TechRepublic Blogs

Sunday, August 31, 2025

भक्ति येते

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्रीब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩* 



*मूल  होऊन  भगवंतापाशी  जावे .*


या जगात कर्माशिवाय कोण राहतो ? पण कर्म यथासांग होत नाही याचे कारण, आपण कर्म कशाकरिता करतो याची जाणीवच होत नाही आपल्याला. अधिष्ठानाशिवाय कर्म साधत नाही. मालक पाठीशी असला की कर्म करणाऱ्याला जोर येतो. काही चांगली कर्ममार्गी माणसे भक्तिमार्गी लोकांना नावे ठेवतात. भक्तिभावाने जो राहतो तो दुसऱ्याला नावे ठेवीत नाही. 'मी कोण' हे जाणायला ज्ञान आणि भक्ति लागतेच. तसेच, 'ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या' म्हटले तरी त्याचा अनुभव येण्यासाठी कर्म करावेच लागते. उपासना भगवंताला ओळखून करावी. लहान मूल आईकडे डोळे करून मुकाट्याने दूध पिते, त्याप्रमाणे समर्थांसारख्यांनी जे सांगितले ते आम्ही निमूटपणे करावे. डोळे मिटून जितके काम होईल, अंधश्रद्धेने जे होईल, ते अभिमानाने, ज्ञानाचे डोळे उघडे ठेवूनही नाही होणार. मूल होऊन भगवंताला ओळखावे. याला अडचण एकच असते; माझे 'शहाणपण' आड येते. भक्त मुलांसारखे वागतात देव त्यांचे लाड पुरवितो. कुणी असे म्हणतील की, "भगवंताची आणि आमची ओळख नाही, तर त्याची आम्ही कशी पूजा करावी ?" "त्याला ओळखल्या शिवाय मी भजन करणार नाही" असे म्हणणे वेडेपणाचेच आहे. भगवंताला पुष्कळ मार्गांनी ओळखता येईल. पांडुरंगाकडे जाण्यासाठी काही मार्ग आधी आक्रमणे जरूर आहे. संतांनी अखंड जागृत राहण्याचा मार्ग सांगितला; तो असा की, देहाने प्रपंच करा, पण मन भगवंताच्या ठिकाणी अर्पण करा. मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाल्याशिवाय इतर काहीही करून उपयोग नाही.


ध्येय सत्य असल्याखेरीज चित्ताची स्थिरता होत नाही. पण सत्य अशा ध्येयावर अगोदर पूर्ण श्रद्धा पाहिजे. प्रपंचात जशी प्रेमाची गरज आहे तशी परमार्थात श्रद्धा पाहिजे. 'देव माझा आहे' असे म्हणण्या‍ऐवजी 'मी देवाचा आहे' असे म्हणावे, म्हणजे श्रद्धा उत्पन्न होते. समुद्राचा तरंग असतो, तरंगाचा समुद्र असतो असे नव्हे समाधानात निश्चितपणा असेल तर त्यात समाधान आहे; म्हणून साधन श्रद्धेने करीत जावे. जशी श्रद्धा तशी फळे. आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावे. प्रपंचात कधीच धीर सोडू नये. ज्याप्रमाणे मुंग्यांची राणी जागेवरून हलवली की तिच्यामागे असणाऱ्या हजारो मुंग्या तिच्याबरोबर नाहीशा होतात, त्याचप्रमाणे एक देहबुद्धी काढून टाकली, की आपल्या मनात उठणारे हजारो संकल्प नाहीसे होतात. या देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होते त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. असे आत्मज्ञान झाल्यावर जे पूर्ण समाधान मिळते तेच खरे भगवंताचे दर्शन होय.


*१८९ .  भक्तिमार्ग  हा  प्रेमाचा  मार्ग  आहे .  प्रपंचाकडचे  प्रेम  भगवंताकडे  वळविले  की  भक्ति  येते .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Saturday, August 30, 2025

धनी

 *🌹🙏श्रीराम समर्थ🙏🌹*


*🌺🙏नामप्रभात🙏🌺*


      *श्रीमहाराज त्यांच्या एका अभंगात म्हणतात , ' आजवरी तुम्हां सांगितली मात  | नामावीण हित समजूं नका  || दीनदास म्हणे सांगतो ते ऐका  |  अभ्यास वैखरी सोडूं नका || ' वैखरीनं नामस्मरण करण्याचा अभ्यास सोडू नका असं श्रीमहाराज आपणास सांगत आहेत. आनंदसागर महाराज देखील तेच सांगतात. नाम अखंडपणे मुखामध्ये असू दे. वैखरीला अखंड नामाचा चाळा लावून घेतला पाहिजे. वरील अभंगात श्रीमहाराज खरंतर आज्ञा करत आहेत. ' सांगतो ते ऐका ' असं म्हणत आहेत. त्यामुळे याच्यासाठी कुठलंही वेगळे स्पष्टीकरण देण्याची खरंच जरूर नाही. सद्गुरूच्या आज्ञेचं पालन केलं की आपलं काम होतं. श्रीमहाराजांनी इतकं स्पष्ट सांगूनही वैखरीनं नाम घेण्याची गरज काय असंच आपल्याला वाटत राहतं.*

*संदर्भ - आनंदसागराचा धनी* 

*लेखक - रविंद्रदादा पाठक*

स्थूलातून सुक्ष्मात

 आपण साधना करतो तेव्हा स्थूलातून सुक्ष्मात जात असतो. इंद्रिय स्थूल त्यातून आपण सुक्ष्मात जातो. आपल्या शरीररचना पहिली तर चार प्रमुख अंग आहेत. पाहिले इंद्रिय नाक, कान डोळे जीभ आणि त्वचा. दोन  गंध,शब्द, रूप, रस, स्पर्श . तिसरं आहे प्राण हे वेगळं करता येत नाही कारण ते मनाला आणि इंद्रियांना प्रेरणा देते. चौथे आहे मन . मानसशास्त्राने मन बुद्धी आणि अहंकार हे तिन्ही एकत्र केले आहे. सूर्य अस्ताला गेला की त्याची प्रभा त्याच्या मागे जाते तस मन आणि बुद्धी भगवंताला अर्पण केली की अहंकार त्याच्या मागे जातो. इंद्रिय सगळ्यात स्थूल त्यातून आपण सूक्ष्मात  जातो. प्राण वेगळा काढता येत नाही. एक साधनी बाई  आठ दहा वर्षे नामस्मरण करत होत्या. त्या नामस्मरण  करायला बसल्या इंद्रिय सूक्ष्मात गेली की त्यांना सुगंधाचा अनुभव यायचा. आपल्या गुरूंची प्रचिती आपल्या सुगंधामध्ये येते. आपला देह हा पंचमहाभूतांचा. या पंचमहाभूतांमध्ये एकापेक्षा एक सूक्ष्म भुत आहेत. सगळ्यात स्थूल पृथ्वीतत्व त्याचा अनुभव सुगंध,  त्यानंतर सूक्ष्म पाणी , मग अग्नी, वायू आणि सगळ्यात शेवटी सूक्ष्म आकाश. आकाशाचा गुण आहे शब्द. साधकाची साधनांमध्ये प्रगती होत असताना त्याला सुगंधाचा अनुभव येईल नंतर तेज प्रकाश दिसेल शेवटी नामाचा जो आवाज आहे नामाचा जो शब्द आहे या शब्दाची शांती होऊन आतला शब्द उमटतो. हा शब्द आहे तो भगवंताचा शब्द आहे. ह्याला अनाहत नाद म्हणतात. हा आतला आवाज यायला लागला की अधिक नांम घ्यावस वाटेल. मोठे ज्ञानी पुरुष नामाला महत्व देतात कारण आजच्या अवस्थेमध्ये प्रपंचात उलथापालथ न करता जे साधन करता येईल ते नाम आहे.

Friday, August 29, 2025

असा जर

 वैखरीने नाम घेणे महत्वाचे आहे कारण वैखरी देहाचा उंबरठा आहे. श्रीगोंदवलेकर महाराजांनी सांगितले आहे की घरात आणि अंगणात असं दोन्हीकडे जर प्रकाश हवा असेल तर दिवा उंबरठ्यावर ठेवतात. 

त्याप्रमाणे अंतरंगात आत्मज्योत आणि लौकिक जगात यश, कीर्ती संपादन करण्यासाठी नामदीप उंबरठ्यावर लावायला हवा म्हणजे मुखमध्ये अखंड नाम ठेवावं." वैखरी शब्दाचा अर्थ मुखाने उच्चारणे.

 दुसऱ्याला ऐकू जाईल अशा पद्धतीने म्हणणं असा जर त्याचा अर्थ घेतला तर तो चुकीचा ठरेल. श्रीगोंदवलेकर महाराजांनी वैखरीची व्याख्या खूप सोपी करून दिलेली आहे. ते म्हणतात वैखरीचा उच्चार असा करावा की तो फक्त आपल्याच कानांना ऐकू जाईल. मोठ्याने नामसमरण केलं तर काय होतं असा अनेकांना प्रश्न असतो. याचं उत्तर असं की आपल्या ब्यांकेच्या पासबुकामधील नोंदी, शिल्लक रक्कम मोठ्याने ओरडून सांगू का ? नाही ना पासबुक आपण मनातल्या मनातच वाचत असतो ना ?

 आपण कमावलेल्या धनाची बातमी आपल्या कानापूरती मर्यादित  असावी असेच आपणांस वाटते ना ! तसं दिक्षामंत्र हा सद्गुरूंची शिष्याला दिलेला हा मंत्र त्याच शिष्याकरिता असतो, तो त्याचा निजठेवा असतो. त्याने तो मंत्र स्वतःस ऐकू जाईल एवढ्याच आवाजात म्हणवायचा असतो.

Wednesday, August 27, 2025

अनुभूतीसाठी

 

            श्रीराम,

     नुकताच आंब्याचा सिझन येऊन गेला. त्या आम्रफळाचे रसभरित वर्णन करणे हा झाला एक भाग! त्या फळाच्या माधुर्याचा आकंठ आस्वाद घेणे हा झाला दुसरा भाग!

  एकाला परोक्षज्ञानाने म्हणजे शब्दांच्या साह्याने मिळालेले ज्ञान म्हणता येईल तर दुसरा अनुभव आहे म्हणजे अपरोक्ष ज्ञान.

       ज्याने आंब्याची गोडी चाखली त्यालाच वर्णन करण्याची उर्मी येते, परंतु ज्याने आंबा पाहिला नाही आणि खाल्लाही नाही, त्याचे बाबतीत नुसतेच शब्दाने वर्णन करणे कुचकामी ठरते. संत असे म्हणतात - ब्रह्मानंदी लागली टाळी |तेथे देहाते कोण सांभाळी||

हा त्यांचा स्वानुभव आहे आणि हे आपल्या साठी नुसतेच परोक्ष ज्ञान आहे पण सत्संगाने संतांच्या, सद्गुरूंच्या विचाराच्या सान्निध्यात आनंदाचे साम्राज्य कसे असते ह्याची क्षणमात्र ओळख होते त्या माधुर्याचा आस्वाद घेता आला की मनातील विकारांचे प्राबल्य कमी कमी होऊ लागते.. आणि विमान जसे आकाशात झेप घेण्यापूर्वी धावपट्टी वरून धावते त्या प्रमाणे निरपेक्ष आनंदाच्या अनुभूतीसाठी आपले मन सत्संगाकडे धाव घ्यायला लागते.... हे फक्त सद्गुरू कृपेने शक्य होते.

                     ||श्रीराम ||

शाश्वत समाधान

 *🌹🙏🏻 श्रीराम समर्थ 🙏🏻🌹*


*🌺🙏🏻नामप्रभात 🙏🏻🌺*


*चांगले काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीने परमार्थ साधेल. परमार्थ खालील तीनपैकी कोणत्याही एका गोष्टीने साधेल. पहीली म्हणजे देहाने साधूची संगत. दुसरी म्हणजे संताच्यां वांड्गमयाची संगत व त्याप्रमाणे आचरण. आणि तिसरी म्हणजे भगवंताचे नामस्मरण. नाम घेतल्याने त्यांची संगत आपल्याला अखंड लाभू शकते. संतांना सांगितले ते संशय न घेता विश्वासाने करणे पहीली पायरी. आणि पुढे ते निश्चयानं करणे श्रध्देने आणि प्रेमाने चालू ठेवणे ही शेवटची पायरी. हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे.*


*🍁 श्रीमहाराज 🍁*

Tuesday, August 26, 2025

दृढ श्रद्धा

 दृढ श्रद्धा आणि भक्ती असल्यास संकटकाळी परमेश्वर धावून येतोच. याविषयी थोडासुद्धा संशय मनी बाळगू नये.

