श्रीराम समर्थ
*"जेथ उंचावलेनि पवाडें !सुखाचा पैसारु जोडे !*
*आपुलेनि सुरवाडें ! उडों ये ऐसा !!"*
आपण मागे पाहिले ना की, ज्या पक्षाला तुम्ही पिंजऱ्यात ठेवले आहे, तो बाहेर काढला तरी पुन्हा तो त्या पिंज-यात जातो . तो आपली आकाशात उडण्याची शक्ती विसरुन जातो. तस आपल होता कामा नये. माझ्या ज्या शक्ती आहेत त्यांचा विकास व्हायला पाहिजे. शिक्षणाचा मूळ हेतू तोच आहे. Education या शब्दात मूळ धातू आहे Educt. हा तर्कशास्त्राचा शब्द आहे. त्याचा अर्थ असा आहे की, तुम्ही एक विधान केल तर त्या विधानामध्ये असलेला जो अर्थ आहे तो पूर्ण रुपाने बाहेर काढण. माणसाच्या अंतर्यामी ज्या ज्या शक्ती आहेत, त्याचा पूर्ण विकास करण हे खर शिक्षणाच काम आहे. म्हणून साक्रेटिस म्हणे की, मी सुईणीच काम करतो. माणसाच्या अंत:करणात असलेल ज्ञान मी बाहेर काढतो. गुरुच खर काम हेच आहे. तुमच्यातल्या ज्या इतर शक्ती आहेत त्या अमाप वाढवण जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या वाढवण हे त्यांचं काम आहे. तुमच्यातल्या इतर शक्तींना एक वाढीची मर्यादा असते पण एकच शक्ती अशी आहे की ती अनंत वाढू शकते आणि ती म्हणजे आत्मस्वरुपाच ज्ञान. इतर शक्ती तुमच्या देहबुध्दीला जोडून असल्यामुळे त्यांच्या वाढीला एक मर्यादा येते. ही शक्ती आत्मस्वरुपाच ज्ञान ज्याला प्रेम म्हणतात, हे संत लोक - ती किती वाढवाल - ती या विश्वाला व्यापून उरेल अस ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.
आपुलेनि सुरवाडे, सुरवाडे म्हणजे मनाची इच्छा. म्हणजे आपल्याला आपल्या मनात आहे तितक उडता आल पाहिजे. किती उंच जाव ? तर सुखाचा पैसारु जोडे, खूप खूप सुख मिळेल इतक्या उंचीवर ती गेल पाहिजे. म्हणजे या दृष्य विश्वाच्या ज्या खेची आहेत , त्या सगळ्या तोडून पलीकडे गेल पाहिजे. याचा अर्थ असा की कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंद राहिला पाहिजे.
( ज्ञानेश्वरी .... बाबा बेलसरे )
*ll श्रीराम जयराम जय जय राम ll*
No comments:
Post a Comment