आपण साधना करतो तेव्हा स्थूलातून सुक्ष्मात जात असतो. इंद्रिय स्थूल त्यातून आपण सुक्ष्मात जातो. आपल्या शरीररचना पहिली तर चार प्रमुख अंग आहेत. पाहिले इंद्रिय नाक, कान डोळे जीभ आणि त्वचा. दोन गंध,शब्द, रूप, रस, स्पर्श . तिसरं आहे प्राण हे वेगळं करता येत नाही कारण ते मनाला आणि इंद्रियांना प्रेरणा देते. चौथे आहे मन . मानसशास्त्राने मन बुद्धी आणि अहंकार हे तिन्ही एकत्र केले आहे. सूर्य अस्ताला गेला की त्याची प्रभा त्याच्या मागे जाते तस मन आणि बुद्धी भगवंताला अर्पण केली की अहंकार त्याच्या मागे जातो. इंद्रिय सगळ्यात स्थूल त्यातून आपण सूक्ष्मात जातो. प्राण वेगळा काढता येत नाही. एक साधनी बाई आठ दहा वर्षे नामस्मरण करत होत्या. त्या नामस्मरण करायला बसल्या इंद्रिय सूक्ष्मात गेली की त्यांना सुगंधाचा अनुभव यायचा. आपल्या गुरूंची प्रचिती आपल्या सुगंधामध्ये येते. आपला देह हा पंचमहाभूतांचा. या पंचमहाभूतांमध्ये एकापेक्षा एक सूक्ष्म भुत आहेत. सगळ्यात स्थूल पृथ्वीतत्व त्याचा अनुभव सुगंध, त्यानंतर सूक्ष्म पाणी , मग अग्नी, वायू आणि सगळ्यात शेवटी सूक्ष्म आकाश. आकाशाचा गुण आहे शब्द. साधकाची साधनांमध्ये प्रगती होत असताना त्याला सुगंधाचा अनुभव येईल नंतर तेज प्रकाश दिसेल शेवटी नामाचा जो आवाज आहे नामाचा जो शब्द आहे या शब्दाची शांती होऊन आतला शब्द उमटतो. हा शब्द आहे तो भगवंताचा शब्द आहे. ह्याला अनाहत नाद म्हणतात. हा आतला आवाज यायला लागला की अधिक नांम घ्यावस वाटेल. मोठे ज्ञानी पुरुष नामाला महत्व देतात कारण आजच्या अवस्थेमध्ये प्रपंचात उलथापालथ न करता जे साधन करता येईल ते नाम आहे.
TechRepublic Blogs
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment