एकदा इच्छामरण या संदर्भात पू.श्री.गोंदवलेकर महाराजांच्या शिष्य मंडळीत चर्चा चालू होती. तेव्हा श्री.महाराज म्हणाले "निसर्गक्रम झुगारून, मर्जी लागेल तेव्हा मी देह सोडीन असे म्हणणारा हा इच्छामरणी नव्हे. ज्याने आपली सर्व इच्छा भगवांताच्या इच्छेत विलीन करून टाकली असाच माणूस इच्छामरणी म्हणावा. भगवंत त्याला बोलावतो तेव्हा तीच आपलीही इच्छा समजून तो आनंदाने देह सोडतो. खरे म्हणजे ज्या क्षणाला गुरुकृपेने देहबुद्धी पूर्णपणे नष्ट होते त्या क्षणालाच तो देहापासून पूर्ण निराळा झालेला असतो. ' आपुले मरण पाहिले म्या डोळां ' असे पू. श्री.तुकाराम महाराज सांगतात ते हेच. देहबुद्धी गेली की त्याला देहाची आसक्तिही रहात नाही. आणि त्याची स्वतंत्र अशी काही इच्छाही उरत नाही. म्हणजे तो इच्छामरणी होतो. हे नामस्मरणाने साधते. म्हणून मी तुम्हाला एवढ्या आग्रहाने नाम घ्यायला सांगतो."
TechRepublic Blogs
Saturday, August 31, 2024
चिंतन
चिंतन
श्रीराम,
सद्गुरू सांगतात, प्रतिक्रिया म्हणून आलेला संताप आणि आवश्यकता म्हणून आणलेला संताप ह्यात खूप फरक आहे. काही ठिकाणी संताप आवश्यक असतो. त्याशिवाय काम होणारच नसते. तेव्हा आपण ठरवून बेतशीर (calculated) आणू शकतो. व्यवहारात अनेकदा असे प्रसंग येतात, जिथे क्रोध आणावा लागतो. कारण आपण फार नमते घेऊ लागलो तर व्यवहार बिघडू शकतो. परमार्थात अगदी प्राथमिक स्तरावर असताना व्यवहार बिघडू नये अशी खबरदारी घ्यावी लागते. कारण व्यवहार बिघडला की, चित्त अस्थिर रहाते आणि त्याने परमार्थही बिघडतो. अशावेळी लोकांची फिकीर न करता 'आणलेला क्रोध' वापरून आतली शांती टिकवता येते.
मात्र क्रोध आणलेला असावा, आलेला नसावा. कारण आलेला संताप त्याला पाहिजे तेव्हा जातो आणि आणलेला संताप आपल्याला पाहिजे तेव्हा घालवता येतो. क्रोधाचे अनेक प्रकार दिसून येतात. कोणावरही अन्याय होताना पाहून जेव्हा माणसाला राग येतो तेव्हा त्याला सात्विक संताप म्हणतात. या ठिकाणी रागाचे कारण व्यक्तीगत नसून मानवनिष्ठ असते. असा सात्विक संताप चांगलाच नव्हे तर आवश्यक ही मानला जातो. त्यामुळे समाजातील वाईट प्रवृत्तींना आळा बसण्यास मदत होते असे समजण्यात येते.
||श्रीराम ||
Thursday, August 29, 2024
परमात्मा
पु.योगी अरविंद यांच्या शिष्या पु.मदर त्यांच्या "दि माईंड ऑफ दि सेल्स" या पुस्तकात म्हणतात की मी सदैव नामतच राहते. काल मी चालत असताना नामाने मला सर्व बाजूंनी व्यापले. माझ्या सभोवती परमात्मा होता. कोणत्याही समस्या राहिल्या नव्हत्या केवळ त्याचे अस्तित्व होते. दुसऱ्या उताऱ्यात त्या म्हणतात की मनावर ताबा न मिळवता केवळ शरीरावर ताबा मिळवू म्हणणाऱ्यांना माझे आव्हान आहे की त्यांनी तसे करून दाखवावे. एकदा पु.श्री.बेलसरे यांनी श्री.गोंदवलेकर महाराजांना विचारले की योगमार्गाचे आचरण करू का ? श्री.महाराज म्हणाले तुम्हाला विनाकारण कष्ट करायची हौस आहे का ? श्री. बेलसरे म्हणाले "मी सर्व मार्ग चोखाळले.
नामस्मरणासारखा मार्ग नाही. योगमार्गात इंद्रियांवर ताबा मिळवून मन ताब्यात आणतात. भक्तिमार्गात मन ताब्यात आणून त्या द्वारे इंद्रियजय केला जातो. मन हे देखील इंद्रियच आहे. त्यामुळे जडाचे नियम त्यालाही लागू आहेत." भक्तिमार्गात सिद्धीचे टप्पे केव्हा येऊन गेले याचा साधकाला पत्ताच लागत नाही. त्यामुळे साधक घसरण्याची भीती कमी असते.
Wednesday, August 28, 2024
ब्राह्मण्याधाय कर्माणी
ब्राह्मण्याधाय कर्माणी म्हणजे सर्व कर्मे ब्रह्माच्या ठिकाणी पोचायची आहेत म्हणजे सर्व कर्मे मूळच्या ठिकाणी पोचली पाहिजेत. म्हणजे त्यांच्या फळाची अपेक्षा आशा करण्याची गोष्टच नाही. अस असल्यामुळे तो साक्षीभावाने कर्म करतो मग त्या कर्माचं पापपुण्य त्याला लागत नाही. तो या कर्माच्या फळापासून पूर्णपणे अलिप्त असतो.
सरकारी नोकरी करणाऱ्यांना या अलिप्ततेची पूर्ण कल्पना असते. वरून आदेश आला की कितीही मनाविरुद्ध असु दे तरी आदेश पाळावा लागतो आणि त्याचं कर्तेपण त्याच्याजवळ नसत. तसं आपल्या गुरूंबद्धल भगवंतांबद्धल वाटलं पाहिजे .
आज हे कर्म आहे ना तुझी इच्छा, तुझा हुकूम आहे ना , तुझ्या मनात आहे ना मग तसं होऊ दे. मग प्रपंचात अमक झालं तर प्रपंच चांगला पण ते न झालं तर प्रपंच वाईट हे खरं नाही. श्री.गोंदवलेकर महाराजांनी एक दृष्टांत दिला . एक शिष्य गुरूंच्या उपासनेला जायचा.
उपासना झाल्यावर प्रसाद वाटतात तो सर्वसाधारण गोड असतो. पण एकदा प्रसादात कडू बदाम आला .या कडू बदमाने शिष्य नाराज झाला. खरं असं आहे आपल्या गुरूचा प्रसाद आहे ना मग इतके दिवस गोड प्रसाद खाल्ला तर एक दिवस कडू बदाम खाल्ला तर का वाईट वाटावं ? आज पर्यंत चांगली परिस्थिती होती आज हा प्रसंग आला तर असू द्या, काही हरकत नाही हे बरोबर आहे .
हे मनाला शिकवण हा परमार्थ आहे. तू ठेवशील तसा मी राहीन. आपल्या मनाला शिकवावे की गुरूच्या हातात सत्ता आहे. तो आपल्याला माकड नाचवतात तसं नाचवू शकतो.
आपल्या प्रपंचात आपण कोणत्या प्रकारे रहावं याचा सगळं हिशोब त्याच्याकडे असतो. कितीही उड्या मारा, प्रयत्न करा पण या प्रयत्नांना फळ तेव्हाच मिळेल जेव्हा गुरूंना वाटेल की आता याला थोडं दिलं पाहिजे. आपण ही जाणीव ठेवणे हा परमार्थ आहे.
Tuesday, August 27, 2024
सत्संगती
*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*
*🚩श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर🚩*
*सत्संगतीच्या योगे मन पैक्यावर गुंतून राहात नाही .*
संतांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते; ते बोलतील ते खरे होते. वाचासिद्धी म्हणतात ती हीच. या सिद्धीचा उपयोग आपणसुद्धा करून घेऊ शकतो; परंतु भगवत्सेवा करावी आणि त्याबद्दल पगार घ्यावा, तसे हे होते. कामधेनूवर ओझे टाकावे हे बरे वाटेना म्हणून, वाटेने घोडा येत होता तो घेतला आणि कामधेनू देऊन टाकली, तशासारखे होते. जे सुख चिरकाल टिकणारे नाही ते घेऊन काय करायचे ? हाडांची काडे करून स्वर्गसुख हाती आले, पण कालांतराने ते नाश पावणार; मग ते घेऊन काय करायचे ? पैक्यासारख्या निर्जीव वस्तूत आपले मन किती गुंतून राहते ! पैसा हा भूतासारखा आहे; त्याच्याकडून काम करवून घेतले तर तो फार उपयोगी आहे. पण ते न केले तर तो उरावर बसतो ! आपण प्रापंचिक माणसे; आपण पैसा साठविला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा. पैशाचा आधार आहे असे वाटणे म्हणजे भगवंताचा आधार नाही असे वाटणे होय. आपल्याजवळचा पैसा आपण होऊन कुणाला द्यावा असे मी म्हणत नाही. पण चोराने तो चोरून नेला तर रडत बसू नये, किंवा कुणी मागायला आला तर त्याला 'नाही' म्हणू नये. त्याला काहीतरी द्यावेच. पैसा प्रपंचाला पुरेसा असावा. म्हणजे किती ? तर पेन्शन असेल त्यांना रोजच्या निर्वाहापुरता असला म्हणजे पुरेसा झाला; आणि पेन्शन नसेल त्यांना साधारण मध्यम स्थितीत दहापंधरा वर्षे पुरेल इतका असला म्हणजे पुरेसा झाला. याला अमुक एक असा हिशेब सांगता येणार नाही. आपल्या प्रपंचाला जेवढा जरूर आहे तेवढा पैसा आपल्याला मिळाला, की बस्स झाले. श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागतो असे थोडेच आहे ? आपल्याला अडचण नाही पडली की आपली श्रीमंतीच आहे ! पैशाच्या बाबतीत आपण प्रयत्न मात्र आग्रहाने करावा, आणि नंतर होईल तसे होऊ द्यावे. आपण आतून निष्काम, निर्लोभ आणि निरिच्छ असावे. दुसर्याचे द्रव्य मला यावे अशी बुद्धी कधीही ठेवू नये. ज्याच्याजवळ पैसा विपुल आहे त्याला श्रीमंत अगर सावकार म्हणता येईल; ज्याच्याजवळ विद्वत्ता आहे त्याला विद्वान् म्हणता येईल; ज्याच्याजवळ शेत आहे त्याला शेतकरी म्हणता येईल; परंतु यांच्यापैकी कोणाला मोठा म्हणता येईलच असे नाही. सावकार कंजूष असेल, विद्वान् गर्विष्ठ असेल, किंवा शेतकरी असाच दुर्गुणी असेल. ज्याच्याजवळ सर्व गुण एकसमयावच्छेदेकरून असतील तोच खरा मोठा होय. सर्व गुण एका भगवंताच्या ठिकाणीच असू शकतील. म्हणून त्याला ज्यांनी आपलासा केला तेच खरे मोठे बनतात. अशा लोकांना संत म्हणतात. आपण संतांचे होऊन राहावे, त्यात आपले कल्याण आहे. सत्संगतीपासून सद्विचार आणि सद्भावना प्राप्त होतात. ज्याचे विचार चांगले तो मनुष्य खरा चांगला होय; आणि जिथे भगवंताचे अनुसंधान आहे तिथे राहणे हीच खरी सत्संगती होय.
*१०६ . पैशाचे नाव अर्थ , पण तो करतो मोठा अनर्थ .*
*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*
Monday, August 26, 2024
मर्म
श्री.गोदवलेकर महाराजांच एक वाक्य आहे वेळ आली की गोष्ट घडायची थांबत नाही.पण तो पर्यंत वाट पाहावी लागते. परमार्थाचे मर्म असे आहे की जे आपल्या वाट्याला आलं आहे ना ते शांतपणे भोगावे. ही ज्याची तयारी आहे ना त्याला जीवन थोडे तरी कळलं.अध्यात्म थोडं तरी कळलं. हे सोपं नाही.
बनारसला पु.श्री.तैलंगस्वामी नावाचे एक सत्पुरुष भैरवनाथाच्या मंदिरात रहायचे. एका मुलीचे वाकडे पाऊल पडले.तीला दिवस राहिले. तिच्या बापाने विचारलं याचा बाप कोण तर त्या मुलीने तैलंगस्वामीचं नाव सांगितले. ते मूल झाल्यावर त्या बापाने ते मूल तैलंगस्वामीना आणून दिले. त्यांनी मग चार लोकांकडून कपडे आणले, त्याला दूध पाजले.
ती मुलगी रोज येऊन मुलाला पाहून जायची. चार महिन्यांनी त्या मुलीने आपल्या बापाला त्या मुलाच्या खऱ्या बापाचे नाव सांगितलं.तो स्वामींकडे आला त्याने क्षमा मागितली आणि ते मूल परत घेतलं. ते म्हणाले " हरकत नाही ". हे फार कठीण आहे. मनासारखं झालं तरी हरकत नाही मनाविरुद्ध झालं तरी हरकत नाही. हे तितक्या समतेने म्हटलं पाहिजे. हे आपल्याला प्रत्येक गोष्टीत शिकता येईल. प्रपंच धड नाही हरकत नाही भगवंताचे स्मरण आहे ना. मग उत्तम .
म्हणून श्री.तुकाराम महाराज म्हणाले "भागा आले ते करितो | तुझे नाम उच्चारितो ||" ही जी दृष्टी आहे पाहण्याची ही दृष्टी येणं हे खरं अध्यात्माचे मर्म आहे.
भ्रमरा
रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥
चरणकमळदळू रे भ्रमरा । भोगीं तूं निश्चळु रे भ्रमरा ॥
सुमनसुगंधु रे भ्रमरा । परिमळु विद्गदु रे भ्रमरा ॥
सौभाग्यसुंदरू रे भ्रमरा । बाप रखुमादेविवरू रे भ्रमरा ॥
*एखादा खोडकर मुलगा असेल तर त्याला हे करू नको, ते करू नको असं सतत सांगावं लागतं. मग तो मुलगा म्हणतो, हे करू नको, ते करू नको, मग करू तरी* *काय? या मनरुपी भ्रमराची तीच अवस्था झाली आहे. क्रोधाकडे जाऊ नको, कामाकडे जाऊ नको, लोभाकडे जाऊ नको, मत्सराकडे जाऊ नको, मग जाऊ तरी कुठे? तर माऊली त्या भ्रमराला म्हणते, तु ज्या ५-६ ठिकाणी जातोस, ते गटार आहे, तिथे समाधानाचा सुगंध नसून विषयभोगाची दुर्गंधी आहे. तुला खरा सुगंध जे पूर्ण समाधानी आहेत त्या कमळात मिळेल!*
*माऊलींनी जसं भ्रमर म्हणजे* *मन म्हंटले आहे, तसे कमळ* *कुणाला म्हंटलं आहे? तर* *संतांना! या संतरूपी कमळाच्या चरणी गेल्यावरच मनरुपी भ्रमराला खरं निश्चल, अखंडीत समाधान भोगायला मिळेल!*
चरणकमळदळू रे भ्रमरा । भोगी तूं निश्चळू रे भ्रमरा ।।
*जसं भ्रमराची भ्रमंती कमळाच्या कुशीत गेल्यावर कायमची थांबते, त्याप्रमाणें संत सद्गुरूंच्या* *चरणरजाचा विषयी माणसाच्या मस्तकावर अभिषेक झाला की वासनेचं बीज जळून वासनेकडचं भ्रमण कायमचं थांबतं!*
सुमनसुगंधु रे भ्रमरा ।।
*सुमन म्हणजे फुल आणि सुमन म्हणजे चांगले मन! कमळाच्या सहवासानें भ्रमराला कमळाचा सुगंध लागतो, त्याचप्रमाणे संतांच्या सहवासानें साधकाला* *संतांचा भक्तीप्रेमाचा सुगंध लागतो. तो सुगंध, तो परिमल विद्गदु म्हणजे साधकाला सद्गदित करून परमानंदाचा अधिकारी बनवतो. मनाची ही अवस्था येण्यासाठीच माऊली म्हणते,*
सुमनसुगंधु रे भ्रमरा । परिमळु विद्गदु रे भ्रमरा ।।
*विद्गदु चा व्यावहारिक अर्थ आहे पसरवणे! जो भक्तीप्रेमाचा परिमळ मला संतरूपी कमळाच्या सहवासानें लाभला तो मी पसरवला पाहिजे!* श्रीमहाराजांचं* *"नाम सदा बोलावें, गावे भावे, जनांसि सांगावें" हे 'परिमळु विद्गदु'च्या समकक्ष वाटतं! मनरुपी भ्रमराने कमळाच्या सहवासात जाणें म्हणजे 'चरणकमळदळू रे भ्रमरा' म्हणजेच 'नाम सदा बोलावें'! कमळाच्या सहवासात राहून सुगंध घेणे म्हणजेच 'सुमनसुगंधु रे भ्रमरा' म्हणजेच"भावे गावे!"*
*मनरुपी भ्रमर जेंव्हा अंतर्बाह्य भक्तीप्रेमाचा सुगंध बनतो, तेंव्हा त्याचं भगवंताशी नातं बदलून*
*पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आम्हा नारायण तैशापरी ।। *असं होतं! संकलन आनंद पाटील*
नर्मदा परिक्रमा
*उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा, गुजरात*
*वासुदेव आश्रम, वासन*
काल चैत्र प्रतिपदा झाली व नर्मदा परिक्रमा क्षेत्राकडे धाव घेणाऱ्यांची संख्या अचानक कितीतरीपट वाढली.
चैत्र महिन्यात नर्मदेच्या उत्तरवाहिनी परिक्रमेचे महत्त्व आता नव्याने सांगण्याची गरज नाही.
ज्या भाविकांना नर्मदा परिक्रमा करायची आहे, पण नौकरीतून, व्यवसायातून तीन हजार किलोमीटर ची परिक्रमा करायला तीन ते चार महिने वेळ काढू शकत नाहीत. काही असेही भाविक असतात जे शारीरिक अक्षमतेने सलग इतके चालू शकत नाहीत व इतके दिवस घराबाहेर राहू शकत नाहीत. अशा भाविकांसाठी चैत्र महिन्यात होणारी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा म्हणजे एक पर्वणीच असते.
गुजरात च्या बडोद्या जवळ नर्मदा जिल्हा आहे. तिथे गरुडेश्वर जवळ (जिथे दत्तभक्त वासुदेवानंद सरस्वती - टेंब्ये स्वामी महाराज यांची समाधी आहे) रमपूरा या गावापासून पश्चिमवाहिनी असलेली नर्मदामैया उत्तर दिशेकडे वाहायला सुरूवात होते. तिथून दहा किलोमीटर समोर तिलकवाडा या गावापर्यंत ती उत्तर वाहिनी आहे.
स्कंदपुराणात उत्तरवाहिनी नर्मदेचे फार महत्त्व सांगितले आहे. चैत्र महिना म्हणजे नवसंवत्सर. या महिन्यात प्रत्यक्ष देवच याठिकाणी नर्मदा स्नानासाठी येत असतात. अगदी गंगा यमुना, सिंधू, सरस्वती, कावेरी, गोदावरी आदी तिर्थ नद्याही या उत्तरवाहिनी नर्मदेत स्नानाला येत असतात. त्यामुळे या चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदानदीला परिक्रमा (प्रदक्षिणा) केली की संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य मिळते, अशी मान्यता आहे. त्यामुळे चैत्र महिन्यात रमपूरा ते तिलकवाडा हा परिसर परिक्रमा करणाऱ्या भाविकांनी गजबजलेला असतो. रमपुरा व तिलकवाडा या दोन ठिकाणी नर्मदा मैय्याचे तट परिवर्तीत करायचे असते. तिथे नावाड्यांची सोय असते. एकूनण २१ किलोमीटर ची ही परिक्रमा आहे.
उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा व सध्या वासन या गावी आश्रम करून राहणारे स्वामी विष्णुगिरी, हे नावं एकमेकांचे पुरक आहेत.
पुर्वी तिलकवाडा वासुदेव कुटीर आश्रम येथून स्वामी विष्णुगिरी आपले सेवाकार्य चालवायचे. उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमे बद्दल दत्तभक्तांना व भाविक वर्गाला सांगायला स्वामी विष्णुगिरींनी सोशल मिडियाच्या वापरासहीत महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी प्रवास केलेत. २०१४ मध्ये केवळ ४०० जणांनी ही परिक्रमा केली होती. आता अमावस्यांत चैत्र महिन्यात सत्तर हजारावर लोक या महिन्यात परिक्रमा करून जातात. स्वामी विष्णुगिरी या परिक्रमावासींची राहण्याची व भोजनाची सोय निशुल्क करतात.
गेल्या दोन वर्षांपूर्वी विष्णुगिरी महाराजांनी तिलकवाड्याहून तीन किलोमीटरवर ' वासन' या गावी दिड एकर जागेत वासुदेव आश्रम बांधला आहे. तिथे त्यांनी परिक्रमावासींच्या सोईसाठी मोठे सभागृहही बांधले होते. आणखीही विकासकामं सुरू होते. पण गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने नर्मदेला आलेल्या अतीपुराने बरेच काही वाहून गेले होते. तरीही अगदी तीन चार महिन्यांतच स्वामीजींनी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमावासींची गैरसोय होऊ नये म्हणून भरभरं नवीन व्यवस्था उभारल्यात.
चार महिन्यांत येवढा मोठा आश्रम पुन्हा बांधून कार्यरत झाला???
अनेकांचे डोळे विस्फारले गेले....
पण
ईश्वरेच्छा, म्हणजेच लोक विश्वास व लोक सहभागातून हे सारे सहजच घडले आहे.
कालपासून उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा सुरू झाली व या परिक्रमे बद्दल विचारणा करायला माझे फोन वाजणे सुरू झाले. प्रत्येक फोनवर सतत तिच तिच माहिती देण्या ऐवजी लेख लिहिला तर तो शेअर होत होत ही माहिती नर्मदाभक्तांपर्यंत पोहचेल, म्हणून या लेखाचे प्रयोजन!
मराठी, हिंदी व गुजराती भाषा बोलणारे स्वामी विष्णुगिरी महाराज म्हणजे जिव्हाळ्याची प्रतिमुर्ती. मोठी नर्मदा परिक्रमा वा उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करणाऱ्या प्रत्येक परिक्रमावासीला याचा अनुभव येत असतो. त्यामुळे कुठलाही संभ्रम मनात न बाळगता आपण उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेला जाऊ शकता. रेल्वेचे मुख्य स्टेशन बडोदा आहे. तिथून शेअर टॅक्सीने वा बसने वासन या गावी पोहचता येते.
माझा स्वामी विष्णुगिरींशी नित्य संपर्क असतोच. त्यामुळे आश्रमाच्या सोशल मीडिया पोस्टस् सोबतच मला प्रत्यक्ष स्वामीजींकडूनही आश्रमाची एक एक वाटचाल माहिती असते. आपणासाठी ती पुढे देत आहे.
-----------------------------------------------------
यावर्षीची उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा चैत्र प्रतिपदा, गुढीपाडवा पासून सुरू झाली. वासन गावचा *वासुदेव आश्रम* सर्वांच्या व्यवस्थेसाठी जय्यत तयार आहे. वासन हे गाव तिलकवाडा ते गरुडेश्वर मार्गावर तिलकवाड्यापुढे तीन किलोमीटरवर आहे.
आपल्या सर्वांची आश्रमात राहायची व शास्त्रोक्त परिक्रमेची संपूर्ण सोय होईल, पण होणारी गर्दी बघता काही व्यवस्था लक्षात घ्यायला हवी.
१) आपण कितीजणं व कोणत्या दिवशी वासन आश्रमात जाणार, हे स्वामी विष्णुगिरींना अगोदरच कळवावे. यासाठी त्याकाळात सुरू राहणारा फोन नंबर 9913486135 हा आहे.
२) आपल्या दोनचाकी, चारचाकी वा बस या वाहनासाठी निःशुल्क पार्किंगची सोय आश्रमातर्फे आहे.
३) आपली आश्रमात राहण्याची व भोजनप्रसादाची सर्व सोय निःशुल्क आहे.
४) आपल्याला गरज असल्यास आश्रमातर्फे परिक्रमेसाठी मार्गदर्शक व्यक्ती सशुल्क उपलब्ध राहिल. जेष्ठ नागरिकांसाठी सशुल्क वाहन परिक्रमेची सोयही आहे.
५) संकल्प पुजेची व संकल्पपुर्ती पुजेची ब्राह्मणाची दक्षिणा तसेच तट परिवर्तन करतांना नावाड्याचे आर्थिक पारिश्रमिक आपणास द्यावे लागेल. याशिवाय आपणास आणखी कोणताही खर्च लागणार नाही.
६) आश्रमात होणारी गर्दी व तिचे व्यवस्थापन बघता स्वामी विष्णुगिरी आपणास चर्चेसाठी भरपूर वेळ देऊ शकतील अशी अपेक्षा आपण करू नये. स्वामीजी धावपळीत व्यस्त असतांना त्यांच्यासोबत सेल्फीचा अवास्तव आग्रह करू नये.
७) शक्यतोवर मौल्यवान वस्तू, महागडे कॅमेरे वा महागडे मोबाईल फोन सोबत आणूच नये.
८) आश्रमात आपण सेवा कार्यात सहभाग घ्यावा, हे प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक आहे. पण सर्वचजण सेवेत सहभागी होऊ शकतील असे नाही. त्यामुळे वर्षभरात इतरवेळी आश्रमात सेवेला व साधनेला आपण जाऊन राहू शकता.
९) आश्रमात बांधकाम व इतर सेवाकार्य सुरू आहेच. त्यात आपण आर्थिक देणगी देऊन सहभागी होऊ शकता.
टिप : आश्रमातील नियमांचे तंतोतंत पालन करून आश्रमाचे पावित्र्य जपणे अत्यंत आवश्यक आहे.
आपण वासन आश्रमाशी संपर्क करूनच परिक्रमेला जावे.
किशोर पौनीकर नर्मदापुरकर, नागपूर
फोन : 9850352424
राष्ट्रीय दिनांक : सौर चैत्र २१, शके १९४६.
तिथी : चैत्र शुद्ध द्वितीया शके १९४६
Sunday, August 25, 2024
संतसहवास
*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*
*🚩श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर🚩*
*साधनांनी जे साधत नाही ते संतसहवासाने साधते .*
अवतारी संत आणि इतर संत यांच्यामध्ये फरक असतो. अवतारी संत हे ज्ञानेश्वर महाराजांसारखे किंवा समर्थांसारखे असतात. ते आपण होऊन येतात, आणि आपले काम झाले की जातात; मग ते राहात नाहीत. संतांनी जगातील राज्ये मिळविली नाहीत. पण त्यांनी स्वतःवर राज्य केले. चमत्कार करणे हे संतलक्षण नव्हे. चमत्कार सहजगत्या होतील तर होवोत, चमत्कार दाखवावा म्हणून संत चमत्कार करीत नाहीत. संतांची निंदा किंवा अपमान करू नये. त्यांची परीक्षाही पाहू नये. कोणाचेही वाईट चिंतू नये. दुसर्याचे हित करावे, हितच चिंतावे. उत्तम हित नामावाचून अन्य कशातही नाही. म्हणून अखंड भगवन्नाम जपणे ही संतसंगतच आहे. सद्विचार ही एक सत्संगतच आहे. ध्यान, स्मरण, मनन आणि सद्ग्रंथवाचन यांमुळे संतांची गाठ पडून त्यांच्याशी समागम होणे शक्य होईल.
संतसमागमात राहून विषय मागणे हे समागमाचे रहस्य नाही. एकुलत्या एका मुलाने अफूच्या गोळीसाठी हट्ट धरला, तर आई त्याला ती गोळी देईल का ? जर तिने ती दिली, तर ती खरी आईच नव्हे. त्याप्रमाणे, जो विषयाचे प्रेम देईल तो खरा संत नव्हे. संताला विषयाचे प्रेम असत नाही. इतकेच नव्हे, तर त्याचा माणूस विषयात राहिला तर त्याच्या हृदयाला पीळ पडतो. कुत्रा हाड चघळीत असताना आपल्याच तोंडातले रक्त पिऊन, ते त्या हाडातून येते आहे असे समजतो आणि शेवटी त्यातच मरतो. हे पाहून जितके वाईट वाटेल त्याच्या दसपट, नव्हे अनेकपट, आपण विषयमग्न असलेले पाहून संतांना वाईट वाटते.
संतांनी खरे भगवंताला जाणले. जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते. साधनांनी जे साधत नाही ते संताच्या सहवासात राहिल्याने साधते. मनुष्य जितका निःस्वार्थी तितकी त्याची भाषा व्यापक असते. तुमच्याआमच्या घरातले लोकसुद्धा आपले ऐकत नाहीत, पण संतांची वाणी सर्व जगावर परिणाम करते, कारण ती सर्वव्यापक असते. ती अत्यंत तळमळीची असते. याच अर्थाने श्रुती सनातन आहे. जगाचे कल्याण व्हावे म्हणून ऋषी बोलले, म्हणून त्या वाणीने जगाचे कल्याण व्हायचेच, आणि जगाचे कल्याण व्हावे असे वाटते तोपर्यंत ती वाणी राहायचीच. आहे त्यात समाधान मानणे, कोणाचाही द्वेष मत्सर न करणे, सर्व भगवद्रूप मानणे, निरभिमान राहणे, सदोदित भगवन्नामस्मरण करणे, आणि संत, सज्जन, सद्गुरू यांच्याविषयी पूज्यभाव ठेवणे, या गोष्टी आचरणात आणणे, हाच परमार्थ. यांत कोणती गोष्ट अवघड किंवा खर्चाची आहे ? आम्ही निश्चयाने ती करीतच नाही म्हणून समाधान येत नाही. या गोष्टींप्रमाणे आचरण ठेवले तर समाधान येईलच.