!!श्रीराम जय राम जय जय राम!!

एका मंदिरात संत नामदेव महाराजांचे कीर्तन चालू होते. खुद्द बादशहाच्या कानावर त्यांची कीर्ती गेली. तेव्हा नामदेवांचे कीर्तन एकवेळ ऐकून त्यांच्या संतपदाची प्रचीती पाहण्याचा विचार बादशहाच्या मनात आला. एक दिवस नामदेवांचे कीर्तन चालू असता बादशहा तेथे आला आणि त्याने एक गाय आणवून तिचा तेथे वध करविला. नंतर त्याने नामदेव महाराजांना सांगितले, ‘जर ही मेलेली गाय जिंवत करून उठवशील, तरच तू खरा साधू, नाहीतर तुझा शिरच्छेद करीन. किती दिवसांत गाय जिवंत करशील ?’ असे नामदेवांना विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘चार दिवसांत उठवीन”. ते ऐकून बादशहा निघून गेला. हे संकट पाहून नामदेवास फार चिंता वाटू लागली. त्याने पांडुरंगाचा धावा आरंभला. तीन दिवस सारखे कीर्तन करून ‘पांडुरंगा, आता माझा अंत पाहू नकोस. लवकर धाव”, अशी प्रार्थना केली.

चौथ्या दिवशी देवाने नामदेवाच्या अंतःकरणात प्रगट होऊन तात्काळ ती गाय उठवली आणि नामदेवास म्हटले, ‘सावध हो आणि डोळे उघडून पहा’. तेव्हा नामदेव म्हणाला, ‘देवा, चार दिवसांपर्यंत तू माझा अंत का पाहिलास ?’ तेव्हा विठोबा म्हणाला, ‘नाम्या, आताच गाय उठवतो, असे तू म्हणाला असतास, तर मी त्याच वेळी येऊन ती गाय उठविली असती; परंतु तू चार दिवसांची मुदत घेतलीस; म्हणून मला थांबणे भाग पडले. मी तुम्हा भक्तांच्या अधीन आहे. जसे तुम्ही बोलाल, तसे मी त्याच वेळी केल्यावाचून रहाणार नाही’. गाय जिवंत झाल्याची पाहताच बादशहाचा अहंकार गळून पडला आणि तो नामदेवास शरण गेला.

तात्पर्य : दृढ श्रद्धा आणि भक्ती असल्यास संकटकाळी परमेश्वर धावून येतोच. याविषयी थोडासुद्धा संशय मनी बाळगू नये.

सतत नामस्मरण करा

!! श्री महाराज !!

Monday, August 25, 2025

आनंद राहिला पाहिजे.

 श्रीराम समर्थ


*"जेथ उंचावलेनि पवाडें !सुखाचा पैसारु जोडे !*

*आपुलेनि सुरवाडें ! उडों ये ऐसा !!"*

      आपण मागे पाहिले ना की, ज्या पक्षाला तुम्ही पिंजऱ्यात ठेवले आहे, तो बाहेर काढला तरी पुन्हा तो त्या पिंज-यात जातो . तो आपली आकाशात उडण्याची शक्ती विसरुन जातो. तस आपल होता कामा नये. माझ्या ज्या शक्ती आहेत त्यांचा विकास व्हायला पाहिजे. शिक्षणाचा मूळ हेतू तोच आहे.  Education या शब्दात मूळ धातू आहे Educt. हा तर्कशास्त्राचा शब्द आहे. त्याचा  अर्थ असा आहे की, तुम्ही एक विधान केल तर त्या विधानामध्ये असलेला जो अर्थ आहे तो पूर्ण रुपाने बाहेर काढण. माणसाच्या अंतर्यामी ज्या ज्या शक्ती आहेत, त्याचा पूर्ण विकास करण हे खर शिक्षणाच काम आहे. म्हणून साक्रेटिस म्हणे की, मी सुईणीच काम करतो. माणसाच्या अंत:करणात असलेल ज्ञान मी बाहेर काढतो. गुरुच खर काम हेच आहे. तुमच्यातल्या ज्या इतर शक्ती आहेत त्या अमाप वाढवण जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या वाढवण हे त्यांचं काम आहे.  तुमच्यातल्या इतर शक्तींना एक वाढीची मर्यादा असते पण एकच शक्ती अशी आहे की ती अनंत वाढू शकते आणि ती म्हणजे आत्मस्वरुपाच ज्ञान. इतर शक्ती तुमच्या देहबुध्दीला जोडून असल्यामुळे त्यांच्या वाढीला एक मर्यादा येते.  ही शक्ती आत्मस्वरुपाच ज्ञान ज्याला प्रेम म्हणतात, हे संत लोक - ती किती वाढवाल - ती या विश्वाला व्यापून उरेल अस ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. 

      आपुलेनि सुरवाडे, सुरवाडे म्हणजे मनाची इच्छा. म्हणजे आपल्याला आपल्या मनात आहे तितक उडता आल पाहिजे. किती उंच जाव ?  तर सुखाचा पैसारु जोडे, खूप खूप सुख मिळेल इतक्या उंचीवर ती गेल पाहिजे. म्हणजे या दृष्य विश्वाच्या ज्या खेची आहेत , त्या सगळ्या तोडून पलीकडे गेल पाहिजे. याचा अर्थ असा की कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंद राहिला पाहिजे.


( ज्ञानेश्वरी .... बाबा बेलसरे )


*ll श्रीराम जयराम जय जय राम ll*

Sunday, August 24, 2025

रक्षण

 प.पु.परमहंस श्रीरामकृष्ण यांच्या पत्नी सारदादेवी यांच्या भक्तांच्या झालेल्या संभाषणातील गोष्ट 

एकेदिवशी माताजी म्हणाल्या "एवढा जप केला काय, नी तेवढा जप केला केला कशानच काही होत नाही. महामायेने रस्ता सोडून दिल्याशिवाय कोणाची काय बिशाद आहे !

 हे जीवा शरणांगत हो, केवळ शरणांगत हो. मगच ती दया करून रस्ता सोडून देईल." असे बोलून त्यांनी कामारपुकुरला वास्तव्य करीत असतानाची ठाकुरांच्या जीवनातील एक घटना सांगितली. " 

एकदा कामारपुकुरात ज्येष्ठ महिन्यात संध्याकाळी खूप पाऊस पडून मैदान पाण्याने भरून गेली. ठाकूर    डोंबवाड्याकडून ससमोरच्या रस्त्याने पाणी तुडवत तुडवत सौचाला चालले होते. तिथं मागूर जातीचे मासे आढळून येतात. पुष्कळ लोक त्यांना काठीने मारीत होते.

 एक मागूर मासा ठाकुरांच्या पायाजवळ सारखा घुटमळू लागला. तो पाहून ठाकूर म्हणाले "ह्याला मारू नका रे हा कसा शरणागत होऊन माझ्याजवळ फिरत आहे. कोणाला जमत असल्यास याला तळ्यात नेऊन सोडून या." त्यानंतर आपणच त्याला सोडून आले नी घरी येऊन म्हणू लागले  "अहा कुणी जर अशा प्रकारे शरण आला तर त्याचे रक्षण होते."

Saturday, August 23, 2025

कैफ

 🌈🛕⛱️🏆

मूसाफीर ......


*क्षण चोरताना....*


सांबार गँसवर चांगला खळखळ उकळत होता. घरभर त्याचा दरवळ भरुन राहीला. शेजारच्या शेगडीवर इडलीचा पहिला घाणा कुकर मधुन खुणावत होता. बाहेर सगळं उरलेलं कुटुंब. रंगात आलेली क्रिकेट फायनल मँच बघण्यात गर्क. 


स्वप्नाली ला एकदम तीव्र इच्छा झाली. तो गरम सांबार वाफाळत्या इडलीवर ओतून मस्तपैकी आडवा हात मारावा. बाहेर मुलगा, नवरा त्रिभूवन, नातवंड अजुन खायचे आहेत आणि आपण असं सगळ्यांच्या आधी खाणं, तिचं तिलाच नकोस वाटलं.


पण ... तिने घेतलाच बाऊल.

दोन वाफाळत्या इडल्यांवर मस्त बाऊलभर सांबर वाढुन घेतले. सहजच बाहेरची हालचाल बघून ती परत किचनमध्ये आली, 


खुर्चीवर बसुन लुसलुशीत इडलीचा सांबारां बरोबरचा पहिला तुकडा मोडून तिनं तोंडात टाकला. *अंम्म्म आहाहा ऽऽऽ ...*


परफेक्ट जमलेलं काँबिनेशन. त्या दोन इडल्यात स्वप्नाली तृप्त झाली. म्हणजे भूक भागली असं नाही. पण इच्छेची तीव्रता निमली. एक चोरलेला क्षण स्वतःच्या इच्छेसाठी. तिला तृप्ती ची अनुभूती देऊन गेला.आणि तिचा तो क्षण कुणाला समजला देखील नाही.


तिची क्षणाची चोरी निर्धोक झाली.


खरं तर इतक्या वर्षाच्या तिच्या संसारात तिला काही बंधनं नव्हतीच मुळी कुणाची. पण स्वतःच स्वतःसाठी घालुन घेतलेलं एखादं बंधन असतच प्रत्येक गृहीणीपाशी.

स्वयंपाकघरातलं तिचं स्वातंत्र्य अबाधित च असतं पण तरी ही , वाटलं म्हणुन घेऊन खावं असं कधी होतच नाही. सगळ्यांना वाढून तिच्या रसवंती पर्यंत पोहचेतो. पदार्थ गार होऊन गेलेला असतो. 

करुन बघून, दमल्यामुळे कदाचित, खाण्याची इच्छा कमीच उरते. केवळ भुकेसाठी खाणं होत असतं नेहमी. कधीतरी वाटतच त्याला छेद द्यावासा आणि उपभोगावा आपल्याच बंधनांची मुक्तता. त्यासाठी मात्र क्षण चोरण्याची कला अवगत व्हायला हवीय.

असे अगणित चोरटे क्षण रोज खरं तर मनाच्या दारावर दस्तक देऊन जातात. पकडता आले. ते साजरे करता आले तर, आपलंच आपल्याशी एक मस्त नातं जमून जातं.


कधी तरुण होऊन. बेभान गाव ऽऽऽ सं वाटतं. तर कधी हातपाय ताणून गुरफटून जावसं वाटतं. निरभ्र आकाशातले उडते पक्षी कधी शीळ घालायला मजबूर करतात. तर दारातली उमलती कळी दोन क्षण तिला गोंजारायचे मागणे मागते.


