वैखरीने नाम घेणे महत्वाचे आहे कारण वैखरी देहाचा उंबरठा आहे. श्रीगोंदवलेकर महाराजांनी सांगितले आहे की घरात आणि अंगणात असं दोन्हीकडे जर प्रकाश हवा असेल तर दिवा उंबरठ्यावर ठेवतात.
त्याप्रमाणे अंतरंगात आत्मज्योत आणि लौकिक जगात यश, कीर्ती संपादन करण्यासाठी नामदीप उंबरठ्यावर लावायला हवा म्हणजे मुखमध्ये अखंड नाम ठेवावं." वैखरी शब्दाचा अर्थ मुखाने उच्चारणे.
दुसऱ्याला ऐकू जाईल अशा पद्धतीने म्हणणं असा जर त्याचा अर्थ घेतला तर तो चुकीचा ठरेल. श्रीगोंदवलेकर महाराजांनी वैखरीची व्याख्या खूप सोपी करून दिलेली आहे. ते म्हणतात वैखरीचा उच्चार असा करावा की तो फक्त आपल्याच कानांना ऐकू जाईल. मोठ्याने नामसमरण केलं तर काय होतं असा अनेकांना प्रश्न असतो. याचं उत्तर असं की आपल्या ब्यांकेच्या पासबुकामधील नोंदी, शिल्लक रक्कम मोठ्याने ओरडून सांगू का ? नाही ना पासबुक आपण मनातल्या मनातच वाचत असतो ना ?
आपण कमावलेल्या धनाची बातमी आपल्या कानापूरती मर्यादित असावी असेच आपणांस वाटते ना ! तसं दिक्षामंत्र हा सद्गुरूंची शिष्याला दिलेला हा मंत्र त्याच शिष्याकरिता असतो, तो त्याचा निजठेवा असतो. त्याने तो मंत्र स्वतःस ऐकू जाईल एवढ्याच आवाजात म्हणवायचा असतो.
No comments:
Post a Comment