*मानवी सवय...*
*(एक खरी गोष्ट)*
पुण्यातील एक महिला *पेइंग गेस्ट* ठेवते. तिचे स्वतःचे वडिलोपार्जित घर आहे, ज्यामध्ये १०-१२ मोठ्या खोल्या आहेत.
प्रत्येक खोलीत ३ बेड ठेवले आहेत. त्यांच्याकडे रुचकर जेवणही उपलब्ध आहे, जे तेथील प्रत्येकाला आवडते.
बरेचसे नोकरदार लोक व विद्यार्थी त्यांच्या *PG* मध्ये राहतात.
प्रत्येकालाच सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण मिळते, ज्यांना गरज आहे त्यांना दुपारचे जेवणही पॅक करुन मिळते.
पण त्या बाईंचा एक विचित्र नियम आहे. तिथे प्रत्येक महिन्यात *फक्त 28 दिवसच* अन्न शिजवले जाते.
उरलेले २-३ दिवस सगळ्यांना बाहेर खावे लागते. तेथील किचनमध्येही शिजवू दिले जात नाही.
किचन सुद्धा फक्त 28 दिवस खुले असते. उरलेले दिवस बंद !
मी त्यांना विचारले, हे असे का? किती विचित्र नियम आहे हा ! तुमचे किचन फक्त २८ दिवसच का सुरू असते ?
त्या म्हणाल्या, आम्ही फक्त 28 दिवसांसाठी जेवणाचे पैसे घेतो. म्हणून किचन फक्त २८ दिवसच चालते.
मी म्हणालो, हा विचित्र नियम तुम्ही बदलत का नाही ?
त्या म्हणाल्या, नाही, नियम म्हणजे नियम !
पुन्हा एके दिवशी मी त्यांना चिडवले, २८ दिवसांच्या त्या विचित्र नियमावरुन.
त्यादिवशी त्या म्हणाल्या, "तुला माहित नाही भाऊ, सुरुवातीला हा नियम नव्हता. मी खूप प्रेमाने स्वयंपाक करून यांना खायला घालत असे. पण त्यांच्या तक्रारी कधी संपतच नसत. कधी ही उणीव, कधी ती उणीव, नेहमीच असमाधानी, नेहमी टीका करणार...
त्यामुळे वैतागून २८ दिवसांचा हा नियम केला. २८ दिवस इथे खा आणि उरलेले २-३ दिवस बाहेर खा.
*त्या ३ दिवसांत त्यांना बरोबर नानी आठवते..!*
मैदा आणि मसूर यांचे भाव कळतात. बाहेर किती महाग आणि निकृष्ट अन्न मिळते हे कळते..
माझी *किंमत त्यांना या ३ दिवसांतच कळते.* त्यामुळे आता उरलेले २८ दिवस ते सुतासारखे सरळ राहतात.
जास्त आरामाची सवय माणसाला असमाधानी आणि आळशी बनवते.
*अशीच परिस्थिती सध्या देशात राहणार्या काही जणांची देखील आहे, ज्यांना देशाच्या प्रत्येक गोष्टीत नेहमीच काही ना काही उणिवा दिसतात.*
*अशा लोकांच्या मते देशात काहीही सकारात्मक होत नाहीये आणि होणारही नाही.*
*अशा लोकांनी काही दिवस पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा श्रीलंकेत घालवावेत, म्हणजे त्यांची बुद्धी ताळ्यावर येईल व या देशाचे महत्त्व त्यांना कळेल !*
No comments:
Post a Comment