*१०२ . प्रपंचात कसे वागावे हे संत शिकवितात आणि वागून दाखवितात .*
*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*
Saturday, August 24, 2024
सत्संग
*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*🌺🙏नामप्रभात 🙏🌺*
*साधनकाळात साधकाला चढउतार अनुभवायला मिळतात. साधनेत प्रगती होण्याची कारणे म्हणजे *सत्संग, विवेक, शरणागती, सावधानता आणि गुरूकृपा* *ही आहेत. ज्यादिवशी थोडा सत्संग लाभला, विवेक जागृत झाला आणि त्यायोगे शरणागत भाव आला, त्यादिवशी* *नामस्मरण कसं छान होतं!*
*परंतु, साधनेत अधोगती आणणारी कारणे म्हणजे *विषयभोग, निद्रा, हास्य, जगतप्रिती, बडबड* *ही *आहेत.* *ज्यादिवशी खाणे, विषयीवृत्ती मजबुत करणारे कार्यक्रम, अतीनिद्रा, वायफळ हास्यविनोद, वस्तु, पदार्थ यांची आसक्ती आणि व्यर्थ बडबड किंवा चर्चा जास्त झाली त्यादिवशी साधनेला बसलो तरी *मुखामध्ये नाम राहिना । नामस्मरणीं चित्त रमेना ।।* *अशी दुरावस्था साधकाला कासावीस करते.*
*जो विषयात रमलेला आहे, त्याला कली फारसा त्रास देत नाही.* *परंतु, तोच मनुष्य साधनेला लागला तर कली त्याला खाली खेचण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो. या कलीप्रयत्नाचा एक भाग म्हणजे वरील पाच बाधक गोष्टी. अशावेळी साधकाने सावध होऊन सत्संगतीचा आधार* *घ्यावा. ही सत्संगती संतांची असु शकते, सज्जनाची असु शकते, सद्ग्रंथाची असु शकते किंवा सद्विचाराची असु शकते. वाढता* *कलीप्रभाव निष्प्रभ करून परमसुखाची साधना प्रभावी करण्यासाठीच समर्थांनी अत्यंत सुक्ष्म बोध केला की,*
*सदा संगती सज्जनाची धरावी!*
*||श्रीराम जय राम जय जय राम||*
Friday, August 23, 2024
समीकरण
श्रीराम,
परमार्थात एक समीकरण आहे. देह म्हणजे दुःख आणि आत्मा म्हणजे आनंद. मी म्हणजे देह असे म्हटले की दुःख अपरिहार्यपणे येतेच. तर मी म्हणजे आत्मा असे म्हटले असता आनंदाची प्राप्ती होते. कारण हे एकमेकांना सोडून कधीच रहात नाही. कोणताही आजार हा देहाला होतो.. आणि आजार झाला की दुःख होतेच. पण मी म्हणजे आत्मा अशी आत्मबुद्धी दृढ केली की देहाच्या आजाराचे दुःख होत नाही. उदा - : एखादा पदार्थ तिखट झाला असेल तर आपण म्हणतो.. पदार्थ खूप तिखट आहे, मी खाऊ शकत नाही. पण जीभेला तिखट लागत आहे. मला नाही.
थोडक्यात मी देह आहे ही धारणा जेवढी दृढ असेल तेवढे आध्यात्मिक ताप जास्त होतात म्हणून "देह दुःख ते सुख मानीत जावे" असे समर्थ सांगतात.
आधिभौतिक ताप कमी होण्यासाठी जग मिथ्या आहे ही धारणा दृढ करावयास हवी. आधिदैविक तापातून सुटण्यासाठी माणसांनी नीतीने, परोपकारी वृत्तीने वागावे असा सल्ला समर्थ देतात.
भक्तीमार्गात त्रिविध ताप कमी होत नाहीत तर 'मी म्हणजे आत्मा' अशा आत्मबुद्धीने आणि ईश्वर शरणागतीने या तापांच्या मुळे जीवाला जो त्रास होतो तो त्रास किंवा त्याचे दुःख कमी होते असे संत सांगतात.
||श्रीराम ||
उपासना
||श्री राम समर्थ||
*कहाणी श्री ब्रह्मचैतन्याची*
||श्री गणेशाय नम:ll
ऐका श्री सद्गुरुनाथा तुमची कहाणी आटपाट नगर होते, कुठे होते हे नगर?
सातारा जिल्हा, तालुका माण, माण गंगेच्या तीरावर गोंदवले हे गाव. गोंदवले गावात वशिष्ठ गोत्री, शुक्ल यजुर्वेदी, देशस्थ ब्राह्मण रहात असे रावजी आणि सौ. गिताबाई कुलकर्णी त्यांच नाव. रावजी व गीताबाईंच्या पोटी एक अलौकिक बाळ जन्मले. गणपती त्यांचे नाव. प्रेमाने सर्व गणूबुवा म्हणत. गणपतीला रामाची नामाची व ध्यानाची आवड.
वयाचे बारावे वर्षी गणपती गुरुच्या शोधात निघाला. मराठवाड्यातील येहेळगांवी श्री तुकामाईशी त्यांची भेट झाली.
येहळगांवी येऊन गणूबुवांना नऊ महिने झाले होते. या काळात त्यांना गोंदवल्याची वा आपल्या माता पित्याची आठवण झाली नाही. गुरूंच्या अखंड सेवेत ते स्वतःचे भान विसरले. त्यांच्या मनाचे व्यापार स्तब्ध झाले. भूक, तहान, झोप वगैरे देह धर्म सुटले. अंतकरण पूर्ण निर्वासन झाले. खऱ्या चित्तशुद्धीचे तेज त्यांच्या शरीरावर झळकू लागले.
रामनवमीच्या दिवशी भर उन्हात दोघे गुरुशिष्य रानात गेले. एका शेतात विहिरीवर दोघांनी स्नाने केली. एका अशोका वृक्षाखाली तुकामाईंनी गणूबुवांना हात धरून आपल्यासमोर बसवले आणि बोलले, "मी तुला आज पर्यंत फार कष्ट दिले. पण पूर्वी
वशिष्टांनी रामचंद्र ला जे दिले ते मी तुला आज या क्षणी देतो" असे सांगून त्यांनी गणूबुवांच्या डोक्यावर हात ठेवला गणूबुवांना तात्काळ समाधी लागली. काही वेळानंतर जेव्हा समाधी उतरली तेंव्हा तुकामाईंनी त्यांचे " ब्रह्मचैतन्य " असे नाव ठेवले आणि अत्यंत प्रेमाने आलिंगन दिले.
"श्री राम जय राम जय जय राम" हा त्र्ययोदशाक्षरी मंत्र जपून राम उपासना करावी असे सांगून तुकामाईंनी श्री महाराजांना रामदासी दीक्षा दिली व अनुग्रह देण्याचा अधिकार दिला.
"प्रापंचिक लोकांना, विशेषतः मध्यम स्थितीतील लोकांना आपल्या प्रपंचामध्ये परमार्थ कसा करायचा हे शिकव. राम मंदिराची स्थापना करून राम नामाचा प्रसार कर. माझे महत्त्व वाढविण्यापेक्षा श्री समर्थांचे महत्व वाढव. लोकांमध्ये भजनाचे प्रेम उत्पन्न होईल असा मार्ग दाखव. जे खरे दिन असतील त्यांची सेवा कर आणि सर्व ठिकाणी प्रेम वाढेल असा उपाय कर "
इतक्या गोष्टी श्री महाराजांना तुकामाईंनी करण्यास सांगितल्या, यावेळी, सूर्य बरोबर डोक्यावर आला होता.
श्री महाराजांनी अनेक ठिकाणी रामाची मंदिरे स्थापिली. गोंदावले ग्रामी रामाचे मंदीर बांधले व रामनामाचा प्रसार केला.
नीतीमत्तेने वागावे, परनिंदा, परधन विष्ठेसमान मानावे. परनारी मातेसमान मानावी. यथाशक्ती अन्नदान करावे. अहोरात्र रामनाम स्मरण करावे. सतत अनुसंधान ठेवावे जगाची आज सोडावी. सद्गुरुला अनन्यभावे शरण जावे. हा उपदेश तुकामाईंनी केला.
गोंदवलेग्रामी श्री महाराजांनी रामनामाचा, अन्नदानाचा मोठा हाट भरवला तो आजही अव्याहतपणे चालू आहे.
*आयुष्याचा भरवसा नाही म्हणून राम नामाचा वसा घ्यावा -* हा वसा कधी घ्यावा? आयुष्याच्या सुरुवातीस घ्यावा. हा वसा कसा घ्यावा? गोंदावलेग्रामी जावे. सद्गुरूंना अनन्यभावे शरण जावे, मस्तकाचे श्रीफळ अर्पावे, बाहूंचा हार घालावा. मनाची सुमने व्हावीत. हृदयाचे सिंहासन करावे त्यावर सद्गुरूंना बसवावे. काम, क्रोधाचा धुप लावावा. प्रेमाची ज्योत जागवावी. स्नेहाचे तूप घालावे. 'मी' पणाचा कापूर जाळावा. सर्वस्वाचा नैवेद्य दाखवावा, राम नामाचा प्रसाद घ्यावा, तुळशी माळहाती घ्यावी, अखंड राम नामाचा जप करावा.
*ह्याने काय होते?* देह शुद्धी होते. चित्त शुद्धी होते, काम थकून जातो, क्रोध क्षीण होतो, लोह, विरून जातात, मी कोण हे कळते, जीवनाचा अर्थ कळतो, आत्मारामाचे दर्शन होते.
आवडीने, तळमळीने व प्रेमाने
घेतलेल्या कोटीच्या कोटी राम नामाने व सद्गुरु कृपेने ही प्रचिती येते.
*ही उपासना कधी करावी?*
ब्राह्म मुहूर्ती उठावे, अंतरबाह्य शुचिर्भूत व्हावे, अनन्यतेने, प्रेमाने स्नेहाने सद्गुरुंची शोडषोपचारे मानस पूजा करावी. सद्गुरूंना साष्टांग नमस्कार करावा, षडरिपू त्यांचे चरणी अर्पण करावे, मूर्ती हृदयी साठवावी, नामस्मरण करावे.
उतू नये, मातू नये घेतला वसा टाकू नये. हा वसा जन्मोजन्मी चालवावा.
*मोक्षप्राप्तीने या व्रताची परिपूर्णता होते.*
जसे ब्रह्मानंद महाराज, तात्यासाहेब केतकर, कुर्तकोटी, आनंद सागर रामानंद महाराज, प्रल्हाद महाराज यांना सद्गुरू कृपा झाली तशी तुम्हा आम्हा होवो, ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
|| सद्गुरु महाराज की जय ||
श्री. प्रकाश जोशी,
Thursday, August 22, 2024
तरंग
योगवासिष्ठात एक सुंदर कल्पना आहे. समुद्रात एकसारखे तरंग येतात, लाटा येतात. त्या तरंगामध्ये काटक्या, लाकडाचे तुकडे असतात. काही वेळा त्या काटक्या लाटे बरोबर एकत्र येतात आणि दुसरी लाट आली की पुन्हा त्या वेगळ्या होतात. जशा लाटे मुळे काटक्या एकत्र होतात व दुसऱ्या लाटे बरोबर वेगळ्या होतात तसंच माणसांच पण एकात्रपणा असतो. कधीतरी माणसं एकत्र येतात आणि कधी ती वेगळं होतात ते कळत नाही. असं का याचे उत्तर नाही. एक जर असेल तर प्रपंचात आपल्या इच्छा तृप्त होत नाहीत. नवीन इच्छा निर्माण होतात. त्यातून कटकट निर्माण होते. जर साधक स्थितप्रज्ञ असेल, म्हणजे असं असलं तरी ठिक तसं असलं तरी ठिक या पद्धतीने जो मनातील वासना सोडतो तो साधक. याला स्वीकार म्हणतात. भक्तराज काय म्हणतो " तू ठेवशील तसा, तुझ्या इच्छेने मी राहीन." यालाच पू.श्री.स्वामी रामतीर्थ म्हणतात " या युं भी वाहवा हैं और वो भी वाहवा है." हे अत्यंत कठीण आहे. दुःखाचे मूळ तिथे आहे की माझ्या मनासारखं व्हावे. मग माझ्या मनातील इच्छा जात नाही. त्याला पर्याय प्रार्थना श्री.महाराजांना , सद्गुरूंना म्हणावे " माझ्या मनात (इच्छा) असे आहे , आपण हे करा, पण आपल्या मनात नसेल तर करू नका. कारण माझ्या मनातलं जे आहे ते माझ्या हिताचे होईल हे मला माहीत नाही. पण हे मला आपणांस सांगितल्या शिवाय राहवत नाही म्हणून सांगतो." याचाच अर्थ नामस्मरण आहे.
Wednesday, August 21, 2024
जाळ
पु.श्री.कृष्णमूर्ती म्हणतात "आपलं जीवन म्हणजे संबंधांच जाळ आहे." म्हणजे काय तर हा माझा मालक, हा नोकर, ही माता, ही पत्नी असं सगळं माझं आहे. संतांचं म्हणणे काय आहे की "तुम्ही मी काय आहे हे समजण्याचा प्रयत्न करू नका. पण हे ममत्व काढा, नाहीस करा." हे माझं हे माझं म्हणून सगळं उपाधीयुक्त आहे. आपल्या जिभेवर गोड चव ओळखणाऱ्या पेशी असतात, त्या पदार्थांची चव ओळखतात, परंतु आपण अन्न खाताना त्या पेशी काम करतात त्यांच्याकडे लक्ष दिले नाही तर किंवा मी काय खाल्लं यांचं भानच नसलं तर काय होईल ? हा जो संतांचा विचार आहे तो आपल्याला पटतच नाही. तो डोक्यावरून जातो. हे काय आहे तर माझा देह हे सगळं करतो आहे यात माझं अस काय आहे ? जो देहच माझं नाही तर मी त्यावर किती विसंबून आहे? तर हे माझं माझं नाहीस करायला पाहिजे. ते कसं नाहीसे करावे याला गोपींच उदा.आहे. हे माझं माझं करण्याच्या मागे मूळ काय असेल तर हा मी आहे. या मी ला कोणाला देऊन टाकला तर. गोपी भगवंताला काय म्हणाल्या "आम्ही तुझ्या निःशुल्क दासी आहोत " म्हणजे मी माझी नाहीच मी तुझी आहे. असं म्हटल्यावर माझं जे आहे ते सर्व तुझंच आहे हा परमार्थ.