रेनकोटचा उद्धार करत कधीतरी धो धो पावसात मनसोक्त भिजावसं वाटतं. तर दाटलेल्या आभाळाशी वाफाळत्या चहा बरोबर कुणाला आठवावंस वाटतं. प्रत्येक क्षणांचा असा कैफ अनुभवासा वाटतो. 

पण व्यस्त आणि रुढी परंपरांची गस्त असणारे क्षण फक्त येतात आणि जातात. त्यावर लक्ष ठेवून 


*बस्स हमे उन्हे चुराना है.* 

    *खुद के लिये ..*

*जीयो जी भर के ऽऽऽ...*


*जिंदगी हंसने गानेके लीये है पल दो पल*

*इसे खोना नही, खोके रोना नही*

*जिंदगी हंसने गानेके लीये*


मूसाफीर हूं यारों .......

🍁🌈🛕⛱️🍁

Friday, August 22, 2025

कर्म

 कर्मामध्ये अमुक एक कर्म माझ्या वाट्याला आलं पाहिजे असे वाटते, पण ते माझ्या हातात नाही. तसंच अमुक एक कर्म केलं तर ते फळ मला मिळेल, हे माझ्या हातात नाही. जीवनात कोणती अशी गोष्ट आहे की तुम्ही ती हमखास करू शकता? जीवनात कोणावर कोणत्या वेळी काय प्रसंग येईल याचा नेम नाही. या विश्वाला एक कारणांची परंपरा आहे. आपण एका संस्कृती मध्ये जन्माला येतो आणि तिची बंधन आपल्या जीवनावर पडतात.

 ज्या परिस्थितीत आपण आहोत, ज्या समाजात आपण आहोत, ज्या भाषेत आपला व्यवहार होतो त्याचं दडपण आपल्या जीवनावर असते. या जीवनामध्ये कर्माची परंपरा आहे आणि त्या परंपरेच्या बाहेर तुम्हाला जाता येत नाही. त्या परंपरेत जन्माला येणे याला प्रारब्ध म्हणतात. 

प्रारब्ध म्हणजेच विश्र्वाच जे कर्म आहे, प्रवाह आहे त्या प्रवाहामध्ये तुम्ही जन्माला येता. मग त्या प्रवाहाचे गुणधर्म लागू होतात. प्रारब्ध म्हणजे विश्वाच्या कर्मसंचयामध्ये माझ्या वाट्याला जे कर्म जन्म घेताना आलेलं आहे ते प्रारब्ध. 

याचा व्यक्तिगत संबंध काय त तर मी अमक्या ठिकाणी, अमक्या वेळी, अमक्या कुटुंबात जन्माला येणे, स्त्री अथवा पुरुष म्हणून आणि माझ्या हातून काय कार्य व्हावं हे विश्वाच्या योजने मध्ये ठरलेलं आहे.

Thursday, August 21, 2025

तिसरा विचार

 *॥श्रीहरिः॥*


कोणत्या कालात देहावसान झालं असता योगी जन्ममरणांपासून मुक्त होतात आणि कोणत्या कालात देहत्याग केल्यानंतर पुनर्जन्माला प्राप्त होतात हे उलगडताना भगवंत म्हणतात, 


*-----------------------------*


॥ॐ श्री परमात्मने नमः ॥

अथश्रीमद्भगवद्गीता अष्टमोध्यायः 


*अग्निर्ज्योतिरह: शुक्लः* 

*षण्मासा उत्तरायणम् ।*

*तत्र प्रयाता गच्छन्ति* 

*ब्रह्म ब्रह्मविदो जनाः ॥* 

*॥८.२४॥*


(श्रीमद्भगवद्गीता अध्याय आठवा अक्षरब्रह्मयोग ८.२४) 


*भावार्थ :- पार्था, शरीरातले अग्नितत्त्व, बाहेरचा दिवसाचा लख्ख प्रकाश, शुक्ल पक्ष आणि उत्तरायणाचे सहा महिने म्हणजेच मकरसंक्रतीपासून - कर्कसंक्रातीपर्यंतचा सहा मासांचा काळ - या शुभ काळात मृत्यू पावलेले योगी ब्रह्मवेत्ते, ब्रह्मपदाला जाऊन पोहोचतात.* 


जे परमब्रह्माला जाणतात ते, अग्निदेवतेच्या प्रभावामध्ये, प्रकाशामध्ये, दिवसाच्या शुभक्षणी शुक्लपक्षामध्ये अथवा सूर्य जेव्हा उत्तरायणात असतो, त्या सहा महिन्यांमध्ये या भौतिक जगतात मृत्यू झाल्यावर परब्रह्माची प्राप्ती करतात.


*-----------------------------*


मागील श्लोकामध्ये सांगितलेल्या दोन मार्गांपैकी एक मार्ग समजावताना भगवान श्रीकृष्ण  म्हणतात, 


*काही अशा योग्य संधी असतात, ज्यावेळी शरीर सोडल्यानंतर मनुष्य परम गतीला प्राप्त होतो, पुन्हा जन्म घेत नाही.* 


"अग्नी ज्योतीच्या प्रभावामध्ये, दिवसाच्या वेळी, शुक्ल पक्षामध्ये आणि उत्तरायण काळामध्ये केलेला देहत्याग सद्गतीला प्राप्त होतो." 


आता एक एक करून यांचे अर्थ समजून घेणे आवश्यक आहे.



*अग्नी ज्योती,* *दिवसाच्या वेळी* हे शब्द ज्ञानाच्या प्रकाशाकडे संकेत करतात. हे साधकाची ज्ञानावस्था, समज दर्शवतात. जिथे, 'मी हे शरीर नाही... शरीराच्या पलीकडील चैतन्य आहे... शरीराचा मृत्यू म्हणजे माझा मृत्यू नव्हे... माझा प्रवास तर पुढेदेखील सुरू राहणार आहे... 


*पुढील प्रवासामध्ये* मला उच्च स्तरांवर जायचं आहे...' हे स्पष्ट असतं. जिथे मृत्यूकाळी कोणताही संभ्रम नसतो. फक्त वरील आवरण

निघण्याचा, दूर होण्याचा तो अनुभव असतो.


*अमावस्येनंतरचे* ते पंधरा दिवस जेव्हा चंद्र आकाराने हळूहळू मोठा होत जातो आणि पौर्णिमेला प्राप्त होतो, हा काळ शुक्ल पक्ष म्हणून ओळखला जातो. चंद्राचा आकार

वाढणं म्हणजे प्रकाश अधिकतम ज्ञानाकडेच इशारा करतो. जो या अवस्थेमध्ये शरीराचा त्याग करतो, तो भगवंताच्या परमधामाला प्राप्त होतो.



*उत्तरायण* ही सूर्याची एक दशा आहे, जेव्हा सूर्य उत्तरेकडे गमन करतो. शास्त्र आणि धर्म यांनुसार उत्तरायणाचा काळ, देवतांचा ‘दिवस' मानला गेलाय. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे, दिवस प्रकाशाचं, ज्ञानाचं प्रतीक आहे. त्यामुळे उत्तरायणामध्ये मृत्यू होणं फार अत्यल्प वेळा घडतं. अर्थात या दरम्यान ज्ञान स्पष्ट आणि प्रखर असतं. मृत्यूसाठी योग्य वातावरण असतं.


*देहत्याग* करतानाचा हा शुभ काळ म्हणजे प्रत्यक्षात आंतरिक बाब आहे. त्यामुळे ती समजावण्यासाठी बाह्य शब्दांची जोड दिली आहे.परंतु कालांतराने हे शब्द आपले अर्थ गमावतात. लोक त्याचे वरवरचे अर्थ समजून म्हणतात, 


"मनुष्याचा मृत्यू अमृतकाळात, अशा शुभ मुहुर्तावर, शुक्ल पक्षामध्ये, उत्तरायणात झाला तरच त्याला सद्गती मिळेल." 


अशा प्रकारे बाह्य व्यवस्थांची जुळवा-जुळव करण्यात, त्यानुसार ठोकताळे बांधण्यातच लोक व्यग्र असतात. या गोष्टींना दिलेल्या अवाजवी महत्त्वामुळे त्यांना अस्सल गोष्टींचंच विस्मरण घडतं. 


*एखाद्याने* मनाच्या शुद्धतेवर कार्यच केलं नसेल, ध्यानाचा /नामस्मरणाचा अभ्यासच केला नसेल, आपली  कर्मे ईश्वराला समर्पितच केले नसतील, 'स्व' अस्तित्वाच्या जाणिवेमध्ये डुबकीच मारली नसेल, त्यामध्ये तल्लीनच झाला नसेल तर हे सगळे बाहेरचे शुभ मुहूर्त साधूनदेखील तो रिटर्न तिकीटच काढणार. 

*अर्थात त्याला पृथ्वीवर परत यावंच लागणार.*



*उत्तरायणाचा अर्थच आहे, अंतर्मुखी होणं.* 

मृत्यूच्या वेळी जर साधक अंतर्मुखी झाला तरच त्याला सद्गती प्राप्त होऊ शकते. या गोष्टीचं ज्ञान त्याला तेव्हाच होईल जेव्हा मनुष्य अंतिम क्षणी मनाला बाह्य गोष्टींपासून दूर त्याला समजेल, की बाहेर जे चाललंय, त्याची काळजी करायची नाही. बस अंतर्मुख होऊन प्रार्थना करायची आहे.


आपण एखाद्याच्या घरी पाहुणे म्हणून जातो तेव्हा परत येताना त्यांनी केलेल्या आदरातिथ्यासाठी त्यांना धन्यवाद देतो. 


*त्याचप्रमाणे* 

अंतिम काळात या पृथ्वीलाही धन्यवाद द्या, जिथे आपण पाहुणे बनून आलो होतो. या पाहुणचारामध्ये आपल्याला जे शुभचिंतक मिळाले त्यांनाही धन्यवाद द्या. 


जे अशुभचिंतक होते, ज्यांनी आपल्याला विरोधाला सामोरं जाण्यासाठी ताकद दिली त्यांना देखील धन्यवाद द्या.आयुष्यात ज्यांच्यासोबत आपले वादविवाद झाले, त्यांची क्षमा मागा आणि जे आपल्याशी वाईट वागले, त्यांना क्षमा करा. आपल्या संपर्कात आलेल्या निर्जीव वस्तूंना देखील धन्यवाद द्या आणि त्यांची क्षमा मागा.आयुष्यभर आपल्याला ही सवय असेल तरच अंतःकाळीदेखील अंतर्मुखी होऊन आपण हे सर्व करू शकाल. तेव्हाच आपल्याला *नॉनरिटर्न* तिकीट मिळेल, *सद्गती प्राप्त होईल.*



*-----------------------------*


*एका प्राचीन मतानुसार,* 


शुक्लगती(देवयानमार्गे) आणि कृष्णगती(पितृयानमार्गे) असे दोन प्रकार आहेत. शुक्लगती म्हणजे शुद्धगती आणि कृष्णगती म्हणजे कुटिलगती. सुर-असुर वृत्तींचा इथे संबंध असावा. ज्याची जशी वृत्ती तशी त्याची गती!


उत्तरायणाचा संबंध इथे येण्याचं कारण कदाचित भौगोलिक परिस्थिती असावी -


म्हणजे *आर्यांचं* सुद्धा मूल वसतीस्थान असावं. वैदिक आर्यांचं मूलस्थान *उत्तरध्रुव प्रदेशात* होतं अशी लोकमान्य टिळकांसह कित्येकांची मान्यता आहे तर कित्येकांचा या विचाराला विरोध आहे. काही अभ्यासक एका विशाल

उल्केच्या टकरीमुळे पृथ्वीचा ध्रुवच बदलला असं मानतात. म्हणजे ध्रुव मेरुपर्वतापाशी होता; अर्थात हिमालयात किंवा मध्य आशियापाशी होता असं मानतात. पण देवांची, ऋषींची वस्ती ध्रुवप्रदेशात होती, असं *महाभारतात* निःसंदिग्धपणे म्हटलं आहे.


