*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*🌺🙏नामप्रभात🙏🌺*
*भगवंताच्या नामाची त्याच्या अस्तित्वाची विस्मृतीतच समस्त पापांची खाण आहे हे संत जाणून असतात. श्रीमहाराज तेच सांगतात, ' भगवंताच्या विस्मरणासारखं मोठं पाप दुसरं कुठलं नाही. ' ज्याक्षणी भगवंताच्या अस्तित्वाची विस्मृती होते त्या क्षणी मी सत्य होतो, हे जग सत्य होतं आणि माझी वासनापूर्ती व्हावी या दृष्टीने मी जगाकडं पाहू लागतो. जगानं माझ्या वासना पूर्ण कराव्यात हा काम आपल्या जीवनात हा काम आपल्या जीवनात प्रकट होतो. अधिकाधिक वासना पुऱ्या व्हाव्यात असा लोभ मोह होतो. त्या वासना पूर्ण झाल्या तर त्याचा मद देखील होतो. समजा वासना पूर्ण झाल्या नाहीत तर माझा क्रोध उफाळून येतो. मला न मिळता दुसऱ्याला काही मिळालं तर त्यालाच ते का मिळालं अशा विचारानं माझा मत्सर वाढू लागतो. मलाच सगळं मिळालं पाहिजे असा मोह देखील होतो. हे षड्विकार कशातून निर्माण होतात ? तर मी सत्य आहे, हे जग सत्य आहे असं वाटल्यानं विकार जन्म घेतात. भगवंताच्या नामाला त्याच्या अस्तित्वाला विसरल्यानं विश्व सत्यच आहे ही भ्रामक संकल्पना मूळ धरू लागते. म्हणून भगवंताचं नाम हेच कलियुगामधील सर्वश्रेष्ठ साधन आहे. रामनाम औषधाच्या मात्रेप्रमाणं नित्य नियमित घेत राहिलो तर आपणास इतर कुठलं औषध घेण्याची गरज पडणार नाही. रामनाम निरंतर मुखी असेल तर जसा श्रीमहादेवानं , श्रीमहाराजांनी , श्रीब्रम्हानंदबुवांनी श्रीआनंदसागरांनी अनुभव स्वतः घेतला तसाच तो प्रत्येक जीवाच्या अनुभूतीला येईल.*
*संदर्भ - आनंदसागराचा धनी*
*लेखक - रविंद्रदादा पाठक*
No comments:
Post a Comment