गोंधळ
*सहज बोलणे हितोपदेश*
*वाचन - गोंधळ*
*श्रीमहाराज निरूपणास बसले म्हणजे एक वयस्कर माणूस तेथे ऐकायला येऊन बसे. असे काही दिवस झाल्यावर त्या इसमाने श्रीना आपल्या घरी नेले व आपल्या ग्रंथसंग्रहातील विविध आध्यात्मिक विषयांवरील पुस्तके व विषय आणि लेखकांप्रमाणे त्याची वर्गवारी केलेल्या वह्या दाखविल्या. त्यावर श्री म्हणाले, “तुमचा हा व्यासंग फार चांगला आहे.*
*पण मला एक शंका आहे, तुमच्या विविध पुस्तकांत पुष्कळ परस्पर विरोधी मते असलेली पुस्तके* *आहेत. त्यातून तुमचे स्वतःचे असे निश्चित काय मत झाले ?" त्यावर तो गृहस्थ गोंधळला व म्हणाला, “महाराज, ज्यावेळी ज्याचे पुस्तक वाचावे त्यावेळी ते खरे वाटते परंतु मागाहून याउलट दुसरे कोणाचे वाचले तर तेही खरे वाटते. त्यामुळे खरं म्हणजे माझाच गोंधळ झाला आहे, त्याला काय करावे?" त्यावर श्रींनी त्यांचे वय विचारले, तेव्हा*
*ने ७५ वर्षाचे असल्याचे त्यांनी* *सांगितले त्यावर श्री म्हणाले, “सर्व पुस्तके वाचून तुम्ही फक्त गोंधळ पदरात पाडून घेतला.* *आता हा गोंधळ जाऊन तुमचे निश्चित मत केव्हा होणार? व मग हातून कृती केव्हा घडणार? मग एवढी पुस्तके वाचून तुमच्या पदरात काय पडले ? माझे एक बरे आहे, मी पुस्तके न वाचल्याने माझा गोंधळ तरी झालेला नाही. माझ्या गुरूने मला दिलेले नाम मी घट्ट धरून ठेवल्याने माझे कल्याण झाले आहे*
*व मी आनंदात आहे." त्या गृहस्थाचे ६ महिन्यांनी निधन झाल्याचे कळल्याने श्रींना वाईट वाटले. श्री म्हणाले, “शहाण्या माणसाने फार वाचून गोंधळात पडू नये. गुरूंना शरण जाऊन त्यांनी दिलेले नाम श्रद्धेने घेत राहावे हाच समाधानाचा मार्ग आहे."*
*"परस्पर विरोधी वाचन हेच* *असमाधानाचे कारण"*
*निःशंक होउनि गुरुवरी ठेवावा विश्वास l*
*नित्यनेमी घ्यावा नामाचा श्वास ll*
*जय जय रघुवीर समर्थ:संकलन आनंद पाटील*
Tuesday, August 20, 2024
विनोद
*आजचा विनोद!*
*सरकारी कर्मचाऱ्यांनी जरूर वाचा...*
😃
राम-रावण यांच्या युद्धात, हनुमानजींनी संजीवनी बुटी आणण्यासाठी केलेल्या प्रवासाचे *TA बिल* (Travelling Allowance) सादर केले आणि ते अयोध्या प्रशासनाला सादर केले.
*परंतु तेथील लेखापरीक्षकाने ३ आक्षेप नोंदवले...*
१. हनुमानजींनी त्यावेळच्या अयोध्यातील राजाकडून (भरत) प्रवासासाठी पूर्व परवानगी घेतली नव्हती.
२. हनुमानजी हे ग्रेड २ चे अधिकारी असल्याने त्यांना विमानाने प्रवास करण्याची परवानगी नव्हती.
३. त्यांना फक्त संजीवनी बुटी आणायला सांगितले होते, पण त्यांनी संपूर्ण डोंगर वाहून नेला आणि आणखी जास्तीचे सामान घेऊन प्रवास केला.
त्यामुळे *ऑडिटरने बिल परत केले!*
राजा *राम* काहीही करू शकले नाहीत आणि बिल पुन्हा तपासणीसाठी चिन्हांकित केले गेले...
चिंताग्रस्त हनुमानजी "आता काय करावे?"
या विचारात पडले आणि थेट ऑडिटरकडे पोहोचले आणि TA बिलाच्या २०% ऑफर केली.
*आता लेखापरीक्षकाने पुन्हा तपासणी करून आक्षेप काढून टाकला...*
१. त्यावेळी राम हे आपल्या पादुकाद्वारे राजा होते, म्हणून त्यांच्या परवानगीने ही यात्रा झाली.
३. लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी ग्रेड २ च्या अधिकाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत विमानाने प्रवास करण्याची परवानगी आहे.
३. जर चुकीची संजीवनी बुटी आली असती, तर पुन्हा प्रवास करण्यासाठी जास्त खर्च आला असता..
म्हणून *बिल पास* केले जात आहे, ज्यामुळे अधिकचा खर्च वाचला आहे.
ऑडिट विभागाचा विजय असो !...
🙆🏻♂️😃
Monday, August 19, 2024
*कशास मागू
🌹
क्षणो क्षणी तो देतो मजला हृदया मधुनी श्वास नवे..
*कशास मागू देवाला,*
*मज हेच हवे अन् तेच हवे?*
क्षितिजावरती तेज रवीचे
रोज ओततो प्राण नवे..
उजळविती बघ यामिनीस
त्या नक्षत्रांचे लक्ष दिवे....
निळ्या नभावर रांगोळीसम
उडती चंचल पक्षी-थवे....
*कशास मागू देवाला, मज हेच हवे अन् तेच हवे?*
वेलींवरती फुलें उमलती
रोज लेऊनी रंग नवे...
वृक्ष बहरती, फळे लगडती
गंध घेउनी नवे नवे...
हरिततृणांच्या गालिच्यावर दवबिंदूंचे हास्य नवे...
**कशास मागू देवाला,*
*मज हेच हवे अन् तेच हवे?*
प्रसन्न होऊनी निद्रा देवी
स्वप्न रंगवी नवे नवे
डोळ्यांमधली जाग देत असे
नव दिवसाचे भान नवे
अमृत भरल्या जीवनातले
मनी उगवती भाव नवे
*कशास मागू देवाला, मज हेच हवे अन् तेच हवे?*
कोण आप्त तर कोणी परका
उगा निरर्थक मन धावे..
सखा जिवाचा तोच, हरी रे,
नाम तयाचे नित घ्यावे...
*नको अपेक्षा,नकोच चिंता, स्वानंदाचे सूत्र नवे...*
*कशास मागू देवाला,*
*मज हेच हवे अन् तेच हवे?*
🙏
Sunday, August 18, 2024
गुरुकृपेचा दीप
*गुरुकृपेचा दीप*
(*सहज बोलणे हितोपदेश:* संकलन आनंद पाटील)
*इंदूरच्या भैय्यासाहेब मोडकांमुळे श्रीब्रह्मानंदांना श्रींचा लाभ झाला. म्हणून ब्रह्मानंदांचे त्यांच्यावर विशेष प्रेम होते. १९१७ साली भैय्यासाहेबांनामोठ्या आग्रहाने ब्रह्मानंदांनी रामनवमीसाठी इंदूरहून बेलधडीला मुद्दाम बोलावून घेतले. भैय्यासाहेबांना स्वतंत्र खोली राहण्यास दिली. एक महिना*
*भैय्यासाहेब तेथे राहिले. संध्याकाळी ब्रह्मानंद* *भैय्यासाहेबांच्या खोलीवर जायचे व तंबाखू खायचे. एके दिवशी ब्रह्मानंदांना येण्यास उशीर झाला. आल्याबरोबर भैय्यासाहेबांनी त्यांना आलिंगन दिले व केविलवाणेपणाने म्हणाले,*
*तुम्ही महाराजांकडे आमच्या मागून आलात पण आपले काम करून घेतलेत, आम्ही मात्र तसेच राहिलो.” हे ऐकून ब्रह्मानंद* *म्हणाले, “आधी तंबाखू काढा.” अंधार झाल्याने भैय्यासाहेब चंची शोधू लागले. चंची कोनाड्यात* *काही सापडेना. इतक्यात कोणीतरी खोलीत कंदिल* *आणला. एका कोनाड्यात ठेवलेली चंची लगेच सापडली. श्रीब्रह्मानंद म्हणाले,* *“भैय्यासाहेब, हे बघा तुम्हीच ठेवलेली चंची तुम्हाला सापडली नाही, पण दिवा आल्याबरोबर लगेच सापडली. परमार्थात अगदी तसेच आहे. गुरुकृपा झाली की आपले आपल्याला*
*आपल्यापाशीच सापडते. तुम्ही काळजी करू नका. महाराज तुमच्यावर कृपा करतील." भैय्यासाहेबांचा जीव शांत झाला*.
Saturday, August 17, 2024
ज्ञानविज्ञानयोग
*॥श्रीहरिः॥*
श्रीभगवंत म्हणतात,
सामान्य मनुष्य मात्र मोहमायेमुळे मोहित होतो आणि दुःखाला प्राप्त होतो मात्र जे ज्ञानी, पुण्यशील असतात ते या मोहमायेतून मुक्त होतात आणि माझीच भक्ति करतात.
॥ॐ श्री परमात्मने नमः ॥
अथश्रीमद्भगवद्गीता सप्तमोध्यायः
*येषां त्वन्तगतं पापं*
*जनानां पुण्यकर्मणाम् ।*
*ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता*
*भजन्ते मां दृढव्रताः ॥*
*॥७.२८॥*
(दैनंदिन श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञानयोग ७.२८)
*भावार्थ:- ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्य कर्म केली आहेत, ज्यांची पापकर्म पूर्णपणे नष्ट झाली आहेत, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढनिश्चयाने माझ्या सेवेतच युक्त होतात.*
'ज्या सत्कर्माचरणी लोकांचं (अज्ञानरूपी) पाप संपलं आहे ते द्वन्द्वांच्या मोहातून मुक्त होऊन दृढव्रतानं माझीच भक्ती करतात.'
*मनुष्य* जोपर्यंत श्रवण, सेवा, भक्ती या त्रिकोणामध्ये राहतो, तोपर्यंत कामना आणि वासना त्याच्यावर आरूढ होत नाहीत. तो आपल्या इंद्रियांचा मालक असतो, गुलाम नाही. परंतु या त्रिकोणाच्या बाहेर जाताच इंद्रियं, मायावी आकर्षणं आणि कामना त्याला आपल्या जाळ्यात गुरफटून टाकतात.
त्यामुळे मनुष्यामध्ये कधी द्वेषाचे तर कधी सुडाचे विचार येत राहतात. मात्र यात त्याचा मौल्यवान वेळ वाया जातो. कारण मनुष्याच्या इच्छांना अंतच नसतो, मग ईश्वराची प्राप्ती घडणार कशी?
*मी-माझं, सुख-दुःखं, यश-अपयश, शीत-उष्ण* अशा प्रकारच्या द्वन्द्वंमोहामुळे मोहित होऊन जीव या जगामधे उत्पन्न होतात. त्रिगुणात्मक प्रकृती जीवांना खेळवते. त्यामुळे मी कोण आहे ते जीव जाणत नाहीत.
*परंतु,*
जे पुण्यशील चित्तशुद्धीकारक अशी पुण्यकर्मं करतात त्यांना हा त्रिगुणप्रेरित द्वंद्वमोह मोहित करीत नाही. मोह उत्पन्न करणारं पाप चित्तशुद्धीमुळे नाहीसं होतं.
*पुण्यवान* श्रेष्ठ पुरुषांना परमतत्त्वाचं खरं ज्ञान होतं. दृढज्ञाननिष्ठ झालेले असे फक्त परम ईश्वरालाच भजतात. त्याचीच भक्ती करतात. अशा चित्तशुद्धीसाठी आवश्यक अशी पुण्यकर्मं कोणती असा प्रश्न सामान्य जनांना पडतो.
*जप, तप, व्रत, वैकल्य*
यांनी चित्तशुद्धी होऊ शकते. पण ते करताना आपलं मनच त्यात नसेल आणि ती नुसतीच कृती होत असेल तर चित्तशुद्धी होऊ शकते का याचा विचार केला पाहिजे.
*चित्तशुद्धीसाठी* कर्मकांड करताना देवासाठी जी फळं आणायची ती सडकी फळं! स्वस्तात एका ताटलीत मिळणारी! त्यात कोणताही भाव नाही; विचार नाही. आपण देवासंदर्भात केवढी अक्षम्य गोष्ट करतो आहोत याचंही भान नाही.
*एकीकडे* लोकांना लुटायचं, काळे धंदे करायचे, अधार्मिक कृत्यं करून फसवणूक करायची आणि दुसरीकडे भागवत सप्ताह साजरा करायचा! देव बघत नाही, तो तर आकाशत आहे; त्याला काय कळणार,अशी समज मनुष्याला पापी बनवू शकते. पण अशा पाप्याला काय माहीत,तो हृदयात बसून साऱ्या नोंदी करीत आहे ते!
*एक कवी म्हणतो,*
‘जप करिता झिजले मणि,
कथा ऐकता फुटले कान,
तरी न होई ब्रह्मज्ञान ।'
'दगड पाहता वाही फूल,
तुलसी पाहता तोडी पान,
नदी पाहता करी स्नान,
तरी न होई ब्रह्मज्ञान ।।'
*सामान्य अविचारी भक्तांची अशीच अवस्था असते.*
*मात्र*
*"ज्ञानमार्गी"* आपली विहित कर्मं परमेश्वराला अर्पण करून करतो. तो कोणाचंही कधी वाईट चिंतित नाही. तो आपल्या कामातच देव पाहतो.
मिळालेलं धन, अन्न, वस्त्र या गोष्टी परमेश्वराचा प्रसाद म्हणून तो घेतो. त्याचप्रमाणे परमेश्वर हा सर्व प्राणिमात्रांमध्ये वास करून आहे; तो आणि मी दोन नाही हेही तो जाणून असतो; आणि अशातऱ्हेनं परमेश्वराचं सत्स्वरूप जाणल्यामुळे त्याचं पाप नाहीसं होतं. असा हा पुण्यकर्मी मनुष्य दृढव्रत होतो.
*तो* अन्य देवदेवतांच्या भजनी लागत नाही. तो फक्त परब्रह्माचीच पूजा करतो.संकुचित वृत्ती ही पापाला कारण ठरते.म्हणून आपला दृष्टिकोन विशाल बनवला पाहिजे.स्वत:पुरतं बघण्याची संकुचित वृत्ती जाऊन जेव्हा विश्वाकडे बघण्याची व्यापक दृष्टी येते तेव्हा माणसाचं अज्ञानरूपी पाप नाहीसं होतं.
*विश्वाकडे* बघणं म्हणजे त्या विश्वंभराला जाणून त्याच्या इच्छेनं त्याच्या कर्माशी साधर्म्य राखणारं विश्व-कल्याणाकरता निष्कामकर्म करणं असा याचा व्यापक अर्थ आहे. राष्ट्रउभारणीसाठी निष्काम वृत्तीनं हातभार लावणं हे सुद्धा ईश्वरी कार्य ठरू शकतं.
*थोडक्यात,*
ईश्वराविषयीची समज आणि आपल्या जन्माचा हेतू ध्यानात आल्यानंतर व्यक्तीची चित्तशुद्धी होऊ लागते. हळुहळू ती विकसित होते.
विकसित झाल्यावर चित्तातले विकार आपोआप निघून जातात; आणि विकार गेले की भगवंत प्रतीत व्हायला लागतो.
*सारांश:*
*संकुचित वृत्तीमुळे पाप निर्माण होतं, ते वाढत जातं. पाप नाहीसं करण्याकरता आपण आपला दृष्टिकोन विशाल बनवला पाहिजे. निष्कामतेनं चित्तशुद्धी होते. त्यानंतर ज्ञान होतं. विकास झाला की विकार निघून जातात. विकार नाहीसे झाले की भगवंताची खरी ओळख होत.
श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीता भाष्य.