*तिथे* सहा महिन्यांचा दिवस आणि सहा महिन्यांची असते. दक्षिणायन कालातील अडीच मास अशा प्रदेशात पूर्णपणे अंधकाराचं साम्राज्य असतं. त्या कालात एखाद्याचा मृत्यू झाला तरत्याच्या मृत शरीरावर अंत्यसंस्कार करता येत नसत. कारण सूर्यकिरणं मृत शरीरावर पडल्याशिवाय ते शरीर शुद्ध होत नाही, अशी तत्कालीन आर्यांची श्रद्धा होती.


त्या कालात नद्यांचे प्रवाह थांबायचे. वनस्पतींची वाढ खुंटायची.ज्योतिर्मय अनी नसायचा. अशावेळी मृत शरीराची विल्हेवाट कशी लावावी हा प्रश्न उभा असे. हिवाळा संपेपर्यंत ते शव एका पेटीत योग्य रीतीनं ठेवण्याची प्रथा होती. पारशी धर्मग्रंथ *'अवेस्ता'* मध्ये त्याचं सविस्तर वर्णन आहे.


मग पुन्हा *उत्तरायण* सुरू झालं, पक्षी उडू लागले, वनस्पती वाढू लागल्या, जलप्रवाह वाहू लागले की त्या शवाची रीतसर विल्हेवाट लावली जायची. उत्तरायणात सूर्य ध्रुव- प्रदेशातच सतत क्षितिजावर फिरत असल्यामुळे मृत शरीराच्या विल्हेवाटीत कोणतीच अडचण येत नसे. म्हणून उत्तरायणाचा काल मृत व्यक्तींसाठी पवित्र मानला जायचा. इजिप्तमधल्या पिरॅमिड्समध्ये देखील मृतव्यक्ती थेट सूर्यलोकी जाव्यात म्हणून त्यांच्या ममीज् करून त्या जतन केल्या जायच्या.सूर्यलोकाला म्हणजेच प्रकाशलोकाला तेव्हा किती महत्त्व होतं ते दिसून येतं.



*एक दूसरा विचार म्हणजे,* 


विशिष्ट वेळी आणि परिस्थितीत *विश्व-द्वारं* *(Star - Gates)* उघडली जात असावीत. ती वेळ साधणारा ग्रहगोलांमधे फिरत न राहता ब्रह्मलोकापर्यंत निसटून जात असावा. रॉकेट्सही विशिष्ट कोनातूनच पृथ्वीच्या कक्षेबाहेर सोडावी लागतात. नाहीतर ती पृथ्वीवर कोसळतात! 


(भीष्माचार्यही उत्तरायणासाठी प्राण धरून होते, हे महाभारतात लिखित आहे.) 


*त्या काळी लोकांना असं कोणतं ज्ञान होतं म्हणून ते उत्तरायण कालाला इतकं पवित्र मानत होते, हे एक गूढ आहे.*



*तिसरा विचार म्हणजे,* 


जीवनभर शुद्धं कर्मं केली तर त्या जीवासाठी या कालात आपोआप स्टार गेटस् मुक्त होत असावीत. २६-२७व्या श्लोकांच्या संदर्भानं हा विचार तपासून बघितला तर तो अधिक योग्य वाटतो.


*पाच हजार वर्षांपूर्वी आपल्या प्राचीन ऋषींना हे ज्ञान होतंच. त्या ज्ञानाचा अर्थ लावणं आज जिकिरीचं जातं.*


या श्लोकांमधून गीताकारांना नेमकं काय सांगायचं आहे? यावर बुद्धिनिष्ठ दृष्टिकोनातून पुष्कळ संशोधन होणं आवश्यक आहे.


*-----------------------------*


संदर्भ ग्रंथ :-

श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीताभाष्य. 

संपूर्ण भगवद्गीता. 



*॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥*

Tuesday, August 19, 2025

षड्विकार

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*🌺🙏नामप्रभात🙏🌺*


     *भगवंताच्या नामाची त्याच्या अस्तित्वाची विस्मृतीतच समस्त पापांची खाण आहे हे संत जाणून असतात. श्रीमहाराज तेच सांगतात, ' भगवंताच्या विस्मरणासारखं मोठं पाप दुसरं कुठलं नाही. ' ज्याक्षणी भगवंताच्या अस्तित्वाची विस्मृती होते त्या क्षणी मी सत्य होतो, हे जग सत्य होतं आणि माझी वासनापूर्ती व्हावी या दृष्टीने मी जगाकडं पाहू लागतो. जगानं माझ्या वासना पूर्ण कराव्यात हा काम आपल्या जीवनात हा काम आपल्या जीवनात प्रकट होतो. अधिकाधिक वासना पुऱ्या व्हाव्यात असा लोभ मोह होतो. त्या वासना पूर्ण झाल्या तर त्याचा मद देखील होतो.‌ समजा वासना पूर्ण झाल्या नाहीत तर माझा क्रोध उफाळून येतो. मला न मिळता दुसऱ्याला काही मिळालं तर त्यालाच ते का मिळालं अशा विचारानं माझा मत्सर वाढू लागतो. मलाच सगळं मिळालं पाहिजे असा मोह देखील होतो. हे षड्विकार कशातून निर्माण होतात ? तर मी सत्य आहे, हे जग सत्य आहे असं वाटल्यानं विकार जन्म घेतात. भगवंताच्या नामाला त्याच्या अस्तित्वाला विसरल्यानं विश्व सत्यच आहे ही भ्रामक संकल्पना मूळ धरू लागते. म्हणून भगवंताचं नाम हेच कलियुगामधील सर्वश्रेष्ठ साधन आहे. रामनाम औषधाच्या मात्रेप्रमाणं नित्य नियमित घेत राहिलो तर आपणास इतर कुठलं औषध घेण्याची गरज पडणार नाही. रामनाम निरंतर मुखी असेल तर जसा श्रीमहादेवानं , श्रीमहाराजांनी , श्रीब्रम्हानंदबुवांनी  श्रीआनंदसागरांनी अनुभव स्वतः घेतला तसाच तो प्रत्येक जीवाच्या अनुभूतीला येईल.*

*संदर्भ - आनंदसागराचा धनी* 

*लेखक - रविंद्रदादा पाठक*

Monday, August 18, 2025

आत्मानात्म

 

           श्रीराम,

     ब्रह्मानंदी लागली टाळी |तेथे देहाते कोण सांभाळी|

अशी संतांची रोकडी प्रचिती आहे. या उलट आमचे असते. आम्ही उभ्या आयुष्यात सर्वाधिक काळजी स्वतःच्या देहाची घेतो. त्यालाच फक्त अग्रक्रम, बाकी सर्व गौण. संत वर्णन करतात ते आनंदाचे साम्राज्य कसे असेल ह्याचे साधे कुतूहल ही आमच्या मनात उमटत नाही. धावपट्टीवरून सुसाट प्रस्थान करणारे विमान हे भूमीवरचे सर्व काही सोडून थेट अंतराळात झेपावते आणि ढगांच्या ही वरती पोचून विहरत प्रवास करते.

              तसेच आत्मानात्म, सारासार विवेकाने विषयांच्या पलीकडे आणि देहभानाच्या पलीकडे पोहचू शकल्यास एक विलक्षण तटस्थ, प्रसन्न आणि आनंदमय साम्राज्यात प्रवेश करता येतो. प्रगाढ शांतीची स्तब्धता, स्थितप्रज्ञता फक्त सद्गुरूंच्या कृपाशिर्वादाने प्राप्त होते.

                    ||श्रीराम ||

Sunday, August 17, 2025

व्हेकेशन्स

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*पू. बाबांना भेटावयाला एक गृहस्थ आले होते त्यांना पू. बाबांनी विचारले, तुमच्या डिपार्टमेंटमधे लोक पैसे खातांत का? ते हो म्हणाले तेव्हां पू. बाबा म्हणाले की आपण तसे करू नये. मागू नये व कोणी दिल्यास ते आपले समजू नये आणि घरी आणू नये. आपल्याला पैशाचा फार आधार वाटतो; ते चूक आहे. आम्हाला व्हेकेशन्स मिळत. एकदा श्रीमहाराजांनी विचारले की व्हेकेशनचा पगार मिळतो ना? मी हो म्हणालो तेव्हा ते म्हणाले की काम न करता मिळालेला पैसा ह्य आपला नव्हे. त्याचा मोबदला म्हणून विद्यार्थ्यांना मोफत शिकवावे किंवा तो पैसा दानात खर्च करावा. मोबदला दिल्याशिवाय पैसा घेणे हे योग्य नाही. ते नीतीला धरून नाही.*


*-- अध्यात्म संवाद*

Saturday, August 16, 2025

सर्वश्रेष्ठ साधन

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*🌺🙏नामप्रभात🙏🌺*


     *भगवंताच्या नामाची त्याच्या अस्तित्वाची विस्मृतीतच समस्त पापांची खाण आहे हे संत जाणून असतात. श्रीमहाराज तेच सांगतात, ' भगवंताच्या विस्मरणासारखं मोठं पाप दुसरं कुठलं नाही. ' ज्याक्षणी भगवंताच्या अस्तित्वाची विस्मृती होते त्या क्षणी मी सत्य होतो, हे जग सत्य होतं आणि माझी वासनापूर्ती व्हावी या दृष्टीने मी जगाकडं पाहू लागतो. जगानं माझ्या वासना पूर्ण कराव्यात हा काम आपल्या जीवनात हा काम आपल्या जीवनात प्रकट होतो. अधिकाधिक वासना पुऱ्या व्हाव्यात असा लोभ मोह होतो. त्या वासना पूर्ण झाल्या तर त्याचा मद देखील होतो.‌ समजा वासना पूर्ण झाल्या नाहीत तर माझा क्रोध उफाळून येतो. मला न मिळता दुसऱ्याला काही मिळालं तर त्यालाच ते का मिळालं अशा विचारानं माझा मत्सर वाढू लागतो. मलाच सगळं मिळालं पाहिजे असा मोह देखील होतो. हे षड्विकार कशातून निर्माण होतात ? तर मी सत्य आहे, हे जग सत्य आहे असं वाटल्यानं विकार जन्म घेतात. भगवंताच्या नामाला त्याच्या अस्तित्वाला विसरल्यानं विश्व सत्यच आहे ही भ्रामक संकल्पना मूळ धरू लागते. म्हणून भगवंताचं नाम हेच कलियुगामधील सर्वश्रेष्ठ साधन आहे. रामनाम औषधाच्या मात्रेप्रमाणं नित्य नियमित घेत राहिलो तर आपणास इतर कुठलं औषध घेण्याची गरज पडणार नाही. रामनाम निरंतर मुखी असेल तर जसा श्रीमहादेवानं , श्रीमहाराजांनी , श्रीब्रम्हानंदबुवांनी  श्रीआनंदसागरांनी अनुभव स्वतः घेतला तसाच तो प्रत्येक जीवाच्या अनुभूतीला येईल.*

