TechRepublic Blogs

Tuesday, November 26, 2024

निरोप

 दिवस तो आजचा, सारे अक्कलकोट रडले होते,


कुणी विचार केला न्हवता, असे काही घडले होते..


माझा स्वामी राजा, निरोप घेऊन चालला होता,


अलौकिक शक्तीने, जो साऱ्या ब्रह्मांडात गाजला होता...


काय वर्णू त्याची ख्याती, जो या विश्वाचा बाप होता, अनावर झाले होते अश्रू, जेव्हा त्याने निरोप हा घेतला होता...


क्षणात सारे अक्कलकोट स्तब्ध झाले होते, स्वामींना निरोप द्यायला साक्षात पंच महाभूते आले होते..


पोरके करून निघाला, साऱ्या ब्रह्मांडाचा हा राजा,


क्षणात शांत झाला, माझ्या स्वामींचा गाजावाजा..


संबंध अक्कलकोट हा, दुःखात असा बुडाला,


स्वामींच्या नंतर कोण शोभणार होत त्या वडाला..


पालखीत बसून स्वारी, आली चोळप्पा च्या घरी, शेवटच्या श्वासापर्यंत, ज्याने केली स्वामींची हो चाकरी..


लागली समाधी, माझ्या स्वामी राजाची क्षणात, खंत राहून गेली देवा सोबत राहण्याची, प्रतेकाच्या अंतःकरणात..


आजही आहेत स्वामी माझे, त्याच अक्कलकोटात, चैतन्य रूपात बसले आहेत, प्रत्येक ठिकाणच्या मठात..


आजही हाकेला धाऊन येतात माझे स्वामी, तु आमुची आई, तुझे अजान लेकरू आम्ही..


भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. या वचनाला जागले माझे स्वामी, आधार आहेत आज प्रत्येकाचा, नतमस्तक आहोत सदैव चरणी आम्ही..!!!    

   अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥       

146 व्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम 🙏🙏                                                                                     🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺

No comments:

Post a Comment