव्हा फळ काय मिळेल याची खात्री नाही हे जो कोणी मनात ठेवून कर्म करेल त्याला कर्मयोग साधेल. असा कर्मयोगी कायम समाधानात राहील.