*संदर्भ - आनंदसागराचा धनी* 

*लेखक - रविंद्रदादा पाठक*

Friday, August 15, 2025

सुखदुःखे

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩* 


*आपली  सुखदुःखे  श्रीरामाला  सांगा .*


तुम्ही सर्वजण छान सेवा करता आहात याबद्दल शंका नाही. अशीच सेवा अखंड चालू ठेवा, त्यातच कल्याण आहे. त्यानेच आपण तरून जाऊ. जरी कुणी काहीही सांगितले, 'ह्यात काय आहे, त्यात काय आहे, ह्याने काय होणार आहे,' असे म्हटले, तरी तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. परमेश्वराची सेवा वाढवावी तेवढी थोडीच आहे. तो फार मोठा आहे, अमर्याद आहे, त्याला पहायला तशीच सेवाही फार मोठी करायला पाहिजे. त्याला पाहण्यासाठी तशी मोठी शक्तीही आपल्याला लागेल. अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्याने दिव्य दृष्टी देऊन दर्शन घडविले. ती दिव्य दृष्टी आपल्याजवळ नाही, पण ती मिळविण्याची शक्ती आपल्याजवळ आहे. भक्तीची प्रगती ही खरी शक्ति; आणि त्याकरिता अखंड नामस्मरण हेच खरे साधन. श्रीरामप्रभू आपल्या घरातला कुणीतरी आहे याबद्दल खात्री बाळगा. त्याला तुम्ही आपली सुख-दुःखे सांगा. दिवसाकाठी एकदा तरी रामापुढे उभे राहून त्याला अनन्यभावाने शरण जा; दिवस आनंदात जाईल आणि तुमचे दुःख दूर होईल. आपले ज्ञान, शक्ति, वैभव, सत्ता, त्याच्यापुढे काहीच नाहीत. तेव्हा या सर्वांचा विसर पाडून, त्याला शरण जा, आणि त्याच्याजवळ प्रेम मागा. "देवा ! आम्ही जे तुझे दर्शन घेतो ते सर्व बाह्य स्वरूपाचे; तुझे आम्हाला खरे दर्शन घडव. आम्ही अवगुणसंपन्न असू, तुझे दर्शन व्हावे एवढी सेवा आमच्याजवळ नाही, परंतु तू आता आम्हाला क्षमा कर. यापुढे देवा, कितीही संकटे येवोत, आमच्या प्रारब्धाचे भोग आम्ही तुझ्या नामात आनंदाने भोगू. जे काही व्हायचे असेल ते होऊ दे, आमचे समाधान टिकून तुझ्या नामात आमचे प्रेम राहील एवढी तुझी कृपा असू दे."


खरोखर, परमेश्वर भक्ताचे मन पाहतो, त्याचा भाव पाहतो; एरव्ही तो त्याच्याजवळच असतो. जो श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करतो त्याला, परमेश्वर जवळ असून आपल्याला तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्रीच असते. आपल्याला दोन मार्ग आहेत; एक श्रद्धेचा, आणि दुसरा अनुभवाचा. एका गावी पायवाटेने गेले तर फक्त तीन मैलांचे अंतर, आणि मोटारच्या रस्त्याने गेले तर दहाबारा मैलांचे अंतर. श्रद्धा ही त्या पायवाटेसारखी आहे. तिने चालले तर अंतर कमी पडेल. मोटारीचा मार्ग म्हणजे अनुभवाचा मार्ग. मोटार कुठे रस्त्यात बिघडली, किंवा वाटेत कुठे अडथळा आला, की प्रगती थांबते; त्याप्रमाणे अनुभवात काही चुकले की प्रगती खुंटते. तेव्हा शक्यतो आपण श्रद्धेचा मार्ग पत्करावा. सद्‍गुरूच्या शब्दावर विश्वास ठेवून श्रद्धेने आणि प्रेमाने नाम घ्यावे.


*१८७ .   भगवंताचे  नाम  सिद्ध  करून  देणे  हाच  संतांचा  जगावर ‌ सर्वांत  मोठा  उपकार  होय .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

पासवर्ड

 पर्स काढून घेतलेली आई --


     सुटीवर आलेला लेक जीवाची असोशी पुरवतो ही भावनाच मनाला अतीव समाधान मिळतं.त्याच्याबरोबर कुठेही जाणं म्हणजे त्याच्या सहवासाची तहान भागवून घेणं .सून अवतीभवतीनं वावरत काळजी घेते , आवर्जून हवं  नको बघते ,नातू कुशीत शिरत ' आजी गोष्ट सांग ना ' म्हणत लडिवाळ हट्ट धरतो.या सगळ्या क्षणांना मन घागरभर ओसंडून येतं. भरून आलेले डोळे लपवायला प्रयास पडतात. एकेक वर्षाची गॕप एकेका क्षणाच्या पोह-याने भरायची असते.

     लेकाबरोबर चक्क मराठी सिनेमाला त्याच्या कारने निघाले होते.खांद्यावर माझी सवयीची पर्स लटकलेली होती. ती सावरत त्याच्या शेजारी टेकणार तोच त्याने " ती पर्स कशाला बरोबर घेतेयस ?ठेव ती." असं म्हटलं.मी क्षणभर विचार करून पर्स बाहेर उभ्या असलेल्या सुनेच्या हातात दिली. 

     तिने ती तिच्या खांद्यावर घेतली.

     गाडी सुरू झाली.

     सिनेमागृहात सिनेमा सुरू व्हायला अजून थोडा वेळ होता.बाहेर थांबलो.लेकानं चक्क पाॕपकाॕर्न माझ्या हातात ठेवलं.लहानपणी त्याचं बोट धरून मी हिंडवलं असेन,खाऊ दिला असेल त्याचं आरश्यातल्यासारखं प्रतिबिंब दिसायला लागलं उलटी प्रतिमा !

      मी चुळबुळत होते.अस्वस्थ होते.माझा खांदा इतका रिकामा ? मी एवढी मोकळी ? दोन्ही हात इतके मोकळे कधीच नव्हते. काय करू या मोकळ्या हातांचं ?

       अंधारात पाय-या चढताना कठड्याला धरण्याचंही काम हातांना नव्हतं.लेकानं त्याच्या कणखर हातात हात धरला होता.

       सिनेमा  कसा होता हे माझ्या दृष्टीने फारच दुय्यम होतं.मी मोकळ्या खांद्याने फिरते आहे याचं अपरूप मनात पुन्हा  पुन्हा  उमटत होतं.आज मांडीवर ओझं नव्हतं पर्सचं. 

         कायकाय वागवावं लागत होतं आजवर !

         पैसे ... हं ...साहजिकच    नोटा कमी चिल्लर जास्त असे  असायचे.

          रूमाल,किल्ल्या, पेनं, पिना, आधार,पॕनकार्डची झेराॕक्स,कानातल्या कुडीच्या जोडातलं एकुलतं राहिलेलं, फोननंबर लिहिलेली चिटोरी... वाणसामानाची यादी ....!

        सांसारीक ,सामाजिक अस्तित्वाचे सगळे साक्षीदार पर्समध्ये हजर असतात. पर्स हा आयुष्याचा फेविकाॕल लावलेला जोड आहे.

अशीच भावना तर होती.

         आज याने माझी पर्स काढून ठेवायला लावली.

          खूप मोठ्या जबाबदारीचं आजवर वाहिलेलं ओझं त्याने सहजपणाने उतरवून ठेवायला सांगितलं.सुनेच्या खांद्यावर माझी पर्स होती. ' माझं ' असं जडसं काही या दोघांनी फार उमदेपणाने पेललं असं वाटलं.

         आज माझं टेन्शन चिल्लर झालं होतं.

          लेकाचा खिसा माझं चलन होतं,

          माझं कोणतंही कुलूप उघडण्याचा पासवर्ड लेकाकडे होता.

          माझं आधारकार्ड तोच होता.

माझी वेगळी स्पेस जपणारा कप्पाही त्याच्याचजवळ होता.

           पर्स काढून घेतलेली आई मोकळ्या खांद्याने 

           फिरत होती... मनातली पर्स चेन लागू नये एवढी तट्ट फुगलेली आहे.... !

          ----- आई. 

लेखक माहीत नाही

Thursday, August 14, 2025

हठयोग

 हठयोगामध्ये जसे योगक्रियांचे शरीरावर परिणाम होतात तसे नामस्मरणही बरेच होऊ लागले की त्याचे शरीरावर परिणाम होतात. मुख्यतः हे परिणाम आधी नसांवर होतात. त्या पुरेशा बळकट नसतात त्यामुळे त्यांचा शरीरावर परिणाम दिसू लागतो. जपाचा आणखी एक परिणाम असा की काही वेळा बराच वेळ जप झाल्या नंतर, एका साधकाला मीठ खावे, लोणचे खावे असे वाटू लागले, तर जपा मध्ये प्रेम आले तर गोड पदार्थ ही नकोसा होतो. याचा अर्थ असा की जपाचा नामस्मरणामुळे मनातच पालट होतो असे नाही तर शरीरातही बदल होऊ लागतात. ते हळूहळू साधनास अनुकूल असे होऊ लागते. अध्यात्मिक आरोग्य सुधारू लागते. आधी होणार त्रास ही शरीर अनुकूल बनण्याची पूर्वतयारी असते. अर्थात जो तळमळीने या साधनाकडे वळलेला असेल त्याला साधन करतांना देहाचे बरेवाईट झाले तरी त्याची पर्वा नसते. त्याची तशी तयारीही झालेली असते. पु.श्रीब्रह्मानन्द महाराजांना खूप वेळा जप केल्यामुळे अतिसार होत असे. श्रीअण्णासाहेब घाणेकरांना पचनाचा त्रास व पुढे मूळव्याध झाली. त्यांना श्रीमहाराजांनी जप कमी करायला सांगितला.

Wednesday, August 13, 2025

वळण लागले

 *🌹🌹!! श्रीराम समर्थ !!🌹🌹*


*🌸अपराध्यांना प्रेमाने वळवून सन्मार्गास लावले🌸*


*श्रीमहाराज एकदा गोंदवल्यास ओढ्यावर स्नान करीत होते. त्यावेळी पुढे दोन, मागे दोन  पोलीस शिपाई व मधे दोन चोर, असे सहाजण दहीवडीला कोर्टात हजर रहाण्यास चालले होते.* *शिपायांपैकी एकजण श्रीमहाराजांचा शिष्य होता. आपल्या नाईकाच्या परवानगीने तो ओढ्याकडे श्रीमहाराजांच्या दर्शनासाठी आला . श्रीमहाराजांनी त्यास म्हटले, "आता थोड्याच वेळात रामाचा प्रसाद  होईल. तुम्ही सर्वांनी तो घेवून पुढे जावे."*          

*"आरोपीच्या हातात बेड्या आहेत. त्या काढण्याचा आपल्याला अधिकार नाही, म्हणून त्यांना प्रसाद घेता येणार नाही ,"  अशी सबब शिपायाने पुढे केल्यावर श्रीमहाराज म्हणाले, '' तुमच्या नाईकांना विचारावे, व प्रसाद घेण्यापुरत्या त्यांच्या बेड्या काढल्या तर ते आरोपी पळून जाणार नाहीत, याची हमी मी    घेतो ". नाईकाने ते कबूल केले व सगळेजण पोटभर जेवले. निघायच्या वेळी आरोपी श्रीमहाराजांच्या पाया पडायला आले  असता श्रीमहाराज त्यांना म्हणाले, " या खेपेस जर रामाने गय केली तर आपण चोरी कायमची सोडणार का ? " दोघांनीही ते कबूल केले. पुढे खटला चालला व संशयाचा फायदा मिळून दोघेही सुटले ! ते तसेच गोंदवल्यास आले व श्रीमहाराजांच्या पाया पडले. रामाच्या पायावर हात ठेवून , इतःपर चोरी करणार नाही , अशी शपथ त्यांनी घेतली.* 

