TechRepublic Blogs

Thursday, November 21, 2024

मानसपूजा


             श्रीराम,
   मानसपूजेत ईश्वराला म्हणावे, आता ऐसे करावे, तुझ्यात मी विरून जावे आणि फक्त तूच तू पुरावे ||म्हणजे ईश्वरा किंवा सद्गुरू नाथा 'तुमच्या शिवाय मला कोणी नाही, अशा अनन्य भावनेने शरणागत होऊन मानसपूजा करावी. बाह्य कर्मकांडाचे उपचार न करता मनानेच सर्व समर्पण युक्त केलेली देवतेची पूजा म्हणजे मानसपूजा.
              आपण रोज घरी देवपूजा करतो, पण त्यात आपले मन क्वचितच रमते. नैमित्तिक कामाचा भाग म्हणून ती खरंतर एक औपचारिकता झालेली असते. वेळेअभावी किंवा इतर काही कारणाने बाह्यकर्म, पूजा अर्चा जमत नाही तिथे चित्ताची बैठक किंवा स्थिरता कशी निर्माण होणार?
                सगुणाचेनि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे' असे समर्थ म्हणतात पण सगुण आराधना करत करत निर्गुण अवस्थेपर्यंत पोहचण्याइतपत सातत्य आणि निष्ठा आपल्याकडे नसते. अशावेळी या दोघांमधील सुवर्णमध्य साधणारी साधना म्हणजे मानसपूजा होय. ह्यात मनाची सात्विक बैठक सिद्ध होऊन भगवंताशी अनुसंधान राखण्यास मदत ही होते.
        सगुण आराधनेने समाधान आणि त्याचवेळी निर्गुणाकडे होणारी वाटचाल याचा एकत्रित आनंद देणारी उपासना म्हणजे मानसपूजा.
                          ||श्रीराम ||

No comments:

Post a Comment