*🌹🙏श्रीराम समर्थ🙏🌹*
*🌺🙏नामप्रभात🙏🌺*
*श्रीमहाराज त्यांच्या एका अभंगात म्हणतात , ' आजवरी तुम्हां सांगितली मात | नामावीण हित समजूं नका || दीनदास म्हणे सांगतो ते ऐका | अभ्यास वैखरी सोडूं नका || ' वैखरीनं नामस्मरण करण्याचा अभ्यास सोडू नका असं श्रीमहाराज आपणास सांगत आहेत. आनंदसागर महाराज देखील तेच सांगतात. नाम अखंडपणे मुखामध्ये असू दे. वैखरीला अखंड नामाचा चाळा लावून घेतला पाहिजे. वरील अभंगात श्रीमहाराज खरंतर आज्ञा करत आहेत. ' सांगतो ते ऐका ' असं म्हणत आहेत. त्यामुळे याच्यासाठी कुठलंही वेगळे स्पष्टीकरण देण्याची खरंच जरूर नाही. सद्गुरूच्या आज्ञेचं पालन केलं की आपलं काम होतं. श्रीमहाराजांनी इतकं स्पष्ट सांगूनही वैखरीनं नाम घेण्याची गरज काय असंच आपल्याला वाटत राहतं.*
*संदर्भ - आनंदसागराचा धनी*
*लेखक - रविंद्रदादा पाठक*
No comments:
Post a Comment