*श्रीमहाराजांनी त्यांना नाम दिले. काही दिवस ठेवून घेतले व पाठवणी करतांना प्रत्येकास १०० रु. देवून, एकास मेंढपाळाचा तर दुसर्यास कोंबड्यांचा धंदा करायला सांगितले. दोघांच्याही जीवनाला प्रभू श्रीरामचंद्र व श्रीमहाराजांच्या कृपाशिर्वादाने चांगले वळण लागले.*


*!! श्रीराम जयराम जय जय राम !!*


*प पू सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज*

Tuesday, August 12, 2025

प्राप्तीकरता

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*



*देह  हा  देवाच्या  प्राप्तीकरता  आहे .*


एकदा असे झाले, की एका साधूकडे चोरांनी चोरी केले. ते पळून जात असताना शिष्यांनी पाहिले, तेव्हा चोरांना धरून त्या शिष्यांनी खूप चोप दिला. हे त्यांचे करणे गुरूला समजले, तेव्हा त्या चोरांना आणून, गुरूने त्यांच्या अंगाला तेल वगैरे लावून स्नान घातले, आणि त्यांना पंचपक्वान्नांचे भोजन दिले. हे असे काय करता ? म्हणून शिष्यांनी गुरूला विचारले, तेव्हा त्याने शिष्यांना सांगितले की, "तुम्ही तरी काय करता ? सर्वचजण देवाच्या घरी चोरी करीत आहेत; कारण आपल्याला त्याने हा जो देह दिला तो देवाची प्राप्ती करून घेण्याकरिता म्हणून दिला, परंतु आपण ते न करता त्याच्यापासून विषय चोरतो आहोच की नाही ! म्हणून, विषयात आसक्ति न ठेवता आपण मनापासून देवाची भक्ति करावी. आपण सर्वांनी 'मी भगवंताकरिता आहे' असे मनाने समजावे. सर्व ठिकाणी भगवंतच भरलेला आहे अशी मनाची पक्की खात्री झाल्यावर, मग द्वैत आपोआप नाहिसे होऊन जी एकाग्रता साधते, तीच खरी समाधी होय.


संत काय करतात ? आपण चुकीची वाट चालत असताना, 'अरे, तू वाट चुकलास' अशी जागृती आपल्याला देतात आणि खरा मार्ग दाखवितात. ते सदासर्वदा समाधिसुख भोगीत असतात, आणि नेहमी भगवंताविषयी सांगत असतात. भगवंताच्या लीला पाहणार्‍यांनाच खरा आनंद मिळतो. आपण एक दाणा शेतात पेरावा आणि त्याबद्दल हजार दाणे घ्यावे, ही भगवंताची लीला आहे. भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते ते सर्व आपल्या ठिकाणी आहे. जसा मारुतीमध्ये देव-अंश होता, तसा तो आपल्यामध्येही आहे. त्याने तो फुलविला, आपण तो झाकून विझवून टाकला. मारुतीचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवावे. त्याचे ब्रह्मचर्य, भक्ति, दास्य आणि परोपकार करण्याची तऱ्हा या गोष्टी आपण शिकाव्यात. मारुती हा चिरंजीव आहे. ज्याची तशी भावना असेल त्याला अजूनही त्याचे दर्शन होईल. मारुतीला सर्व सृष्टी रामरूप दिसली. हेच खरे भक्तिचे फळ आहे. उपासक देहाला विसरला की उपास्यमूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल. 'माझ्या देवाला हे आवडेल का ?' अशा भावनेने जगात वागावे. हाच सगुणोपासनेचा मुख्य हेतू आहे. भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझे कल्याण करणारा आहे, ही जाणीव झाली, की जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेने मिळाले ही भावना होऊन, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळेल. समाधान आणि आनंद हीच खरी लक्ष्मी होय. आपली वृत्ती अशी असावी की, कुणाला आनंद पाहिजे असेल तर त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरी पडत नाही, पण वृत्तीचा आनंद देऊन कधीच संपत नाही.


*१८६ .   वृत्तीचे  समाधान  ही  भगवंताच्या‌  कृपेची‌  खूण  आहे .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Monday, August 11, 2025

कृपाशिर्वाद

 *🌹🌹!! श्रीराम समर्थ !!🌹🌹*


*🌸अपराध्यांना प्रेमाने वळवून सन्मार्गास लावले🌸*


*श्रीमहाराज एकदा गोंदवल्यास ओढ्यावर स्नान करीत होते. त्यावेळी पुढे दोन, मागे दोन  पोलीस शिपाई व मधे दोन चोर, असे सहाजण दहीवडीला कोर्टात हजर रहाण्यास चालले होते.* *शिपायांपैकी एकजण श्रीमहाराजांचा शिष्य होता. आपल्या नाईकाच्या परवानगीने तो ओढ्याकडे श्रीमहाराजांच्या दर्शनासाठी आला . श्रीमहाराजांनी त्यास म्हटले, "आता थोड्याच वेळात रामाचा प्रसाद  होईल. तुम्ही सर्वांनी तो घेवून पुढे जावे."*          

*"आरोपीच्या हातात बेड्या आहेत. त्या काढण्याचा आपल्याला अधिकार नाही, म्हणून त्यांना प्रसाद घेता येणार नाही ,"  अशी सबब शिपायाने पुढे केल्यावर श्रीमहाराज म्हणाले, '' तुमच्या नाईकांना विचारावे, व प्रसाद घेण्यापुरत्या त्यांच्या बेड्या काढल्या तर ते आरोपी पळून जाणार नाहीत, याची हमी मी    घेतो ". नाईकाने ते कबूल केले व सगळेजण पोटभर जेवले. 

निघायच्या वेळी आरोपी श्रीमहाराजांच्या पाया पडायला आले  असता श्रीमहाराज त्यांना म्हणाले, " या खेपेस जर रामाने गय केली तर आपण चोरी कायमची सोडणार का ? " दोघांनीही ते कबूल केले. पुढे खटला चालला व संशयाचा फायदा मिळून दोघेही सुटले ! ते तसेच गोंदवल्यास आले व श्रीमहाराजांच्या पाया पडले. रामाच्या पायावर हात ठेवून , इतःपर चोरी करणार नाही , अशी शपथ त्यांनी घेतली.* *श्रीमहाराजांनी त्यांना नाम दिले. काही दिवस ठेवून घेतले व पाठवणी करतांना प्रत्येकास १०० रु. देवून, एकास मेंढपाळाचा तर दुसर्यास कोंबड्यांचा धंदा करायला सांगितले. दोघांच्याही जीवनाला प्रभू श्रीरामचंद्र व श्रीमहाराजांच्या कृपाशिर्वादाने चांगले वळण लागले.*


*!! श्रीराम जयराम जय जय राम !!*


*प पू सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज*

Saturday, August 9, 2025

अनुसंधान

 *नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ति ll*


सदगुरुंची प्राप्ती झाल्यानंतर ‘गुरुसेवा’ करणे हे शिष्याचे परमकर्तव्य आहे. गुरुसेवा म्हणजे त्यांची आज्ञा पाळणे. मनात कोणताही किंतू न ठेवता, विकल्प येऊ न देता त्यांनी सांगितलेली साधना नित्यनियमाने प्रेमाने करावी. तसेच साधकाची संपूर्ण शरणागती असावी. शरण जाणे म्हणजे १) सदगुरु ठेवतील त्या अवस्थेत समाधानात राहणे. २) त्यांच्या इच्छेत आपली इच्छा मिसळणे. ३) कोणत्याही परिस्थितीत नाम घेण्याचे सोडू नये. ४) नामावर, सदगुरूवर पूर्ण विश्वास, श्रद्धा ठेवणे. त्यांनी सांगितलेले साधन न करता इतर साधन केल्यास वृथा कष्टच होतील आणि पदरात काही पडणार नाही. सदगुरुंना जे शरण जातात त्यांचा कार्यभार सदगुरु उचलतात. त्यांच्या मागे-पुढे उभे राहून ते सत्तारूपाने त्यांना मदत करतात. सदगुरु नावाड्याचे काम करतात. आपली जीवनरूपी नौका योग्य दिशेला घेऊन जातात.


भगवंताच्या आशीर्वादानेच आपली सदगुरुंशी भेट होते व सदगुरुंकडे नाम मिळाल्यानंतरच ईश्वराच्या व्यापक स्वरूपाची महती कळते.


सदगुरुंचे ‘अनुसंधान’ राखणे महत्त्वाचे. कोणतेही प्रापंचिक काम करत असताना सदगुरुंवर मन एकाग्र करणे यालाच अनुसंधान असे म्हणतात. सदगुरुंना दृष्टीआड होऊ न देणे म्हणजेच अनुसंधान. अनुसंधान ठेवण्यासाठी त्यांनी दिलेले नाम नियमितपणे घेणे. प्रपंच करताना आपले लक्ष मात्र सदगुरूंच्या चरणी असावे. ते म्हणजेच अनुसंधान. 


जिथे आपले समाधान होते, संशय, शंका फिटतात तेच गुरुपद म्हणावे. गुरुपद, गुरुतत्व सर्व ठिकाणी एकच असते म्हणूनच -


*ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे । त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे ।*

*मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ॥*


!! श्री महाराज !!

!! श्रीराम जयराम जय जय राम !!

!! श्रीराम जयराम जय जय राम !!

!! श्रीराम जयराम जय जय राम !!

!! श्रीराम जयराम जय जय राम !!

          !! श्रीराम समर्थ!!

Friday, August 8, 2025

आत्मानात्म

 

            श्रीराम,

             आपण सर्वांशी चांगले वागतो ते आपल्यावर झालेले संस्कार आहेत पण आपण चांगले वागूनही काहीजण आपल्याशी वाईट वागतात हे त्यांच्यावर झालेले आहेत म्हणून तिथे दुर्लक्ष करणे हे फार महत्त्वाचे असते. क्रियेवर प्रतिक्रिया देण्यातच आपले आयुष्य संपते.

           मिळालेले सुख उपभोगायचं ते मिरवत नाही बसायचं. प्रत्येक दुःख आणि यातना ही भोगल्यावाचून समजू शकत नाही असे मुळीच नाही. इतरांचे क्लेश, व्यथा आणि दुःखही समजून घेता येतात. मानवी दुःखाचे अनंत प्रकार आहेत त्यात व्याधीच्या यातना, दारिद्र्य, वैफल्य, अपमानशल्य त्यांची तडफड, निराधार बनल्याची त्यांची जीवघेणी जाणीव आणि सर्वात दारूण दुःख म्हणजे मृत्यू!

                 ह्या सगळ्यात सुख किंवा सौख्य म्हणजे काय? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. सौख्य हे उपभोगात आहे की त्यागात? कित्येकदा ज्यात आधी सुख वाटते त्याचे रुपांतर लौकरच दुःखात होऊन बसते. मग सुखरूप होणे म्हणजे काय? यावर सद्गुरू सांगतात - सारासार किंवा आत्मानात्म विवेकाने सुखरूप होणे म्हणजे काय? हे समजून घेता येते.

                          ||श्रीराम ||

Thursday, August 7, 2025

अमृतत्व

 ब्रम्हज्ञानी याज्ञवलक्य सधन गृहस्थाश्रमी होता. त्याला दोन बायका होत्या. एकीचे नाव मैत्रेयी व दुसरीचे नाव कात्यायनी. एके दिवशी याज्ञवल्क्याने मैत्रेयीला हांक मारली व तो तिला म्हणाला "मैत्रेयी मी आता संन्यास घेणार आहे . म्हणून तू आणि कात्यायनी दोघींमध्ये माझ्या संपत्तीची वाटणी करून देतो." कात्यायनी संसारी वृत्तीची साधी बायको होती. 