संपूर्ण भगवद्गीता - सरश्री
*।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।*
Friday, August 16, 2024
रामरंगी रंगले
*मन हो रामरंगी रंगले*
संकलन आनंद पाटील
*भक्तीभावाने आपल्या मनाचं पात्र पूर्ण भरलेलं असेल तर*
*समाधानाचं तीर्थ नित्य सेवन करायला मिळेल. आनंद,* *समाधान, शांती बाहेरून नाही मिळत. ती आपण आपली* *मिळवायची असते. एकदा का शांतीचा झरा झुळझुळू लागला की जे मिळवायचं ते मिळालंय याची जाणीव होऊ लागते, जीवन* *दृष्टी बदलते, समोरच्या माणसाठाई असलेले दोष* *दिसण्याऐवजी असलेला एखादा गुण मात्र दिसू लागतो. आनंदाचा झरा झुळझुळ करू लागला की रामप्रती, नामाप्रती, भगवंताप्रती भक्तीभाव अधिक दृढ होऊ लागतो. नामापरते*
*सत्य नाही रे अन्यथा !!*
*भक्ती म्हणजे भगवंताचं* *श्रद्धेनं घेतलेलं नाम. भगवंत* *नामस्वरूप आहे. त्याच्या* *नामाला चिकटून राहिलं की वाट्याला येणाऱ्या अडचणी,* *त्रास, विपरीत प्रसंग, अनुभव यामध्येही एक वेगळं बळ,* *शक्ती मिळते.आपलं काम, कर्तव्य आपण याही परिस्थितीत, आहे त्या मार्गाने चालू ठेवले, तर पुढे काय होईल ते होऊ दे, मी माझ्या कामात, कर्तव्यात कसूर केली नाही ही भावना मनाला शांती व समाधान देणारी असते.. मग कोणी म्हणोत, न म्हणोत,
आपलं करत राहणं आपसूक होऊ लागतं, फार ओढाताण न होता. हा श्रद्धायुक्त भक्तिचा परिणाम. आताच्या सहज भाषेत, ‘व्यथा असो आनंद असू दे' आपलं पुढे जात राहणं चालू राहतंच. संकलन आनंद पाटील*
Thursday, August 15, 2024
प्रवचन
*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*
*🚩श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर🚩*
*🌸 प्रवचन
*सदवस्तू साध्य करून घेण्याचा उपाय सत्संगती .*
एखाद्या दारूबाजाप्रमाणे विषयी मनुष्य वागत असतो. त्याला सर्व कळते, पण वळत नाही. एकीकडे स्वतःला तो परमात्म्याचा अंश म्हणवितो, आणि दुसरीकडे विषयांच्या आहारी जातो. खरोखर, भक्तीशिवाय सर्व काही वाया आहे. संताजवळ राहावे आणि भक्तीचे साधन करावे. आपल्याला काही करायचे उरले आहे असे जे वाटते, ते न वाटू लागले, म्हणजे साधनात प्रगती झाली असे समजावे. भगवंताची भक्ती घडायला गुरूसेवा हे एक मुख्य साधन आहे. जो शिष्य आज्ञा पाळतो त्याला भेटणे गुरूला भागच पडते. वास्तविक, गुरू मनात काही इच्छाच येऊ देत नाही; म्हणून कामधेनूपेक्षाही गुरू श्रेष्ठ आहे.
अत्यंत तळमळीशिवाय भगवंताचा योग शक्य नाही. संतसमागम प्रारब्धाने होतो, पण 'सम' रीतीने जाता आले तर खरा 'समागम' घडतो. पण आमचा मार्ग विषय आहे; म्हणून संत भेटूनही त्याचा 'समागम' आपल्याला होत नाही. विषयांमध्ये धुंद असलेल्या आम्हांला पाहून संतांच्या मनात कालवाकालव होते; त्याची आपल्याला कल्पनाही येणार नाही. आपली बुद्धी आपल्याला समाधानप्रत नेत नाही, तर दुसर्याची मदत घेणे आवश्यक आहे. अशा वेळी, ज्यांची मदत आपण घेतो त्यांचे आपण ऐकायला नको का ? भगवंताच्या जिज्ञासेचा मार्ग आक्रमायला संतांनी सांगितले. संतांना जिज्ञासा मूळचीच असते. आपल्याला ती नाही, म्हणून ती उत्पन्न करणे भाग आहे. काही केल्याशिवायच सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय, म्हणजे सत्संगती हा होय. सत्संगती अती अपूर्व काम करणारी आहे. ज्याचे भाग्य थोर असेल त्यालाच ती लाभेल. एखादा मनुष्य भोवर्यात सापडला तर त्याला बाहेर काढण्याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग असा की, दुसर्या चांगल्या पोहणार्याने त्या भोवर्यामध्ये उडी मारून तो फोडायचा आणि बुडत्याला बाहेर ओढून काढायचे. पण यासाठी शक्ती फार लागते. दुसरा मार्ग असा की, आपणच भोवर्यामध्ये बुडी मारून तळाशी जायचे आणि खालून बाहेर निघायचे. विद्वत्ता ही भोवर्यासारखी आहे. वर वर पाणी फिरत असते तरी तळाशी ते संथ असते. तसे, जे लोक वरवर विद्या शिकतात ते वादाच्या आणि मतांतराच्या चक्रात सापडतात; पण जे लोक खोल तळाशी जातात त्यांना खरे काय ते आपोआप कळते, आणि ते सगळीकडे एकच असते. विद्येच्या भोवर्यामध्ये सापडणार्यांना बाहेर ओढून काढण्याचे काम फार मोठया संतांचे असते. शहाण्याने त्या भानगडीत न पडावे. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हे खरे संतांचे काम होय.
*१०३ . कोणत्याही सत्पुरूषाची परंपरा रक्षण केली पाहिजे . त्यात आपले घुसडू नये .*
Wednesday, August 14, 2024
चरित्र
*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*🌷 काशीमध्यें प्रसिद्धि : श्रीमहाराज काशीमध्यें शास्त्रीबुवांच्याच घरीं उतरले. त्यांच्याबरोबर पांचदहा माणसें नेहमीं असत. थोड्या दिवसांनीं एका राममंदिरामध्यें श्रीमहाराजांचा मुक्काम हलला. एकदां श्रीविश्वेश्वराच्या दर्शनाला गेले असतां एक म्हातारी बंगाली बाई त्यांच्या पाया पडली. तिची चौकशी करतां ती म्हणाली, 'आम्ही बंगाली जमीनदार आहोंत. घरची अलोट श्रीमंती आहे. सर्व कांहीं अनुकूल आहे, पण माझ्या मुलाला मुलगा नाहीं. त्यानें तीन लग्ने केलीं, व आतां त्याचें वय ५५ च्या आसपास आहे.' श्रीमहाराजांनीं सहज विचारलें, 'बाई, तुमचा मुलगा व पहिली सून कुठे आहेत ? बाई म्हणाली 'ते कलकत्त्याला असतात, पण मी त्यांना ताबडतोब आपल्या दर्शनासाठीं बोलावतें.' आठ दिवसांनी तो बंगाली जमीनदार सर्व कुटुंब घेऊन काशीला आला. श्रीमहाराजांचे दर्शन घेतल्यावर त्याच्या पहिल्या बायकोच्या ओटीत (ज्या बाईचे वय ४०-४२ वर्षे होतें) श्रीमहाराजांनीं नारळ टाकला आणि तिला सांगितले, 'बाई, रामनामाचा साडेतीन लाख जप करा. हा नारळ जपून ठेवा, आणि मुलाच्या बारशाला तो फोडून सर्वांना वाटून टाका.' काशीमध्ये त्या वेळी एक कोट्यधीश व्यापारी रहात होता. त्याचे वय सुमारे तीस वर्षांचे असून आई, बाप, आजा, आजी, भाऊ, बहिणी, नोकरचाकर, वगैरे त्याचा परिवार फार मोठा होता. त्याचें लग्न होऊन तीन वर्षे झालीं होतीं आणि त्याला दीड वर्षाचा एक मुलगा होता. ज्याप्रमाणें त्या तरुण व्यापाऱ्याकडे पैसा अमाप होता त्याप्रमाणें त्याचा दानधर्मही हद्दीच्या बाहेर होता. त्याच्याकडे मागण्यासाठी गेलेला मनुष्य कधीं विन्मुख परत गेला नाहीं. भारताच्या सर्व भागांतून काशीमध्ये येणारे साधु, संत, बैरागी, यात्रेकरू, यांचें तो मायपोट होता. त्याचे द्वारीं अन्नछत्र होते. इतकेंच नव्हे तर काशीमधील जवळजवळ पन्नास कुटुंबांचा चरितार्थ त्याच्या जिवावर चालत असे. हा पुण्यवान् व्यापारी नवज्वरानें अकाली मृत्यू पावला. सर्व काशीमध्ये मोठा हाहाकार झाला; परंतु मृत्यूपुढे कोणाचा इलाज चालत नाहीं, हे जाणून लोकांनी त्याचें प्रेत मनकर्णिका घाटावर जाळण्यासाठीं आणलें, त्याची तरुण पत्नी सती जायला निघाली. प्रेताचे सर्व संस्कार संपून आतां अग्नि देणार इतक्यामध्ये लोकांच्या गर्दीमधून रामशास्त्री पुढे झाले आणि त्या बाईला म्हणाले, 'बाई! आपण आतां जाणारच आहांत, पण ज्याअर्थी आपण इतक्या साधुसंतांना नमस्कार करीत आहांत त्याअर्थी आणखी एका साधूला नमस्कार करायला चला.' शास्त्रीबुवांनीं तिला श्रीमहाराजांकडे आणले. त्यांच्या कानावर सर्व वस्तुस्थिती घातल्यावर श्रीमहाराज बोलले, "चला, मला त्या पुण्यवान् आत्म्याला एकदां बघू द्या." शास्त्रीबुवांनी श्रीमहाराजांना घाटावर आणलें, लोकांना बाजूला करून स्वारी जेव्हां त्या प्रेताजवळ आली तेव्हां सर्व लोकांची उत्सुकता कळसास पोंचली. श्रीमहाराज बोलले, 'अहो, याला सोडा, हा तर जिवंत आहे!" असें लोकांना सांगून ते त्या बाईला म्हणाले, "माय, तुमचा पति जिवंत असतांना तुम्ही सती कशा जातां ?" श्रीमहाराजांनीं थोडें गंगाजल मागून घेतलें, आणि तीन वेळां 'श्रीराम' म्हणून ते त्या प्रेताच्या तोंडांत घातलें.
दोन-तीन मिनिटांनीं त्यानें डोळे उघडले, आणि जसा एखादा मनुष्य झोपेतून जागा व्हावा त्याप्रमाणें तो सावध होऊन उठून बसला. (म्हणूनच श्रीब्रह्मानंदांनीं आरतीमध्ये म्हटले आहे की, "वाराणसी क्षेत्रदि प्रेतव बदकिसि दातने.") एकदम जिकडे तिकडे या नव्या सत्पुरुषाचा जयजयकार होऊ लागला आणि जो तो त्यांच्या पाया पडण्यासाठीं धडपड करूं लागला.
परंतु श्रीमहाराजांनीं धाडकन् गंगेत उडी मारली आणि ते तात्काळ नाहींसे झाले. तो व्यापारी मोठ्या आनंदानें सर्व मंडळींबरोबर घरीं गेला. नंतर त्यानें पुष्कळ दानधर्म व अन्नदान केलें; परंतु ज्या महापुरुषानें आपले प्राण वांचवले त्याचें पुन्हा दर्शन व्हावें ही तळमळ त्या नवराबायकोला लागून राहिली*
*-- चरित्र*
Tuesday, August 13, 2024
Michchami Dukkadan
n the text of four lakh biography, 'Michchami Dukkadan' is given in 18,24,120 types. How are these types made?
563 differences of northern living beings are multiplied by 10 viradhya, vattia etc. 5630 differences are made. Now this is either the form of melody or the form of hatred, therefore 11260 differences were made if multiplyed by these two. Again, when they multiplied with these three yogas, 33780 discrimination. 101340 discriminated on multiplying by three reasons. 304020 discriminated on multiplication since three periods. All these five are due to Parmeshthi and introspective, so if multiplying by 6, 18,24,120 types are made. Indeed, the subtle discrimination of its fault and philosophy has come out in Jain religion.
563(life differences) x 10(viradhana) x 2(anger-hatred) x 3(yoga) x 3(kal) x 6(witness) = 18,24,120
Monday, August 12, 2024
सदाचार
श्रीराम समर्थ
*चिंतामणी येथे १९-४-१९५६ रोजी रामनवमीला दुपारी १:३० चे सुमारास झालेल्या श्रीमहाराजांच्या [वाणी अवतार] प्रवचनातील काही भाग.*
आपण सर्वजण जन्माला येतो आणि परमात्मा ही आज जन्माला आला आहे असे म्हणतात. पण या दोघांच्या जन्माला येण्यामध्ये फरक आहे. आपल्याला जन्माला यावे लागते - येणे न येणे आपल्या हातात नाही. परमात्मा स्वेच्छेने - स्वखुशीने जन्माला येतो. आपण आपल्या पूर्व कर्माने बांधलेले असतो व प्रारब्ध आपणास जन्म घ्यावयांस लावते. परमात्मा सर्व कर्माच्या पलीकडे आहे म्हणून जन्म घेणें किंवा जन्माला येणे हा भाग दोघांना जरी सारखा असला तरी दोहोंचा जन्म घेण्यात महदंतर आहे.
हा परमात्म्याचा जन्म दरवर्षी अनेक ठिकाणी साजरा केला जातो. *काही वेळेस, जन्म वर्षातून दोन वेळा साजरा होतो [पंचांगात बदल असेल त्याप्रमाणे] व काही वेळेस निरनिराळ्या वेळी जन्म करण्यात येतो. [चिंतामणीला रामजन्म दुपारी साडेअकराला करण्याची पद्धती आहे*].** याचा अर्थ आपण परमात्म्याला आपल्याला पाहिजे त्यावेळी जन्माला आणू शकतो. याचे कारण तो सदासर्वदा आहेच.
तो कधी कोणत्याही क्षणाला नव्हता असे म्हणता येत नाही. मग असे विचारावेसे वाटते की *त्या जन्माने आपल्या बाबतीत कार फरक होतो. आपण आपल्यालाच विचारून पाहिले पाहिजे की आपण जन्म साजरा केल्यानंतर पुर्वी होतो त्यापेक्षा काही निराळे झालो की त्यानंतरही होतो तसेच राहिलो आहोत.
जर आपल्यात काही बदल झाला नसेल तर हा सर्व खटाटोप म्हणजे एक नुसता करमणुकीचा कार्यक्रम झाला.* त्यापेक्षा त्याला अधिक किंमत राहणार नाही. खरे पाहिले असता जन्मानंतर - जन्म केल्याचे फळ म्हणून - आपणात आमूलाग्र फरक पडला पाहिजे. परमात्मा आला असे म्हणतो ते खरोखर आल्याचा विश्वास वा परिणाम दाखवत नाही.
लहान मूल रस्त्याने एकटे जात असता त्याला आपला बाप दृष्टीस पडला म्हणजे जसा सुरक्षितपणा - जशी निश्चिंतता व निर्भयता वाटते *तशी परमात्मा जन्माला आल्यावर आमची भिती, काळजी, असमाधान, दुःख एकदम नाहीशी झाली पाहिजेत परंतु प्रत्यक्षात पाहिले तर तसे होताना दिसत नाही.* आमच्या या सर्व गोष्टी जवळजवळ आहे तशाच कायम राहतात.
म्हणून प्रभूच्या जन्माचा खरा अर्थ - रहस्य आम्हाला समजत नाही कारण त्याकरिता लागणारी श्रद्धा आमचे जवळ नाही. आम्हाला परमेश्वराच्या आगमनापासून जर खरा फायदा व्हायचा असेल तर ही श्रद्धाच उपयोगी येईल. ती सदाचार व नामस्मरण ह्यातून निर्माण होते. *सदाचार हा परमार्थाचा पाया आहे पण त्याला अखंड नामस्मरणाची जोड पाहिजे.* परमेश्वर प्राप्ती करता जी अनेक साधने सांगितली आहेत ती सर्व एका नामात आहेत.
