प.पु.परमहंस श्रीरामकृष्ण यांच्या पत्नी सारदादेवी यांच्या भक्तांच्या झालेल्या संभाषणातील गोष्ट
एकेदिवशी माताजी म्हणाल्या "एवढा जप केला काय, नी तेवढा जप केला केला कशानच काही होत नाही. महामायेने रस्ता सोडून दिल्याशिवाय कोणाची काय बिशाद आहे !
हे जीवा शरणांगत हो, केवळ शरणांगत हो. मगच ती दया करून रस्ता सोडून देईल." असे बोलून त्यांनी कामारपुकुरला वास्तव्य करीत असतानाची ठाकुरांच्या जीवनातील एक घटना सांगितली. "
एकदा कामारपुकुरात ज्येष्ठ महिन्यात संध्याकाळी खूप पाऊस पडून मैदान पाण्याने भरून गेली. ठाकूर डोंबवाड्याकडून ससमोरच्या रस्त्याने पाणी तुडवत तुडवत सौचाला चालले होते. तिथं मागूर जातीचे मासे आढळून येतात. पुष्कळ लोक त्यांना काठीने मारीत होते.
एक मागूर मासा ठाकुरांच्या पायाजवळ सारखा घुटमळू लागला. तो पाहून ठाकूर म्हणाले "ह्याला मारू नका रे हा कसा शरणागत होऊन माझ्याजवळ फिरत आहे. कोणाला जमत असल्यास याला तळ्यात नेऊन सोडून या." त्यानंतर आपणच त्याला सोडून आले नी घरी येऊन म्हणू लागले "अहा कुणी जर अशा प्रकारे शरण आला तर त्याचे रक्षण होते."
No comments:
Post a Comment