मैत्रेयी अध्यात्म वृत्तीची बायको होती. तिला पतीच्या संपत्तीची वांटणी हवी होती. परंतु नश्वर संपत्तीची नको होती. तर तिला खरे समाधान देणाऱ्या ब्रह्मविद्येची संपत्ती पाहिजे होती. ती पवित्र संपत्ती याज्ञवलक्यांपाशी आहे हे तिला माहीत होते. तिने पतीला विचारले "हे भगवान पृथ्वीच्या मोलाइतके द्रव्य जर मला मिळाले तर मी मुक्त होईन का ?" त्यांनी उत्तर दिलें " मैत्रेयी तू म्हणतेस ते खरे आहे . द्रव्याने अमृतत्व मिळत नाही." यावर ती म्हणाली " द्रव्याने अमृतत्व मिळत नाही तर ते घेऊन मी काय करू.? अमृतत्व कसे मिळेल ते सांगा " याज्ञवल्क्य प्रसन्न होऊन म्हणाले " मैत्रेयी तू अत्यंत प्रिय भाषण करीत आहेस. ये बैस. ते ज्ञान तुला मी सांगतो . अखेर आपला आत्मा हाच समाधानाचे व प्रेमाचे मूलस्थान आहे. त्या आत्म्यालाच पाहण्याचा प्रयत्न करावा. 

त्याचे चिंतन करावे , त्याचे ज्ञान झाले  की सर्व जगाचे ज्ञान होते." असे याज्ञवलक्य म्हणाले. पैसा मोठा धोका देतो.व्यवहाराला तो अवश्य लागतो. पण त्याचा आधार वाटतो. त्यामुळे त्याचे प्रेम ईश्वरदर्शनाच्या आड येते. पैशाचे प्रेम नसणे ही खरी संतांची दृश्यातील खूण आहे.

Wednesday, August 6, 2025

खळांची व्यंकटी सांडो.

 प्रसिद्ध गायक पं. अब्दुल करीम खान म्हणयाचे मी सुरांना गोंजारतो. त्यांच्याकडे गायन शिकायला जाणारे एक जण श्री.बेलसरे यांना म्हणाले की मला सुद्धा नामाला गोंजारावस वाटते. किती रम्य कल्पना आहे. हे नामाचे प्रेम आले तरच गोंजारणे शक्य आहे. लहान मुलाला आई जशी गोंजारते तसं. हे प्रेम असत. गोंजारण्याच्या क्रियेमध्ये आत सौंदर्याचे भान आहे. त्यात निरागसता आणि सहजता आहे. त्यात रसमयता आहे. पु.श्री.तात्यासाहेब केतकर सांगायचे की श्रीमहाराजांकडे गेलं आणि त्यांनी पाठीवरून हात फिरवला की शरीरावर रोमांच यायचे. म्हणजे गुरु तुम्हाला गोंजारतात. पण त्यासाठी निरागस झालं पाहिजे. जिथे अहंकार आहे तिथे निरागसता शक्य नाही. मूल मोठं होऊ लागलं की त्याचा अहंकार वाढू लागतो आणि त्यामुळे त्याची निरागसता नाहीशी होते. श्री.गोदवलेकर महाराज म्हणाले की कमी दिवसाचे मूल जसं कापसात गुंडाळून ठेऊन सांभाळतात तशी मी लोकांची अंतःकरण सांभाळली. माणूस हा चांगल्यावाईटाच मिश्रण आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले खळांची व्यंकटी सांडो.

Tuesday, August 5, 2025

स्टेडियम

 "तुम्ही घाटी लोक काय स्टेडियम बांधनार ", मराठी माणसाच्या अपमानातून उभे राहिले वानखेड़े स्टेडियम... 👌👌👌👌


मुंबईतील प्रचलित वानखेडे स्टेडियम हे भारतातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहे. हे स्टेडियम १९७५ मध्ये बांधले गेले. या स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात २३ ते २८ जानेवारी १९७५ दरम्यान खेळला गेला होता.


त्यानंतर या स्टेडियमवर अनेक क्रिकेट सामने रंगले. पण सध्या प्रचलित असलेले हे स्टेडियम मराठी माणसाच्या अपमानातून उभे राहिले होते.


वानखेडे स्टेडियमच्या उभारणीत दडलाय मराठी माणसाचा अपमान...


मुंबईतील सध्या प्रसिद्ध असलेले वानखेडे स्टेडियम उभारण्याआधी मुंबईत आधीपासूनच ब्रेबॉर्न हे एकमेव क्रिकेट स्टेडियम होते. हे स्टेडियम CCI (क्रिकेट क्लब ऑफ इंडिया)च्या अंतर्गत असून मुंबईतील सर्व आंतरराष्ट्रीय सामने या स्टेडियमवर खेळले जायचे. त्या काळी ते खूप प्रसिद्ध स्टेडियम होते. त्यावेळी विजय मर्चंट (माजी क्रिकेटपटू) त्या स्टेडियमचे अध्यक्ष होते. त्या काळात भाषिक आणि धार्मिक आधारावरती क्लब बनवले जायचे आणि त्यामध्ये स्पर्धा व्हायची.


त्यामुळे विजय मर्चंट यांच्या मनामध्ये मराठी माणसांबद्दल नेहमी एक कटुता असायची. अनेकांच्या मते त्यांना मराठी माणसांबद्दल खूप राग होता.

१९७२ साली बॅरिस्टर शेषराव वानखेडे हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष होते. वानखेडे खूप हुशार व महाराष्ट्राचे पहिले अर्थमंत्रीदेखील होते. तसेच त्यांना क्रिकेटची खूप आवड होती. त्यामुळे त्यांनी MCA आणि BCCI मधील अनेक पदेदेखील भूषवली होती.


शेषराव वानखेडे यांचे हे क्रिकेटप्रेम पाहून आमदार प्रस्ताव घेऊन त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी आमदारांसाठी एक क्रिकेट स्पर्धा भरविण्याचा आग्रह वानखेडे यांना केला. सर्व आमदारांचा एक प्रदर्शनीय सामना भरविण्याचा प्रस्ताव त्यांना खूप आवडला आणि त्यांनी यासाठी लगेच होकार दिला. वानखेडे यांच्याकडून होकार मिळाल्यानंतर हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जावा यासाठी विजय मर्चंट यांची परवानगी घेण्याचे ठरवण्यात आले.


आमदारांचा प्रदर्शनीय क्रिकेट सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळण्याची परवानगी मिळावी, असा प्रस्ताव घेऊन वानखेडेंसोबत काही वरिष्ठ नेते, तसेच काही आमदारदेखील विजय मर्चंट यांच्यकडे गेले. विजय मर्चंट यांनी सर्व ऐकून घेतले; पण त्यानंतर त्यांनी त्या प्रस्तावास मंजुरी देण्यास नकार दिला. त्यावेळी ते म्हणाले की, मी आमदारांच्या मॅचसाठी हे स्टेडियम तुम्हाला देणार नाही. कारण- हे इंटरनॅशनल दर्जाचे स्टेडियम आहे आणि इथे फक्त इंटरनॅशनल मॅच खेळल्या जातात. नकार ऐकून सर्व वरिष्ठ नेत्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्नही केला; पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यावेळी त्या ठिकाणी अनेक वाद झाले. शाब्दिक बाचाबाचीदेखील झाली; ज्यात वानखेडे रागात म्हणाले की, तुम्ही देत नाही, तर आम्ही आमचे स्टेडियम स्वतः बांधू. त्यावर मर्चंट यांनी, “तुम्ही घाटी लोक काय स्टेडियम बांधणार?”, या शब्दांत वानखेडे यांना हिणवले.


विजय मर्चंट यांनी केलेला हा अपमान वानखेडेंना सहन झाला नाही. त्याच वेळी त्यांनी ठरवले की, आता काहीही करून मराठी माणसांचे स्टेडियम बांधायचे. काही दिवसांनंतर स्टेडियमचा प्रस्ताव घेऊन वानखेडे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे गेले. पण, त्यावेळी नाईक यांनी मुंबईमध्ये आधीपासून एक स्टेडियम असल्यामुळे तसेच सरकारच्या तिजोरीत नव्या स्टेडियमसाठी पैसे नसल्याने वसंतराव नाईकांनी नकार दिला. पण, वानखेडेंनी हट्ट करून, “तुम्ही फक्त जागा द्या. स्टेडियम बांधण्याची जबाबदारी आम्ही घेऊ आणि स्टेडियम बांधू”, अशी विनंती नाईक यांना केली.

काही दिवसांनंतर वानखेडे यांना नव्या स्टेडियमसाठी जागा मिळाली. मरीन ड्राईव्हजवळ असलेली ही जागा जवळपास सात-साडेसात एकरमध्ये होती. हे स्टेडियम बांधण्याआधी त्यांनी ठरवले की, हे स्टेडियम ब्रेबॉर्नपेक्षा मोठे असायला हवे, याची जबाबदारी त्यांनी शशी प्रभू नावाच्या आर्किटेककडे देण्यात आली. शशी प्रभू यांनी विविध स्टेडियमना भेटी दिल्या आणि प्लॅन तयार केला. अनेकांकडून देणगी गोळा करुन १९७५ साली हे स्टेडियम तब्बल १३ महिन्यात उभारण्यात आले.

 या स्टेडियमसाठी घेतलेल्या कष्टामुळे या स्टेडियमला वानखेडे स्टेडियम, असे नाव देण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत मुंबईतील सर्व आंतरराष्ट्रीय सामने वानखेडे स्टेडियममध्येच होतात.

Monday, August 4, 2025

देवाजवळ दिवा

 *देवाजवळ दिवा का लावावा. आणि कधी लावावा. याच वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण नक्कीच वाचा....🪔🪔* 


*दिवसाला एकूण ८ प्रहर असतात* 

*यात दिवसाला ४ व रात्रीचे ४ चे प्रहर असतात. यात दिवा लावायची वेळ महत्त्वपूर्ण मुख्यता त्या दोन असतात सायंकाळ आणि कातरवेळ पण या दोघांमध्ये फरक असते. तो कसा*


*दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो जो ४ ते ७ वाजे पर्यत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो. सुर्य अस्ताची वेळ आणि सुर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ हीच कातरवेळ असते. जी सध्या ६.४५ ते ७.३० आहे. आणि हिच वेळ दिवा लावण्या साठी योग्य सांगीतली आहे म्हणून आपले पूर्वज म्हणायचे ७ च्या आत घरात*


*सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर ४८ मिनिटांच्या (दोन घटिकांच्या) काळाला ‘संधीकाल’, असे म्हणतात. संधीकाल हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ*


*दिवे का लावावेत हे प्रथम लक्षात घ्यावे.*

*दिवे लावणे म्हणजे अग्नीस आवाहन करणे. सूर्य मावळल्यानंतर, वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्ही कमी होते. यामुळे, जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात. शरिरात प्रवेश करू शकतात व स्वास्थ्य बिघडवू शकतात. वातावरणात सुक्ष्मजीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते, सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा, सर्वत्र दिवे लावून मिळवता येते. म्हणून दिवे लावावेत. तसेच प्रकाशाचीही कमतरता भरुन निघते. ही वेळ अत्यंत महत्त्वपूर्ण कारण*


*बर्‍याचदा वाईट शक्तींचा त्रास हा तिन्हीसांजेच्या वेळी सर्वांत जास्त प्रमाणात होते. अघोरी विद्येचे उपासक तिन्हीसांजेच्या वेळी वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करणार्‍या वाईट शक्तींना नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्ये करवून घेतात. म्हणून तिन्हीसांजेच्या वेळीच मोठ्या प्रमाणावर अपघात, हत्या (खून) होतात किंवा बलात्काराची कृत्ये घडून येतात. या काळाला ‘कातरवेळ’ म्हणजेच ‘त्रासदायक किंवा विनाशाची वेळ’, असे म्हणतात.’*