जन्माला येण्याचे वेळी किंवा आल्याचे वेळी प्रभू विशेष आनंदात आणि देण्याचे भरात असतो आणि आपण काय मागू ते तो आपणास देईल. म्हणून या शुभ प्रसंगी त्याच्याजवळ त्याचे नामाचे प्रेम फक्त मागू आणि ते तो खात्रीने देईल. त्या वाचून दुसरे काही आपण मागू नये. या एका ध्येयाच्या मागे जाण्याचा आपण आज निश्चय करूया आणि मगच आपण केलेल्या जन्मोत्सवाचे खरे सार्थक होईल.
*********
**[हे १९५६ सालचे चिंतामणी येथील श्रींचे प्रवचन आहे. सध्या तेथे राम जन्म किती वाजता साजरा करतात हे माहित नाही.]
संदर्भः *मालाडचे एक जेष्ठ साधक डा वा रा अंतरकर यांच्याकडे असलेल्या वाणीरूप अवतारातील श्रीमहाराजांच्या प्रवचनातून. पान १५-१६*
संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन
Sunday, August 11, 2024
संततधार विधी
आज पासुन म्हणजे चैत्र शुद्ध पंचमी पासून श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील श्रीगुरुचरणांवर *"संततधार"* अनुष्ठान सोहळा संपन्न होत आहे...!!!
*नृसिंहवाडी चा संततधार विधी म्हणजे काय ?*
असा प्रश्न ब-याच जणांच्या मनात येतो; कारण फक्त नरसोबाच्या वाडीलाच हा विधी संपन्न होतो. श्री क्षेत्र नृसिंह वाडी येथे हा संततधार विधी चैत्र शुद्ध पंचमी ते द्वादशी असे आठ दिवस असतो. या वेळेच्या यात्रेदरम्यान संततधार संपन्न होणार आहे. वैशाखवणव्याचा दाह श्री दत्तमहाराजांच्या सुकुमार पाऊलांना होऊ नये म्हणून त्यांच्या मनोहर पादुकांवर प्रथम दत्तदेवस्थान तर्फे सलग आठवडाभर दिवसरात्र जलाभिषेक होत असतो.
त्यावेळी नृसिंहवाडीचे पुजारी ३ पाळ्यांत आठ तास पवमानसूक्त, रुद्रावर्तने, पुरुषसूक्त, श्रीगुरुचरित्र पठण करीत असतात. एरवी शेजारती नंतर देवांच्या कट्टयावर जायला परवानगी नसते पण संततधार चालू असताना मध्यरात्रीही भक्त मागील बाजूला अभिषेक चालू असलेल्या पादुकांचे दर्शन घेऊ शकतात. त्यावेळी पुजारी भक्तांना पादुकांवरील पवित्र तीर्थ देतात. देवस्थानच्या संततधारेनंतर ज्या यजमानांना वैयक्तिक संततधार करायची असेल ते देवस्थानच्या परवानगीने करू शकतात. पूर्वी बरेच यजमान संततधार करीत होते पण वेळेच्या अभावामुळे आणि महर्गतेमुळे आता एखाद-दोनच होतात.
देवाच्या कट्टयावर मागील बाजूच्या ओवरीत एका मोठ्या परातीत अभिषेकासाठीच्या दत्तपादुका ठेवल्या जातात. एका मोठ्या अडणीवर अभिषेकपात्र ठेवले जाते. अत्यंत कडक सोवळ्यात आठ दिवस संततधार चालू असते. दहा ब्राह्मण सोवळ्याने नदीचे पाणी आणून हंडे भरत असतात. दोन ब्राह्मण समोरासमोर बसून सतत वेदपठण करीत असतात. पादुकांवरील जलाभिषेकाचे तीर्थ फार पवित्र असते आणि खरोखरच अकाल मृत्युहरण व सर्व व्याधींचा नाश करणारे असते अशी भाविकांची श्रद्धा आहे. ओवरी नारळाच्या झावळ्यांनी आणि विविध फुलांनी सजवलेली असते.
श्रीनरसिंहसरस्वती दत्त महाराजांची सुरेख तसबीर ठेवलेली असते. सातही दिवस श्रीगुरुचरित्र सप्ताह सुरू असतो. ब्राह्मणांना अल्पोपहार, भोजन सर्व दिले जाते. समाप्तीला १० ते १५ ब्राह्मण सामुदायिक पवमानसूक्त म्हणतात तेंव्हा अंगावर रोमांच येतात आणि डोळे प्रेमाश्रूंनी भरून येतात. मग सेवेकरी ब्राह्मणांना वस्त्र, दक्षिणा देऊन सन्मान केला जातो व मिष्टान्नभोजन देऊन समारोप होतो. मित्रमेत्रिणिंनो, मध्यरात्रीच्या शांततेत, मंद वाहणाऱ्या सरितेच्या ध्वनीने आणि ब्राह्मणांच्या धीरगंभीर वेदपठणाने ब्रह्मानंद होतो. जरूर लाभ घ्या.
संततधार विधी चैत्र शुद्ध पंचमी ते द्वादशी असे आठ दिवस असतो.
Saturday, August 10, 2024
गोमातेविषयी
1. प्रत्येक व्यक्तीचा जन्म गायीचा पुत्र म्हणून होतो, म्हणून त्याला गोत्र आहे.
2. प्रत्येक व्यक्तीला गो-धुळीच्या वेळी लग्नाचा मुहूर्त हवा असतो.
3. प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतर गोलोक धामला जायचे असते.प्रत्येक जीवाला गोलोकवासात जायचे असते.
4. प्रत्येक जीवाला मृत्यूपूर्वी गाय दान करून वैतरणी पार करायची असते.
विचार करा! प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आई गाईचा आधार. पण त्याच गायीची सेवा करायला वेळ मिळत नाही.
गोमातेविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी -
1. ज्या ठिकाणी गाय माता उभी राहून आनंदाने श्वास घेते. तिथे वास्तुदोष संपतात.
2. ज्या ठिकाणी गाय माता आनंदाने रडू लागते त्या ठिकाणी देवता फुलांचा वर्षाव करतात.
3. गाईच्या गळ्यात घंटा बांधावी; गाईच्या गळ्यात बांधलेली घंटा वाजवून गायीची आरती केली जाते.
4 गाईची शेपटी डोक्यावर फिरवून दृष्ट काढतात
5. गोमातेच्या खुरांमध्ये नागदेवता वास करते. गाई माता ज्या ठिकाणी फिरते त्या ठिकाणी साप आणि विंचू येत नाहीत.
6. गाईच्या गोठ्यात लक्ष्मीचा वास असतो.
7. गायीच्या उजव्या डोळ्यात सूर्य आणि डाव्या डोळ्यात चंद्र वास करतो.
8. गाईच्या दुधात सोन्याचे तत्व आढळते, ज्यामुळे रोग होण्याची शक्यता कमीच असते.
9. हनुमानजी मातेच्या शेपटीत राहतात. जर एखाद्या व्यक्तीला दृष्टीदोष असेल तर गायीच्या शेपटीला डोकं लावल्याने दृष्टी विकारापासून मुक्ती मिळते.
10.गाईच्या पाठीवर एक उंच वशिंड आहे, त्यात सूर्य केतू नाडी आहे. रोज सकाळी अर्धा तास गाईच्या पाठीवर हात फिरवल्याने रोग नष्ट होतात.
11. गाईला चारा खायला दिल्याने तेहतीस प्रकारातील देवतांना भोग अर्पण केले जातात.
12. गाईचे दूध, तूप, लोणी, दही, शेण आणि गोमूत्र यापासून बनवलेले पंचगव्य हजारो रोगांवर औषध आहे. याच्या सेवनाने असाध्य रोग नष्ट होतात.
13. ज्या व्यक्तीची भाग्यरेषा झोपलेली असेल, त्यांनी गूळ तळहात ठेवून गाय मातेला जिभेने चाटल्यास, मातेच्या तळहातावर ठेवलेला गूळ चाटल्यास त्या व्यक्तीची झोपेची भाग्यरेषा उघडते.
14. गाईच्या चार पायांमध्ये प्रदक्षिणा केल्याने माणूस भयमुक्त होतो.
15. महान विद्वान धर्मरक्षक गौ कर्णजी महाराज यांचा जन्म गाईच्या पोटातून झाला होता.
16. देव-देवतांनी या पृथ्वीतलावर केवळ गाय मातेच्या सेवेसाठी अवतार घेतला आहे.
17. गाय मातेने वासराला जन्म दिल्यावर पहिले दूध वंध्यत्व नसलेल्या स्त्रीला पाजल्याने तिचे वंध्यत्व संपते.
18. निरोगी गायीचे दोन तोळे गोमूत्र दररोज सात पदरी कपड्यात गाळून घेतल्यास सर्व रोग नाहीसे होतात.
19. जो गाई मातेकडे प्रेमळ नजरेने पाहतो त्याला गाईची कृपा प्राप्त होते.
20. काळ्या गायीची पूजा केल्याने नऊ ग्रह शांत राहतात. जे धर्माने गाईची पूजा करतात, ते शत्रू दोषांपासून मुक्त होतात.
21. गाय हे फिरते मंदिर आहे. आपल्या सनातन धर्मात तेहतीस देवता आहेत, आपण दररोज तेहतीस प्रकारच्या देवतांच्या मंदिरात जाऊ शकत नाही, परंतु गाय मातेच्या दर्शनाने सर्व देवता दिसतात.
22. कोणतेही शुभ कार्य रखडले असेल, वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, तर गाईच्या कानात सांगा, ते रखडलेले काम होईल.
23. गाय ही सर्व सुखाची दाता आहे.
आई तू शाश्वत आहेस! तुझे गुण शाश्वत! तुझ्या गुणांचे वर्णन करण्याएवढा मी सक्षम नाही गोसेवा हाच धर्म...🚩🚩
अक्षरब्रह्मयोग
*।। ॐ श्री परमात्मने नमः ।।*
अथश्रीमद्भगवद्गीता अष्टमोध्यायः
अध्याय आठवा
*"अक्षरब्रह्मयोग"*
श्लोकसंख्या - २८
वक्ते - अर्जुन (२ श्लोक),
भगवान श्रीकृष्ण (२६ श्लोक)
या अध्यायाचे नाव *अक्षरब्रह्मयोग* आहे.
*भगवंतांच्या* परा (ज्ञान) व अपरा (विज्ञान) प्रकृतीला जाणणारा मोक्षाचा लाभ करून घेतो असे भगवंतांनी ७ व्या अध्यायात सांगितले. त्याची सांगता करताना (२९ व ३० श्लोक) भगवंतांनी ज्ञानविज्ञानात्मक अशा सहा संज्ञा सांगितल्या. त्या सर्वांना जाणणारा ज्ञाता अंतकाळी परमात्म्यातच मिसळून जातो, असे सांगितले. साहजिकच अर्जुनाला त्या संज्ञांचे रहस्य जाणून घ्यावेसे वाटले.
'ब्रह्म,अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ म्हणजे काय हे अर्जुनाने विचारले.'
परमअक्षर अविनाशी परमात्मा हाच ब्रह्म, त्या ब्रह्माचा स्वभाव (प्रत्यगात्मा वा शुद्धात्मा) हेच अध्यात्म,भूतांच्या भावांना निर्माण करणारा शास्त्रविहित यज्ञ-दान- होम यांच्या निमित्ताने जो त्याग तेच कर्म, सृष्टीतील सर्वनाशवंत वस्तू अधिभूत, पुरुष (हिरण्यगर्भ) हाच अधिदैव आणि देहात विष्णुरूपाने असणारा (सृष्टीचक्राचा प्रवर्तक आणि फलदाता) तोच अधियज्ञ होय, असे भगवंतांनी सांगितले. हे जाणून जो अंतकाळी परमात्म्याचे चिंतन करतो, तो त्यालाच प्राप्त होतो. त्या परब्रह्म परमात्म्याचे स्वरूप एकाक्षरी ॐकाराचे आहे.
*केवळ* हे परब्रह्मच अविनाशी आहे. बाकी ब्रह्मलोकापासून कृमिकीटकापर्यंत अवघेच विनाशी आहेत. हे जाणून जो उत्तरायणात देवयान (अर्चिरादि) मार्गाने जातो तो मुक्त होतो.जो दक्षिणायनात पितृयान (धूम्र) मार्गाने जातो तो पुन्हा जन्ममरण बंधनात पडतो.
जो हे सर्व जाणतो तो वेदाध्ययन, यज्ञ, तप, धन या सर्वांच्या फळांचे उल्लंघन करून परमपद प्राप्त करतो. हे परमपद अक्षर, एकरस, अखण्ड आणि अविनाशी ब्रह्माचे असल्यामुळे या अध्यायाला *'अक्षरब्रह्मयोग'* असे नाव आहे.
श्रीगीतासागर पूर्वार्ध - श्री गुरुदेव शंकर अभ्यंकर.
*।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।*
Thursday, August 8, 2024
आई कुणा म्हणूं मी.....!*
*आई कुणा म्हणूं मी.....!*
*हळुहळु माझ्या लेकी ,*
*माझ्या आया बनत आहेत!*
*आजवर सांभाळ केला मी त्यांचा,*
*आज त्या मला सांभाळत आहेत.*
*फरक आहे पण खूप,*
*एकमेकींच्या सांभाळण्यात,*
*मी म्हणत असे,"चुप रहा पोरींनो गं,"*
*त्या म्हणत असतात,"गप्प कां,बोलत रहा नं तूं आई गं!"*
*मी म्हणत असे,*
*"धुळीत माखलेत,तुमचे पाय,वर नका ठेऊ!*
*त्या म्हणतात,"सुजतील आई तुझे पाय,*
*वर ठेव,खाली नको ठेऊ!*
*म्हणत असे मी त्यांना,"हे नका खाऊ,ते नका खाऊ,*
*बिघडतीत तुमची पोटं गं!"*
*त्या म्हणतात," आई,काय हवं ते खात जा पोटभर,मन नको मारु गं!"*
*मी पहाटेच उठवी त्यांना अभ्यासाला,*
*त्या म्हणतात," निवांत झोप आई,पुष्कळ वेळ आहे सकाळ व्हायला!*
*इच्छा त्यांच्या सगळ्याच मी,पुऱ्या करु शकले नाही तेव्हा,*
*कांहीं कमी पडूं देत नाहीत त्या,मिळते सगळे मला अगदी मला हवे तेव्हा!*
*मी म्हणे,"नका जाऊ सारख्या सारख्या गं सिनेमाला,*
*त्या म्हणतात,हा सिनेमा छान आहे आई,बघं Netflix वर आवडेल तुला!*
*मी म्हणत असे,"काय उठसूठ मैत्रिणींबरोबर किती गं मारत असता गप्पा?*
*त्या म्हणतात,"मोबाईलवर तरी बोलत जा नं गं मैत्रिणींशी आई,तूं जरा!*
*मी म्हणे,"खेळाच्या वेळी खेळ,अभ्यासाच्या वेळी अभ्यास खूप!*
*त्या म्हणतात,"वेळच्या वेळी खात जा,*
*वेळच्या वेळी औषध घे,वेळच्या वेळी झोप खूप!"*
*सर्व माय-लेकींना समर्पित..!*
.*(अनुवादित)....................राजेंद्र देवधर.*🙏
संतांचे ग्रंथ .