*तिन्हीसांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्राबल्य अधिक असते. त्यामुळे वायूमंडलातील या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यांवर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते. वायूमंडलात कार्यरत असणार्‍या वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भय (भीती) निर्माण करतात. तिन्हीसांजेच्या वेळी दिवा लावून ‘शुभं करोति’ व संध्या प्रार्थना म्हटल्यामुळे देहाभोवती व घराभेवती संरक्षक-कवच निर्माण होऊन वाईट शक्तींपासून रक्षण होते. तसेच देवाच्या आशीर्वादामुळे देहात कार्यरत असणारी शक्तीची स्पंदने १२ तास सूर्योदयापर्यंत सूक्ष्मातून कार्यरत रहातात. व मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येते. तसेच मुलांमध्ये क्षात्रवृत्ती वाढण्यास साहाय्य होते.*


*असे म्हणतात दिवा लावल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता ह्या राखणदारा सोबत फेरफटका मारतात व ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते तेथे वास करतात. व घरातील व्यक्तींना व घराला वाईट स्पंदनांपासुन संरक्षण करतात तसेच कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक रुप धारण करुन जेथे दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो. कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचे लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रुपाने वावरत आहे. तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकांच्या सखी आहेत त्या कातारवेळी एकमेकींशी गप्पा मारतात म्हणून कातरवेळी तुळशी जवळ दिवा लावला जातो.*


*संध्याकाळी 6.30 नंतर केव्हाही दिवा लावावा, दिवा लावल्यावर घरातील सुवासींनीने दिवा लावला की घराचे मुख्य दार उघडून  हातात हळद कुंकू घेऊन थांबावे व कुलदेवता, ग्रामदेवता, लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे. आणि उंबरठ्यावर हळद कुंकू वहावे. देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव अन् दिवा यांना नमस्कार करावा !*


*हल्ली सगळेच कामात व्यस्त संध्याकाळ नंतर सगळे घरी येतात मग दिवा करायची वेळ चुकते अशा वेळी आल्यावर हातपाय धुवून दिवा नक्कीच करावा कारण जस आई वडील मुलांची वट पाहतात की मुल कधी घरी येतील तीच वाट आपली कुलदेवता देखील बघत असते कारण घरातून बाहेर पडल्यावर परत घरी येईपर्यंत आपली जबाबदारी ही ती घेत असते*


*पण आता दिवस बदललेले आहेत संध्याकाळ झाली की वेद लागतात ते बार, पब, क्लब मधे बाहेर जाण्याचे. दिवा लावण तर दुर राहील बिल येत म्हणून घरातील लाईट सुध्धा बंद करून जातात लोक याचे परीणाम ते वेगळं सांगायला नकोच आपण पहातच आहोत*

Sunday, August 3, 2025

आत्मस्वरूपाचं ज्ञान

 *॥श्रीहरिः॥*


अनन्य भक्तीच्या साधनाने ईश्वराचे परमधाम प्राप्त करणारा जीवात्मा कोणत्या मार्गाने जातो, हे भगवंत सांगतात,


*-----------------------------*


॥ॐ श्री परमात्मने नमः ॥

अथश्रीमद्भगवद्गीता अष्टमोध्यायः 


*यत्र काले त्वनावृत्ति-*

*-मावृत्तिं चैव योगिनः।*

*प्रयाता यान्ति तं कालं* 

*वक्ष्यामि भरतर्षभ ॥*

*॥८.२३॥*


(श्रीमद्भगवद्गीता अध्याय आठवा 

अक्षरब्रह्मयोग ८.२३)


*भावार्थ - हे भरतश्रेष्ठा, कोणत्या श्रेष्ठ अशा पवित्र वेळी देह ठेवला असता योगी पुन्हा जन्माला येत नाही, जन्म-मरण-जन्म ह्या चक्रातून मुक्त होतो आणि कोणत्या अशुभ वेळी देह ठेवला असता तो योगी पुन्हा जन्माला येतो आणि ह्या जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकतो तो काळ मी तुला आता सांगतो.*


हे अर्जुना! आता ज्या वेगवेगळ्या काळी या जगतातून योग्याने प्रयाण केले असता, तो परतून येतो अथवा येत नाही, याचे मी तुला वर्णन करतो.


*-----------------------------*


*भगवान श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात -* 


हे भरतश्रेष्ठ ! 

या पृथ्वीवर मनुष्य जेव्हा शरीराचा त्याग करतो, तेव्हा दोन परिणामांची शक्यता असते. एक तर त्याला पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल किंवा त्याला सद्गती (पृथ्वीवर परत येण्याची आवश्यकता नसणे) प्राप्त होईल. 


भौतिक संपत्ती आणि लौकिक उन्नती हेच लक्ष्य ठेवून जीवन जगणारा मनुष्य जेव्हा शरीराचा त्याग करतो, तेव्हा त्याला पृथ्वीवर परत यावं लागतं, ज्याला आवृत्ती म्हटलं जातं. परंतु जो आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करतो आणि त्या अनुभूतीमध्ये देहाचा त्याग करतो, त्याला पुन्हा पृथ्वीवर यावं लागत नाही, याला अनावृत्ती म्हटलं जातं. हे दोन्ही मार्ग भगवान श्रीकृष्ण पुढील श्लोकांमध्ये सविस्तर समजावून सांगत आहेत.



*देवयान व पितृयान -*

प्राणोत्क्रमणाच्या वेळी त्या काळाच्या अभिमानी देवतेप्रत मनुष्य जातो. जे योगी असतात ते ब्रह्मरूप होऊन परत येत नाहीत. परंतु जे कर्मी असतात ते पुन्हा जन्ममृत्यू चक्रात येतात. परंतु जे ब्रह्माचे ध्यान करतात ते देवयानमार्गे जातात. त्यास पुनरावृत्ति (पुन्हा जन्म) नाही. कर्म करणारे पितृयानमार्गाने जाऊन पुनः परत येतात. 


कर्म करणारे देवयानमार्गाने गेले तरी ते पुनरावृत्ति पावतात.परंतु पितृमार्गाने जाणारे जे कर्मी त्यास क्रममुक्ती सर्वथा प्राप्त होत नाही. त्यांनी केलेल्या कर्मानुसार त्यास लोकप्राप्ती होऊन भोग भोगावे लागतात. हे भोग संपले म्हणजे ते पुन: जन्म पावतात. *म्हणून पितृयान ह्या मार्गाहून देवयान श्रेष्ठ होय.*


देह टाकल्यावर ईश्वररूप होणे किंवा जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडणे ही दोन्ही ठराविक मरणवेळेच्या स्वाधीन आहेत. योग्यांनी योग्य काली देह ठेवला, तर देह ठेवता क्षणीच ते ब्रह्मरूप होतात,अन्यथा अयोग्य वेळी देह टाकला तर पुन्हा संसारात येतात. देह टाकण्यास दक्षिणायनापेक्षा उत्तरायण अधिक चांगले. (पितामह भीष्मही उत्तरायणाला प्रारंभ होईतो- पर्यंत थांबले होते.) 


*संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे,* 

देहातील अग्नितत्त्व शेवटपर्यंत प्रबळ हवे.


'आतां असो हें सकळ । 

जाण पां ज्ञानासि अग्नि मूळ । 

तया अग्नीचें प्रयाणीं बळ । 

संपूर्ण आथी ।' (ज्ञाने. ८.२१९).


'आता हे सगळे असू दे. असे समज की, ज्ञानाला मूळ कारण अग्नी आहे. त्या अग्नीचे मरणकाळी संपूर्ण बळ असावे.' अग्नीशिवाय प्राणांना बळ नाही,शरीरातील ज्ञानकलाही (चेतना) टिकत नाही. 


*-----------------------------*


संदर्भ ग्रंथ :-

गीतासागर पूर्वार्ध - श्री गुरुदेव शंकर अभ्यंकर. 



*॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥*

Saturday, August 2, 2025

प्राप्तीकरता

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*



*देह  हा  देवाच्या  प्राप्तीकरता  आहे .*


एकदा असे झाले, की एका साधूकडे चोरांनी चोरी केले. ते पळून जात असताना शिष्यांनी पाहिले, तेव्हा चोरांना धरून त्या शिष्यांनी खूप चोप दिला. हे त्यांचे करणे गुरूला समजले, तेव्हा त्या चोरांना आणून, गुरूने त्यांच्या अंगाला तेल वगैरे लावून स्नान घातले, आणि त्यांना पंचपक्वान्नांचे भोजन दिले. हे असे काय करता ? म्हणून शिष्यांनी गुरूला विचारले, तेव्हा त्याने शिष्यांना सांगितले की, "तुम्ही तरी काय करता ? सर्वचजण देवाच्या घरी चोरी करीत आहेत; कारण आपल्याला त्याने हा जो देह दिला तो देवाची प्राप्ती करून घेण्याकरिता म्हणून दिला, परंतु आपण ते न करता त्याच्यापासून विषय चोरतो आहोच की नाही !

 म्हणून, विषयात आसक्ति न ठेवता आपण मनापासून देवाची भक्ति करावी. आपण सर्वांनी 'मी भगवंताकरिता आहे' असे मनाने समजावे. सर्व ठिकाणी भगवंतच भरलेला आहे अशी मनाची पक्की खात्री झाल्यावर, मग द्वैत आपोआप नाहिसे होऊन जी एकाग्रता साधते, तीच खरी समाधी होय.


संत काय करतात ? आपण चुकीची वाट चालत असताना, 'अरे, तू वाट चुकलास' अशी जागृती आपल्याला देतात आणि खरा मार्ग दाखवितात. ते सदासर्वदा समाधिसुख भोगीत असतात, आणि नेहमी भगवंताविषयी सांगत असतात. भगवंताच्या लीला पाहणार्‍यांनाच खरा आनंद मिळतो. 

आपण एक दाणा शेतात पेरावा आणि त्याबद्दल हजार दाणे घ्यावे, ही भगवंताची लीला आहे. भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते ते सर्व आपल्या ठिकाणी आहे. जसा मारुतीमध्ये देव-अंश होता, तसा तो आपल्यामध्येही आहे. त्याने तो फुलविला, आपण तो झाकून विझवून टाकला. 

मारुतीचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवावे. त्याचे ब्रह्मचर्य, भक्ति, दास्य आणि परोपकार करण्याची तऱ्हा या गोष्टी आपण शिकाव्यात. मारुती हा चिरंजीव आहे. ज्याची तशी भावना असेल त्याला अजूनही त्याचे दर्शन होईल. मारुतीला सर्व सृष्टी रामरूप दिसली. हेच खरे भक्तिचे फळ आहे.

 उपासक देहाला विसरला की उपास्यमूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल. 'माझ्या देवाला हे आवडेल का ?' अशा भावनेने जगात वागावे. हाच सगुणोपासनेचा मुख्य हेतू आहे. भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझे कल्याण करणारा आहे, ही जाणीव झाली, की जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेने मिळाले ही भावना होऊन, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळेल.

 समाधान आणि आनंद हीच खरी लक्ष्मी होय. आपली वृत्ती अशी असावी की, कुणाला आनंद पाहिजे असेल तर त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरी पडत नाही, पण वृत्तीचा आनंद देऊन कधीच संपत नाही.


*१८६ .   वृत्तीचे  समाधान  ही  भगवंताच्या‌  कृपेची‌  खूण  आहे .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*