*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*
*🚩श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर🚩
*संतांचे ग्रंथ .*
संतांचे ज्ञानच असे असते की, त्यांना वेदांताचे मर्म आपोआप कळते. अमुक एक ग्रंथ कुणी लिहिला, केव्हा लिहिला, त्यामध्ये अमक्या पानावर काय आहे, या गोष्टी एक वेळ संतांना सांगता येणार नाहीत, पण त्या विषयाचे मर्म त्यांना बरोबर ठाऊक असते. आपण पोथीतले नुसते शब्द तेवढे वाचतो; त्यांचा अर्थ संतांच्या कृपेवाचून कळणे कठीण आहे. बापाचा निरोप लहान मूल आईला आपल्या बोबडया शब्दांत आणि स्वतःला कळला असेल तसा सांगत असते, तितपत पोथीतल्या शब्दांचा अर्थ आपल्याला सांगता येईल. संतांनी ग्रंथ लिहिले याचे कारण, ज्यांना बुद्धीने खात्री करून घ्यायची आहे त्यांनी ती करून घ्यावी आणि परमार्थ करावा. संतांच्या वचनाचा ओढूनताणून अर्थ करू नये, त्याचा सरळ अर्थ घ्यावा. ग्रंथ वाचीत असताना आपली मते बाजूला ठेवावीत; एक अक्षरावर दुसरे अक्षर लिहिले, तर पहिले दिसत नाही आणि समजत नाही, म्हणून शुद्ध मनाने ग्रंथ वाचावा. आपल्या वडिलांचे पत्र जर आपल्याला आले तर आपण त्यातले अक्षर अन् अक्षर वाचतो. तसे, ज्ञानेश्वरी, दासबोध, हे ग्रंथ अगदी मनापासून वाचावेत. पुष्कळ लोक जे पोथी ऐकायला जातात ते लोकांनी बरे म्हणावे यासाठी, किंवा करमत नाही यासाठी, किंवा इतर उद्योग नाही म्हणून जातात. असे करणे योग्य नाही. खरे म्हणजे, संतांचे ग्रंथ वाचून स्वतःला काय करायला पाहिजे ते शोधून काढून तेवढे करणारे लोक थोडेच असतात. ते ग्रंथ वाचून त्यांचा अर्थ नीट समजणारे लोक त्यापेक्षा जास्त असतात; 'मोठया संताचा ग्रंथ आहे' म्हणून नुसता वाचणारे लोक त्याहून जास्त असतात; आणि त्याहीपेक्षा, ते ग्रंथ मुळीच न वाचणारे लोक फारच जास्त असतात !
जगाच्या प्रवाहाच्या उलट जायला संतांजवळ शिकायचे असते. संतांना व्यवहारापुरतीच देहाची स्मृती असते. ते देहाला सावलीप्रमाणे मानतात. सावलीला दुःख झालं म्हणणे केव्हाही अयोग्यच. म्हणूनच संतांच्या मनावर सुखदुःखाचा परिणाम होत नाही. संतांकडे लोक कितीतरी कष्ट करतात आणि ते लोक यांच्या नात्यागोत्याचेही नसतात. संत त्यांना काही देत नसताना ते इतके कष्ट करतात, याचे कारण संतांचा त्यांच्याविषयी असणारा खरा आपलेपणा होय. संत एकांतात जातात याचे कारण असे की, लोकांतात त्यांना भेटणारे निराळे असतात आणि एकांतात भेटणारे निराळे असतात. लोकांतात संतांची शांती बिघडते असे मुळीच नाही; पण एकांतात भेटणार्यांना लोकांतात भेटता येत नाही, म्हणून ते एकांतात जातात.
*१०४ . कोणत्याही संताचा ग्रंथ वाचताना , तो कृतीत आणण्याकरिता आहे , ही भावना ठेवून वाचावा .*
*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*
Tuesday, August 6, 2024
देहबुद्धी ते आत्मबुद्धी
चिंतन
श्रीराम,
थोडक्यात, हे त्रिविध ताप जाणून घेतल्यावर आपल्या लक्षात येईल की, होणारे प्रत्येक दुःख हे 'मी म्हणजे देह' असे समजल्याने होत असते. भगवंताच्या चरणी अनन्यभावे शरण गेलो तर तो आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. प्रभू रामचंद्र, श्रीकृष्ण किंवा आपले आराध्यदैवत नेहमीच शरण आलेल्या आपल्या भक्ताचे रक्षण करतात. पण मग आपण त्यांना अनन्य भावे शरण जातो का? हे तपासून बघायला हवे. अनन्य भावे शरण म्हणजे माझ्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा हिशोब मी ईश्वराला देत आहे का? त्याने गीतेत जसे कर्म सांगितले आहे तसे स्वधर्माचे पालन करून कर्म करीत आहे का? कोणत्याही फलाची अपेक्षा न ठेवता त्याला अर्पण करत आहे का? अशा अनेक गोष्टी दर सेकंदाला तपासणे आणि ईश्वराच्या शक्तीवर दृढ श्रद्धा व विश्वास असणे म्हणजे शरणागती असा एक अर्थ लावता येईल.
जेव्हा संतांना अपेक्षित असे आपले सदाचारी वागणे असेल तेव्हा देहबुद्धी ते आत्मबुद्धी होण्यास वेळ लागणार नाही.. अशी ग्वाही स्वतः संत आपल्याला वेळोवेळी देतात.
||श्रीराम ||
Monday, August 5, 2024
जिव्हाळा
खरच..आपला हास्य परिवार म्हणजे जिव्हाळ्याने जोडलेली माणसे..... 🙏🏻 वाचा.. जिव्हाळा!*. आईला ऑपरेशनसाठी आत नेलं, तसा प्रसन्न बाहेर रिसेप्शन काउंटर जवळच्या सोफ्यावर येऊन बसला. विशाखा सासूबाईंची फाईल घेऊन तिथेच बसली होती.
आज पहाटे साडेपाचला आई बाथरुमला जायला म्हणून उठली आणि चादरीत पाय अडकून पडली. कमरेचं हाड मोडलं होतं. प्रसन्न आणि विशाखा तिला घेऊन करूणा आर्थोपेडिक हाॅस्पिटलमध्ये घेऊन आले. एक्स-रे बघून ऑपरेशन शिवाय गत्यंतर नाही असं डाॅक्टर म्हणाले, तेही लगेच करायला हवं होतं. सुदैवाने आईला इतर काही व्याधी नसल्याने बाकी रिपोर्ट्स चांगले आले आणि आता नऊ वाजता ऑपरेशन सुरू झालं होतं. या सगळ्या गोंधळात दोघांना चहा घ्यायला देखील सवड मिळाली नव्हती.
हाॅस्पिटलच्या कँटिनचा मुलगा चहा घेऊन आला, तसं प्रसन्न आणि विशाखा, दोघांनी चहा घेतला. चहा पिऊन प्रसन्नाने त्याच्या बाॅसला फोन करून आज ऑफिसला येऊ शकत नसल्याचं कळवलं. विशाखानं तीन दिवस रजाच टाकलेली होती. उद्या तिच्या भावाच्या मुलीचं लग्न होतं, बोरीवलीला. आज घरातलं आवरून दुपारी ती आणि सई, तिची लेक, तिच्या माहेरी मालाडला जाणार होत्या. आणि आज सकाळी हे सगळं झालं होतं. तिनं ठाण्यातच राहणाऱ्या तिच्या मोठ्या जाऊबाईंना फोन लावला. सासूबाईंबद्दल कळवलं. ती पुढे काही बोलायच्या आधीच त्या म्हणाल्या, 'अरे देवा! अग आम्ही आलो असतो ग, पण काल घरी येताना हे पावसात भिजले ना, त्यांना रात्री थंडी वाजून ताप भरलाय. रात्री १०३ होता, अजूनही पूर्ण उतरलेला नाही. बघते दुपारी उतरला ताप तर संध्याकाळी मी येऊन जाईन'. यांच्या तब्येतीच्या तक्रारी म्हणजे गोड बोलून नाही म्हणणं आहे. इकडे तिकडे भटकताना बरे टुणटुणीत असतात. कायम कुठल्या न कुठल्या टूरवर जात असतात आठ-पंधरा दिवस!' विशाखा मनात म्हणाली.
'अहो, राजू भावजींना फोन करायला हवा ना' ? तिनं प्रसन्नला विचारलं. राजू म्हणजे प्रसन्नचा दोन नंबरचा भाऊ! प्रसन्न सगळ्यात धाकटा.'करू सावकाश ऑपरेशन झाल्यावर! तो आणि त्याची बायको काही इथे यायचे नाहीत. नुसत्या उंटावरून शेळ्या हाकतील. शंभर चौकश्या करतील. असं कसं झालं? तुम्ही काळजी घ्यायला हवी होती. यांव करा, नी त्यांव! तू आणि सई ठरल्याप्रमाणे जा बोरीवलीला, मी करतो मॅनेज इथे. तसंही पेशंटचं जेवणखाण इथेच मिळणार आहे.'
'अहो, तुम्ही एकटे कसं कराल? मी आज काही जात नाही. उद्याचं उद्या बघू. आईंना असं ठेवून जाऊन माझं काही तिथे लक्ष लागणार नाही. मीराताईंना विचारायचं का? पण नकोच, त्यांच्या घरी आधीच एवढं खटलं आहे. तरी त्या बिचार्या येतात धावून मदतीला!' मीरा प्रसन्नची बहिण, लांबच्या नात्यातली. ती मुलुंडला राहायला होती. तिच्या घरी तिचे सासू-सासरे दोघंही ऐंशीच्या पुढचे. त्यामुळे विशाखाला तिची मदत मागायला संकोच वाटायचा.
असाच थोडा वेळ गेला आणि ऑपरेशन थिएटरमधून त्यांना बोलावणं आलं. ऑपरेशन व्यवस्थित झाल्याचं सांगून डाॅक्टर गेले.पाच-सहा दिवस तरी आईला हाॅस्पिटलमध्ये राहावं लागणार होतं. तिला सेमी डिलक्स रूममध्ये हलवण्यात आलं. एका रूममध्ये दोन पेशंट असणार होते. आईला रूममध्ये ठेवून वाॅर्डबाॅय बाहेर गेल्यावर प्रसन्न आणि विशाखा आत गेले. आई अजून जरा गुंगीतच होती. रूम तशी बऱ्यापैकी मोठी होती. बाजूच्या काॅटवर एक साधारण साठीच्या बाई झोपल्या होत्या. त्यांच्याही पायाचंऑपरेशन झालेलं दिसत होतं. त्यांच्या बाजूला बहुतेक त्यांचा नातू बसलेला होता. पण तो आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त होता. त्याने फक्त कोण आहे ते बघण्यासाठी एकदा मान वर करून बाजूला बघितलं आणि पुन्हा मोबाईलकडे नजर वळवली.
सईचा फोन आला होता, मी येऊ का आजीजवळ बसायला? उद्या लग्नाला कसं जायचं आपण, या विचाराने थोडी नाराजही झाली होती ती! पण विशाखानं तिला घरीच थांब म्हटलं. कामवाली यायची होती. शिवाय कुकर लावून, बाहेरून पोळी-भाजी आणून / मागवून ठेवायलाही सांगितलं. मग तिनं प्रसन्नला घरी पाठवलं. तो स्वतःचं आवरून आणि जेवून आला की विशाखा घरी जाणार होती.
*विशाखा सासूबाईंच्या काॅटजवळ येऊन बसली आणि तिचा फोन वाजला. 'जिव्हाळा' च्या कुलकर्णी काकू बोलत होत्या. 'अग, सुधाताईंचं ' सुप्रभात', आलं नाही ग्रुपवर सकाळी, म्हणून मी फोन केला, तर तो पण उचलला नाही त्यांनी. म्हणून मी आणि सानेबाई तुमच्या घरी गेलो. सईकडून हा सगळा प्रकार कळला. झालं का सुधाताईंचं ऑपरेशन?'*
'हो, काकू ऑपरेशन झालं व्यवस्थित. अजून एक-दीड तासानी त्या शुद्धीवर येतील, म्हणाले डॉक्टर.'
'बरं, तुला आज बोरिवलीला जायचंय ना भाचीच्या लग्नासाठी? ते तू ठरल्याप्रमाणे जा. सई बोलली मला, मग ग्रुपवर कळवलं मी! आम्ही सगळी जबाबदारी वाटून घेतली आहे दोन दिवसांसाठी. रात्री माटेवहिनी येणार आहेत सुधाताईंजवळ झोपायला. त्यांना सकाळचा चहा नाश्ता आमची सुरभी देईल, ऑफिसला जाता जाता! मग काळेबाई, निशा, देशपांडे काकू आणि मी उद्याचा दिवसभर आळीपाळीने थांबू. रात्री सरोजाताई येतील झोपायला. त्यामुळे प्रसन्नलाही लग्न अटेंड करता येईल उद्या. बाकी काही मदत लागली तर शहाणे, कुलकर्णी वगैरे पुरूष मंडळी आहेतच.' असं म्हणून काकूंनी फोन ठेवला सुद्धा!
*जिव्हाळा', हा खरं तर सासऱ्यांच्या पेंशनर्स मित्रांचा ग्रुप. ठाण्यात राहणाऱ्या या पंधरा जणांनी हा 'जिव्हाळा', ग्रुप बनवला होता. या ग्रुपपैकी कोणाच्याही घरी काही अडचण असेल तर, बाकीचे जाऊन शक्य ती सगळी मदत करायचे. मग ती मदत आर्थिक असो, सोबत करण्याची असो की इतर काही. कोणाची मुलं परदेशी, कोणाची असून नसल्यासारखी. तर कोणी एकेकटेच. शिवाय नोकरी व्यवसायामुळेही मुलं-सुना दिवसभर बाहेर असायची. वेळ - प्रसंग काही सांगून येत नाही. पण अडचणीवर मात करण्यासाठी या सगळ्यांनी हा सोपा मार्ग शोधला होता. विशाखाचे सासरे गेले तेव्हा या मदतीचा अनुभव त्यांनी घेतला होता.सासऱ्यांनंतर सासूबाई आता या ग्रुपवर होत्या. प्रत्येकाने सकाळी 'सुप्रभात', चा मेसेज टाकला म्हणजे, 'All is well', समजायचं. इतर वेळी फोन, मेसेज करायचाच गरज असेल तर. त्यानंतर विशाखा, प्रसन्न आणि इतर काही जणांची मुलं-सुनादेखील या ग्रुपला मदत करण्यात सामील होऊ लागले होते.*
विशाखाला अगदी भरून आलं होतं. इथे रक्ताच्या नात्याची माणसं सबबी सांगत होती आणि ही जिव्हाळ्यानं जोडलेली माणसं मात्र खंबीरपणे पाठिशी उभी राहिली होती. आता ती निश्चिंत मनाने भाचीच्या लग्नाला जाऊ शकणार होती.
*कोणत्याही ग्रूपवर आपल्यासोबत असे "जिव्हाळा" ग्रुप करून अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.*
*एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ !*
*संत
*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*
*🚩श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर🚩*
*संत आपल्याला जागे करतात .*
प्रत्यक्ष विषयापेक्षा विषयी माणसाची संगत फार वाईट असते, हे ज्याप्रमाणे संसारात, तसेच परमार्थतही लागू आहे. संगतीचा परिणाम नेहमी मनावर होतो; म्हणून चांगल्या विचारांच्या माणसाची संगत धरावी. चांगलेवाईट हे नेहमी आपल्यावरूनच ओळखावे. स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो हेच आपले चुकते. जगात संत असतील असे पुष्कळांना वाटतच नाही. संताला ओळखायला आपल्या अंगी थोडेतरी भगवंताचे प्रेम असायला पाहिजे. आपल्याला आपल्या ध्येयाचा विसर पडला, परंतु संतांनी आपल्याला जागे केले. चुकीची वाट चालत असताना, 'अरे, तू वाट चुकलास,' अशी जागृती संतांनी आपल्याला दिली. तेंव्हा, जिकडे पाठ होती तिकडे आपण तोंड केले आणि पुनः चालू लागलो, तर आपण योग्य स्थळी जाऊ.
संत आनंदरूप झाल्यावर स्वस्थ बसत नाहीत. ते ज्या लीला करतात त्या जगाच्या कल्याणासाठी असतात. आपण धडपड करून फुकट मरतो, त्यापेक्षा ते स्वस्थ बसून जिवंत राहतात, हे केव्हाही चांगलेच होय. संत आनंदरूप झालेले असल्यामुळे त्यांच्या वचनानुसार आपण जाऊ या. लोकांना उपदेश करण्यामध्ये संतांचा हेतू एकच असतो, आणि तो हा की, 'जे मला कळले आहे ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या.' संत आपल्या स्वार्थासाठी सांगत नसल्याने, त्यांचे म्हणणे आपल्याला खोटे कसे म्हणता येईल ? प्रपंच हा दुःखमय आहे हे कळल्यावर त्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. तो संतांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या वाचनाने कळतो. त्या ग्रंथात सांगितलेले आपण करावे. आपण ग्रंथामध्ये जे वाचतो ते जर आचरणात आणले नाही, तर त्या वाचनाचा उपयोग नाही. वाचनाचे मनन झाले पाहिजे. साधन व वाचन बरोबर चालावे.
ज्या संतांचा ग्रंथ आपण वाचतो त्यांच्या कृपेवाचून तो नीट समजणार नाही. ज्याच्यावर त्यांची कृपा आहे त्याला, अंगी विद्वत्ता नसताना देखील, त्या ग्रंथांचा बरोबर अर्थ अगदी स्वाभाविकपणे कळेल. विद्वान् हा कल्पनेने सत्यस्वरूपाचे वर्णन करतो, पण संत मात्र निश्चयाने, खात्रीने, आणि अनुभवाने ते रूप काय आहे हे सांगतात. सत्पुरूषांच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणें वृत्ती बनवणें हा खरा सत्समागम आहे.
*१०५ . संतांची आज्ञा पालन करणे म्हणजे संतसेवाच होय .*
*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*
नामप्रभात
*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*🌺🙏नामप्रभात 🙏🌺*
*पू. बाबा - म्हातारपणी विस्मरण वाढत असले तरी विस्मरणाचा हा अनुभव नामाला मात्र लागू नाही. नामस्मरण म्हणजे केवळ repetition नाही. प्रत्येक नाम स्वतंत्र आहे, नवे आहे. नाम स्थूलात आहे तसे सूक्ष्मातही आहे. ते देहबुद्धीच्या आणि जडाच्या पलीकडे आहे. दृश्यावर आधारलेल्या स्मृती कमी होऊ लागतील. पण ज्याला दृश्याचा आधारच नाही त्या नामाची गोष्ट वेगळी आहे. नाम हे माणसाला देहबुद्धीच्या पलीकडे नेणारे आहे असे श्रीमहाराज म्हणत असत. त्यामुळे गेल्या आठवड्यात मनात विचार आला की आपण नामात आहोत असे श्रीमहाराजांनी अनेकदा सांगितले आहे, तेव्हां आपण त्यांना नामात पाहण्याचा प्रयत्न करावा. म्हणून नामस्मरण करतांना तो भाव मनात आणू लागलो आणि जाणवू लागले की सर्वकाळ ते आपल्याबरोबर आहेत. प्रत्येक नामात ते दिसू लागले. येवढेच नव्हे तर येणारे प्रत्येक नाम वेगळे आहे, पहिल्यापेक्षा निराळे आहे, आतून येते आहे; त्यामधे सौंदर्य आहे, आनंद आहे हे जाणवू लागले आणि नाना, मला ते वचन आठवले 'क्षणे क्षणे यन्नवतामुपैति'*
*-- अध्यात्म संवाद*
Saturday, August 3, 2024
स्पर्श
*स्पर्श*….. 🖐️
©️®️ ज्योती रानडे
अमेरिकेतील एका मोठ्या शहरातील एका हॅास्पिटल मधे जेन नवीन नर्स म्हणून कामाला लागली होती. त्या रात्री तिथे एक बाळ जन्माला आले पण त्या बाळाला severe congenital disorder होती. बाळाच्या मेंदूवर परिणाम झाला होता व ते बाळ जगणार नाही हे डॉक्टरांना दिसत होते. जेनला वाटले की नेमके आपल्या नोकरीच्या पहिल्या आठवड्यात अगदी असे बाळ का जन्माला यावे? माणसाचे मन तरी किती विचित्र असतं..कायम फक्त स्वतःचा विचार करतं..
जेनने यापूर्वी अशा प्रकारचे बाळ जन्माला आले तर काय होते बघितले होते. अशा बाळांना ॲडमिट करून ती जाण्याची वाट बघितली जाते. कारण उपचाराचा काही उपयोग नसतो.
त्या रात्री मॅटर्निटी वॉर्डची प्रमुख नॅन्सी कामाला आली. जेनने नॅन्सीला या बाळाची माहिती दिली. नॅन्सीने बाळाजवळ जाऊन सर्व रिपोर्ट वाचले. त्यानंतर नॅन्सीने जे केले ते बघून जेनला जी शिकवण मिळाली ती जेन आयुष्यभर विसरली नाही.
नॅन्सी त्या बाळाजवळ गेली. तिने तिचा चेहरा बाळाच्या अगदी शेजारी आणला आणि ती बाळाशी बोलू लागली. "कसं आहे आमचे बाळ? तू किती सुंदर आहेस हे तुला माहिती आहे का? किती गोड आहेस तू" असे बोलत नॅन्सीने त्या अत्यंत आजारी बाळाला हळुवारपणे उचलून घेतले. त्याला जवळ घेऊन ती थोडावेळ बसून राहिली. तिने गाणे गुणगुणत त्याला दुधाच्या बाटलीने दूध पाजले. परत त्याच्याशी गोड आवाजात बरच काही बोलली. बाळाला झोपवून तिने त्याला अलगद पाळण्यात ठेवले. हे तिने एकदाच नाही पण त्या रात्री अनेकवेळा केले. जणू काही ते तिचे स्वतःचे बाळ होते..
जेन अंतर्बाह्य हलून गेली. तिच्या नर्सिंग कॉलेजमध्ये असे काही शिकवले नव्हते. नॅन्सी म्हणाली,”जिथे मेडीकल उपचार संपतात त्यानंतर सगळं संपलं असं कधीच नसते. *प्रत्येक जीवाला प्रेमाचा स्पर्श कळतो. आवाजातलं प्रेम कळतं.* कुठल्याही नर्सचं हे कर्तव्य आहे की जोवर एखाद्या जीवाचा श्वासोच्छवास सुरू आहे तोवर त्याची काळजी घ्यायची! सर्व प्रकारे जपायचं! प्रेम द्यायचं!"
*स्पर्श ही मानवी जीवाला, सर्वच प्राण्यांना समजणारी सर्व भाषांपलीकडील भाषा आहे*. इतर कोणत्याही औषधांचा उपयोग नसताना नॅन्सीने त्या चिमुकल्या जीवाला प्रेमळ स्पर्शाचे औषध देऊन त्याचा कठीण काळ थोडा का होईना सुलभ केला होता. जिथे डॉक्टरांनी हात टेकले होते तिथे नॅन्सीने एक नवा उपचार शोधून काढला होता.
जेनला ही महान शिकवण त्या रात्री मिळाली. पुढची ५० वर्षे जेन ने वेगवेगळ्या मॅटर्निटी वॉर्डमध्ये bकाम केले. तिला उत्तम नर्स म्हणून अनेक बक्षिसे मिळाली. मान- सन्मान मिळाले. तिने कित्येक जाणारी बाळे पण बघितली आणि नॅन्सीची शिकवण डोळ्यापुढे ठेऊन त्या प्रत्येक आजारी बाळाला प्रेमाचा स्पर्श दिला. बाळाच्या शेजारी आपला चेहरा आणून त्या बाळाचे कौतुक केले. त्याला जवळ घेऊन बाटलीतून दूध पाजून ती बसून राहिली आणि त्या पलीकडे जाऊन त्या बाळाच्या आईचे सांत्वन केले.
*स्पर्श ही आपण एखाद्या व्यक्तीला दिलेली अमूल्य भेट आहे. दोन हाताच्या उबेतून एक शब्द न बोलता आपले प्रेम दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोचवणारी! आपल्यातले तेज दुसऱ्याला देऊन त्या व्यक्तीचे जग उजळवून टाकणारी! एक पाठीवरची प्रेमळ थाप सर्व ताणातून मुक्त करण्यास पुरेशी असते.*
*जगात अनेक प्रकारची कनेक्टीव्हीटी आली आहे पण माणसाचा एकटेपणा काही कमी होत नाही..म्हणून एखाद्या व्यक्तीला भेट द्यायची असेल प्रेमळ स्पर्शाची भेट द्यावी. शेजारी श्रोता होऊन बसावे आणि त्या व्यक्तीचा एकटेपणा दूर करावा*.
बुद्धिबळपटू बॉबी फिशर ने म्हटले आहे, "*Nothing is so healing as the human touch."*
Friday, August 2, 2024
सत्संगती
*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*
*🚩श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर🚩*
*सदवस्तू साध्य करून घेण्याचा उपाय सत्संगती .*
एखाद्या दारूबाजाप्रमाणे विषयी मनुष्य वागत असतो. त्याला सर्व कळते, पण वळत नाही. एकीकडे स्वतःला तो परमात्म्याचा अंश म्हणवितो, आणि दुसरीकडे विषयांच्या आहारी जातो. खरोखर, भक्तीशिवाय सर्व काही वाया आहे. संताजवळ राहावे आणि भक्तीचे साधन करावे. आपल्याला काही करायचे उरले आहे असे जे वाटते, ते न वाटू लागले, म्हणजे साधनात प्रगती झाली असे समजावे. भगवंताची भक्ती घडायला गुरूसेवा हे एक मुख्य साधन आहे. जो शिष्य आज्ञा पाळतो त्याला भेटणे गुरूला भागच पडते. वास्तविक, गुरू मनात काही इच्छाच येऊ देत नाही; म्हणून कामधेनूपेक्षाही गुरू श्रेष्ठ आहे.
अत्यंत तळमळीशिवाय भगवंताचा योग शक्य नाही. संतसमागम प्रारब्धाने होतो, पण 'सम' रीतीने जाता आले तर खरा 'समागम' घडतो. पण आमचा मार्ग विषय आहे; म्हणून संत भेटूनही त्याचा 'समागम' आपल्याला होत नाही. विषयांमध्ये धुंद असलेल्या आम्हांला पाहून संतांच्या मनात कालवाकालव होते; त्याची आपल्याला कल्पनाही येणार नाही. आपली बुद्धी आपल्याला समाधानप्रत नेत नाही, तर दुसर्याची मदत घेणे आवश्यक आहे. अशा वेळी, ज्यांची मदत आपण घेतो त्यांचे आपण ऐकायला नको का ? भगवंताच्या जिज्ञासेचा मार्ग आक्रमायला संतांनी सांगितले. संतांना जिज्ञासा मूळचीच असते. आपल्याला ती नाही, म्हणून ती उत्पन्न करणे भाग आहे. काही केल्याशिवायच सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय, म्हणजे सत्संगती हा होय. सत्संगती अती अपूर्व काम करणारी आहे. ज्याचे भाग्य थोर असेल त्यालाच ती लाभेल. एखादा मनुष्य भोवर्यात सापडला तर त्याला बाहेर काढण्याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग असा की, दुसर्या चांगल्या पोहणार्याने त्या भोवर्यामध्ये उडी मारून तो फोडायचा आणि बुडत्याला बाहेर ओढून काढायचे. पण यासाठी शक्ती फार लागते. दुसरा मार्ग असा की, आपणच भोवर्यामध्ये बुडी मारून तळाशी जायचे आणि खालून बाहेर निघायचे. विद्वत्ता ही भोवर्यासारखी आहे. वर वर पाणी फिरत असते तरी तळाशी ते संथ असते. तसे, जे लोक वरवर विद्या शिकतात ते वादाच्या आणि मतांतराच्या चक्रात सापडतात; पण जे लोक खोल तळाशी जातात त्यांना खरे काय ते आपोआप कळते, आणि ते सगळीकडे एकच असते. विद्येच्या भोवर्यामध्ये सापडणार्यांना बाहेर ओढून काढण्याचे काम फार मोठया संतांचे असते. शहाण्याने त्या भानगडीत न पडावे. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हे खरे संतांचे काम होय.
*१०३ . कोणत्याही सत्पुरूषाची परंपरा रक्षण केली पाहिजे . त्यात आपले घुसडू नये .*
Thursday, August 1, 2024
निष्ठा
मानवी जीवनाचं अंतिम घ्येय काय आहे ज्याच्या पलीकडे ध्येयच नाही. त्याची खूण अशी आहे की ते ध्येय मिळाल्यावर सार्थकता वाटली पाहिजे.कृतकृत्यता वाटली पाहिजे. कृतकृत्य म्हणजे जे काही करायचे होते ते करून झालं. तर त्याचा परिणाम काय तर अत्यंत समाधान. राजाला लाजवील असं समाधान मिळालं पाहिजे. मनुष्य म्हटला की त्याला जो देह मिळाला आहे आणि त्या देहाला सांभाळणार जे मन आहे ते तर अतिशय निराळे आहे. म्हणून श्री.गोंदवलेकर महाराज म्हणाले *"माणसाचे शरीर आणि त्याचे मन हा भगवंताचा प्रसाद आहे."* पण आपल्याला तसे वाटत नाही.
आपण कसे आहोत तर वासनेने भरलेले आहोत. म्हणजे मला अमुक हवं, तमुक नको याचे नाव वासना. आपण स्वतःशी विचार करावा की "आता मला काही नको." असं खरं वाटत का ? अगदीच नाही तरी मृत्यू तरी शांत यावा असे तरी वाटते ना. मग देह आणि मन हा प्रसाद आहे म्हणजे परमात्म्याची देणगी आहे. याच कारण की माणसाला जी कृतकृत्यता येते , म्हणजे आणखी काही मिळवायचे राहत नाही ती, माणसाला या देह आणि मनातूनच मिळविता येत. याचे नाव परमार्थ. म्हणून देहाला आणि मनाला महत्व आहे. श्री.भाऊसाहेब केतकर होते ते म्हणाले "महाराज भेटले आता काय मिळवायचे राहिले आहे ?" ही खरी गुरुवरची निष्ठा आहे. यात खरं समाधान आहे.